All the contents on this blog are Copyright Protected.

All the contents on this blog are Copyright Protected.

MyFreeCopyright.com Registered & Protected
Protected by Copyscape Duplicate Content Software

Tuesday 3 December 2019

तिच्या मनातला " तो " आणि त्याच्या मनातली "ती " (भाग चार)

ती : किती ट्राफिक केले या पावसाने उगाचच.... ते म्हातारे आजी-आजोबा ... चिखलातून चालता सुद्धा येतं नाही त्यांना. कोणी मदत सुद्धा करत नाही त्यांना.... " तो " असता ना सोबत आता ...असाच बसमधून उतरून गेला असता, त्यांच्या मदतीला. " तो " असाच आहे. कोणाचे दुःख पाहवत नाही त्याला. सतत कोणाची ना कोणची मदत करायला पुढे. कोणाकडून कधी काही परतफेड मिळेल, अशी अपेक्षाच कधी केली नाही त्याने. इतका हळवा. एकदा तर हॉटेल मध्ये बसलो होतो, एका माणसाने त्याच्या फॅमिलीसाठी बसायला जागा मागितली.... लगेच उठून जागा दिली वेड्याने. मला विचारलेही नाही.... लगेच उभा राहिला. " आम्ही निघतच होतो " म्हणत मलाही उठायला सांगितले. राग आलेला पण दाखवला नाही. ... हो .... तसाच करायचा तो. पुढच्या वेळेस सुद्धा ... तसंच... काय माहित , सर्वांना काय आम्हीच दिसायचो वाटते. असेच गप्पा मारत बसलो होतो... तर अशीच एक फॅमिली आली. आम्हाला जरा जागा देणार का बसायला... तो बोलण्याआधीच मी बोलून टाकले , मिळणार नाही ... आम्ही बसलो आहोत.


तो : एकदा कशी बोलली होती, त्या फॅमिलीला .... आम्ही बसलो आहोत ना ... नाही मिळणार जागा, ते गेलयावर माझ्यावर रागावली. माझ्या माणसासोबत बोलत असताना , मला कोणी मध्ये मध्ये आलेलं चालत नाही. आणि कोणाचा कॉल आलेला हि आवडत नाही. एवढा राग ... तरी खूप काळजी करायची. आताही करत असेल ... जवळ नसलो तरी असेल तिला काळजी. तिला आवडायचे सगळ्याची विचारपूस करायला , काळजी घेयाला. मी आजारी पडलो तेव्हा तर किती जगायची. किती रात्री तर माझ्या शेजारी बसून काढल्या आहेत तिने.


ती : व्वा !! किती छान वारा सुटला आहे. पावसाची रिपरिप थांबली वाटते. त्यामुळे वारा सुटला असावा. त्याचे केस किती छान होते ना ... असा वारा आला कि भुरुभुरु उडायचे केस..... मीच किती वेळा ते विस्कडायचे .... मुद्दाम... , मुलायम केस होते त्याचे. पण .... पण ती chemotherapy सुरु झाली आणि हळूहळू सर्वच केस गेले त्याचे. काही ऑपशनच नव्हता. तो महत्वाचा होता... त्याचे केस गेले तरी तो हवाच होता मला. पण ...... त्याने वेगळाच निर्णय घेतला , ... त्याला असे काही होईल , असा विचार कधी स्वप्नांत सुद्धा आला नसता.


तो : कॅन्सर चे निदान खूप उशिरा झाले. आधी कळले असते तर.... " जर - तर " ........ या जर-तर च्या गोष्टी जास्त त्रास देतात. मलाच जर आधी कळलं असते ... मला कॅन्सर होणार आहे, तिच्याशी लग्नच केले नसते मी... तिची होणारी फरफड... झालीच नसती. २ वर्षांच्या आमच्या सुखी संसारानंतर कळलं .. अचानकचं कळलं ते ... कसे जाणवले नाही मला कधी, तिला तर किती मोठ्ठा धक्का होता तो. मी तर सारखा आजारी पडायचो मग, सारखे ट्रीटमेंट साठी जावे लागायचे. साथ सोडली नाही तिने, खरं प्रेम होते ना ... रात्री जागी असायची सारखी. त्या गॅलरीत विचार करत. तिला कधी त्रास झालेला मला खपायचे नाही. कोणी तिच्याकडे चोरून बघितलेलं .... आवडले नाही कधीच. त्यामुळे तिला आता माझ्यामुळे होणार त्रास ... ते पटायचे नाही मला. मी तसाही वाचणार नव्हतो , या आजारातून. हे नक्की होते. माझी शिक्षा .... तिला का ... तिने का सोसावे ते, असे उपरे जगणे... तिचे इतके सुंदर आयुष्य , पुढे आणखी बहरावे .... या साठी , मीच निर्णय घेतला ... पूर्ण विचार करून. ..... मी निर्णय घेतला ... तो तिला मुक्त करण्याचा.


ती : आठवतो तो दिवस . मी तेव्हा नुकतीच हॉस्पिटल मधून आलेली. त्याचे रिपोर्ट घेऊन. बघते तर घरी, सर्वच... माझी फॅमिली ... त्याची फॅमिली... मिटिंग भरली होती. मी यायचीच वाट बघत होते.... सर्वच.. !! तो सुद्धा... त्यानेच विचारलं थेट.. .... आपण डिवोर्स घेऊ... !! तू तुझे नवीन आयुष्य सुरु कर. हे असे पट्कन बोलून गेला. अर्थात माझ्यासाठीच हा निर्णय घेतला होता त्याने..... पण मला विचारायचे तरी आधी.


तो : हृदयावर दगड वगैरे म्हणतात , तसंच झालं होते मला. मी बोललॊ ते प्रेमाखातर ... अजिबात आवडलं नव्हते तिला. डोळे रागाने लाल झालेले, सर्वासमोर ओरडली होती मला... अक्कल आहे का .... तेव्हा घाबरलो होतो, आता हसायला येते आठवलं कि... तिच्या लग्नाला आता ३ वर्ष तरी होतील ना .... तरी , तिच्या साठीच हा निर्णय घेतला होता. तिचे वय बघता पुढची वर्ष .... एकटीने जीवन जगणे, हे मी नसतानाही मला बघवले नसते. त्यामुळे तिने मला डिवोर्स देऊन नव्याने लग्न करावे , हे सगळ्यांचे मत ठरले. खरंतर, सगळयांना मीच समजवून सांगितले. आधी कोणीच तयार नव्हते. एक -एक व्यक्तीला समजावले तेव्हा सारे तयार झाले. सर्वात शेवटी तिला सांगितले.


