All the contents on this blog are Copyright Protected.

All the contents on this blog are Copyright Protected.

MyFreeCopyright.com Registered & Protected
Protected by Copyscape Duplicate Content Software

Monday 28 October 2013

" The Original Love Story" (Part 1)"

" अरे .... विनू ?...... अजून घरी नाही गेलास ? ", 
" हो. निघतोच आहे सर आता.",
" OK. पण लवकर घरी जा आणि सांभाळून जा.",
"असं .. का सर ?",
"अरे , बाहेर बघितलास का ? पाऊस सुरु होणार आहे म्हणून बोललो." 
"पाऊस ?.... आता ?" 
" कुठे हरवलेला असतोस कळत नाही. आज तारीख किती आहे माहित नाही वाटते ?",
" नाही सर . खरंच नाही माहित ", 
"अरे माणसा, आज ७ तारीख, ७ जून . आज पावसाची सुरवात होते , एवढं तरी माहित आहे ना ? " त्यावर विनू काही बोललाच नाही. पुढे सर बोलले ," चल निघ लवकर . पाऊस बघ किती धरलाय, कधीही सुरवात होईल . छत्री आहे ना?. " पण विनू कुठेतरी दुसरीकडेच हरवला होता. सरांच्या ते लक्षात आले, ते मनात बोलले ," जाऊ दे . हा काय माझ्याकडे लक्ष देणार नाही,त्यापेक्षा मीच जातो,राहू दे त्याला एकट्याला.  " आणि त्याचे सर निघून गेले. विनू मात्र तसाच उभा होता. 

                एका थंड हवेच्या झोताने त्याच्या office ची एक खिडकी उघडली  आणि पूर्ण office मध्ये छानसा थंडावा आला. तो थंडावा A.C. पेक्षा ही सुखद होता. कारण त्यात ओलावा होता आणि ओल्या मातीचा सुगंध होता. उघडलेल्या खिडकी जवळ विनू आला. बाहेर बघितलं त्याने. छान पाऊस सुरु झाला होता. काहीजण छत्री नसल्याने आडोश्याला उभे होते, काही जण पहिल्या पावसाचा आनंद घेत होते, एकंदरीत छान वातावरण होते ते. पण विनू कसल्या तरी विचारात होता.

                 " आज ७ तारीख, ७ जून आणि उद्या ८ जून , हो. उद्याच तिचा वाढदिवस आहे ना. उद्या ती २७ वर्षाची होईल. काय ना,कशी वर्ष गेली पटापट." स्वतःशीच हसला तो. एव्हाना त्याचं सगळ office घरी गेलं होते. तो एका software company मध्ये  job ला होता. software engineer होता तो. वय वर्षे २८. दिसायला देखणा, उंच ,गोरापान. एकूणच " Handsome" होता तो . office मध्ये सर्व त्याला ओळखायचे,कारण त्याचं काम सुद्धा चांगला होत त्याचं, "famous" होता office मध्ये तो. फक्त त्याची एक गोष्ट  खटकायची आणि ती म्हणजे त्याचा " एकलकोंडेपणा ". गप्प गप्प राहायचा, कधी कोणाशी जास्त बोलायचा नाही, मिसळायचा नाही, कोणी काही विचारलं तरी तेवढ्यापुरताच बोलायचा, कधी कधी कुठे हरवून जायचा तेव्हा तर आपण office मध्ये आहोत, हेच तो विसरून जायचा. आणि पाऊस सुरु झाला कि खिडकीबाहेर कितीतरी वेळ कूठेतरी  बघत राहायचा,अगदी पाऊस थांबेपर्यंत, उशिरापर्यंत office मध्ये थांबायचा, कधी कधी घरी सुद्धा जायचा नाही, अगदी विचित्र वागायचा. परंतु सगळ्यांना माहित होते कि तो वेडा नाही आहे. त्यामुळे त्याला कोणी काही बोलायचे नाही. पण विनू असा नव्हता पहिला.                

