All the contents on this blog are Copyright Protected.

All the contents on this blog are Copyright Protected.

MyFreeCopyright.com Registered & Protected
Protected by Copyscape Duplicate Content Software

Wednesday, 21 October 2020

Mastermind !!! (season 1- भाग २ )


D.B. Bank मध्ये चोरी होऊन ६ महिने झाले. चोरांचा काही पत्ता नाही. बँक सुद्धा नव्याने सुरु झालेली. त्या मोठ्या धक्यातून सावरत पुन्हा उभी राहिली होती. जास्त security guard , नव्या सुरक्षा व्यवस्था... नवीन अकाउंट सुरु करताना त्या व्यक्तीचे personl detalis .... ३-४ वेळा चेक केल्यानंतरच पुढील कार्य.... जिथे चोरी झालेली.. ती लॉकर रूम  आता नव्याने सज्ज झालेली. तिन्ही भिंतींना आतून लोखंडी भिंती उभ्या केलेल्या... पलीकडून कोणी पुन्हा चोरी करण्याचा प्रयन्त करू नये , यासाठी तो जुना लोखंडी पाईप सुद्धा सिमेंट टाकून भरण्यात आला, नवीन आणि जास्त CCTV कॅमेरा लावण्यात आले. आणखी उपायोजना करण्यात आल्या पण हे सर्व चोरी झाल्या नंतर.


inspector अभिषेकने या सहा महिन्याच्या काळात आणखी ७-८ केस सोडवून आरोपीना तुरुंगात टाकले होते. परंतु त्याच्या डोक्यातून हि चोरी काही जात नव्हती. पोलीस स्टेशनमधली काही डोकी सोडली तर  " D.B. Bank  आणि चोरी " हि केस लोक जवळपास विसरून गेली होती. आजही महेश आणि अभि एकत्र घरी जायला निघालेले. त्यांची गाडी त्या D.B. Bank जवळून गेली. आणि अभिची आठवण ताजी झाली.

" कसला विचार आहे तुझ्या डोक्यात.... " महेशने अभिला विचारलं.

" हेच.... D.B. Bank मध्ये चोरी करणारे गेले कुठे... " अभिच्या या बोलण्यावर महेश बोलला.

" अजूनही त्याचाच विचार सुरु आहे का ... आपले सर २ महिन्यापूर्वी काय बोलले. केस सुटत नसेल तर बंद करा... जास्त विचार करू नकोस..... ",

" हम्म ",

" आणि तू बघितले ना...... एवढ्या वस्तू चोरी झाल्या दागिने , हिरे ... सोने वगैरे ..... किती लोकं पुढे आले ... ज्यांच्या वस्तू चोरीला गेल्या .... ज्या लोकांचे लॉकर फोडले ... त्यापैकी फक्त ६ जण आले होते. त्यांच्या लॉकर मधून काय काय चोरीला गेले ते सांगायला. बँकमधला एक अकाउंट वाला आतली गोष्ट सांगत होता कि चोरी जवळपास ५ कोटीच्या आसपास आहे... मॅनेजरने फक्त ३ कोटी दाखवली.... या लॉकरमध्ये बहुदा ब्लॅक मनी साठवून ठेवतात... तीच चोरीला गेली तर कोण कशाला येईल पुढे .... आणि तसेही .... या श्रीमंत माणसांना त्यांचे ४-५ लाख गेले तरी काय फरक पडणार आहे. " ,

" तेही बरोबर .... तरी सारखं मनात येते ना .... एक अपूर्ण केस .... " अभि बोलला. दोघांच्या इतर गप्पा सुरु झाल्या......  गाडी चालवत.

दोन दिवसांनी अभि पुण्याला निघाला. एका केस संदर्भात तो पुण्याला आलेला होता. वेळेआधीच काम झाले. वेळ होता म्हणून त्याने त्याचा मित्र संदीपला कॉल लावला. तोही अभि सारखा inspector ." अरे !! पुण्यात आला आहेस तर भेटायला ये ना ..... कॉलवर बोलण्यापेक्षा समोरासमोर बोलू... " संदीप बोलला. जास्त दूर नव्हते त्याचे पोलीस स्टेशन. खूप वर्षीनी भेटत होते दोघे, छान गप्पा रमल्या. तेवढ्यात एक तरुणी मोठं मोठ्याने बोलत शेजारच्या केबिनमधून बाहेर आली. किती मोठ्या आवाजात ती एका कॉन्स्टेबल सोबत हुज्जत घालत होती. अभिचे लक्ष गेले तिच्याकडे.

" काय भानगड आहे रे ... इतकी कशाला ओरडते आहे... " अभिने त्रासिक स्वरात विचारलं.

" बघ ना .... सकाळपासून डोकं उठवलं आहे हिने , उगाचच आरडा-ओरडा करते आहे.. " ,

" पण झालं तरी काय .... ",

" तेच जुने .... नवरा - बायकोचे भांडण... मारहाण .... " संदीप बोलला.

" तिच्याकडे बघून वाटत नाही ... तिला मारहाण केली असेल... " ,

" अरे ... हिने तिच्या नवऱ्याला चोपले आहे.... ",

" कशाला .... " अभिला हसू आलं.

" मलाही हसू आलं. ऐकून ..... बोलते कि तिचा नवरा लबाड आहे... हिच्यासोबत गेल्या महिन्यात लग्न झाले. या महिन्यात .... कालच म्हणू शकतोस... तिला कळलं कि त्याचे आधीच एक लग्न झाले आहे... त्यावरून दोघांची मारामारी..... ",

" मग पुढे काय ... ",

" चांगलंच चोपला तिने ... जास्त मार बसू नये म्हणून आम्ही त्याला घेऊन आलो. तर बोलते तुरुंगात टाका.... असे कसे आत टाकणार त्याला .... नाही बोललो म्हणून डोक्यावर घेतले आहे पोलीस स्टेशन ... " अभिला पुन्हा हसू आलं.

" आहे कुठे हिचा हिरो ... " ,

" तो काय ... तिथे बसून आहे.... " अभिने बसल्या जागेवरूनच शेजारच्या केबिनमध्ये डोकावून पाहिलं. चेहरा ओळखीचा वाटला म्हणून निरखून पाहिलं. डोक्यावर ताण दिला तेव्हा काही आठवलं.

" याला ओळखतो मी... दिलीप नाव याचे... मुंबईत असतो हा .... इथे कसा.. ",

" नाही रे .... काहीतरी चूक होते आहे .... दिलीप नाही .... अजित देशपांडे नाव याचे....तू कसा ओळखतो याला... " ,

" अरे हा चोर आहे... याचा क्रिमिनल रेकॉर्ड आहे आमच्याकडे... २ वर्षांपूर्वीच त्याला सोडले .... जेल मध्ये होता १० वर्ष...एका घरफोडी मध्ये पकडला होता... " अभीचा मित्र हि माहिती ऐकून चकित झाला.

" पण ..... आता या दोघांना घेऊन आलो तेव्हा ..... याने तर त्याचे नाव अजित देशपांडे असे सांगितले, त्याच्या address वर सुद्धा तेच नाव आहे... ",

" हम्म ... चोरी करणे तर केव्हाच सोडले याने .... सुधारला होता. मग नाव बदलून राहण्याची गरजच काय..... शिवाय ... हि बाई बोलते ते बरोबर .... याचे लग्न झालेले आहे .... २ मुलेही आहेत ..... मुंबईत... " अभि बोलला पण तोही विचारात पडला.

" एक काम करतो ... मी याचे सर्व रेकॉर्ड मागवून घेतो. तुला मेल करायला सांगतो. तोपर्यत याला असेच बसवून ठेव , मी समोर गेलो तर लगेच ओळखेल मला , ह्या बाईला तो विवाहित आहे ते कसे कळले ते विचारतो मी... " अभिने मुंबईत कॉल करून त्याला पाहिजे असलेली माहित मेल करायला सांगितली आणि तो त्या बाई जवळ गेला.

" नमस्कार !! ... शांत व्हा ... मला सांगा ... नक्की काय झालं ... " ,

" तुम्ही कोण ... " त्या बाईने उलट विचारलं.

" मी हि इन्स्पेक्टर आहे .... मुंबईत असतो... " ,

" याला शिक्षा करा ना तुम्ही तरी.... माझ्या life ची वाट लावली आहे .. मीही याची वाट लावणार.. " ,

" शांत व्हा .... शांत व्हा ... " तिच्या भाषेवरून ती जरा तापट वाटली.

" तुम्ही याला कधी पासून ओळखता ... आणि काय झाले ते सविस्तर सांगा "  ,

" ५ महिन्यापूर्वी आम्ही भेटलो... एका बार मध्ये आमची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. माझे कोणी नाही, त्यामुळे मलाही सपोर्ट पाहिजे होताच, हा चांगला वाटला... लग्नाची मागणी त्यानेच घातली. खूप विचार करून होकार दिला आणि गेल्या महिन्यात लग्न केले. तोच महिना चांगला गेला . पण १० दिवसापूर्वी याच्या मोबाईल वर एक मेसेज आलेला , नेमका त्याच वेळी मोबाईल माझ्याकडे होता. ",

" काय होता मेसेज ... ",

" पैसे संपत आले आहेत... बाकी गोष्टीसाठी १ लाख तरी लागतील ... असा मेसेज होता. मला संशय आला. तेव्हा याला काही कळू दिले नव्हते. मला वाटलं कोणी कामानिमित्त पैसे मागत असेल. पुन्हा २ दिवसापूर्वी कॉल आलेला , त्यावेळेस मी किचन मध्ये होते. कॉल आला तसा लगेच बाथरूम मध्ये गेला. मीही चोरून बोलणे ऐकले याचे. बोलत होता देतो पैसे, उद्या पाठवतो .... कामानिमित्त बाहेरगावी आलो आहे... खोटे बोलत होता असे वाटले , तेव्हा कळले कि हा कोणाला तरी गुपचूप पैसे पाठवत असतो. वेळ बघून त्याच्या मोबाईल मधून नंबर घेतला , कालच कॉल लावला तर मुंबईत कॉल लागला. याच्या बायकोचा नंबर आहे तो... तेव्हाच डोके फिरले... बघा तुम्ही... तुम्ही शिक्षा केली नाहीत तर मी माझ्या परीने शिक्षा करिन .... "

बापरे !!! हि बाई तर डेंजर आहे... अभि मनातल्या मनात बोलला. संदीप आला, " अभि .... तू बोलल्याप्रमाणे खरे आहे... हा नाव बदलून राहतो आहे पुण्यात ... त्याच्या क्रिमिनल रेकॉर्ड प्रमाणे ... " अभिने त्याला बोलताना मधेच थांबवले.

" थांब .... आधी हिला या  सर्वांची कल्पना आहे का ते विचारू ... "

" तुम्हाला तो .... तुमचा नवरा ... काय काम करतो ते माहित आहे का ... " अभिने शांतपणे विचारलं.

" हो .... म्हणजे आता तो बिजनेस करतो ... स्वतः नाही करत ....एका पार्टनरच्या बिजनेस मध्ये पैसे गुंतवले आहेत... ",

" बर .... आता बिजनेस करत असेल .... त्याआधी काय करायचा याची कल्पना आहे का .... " तशी ती गप्प झाली.

" हा ...... म्हणजे .... थोडे माहित आहे .... " , ती घाबरली आता...

" जे काही थोडे माहित असेल ते सांगा ... " ,

" आधी चोरी करायचा .... तुरुंगात होता .... पण आता सुधारला आहे तो .... हे त्यानेच सांगितले मला... " ,

" मग तो इथे नाव बदलून राहतो ... हे सांगितले का ... ",

" नाही ... आताच कळले... ",

" त्याचे लग्न झाले आहे आधीच हे कळले तुम्हाला .... पण त्याला २ मुले आहेत ... मुंबईत घर आहे ... हे माहित आहे का ... " तिने नकारार्थी मान हलवली.

" म्हणजे हा सर्वच खोटे बोलला माझ्याशी .... मग ते बिजनेसचे सुद्धा खोटे असेल... " ,

" त्याचे काय ... ",

" ३० लाख गुंतवले असे बोलला... " इतकी रक्कम ऐकून अभिला संशय आला.

" त्याला चांगला ओळखतो मी... त्याची आर्थिक परिस्तिथी माहित आहे मला... त्याने इतकी मोठी रक्कम कुठून आणली .... ते माहित आहे का तुम्हाला .... " अभिने विचारलं तस तिची चुळबुळ सुरू झाली.

" पटकन बोला !!... " अभि मोठयाने ओरडला तशी ती घाबरली.

" आम्ही दोघे एकत्र ड्रिंक करतो ... लग्न झाल्यापासून घरीच ड्रिंक करतो..... एकदा बोलता बोलता विषय निघाला. तेव्हा तो जास्त पियाला होता .... बोलून गेला कि बँक मध्ये चोरी केली आहे... " ती घाबरत बोलली.

अभि संदीपला केबिन मधून बाहेर घेईन आला. " माझ्या माहितीत तर गेल्या २ वर्षात ... पुण्यात कोणत्याच बँकवर दरोडा पडलेला नाही... " संदीप बोलला. अभि विचार करु लागला.

" कसला विचार करतोस .... ",

" सहा महिन्यापूर्वी ... D.B. bank च्या मुंबई ब्रांच वर दरोडा पडला होता ... आठवलं ना ... " ,

" हो .... आहे लक्षात ... म्हणजे तुला काय म्हणायचे आहे ... याचा काही संबंध .. " ,

" त्यालाच विचारू .... " अभि म्हणाला आणि दोघे त्याच्या समोरच येऊन उभे राहिले. अभिला बघून दिलीप दचकला.

" अभि सर .... तुम्ही काय करता इथे ... " दिलीप घाबरला.

" हा प्रश्न मी विचारला पाहिजे ना .... आणि नाव बदलून का राहतोस इथे.... " दिलीप गडबडला होता.  

" आणि एक सांग ..... तुझी नवीन बायको बोलली कि बिजनेस साठी ३० लाख गुंतवले तू.... एवढा पैसेवाला नाहीस हे मला माहित आहे. बोल .... आणि खरं बोल .... मी खरं बोलवून घेऊ शकतो , ते तुलाही माहित आहे. " दिलीप प्रचंड घाबरला. काहीच बोलत नाही बघून अभि त्याच्या समोरच येऊन बसला.

" बोलतो बोलतो ... मारू नका मला ...... " दिलीपला अभिचा अनुभव होता. आणि आता इतक्या वर्षांनी पोलिसांचा मार खाणे नको होते त्याला...

" बँक चोरीत मी सामील होतो.. त्याचेच पैसे आहेत ते... " अभि आधीच त्या केस मध्ये डोकेफोड करत होता. हा खूप मोठा क्लू होता.

" D.B. bank बद्दल बोलतो आहेस ना ..... आणि बाकीचे साथीदार कुठे आहेत .... तेही पुण्यात आहेत का ... " दिलीप काहीच बोलला नाही. २ जोरदार कानाखाली बसल्यावर दिलीप बोलू लागला.