ती : कशी तयार होणार होती मी.... नाहीच आवडला त्याचा तो निर्णय... पुढे ३ दिवस तरी त्याच्याशी बोलत नव्हते. इतका राग आलेला त्याचा. न बोलता त्याची कामे करायची मी. चौथा दिवस , त्याने खूप दिवसांनी जवळ घेतले प्रेमानं... किती वेळ तो बोलत होता.... भविष्याबद्दल.. !! मी ऐकत होते फक्त. किती प्लॅन केले होते आम्ही, आमच्या future साठी..... असे सोडून देयाचे का ... नाहीच !! पण शेवटी त्याने तयार केलेच मला. त्या रात्री गॅलरीत जाऊन खूप रडली होती. त्याला सोडायचे नव्हतेच ....आजारी असला तरी तो माझा होता ना ... " शेवटची इच्छा !! " असे ब्लॅकमेल केले आणि माझ्याकडून वचन घेतले.


तो : तिला मीच तयार केले..... तयार झाली... नाखुशीने... दोघांचे इतके प्रेम ... नजर लागू नये असेच... लागली नजर ... देवाच्या मनात काय होते काय माहित. दोन वर्षांनी वेगळे झालो. त्याआधीच बोलली होती. मला न विचारात ठरवलं ना सगळं, आता मीही .... जे ठरवीन ते मान्य करावं लागेल. तसही... नेहमी तिच्याच मनाचा विचार केला. त्यामुळे ती काही बोलण्याआधीच तिच्या पुढच्या सर्व अटी मान्य केल्या. एकच बोलली, एकदा या घरातून बाहेर पडली ना ... वळून सुद्धा बघणार नाही. दोन आठवडे गेले ... त्यानंतर डिवोर्स दिला. एकदम शांत होती तेव्हा. गॅलरीत जाऊन बसायची.... शांत ... त्या गुलाबाच्या फुलांकडे पाहत..... डिवोर्स झाला असला तरी नवीन लग्न होईपर्यंत ती माझ्या जवळचं राहणार होती. पुढल्या महिन्यात लग्न जुळले तिचे. माझ्याच वडिलांनी पुढाकार घेतला होता त्यात. register marriage करणार होती. आदल्या दिवशी , सामान भरले तिने. फक्त तिचेच सामान घेतले. माझी आठवण म्हणून आमच्या लग्नातला एक फोटो तेव्हडा घेतला सोबत. त्या रात्री, शेवटचे मिठीत घेतले तिला. मिठीत घेऊन माथ्यावर किस केले... तेच शेवटचे. दुसऱ्या दिवशी, सकाळीच निघून गेली..... मागे न बघता...

ती : शेवटी काय ..... तर प्रेमासाठी सारे !! इतके प्रेम हि त्याचे. अजूनही असेलच.... तसा तो मुलींच्या मागे कधी नव्हताच. मीच भेटली होती त्याला.... गुपचूप प्रेम करायचा... त्याला असे कधी एक्सप्रेस होता आलेच नाही. अर्थात त्यानेच propose केले होते मला, पण " तू मला खूप आवडतोस "... हे तर मीच बोलले होते त्याला. कारण खरच आवडायचा मला तो. आणि कोणी दुसऱ्या मुलीने विचारण्याआधीच मी विचारलेलं बरं , असा विचार केला मी, म्हणून स्वतःहून व्यक्त झालेले. कधीपासून प्रेम त्याचे.... !! शरीरापेक्षा मनावर प्रेम करणारा असा तो... खूप काळजी , खूप सपोर्ट केला त्याने आधीपासून. वेगळा होता. आताही दुसरे लग्न केले असले तरी , मनाने त्याच्यापाशी आहे मी. कायम राहीन.... त्याने शिकवलं , सुखाने जगणे काय असते ते. प्रेम फक्त त्याच्यावर होते , आहे आणि राहील... पण आता त्याच्याकडे बघवत नाही. कसा दिसतो आता तो .... आजारपणाने अगदी थकून गेला आहे. जमलं असत तर मीही त्याच्यासोबत प्राण सोडले असते.. तयारी होतीच माझी. परंतु तो बोलला मला.... " मरतात तर खूप जणं एकमेकांसाठी.... माझ्यासाठी जगशील का.... " त्याच्यासाठी जगते आहे आताही आणि जगत राहीन ... हेच खरे प्रेम !!


तो : माझ्याकडे जास्त दिवस नाहीत आता... खरे तर , ती गेली आणि माझा अर्धा जीव निघून गेला.... ३ वर्ष कशीबशी काढली त्या ट्रीटमेंटमुळे .... जगवत आहेत माझ्या घरातले मला... जबरदस्ती !! पण ती करत असेल का माझी विचारपूस. काळजी तर असायची माझी तिला. आम्ही इतके जवळ होतो ना ... कि कोणीही आम्हाला वेगळे करू शकत नव्हते.... देवानेच डाव साधला. तेव्हापासून तिचा देवावर राग. एकदा तर देवळात जाऊन गणपती बाप्पाशी भांडली होती. रडत होती. अशीच ती. एकदा का राग आला कि शांत होयाचा नाही लवकर. देवावरचा राग... अजूनही मनात ठेवला आहे तिने.... अजूनही !!