                       संध्याकाळचे ७ वाजले होते. watchman office मध्ये कोणी आहे का ते बघायला फिरत होता आणि Light's बंद करत होता. चौथ्या मजल्यावर त्याला विनू दिसला," हे साहेब आज पन एकडच राहनार वाटतीया" अस बोलून तो खाली निघून आला. इकडे विनूच्या मनात वेगळंच चालू होतं काहीतरी. " पहिला पाऊस……तिला पण आवडायचा ना. ती पण कूठेतरी  भिजत असेल आता.… कूठेतरी……. कूठे असेल ती, तिच्या इकडे सुद्धा पाऊस पडत असेल का ? आज इकडे असती तर छान पैकी पावसात भिजता आले असते तिला ना. ……… इकडे असती तर ना.. मग..... मग ती माझ्या जवळ पण असती आज. " ती म्हणजे विनू ची " Best Friend ", ती म्हणजे  विनू ची " कुटूंब ", ती म्हणजे विनू चं सर्व काही होती. विनू कोल्हापूर वरून मुंबई मध्ये आला होता engineering करण्यासाठी, एकटाच. कोणी नातेवाईक नव्हते मुंबई मध्ये. आणि " ती " त्याची मुंबई मधली पहिली " Friend " होती. ती म्हणजे " सुची ".   

                        " सुची " हे काही तिचा खर नाव नव्हते. पण college मध्ये तिला सगळे " सुची " असेच म्हणायचे आणि विनय चे " विनू "   हे नामकरण करण्यामागे तिचाच हात होता. तर त्याची ओळख झाली ती college मध्ये, पहिल्या वर्षालाच. पहिल्यातला विनू म्हणजे डोक्यात सुसाट वारा भरलेला मुलगा. चंचल, बडबड्या, थोडासा मस्तीखोर. पण मनानी मात्र चांगला. सगळ्यांना मदत करायला सतत पुढे. धडपड्या होता अगदी. प्रत्येक नवीन गोष्ट आपल्याला आलीच पाहिजे, या वृत्तीचा. तो उत्तम " Dancer " होता, डोक्याने हुशार असल्याने "chess" त्याला कोणी हरवायचे नाही, असा होता विनू . त्याला अनेक गोष्टी आवडायच्या. पण २ गोष्टी तो मनापासून करायचा. पहिल म्हणजे पावसात भिजणं आणि दुसरं - पावसावर कविता करणे. पावसासाठी अगदी वेडा होता तो. पाऊस सुरु झाला कि नुसता धावत सुटायचा भिजायला. त्यामुळे आई वडिलांची अनेक वेळा त्याने बोलणी खाल्ली होती,पण ते तेवढ्या पुरताच. नंतर परत सुरुवात. तो कविता छान करायचा आणि उत्तम अशा कथा सुद्धा लिहायचा, फक्त " Love  Story's ". " फक्त " Love  Story's " का ? " असा कोणी विचारलं तर सांगायचा , " प्रेम असे काही नसते म्हणून मी त्यावर गोष्टी लिहितो." हे काय बोलायचा ते कोणालाच कळायचं नाही. पण त्याच्या  " Love  Story's "  सगळ्यांना आवडायच्या. 