" बाकीचे सर्व मुंबईत आहेत. मी खूपच घाबरलो होतो... म्हणून चोरी केली त्याच दिवशी पुण्यात आलो. .... " त्याचे बोलणे ऐकून अभिने लगेच मुंबईला कॉल केला. दिलीपला पुण्याहून मुंबईला आणण्यासाठी सर्व procedure पूर्ण केली आणि अभि त्याच्या सहित निघाला.

अभि मुंबईला पोचोहला आणि हालचालींना वेग आला. दिलीपने सांगितल्याप्रमाणे , ते सहा जण होते. त्यातल्या फक्त ४ जणांना पकडण्यात यश आले. दोघे अजूनही मोकाट होते.

" आम्ही फक्त चोरीत मदत केली... प्लॅन त्या दोघांचा होता. " दिलीप अभिला सांगत होता.

" ते दोघे .... " अभि संतापला होता.

" माहित नाही साहेब .... आम्हाला त्या दोघांनी प्लॅन मध्ये घेतले होते. " ,

" मग आहेत कुठे ते दोघे .... " अभि आणखी मोठयाने ओरडला. दिलीप आधीच घाबरलेला होता.

" एकाचे सांगू शकतो साहेब .... तो एका ठरलेल्या दिवशी एका बार मध्ये येतो .... तिथेच भेटलो होतो आम्ही सगळे .... पहिल्यांदा.... " दिलीपने त्याचे वर्णन सांगितले. अभिने तशी तयारी केली.

दिलीपने सांगितलेल्या बार मध्ये अभिने आधीच तयारी करून ठेवली होती. साध्या ड्रेसमधले पोलीस आधीच तिथे होते. दिलीपला सोबत घेऊन अभि सुद्धा एका ठिकाणी बसलेला होता. ठरलेली वेळ झाली तरी तो आलाच नाही. खूप वेळ झालेला , आता तर दिलीप खोटे बोलतो आहे असे वाटत असताना दिलीपने इशारा केला... " तो बघा साहेब ..... तोच माणूस आहे तो .... " अभिने त्याच्याकडे पाहिले. दोनदा विचारून खात्री केली. अभि तयार झाला. अभि आणि त्याच्या सहकार्यांनी बाकी कोणाला संशय न येऊ देता त्याला अलगद पकडून बाहेर आणले आणि गाडीत टाकले. त्याला पकडून पोलीस स्टेशन मध्ये आणले. आधी तो मानायला तयारच नव्हता , परंतु पोलिसांचा प्रसाद मिळाला आणि पटपट बोलू लागला.

अभि दमलेला , थोडावेळ आराम करून पुन्हा या सर्वाकडे आला. नवीन पकडलेला ... त्याचे नाव आनंद ... त्याचीच जबानी घेण्यासाठी आला. " बोल ... खूप मोठी कामगिरी केली आहेत सर्वानी.... पटापट बोला नाहीतर माझा हात थांबणार नाही... बाकीचेही आहेत माझे मित्र ... त्यांनाही हात साफ करायचे असतील. " ५ पैकी कोणीच बोलायला तयार नाही.

" मला वाटते पोट भरले नाही अजून तुमचे... " असे बोलत अभि उभा राहिला.

" नको नको साहेब ... नका मारू ... " आनंद रडत होता.

" मला सवय नाही असा पोलिसांचा मार खायची.. आणि या बाकी लोकांना माहित नाही आमच्या प्लॅनचे ... मदतीला होते ते फक्त ... सांगतो सगळं " ,

" सांगावेच लागेल ... " अभिने त्याची कॉलर पकडली. " आधी सांग .. चोरीचा सर्व ऐवज कुठे आहे... " ,

" आम्ही तो सर्वानी वाटून घेतला... " आनंद बोलला.

" आधी ते सर्व गोळा करू ... मग याकडे बघू ... " अभि बोलला.


५ चोरांना सोबत घेऊन ५ टीम निघाल्या. प्रत्येकाने आपला वाटा कुठे कुठे वेगवेगळ्या ठिकाणी लपवला होता. सर्व एकत्र करण्यात आला. अर्ध्या पेक्षा जास्त हाताला सापडले. सर्व पोलिसांच्या ताब्यात ठेवण्यात आलं. पण अभिला उत्सुकता होती ती प्लॅनची. पुन्हा यांची जबानी घेण्यासाठी अभि आला.

" आनंद .... या चार जणांच्या म्हणण्यानुसार तुझा प्लॅन होता. बरोबर  ?? " अभिने पहिला प्रश्न विचारला. सोबत महेश सुद्धा होता. आनंदने नकारार्थी मान हलवली.

" प्लॅन तर त्याने बनवला... " ,

" कोणी ? " ,

" सुपरमॅनने " आनंद बोलला पण अभिला वाटलं कि हा नक्कीच मस्करी करतो आहे. एक जोरदार चपराक आनंदच्या गालावर बसली.

" मारू नका सर .... मस्करी नाही करत... त्याचे नाव तेच आहे , मला पहिल्यादा भेटला होता तेव्हा हेच नाव सांगितले होते .... मलाही हसायला आले होते. तो स्वतःला सुपरमॅन म्हणतो... " ,

" आहे कुठे तुझा सुपरमॅन ... " ,

" माहित नाही... ",

" माहित नाही म्हणजे ... तुझ्या सोबत होता ना ... ",

" नाही सर ...... मी फक्त दर बुधवारी ड्रिंक करायला जातो.... माझा बार हि ठरलेला आहे. वेळही ठरलेली असते माझी. एका दिवशी , त्याने स्वतःच ओळख करून घेतली माझ्याशी. माझे स्वतःचे बुक शॉप आहे. पण illegal documents सुद्धा बनवून देतो. बार मध्ये सर्व ओळखतात मला, त्यामुळे असे काही illegal documents पाहिजे असतील तर माझ्याकडे पाठवतात. त्यालाही असेच काही पाहिजे आहे असे वाटले मला. " ,

" मग पुढे ... ",

" तो बोलला कि मोठे काम आहे ... पैसे जास्त मिळतील , आणि कोणाला कसलाच प्रॉब्लेम होणार नाही असे म्हणाला तो.. मलाही पैशाची गरज होतीच. त्याला माझ्या घरी बोलावले , तेव्हा बोलला कि बँक लुटायचा प्लॅन आहे. आधी मला उगाचच काही बोलतो आहे असे वाटले. पण तो सिरियस होता. भीती वाटली मला, कारण illegal documents बनवणे आणि चोरी करणे यात खूप फरक आहे ना.... शिवाय पोलिसांचा आणि माझा तसा कधीच संबंध आला नव्हता... नकोच होता मला. तरी तो बोलला कि तुला फक्त मदत करायची आहे.... माणसे जमवणे , चोरीच्या वेळी फक्त नजर ठेवणे हे काम ... प्रत्यक्ष चोरी आणि प्लॅन त्याचा होता... पैसे जास्त मिळणार होते तर मीही तयार झालो... "

" मग प्लॅन कसा बनवला आणि हे बाकीचे ... त्यांना माहित नव्हते का " महेशने विचारलं.

" त्याचा प्लॅन आधीच तयार होता. चोरी झालेल्या दिवसा आधी २ महिने आधीच तयारी करत होतो आम्ही... या चार जणांना मीच जमवले. काही ओळखीतून याना निवडले मी. त्यात त्याची अट होती कि ,ज्यांना निडवणार , त्यांच्या घरी " तो व्यक्ती " चोर आहे याची कल्पना असावी. म्हणजे या प्लॅनचा कोणताच भाग बाहेर येऊ नये. तसे चौकशी आणि ओळख काढून याना प्लॅनमध्ये घेतले. सुपरमॅन खूपच चलाख ... कुठून कोणी कसे जावे ते आधीच ठरवलेले. लॉकर तोडण्यासाठी त्याने एक वेगळ्याच प्रकारचे हत्यार बनवले होते. ",

" म्हणजे कसे ... ",

" ते असते ना .. जमीन खोदण्यासाठी ड्रिल मशीन वापरतात... त्याच प्रकारची एक छोटी ड्रिल त्याने बनवली आणि त्यावर एक लहानशा हातोडा बसवला. मला त्याने दाखवले होते. एका फटक्यात लॉकरचा लॉक तुटतो. त्यानेच सर्व लॉकर तोडले. "


" पण प्लॅन तुला तर माहित असेलच ना... इतक्या सुरक्षित जागी चोरी कशी केलीत ते सांग " महेशला उत्सुकता लागलेली.

" आठवड्या आधी मी त्या बँकमध्ये अकाउंट ओपन केले. आणि लॉकर साठी apply केला. लॉकर मिळाले हि. त्याच लॉकर मध्ये त्याने एक trasmiter दिले होते, काही वस्तू सहित तेही ठेवले तिथे. जेणे करून ती लॉकर रूम नक्की कुठे आहे त्याचा अंदाज येईल. माझे इतकेच काम... हे चार जण सुद्धा एक - एक करून बँकेत फिरून यायचे. सुपरमॅन कधीच बँकेत गेला नाही. बँकेचे layout ... अगदी ती आतून कशी दिसते , याचे विडिओ आहेत नेटवर ... " ,


" तो कधीच बँकेत गेला नाही... तर मग हे security gard ... त्याची ड्युटी कधी बदलते... ते कसे माहित... ",

" हा दिलीप.... बोलण्यात पटाईत आहे. एक -दोनदा बँकेत जाऊन त्याने गार्ड सोबत ओळख काढली. बाकी सर्व security , अलार्म ... याची माहीत तर नेटवर आहेच. " ,

" हम्म ... पुढे ... " ,

" आदल्या रात्री आम्ही सर्व माझ्याच घरी भेटलो. सकाळी उठून तयारीला लागलो. सुपरमॅनने आधीच २ बोटी बनवल्या होत्या. सर्व बनवता येते त्याला. आम्ही सकाळी ७ वाजताच त्या सांडपाणी वाहते तिथून आत शिरलो. तिथे पाणी जास्तीत जास्त अडीच फूट असते, बोटीत गॅस कटर , ते power magnet आणि बॅगा होत्या. सर्व तयारीनिशी आम्ही तिघे मागच्या लोखंडी पाईप मध्ये बसून होतो. transmiter मी आधीच एका लॉकरमध्ये ठेवलेला त्यामुळे लॉकर रूम नक्की कुठे ते कळलं. ठरलेल्या वेळी हे तिघे आत शिरले , सर्व security , अलार्म बंद केले. आधी ठरवलेल्या वेळेला म्हणजेच सकाळी ९:३० वाजता आम्ही तो लोखंडी पाईप कापायला सुरुवात केली. अर्धा तास लागला त्याला. मग सुपरमॅननेच त्या विटांवर कसले ऍसिड टाकले त्यामुळे त्या विटा अलगद निघाल्या. तोपर्यंत हा मिकी माउस लॉकर रूममध्ये आलेला.... " ,

" मिकी माउस काय .... त्याचे नाव असेल ना काही "

" मी फक्त दिलीपला नावाने ओळखतो... बाकी कोणाचे नाव माहित नाही मला... दिलीपच बाकी लोकांना घेऊन आलेला माझ्याकडे... " आनंद बोलला.

" त्याला त्याचा आकार बघूनच निवडले. त्याने एकट्याने ते कपाट सरकवले. मागून आम्ही आलो. पटापट लॉकर तोडली. वर हे दोघे तुम्हाला गुंतवून होते. त्या वरच्या दोघांना दुपारी १२ वाजता खाली यायला सांगितले होते सुपरमॅनने. तेही वेळेत खाली आले. तोपर्यंत आमचे काम झाले होते. त्या लॉकर रूमची साफसफाई सर्वानी मिळून केली. माती पडलेली ती साफ केली. निघताना मग उगाचच काही नोटा , कागदपत्र पसरवून ठेवली. सुपरमॅनने न्हावीच्या दुकानातून काही केस आणले होते. ते त्यानेच योग्य जागी ठेवले , जेणेकरून डॉक्टर महेशला ते मिळतील. एक केमिकल आणला होता त्याने , तो सर्व ठिकाणी स्प्रे केला. सर्व ठीक समजून निघालो. कपाट मागूनच त्या power magnet ने नीट लावले. मग विटा जागच्या जागी लावल्या. तिथेच सर्व कपडे बदलले. पोलिसांचे कपडे आणले होते , ते घातले. जुने कपडे मुद्दाम तिथेच जाळले.... पुन्हा त्याचेच डोके ... अर्धवट जाळायचे कपडे. सर्व झाल्यावर बोटीत बसून बाहेर आलो. समुद्र किनाऱ्यावर एक बनावट चोरीच्या व्हॅन.... तिला same to same पोलिसांच्या व्हॅन सारखा रंग दिलेला. ती व्हॅन तयारच होती. सुपरमॅनला खात्री होती कि त्यावेळेस किनाऱ्यावर कोणीच नसणार कारण गर्दी तर बँक भोवती असणार. तसेच झाले. त्या बोटीही मुद्दाम तिथेच सोडल्या. आम्ही व्हॅन मध्ये बसून ... बँक समोरूनच माझ्या घरी आलो. आराम केला... चोरी केलेल्या सामानाची वाटणी तिथेच केली. आम्ही टीव्हीवर सर्व बघत होतो.... नक्की काय सुरु आहे बँक जवळ ते. त्याने मुद्दाम ते क्रेडिट कार्ड चोरायला सांगितले होते. दुपारीच म्हणजे जवळपास ३ वाजता , बाकी सर्व आपापल्या घरी निघाले. त्याने जाताना ती सर्व क्रेडिट कार्ड त्याला पाहिजे तिथे फेकून दिली. तेही प्लॅन मध्ये होते त्याच्या. सर्व कसं परफेक्ट झालेले.... तो बोलला होता , तुमच्या फॅमिली बाहेर जोपर्यंत हि news जात नाही , तोपर्यंत तुम्ही safe आहात. तो बोलला तेच झाले... एकाच्या चुकीने बाकीचे अडकले."


" पण तो तर अजूनही बाहेर आहे ना ... तुमचा सुपरमॅन... कुठे राहतो ते माहित नसेल ना ... " आनंद त्यावर काही बोलला नाही.

" तुला माहीत नसेल तर मग या प्लॅनवर कुठे तुमच्या मीटिंग झाल्या. ",

" आम्ही सर्व माझ्या घरीच भेटायचो. ",

" त्याचे वर्णन सांग... ते आहे ना लक्षात ... सावंत , स्केच आर्टिस्टला बोलवा..... लवकर " अभिने एका कॉन्स्टेबलला आदेश दिला.

" नाही सर .. " ते ऐकून अभि संतापला. दोन - चार फटके हि दिले रागात. महेशने त्याला शांत केले.

" काय म्हणायचे आहे तुला... तुला चेहरा कसा लक्षात नाही त्याचा .... किती वेळा भेटला असाल तुम्ही.. " महेशने आनंदला प्रश्न केला.

" खरं बोलतो आहे मी सर ... चेहरा कसा दिसणार त्याचा..... प्रत्येक वेळेस तो चेहऱ्यावर मास्क लावून असायचा. चोरी करताना सुद्धा तो तसाच आलेला मास्क लावून... ",

" कसला मास्क .... ",

" तो पूर्ण चेहरा झाकला जातो तो मास्क ... त्यातून फक्त डोळे दिसतात ते ... डोक्यावर , केस सुद्धा रुमालाने झाकलेले नाहीतर डोक्याला स्कार्फ बांधलेला. कसा कळणार चेहरा.... " हे जरा नवीन प्रकरण होते. अभि ऐकत होता. शांत झालेला. त्यानेच पुढचा प्रश्न केला.

