All the contents on this blog are Copyright Protected.

All the contents on this blog are Copyright Protected.

MyFreeCopyright.com Registered & Protected
Protected by Copyscape Duplicate Content Software

Saturday 15 June 2013

थोडासा पाऊस

थोडस भरलेलं आभाळ आणि पावसाची वाट पाहणारी ती ,
                             थोडासा पाऊस आणि थोडासा मी . 

पावसाची रिमझिम सुरु होतच ती अगदी वेड्यासारखी होते. 
पण मला येताना बघताच घाबरून लपून बसते. 
अशाचं रिमझिम पावसात थोडीसी बावरलेली ती,
                             थोडासा पाऊस आणि थोडासा मी .

पाऊस सुरु होतच मग मी थोडा मुददामच आडोशाला जातो,
लपून छपून मग तिलाच बघत बसतो,
मला अगदी हळूच लपून बघणारी ती ,
                             थोडासा पाऊस आणि थोडासा मी .

पाऊस धो धो सुरु होताच मग मात्र तिला राहवत नाही,
बाहेर पडून पावसात भिजण्याची मजा ती सोडत नाही,
पावसात भिजणारी तरीही पागोळ्यात रमणारी ती,
                             थोडासा पाऊस आणि थोडासा मी .

पावसात ती भिजत असते , पण मनातून मी भिजलेला असतो. 
तिचं ते फुलाप्रमाणे भिजलेलं रूप बघून मी स्वप्नात गेलेला असतो. 
पावसात भिजताना मोगऱ्याच्या फुलासारखी फुललेली ती,
                             थोडासा पाऊस आणि थोडासा मी .

पावसाला मात्र थांबायचे नसते, तो नुसता बरसतच असतो,
मध्येच एखादी वीज चमकवुन तिला घाबरवत असतो,
वीजेलाच जीभ बाहेर काढून वेडावून दाखवणारी ती,
                             थोडासा पाऊस आणि थोडासा मी .

मी अजूनही तीलाच बघत असतो,तीच्या त्या स्वच्छदी जगात हरवलेला असतो,
तिला कशाचेच भान नसते,कारण तीला या जगाचाच विसर पडलेला असतो,
स्वतःचा जगात या जगालाच विसरून गेलेली ती,
                             थोडासा पाऊस आणि थोडासा मी .

अशी आमची कहाणी सुरूच राहते,
                     दरवर्षी येणाऱ्या पावसाबरोबर वाढतच राहते,
तिच्यात गुंतलेला मी , आणि बरसणाऱ्या पावसात गुंतलेली अशी ती,
 आता बराच मोठ्ठा पाऊस आणि त्यात मनसोक्त भिजणारा मी . 


3 comments:

Followers