खूप प्रेम होते माझ्यावर.... लाडोबा माझी..... चांदोबा ... बोलेल ते करायची. केलं हि. अजूनही बघत नाही माझ्याकडे कधी. ना आमच्या घराकडे. वाईट वाटते. तरी , हीच आता जिंदगी , हेच ठरवले आहे मी. तिच्या शिवाय कोणातच दिवस छान नसायचा. आताही नाही... आठवण तर नेहमीची तिची. कसा विसरणार !! आमची मस्ती , आमचे भेटणे, फिरणे , गप्पागोष्टी .... आमच्या बेडरूम मधली आमची फोटोफ्रेम.. तिचे ते मोठ्ठ कपाट.... तीही बडबड... तिची smile .... तिचे मिठीत येणे... तिचे राग ... गाल फुगवून फोटो काढणे... आवडायचे सारेच .... आठवते ..... !!! माणूस दूर गेला कि त्याची किंमत कळते, तिचे लग्न झाले असले तरी तिच्या नवऱ्यावर प्रेम करत नसेल ती. हे मी चांगले ओळखून आहे. कारण प्रेम जबरदस्ती कोणावर लादता येतं नाही किंवा ठरवूनही होतं नाही....

प्रेम मनातून होणे गरजेचं असते. माझे होते तिच्यावर ... अजूनही आहे. राहील .... मी जोपर्यंत या जगात असेन तोपर्यंत....आठवण येते तिची... बोलावेसे वाटते... पण जमत नाही. फोटो बघतो तिचे.... छान वाटते मग.. कधी कधी तिच्या घराकडे बघतो. तिथे नसली तरी वाटते, कधी तरी मला त्या दारातून " Hiii " करेल. मी रोज आमच्या गॅलरीत जातो... तिने लावलेली गुलाबांची रोपटी ... इतकी वर्ष मीच सांभाळली , यंदाच्या पावसात सर्व मरून गेली. तिच्या आठवणी होत्या त्यात. पण जास्वंदाचे रोपटे , ते तसेच आहे. जेव्हा जेव्हा जास्वंदाचे फुल उमलते ना ... तेव्हा नकळत का होईना , त्याला गुलाबाचा सुगंध येतो... तिच्या शरीराचा सुवास येतो त्या जास्वंदाला... मोहवून जातो मला. आमचे भेटणे .. जे अर्धवट राहिले ... ते कदाचित पुढल्या जन्मात होईल.. may be ... तरी आता... आमच्या दोघांमधली शांतता .. नेहमीच दरवळत असते .... अगदी न चुकता ... !!!


================================ समाप्त ===================

तिच्या मनातला " तो " आणि त्याच्या मनातली "ती " (भाग तीन )

तो : पुढे गेली का माझी बस , या पावसाचे काही नक्की नाही... त्यापेक्षा आधीच टॅक्सी करून गेलो असतो तर.... टॅक्सी !! तिला भारी हौस ... गाडीतून फिरण्याची... कुठून कुठे प्रवास करायचो आम्ही.... एखादी टॅक्सी करायची आणि वाटेल ते ठिकाण सांगायचो. नाहीतर ट्रेनने जायचे दूरच्या स्टेशनवर. आणि तिथून टॅक्सी किंवा एखादी गाडी बुक करायची , तिथून घरी.... पैसे तर खर्च होयाचे पण तिच्या सोबत फिरताना छान वाटायचे.... वेडी होती अगदी... मलाही वेडं केले होते.


ती : बसमधून उतरून चालत गेले असते , पावसाने गोंधळ घातला ना ... नाहीतर एव्हाना चालत घरी पोहोचले असते. चालण्याचा विषय निघाला कि त्याची आठवण येते.... माझ्यामुळे फिरायला लागला तो , किंबहुना , मीच जबरदस्ती घेऊन जायचे त्याला... चालायचा किती कंटाळा. आणि म्हणे , तुला जिथे जायचे ते सांग... मी घेऊन जाईन, काय नी काय...तरी , जे बोलायचा ते करून दाखवायचा... घेऊन गेला हा फिरायला ..... नैनिताल , उटी ... पावसात गड -किल्ले... माझ्यासाठी ते तुटलेले गड - किल्ले सुद्धा चढला माझा हिरो. ... माझ्यासाठी काहीही करायचा...


तो : "बाली " ... तिचे स्वप्न ...... तिथे जायचे राहून गेले. बाकी मोठी मोठी स्वप्न .... अर्थात मी होतोच कि स्वप्न पूर्ण करायला. बहुतेक केली पूर्ण,.... बुलेट शिकायची होती... ती शिकवली. लग्नानंतर हातावर टॅटू ... दोघांच्या.... मला नको होता तरी... तो काढून घेतला. लग्नानंतर ... ' one piece dress ' काय म्हणतात ते... तो घेतला ... तिच्या घरी चालायचे नाही ... म्हणून नवऱ्याच्या घरी सगळी हौस पूर्ण करणार अशी बोलली होती. घरात एक कुत्रा पाहिजे होता .... तोही आणला ... बापरे !! मलाही आठवत नाही किती हट्ट पुरे केले तिचे. पण आवडायचे. तिच्या समोर पैसे ..... काय चीज !! .... हा .... हिरा आवडायचा तिला.. हिऱ्याची अंगठी.... ती घेणार होतो .... किती महाग असते माहित आहे ना .... तेव्हा स्वतःच ओरडली मला , नाही घेयाची ... बाकी .... तिच्या चपला .... किती त्या... वेडं नुसते त्याचे.... किती प्रकारचे फुटवेअर ... तिच्याच चपलासाठी एक वेगळे असे छोटे कपाट घ्यावे लागले होते. कपाटावरून आठवलं. आमच्या फ्लॅट मध्ये मोठे कपाट होते. मोठे असूनही मला फक्त एका कोपऱ्यात जागा .... माझ्या कपडयांसाठी..... बाकी तो इतका मोठा कपाट ... तिचेच कपडे, ड्रेस आणि साड्या... पैठणी , कांजीवरम ..... प्रत्येक सणाला एक नवीन साडी पाहिजे , असं वचनचं घेतले होते. कधी कधी मला भीती वाटायची... मलाच बाहेर काढते कि काय ... साड्यांना जागा पुरली नाही तर .... हाहाहा !!!!