" तुला कधी त्याला विचारावे वाटलं नाही का... आणि चेहरा न बघताच विश्वास ठेवला तू ... कमाल आहे... "

" त्याने इतक्या पैशाचे अमिश दाखवले तर मी लगेच तयार झालो. चेहऱ्याचे एकदा विचारले होते... तर बोलला एका accidant मध्ये अर्धा चेहरा आणि डोक्यावरचा काही भाग जळाला आहे. त्यानंतर विचारले नाही त्याला. चोरी करून निघताना सुद्धा तो व्हॅनच्या मागच्या भागात बसला होता. दिलीप गाडी चालवत होता. मास्क घातलेला driver दिसल्यास संशय येऊ नये म्हणून. खरं सांगतो साहेब... आम्ही मोजून ७ वेळा भेटलो फक्त..... सर्वात आधी त्या बारमध्ये. नंतर माझ्याच घरी ... त्यानंतर शेवटी भेटलो ते चोरी करताना. "

अभि विचारात पडला. " कुठून आलेला हेही माहित नसेल तुला... ",

" नाही सर ... जाताना सुद्धा त्याने त्याचा मोबाईल आणि सिम कार्ड आमच्या समोरच तोडले. पुन्हा कोणताच contact नको म्हणून. ",

" हम्म " अभि आणि महेश त्या केबिन मधून बाहेर आले.

" मला वाटते हे पाचच असतील... कोणी सहावा आहे , असा बनाव करत असतील. " महेश विचार करून बोलला.

" मला वाटत नाही कि तो खोटे बोलत असेल.... आणि खोटे बोलून त्याला तसाही काही फायदा नाही.... " ,

" म्हणजे ... " महेशने विचारलं.

" सर्वात आधी दिलीपला पकडलं... तेव्हा तो " आम्ही सहा जण होतो " असेच बोलला होता. आनंद .... ज्याने या बाकींना जमवलं ... त्याला तर त्यांची नावं पण माहित नाही.... त्याची history काढली मी. बरोबर बोलला , book shop आहे त्याचे.. बनावट कागदपत्र बनवतो. त्या बिझनेस मध्ये तो गेली १० वर्ष आहे... छानच चाललं होते त्याचे... तो इतकी मोठी आणि गुंतागुंतीची चोरी करायला डोके लावेल असे वाटत नाही. " अभि बोलता बोलता थांबला , पुन्हा आनंद जवळ आला.

" चेहरा बघितला नसशील ... पण काहीतरी त्याच्या बाबतीत नोटीस केले असशील ना ... ",

" नाही सर ... चेहरा , डोके झाकलेले... नेहमीच पूर्ण कपड्यात.... फुल हाताचा शर्ट किंवा फुल हाताचा टीशर्ट... आणि जीन्स ... काय नोटीस करू... " आनंद बोलला. अभिला कळलं कि त्याकडे खरच माहित नसणार. तो बाहेर जात होता तर आनंदने थांबवले.

" सर ... सर .... आठवलं... चोरीच्या दिवशी त्याने टीशर्ट घातला होता. ते विटांवर ऍसिड टाकताना त्याने टीशर्टचे हात वर केलेले. तेव्हा त्याच्या मनगटाच्या थोडं वर .... एक टॅटू दिसला. ",

" कसला टॅटू ... ",

" किंगफिशर पक्षी असतो ना ... त्याचा टॅटू होता... " अभिला हे महत्वाचे वाटले. म्हणून त्याने स्केच आर्टिस्टला बोलावून , तो टॅटू कसा होता तो रेखाटून घेतला.

काही वेळाने मोठया सरांसोबत मिटिंग झाली.

" पण सर .... आणखी एक आहे जो मोकाट फिरतो आहे.. त्याला पकडल्या शिवाय केस close कशी करू.... ",

" अभि , तुझे म्हणणे बरोबर आहे.... तरी त्या सहाव्या व्यक्तीचा काही क्लू आहे का ... तुझ्या म्हणण्यानुसार त्यापैकी त्याचा चेहरा कोणीच पाहिला नाही. मग तू त्याला कसे पकडणार ... केस कशी पुढे नेणार... शिवाय सहा महिने होऊन गेले. तुझी कोणती केस इतकी ताणली गेली आहे का कधी.... मीडियाला सुद्धा कळले आहे कि आरोपीना पकडले आहे आपण. त्यांनाही उत्तर द्यावे लागेल ना... उद्याच मीडिया समोर जप्त केलेली रक्कम ,दागिने ... आणि या पाच जणांना समोर आणू. मीडियाला हे पाचच होते असे सांगू आणि केस बंद करून टाकू... " ,

" पण सर ... ",

" अभि .... माझी ऑर्डर आहे ती ... आपल्याकडे बाकीची कामेही आहेत.. " अभि पुढे काय बोलणार... ठरल्याप्रमाणे , दुसऱ्याच दिवशी मीडिया समोर या ५ जणांना आणले गेले. अभिची सर्वानी मोठी स्तुती केली. उशिरा का होईना , केस सोडवली गेली. दिवसभर सर्व news channel वर तीच बातमी होती.

संध्याकाळ झाली. आज काम लवकर संपले होते , अभि - महेश लवकर घरी निघाले. महेश ५ मिनिटांनी आला. अभि गाडीत बसून महेशची वाट बघत होता , हातात तो टॅटूचे चित्र काढलेला कागद.

" ठेव रे ते ... संपली ना case... " अभिने महेशकडे पाहिलं.

" अभि ... सांग मला .... त्या टॅटू वरून कसा शोधणार आहेस त्याला... कुठे शोधणार ... मुंबईत किती टॅटू काढणारे आहेत... ते सोड ... कुठल्या बाहेरच्या शहरातून आलेला असेल तर ..... तो सुपरमॅन.... " महेशचे बोलणे ऐकून अभिने तो कागद बाजूला ठेवून दिला.

" अभि मित्रा ..... केस संपली ना... आराम कर .... डोक्याला कशाला ताण देतोस... ",

" तेच तर ... लगेच संपली केस .... काहीतरी मिस झाले असे वाटते... " अभि खूप वेळाने बोलला.

" लगेच कुठे... सहा महिने तर झाले.. ",

" तस नाही बाबा .... मी दिलीपला पुण्यात पकडले. बाकी चार जणांना मुंबईत... काल त्या आनंदला पकडलं... कालच त्यांनी चोरी केलेले जप्त केले. आनंदला असा पोलिसांचा मार खायची सवय नाही म्हणून लगेच सर्व बोलून टाकले... पाच दिवसांत संपले सर्व... एवढी मोठी प्लॅनिंग केली ... ती पाच दिवसात संपेल कशी.... हे पाच जण तर अजिबात मुरलेले नाहीत... एक-दोन दांडे पडले तर रडायला लागले.. यांना पकडून तसे काहीच केले नाही असे वाटते मला... तो जो कोण .... सुपरमॅन आहे... तो तर फिरत असेल आरामात.... " ,

" अभि .... त्या सुपरमॅनला फिरू दे नाहीतर उडू दे ... आता त्याचा विचार सोडून दे... आराम कर... दोन दिवसानी नाशिकला जायचे आहे... लक्षात आहे ना .. " ," हो.... " म्हणत अभिने गाडी सुरु केली. 


अभि आणि महेश काही कामानिमित्त दोन दिवस नाशिकला होते. काम तसे झालेले होते , तरी आणखी एक दिवस थांबावे लागणार होते. अशातच त्याच दुपारी अभिला मुंबईहून कॉल आला. लवकरात लवकर बोलवले होते. महेशला हि सांगितले त्याने. " एवढं काय झालं असेल ... लगेच बोलवून घेतलं ते ... " महेशने विचारलं. " काय माहित... पण इथले काम संपल्या शिवाय निघता येणार नाही.... जस काम संपेल तसे लगेच निघू... " अभि आणि महेशचे काम रात्री संपले. तसे ते लगेच निघाले मुंबईला. आता मध्यरात्री तर पोलीस स्टेशनला जाऊ शकत नाही . त्यामुळे सकाळी लवकरच ते मोठ्या सरांच्या ऑफिसमध्ये गेले.

" काय झालं सर ... इतक्या तातडीने बोलवून घेतले.. " महेशने सरांना विचारलं.

" दामोदर ज्वेलर्स माहित आहे ना , परवा रात्री तिथे चोरी झाली आहे. त्यांचे नाव मोठे आहे. लवकर तपास सुरु झाला पाहिजे. त्यासाठी तुम्हा दोघांना लवकर बोलवून घेतले. आताच निघा..... आपले काही ऑफिसर आहेत तिथे... हि केस तुलाच द्यावी वाटली मला अभि... जलद निर्णय लाव या केसचा... " ,

" yes सर .... " म्हणत अभि निघाला.

" दामोदर ज्वेलर्स म्हणजे मोठे व्यक्ती .... त्या शॉपमध्ये तर security पण जास्त आहे ... अश्यात चोरी म्हणजे .... " महेश स्वतःशी बोलत होता.

अर्ध्या तासात ते त्याजागी पोहोचले. कालपासून पोलीस बंदोबस्त होता तिथे. अभि सोबत काही आणखी कॉन्स्टेबल आलेले , महेशची टीम माघाहून आली. अभिला आलेलं पाहून त्या दुकानाचे मालक त्याच्याजवळ आले.

" हॅलो इंस्पेक्टर अभिषेक ... मी दामोदर ... ",

" Hi सर ..... तुम्हाला कोण ओळखत नाही... ",

" कालच तुमची वाट बघत होतो... ",

" हा सर .... ते आम्ही दोघे नाशिकला होतो ना ... आज सकाळचीच आलो. .... " अभिने सांगितले ...

" तुम्हाला कस कळलं चोरी झाले ते .... आणि किती चोरी झाली आहे ... त्याचा अंदाज लावू शकता का... " ,

" आमच्या security gard ने सांगितले मला चोरीचे ... आणि अंदाज लावू शकत नाही ... ते सर्वच निरखून बघावे लागेल ... पोलिसांनी कालपासूनच सर्व बंद करून ठेवले आहे ... आत जाऊ देत नाही.... मला फक्त हिऱ्याचे टेन्शन आहे... " ,

" हिरे ?? ... ",

" चला दाखवतो... " म्हणत दामोदर त्यांना आत घेऊन जायला निघाले.

" एक काम करू .... तुम्ही खालीच थांबा .... तुमची गरज लागली तर बोलावूच... "अभि सर्वत्र बघत होता. ४ मजल्याचे दागिन्यांचे दुकान. सर्वात वर असलेल्या म्हणजे चौथ्या मजल्यावर चोरी झाली. महेश आणि त्याची टीम , काही फिंगर प्रिंट्स मिळतात का ते बघत होते. sub inspector मोहिते तिथे कालपासून होते. अभिला आलेला बघून ते लगेचच पुढे आले.

" सर ... कधी आलात ... ",

" आतच .... इथली काही माहिती मिळाली का... काय झाले असेल ..... काय आयडिया ... " ,

" हा सर .... हि समोरची खिडकी दिसते ना ..... तिथून ते आले असणार... या खिडक्या कधीच उघडत नाहीत , असे दुकानाचे security gard  बोलले. ",

" Good !!... गार्ड कुठे आहेत...साधारण किती वाजता झाली चोरी .... ",

" गार्ड पुढे असतात ... हि खिडकी मागच्या बाजूला आहे.... साधारण रात्री १ नंतर चोरी झाली.. exact वेळ CCTV कॅमरा बघितले कि कळेल... गार्ड सकाळी वर आले तेव्हा कळलं कि चोरी झाली आहे. " ,

" ठीक आहे... त्यांना नंतर बघू... चोरी कुठे झाली आहे.. ",

" चला दाखवतो ... " त्याने अभिला पुढे आणलं. " हि मोठी safe आहे ना तिथे... " अभिने पाहिलं. मोठे लॉकर.... एखाद्या मोठ्या रूम सारखे ते लॉकर. तिथे खूप काही ठेवले होते. दागिने , त्याचे बॉक्स.... सोन्याच्या वस्तू ... सोनाच्या विटाही होत्या तिथे. चांदीचे ही दागिने होते. खजिना होता जणू तिथे , महेश आणि त्याची टीम तिथेच काही शोधत होते.

" काय वाटते महेश.... काही कल्पना येते आहे का ... काय झाले असेल ते ... ",

" हा ... म्हणजे थोडे थोडे आले आहे डोकयात ...हा लॉकर पण एवढा मोठा आहे ना .. सर्व रूम मध्ये फिंगर प्रिंट्स आहेत का ते बघायला वेळ लागेल. " ,

" ठीक आहे ... मोहिते... दामोदर सरांना घेऊन या ... "


दामोदर लगेच आले. " मगाशी बोललात कि हिऱ्यांचे टेन्शन आहे... नक्की काय ... " अभिने त्यांना विचारलं.

" एका क्लायंटचे हिरे आले होते. त्याला काही कारणाने परदेशात जावे लागणार होते म्हणून त्यांनी ते माझ्या safe मध्ये ठेवायला दिले होते. दोन लहान सुटकेस मध्ये ते हिरे होते. त्या सुटकेस दिसत नाहीत... ",

" आता इथे बघून तुम्ही एक अंदाज लावू शकता का ... किती चोरी झाली असेल... ",

" तुम्हीही बघू शकता ... खूप मौल्यवान वस्तू आहेत इथे... तरी एका दिवसात सांगू शकतो मी किती चोरी झाली आहे ते.. तरी त्या २ सुटकेस ... त्यातच १० कोटीचे हिरे होते... " बापरे !! केवढी मोठी चोरी...

" तुम्हाला माहीत होते कि इतके expensive हिरे आहेत ते ..... तरी इथे का ठेवलेत.. " , अभिचा पुढचा प्रश्न.

" माहित होते ते हिरे इतके मौल्यवान आहेत ते ... इथे चोरी करणे जवळपास अशक्य आहे. म्हणून इथे ठेवले..... हि safe अश्या मौल्यवान वस्तू साठीच बनवली आहे. ... " ,

" चोरी होऊ शकत नाही.... हे खात्रीने कसे बोलू शकता तुम्ही.... " ,

" हो .... तुम्हाला काही दाखवतो ... या .. " अभि सहित ते बाहेर आले.

" या लॉकर कडे जाण्याचा हा एकच दरवाजा आहे... हा दरवाजा बंदच असतो. तो उघडतो ते फक्त एक एन्ट्री कार्ड वापरून ......कार्ड swipe केल्याशिवाय आत जाता येतं नाही. " दामोदर सरने ते कार्ड अभिला दाखवलं.

" हम्म ... असे कार्ड किती जणांकडे आहे... " ,

" माझ्याकडे .... मॅनेजर कडे आणि एक extra बनवून ठेवलेले आहे , ते माझ्या घरी असते. " ,

" आणि चोर इथून आलेले नाहीत... ते खिडकीतून आत आले..... बर , तुमचा मॅनेजर दिसत नाही तो ... ",

" तो २ दिवसापूर्वीच त्याच्या गावच्या घरी गेला आहे... ",

" त्याला बोलवून घ्या.. ",

" पण तो विश्वासू आहे... त्याला कशाला ... " , अभिने त्यांचे बोलणे मधेच तोडले.

