मी एक " मेघ " आहे.................
एक पावसाळी " मेघ "..................
एक प्रेमाने ओथंबलेला " मेघ "............
मी उनाड वाऱ्याबरोबर उडू शकत नाही..........कारण तुझ्या प्रेमाने मला बांधून ठेवले आहे.
मी मनसोक्त बरसू शकत नाही .................कारण तुझा प्रेमाचा थंडावा अजून मला मिळाला नाही.
पण ..............पण मला माहित आहे.
तुझ्या मनात एक आभाळ दाटलंय ..............प्रेमाचं .............
तुझ्या ओंजळीत चंद्र विसावला आहे...........
उनाड वारा तुझे केस उगीचचं उडवतो आहे..........
चांदण्यांनी तुझ्या भोवती फेर धरला आहे.
आणि तुझ्या रोमारोमांत एक प्रेमाचा सागर उधाणलेला आहे.
आता ..................... तुझ्या डोळ्यात एक " मेघ " भरून आलंय ..............
मला त्या प्रेमाचा ओलावा आता जाणवतो आहे.
तो " मेघ " आता कधीही बरसणार आहे.,..फक्त माझासाठी ....
मला त्या पावसात मनसोक्त भिजू दे ना ...........
मनसोक्त.........फक्त आणि फक्त एकदाच...................