ती : किती हट्ट पुरे केले त्याने ... लग्नानंतर... जवळपास सारेच. मागेल ते दिले त्याने. त्याचे एवढे प्रेम कोणी केले नाही माझ्यावर.... अगदी माझ्या आई-वडिलांनी ही.... कधी कधी जेवण करायचा कंटाळा यायचा मला.... सांगायला लागायचे नाही त्याला... स्वतःच तयारीला लागायचा. हा , एक मात्र सांगितले होते त्याने... रोज जरी मी जेवण , नास्ता बनवत असले तरी रविवारचा चहा , नास्ता ... तो स्वतः करायचा. माझ्याआधी उठून... मी जागी होण्याआधी नास्ता तयार ... मला तर बेडवर आणून देयाचा नास्ता... इतकं प्रेम कोण करते ....


तो : जेवण बनवायची आणि खाऊ घालायची भारी हौस तिला.... कॉलेजला असताना सुद्धा , काय काय घेऊन यायची माझ्यासाठी, एकत्र कॉलेजला निघालो कि माझ्या वाटणीचा टिफिन मला देयाची. घरी जाताना तिचा टिफिन रिकामा करून परत करायचो. जॉबला लागलो तेव्हाही तसंच... माझ्यासोबत लग्न झाल्यानंतर , किती आणि काय काय जेवणाचे प्रकार.... सगळे प्रयोग माझ्यावर... कधी कधी प्रयोग फसायचा , परंतु छान चव हाताला. चिकन बिर्याणी ... !!! ती बनवायची तर तिनेच... बिर्याणीचा रिकामी भांडी चाटून साफ करायचे , जेवायला येणारे... नॉनव्हेज तर तिचा जीव कि प्राण ... त्यातल्या त्यात दुसऱ्यासाठी जेवण बनवायला जास्त आवडायचे तिला. आता मात्र करते कि नाही माहित नाही.... तिचे मिस्टर , त्यांना फक्त veg आवडते ना... असे तिच्या आजीने सांगितले होते एकदा. इथे माहेरी आली कि खातं असेल नॉनव्हेज.


ती : तसं बघावं तर , त्याला फक्त पोट भरण्यात इंटरेस्ट होता. जे समोर येईल ते आनंदाने , समाधानाने खाणे हेच. मी त्याला वेगवेगळे पदार्थ देयाची... तेव्हा तोही शिकला करायला. पण त्यात इतका रस नव्हता त्याला. तरी रसिक माणूस.... आधी वाटलं नव्हता रोमँटिक ... पण लग्न झाले आणि कळले.... , किती रोमँटिक होता ते...किती काय काय सांगायचा .... असं स्वप्न पडलं ... तसे इमॅजिन केले. भारी !!! बोलायचा तेव्हाच किती धडधड व्हायची. चावट मुलगा !! हे सर्व होते तरी माझा रिस्पेक्ट करायचा नेहमीच.. मी तशी मुडी ... क्षणात मूड बदलतो माझा. तो मात्र प्रत्येक क्षणाला तयार.... माझा मूड सांभाळ्यासाठी... मला ना गुलाब प्रचंड आवडते... गॅलरीत खास माझ्यासाठी गुलाबाची रोपटी लावली होती.


तो : तिचं ना .... प्राण्यांसोबत फुलांवर ही प्रेम.... मलाही आवडायचे फुलं ... पण जास्वंद ... !! तेव्हा ना ... आमचा नुकताच साखरपुडा झालेला. तेव्हा पहिल्यांदा आलेली घरी.... आणि गॅलरीत येऊन बसली. त्यांचे घर खाली ग्राउंड फ्लोअरला ना .... मज्जा वाटली तिला गॅलरीत.... तेव्हाच प्रॉमिस घेतले होते.... लग्न झाले कि हि गॅलरी माझी.... आणि तसे केलेही तिने. गॅलरीभर नुसते गुलाबच गुलाब ....विविध रंगाचे गुलाब, तरी माझ्यासाठी एका जास्वंदचे रोपटे आणले होते तिने. मला जसे आवडायचे तसे... माझीही काळजी असायची तिला. नाहीतर का एवढे प्रेम ... !! आम्ही दोघेही जॉबला .. मी आधी निघायचो, तिथेही अट होतीच ... रोज निघताना ... मिठीत घेऊन माथ्यावर kiss पाहिजेच .... हो .. होतीच अट ... पूर्णही करून घेयाची रोज ... मी कधी विसरलो तर स्वतःच मिठी मारायची, मिठी मारली कि समजायचे मला. तिच्या माथ्यावर kiss करूनच निघायचो ऑफिससाठी.


ती : या वर्षी अंमळ जास्तच पाऊस झाला ना..... ती गॅलरीमधली गुलाबांची रोपटी, एकतर त्यांना पाणी कमी लागते. या वर्षीच्या... पावसात... तग धरला नसेल त्यांनी.. ते घर सोडले आणि त्यानंतर ... तिथे वळून बघितले नाही... माहेर - सासर एकाच सोसायटी मध्ये... पण शेवटची निघाली होती त्यांच्या घरातून ... तेव्हाही त्या गुलाबांकडे पाहिलं नव्हते. आताही ..... कधी माहेरी घरी गेले तरी त्या गॅलरीकडे नजर जातंच नाही.


तो : ती खूप प्रेमळ !! सगळ्यांची काळजी तिला ... तरी नाकावर राग कायम ... राग सांभाळत सांभाळत नाकी नऊ यायचे. पण ते सर्व फोनवर ... समोर आली कि राग कुठल्या कुठे पळून जायचा. होतीच तशी ती ... अगदी परी सारखी... कधी कधी परीचं बोलायचो तिला.... ती मला ' लाडू ' बोलायची. नावाने कधी हाक मारली कि लाडू हमखास बोलायची. .. लाडोबा !! आणि मी तिला चांदोबा !! हे असच चालायचे आमचे. किती मज्जा करायचो आम्ही. आठवले कि हसू येते .... पण ती जाताना वाईट वाटले होते. खूप !!! रडली होती तरी मनाची तयारी करूनच निघून गेली. जाण्याच्या आधी बोलली होती..... , मागे वळून बघणार नाही.... तशीच गेली. मागे वळून बघितलं नाही .... ते अजूनपर्यंत ... !!