" सर ... जुना असला तरी चौकशी करावी लागेल ना.. " त्यांनी मॅनेजरला कॉल केला. आणखी काही माहिती जाणून घेतली. इमारत सील केली गेली.

" त्या दोन्ही गार्डला घेऊन या... " दोघेही आले. " रात्री तुम्ही दोघे असता ना ... झोपायचा पगार घेता का ... चोरी झाली तेव्हा कुठे होता .... " अभि ओरडला.

" सर ... मी एकटाच बाहेर असतो ... समोरच्या गेटवर ... हा दुसरा ... आतमध्ये पहिल्या मजल्यावर असतो... ",

" असे का .. ", अभिने प्रश्न केला तर दामोदर सर पुढे आले.

" पहिल्या मजल्यावर फक्त काचेची कपाटे आहेत. बाकी सर्व ठिकाणी लोखंडी दरवाजे आहेत. त्यामुळे दोघांपैकी एक तिथे असतो. ",

" तरी ... चौथ्या मजल्यावर चोरी होते .... ते कळू नये कोणालाच .... बोला ... गप्प का दोघेही... " अभि दोघांना पुन्हा ओरडला. " मोहिते ... या दोघांना घेऊन जा आणि स्टेटमेंट लिहून घ्या... "


अभि आता इमारतीच्या मागे आला , जिथून चोर आलेले. मागे असलेली भिंत तशी लहानच , कोणीही आरामात उडी मारून येऊ शकेल अशी. अभि CCTV कॅमेरे शोधत होता. नजरेत आले त्याच्या. तिथे असलेले सर्व कॅमेरे तोडलेले होते.

" हे सर्व कॅमेरे सुरु होते ना ... " अभिने दामोदर सरला विचारले.

" हो हो ....चालूच आहेत ... मला वाटते ते चोरांनी तोडले असावेत. शिवाय या सर्व खिडक्यांना सुद्धा एक अलार्म सिस्टीम लावलेली आहे. नेमकी २ दिवसापूर्वी ती बंद झालेली. त्याचाच फायदा घेऊन ते खिडकीतून आत शिरले .. नाहीतर असे आत जाता आले नसते त्यांना. " अभिने आणखी काही नोंदी घेतल्या. दामोदर सरांना चोरीचा हिशोब करायची परवानगी दिली. महेश होता तिथेच. सर्व आवरेपर्यंत संध्याकाळ झाली. महेशची टीम निघाली. " उद्या भेटू " असं म्हणत महेश गेला , अभि रात्री पर्यत तिथेच होता.

सकाळ झाली आणि महेश अभिला भेटायला आला. " बर झालं आलास तू ... तुलाच भेटायला येणार होतो... " ,

" कशाला रे ... ",

" पुन्हा तिथे एक फेरी मारायला पाहिजे ... " ,

" आज परत कशाला ... ",

" अरे ती इतकी मोठी safe बनवली आहे ... ज्याने बनवली त्याला बोलवले आहे. शिवाय तिथे असलेली automatic security system.... त्याबद्दल दामोदर सरांनी माहिती दिली मला .... तरी काही प्रश्न आहेत डोक्यात.. तर ज्याने ती सिस्टिम बनवली आहे , त्यालाही काही विचारायचे होते .... तो येणार आहे. " ,

" मग मी कशाला... मी तर फक्त सांगायला आलो कि एकाच व्यक्तीचे फिगर प्रिंट्स मिळाले आहेत तिथे.... ते आपल्या डेटा मध्ये मॅच करून बघू का ..... आणि माझ्याकडे दुसरी एक केस  आली आहे , त्यावर काम सुरु आहे... तू जाऊन ये , आलास कि बोलू " महेश भरभर निघून गेला.


अभि पुन्हा दामोदर ज्वेलर्स मध्ये आला. बरीच माहिती मिळवली त्याने. CCTV फुटेज मिळाले. अभि संध्याकाळी पोलीस स्टेशनला आला. महेश काही कामानिमित्त बाहेर गेला होता. थोडवेळ थांबून मग अभि सुद्धा घरी निघून गेला.

पुढच्या दिवशी सकाळीच अभिने महेशला बोलावून घेतले. " तुझे त्या केसचे काम झाले का ... ",

" हो ... झाले ना ... तुला काही काम होते का माझ्याकडे ... " ,

" तुला ते फिगर प्रिंट्स मिळाले ... त्याचे काय झालं... ",

" आपल्या डेटा मध्ये शोधणे सुरु आहे... काही मिळाले कि लगेचच सांगतो. ",

" ठीक आहे... बस जरा वेळ.. ",

" कशाला .... " ,

" अरे बस रे ... दामोदर सरांना बोलवले आहे.. चौकशीसाठी.... " ,

" आता त्यांना कशाला बोलावले ... ",

" थांब रे .... आले कि कळेल... " महेश बसला. १० मिनिटांनी दामोदर आले.

" बसा सर ... काही चहा , कॉफी मागवू का .... ",

" नको नको .... राहू दे ... काहीच खावेसे वाटत नाही. इतके मोठे नुकसान झाले आहे..... झोप पण उडाली.. " ,

" लवकरात लवकर पकडू चोरांना... काळजी करू नका.... आधी सांगा... तुम्ही चोरी झालेल्या वस्तूची लिस्ट बनवली का .... ",

" हो ... " त्यांनी ती लिस्ट अभिला दिली.

" १४ कोटी !!!..... त्यात ते हिरेच १० कोटीचे... ",

" हो ना ... इतक्या रक्कमेची भरपाई कशी करणार ते कळत नाही. " दामोदर सर माथ्यावरचा घाम पुसत बोलले.

" आपण पुन्हा त्या दिवसाकडे येऊ... तुमचा क्लायंट ते हिरे घेऊन येणार आहे , हे तुमच्या पूर्ण शॉप मध्ये किती जणांना माहित होते. ",

" दोघांना फक्त... मला आणि मॅनेजरला..... infact त्यानेच तो क्लायंट आणला होता. त्याचीच मीटिंग ठरलेली होती , ऐनवेळी त्याची आई आजारी पडली. आणि त्याला गावी जायला लागले. मॅनेजर सुद्धा जुना आहे , १० वर्ष झाली आमच्याकडे काम करून. ते क्लायंट सुद्धा आधी हिरे ठेवायला घाबरत होते. तुम्ही त्या चोरांना पकडलं आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी ते हिरे आणून दिले मला. त्या आधीच मॅनेजर गावाला निघून गेला. ",

"ठीक आहे .... कोणते गाव त्याचे .... " ,

" मूळचा चेन्नईचा आहे तो... त्याचे कुटुंब तिथेच आहे. उद्या पर्यंत येईल बोलला तो.... " ,

" चालेल .... तो आला कि त्याला इथंच यायला सांगा. बर ... तुम्ही जाऊ शकता... आणखी थोडे दिवस तुमचे शॉप बंद ठेवावे लागेल .... घरी आराम करा " दामोदर निघून गेले.

महेश या दोघांचे बोलणे ऐकत होता. " तुला त्या मॅनेजरवर संशय आहे का... ",

" हो ... खूपच मोठ्या प्रमाणावर संशय आहे... " ,

" का असे .. जुना माणूस आहे ... " ,

" ज्या safe मध्ये चोरी झाली , ती बघितली ना तू... नक्कीच निरीक्षण केले असणार तू ... माझ्या पेक्षा तूच हुशार आहेस.... तिथे कोणाला १० कोटीचे हिरे का ठेवावे वाटतात... दामोदर सर आधीही बोललेले मला ... इथे चोरी करणे जवळपास अशक्य .... एवढी सुरक्षित जागा अजून कुठे सापडणार... " ,

" हा ... मग त्याचा आणि त्या मॅनेजरचा काय संबध... " ,

" सांगतो ऐक... चोरीच्या आधीच त्याची आई आजारी पडते आणि हा चेन्नईला निघून जातो.... योगायोग नसावा हा... त्या चौथ्या मजल्यावर फक्त दामोदर सर आणि मॅनेजर या दोघांनाच प्रवेश आहे. त्याकडे असलेले कार्ड swipe करूनच तो दरवाजा उघडतो... शिवाय त्या safe कडे या दोघांशिवाय कोणी दुसरे जातच नाही. त्या तिजोरीचे किंवा त्या मजल्यावरचे इतके बारकावे... कोणी आतला माणूसच चोराना देऊ शकतो. आणि चोरांनी फक्त ..... तिथेच चोरी केली , जिथे हिरे होते. हिऱ्यांची माहिती या दोघांनाच फक्त .... चोराना कसे कळले.... " अभिचे बोलणे महेशला पटले.

" मग मॅनेजर .... त्याने चोरी केली असेल का...... " महेशने प्रश्न मांडला.

" हा ... त्याने चोरी केली नाही ... त्याने फक्त हि सर्व माहिती चोराला किंवा अश्या माणसाला पुरवली , ज्याला याचा फायदा होऊ शकतो. तुला काल बोललो ना .... मला काही प्रश्न आहेत म्हणून तिथे पुन्हा गेलो होतो. " ,

" काय माहिती मिळाली मग ... ",

" ती पूर्ण इमारत एक मोठा बॉक्स आहे... उत्तम security असलेला metal box .... इमारतीच्या पुढे तर आहेच पण मागेही सॉलिड security आहे. मागच्या बाजूस CCTV कॅमेरे आहेत.... जिथे जिथे खिडक्या आहेत तिथे एक security alram आहे. बाहेरून कोणी कोणतीही खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला तर एक अलार्म वाजतो आणि संपूर्ण इमारती मधील safe , लॉकर बंद होतात. पहिली security इतकी छान आहे कि काळजी करायची गरजच नाही. खिडक्यांचा security अलार्म आधीच कोणी तरी बंद केला. कदाचित मॅनेजरने .... चोर थेट चौथ्या मजल्यावर गेले. खाली आणि वर सुद्धा CCTV कॅमेरे आहेत. ते चोरांनी तोडले. पण महत्वाचे काम पुढे आहे. safe चा दरवाजा ... किती मोठा ... बघितला तुही... जवळपास ७ फुटी लोखंडी दरवाजा... इतका मजबूत कि ड्रिल मशीन सुद्धा तुटून जाईल. तो फक्त चावीने उघडता येतो. चावीची डुप्लिकेट बनवता येणार नाही. ",

" अशी कोणती चावी आहे ... जी डुप्लिकेट होऊ शकत नाही... ", महेशने मधेच विचारलं.

" जवळपास दीड फुटाची चावी आहे ती ... " ,

" एवढी मोठी चावी .. ",

" मुद्दाम बनवली आहे तशी... ती चावी तिथेच असलेल्या एका लहान कपाटात असते. त्या दरवाजाला त्या चावी शिवाय कोणत्याही धातूचा स्पर्श झाला तरी एक security अलार्म वाजतो. त्यानंतर तो लोखंडी दरवाजा आणि त्याबाजूची भिंत यामध्ये सुद्धा एक अदृश्य अशी magnetic ray आहे. चावी शिवाय कोणी तो दरवाजा उघडला तर ती magnetic ray ब्रेक होते आणि आतले सर्व सील होऊन सर्वच बंद होते. " ,

" अरे ... इतकी security... तू सांगतो आहेस .. मला ऐकूनच गरगरते आहे... " , महेश हसत म्हणाला.

" अरे ... अजून बाकी आहे.. चौथ्या मजल्यावर ४ हिट सेन्सर आहेत. त्या सर्वामध्ये एक तापमान सेट करून ठेवले आहे. त्या तापमानापेक्षा जास्त तापमान जर सेन्सरने नोट केले तरी security अलार्म सुरु होतात. असे २ सेन्सर त्या safe च्या आतमध्ये सुद्धा आहेत. ",

" हा ... ते सेन्सर कसे काम करतात ते माहित आहे मला " महेश पुन्हा मध्ये बोलला.


" आपल्या शरीराचे तापमान नोंद करत असतात ते. आपल्या शरीराचे नॉर्मल तापमान त्यात सेट केलेले असते... तेच तापमान हिट सेन्सरला दिसले कि ते शांत असतात. आपण एखादी ऍक्टिव्हिटी केली ... म्हणजे घाई घाईत चालत आलो... धावत आलो... किंवा काही जड उचलले.. काहीतरी जोर लावून उघडले... चोराच्या बाबतीत , दरवाजा जबरदस्ती उघडणे ... वगैरे .... त्यामुळे शरीराचे तापमान वाढते... जोरजोरात श्वास घेतो आपण... ते वाढलेले तापमान ते हीट सेन्सर नोट करतात आणि अलार्म वाजतो. ",

" हेच ... बरोबर बोललास महेश.. तुला हेच सांगायचं try करतो आहे मी... आपण काय बघितले तिथे... " अभि हे बोलला तेव्हा महेशच्या डोक्यात उजेड पडला.

" चोरांनी कोणतीच तोडफोड केली नाही. तरीही .... इतकी security .... कशी तोडली त्यांनी... गार्ड झोपले असतील ... पण मशीन कशी चूक करेल.... आणि चोरी झाली तेव्हा फक्त खिडकीजवळ असलेली सिस्टिम बंद होती... बाकी सर्व तर सुरळीत सुरू होते... " महेश बोलला.

" तुला जे बोटांचे ठसे मिळाले ... एकाच व्यक्तीचे आहेत ना ... ",

" हो ... त्याचे काय ... ",

" मला वाटते एकापेक्षा जास्त लोकांचे काम आहे हे.... निदान ३-४ तरी... हे इतकी security तोडण्यासाठी २ माणसे तर नक्कीच कमी पडणार... मला तर वेगळाच संशय आहे. ",

" कोणता ... ",

" CCTV त्यांनी तोडले किंवा त्याच्या वायर कापून टाकल्या... प्रत्येक CCTV बंद होण्याआधी काही तरी रेकॉर्ड झाले आहे... हे बघ... " महेश निरखून बघू लागला. दोन चोरानी ते कॅमेरे तोडले होते. दोघाच्या चेहऱ्यावर मास्क .. पुन्हा एकदा ... एकाच्या चेहऱ्यावर बॅटमॅनचा मास्क आणि दुसऱ्याच्या चेहऱ्यावर जोकरचा मास्क...

" तुला काय म्हणायचे आहे ते कळले मला... पण हा योगायोग असू शकतो ना... " महेशचा प्रश्न अभिला कळला.  

" सांगतो ते लक्ष देऊन ऐक. तुला मिळालेले फिगर प्रिंट्स... बाकी काहीच मिळाले नाही  त्याशिवाय... त्या CCTV मध्ये सुद्धा चोरांनी हातात ग्लोव्हज घातलेले दिसतात... मग एकानेच हातात काही घातलेले नव्हते का... हे चुकीचे वाटत नाही का तुला... विचार कर... इतक्या वेगवेगळ्या प्रकारची security आहे.. तुला ऐकून बावरायला झाले... साध्या चोराला अशी security तोडणे शक्यच नाही..... आणि हे मास्क .... त्याची आठवण करून देणार ना... " ,


" तरीही ... आपण खूपच लवकर असा अंदाज लावतो आहे असे वाटत नाही का तुला... " , अभि हसला त्यावर ...