          college च्या पहिल्या वर्षी, एका दूपारी विनू घरी चालला असताना अचानक पाऊस सुरु झाला . त्याने पटकन छत्री काढली , कारण त्याचाकडे त्यावेळेस काही Book's होती. ते भिजले तर Problem. म्हणून त्याने छत्री उघडली पण त्याच मन त्याला भिजायला सांगत होता. मग तो काय करायचा, हळूच छ्त्री बाजूला करायचा, जरा भिजायचा परत छत्री सरळ करायचा. तो पण भिजायचा आणि book's पण भिजण्यापासून वाचायची. मज्जा ना, छान idea होती त्याची . त्याचा तो प्रताप बाजूला उभी असलेली एक मुलगी कधी पासून बघत होती आणि अचानक तिने त्याला हाक मारली, " ऐ वेडया.... तूला भिजायचे असेल ना तर ती छत्री मला दे. मला घरी जायचे आहे. " त्याने चमकून मागे बघितलं, बंद दुकानाच्या बाजूला एक मुलगी उभी होती , छत्री नव्हती तिच्याकडे. त्याच्या एवढीच उंची होती तिची जवळपास. गोलाकार चेहरा , जराशी सावळीच होती ती. प्रथम त्याला तिचा राग आला , " मला वेडा म्हणते " , पण नंतर त्याला तिची दया आली. तो तिच्या जवळ गेला आणि बोलला ," मी तुला ओळखत नाही, तर मी माझी छत्री कशी देऊ तुला ? " ," अरे , पण मी तुला ओळखते , तू माझ्याच वर्गात आहेस. बर ते जाऊ दे मला छत्री दे . मला उशीर होतो आहे. तू भिज पावसात. " असं म्हणून तिने छत्री ओढली आणि ती पटापट निघून गेली, त्याला काय घडलं तेच कळल नाही. 

          अशी त्यांची पहिली भेट होती. त्याची छत्री तर त्याला मिळालीच नाही,नवीन मैत्रीण मात्र भेटली. त्यांचे पहिले वर्गात कधी पटले नाही, सारखे भांडत असायचे ते. नंतर हळूहळू दोघांना एकमेकांची सवय होऊ लागली. तो एकटाच आला होता मुंबईला,तिच्यामुळे त्याचा केवढा मोठा group तयार झाला होता. विनू तर पहिल्यापासूनच famous होता college मध्ये. त्याचा लूक सगळ्यांना आवडायचा. त्याच्या कविता , " Love story's " college मध्ये खूप famous झाल्या होत्या. सगळ्या मुलींना तो आवडायचा. खूप जणींनी तर त्याला Propose सुद्धा केलं होतं, विनूचा " प्रेम " या गोष्टी वर विश्वास नव्हता,विश्वास होता तो " Friendship " वर आणि "सुची "वर . पण  तिच्या मनात काही वेगळच होत . सुरवातीला जरी त्यांचे पटत नसले तरीहि नंतर तिला विनू आवडायला लागला होता. त्याच्या वाचून तिचा काही करमायाचेच नाही. तिला सारखं विनू जवळ असावा अस वाटायच, विनू ला तिच्या मनातला काहीच माहित नव्हतं. तिनेही त्याला काही कळू दिले नाही. 

असच एक वर्ष निघून गेलं. " सुची " विनूची " Friend " पासून " Best Friend " झाली होती,एकत्र college ला जायचे ,घरी एकत्र निघायचे ,एकाच डब्यात जेवायचे , एकमेकांसाठी जागा अडवून ठेवायची आणि एक गोष्ट दोघांमध्ये common होती ती म्हणजे पावसात भिजणे . एकत्रच भिजायचे . ८ जून ला तिचा वाढदिवस असायचा , त्या दिवशी तर किती मजा  केली होती सगळ्यांनी ,पण केक कापण्याच्या अगोदर " सुची '' एक वाक्य बोलली, " हा वाढदिवस मला जन्मभर लक्षात राहील,कारण आज मला कळल कि खर प्रेम काय असते ते, आणि आज मला ते भेटलं आहे" हे अस का बोलली ती ते कोणालाच कळल नाही , त्या वाक्याचा तो रात्र भर विचार करत होता ,आणि अचानक बाहेर पाऊस  सुरु झाला . मग काय , विनू बाहेर पडला पावसात भिजायला ."एका ठिकाणी उभा राहून काय भिजायचे ?" म्हणून तो चालू लागला . चालता चालता अचानक तो थांबला . विचार करता करता विनू , " सुची " च्या घरासमोर आला होता नकळतपणे . त्याला कळलंच नाही तो तिकडे कसा आला. आणि समोर " सुची " होती पावसात भिजत, तिलाही आश्चर्य वाटलं विनूच. दोघे कितीतरी वेळ एकमेकांना बघत उभे होते. पाऊस थांबला तरी ते तसेच होते. थोडयावेळाने दोघे ही भानावर आले, एकमेकांना काही बोलले नाहीत फक्त हातानेच " bye " केले आणि विनू घरी आला . पावसात त्याला नेहमीच आनंद देणाऱ्या गोष्टी मिळाल्या होत्या, या पावसात त्याला वेगळाच अनुभव आला होता , " याला मैत्री नाही म्हणत ना , मग हे काय प्रेम आहे. इतके सुंदर असते प्रेम ?" आज त्याला  झोप येत नव्हती, एका वेगळ्याच आनंदात होता तो , दुसऱ्या दिवशी college ला जायचे म्हणून त्याला बळजबरीने झोपावे लागले.     

