कुणीतरी असावं सोबतीला,
सकाळची रात्र ,रात्रीची सकाळ करण्यासाठी ............,
कुणीतरी असावं सोबतीला,
समुद्राजवळची संध्याकाळ घालवण्यासाठी............. ,
कुणीतरी असावं सोबतीला,
निळे आभाळ मनात साठवून ठेवण्यासाठी ............,
कुणीतरी असावं सोबतीला,
पावसाचे टपोरे थेंब अंगावर झेलण्यासाठी ............,
कुणीतरी असावं सोबतीला,
ओळखीच्या वाटेवर अनोळखी होण्यासाठी ............,
कुणीतरी असावं सोबतीला,
माझं तुला आणि तुझं मला करण्यासाठी ............,
कुणीतरी असावं सोबतीला,
हृद्यातील गोष्टी जाणून घेण्यासाठी ............,
कुणीतरी असावं सोबतीला,
आठवणींच्या पानावर बसून भूतकाळात रमण्यासाठी ............,
कुणीतरी असावं सोबतीला,
जीवनाची सकाळ,संध्याकाळ मग रात्र करण्यासाठी ............,