" या सर्वात एक गोष्ट तू मिस केलीस... त्या क्लायंटने हिरे तेव्हाच आणून दिले जेव्हा आपण D.B. bank चोरांना पकडले. त्याच रात्री मॅनेजर गावाला निघून गेला. आपण नाशिकला गेलो. १ दिवसांनंतर तिथे रात्री चोरी झाली.....मध्यरात्री चोरी झाली.... आपण इथे नव्हतो तेव्हा चोरी झाली.. म्हणजे आपल्यावर सुद्धा त्याचे लक्ष होते त्याचे ,असे म्हणू शकतो... चोराने काय क्लू मागे ठेवला ... ते बोटाचे ठसे .... मागच्या वेळेसारखे काहीतरी गुंतवून ठेवायला.... आणि ते कार्टूनचे मास्क.. ... ",

" म्हणजे .... सुपरमॅन ..... तो परत आला आहे का ... " ,

" सुपरमॅन नाही.... आपला जुना मित्र .... mastermind !!! " महेश विचार करू लागला....

" खरच तो असेल का पुन्हा ... " , महेशने पुन्हा विचारलं. अभि चालत चालत खिडकीपाशी आला.

" अर्थातच...... त्याला हेही माहित असेल कि हि केस आपल्याकडेच येणार आहे.... म्हणून तर अशी प्लॅनिंग केली असेल त्याने.... तोच असणार .... D.B. bank मध्ये चोरी करणे तसे प्रॅक्टिकली पॉसिबल नव्हतेच ... म्हणून १०० वर्षात एकही चोरी झाली नाही.... त्याने करून दाखवली..... दामोदर ज्वेलर्स ..... इतकी security .... कोणी चुकून जरी तिथे पाय ठेवला तरी किती अलार्म वाजायला लागतील .... तिथे चोरी झाली... अशक्य ते शक्य  करून दाखवतो .... तो तोच आहे .... mastermind !!!...... well played mastermind .............well played !! " अभि स्वतःशीच हसत म्हणाला.

================================= क्रमश :  =============================

 
Sunday, 4 October 2020

Mastermind !!! (season 1- भाग १ )


इंस्पेक्टर अभिषेक नुकताच पोलीस स्टेशन मध्ये आलेला. नेहमी सारखा दिवस , सकाळी ९ वाजताची ड्युटी त्याची. नेहमीच अर्धा तास आधीच यायचा तो. आजही तसेच. स्वतःच्या जागेवर जाऊन बसला. " सावंत ... एक चहा सांगा जरा ... घरी घेतलाच नाही चहा आज ... " अभिषेकने तिथेच उभ्या असलेल्या एका कॉन्स्टेबलला सांगितले आणि स्वतःच्या कामाला सुरुवात केली. सकाळचे ९ : १५ वाजत होते , अचानक त्याच्या समोरचा फोन वाजला.

" हॅलो ... इंस्पेक्टर अभिषेक बोलतोय " अभिने कॉल उचलला.

" अभिषेक सर ... सर .... बँकेत दरोडा पडला आहे... " पलीकडून खूपच घाबरलेला आवाज...

" दरोडा ????? कुठे .... ",

" हो सर.... दरोडा  पडला आहे ... ",

" हा ... कळले ते .... पण कुठे .... ",

" D.B. बँक सर .... ",

" कोणती ब्रांच .... ",

" मुंबई .... मुंबई ब्रांच सर ... लवकर या तुम्ही ... " पलीकडल्या माणसाने कॉल कट केला.

जसा confused झालेला अभिषेक. लागलीच त्याच्या मोठ्या सरांचा कॉल आला त्याला.

" अभि .....D.B. बँक वर दरोडा पडला आहे... मला तसा कॉल आलेला ... चोरी करायला आलेले अजूनही आतमध्ये असल्याचा संशय आहे.. तुम्ही लवकरात लवकर तिथे पोहोचा... दुसरीकडून आणखी पोलिसांची तुकडी पाठवतो आहे , तरी तुम्ही आता जितकी माणसे तुमच्याकडे असतील त्यांना घेऊन निघा.. " ,

" yes सर ... निघालोच ... " अभि घाईघाईत उठला. पोलीस स्टेशन मध्ये ५-६ जणांना मागे ठेवून, अभि बाकीच्यांना घेऊन निघाला. D.B. बँक जवळच होती. पुढल्या १० मिनिटात तो तिथे पोहोचला. काही अंतरावर लोक जमलेली , दुरूनच काय चालले आहे ते पाहत होती. त्या गर्दीतून एक जण अभिला हाताने खूण करून बोलवत होता. एका कॉन्स्टेबलला सांगून अभिने त्याला घेऊन यायला सांगितले.

" काय झालं .... काही सांगायचे आहे का ... " अभिने त्या माणसाला विचारलं. तो आधीच घाबरलेला दिसत होता.

" हा सर ... मीच कॉल केलेला.. " अभिने त्याला निरखून पाहिले.

" तुम्हाला कसे कळले ... बँकेत चोर घुसले आहेत ते.. " ,

" मी होतो ना आतमध्ये तेव्हा.. " ते ऐकून अभि चपापला.

" आतमध्ये होता तुम्ही .... बाहेर कसे आलात मग ... " अभिने त्याला विचारलं.. त्याचवेळी मोठ्या सरांनी सांगितल्या प्रमाणे पोलिसांची आणखी एक तुकडी तिथे पोहोचली. बँकेत जायचे २ मार्ग , एक समोरून आणि एका मागचा , emergency exit .... दोन्ही मार्ग बंद करून टाकले. अभिने सर्व परिस्तिथीचा आढावा घेतला आणि पुन्हा तो त्या माणसाकडे आला.

" हा ... कुठे होता आपण ... आठवलं .... बँकेतून बाहेर कसे आलात... आणि किती जण आहेत ते .. " ,

" तिघे आहेत ते ... आधी सर्वाना पकडून ठेवले होते.. मग बँक कर्मचारी आणि काही इतर लोकांना ओलीस ठेवून बाकी लोकांना सोडून दिले... " त्याला सांगतानाच घाम येतं होता. हे जरा विचित्र वाटले अभिला .त्या व्यक्तीला FIR नोंदणीसाठी एका कॉन्स्टेबल सहित पोलीस स्टेशन ला पाठवले. लगेचच त्याने मोठ्या सरांना कॉल केला.  

" सर ... चोर अजूनही बँकेत आहेत... मला आणखी माणसांची गरज लागेल... " म्हणत त्याने फोन ठेवून दिला. जमलेल्या सर्व पोलीस , कॉन्स्टेबलला त्याने बुलेटप्रूफ जॅकेट घालायला सांगितले. पुढे काय होईल कळत नव्हते. अश्यातच अर्धा तास गेला. अभि विचार करतच होता , कि सर्व बाजूनी आपण त्यांना अडकवले आहे, तोपर्यंत न्यूजवाले आलेच. अभिने कपाळाला हात लावला. " यांना एवढ्या लवकर कशी माहिती मिळते कळत नाही... " अभि मनातल्या मनात बोलला. एक कॉन्स्टेबल अभि जवळ आला. " सर .... तुम्हाला न्यूजवाले बोलवत आहेत. " नाराजीनेच तो तिथे गेला. पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेट्सच्या मागे न्युजवाल्यानी एकच घोळका केला होता. अभि जवळ पोहोचला आणि प्रश्नावर प्रश्न सुरु झाले. " कशी झाली चोरी ... कोणी जखमी आहे का ..... किती चोरी झाली .... " एकावर एक प्रश्न...

" थांबा .... थांबा सर्वानी... बोलू तर द्या मला ... " तसे सर्व शांत झाले. " आम्हीही पाऊण तासापूर्वीच आलो आहोत. चोर अजूनही आतमध्ये आहेत... काही लोकांना त्यांनी ओलीस धरले आहे. इतकीच माहित आहे माझ्याकडे ... " ,

" किती चोर आहेत .... त्यांच्या काही मागण्या आहेत का ... " पुढचा प्रश्न....

" ते किती आहेत याची काहीच कल्पना नाही ... त्यांच्या काही मागण्या आहेत का आणि त्याच्याकडे कोणती हत्यारे आहेत ... माहित नाही. कोणताच contact झालेला नाही अजूनही.... आणि प्लिज ... तुम्ही सर्व एक अंतर ठेवून रहा .. हल्ला होऊ शकतो ... तुमच्या पैकी कोणीही जखमी होऊ शकते... तर जरा दूर उभे रहा .... " म्हणत अभिषेक पुन्हा बॅंकजवळ आला.अभिने सांगितल्याप्रमाणे पोलिसांची आणखी एक तुकडी तिथे पोहोचली. सोबत डॉक्टरांची टीमसुद्धा आली. ४ अब्युलन्स आल्या. जर कोणता हल्ला केलाच तर तयारीत राहण्यासाठी. अभीचा मित्र , डॉक्टर महेश सुद्धा होता त्यात. सर्वांनी आपापल्या position घेऊन ठेवल्या. आजूबाजूच्या ४ इमारतीवर ४ sniper नेम लावून तयारीत होते. डॉक्टर महेशला आलेले पाहून अभि त्याच्याकडे गेला.

" आलास ... बघ ... तुझा इथे काहीच संबंध नसताना सरांनी तुला पाठवून दिले... माझी पाठ काय सोडत नाही तू ... " अभिच्या वाक्यावर महेशला हसू आलं.

" मस्करी काय करतो रे .. ते राहू दे .. update काय ... " ,

" काही नाही .... तिघे आहेत असे कळले.... पण conform नाही... त्यांनी कोणताच contact केलेला नाही अजून, मग लोकांना ओलीस कशाला धरून ठेवले आहे... काही कळत नाही... confused आहे... एकदा तर मनात आलेलं , तो जुन्या movie मध्ये dialogue  असतो ना , " भागने कि कोशिश मत करना... पोलीस ने तुम्ही चारो तरफ सें घेर लिया है ..... " असे ओरडावे .... खूपच जुना dialogue होता ना ... म्हणून तो विचार बाजूला ठेवून दिला. " अभिच्या बोलण्यावर महेश पुन्हा हसू लागला.

" अरे ...पहिल्यांदा आहे हे .... माझ्या आतापर्यन्तच्या नोकरीत बँक दरोडा ... तोही live ... first time आहे हे .... त्यामुळे सुचत नाही काय करावे ... " ,

" नको टेन्शन घेऊस .... मी आल्याआल्या बघितले सर्व .... दोन्ही entry बंद केल्या आहेस... इतकी लोक आहेत सोबतीला... त्यांना बाहेर यायचे असेल तर करतील contact... तू आधी तुझ्या जागी जाऊन उभा राहा ... इकडे बोलत उभा राहू नकोस , नाहीतर ते न्युजवाले आणखी काही news बनवतील ...   " अभिला महेशचे बोलणे पटले.


साधारण १०:३० च्या सुमारास काही हालचाल जाणवली. बँक २ मजली. बँकेच्या पहिल्या मजल्याच्या एका खिडकीतून एक जण हाताने इशारा करत होता. आत असलेल्या चोरापैकी एक असावा , कारण त्याने मास्क लावलेला..... ' बॅटमॅन ' चा मास्क !! हाताने इशारा करून तो खाली दरवाजाकडे बघण्यास सांगत होता. अभिने दरवाजाकडे पाहिले. एक तरुणी तिचे दोन्ही हात वर करून चालत येतं होती. सर्वानी सावध पवित्रा घेतला. काही घातपात होण्याची शक्यता होती. पण तसे काही झाले नाही. ती तरुणी अर्ध्यावर आली तसे तिला जागच्या जागी खाली बसायला सांगितले... बॉम्ब वैगरेची शक्यता होतीच... तिला बॉम्ब शोधक पथकाने पूर्ण चेक केला , काहीच नव्हते. ती तरुणी मग अभि जवळ आली. प्रचंड घाबललेली..

" तुम्हाला एकटीलाच सोडले त्यांनी... " ,

" मी बँकची receptionist आहे ... त्या चोरांनी माझा मोबाईल घेतला आहे.. तुमच्याशी बोलायचे आहे त्यांना ... माझ्या मोबाईल वर कॉल करायला सांगितले आहे .... म्हणून मला सोडले त्यांनी... " अभिने तिला बाजूला नेले. तिच्यावर तरी कसा विश्वास ठेवावा म्हणून अभिने तिला पोलीस स्टेशन ला पाठवले.

तिने सांगितलेल्या मोबाईल नंबर वर अभिने कॉल केला.

" हॅलो .. मी इन्स्पेक्टर अभिषेक बोलतो आहे. " पलीकडून काही आवाज आला नाही.

" हॅलो !! " अभिने पुन्हा आवाज केला.

" Hi इन्स्पेक्टर .... कसे आहात... " पलीकडून आवाज आला. पोलिसांची अशी चौकशी करणार चोर पहिल्यांदा अभि बघत होता.

" मी ठीक आहे ... पण तुम्ही त्या लोकांना का पकडून ठेवले आहे... मागण्या तरी काय तुमच्या... ",

" हो हो .... किती घाई .... जास्त घाई बरी नव्हे ऑफिसर .... विचार करून सांगतो... तुमचाच नंबर आहे ना .... थोड्यावेळाने करतो मीच कॉल ... " म्हणत पलीकडल्या चोराने कॉल कट्ट केला. अभिचे मोठे सर आलेले तोपर्यंत.

" अभि ... काय update ... ",

" नाही सर ... अजूनही काही स्पष्ठ होत नाही... त्यांनी contact केला पण त्यांची संघटना कोणती ... ते हे कश्यासाठी करत आहेत ... मागण्या काय .... काहीच समजले नाही.. ",

" पुन्हा contact केला नाही का त्यांनी .. " ,

" नाही .... ",

" एक नक्की ना .... ते अजूनही बँकमध्येच आहेत ना ... ",

" हो .... आम्ही एकाला खिडकीत पाहिलेले ... " ,

" मग स्पेशल फोर्सची मदत घ्यावी का .... ते आत शिरून त्यांना मारतील ... " ,

" नको सर ... आतमध्ये किती लोकं ओलीस आहेत याची माहिती नाही... आपण काही करावे आणि निष्पाप लोकांचा बळी जावा हे नको आहे मला ... थोडावेळ वाट बघू.... " त्यांना अभिचे बोलणे पटले. तिथे असलेल्या परिस्थितीचा अंदाज घेऊन तेही निघून गेले. अर्ध्या तासाने अभीचा मोबाईल पुन्हा वाजला. पलीकडे मगाशी असलेला व्यक्ती ....

" आमच्या काही मागण्या आहेत ... त्या पूर्ण करा ... आम्ही सर्वाना सोडून देऊ .... " ,

" कोणत्या मागण्या .... ",

" आम्हाला इथून बाहेर जाण्यासाठी गाडी पाहिजे... गाडी बँकच्या मागच्या दरवाजाला चिटकून उभी करावी. मागील भागातील सर्व पोलिसांना बाजूला करावे.... हा .... आणि काही चलाखी चालणार नाही... आमच्याकडे रिमोटने चालू होणारे बॉम्ब आहेत... गाडीत शिरताना कोणी गोळीबार केलाच तर बँकमध्ये असलेले उगाचच मरतील ... " त्याने एवढे बोलून कॉल कट्ट केला.