========================= to be continued

Sunday 24 November 2019

भटकंती .... नव्या वळणावरची !! .......( भाग २)


" ओ ,....... मिस्टर A ...... उठा आता ..... सकाळ झाली... " सुप्रीच्या या हाकेने आकाश डोळे चोळत जागा झाला.
" अगं ... वाजले किती.... " आकाशने घड्याळात पाहिले तर खरोखरच उशीर झालेला. सकाळचे ८:३० वाजत होते.
" अगं ...काय तू ..... मला जागे करायचे ना ... ८:३० झाले.. इतका वेळ झोपून राहिलो. ",
" राहू दे रे ... काल संध्याकाळ पर्यंत किती काम केलंस तू ... थकला होतास, म्हणून झोपू दिले. आराम करायचा ना ... " ,
" हो बाबा ... पण वाजले किती बघ... सूर्य दादा रागावून गेला असेल ना ... ते ठीक आहे ... तू कुठे गेली होतीस... माझा कॅमेरा घेऊन.. " आकाशने सुप्री कडे त्याचा कॅमेरा बघितला.

" प्रॅक्टिस करते आहे... तू काही शिकवत नाहीस. किती मस्का मारला तुला, मीच हळूहळू शिकते ... स्वतःची स्वतः ..... गरिबाला कोण शिकवणार फोटोग्राफी. " सुप्री उगाचच बोलली. आकाशला हसू आलं.
" बघू .... गरीबाची फोटोग्राफी " आकाशने सुप्रीच्या हातातून कॅमेरा घेतला.
" सांभाळून घ्या ... काही चूक असेल तर .... नवीन आहे फोटोग्राफर... " सुप्री चिडवत म्हणाली.

आकाशने हसतच फोटो बघायला सुरुवात केली. आणि अवाक् झाला. सुप्रीने किती छान क्लिक केले होते. लहान लहान किटकांचे फोटो. त्यात जास्त करून फुलपाखरांचे फोटो. किती छान !! नाजूक फुलांचे फोटो तर ... क्या बात है !! आकाशला गहिवरून आले. आकाशचे फोटो कसे.... गड -किल्ले.... पाऊस... भरून येणारे ढग .... डोंगर -दऱ्या.... म्हणजे भव्य-दिव्य अशी फोटोग्राफी... पण सुप्रीने खरच कमाल केलेली.
" ओ फोटोग्राफर .... रडता कि काय.. एवढीही वाईट फोटोग्राफी नाही हा... " आकाशने तिला मिठीत घेतले. तिच्या कपाळावर ओठ टेकवले.
" किती सुंदर क्लीक आहेत हे ... मलाही जमणार नाहीत .... शिकवशील का मला... " आकाश सुप्रीला बोलला.
" बघा ... कोण बोलते आहे ते ... गणू .... बघतो आहेस ना ... कशी असतात ती माणसं ... " आकाश हसू लागला ते ऐकून .

आकाश स्मित हास्य करत होता. आजही अंमळ उशिराने जाग आलेली त्याला. एका गावाच्या वेशीवर त्याचा तंबू उभा केलेला त्याने. काल बरीच धावपळ , बरीच कामे .... यातच रात्रीचे ८ वाजले. जे मिळालं ते खाल्ले. आणि तसाच झोपी गेला. दमलेला ना ... त्यामुळे आज सकाळी उशिरा जाग आली. जाग आली तीच सुप्रीच्या आठवणीने. कधी कधी गुपचूप कॅमेरा घेऊन जायची आणि फोटोग्राफी करायची. किती छान फोटो असायचे तिचे. स्वतःच शिकली, माझ्या मागे लागून दमली.... मला शिकव .. मला शिकव... किती ते... आकाश हसला मनोमन... आळोखे - पिळोखे देत आळस दूर केला. तंबू गुंडाळला आणि निघाला. पुढच्या प्रवासाला..... पावसाच्या आधी त्याला पोहोचायचे होते ....... कुठेतरी.


================================================================================


" सुप्री !!  ..... हॅलो सुप्री  .... आवाज येतो आहे ना .... " पूजा कधीची कॉल करत होती सुप्रीला. ५-६ वेळा try केला तेव्हा कुठे कॉल लागला. कॉल लागला होता तरी समोरून सुप्री बोलत नव्हती.
" ऐकते आहेस ना सुप्री ... बोल ना काही " पूजा किती बोलत होती. सुप्री ने बोलताच ऐकत होती.
" हे बघ सुप्री .... तू बोलत नसली तरी ऐकत आहेस हे कळत .... मी पुढच्या २ दिवसात निघणार आहे... आकाश जसा तुला जवळचा , तसाच माझाही... त्याला आता यावे लागेल... मी त्याला आणणार .... पण तुलाही यावे लागेल.... बघ , अजून २ दिवस बाकी आहेत. " पूजाने इतके बोलून कॉल कट्ट केला.


सुप्रीला अजूनही वेळ पाहिजे होता विचार करायला. आज ती घरीच होती. मनःशांती मिळावी म्हणून..... काय करावे ... अजिबात समजत नव्हते. आकाश ... मी गेले तर येईल का ... कि त्याला यायचेच नाही परत. मनाला पटत नाहीत या गोष्टी.... करूया का ... जाऊया पूजा सोबत... कि ... आणखी वाट पहावी त्याची..... विसरला असेल का मला... सुप्री संभ्रमात !!


" पुजू , काय वाटते तुला... सुप्री येईल का आपल्या सोबत .... " कादंबरीचा प्रश्न.
" माहित नाही मला ..... तरी वाटते ... तिने यावे " पूजा बोलली. कादंबरी-पूजा आजीच्या घरामागच्या झाडांसोबत बसल्या होत्या. छान संध्याकाळ होती.
" आकाशने का निर्णय घ्यावा. ते त्यालाच माहित. आधीही बोलला होता तो ... पण असा निर्णय घेईल, असे वाटले नव्हते. " पूजा .
" तरीही ... तू मला का सांगितले नाहीस... तो एव्हडा मोठा फोटोग्राफर आहे ते .. " कादंबरी. पूजाने डोक्याला हात लावला.
" अजून तेच आहे का डोक्यात.. ",
" तस नाही ग ... मला शिकायचे होते त्याच्याकडून ... निदान त्यासाठी तरी थांबला असता तो ... मला शिकवायला... " पूजा हसू लागली तिच्या बोलण्यावर.
" तुला काय वाटते... आकाश थांबला असता .... कादंबरीसाठी .... तुझ्यासाठी.... त्या सुप्रीला मागे ठेवून निघून गेला.... " असे बोलतानाही पूजाचे डोळे भरून आलेले.

