तुला माहित आहे,
तुला माहित आहे, की मला सगळ माहित असते.
तरी देखील तू उगाचंच अजाणपणा करतेस.
तुला माहित आहे,
तुला माहित आहे, की मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो.
तरी देखील तू मला चंद्र आणण्यास सांगतेस.
तुला माहित आहे,
तुला माहित आहे, की माझं तुझावर प्रेम आहे.
तरी देखील तू माझ्या प्रेमाची परीक्षा बघतेस.
तुला माहित आहे,
तुला माहित आहे, की तुझामुळे माझी झोप उडाली आहे.
तरी देखील तू नेहमी माझ्या स्वप्नांत येतेस.
तुला माहित आहे,
तुला माहित आहे, की मला पाऊस खूप आवडतो.
तरी देखील तू तुझा हातांची ओंझाळ करून पावसात उभी असतेस.
तुला माहित आहे,
तुला माहित आहे, की तुला पाहिल्यावर चांदण्या लपतात.
तरी देखील तू नेहमी चंद्राशी गप्पा मारतेस.
तुला माहित आहे,
तुला माहित आहे, की तुला बोलण्यात कोणी हरवू शकत नाही.
तरी देखील तू माझाशी पैज लावतेस .
आणि मग जाता - जाता मी हरले असे बोलतेस.
पण तुला माहित असते,कि तू मला प्रेमात हरवून गेलेली असतेस.