अभि विचारात पडला. नक्की किती चोर आहेत आतमध्ये... किती लोकांना पकडून ठेवले आहे.... मोठया सरांशी बोलून पुढे काय करावे यासाठी अभि पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये आला. अभिला कॉल केलेला तो व्यक्ती आणि मघाशी बाहेर आलेली तरुणी ... दोघेही अजून पोलीस स्टेशन मधेच होते. मोठे सर एका कॉलवर होते , तोपर्यंत अभि त्या दोघांजवळ आला.

" तुमच्या दोघांपैकी कोणी तरी चेहरा पाहिला असेल ना ..." दोघांनीही नकारार्थी मान हलवली. अभि मग त्या मुलीकडे बघू लागला .

" तुम्ही तर आतमध्ये होता ना ....  काही वर्णन सांगू शकता का ... किती आहेत .... आतमध्ये किती लोक आहेत ... " ,

" तिघे आहेत ते ... काळ्या रंगाचे कोट ... ते नाही का कॉर्पोरेट ड्रेस कोड असतो ... तसा पेहराव आहे तिघांचा ... चेहऱ्यावर मास्क.... एकाने बॅटमॅनचा मास्क ... दुसऱ्याने आयर्नमॅन चा मास्क आणि तिसरा मिकीमाऊस चा मास्क घालून होता. तिघे एकमेकांना त्याच नावाने बोलत होते. मिकी वाला १० मिनिटात गायब झाला.. तो कुठे गेला माहित नाही. बँकेत पण २५ - ३० लोक असतील... माझा मोबाईल घेतला त्यांनी आणि तुम्हाला कॉल करायला सांगायला पाहिजे म्हणून मला सोडले त्यांनी.. " अभिला एकंदरीत काय झाले असेल त्याचा अंदाज आला.

मोठया सरांशी बोलणे झाले , लोकांचा जीव महत्वाचा , चोरांना नंतर पकडता येईल असा विचार करून गाडीची व्यवस्था करण्यात आली. गाडीत अर्थातच tracker बसवला होता, जेणेकरून चोरांनी गाडी कुठे नेली ते कळण्यासाठी.... गाडी बँकेच्या मागच्या दरवाजाला त्यांनी सांगितल्याप्रमाणे अगदी चिटकून उभी केली. अभिने त्या नंबर वर कॉल केला. सकाळपासून सुरु असलेलं ते नाट्य ... आता दुपारचे १२ वाजले तरी सुरूच होते.

" तुमच्या मागणी नुसार , गाडी बाहेर उभी आहे. मागेच पोलीस संरक्षण सुद्धा काढून टाकले आहे... जाऊ शकता तुम्ही .... ",

" good !! आमची तयारी झाली कि आम्ही निघू... लक्षात आहे ना ... बाँम्ब आहे आमच्याकडे... चलाखी नाही करायची.... " ,

" हो .... हो आहे लक्षात .... ",

" Very good .... निघताना पुन्हा कॉल करिन , बाँम्बची गोष्ट लक्षात आहे का ते बघायला ......  " त्याने कॉल कट्ट केला.कोणत्याही क्षणी ते बाहेर येतील असा विचार करत अभिने सर्वांना सावध केले. सर्व जमलेले त्या गाडीकडे पाहत होते. काही हालचाल होते का , त्याचा कानोसा घेत होते. पैश्याने भरलेल्या बॅग घेऊन तिघेही बाहेर येतील असे सर्वाना वाटत होते, पण तसे काहीच झाले नाही.

दुपारी १२ वाजता केलेला कॉल , अभिने आता घड्याळात पाहिले तर दुपारचे २ वाजत होते. निघताना कॉल करणार होता ... गाडीही आणली होती. मग हे असे का .... २:३० वाजता त्याने पुन्हा कॉल केला. रिंग वाजत होती पण कोणी उचलत नव्हते. किती वेळा त्याने कॉल केला तरी उत्तर नाहीच. ३ वाजता त्याने मोठ्या सरांना कॉल केला. काय झाले ते सर्व सांगितलं.

" खूप वेळ झाला सर ... आत जाऊन बघावे लागेल... ",

" हो ... सावध रहा ... काळजी घ्या ... " ,

" yes सर !! " अभिने तयारी केली. सोबत १५ -२० जणांना घेऊन तो सावध आत शिरला. मागचा दरवाजा सुद्धा पोलिसांनी पुन्हा बंद केला. त्या तरुणीने सांगितल्याप्रमाणे सर्व ओलीस ठेवलेली माणसे पहिल्या मजल्यावर होती. त्याने ग्राउंड फ्लोअर नीट बघून घेतला, बाँम्ब शोध पथक सुद्धा होते. या ठिकाणी कोणता बाँम्ब वैगरे आहे का तेही पाहिले. बॉम्ब नाही मिळाला. आणखी काही पोलिसांना आता बोलवून अभि वरच्या मजल्यावर जाणाऱ्या जिन्याकडे निघाला. बँक मोठी होती. त्यामुळे जिन्याच्या काही पायऱ्या चढल्यावरच त्यांना पूर्ण मजला दिसत होता. तिथे असलेली सर्व लोकं खाली झोपून होती. अभिने हळूच कोणी शस्त्रधारी दिसतो का त्याचा कानोसा घेतला.

तिथेही कोणीच नव्हते. तरीही अतिशय सावध रीतीने ते सर्व वर आले. पोलिसांना आलेले बघून खाली झोपलेले सर्वच उठून उभे राहिले.

" thank you !! thank you !! तुम्ही आलात ... आम्ही वाचलो.... " एक जण धावत अभि जवळ आला.

" थांबा .... सर्वानी एका बाजूला उभे राहा .... कशाला हात लावू नका ... " अभिने निरखून पाहिले. त्यात चोरटे नव्हतेच. बाँम्ब शोध पथकाने तिथेही तपासणी केली. बाँम्ब तिथेही नव्हता.

" यांच्याकडे बाँम्ब होता कि आपल्याला खोटे बोलत होते ते .... " अभि मनातल्या मनात बोलला. सर्वांची तपासणी झाली आणि अभिने त्यांना विचारलं...

" तिघे जण होते ना .... नक्की गेले कुठे ते .. आणि तुम्ही जमिनीवर का झोपले होता... " त्यातल्या एकाला विचारलं.

" त्या दोघांनी आम्हाला खाली झोपायला सांगितले... बोलले कि उठलात तर तिथेच गोळ्या घालू .... असे म्हणत ते त्या लिफ्टच्या दिशेने गेले. नंतर त्यांचा काहीच आवाज नाही... " त्याने त्या समोरच्या लिफ्टकडे बोट दाखवलं. लिफ्ट त्या मजल्याच्या अगदी शेवटाला होती. अभि पुन्हा सावध झाला.

" लिफ्ट ?? .... २ मजल्याच्या इमारतीला लिफ्ट कशाला... २ nd फ्लोअर वर काय आहे .. " अभिने मॅनेजरला विचारलं.

" कागदपत्र ... त्यांची कपाटे ... फाइल्स वगैरे... " ,

" फक्त कागदपत्र ??  बाकी काही नाही... " ,

" नाही ... फक्त या मजल्यावर कॅश असते... याच्या खाली reception आहे आणि underground सर्व locker आहेत. ",

" हि लिफ्ट लॉकर रूम कडे जाते का ... " अभीचा पुढचा प्रश्न...,

" actually लॉकर रूम साठीच ती लिफ्ट बनवली आहे.... तिथे फक्त लिफ्टने च जाता येते..... " ,

" चोर तिथेच गेले असणार .... " अभि बोलला . तरी काही पोलिसांना त्याने दुसऱ्या मजल्यावर पाठवले. अभिने तिथे स्वतः जाण्याचा निर्णय घेतला. cctv ने बघावे तर चोरांनी आधी तेच बंद केलेले. लिफ्टने जाणे धोकादायक होते तरी पर्याय नव्हता. ४ जणांसहित अभि लिफ्ट ने खाली लॉकर रूमकडे निघाला.

मनातून घाबरलेला तरी चोराना पकडायला हवेच. लिफ्ट खाली पोहोचली. दरवाजा उघडताच समोर लॉकर रूम दिसली. मोठी रूम. तिथूनच दिसत होते कि तिथेही कोणीच नव्हते. आणि चोरी तिथेच झालेली. अनेक लॉकर तोडलेले. जमिनीवर काही पेपर्स , नोटा पडलेल्या... तरीही सर्व रूम चेक केली... हातात काही लागले नाही. अभि हताश होऊन वर आला. ओलीस ठेवलेल्या सर्वाना चौकशी साठी पोलीस स्टेशनला घेऊन गेले. बँक सील केली गेली. फक्त मॅनेजर आणि काही कर्मचारी लोकांना तिथे मागे ठेवले गेले. त्यांना किती चोरी झाली याचे गणित मांडायला मागे ठेवले.

मीडियाला काय उत्तर देणार... चोर गेले तरी कुठे.... चोरी तर नक्की झालेली. मग इतका माल घेऊन चोर काय गायब झाले कि काय... अभि विचार करत करत बँकेच्या बाहेर येऊन बसला. डॉक्टर महेश त्याच्या शेजारी येऊन बसला.

" काय विचार केला आहेस.. " महेशने त्याला विचारलं.

" माहित नाही ... आणि काही सुचतही नाही.... कोणी असे कसे अदृश्य होऊ शकते... " ,

" लॉकर रूम मध्ये चोरी झाली ना ... तिथूनच पळाले असतील... " महेशने पुन्हा विचारलं.

" नाही यार ..... त्या रूम मधून पळायला जागाच नाही आहे... साधा आवाज सुद्धा तिथून वर येतं नाही , एवढी बंदिस्थ रूम आहे ती.. बँकेच्या मागे-पुढे ,सकाळपासून पोलीस आहेत .... आपण आहोत... तरी ... " अभि डोक्याला हात लावून बसला होता.

" पुढे काय .. ",

" आज त्यांना किती चोरी झाली आहे त्याचा अंदाज लावू दे... आता संध्याकाळ पण होत आली. उद्या सकाळी तुझी टीम घेऊन ये... फिंगर प्रिंट्स मिळतात का बघू.... बाकी काही मिळाले तरी छान.... मीही असेन सकाळीच.... बघू कसे पळाले ते .... शोध तर लावला पाहिजे ना ... तुही जा घरी .... उद्या सकाळी भेटू .... " महेश उभा राहिला.

" तू हि चल ... " त्याने न्युज वाले उभे होते तिथे बोट दाखवले.

" त्यांना काही तरी उत्तर द्यावे लागेल ना ... तिकडचे आवरतो आणि निघतो घरी..... " अभीचा निरोप घेऊन महेश निघाला.


दुसऱ्या दिवशी, सकाळी ७ वाजताच , महेश त्याच्या टीम सहित बँकेत पोहोचला. अभिची टीम सोबत होतीच. शिवाय कालपासून बँकेला पोलिसांचा वेढा... डॉक्टर महेशची forensic expert ची टीम पटापट कामाला लागली. जितके फिंगर प्रिंट्स घेता येतील तेवढे जमवायला लागले. अभि महेश सोबत लॉकर रूममध्ये आला. मॅनेजर होता सोबत. लॉकर रूम मध्ये आल्या आल्या महेश थांबला.

" काय झालं ?? " अभिने विचारलं.

" तुला एक विशिष्ठ वास येतो आहे का... ",

" हा .... काल आम्ही आलो होतो तेव्हा पासून आहे... का पण " अभिने पुन्हा महेशला विचारलं.

" एक विशिष्ठ केमिकल आहे हे ... मला वाटते चोरांनी फवारले असणार , नॉर्मली हे पोस्टमोर्टम करतात ना ... त्या ठिकाणी साफसफाई साठी वापरतात... सर्वच साफ होऊन जाते. मुद्दाम फवारले असणार ते ... फिंगर प्रिंट्स सुद्धा मिळणार नाहीत आपल्याला आता ... चोराला माहित आहे असे केमिकल ... Good !! " महेश निरीक्षण करू लागला. अभि , मॅनेजर जरा दूर उभे राहून त्यांना बघत होते.

" एक गोष्ट सांगा ... या रूममध्ये लॉकर आहेत तरी कसलीच security नाही... निदान एखादा लोखंडी दरवाजा तरी .... उघडीच आहे हि रूम .... " ,

" हि लिफ्टचं या रूमचे security आहे.... सिक्युरिटी गार्डच्या केबिन मध्ये कंट्रोल आहे याचा... एक बटन दाबले कि पहिल्या मजल्यावरच लिफ्टचा दरवाजा बंद होतो.... खाली येऊच शकत नाही कोणी.... ",

" हम्म ... किती जणांची लॉकर आहेत इथे... " ,

" जवळपास सर्वच भरलेली आहेत लॉकर .. रजिस्टर मध्ये बघावे लागेल किती वापरात आहेत ते.... " ,

" किती चोरी झाली त्याचा हिशोब लागला का.... " ,

" एका दिवसात ते सांगू शकत नाही... तरी उद्यापर्यंत सर्व calculate करून सांगतो... कॅश नसते जास्त या लॉकर मध्ये..... मौल्यवान वस्तू , प्रॉपर्टीचे पेपर्स .. सोन्या - चांदीचे दागिने ... हिरे वगैरे ... जमल्यास क्रेडिट कार्ड ... असे ठेवतात इथे.. त्यामुळे गणित करायला वेळ लागेल जरा ... " मॅनेजरने माहित पुरवली. अभिला जरा विचित्र वाटले.

" क्रेडिट कार्ड ???? लॉकर मध्ये क्रेडिट कार्ड कोण ठेवते. " ,

" मोठया लोकांकडे एकच कार्ड थोडीच असते ... ३-४ तर सहज असतात... हरवली तर पुन्हा प्रॉब्लेम ... एकाने लॉकर मध्ये कार्ड ठेवायला सुरुवात केल्यावर बाकीचे पण ठेवू लागले.. "

अभि ते सर्व शांतपणे ऐकत होता. डॉक्टर महेश सर्व निरखून पाहत होता. थोड्यावेळाने अभिला त्याने बोलावून घेतले.

" मला काही केस सापडले आहेत.. कदाचित चोरापैकी एकाचे असतील. DNA चेक करून आपल्याला चोराचा शोध घेता येईल.." ,

" तुझे बोलणे ठीक ... तरी किती लोकांचा DNA चेक करशील . " ,

" आपल्या रेकॉर्डस् मध्ये आहेत ना खूप रिपोर्ट ...एकाचा तरी जुळला तरी सोप्प होईल काम ... " ,

" तरी एक प्रश्न आहेच... ते पळाले कुठून .... " अभिने महेश समोर प्रश्न उपस्थित केला. महेश पुन्हा ती रूम निरखून पाहू लागला.

एखाद्या १ BHK सारखी मोठी रूम... तीन भिंती... तिन्ही भिंतींना जुन्या काळातली , तरी भक्कम अशी कपाटे, त्यात कपाटातच सर्व लॉकर बनवलेली. अभिच्या मनात काही आले.

