असंच एकदा वेडयासारखा,फिरत होतो रात्रीचा,
चालता चालता चंद्र म्हणाला ,"काय रे,वेळ आहे का दिवसाचा?"
त्याला मी म्हणालो हसत ,"तू नाही का रे असतोस रात्रीचा खेळत?"
तो मला म्हणाला चिडवत," पण मी सूर्यासारखा कोणाला नाही छळत. "
असं म्हणून तो निघून गेला चमचमणाऱ्या चांदण्यांबरोबर ,
मग मीही नवा डाव मांडला उनाड वाऱ्याबरोबर ,
तो नुसता उडत होता ,झोपलेल्या पानांना जागवत होता .
मी त्याला म्हणालो "बस कर आता,दिवसा काय झोपला होता "
रागावून मग तोही निघून गेला , मी पडलो एकटा ,
वेळही अशीच होती , रस्त्यावर कोणीच नव्हते एकटा -दुकटा
अशावेळी रस्त्यावर कोणी चिटपाखरूही नव्हते.
पण मला फिरताना बघून,काही कुत्रे माझा मागे आले होते.
त्यांना वाटले ,"कोण हा प्राणी असा रात्रीचा एकटा फिरतोय?"
"आमच्याच एरियात येऊन असा आमच्यावर दादागिरी करतोय?"
त्यांचा तो पवित्रा बघून मग मीही माघार घेतली.
उगाच कुठला problem नको म्हणून आडवळणाची वाट धरली .
वाट मात्र छान होती, झाडेच झाडे होती तिथे ,
सोसाट्याचा वर मात्र वाहत होता इथून तिथे .
समोर वडाचे एक मोठे झाड दिसले, वाटले जरा बसावं ,
अजून कसा प्रवास असेल , हे कोणी कसं सांगावं ?
बसल्या बसल्या झाड बोललं " कामधंदे नसतात . कधीही आपले येतात."
"स्वतःला झोप येत नाही . पण आमची झोप उडवतात ."
विचार केला निघूया , पुन्हा तो काही बोलायला नको."
" सकाळ पासून थकला असेल ,पुन्हा झोप मोडायला नको."
चालता चालता आंब्याचे झाड दिसले,आंबे लागलेले चार .
झाडाचं म्हणाला ," पाहू नकोस हवाऱ्यासारखा, अजून ते कच्चेच आहेत फार "
समोर एक स्मशान दिसलं ,तिकडे एक माणूस बसला होता .
त्याला बोललो,"काय करताय इथे ?",१२ चा ठोका पडला होता .
तो बोलला ," काय करणार ? "कबर" मध्ये A.C. नाही .फार उकडते आत "
म्हणून जर बाहेर येऊन बसलो,बर वाटते गार वाऱ्यात "
ते ऐकून धावत सुटलो ,घाम सुटला अंगाला .
लांब आल्यावर बोललो " पुन्हा जाणार नाही त्या वाटेला "
तेवढयात कुठून भूत आलं ,बोललं ," दिसतोस एकटा,बसतो तुझ्या मानेवर "
धपाटे मारत आई बोलली , " ऊठ कारट्या , किती झोपतोस . जायचे नाही का कामावर "