================================================================================

" काय पावनं ..... कुठं निघालात... " एका गावकऱ्याचा आवाज ऐकला तसा आकाश थांबला.
" इथून पुढे ..... ",
" इथून पुढे वाट नाही साहेब.. कुठे जायचे आहे नेमके... " ,
" पुढे एखादे गावं असेल तर... तिथे... " ,
" या दिशेने गेलात तर ... जंगल आहे पुढे .... गावं तिथे आहे ... त्या दिशेने ... " त्याचे लक्ष आकाशच्या कॅमेराकडे गेले.
" फोटो काढता का तुम्ही.... " ,
" हो .... " ,
" तरीच .... गावातले वाटतं नाही तुम्ही... शहरातून आलात का... पण इथे कुठे शहर आहे... कुठून आलात नक्की... " ,
" मी फिरत असतो... आता गुजरात मधून आलो. काही दिवसात पाऊस सुरु होईल ना . म्हणून महाराष्ट्रात निघालो आहे. तुम्ही मराठी बोललात ... आता कळलं कि मी कुठे आलो. " आकाश हसून बोलला.
" महाराष्ट्र ना ... अजून वेळ आहे मग..... तुम्ही अजूनही वेशीवर आहेत... मराठी शिकलो मी ....गुजरातीच आहे. येणारे - जाणारे भेटतात तेव्हा त्यांच्याशी गुजरातीमध्ये बोलतो. ",
" मग ..... मला बघून मराठी ..... कसे ओळखले मी मराठी आहे ते ..... " त्याने पुढे येऊन आकाशच्या बॅगला हात लावला. त्यावर चैनला काही अडकवले होते.
" यावरून कळलं .... मराठी आहात ते ... " आकाशचे लक्ष गेलं. सुप्रीने असंच एकदा काही बाही बनवून दिले होते आकाशला. त्याच्या बॅगवर लावण्यासाठी, ते नाही का ... टॅग असतात बॅगवर लावायला. तसेच काहीसं. स्वतः बनवून दिले होते. एक छोटा गणपतीचा फोटो आणि त्याबाजूला " माझा गणू .... माझं आभाळ ... " असे मराठीत लिहून , छान पैकी प्लास्टिकमध्ये सजवून दिलेलं आकाशला. आकाशने अगदी हौशेने ते बॅगला लावले होते. तो गावकरी निघून गेला. पण नकळत त्याने पुन्हा सुप्रीची आठवण जागवली. आकाश तिथेच थांबला मग.

सपाट जागा होती ती. आकाश तिथेच जमिनीवर बसला. तिथे बसून आजूबाजूचे न्याहाळू लागला. सहज आभाळात लक्ष गेले. पावसाचे ढग .... प्रवास सुरु झाला तर... सोबत काही पक्ष्याचे थवे..... जणू पावसासोबत प्रवास करत होते. माझ्या सारखेच आहेत.... त्यांना कुठे घरदार ... फिरत राहायचे ऋतू बदलला कि. काही काळ थांबावे एका ठिकाणी... आणि निघावे. दिवसभर पोटापुरते बघावे .... रात्री आराम.... सकाळी पुन्हा प्रवास. तरी त्या पाखरांना सुप्री सारखी भेटली नसावी.  आकाशने कॅमेरा सुरु केला. जाणाऱ्या ढगांचे पटापट फोटो काढले. सुप्रीला हे असे फोटो आवडायचे. एक - एक फोटो बघत होता आकाश.... कॅमेरा मध्ये.... अचानक सुप्रीचा एक जुना फोटो त्याला दिसला. छान हसायची ना. सुप्री .... माझ्यासोबत तर छानच असायची. ४ वर्ष झाली ना तिला बघून. जातानाही रडतच गेली होती. विसरलो का मी तिची smile .... तिची आठवण तर येते..... अगदी..... तिच्यापासून दूर गेल्यानंतर २-३ महिन्यातच किती मिस केले तिला. तेव्हाच परतून गेलो असतो तर.... अपराधी भावना सारखी मनात... काय वाटलं असेल तिला. कशी react झाली असेल. मला तर विसरली नसेल... समज - गैरसमज मनात भरून ठेवले नसतील ना तिने. रडत असेल का माझ्या आठवणी काढून. पावसाचे थेंब न थेंब मोजताना मन अगदी रिते होऊन जायचे. आपले ते क्षण आठवतात आणि माझे मन वेडे होऊन तुलाच शोधते. हळूच आठवण येते आणि ओठांवर हसू येते.... पण सोबत तू नसतेस.

दुपार जाऊन कधी गुपचूप पावलांनी संध्याकाळ यायची. दुरूनच गावातील एका झोपडीतून दिसणार मिणमिणता दिवा उगाचच तुझी आठवण करून देयाचा. कोटीच्या कोटी संख्येने असणाऱ्या चांदण्या सुद्धा चंद्राविना आसवेच गाळताना वाटायच्या. तू गेल्यापासून आठवणींचे ओले सण .... अगदी उत्साहाने साजरे केले आहेत माझ्या मनाने. तुला भेटायचा किती तो प्रयन्त..... तरी हे अपराधी मन.... त्याने अडवून ठेवले नेहमीच... किती पळत होतो मी.... त्या पावसामागे... पावसामागे कि स्वतः पासून दूर.... आकाश विचारात गढून गेला. तो विचार करत होता तसेच झाले.... वेळ कसा निघून गेला कळलंच नाही. संध्याकाळ गुपचूप पावलांनी.... आकाशच्या शेजारी , सोबतीला येऊन बसली.