" मॅनेजर ... एक सांगा .... हि लॉकरची सिस्टिम कधी पासून आहे... ",

" काय बोलला ते कळलं नाही... ",

" म्हणजे असे कि आताच्या नवीन बँकमध्ये असे लॉकर नसतात. even माझेही एका बँकमध्ये लॉकर आहे... पण तो लॉकर थेट भिंतीत आहे. बहुदा तसेच लॉकर बघितले आहेत मी... इथे हि लोखंडी कपाटे आहेत, त्यात लॉकर लावले आहेत... " ,

" तसे होय... हे लॉकर जेव्हा बँक उभी राहिली ना ... म्हणजे जेव्हा या इमारतीचा पाया झाला ना .... तेव्हाच ते जागच्या जागी बनवून घेतले. फक्त त्यावेळेस लिफ्ट नव्हती , तेव्हा पायऱ्या होत्या. लिफ्ट वापरायला सुरुवात झाली तेव्हा पायऱ्या काढून लिफ्ट बसवून घेतली. म्हणजे खूप जुने आहेत हे लॉकर पण मजबूत आहेत. सहज तोडणे शक्य नाही... त्यांनी कसे केले ते नवलच आहे. " अभि पुन्हा विचारात गढून गेला. भिंतींना हात लावून बघत होता.

" हे बांधकाम कधीचे आहे... ",

" जुनेच आहे ... नवीन असे काहीच नाही... फक्त ३ वर्षांपूर्वी इथे रंगकाम करून घेतले. ",

" हि कपाटे आहेत ना इथे ... याच्या मागे कसे केले असेल रंगकाम... " अभिने विचारलं.

" कपाटे जड दिसतात , हलकी आहेत ती .... सहज हलवता येतात... " मॅनेजरच्या त्या वाक्यावर अभि चमकला. महेशची टीम तिथेच होती. " महेश !! कपाटे सरकवून बघायला हवीत.... " तीन भिंती , तीन भिंतींना ३ कपाटे लावून ठेवलेली. पहिले कपाट सर्वानी मिळून सरकवले. खरच जड दिसणारी ती कपाटे खूपच हलकी होती. त्या मागची भिंत होती तशीच होती. कसलीच तोडफोड नाही. लगेच दुसऱ्या भिंतीकडे गेले. तिथे मात्र भिंतीच्या विटा हलवलेल्या दिसल्या... असे होते कि कोणीतरी त्या विटा काढून पुन्हा लावलेल्या होत्या. अभिने एका लाथेने त्या विटा पडल्या. सर्व विटा पलीकडे पडल्या. एक मोठा माणूस सहज आरपार जाईल इतका मोठा तो बोगदा होता. " टॉर्च !! टॉर्च आणा लवकर ... " अभि ओरडला. एकाने घाईत टॉर्च आणून दिला. अभिने टॉर्च सुरु केला आणि भिंती पलीकडे गेला. इतरही काही टॉर्च घेऊन अभिच्या मागे मागे गेले.


भिंतीच्या पलीकडे एक खूपच जुना लोखंडी पाईप होता. बँकेतून भिंतीपलीकडे थेट ते सर्व तिथेच उभे होते.

" आहे काय हे... ? " अभि सहित सर्वच विचारात पडले.

" मला वाटते हा जुना drainage pipe असावा किंवा पाण्याचा पाईप असावा .... एवढे मोठे पाईप तर त्यासाठीच असतात " महेश बोलला.

" मग यात पाणी कसे नाही. " अभि बोलला. तरी इथूनच चोर पळाले असणार , असे मनात धरून अभि पुढे चालू लागला. ९-११ फूट उंचीचा पाईप.. सर्व आरामात चालत होते. पुढे काही अंतरावर त्यांना अर्धवट जळालेले कपडे दिसले. आजूबाजूला काही सामान पडलेले होते. टॉर्च होते... काडेपेटी .... आणि खेळण्यातल्या बंदुका ... अभि ते बघून चाट पडला. महेशने डोक्याला हात लावला. खोट्या बंदुका घेऊन यांनी बँक लुटली. आजूबाजूला काही नोटा सुद्धा पडलेल्या दिसल्या ... यावरून हे नक्की झालं कि चोर इथूनच पळाले. ते सापडलेले सर्व सामान महेशने एका पिशवीत भरले. पुढे चालू लागले. काही अंतर चालून गेलयावर त्यांना अस्पष्ट असा पाण्याचा आवाज येऊ लागला , सोबत दुर्गंध .... आणखी पुढे चालून तो पाईप संपला. त्याच्याशेवटी शहराचे सांडपाणी वाहून नेणारी दुसरी लाईन दिसली. सर्वांनी आपापले टॉर्च सुरु करून तो परिसर उजळून टाकला.

एखाद्या लहान गुहेसारखी ती जागा होती. ते सर्व उभे असलेला तो पाईप तिथेच संपला होता. खाली फक्त दुरून येणारे सांडपाणी वाहत होते.

" इथून पुढे हे पाणी समुद्राला जाऊन मिळते, जास्त दूर नाही समुद्र इथून... " महेशने माहिती पुरवली. " खाली उतरण्यात काहीच अर्थ नाही , शिवाय हे पाणी किती खोल हे हेही माहित नाही... " महेश पुन्हा बोलला.

" तरी ... ते बँकेतली लूट घेऊन पोहत गेले नसतील ना ... हा पाणी जिथे समुद्राला मिळते ना ... तिथे बघितले पाहिजे.. " अभि बोलला. सर्वच बाहेर आले. लॉकर रूम मध्ये काही जणांना उभे करून बाकी सर्व निघाले. अभि मॅनेजर जवळ आला.

" मघाशी लक्षात आले नाही माझ्या... लिस्ट बनवा , जितके क्रेडिट कार्ड चोरीला गेले आहेत ना ... ते सर्व ब्लॉक करा ... लवकरात लवकर... ब्लॉक केलेली कार्ड कोणी वापरली तर आपल्याला लगेच कळेल , त्यावरून चोरी कोणी केली ते कळू शकते. कळलं ना तुम्हाला .... मी काय बोलतो ते... " ,

" हो सर ... लगेच कामाला लागतो.. " मॅनेजर म्हणाला. अभि गाडीत येऊन बसला. जलदच ते समुद्रकिनारी आले.

" जिथे जिथे सांडपाणी बाहेर येते तिथे शोध घ्या .... नक्कीच काही मिळू शकते.. " अभिने टीमला आदेश दिला. सर्व पसरले. दूरवर पसरलेला किनारा ... शोधायचे तरी कुठे.... अभि विचार करत एका ठिकाणी पोहोचला , जिथून पाणी बाहेर येतं होते. संशय घेता येईल असे काहीच नव्हते तिथे. तितक्यात त्याच्या टीम मधल्या एकाने कॉल केला.

" सर ..... मागे बघा..... " अभिने मागे बघितले. दूरवर एका ठिकाणी एक कॉन्स्टेबल त्याला हात दाखवत होता. " इथे या सर ...... आम्हाला काही मिळाले आहे इथे... " किनाऱ्यावर धावत निघाला अभि. वाळूतून धावताना दमून गेला. तिथे २ लाकडी बोटी होत्या. चोरांनी याचा वापर केला असणार हे नक्की , कारण मासेमारी करणारे असे सांडपाण्यात आपल्या बोटी उभ्या करणार नाहीत आणि त्या भागात कोणी मासेमारी करतच नाही. असा अंदाज अभिने लावला. दोन्ही बोटी ताब्यात घेतल्या त्यांनी.  

खूपच धावपळ झालेली सर्वांची. बँक अजूनही सील केलेली. अभि पोलीस स्टेशन मध्ये आला. सारखा सारखा विचार करून आणि धावपळ करून त्याचे डोके दुखायला लागले. न्युजवाले मागेच लागलेले, चोर नक्की गेले कुठे .... एवढ्या सुरक्षित बँकेतून चोरी... अभिला डोकेदुखी सहन होत नव्हती. घरीच जाऊन आराम करू असा ठरवले त्याने. फिंगर प्रिंट्स , फॉरेंसिक रिपोर्ट यायचे बाकी होते , त्याशिवाय पुढे काही करू शकत नाही. त्यापेक्षा घरी जाऊन आराम केलेला बरा म्हणत अभि घरी निघून गेला.

सकाळी जरा उशिराने अभि पोलीस स्टेशनला आला. बँकेत चोरी झाल्यानंतर ३ दिवस. अभिने आल्या आल्या पाहिले, मॅनेजर आलेले. त्यानेच लवकर बोलावले होते. " तुम्ही सांगितलेले काम केले का .. ते कार्ड ब्लॉक केलेत का .... " अभिने खुर्चीवर बसता बसता मॅनेजरला प्रश्न केला.

" हो सर आणि हि लिस्ट आणली आहे.... ५०० पैकी १७८ लॉकर त्याने फोडले. हे बघा ... " अभिने ती लिस्ट नजरेखालून घातली. तब्बल ४ कोटींचा ऐवज चोरी झालेला. जास्त करून दागिने , हिरे... क्रेडिट कार्ड ची संख्या होती ८० ....

" हम्म .... फारच मोठा हात मारला त्यांनी... " मॅनेजरकडे पाहत म्हणाला.

" आणखी एक काम करा ... गेल्या ३- ४ महिन्यात कोणी कोणी नवीन बँक अकाउंट साठी आणि लॉकर साठी apply केलेला , त्याची लिस्ट काढा ... जमले ना " ,

" हो ... बँकेत जाऊन बघावे लागेल.. " ,

" ठीक आहे ... उद्या पर्यंत त्याचे सर्व details .... त्यांचा address, मोबाईल नंबर वगैरे सर्व काढून द्या मला ... ",

" नक्की " म्हणत मॅनेजर निघून गेला.  

डॉक्टर महेश तिथेच मागे उभा राहून अभिचे बोलणे ऐकत होता. " ये ... उभा का ... बस कि .... आणि सांग ... काही मिळेल का , तुला तरी ... " महेश खुर्चीवर बसला.

" तुला बोलल्याप्रमाणे, तेच केमिकल वापरले त्यांनी. त्यामुळे लॉकर रूममध्ये कोणतेच फिंगर प्रिंट्स मिळाले नाही. त्यांनी हातात ग्लोव्हज घातले असणारच. बँकमध्ये फक्त, त्यादिवशी हजर आलेले बँक कर्मचारी आणि बँकेत व्यवहार करायला आलेली माणसे , यांचेच बोटाचे ठसे आहेत. ",

" हम्म ..... आणि तुला ते लॉकर रूममध्ये केस सापडले होते ते... त्याचा DNA रिपोर्ट आला का.... ",

" नाही ... उद्या मिळेल .... तरी तुला काय वाटते चोरीबद्दल... " ,

" काल लवकर घरी गेलो होते ... आराम करायला. झोप कसली येते, सारखं सारखं तेच डोक्यात... चोरांना कसे माहित कि लॉकर रूमच्या बाजूनेच एक मोठा , वापरत नसलेला पाईप आहे ते ... " अभि बोलत होता.

" तुला कसे माहीत ते .... " महेशने विचारलं.

" काल रात्रभर जागून माहिती गोळा केली मी. " अभिने एक फाईल बनवली होती.

" मॅनेजर काय बोलला... खूप जुनी बँक आहे... बँकचे details काढले मी... बांधकाम ब्रिटिशकालीन आहे. १९१० सालची या बँकेची उभारणी आहे. त्याचवर्षी कोणी ब्रिटिश अधिकाऱ्याने त्याचे उदघाटन केलेलं. २०१० साली १०० वर्ष पूर्ण झाली म्हणून मोठा सोहळा आयोजित केलेला. जरा जास्तच celebration झाले. विडिओ वगैरे काढलेले लोकांनी. D.B. बँक हि इंग्लंड मधली मोठी बँक आहे. त्यामुळे १०० वर्ष झाली म्हणून तिथल्या मीडियाने इथे येऊन कौतूक केले. बँक कशी बांधली , सुरवात कशी झाली ... याचेही विडिओ बनवले होते त्यांनी. Youtube वर अजूनही विडिओ आहेत. काही जास्त हौशी मंडळींनी .... बँकेचा original map ( आराखडा ) नेटवर टाकून बँकेचा गौरवशाली इतिहास सांगितला. तेसुद्धा अजून आहे नेट वर. " अभिने महेशला तो आराखडा दाखवला.

" ब्रिटिशांचे काम किती चोख बघ... बँकेच्या आराखड्यात त्यावेळेचे आजूबाजूचे बांधकाम ही दाखवले आहे. " महेशने निरखून पाहिले.

" हो रे .... even , त्यांनी त्याकाळचे रस्त्याखालचे drainage system हि रेखाटले आहे यात. हाच आराखडा बघूनच त्यांनी प्लॅन केला असणार.... " ,

" ते सोड ... चोरांना हेही माहित कि ती drainage system आता बंद आहे. " अभि बोलला.

" चोर खूपच हुशार झाले आहेत ना .. "

" तू त्या बोटी घेऊन गेलास ... ते अर्धवट जळालेले कपडे ... तुला काही मिळाले का त्यातून .. " ,

" नाही... " महेश म्हणाला.

" पण मीही काही माहिती गोळा केली आहे. चोरांनी किती तयारी केलेली बघ. बँक उघडते सकाळी ८:३० वाजता. बँकेत फक्त ३ गार्ड. २ सकाळी असतात आणि एक रात्रीचा. बँक इतकी भक्कम आहे कि गेल्या १०० वर्षात एकही चोरी झालेली नाही. मुख्य दरवाजा आणि emergency exit ... यांना दोन सरकते लोखंडी दरवाजे आहेत. कधी वाटलंच त्यांना कि हल्ला होणार आहे तर एक बटण दाबले कि दोन्ही दरवाजे बंद होतात. ते बटण आणि cctv चे सर्व कंट्रोल गार्डच्या केबिनमध्ये आहेत. त्याची केबिन reception जवळ आहे. संध्याकाळी बँक बंद होते तेव्हा रात्रीचा असलेला गार्ड ते दरवाजे बंद करून आतमध्ये एकटाच असतो. ते दरवाजे उघडतात ते थेट सकाळी ८:१५ वाजता. त्याची ड्युटी बदलते ती सकाळी १० वाजता. पण बाकीचे दोन्ही गार्ड येतात ते ९:३० वाजता. हीच ती मधली वेळ, त्या तिघांपैकी बॅटमॅनचा मास्क लावलेला ,  त्यानेच सर्वात आधी entry केली आणि त्या गार्डला पकडलं. जेव्हा तो कपडे बदलत होता. त्याच्यामागून बाकी दोघे शिरले. त्यांच्या बंदुका पाहिल्या ना तू ... अगदी खऱ्या वाटतात. खेळण्यातल्या बंदुका घेऊन आलेले... त्यांना फक्त घाबरवायचे होते ... तिथे असलेल्या लोकांनी सांगितले कि ते तिघे होते. पण मला वाटते ते ४ किंवा ५ जण असावेत. " ,

" हे तू कसे सांगू शकतोस ... " अभिने विचारले.