           " साहेब, आज घरी जानार आहात काय ? नायतर मी दरवाजा बंद करतोय , झोपायचे आहे मला ." watchman च्या या शब्दांनी विनू भानावर आला , " निघतो आहे ५ मिनिटात ." अस बोलून त्याने त्याचं सामान उचलल आणि office  च्या बाहेर पडला. पाऊस थांबला होता , छान थंडावा आला होता ,विनूच मनही शांत झालं होत. विनू घरी आला आणि सामान ठेवून त्याच्या बाल्कनी मध्ये येऊन उभा राहिला . पावसाने पुन्हा सुरुवात केली होती , " त्या  दिवशी पण असाच पाऊस होता ना . ज्या दिवशी " सुची " मला पहिल्यांदा भेटली होती." आणि विनू पुन्हा त्याच्या आठवणीत गेला.

           " विनू " आणि " सुची " यांची friendship अजूनच घट्ट झाली होती आणि संपूर्ण college मध्ये त्यांची Friendship famous होती, विनू तिथे सुची ,सुची तिथे विनू असच झालं होत काहीसं . त्यांच्या सर्व मित्रमैत्रिणीनाही ठाऊक होते कि दोघांमध्ये प्रेम आहे. तिलाही तो सुरुवातीपासून आवडायचा आणि विनू लाही ती आवडायची मनापासून ,फक्त कोणी पुढाकार घेऊन मनातली गोष्ट सांगत नव्हत. विनूला मित्रांनी खूप समजावलं कि,"तू पूढे होऊन तिला propose कर " , पण त्याला ते कधीच जमलंच नाही . दिवस असेच आनंदात , मजेत जात होते , दोघे मनानी आणखीनच जवळ आले होते आणि कोणीच पुढे जात नव्हते. आता त्यालाही कळून चुकले होते की खूप उशीर करून फायदा नाही. आपणच तिला विचारलं पाहिजे . त्याने मनाची तयारी केली . फक्त दिवस कोणता तो ठरत नव्हता. तिचा पुढचा वाढदिवस सुद्धा जवळ आला होता. विनूने ठरवलं कि ८ जून हाच दिवस आहे. याच दिवशी त्याला प्रेमाची सावली मिळाली होती ." yes. ८ जूनलाच तिला सर्वांसमोर Propose करायचं ". तिच्या वाढदिवसाची संपूर्ण तयारी झाली होती. ७ जून हा दिवस जाता जात नव्हता , कसाबसा गेला दिवस, त्या दिवशी ती लवकरच गेली college मधून " उद्याची तयारी  करायची आहे " असे म्हणून ती गेली. त्याच्या मनात तर खूप आनंद  झाला होता ,कधीच सांगतो आहे मनातलं  अस त्याला झालं होत.