================================================================================

" हॅलो ... पूजा .... सुप्रिया बोलते आहे. " सुप्रीचा आवाज ऐकून पूजा आनंदली.
" हा ... बोल बोल सुप्री.... काय बोलतेस " ,
" विचार केला खूप ... यावेसे वाटते ... तरी .. " ,
" तरी काय सुप्री ... मनात काही न ठेवता ये .... आपण आकाशला घेऊन येऊ परत.... ",
" येईल का तो ... कि माझ्यापासून कायमचा दूर गेला आहे तो ... " ,
" असा काही विचार करू नकोस... आकाशला मी लहानपणापासून ओळखते. " ,
" चालेल .. मी येते मग ... कधी निघायाचे... " पूजाला आनंद झाला.
" एक काम कर ... तुला मी एक पत्ता पाठवते, तिथे येशील .... माझ्या आजीचे घर आहे. जास्त दूर नाही. तिथे आलीस कि पुढल्या प्रवासाची तयारी करू... " ,
" चालेल ... उद्या सकाळी येते ... " सुप्रीने कॉल ठेवून दिला.

" बघ तुला बोलली होती ना .... सुप्री तयार होणार.... " पूजा आनंदात कादंबरीला सांगत होती. कादंबरीला बरे वाटले.
" पण आकाश... त्याच काय... " पूजाने कादंबरीच्या तोंडावर हात ठेवला.
" शू !!! ... पुढे काही बोलू नकोस... होईल ठीक सर्व... "


पुढल्या दिवशी सकाळीच सुप्री पूजाकडे आली. " कोण गं ही .... " आजीने विचारलं. " मैत्रिण आहे... " पूजाने सुप्रीच्या खांद्यावर हात ठेवला. आजीचे लक्ष सुप्रीच्या बॅगकडे गेलं.
" काय गं पोरी... तुलाही सवय आहे वाटते भटकायची. " ,
" नाही आजी.... पूजा सोबत फिरायला जायचे आहे काही दिवस.. " ,
" काही दिवसच जा .... नाहीतर या दोघी वर्षभराने येतात... " आजी हसत म्हणाली.
" ये ... आतमध्ये ये सुप्री... by the way.... तुला चालेल ना सुप्री बोलले तर .... डब्बू बोलतो ना तुला सुप्री... ",
" चालेल ना .. त्यात काय... " कादंबरीनेही तिला येऊन मिठी मारली. पुढे काय मग .... तिघींच्या गप्पा-गोष्टी सुरु झाल्या. मध्ये मध्ये आजी यायची, तीही मध्ये सामील होयाची त्यामध्ये.

दुपारची जेवणे झाली. कादंबरी सवयीनुसार , कॅमेरा घेऊन निघून गेली. पूजा त्याच ठिकाणी येऊन बसलेली, घराच्या मागच्या बाजूला. सुप्री आली काही वेळाने तिथे. तिची चाहूल लागली पूजाला.
" ये सुप्री ... बस ... " तिलाही आवडली ती जागा.
" किती छान वाटतं ना .... शांतता आहे इथे " ... सुप्री बोलली.
" हो ना ... मला आवडते हि जागा... माझ्या लहानपणीची आवडीची जागा.. आईसोबत यायची ना इथे ... तो बघ समोर ... माझा झोपाळा...  "  सुप्रीने समोर बघितलं. एका झाडाच्या फांदीवर एका लाकडी झोपाळा दिसला तिला.
" तेव्हा ३-४ वर्षांची असेन मी... आजीनेच बांधला होता झोपाळा... तेव्हा कोणी नसायचे खेळायला ... एकटीच... मग हा सोबती झालेला .... म्हटलंस तर दिवसभर या झोपाळ्यावर खेळायचे... मी इथेच रमायची जास्त... ",
" म्हणून आता भटकत असते का ... " सुप्री मधेच बोलली. पूजाला हसू आलं.
" हे समोरचे अंगण आणि मागेच हे असे छोटे जंगल....आजीला आवड या सर्वांची.... त्यातून निसर्गाचे वेड निर्माण झाले. भटकंती बाबत बोलते तर ... त्याचे कारण एकच... आकाश... डब्बू... ",
" मग घरी का जात नाहीस ... आई-वडिलांना भेटायला. ",
" जावेसे वाटायला हवे ना .... हे माझे हक्काचे घर... कधीही येऊ शकते इथे.... तुला माहित आहे का , माझ्या वडिलांनी .... हे घर विकायला काढले होते. आजीला त्या घरी घेऊन जायचे ठरले. मीच थांबवले. तेव्हा तर वडिलांशी भांडली होती. विकले असते तर माझ्या बालपणीच्या आठवणी कायमच्या गमावून बसले असते. तो झोपाळा ... पुन्हा कोणी बांधून दिला असता मला. " पूजा स्वतःशीच हसली आणि त्या झोपळ्याजवळ आली.

झोपाळा वाऱ्यासोबत झुलत होता. पूजाने त्यावर मायेने हात फिरवला. " इथे आली कि जाणीव होते , मी माणूस आहे याची.... आमचा ग्रुप , त्यात असलेली ८-१० डोकी .... हि आजी आणि कादंबरी..... इतकीच काय ती माणसांची ओळख .... ",
" आकाश ..... तो राहिला कि... " सुप्री पुन्हा मध्ये बोलली.
" डब्बू ...... हाहाहा .... तो कुठे माणूस आहे ... पाऊस आहे तो ... प्रत्येकाला वेगळा भासतो.. तुला काय वाटते त्याकडे बघून .... " त्यावर मात्र सुप्री काही बोलली नाही. डोळ्यावरचा चष्मा बोटांनी सरळ केला.
" आकाश ... तो त्याच्या नावासारखा होता माझ्यासाठी.... किंबहुना आहे अजूनही. आभाळासारखा भासतो तो... पाऊस बोलतेस ना त्याला...तुला माहित आहे का , तो ना मला पाऊस बोलतो .. वेडा मुलगा .....  त्याची आई त्याला उधाणलेला वारा बोलते... पण तो आभाळच आहे ... माझ्या आयुष्यावर भरून राहिलेला " यावेळेस तिच्या डोळ्यातून एक थेंब त्या लाकडी झोपाळ्यावर पडला. चट्कन सुप्रीने ते आसू पुसून टाकले. पूजाने पाहिलं ते.