" बघ ... आपण त्या पाईपमध्ये गेलो होतो ना तेव्हा मी पाहिले...... तो पाईप गॅस कटर ने कापला होता. चोरांनी बँकमध्ये शिरताना फक्त बंदुका नेल्या होत्या. ते बँक कर्मचारी.... त्यांच्या स्टेटमेंट मध्ये सुद्धा तेच आहे. चोरांकडे पिशवी , बॅग असे काहीच नव्हते. कोणीतरी तो पाईप गॅस कटरने मागून कापला. गरजेपुरती त्या भिंतीत होल बनवला. तो मिकीमाऊस चा मास्क घातलेला सर्वात आधी लॉकर रूममध्ये गेलेला ना ... त्याने तो कपाट सरकवले असणार. तोच त्या तिघांमध्ये जरा अंगाने धष्ट्पुष्ट होता असे स्टेटमेंट मध्ये आहे. आपण सुद्धा कपाट सरकवले ना .... किती हलके होते ते ... त्याने एकट्याने आरामात सरकवले असेल ते . बाकी ते लॉकर त्यांनी कसे फोडले ते त्यांनाच माहित. पण पलीकडून आलेल्या व्यक्तीनेच .... बॅग वगैरे आणल्या असणार हे नक्की.... " ,

" छानच रे ... !!! माझ्याहून जास्त तूच माहिती गोळा केलीस.. तरी हि .... " अभि बोलता बोलता थांबला.

" तुझ्या म्हणण्यानुसार .... त्यांनी मागून येऊन चोरी केली. मान्य आहे, तसेच झाले असेल. चोरी केली . बॅगा भरून पलीकडे गेले. सर्व ठीक.... मग त्यांनी हलवलेलं कपाट जागच्या जागी कसे लावले. ",

" मला माहित होते कि हा प्रश्न येणार .... मलाही आलेला हा प्रश्न. म्हणून मी मुद्दाम ते कपाट पुन्हा निरखून बघितले. त्या कपाटाच्या मागे २ मोठी काळी वर्तुळे दिसली मला. साधारण आपल्या हाताच्या पंजापेक्षा थोडी मोठी... power magnet माहित आहे ना .... ते जर एखाद्या धातूवर जास्त वेळ लावून ठेवले कि असे होते. ते चुंबक इलेक्ट्रिकवर चालते म्हणून असे होते. त्यांनी तेच केले. चोरी करून पलीकडे गेले, हे चुंबक लावून सर्वांनी मिळून सरकवले मागूनच. इलेकट्रीसिटी कुठून आणली त्यांनी माहित नाही . त्याशिवाय , एक गोष्ट विसरलो आपण. त्याच कपाटातील जास्तीत जास्त लॉकर त्यांनी रिकामे केले आहेत, आधीच हलके कपाट , त्यातून सामान काढल्यावर अजून हलके झाले. ४ जणांना काहीच अडचण आली नसेल ते सरकवताना. ते झाल्यावर भिंत पुन्हा मागूनच लावली त्यांनी. भिंत तोडणारा हुशार , विटा काढल्या त्याने .... तोडल्या नाहीत... लॉकर रूममध्ये माती पडली असेल तीही साफ करून घेऊन गेले... आपल्याला कुठे दिसली माती तिथे.... " महेशने बोलणे संपवले.


अभिला एकंदरीत काय घडलं असेल त्याचा अंदाज आला. पुढे काही बोलणार इतक्यात कॉल आला. बँकेतून मॅनेजरने कॉल केलेला, " सर ... ब्लॉक केलेल्या क्रेडिट कार्ड पैकी एकाचा वापर नुकताच एका मॉल मध्ये झाला आहे... तुम्हाला address पाठवला आहे मी.. " ,

" very good ... मला वाटलंच होते असे होणार... मी निघतो लगेचच ... त्यांना सांगा कि त्या व्यक्तीला अडवून ठेवा.. "

अभि लगेचच निघाला. १० मिनिटात दिलेल्या पत्त्यावर पोहोचला. एका तरुणाला पकडून ठेवले होते. इन्स्पेक्टर अभिला बघून तो आधीच रडू लागला.

" सर ... मी काही नाही केले ... ",

" रडतोस का मग ... " अभि रागात होता.

" मी फक्त .... ",

" काय फक्त ... चोरी केलीस ना बँकमध्ये... तुझे बाकीचे साथीदार कुठे आहेत ... सांग लवकर ... " तो मुलगा आणखी रडू लागला.

" मी नाही केली चोरी... खरं सांगतो आहे... मी कॉलेजला जाणारा स्टुडंट आहे... " ,

" मग हे कार्ड तुझ्याकडे कसे आले... बोल लवकर... " ,

" मला ते फुटपाथवर पडलेले मिळाले.. खरच सर .... मी नाही केली चोरी... " ,

" प्रत्येक आरोपी असाच बोलतो... बोल बाकीचे कुठे आहेत.... " अभि ओरडत होता.

" देवा शप्पत खरे सांगतो आहे... मला ते फुटपाथ वर पडलेले दिसले... फुकटची शॉपिंग करायला आलो होतो तर यांनी पकडून ठेवले. सर .... मी नाही चोरी केली... " त्याला बघून तरी तो चोर असेल असे वाटत नव्हते. पोलिसाची नजर.

" याला घेऊन चला पोलीस स्टेशन मध्ये... " अभि बोलला. गाडीत बसत होताच तर त्याला पुन्हा कॉल आला.

" अभिषेक सर .... आणखी एका शॉप मध्ये एक कार्ड use झाले आहे, तुम्हाला पत्ता पाठवला आहे मी... " अभिने ३ जणांना सोबत घेऊन बाकींना त्या मुलाला घेऊन पोलीस स्टेशनला पाठवले. तडक तो त्या दुकानात पोहोचला. एका मुलीने ते कार्ड वापरले होते. तिला पकडल्यावर तेच रडगाणे. " मी चोरी केली नाही. कार्ड पडलेले मिळाले. " तिलाही अटक करून आणले तरी अभिला तीही चोर नसावी असेच वाटत होते. त्या दोघांची कसून चौकशी करण्यात आली. काही मिळाले नाही. त्या दोघांचाही crime background नव्हता. दिवस त्यातच गेला.

पुढल्या दिवशी , अगदी सकाळीच आणखी एक कार्ड track केले गेले. धावपळ पुन्हा.... त्या दिवसात ४ ठिकाणी कार्ड वापरले गेले. धावपळ करत कार्ड वापरण्याला अटक करत होते. अभिला वैताग आला. दिवसातला चौथा कार्ड वापरणारा एक वयस्क व्यक्ती होता. एका ice cream shop मध्ये त्याने कार्ड वापरायचा प्रयत्न केला होता. एकंदरीत तो सहावा व्यक्ती होता कि ज्याला ते कार्ड पडलेले मिळाले होते. काय गडबड आहे नक्की... कळतच नाही. अभिच्या मनात काही आले.

" एक काम करू ... तुम्हाला ते कार्ड कुठे सापडले तिथे घेऊन चला मला... ते तरी आहे ना लक्षात... " तो त्यांना एका बागेत घेऊन गेला.

" खरं सांगतो साहेब.... मला इथेच सापडले ते ... मी बेरोजगार आहे, या वयात कोणी नोकरी पण देत नाही. कार्ड दिसलं तर ice-cream खाण्याचा मोह झाला. खिशात पैसे नाहीत..... हेच कार्ड वापरू आणि नंतर इथेच आणून ठेवणार होतो कार्ड ..... खरच साहेब ... मला ते इथेच पडलेले दिसले म्हणून उचलेले... कोणा कडून चोरले नाही. " तो रडत होता.

" ठीक आहे ... रडू नका .... मी बघतो काय ते .. " अभि त्याच्या टीम कडे वळला.

" असे कार्ड कुठे मिळतात का ते बघूया .... या बागेत तर शोधूच पण आसपास च्या परिसरात सुद्धा शोधू.... पाऊण तासाने पुन्हा इथेच भेटू.... निघा पटपट ... " सर्व पांगले. पाऊण तासाने सर्व तिथेच जमले आणि पोलीस स्टेशनला निघाले.


संध्याकाळ झालेली. अभि बाहेरच उभा होता. विचार करत. महेशने त्याला बघितलं आणि त्याच्या जवळ आला.

" काय रे .... एवढा कसला विचार करतो आहेस. " ,

" अजून कसला विचार करणार ..... एव्हडे मोठे काम करून ठेवले आहे त्यांनी.. तेच सुरु आहे डोक्यात... " ,

" बर... त्या ६ जणांना पकडलेस .... कोणी बोलले का काही... " ,

" त्यापैकी कोणीच चोरी केलेली नाही... " ,

" तुला कसे माहित.... खरे चोर सापडले का मग ... " महेशने विचारलं.

" आम्ही शोध घेतला तर त्या परिसरात आणखी ३ कार्ड मिळाली. हा योगायोग नक्कीच नाही. कोणालाही सहज दिसतील अश्या ठिकाणी चोरलेली क्रेडिट कार्ड टाकून दिलेली किंवा ठेवलेली. सध्या बेरोजगारी किती आहे माहित आहे ना तुला... या अश्या " easy money " सारखं काही मिळालं तर कोणीही स्वतःचा फायदा करून घेणार.. या ६ जणांनी तेच केले... पुढेही अश्या केस येतील... असे चोरी केलेले कार्ड वापरणारे..... " ,

" काय बोलायचे हे नक्की तुला ... चोरांनी हे मुद्दाम ..... " ,

" मघापासून तेच तर सुरु आहे डोकयात माझ्या.... सगळा क्रम माझ्या लक्षात आला. चोर बँकेत शिरले ते सकाळी ९ वाजता.. तू बोलल्याप्रमाणे त्यावेळेस रात्रीचा गार्ड कपडे बदलत असतो. ९: १५ ला मला कॉल आला. बँकेत cctv आणि ते लोखंडी सरकते दरवाजे गार्डच्या केबिन मधून ऑपरेट होतात. सर्वात आधी तेच बंद केले चोरांनी. पण बँकेत अजून एक सिस्टिम आहे. अलार्म सिस्टिम !! ती ऑटोमॅटिक आहे. बँक बंद होते ती संध्याकाळी ६ वाजता. बँकेतील कर्मचारी निघून गेले कि आत असलेला गार्ड दरवाजे बंद करतो , त्याच वेळेस ती सिस्टीम आपोपाप सुरु होते.कोणी जबरदस्ती बँकेत घुसण्याचा प्रयन्त केला तर अलार्म वाजायला लागतो आणि ती लिफ्ट बंद होऊन जाते , कॅश असलेली पहिल्या मजल्यावरची तिजोरी हि एका बंद दरवाजा मागे safe राहते. हि सिस्टिम सकाळी जेव्हा दरवाजे पुन्हा उघडतात तेव्हा आपोपाप बंद होते. चोरांनी दरवाजे बंदच होऊ दिले नाहीत. शिवाय चोरी जर मागून करायची होती तर रात्रीची होऊ शकली असती .... अगदी आरामात.... कोणाला कळले असते.. ते सकाळी आले. त्या अलार्म सिस्टिमची सुद्धा माहित त्यांना.. " अभि बोलत होता. महेश ऐकत होता.

" सर्व माहिती काढून चोरी केली. त्यांना हेही माहिती कि लॉकर तोडताना आवाज झाला तरी तो वर जाणार नाही. कारण हि रूमच बंदिस्त आहे. इथे कोणीच गार्ड नसतो कि इथे कसलाच दरवाजा नाही. कुठल्या बाजूने पळायचे याचे प्लँनिंग.... बँकेत कॅश असते , ती बहुदा सिरीयल नंबर मध्ये असते... त्यावरूनही आपण त्यांचा माग काढू शकतो , याची जाणीव चोरांना... त्यामुळे त्या कॅशजवळ फिरकले हि नाहीत. त्यापेक्षा लॉकर फोडले. तुला ते केस मिळाले ना तिथे, त्यांचा DNA रिपोर्ट काढून , आपल्याकडे असलेल्या डेटाशी गेले २ दिवस तू जुळवत बसलास ... एक सांग .... भिंत तोडताना खाली पडलेली माती वगैरे त्यांनी साफ करून नेली... कुठेच सापडली नाही माती आपल्याला.... बरोबर ना ... even तो कसला केमिकल स्प्रे मारून त्यांनी असले - नसलेले फिंगर प्रिंट्स सुद्धा साफ केले... मग हे केस मागे कसे राहिले... " अभिच्या या प्रश्नावर महेशला काही बोलायला सुचेना...


" हे क्रेडिट कार्डचे प्रकरण ... २ दिवस नुसता पळतो आहे... का ... तर वाटले होते त्यापैकी कोणीतरी याचा वापर केलाच तर आपल्याला कळेल... इथेही चुकलो आपण... चोरी करणारे कितीही असले ना ... तरी त्यामागे एकच व्यक्तीचे डोके असते... त्याने आपल्याला आपल्याच युक्त्यांमध्ये गुंतवून ठेवले... " ,

" कसे काय ... " महेश खूप वेळाने बोलला ...

" म्हणजे या रिपोर्ट चा काहीच उपयोग नाही का ... " ,

" नाही.... बघ .... प्रत्यक्ष चोरी खाली होत होती. आपण ते वर असलेल्या चोराकडे लक्ष ठेवून होतो... तेही फक्त टाईमपास करत होते. दिवसभर आपल्याला बाहेर ठेवून ... बाँम्ब असल्याचे खोटे बोलून .... त्यांचे काम झाले तेव्हा निघून गेले. त्यांनी चोरी केलेले क्रेडिट कार्ड मुद्दाम सर्वत्र फेकून दिले आहेत... ज्याला कोणाला कार्ड मिळते , त्यालाच आपण पकडायला जातो आहोत ना... तुझी टीम , तू .... २ दिवस त्या रिपोर्टशी कोणचे रिपोर्ट जुळतात का त्यात गुंतला आहात..... त्या समुद्रकिनारी मिळालेल्या बोटी... ते अर्धवट जळलेले त्याचे कपडे... मुद्दाम तिथे सोडून गेले. कपडे तिथे जाळायची काय गरज... दुसरीकडे दूर कुठेही चालले असते ना ... तुलाही अडकवून ठेवले त्याने. खोट्या बंदुका .... चोरी करताना असे कोण करते ... खरी बंदूक असती तर त्यावरुन एक वेळ कुठून खरेदी केली , कोणी खरेदी केली .... ते समजू शकले असते. ज्याने हा प्लॅन बनवला ना .. त्याला पोलीस कसा तपास करतात त्याची उत्तम जाणीव आहे. गुन्हेगार कितीही हुशार असला ना तरी काही ना काही मागे राहतेच..... नेहमीच मागे ठेवून जातो गुन्हेगार .... त्यावरून तर आपण आरोपी पर्यंत पोहोचतो ना ... पण हा .... perfect plan एकदम ..... काहीच चूक नाही .... just perfect plan.... " अभिचे बोलणे संपले.

" मग पकडायचे कसे त्याला ..... प्लॅन करणारा भारीच दिसतो... " महेश बोलला.  

" भारी नाही.... mastermind  !!!  अश्या mastermind ला प्रत्यक्षात भेटायला आवडेल मला... " अभि बोलला.

" भेटून काय बोलशील त्याला ... " महेशने हसत विचारलं. अभिने महेश कडे पाहिलं ,

" त्याला बोलीन ..... nice to see you !!! "

========================= क्रमश : =========================Followers