             ८ जून ............... सकाळीच त्याला जाग आली. आज त्याच्या साठी मोठा दिवस होता ,Infact तो झोपलाच नव्हता रात्रभर. सगळा plan ठरला होता . सकाळी वर्गात वाढदिवस करायचा , मग college सुटल्यावर फिरायला आणि संध्याकाळी पार्टीत तिला Propose करायचा. अगदी perfect plan होता . लवकर उठल्याने तयारी सुद्धा लवकर केली त्याने . छानसा शर्ट ,कडक इत्री केलेला आणि निघाला college साठी बाहेर. बाहेर आल्याआल्या त्याचं लक्ष आभाळाकडे गेलं "आज काय पाऊस पडणार वाटत" असे विनू मनात बोलून , भिजू नये म्हणून झपझप पावलं टाकत college मध्ये आला. Group तर अगोदरच आला होता . फक्त " सुची " आली कि party सुरु . " आज मुद्दाम उशिरा येणार वाटते ही " एक कोणीतरी बोललं तसे सगळे हसले. रोज ७ वाजता येणारी आज ८ वाजले तरी कूठेच दिसत नव्हती. ८ चे ९ , ९ चे १० , १० चे १२ वाजले तरी ती आलीच नाही , त्यावेळी mobile एवढे कोणी वापरायचे नाही आणि तिच्या घरी फोनही नव्हता. शेवटी कंटाळून एक एक जण निघाले .

" संध्याकाळी भेटूया नक्की हा . मोठ्ठी party करूया . मी घेऊन येतो तिला ." असे विनूने सगळ्यांना सांगितले आणि सर्व Group आपल्या घरी निघून गेला. विनू अजूनही थांबला होता . त्याने वर आभाळात पाहिले . अजूनही सकाळचाच पाऊस धरलेला होता . " आज खरंच काहीतरी बिनसलं असणार दोघांच पावसाचं  आणि "सुची" च सुद्धा." तोही घरी निघून आला . " का नाय आली ती . सगळा मूड ऑफ केला . आता भेटू दे संध्याकाळी. भांडणच करतो ." संध्याकाळ झाली तरी ती त्याच्या घरी आली नाही. आता खरोखरच विनूला " सुची "चा राग आला होता. तो तसाच तिच्या घरी गेला. तर दरवाजाला कूलूप. ते बघून तर तो तसाच घरी आला . " एकटीच गेली फिरायला Family बरोबर . आणि मी कोणीच नाही का ? उद्या येऊ दे . बोलणारच नाही." डोक्यात राग घालून तो झोपून गेला. दुसऱ्या दिवशी ती आली नाही . त्याचा राग काही गेला नव्हता. असे ५ दिवस गेले . ती आलीच नाही college ला . आता त्याला तिची काळजी वाटू लागली . " बर नाही वाटतं तिला " college सुटल्यावर तो तिच्या घरी गेला तर कूलूप तसचं होतं. " बहुतेक डॉक्टर कडे गेली असेल " असा विचार करून तो परतला. आणखी ४ दिवस गेले. ती काही college ला आली नाही की त्या दारावरच कूलूप उघडलं नाही. 

विनू तर अगदी वेडा झाला होता. सगळीकडे त्याने विचारलं , शेजारी , तिच्या मैत्रिणीना, तिच्या नातेवाईकांना. कोणालाच माहित नव्हत. एकाकी गायब झाली होती ती. बघता बघता १ महिना झाला,परंतु ती काही आली नाही. विनू तर जवळ जवळ वेडाच झाला होता . ना जेवणात लक्ष ना अभ्यासात . अगदी कोमेजून गेला होता तो . नेहमी हसरा , धडपड्या विनू आता एकटा एकटा राहत होता . कोणीतरी सांगितलं कि ती तिच्या गावी गेली असावी . तसा तोही तिच्या गावी जाऊन आला , ती तिकडे गेलीच नव्हती. आता परीक्षा जवळ आल्या होत्या. आणि शिक्षकांना विनूच असं वागण बघवत नव्हत . त्यांनी त्याच्या आई वडिलांना मुंबई ला बोलावून घेतले, त्यांना सुद्धा विनुला बघून धक्का बसला. थोडे दिवस त्यांनी विनू जवळ राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी विनू च मन पुन्हा वळवलं. विनू परत माणसात परतला, तिची आठवण त्याला सोडवत नव्हती, असेच महिने गेले, वर्षही उलटलं. पुन्हा ८ जून. सुची चा वाढदिवस. त्यादिवशी सुद्धा आभाळ भरलेलं होत आणि  लवकरच पावसाला सुरवात झाली ." आज तरी सुची येणार " त्याला आठवलं तिलापण पावसात भिजायला आवडायचं. मग तोही गेला पावसात भिजायला ." कदाचित ती सुद्धा येईल भिजायला ." पाऊस आला तसा गेला , ती काही आली नाही. मग ही त्याची सवयच होऊन गेली. पाऊस पडायला लागला कि विनू भिजायला जायचा जेणेकरून त्याला सोडून गेलेली " सुची " पुन्हा त्याला भेटायला येईल पावसात.      

               " आज ६ वर्ष झाली. सुची कूठे असेल काय माहित ? " विनू विचार करत उभा होता बाल्कनी मध्ये. ६ वर्ष . ती कूठे गायब झाली अचानक. विनू त्या धक्क्यातून बाहेर आला होता, पण तो तिला विसरला नव्हता. कूठूनही तिची बातमी आली की तो तिथे जायचा, अगदी लगेच. गेल्या ६ वर्षात अर्धे भारतभ्रमण केले होते त्याने, मनापासून प्रेम केलं होत त्याने. तिला शोधण्यातच त्याने इतका वेळ घालवला होता. त्यात त्याचं कविता लिहिण, " Love Story " करणे कधीच मागे पडलं होत. फक्त " सुची " ला शोधायचं हेच त्याला माहित होत. 

       रात्रीचे १२ वाजत होते. विनूला काही झोप येत नव्हती. पाऊस तसाच पडत होता. त्याला एकदम आठवलं " पहिली भेट पावसात झाली होती, मैत्री पावसात झाली होती , प्रेम कळल तेव्हाही पाऊस होता आणि........ आणि ती गेली तेव्हासुद्धा पाऊसच होता . Indirectly , आपण पावसालाच जबाबदार धरत आहोत या सगळ्यांसाठी . तरीही पाऊसच का आवडतो मला ? " या गोष्टी वर त्याला हसायला आल. तो तसाच उभा होता पावसाला बघत, इतक्यात फोन वाजला. तसा विनू वर्तमान काळात परतला. त्याच्या मित्राचा फोन होता , पुण्यावरून. तो पुण्याला JOB ला होता.
 " एवढया रात्री काय काम असेल याच ? " ,
 " Hello…. Hello…विनू .... अरे विन्या जागा आहेस का ? " ,
 " हो ..... रे ... काय झालं ? " , 
" अरे ,, एक गोष्ट सांगायची आहे .", 
" सांग ना.... तुझा आवाज बरोबर नाही येत आहे.…… ",
" ऎक जरा…... नाहीतर फोन बंद होईल…" ,
" हा .... सांग ","मला पुण्यात आपली " सुची " भेटली होती रे ." ,
" काय ......... ? " आणि फोन कट झाला…  

                                                                                                to be continued.............

8 comments:

  1. Aaj mala punha pawsat bhijawes watate

    ReplyDelete
  2. paus majha khup javalacha mitra ahe....karan ya pavasanech mala majhya aayushyachya jodidar milavun dilay....ani ya pavasanech amahala lagnadivashi aashirvadahi dilay

    ReplyDelete
  3. Where is the second part?? पूढे काय होतं ? सुची भेटते त्याला???

    ReplyDelete
  4. Khup chan. Paus ani prem ek vegale cha nate ahe. Start mast ahe.

    ReplyDelete
  5. nice story waiting for 2nd part.... plz update

    ReplyDelete

Followers