" मी आधीही छान असायचे. माणूस म्हटलं कि सुख-दुःख आलेच. दुःखच जास्त असतात. आणि आकाश बोलायचा, दुःख असली तरच सुखाची किंमत कळते. माझं कसं , संजना असायची सोबत.... अगदी बालपणापासून तिची सोबत आहे.... शाळा - कॉलेज , जॉब सर्व एकत्र केले आम्ही. तशी मी घरात लाडकी.... जे मागितले ते लगेचच मिळत गेले. त्यामुळे आपल्याला जे हवे ते मिळतेच , अशी धारणा झालेली. शाळेमध्ये, प्रेम करण्याच्या वयात प्रेम झाले. ते अगदी कॉलेज संपेपर्यंत होते सोबत... तिथेही तशीच धारणा ... आपले प्रेम - आपल्या साठीच तो ... हेच मनात . पण जेव्हा ब्रेकअप झाला तेव्हा खऱ्या दुःखाची जाणीव झाली. माझा स्वभाव हसरा , त्यामुळे कितीही दुःखी असली तरी चेहरा कायम हसरा. ते कुठून शिकले ते आठवत नाही. पण वाईट वाटायचे आतून. संजनाला सुद्धा माहित नव्हते, तिला कधी सांगितले नाहीच मी. का सांगावे, माझ्यामुळे तिला का दुःखी करू, कधी त्याची जास्तच आठवण झाली कि एकटीच जाऊन बसायचे कुठेतरी.... हि सवयच लागली होती मला. मनात इतके दुःख भरून राहिले होते कि सतत negative विचार यायचे मनात. पण काय करणार , जशी life सुरु होती तीच आवडायला लागली होती, त्यातच मी खूष होते. मग अचानक , आकाश आला life मध्ये... आधी तो आवडायचा नाही.... आमच्या शेजारीच त्याचे ऑफिस... मीच जायचे बोलायला.. हा कधीच बोलायचा नाही... फक्त मैत्री केलेली मी ... का ... तर ... तो त्या ' फेमस फोटोग्राफर आकाश ' ला ओळखायचा म्हणून मैत्री.... सुरुवातीला मला माहीतच नव्हते कि हा तोच आकाश आहे... " सुप्री सांगत होती तशी पूजाला गंमत वाटत होती.

" एकदा आमची पिकनिक गेलेली , वाट चुकलो जंगलात... तेव्हा सुद्धा हा अचानक पावसात भेट झाली.... कदाचित गणूच्या मनात होते आमची भेट व्हावी.... आम्हाला वाट दाखवायला आला आणि आमचा ग्रुप लीडर कधी झाला कळलंच नाही. मी किती त्रास देयाची त्याला .... माझा वेडेपणा खपवून घेतला पूर्ण प्रवासात त्याने... पण त्याच्याशी बोलणे आवडायचे... फार कमी बोलायचा पण छान बोलायचा. समजावयाचा. मी त्या प्रवासात सुद्धा कधी कधी एकटी जाऊन बसायची. हा यायचा मागे मागे...तरी छान वाटायचे तो काळजी करतो ते ... तो सोबत असणे छान वाटायचे..... इतकी काळजी घेतली होती त्याने... आठवते सारे... एका ठिकाणी त्याने त्याची खरी ओळख सांगितली होती. म्हणजे तेव्हा तर इतका आनंद ..... काय करावे हेच कळत नव्हते. तेव्हापासूनच तो मनात भरला होता. त्याच्यामुळे जुने सारे विसरून नव्याने सुरवात केली. नंतर चे सारेच दिवस आनंदात होते... पण जेव्हा वाटलं कि आपल्यामुळे तो असा अडकून पडला आहे... तेव्हा वाटले त्याला त्याचे आयुष्य जगता यावे .... " सुप्रीचा आवाज दाटला होता.

 पूजाने सुप्रीच्या खांद्यावर हात ठेवला. " आठवणी अश्याच असतात. आकाश तर बघ कसा ... माणसात राहून सुद्धा वेगळा असा तो ... मला तर आठवतो तो अबोल आकाश.. कोणाशी न बोलणे ना बघणे... आपल्याच जगात राहणारा .... त्याच्या आईवर जास्त प्रेम त्याचे... तरीही तिच्याशी किती कमी बोलायचा. लोकांना वेड लावणारी फोटोग्राफी.... पण कधी स्वतःचा फोटो काढला नाही कि लोकांसमोर आला नाही. आम्ही जायचो ना दोघेच... त्यावेळेची आठवण , आम्ही शनिवार - रविवार जायचो. जास्त करून तोच जायचा... आवड ना फोटोग्राफीची. दोन दिवस फिरणे झाले कि पुन्हा तीच रुटीन लाईफ. माझ्या घरी असे फिरणे पसंद नव्हते. तरी आकाश साठी जायचे. त्याची सोबत आवडायची. हवीहवीशी वाटायची. प्रेम तर होतेच त्यावर पण त्याने कधी कोणत्या बंधनात अडकू नये असे वाटायचे. मनातलं सांगितलं नाही कधी त्याला... कारण होते तसेच. आम्ही मित्र म्हणूनच छान होतो. त्याचा स्वभाव मी जाणून होते. तरी त्याने आता जे केले , त्यासाठी मी नाखूष आहे. तुला असे सोडून जाणे ठीक नव्हते. "

या दोघींच्या गप्पा सुरु होत्या... किती वेळ झाला. संध्याकाळ सुद्धा झाली. कादंबरी आली तेव्हा त्यांना कळलं.
" काय मग ... झाल्या का गप्पा-टप्पा .... " कादंबरीने आल्या आल्याचं सुरु केले.
" आली .... वेडी माणसं आली. " ,
" हो .... आहेच मी वेडी... तुला काय त्याचे.. पण गप्पा मारताना आजूबाजूचा परिसर तरी पाहावा माणसाने... " कादंबरी बोलता बोलता पुढे आली आणि समोरच्या आभाळाचा छानसा फोटो काढला. तेव्हा या दोघीचे लक्ष समोर गेले.

संध्याकाळ होती ती. सूर्यास्त जवळ होता. त्यात पावसाच्या ढगांची वाटचाल सुरु होती. काळे-पांढरे ढग.... हातात हात गुंफून निघाले असावेत. सोबतीला घरी परतणारे पक्षी होतेच. मावळणारा सूर्य मधेच आपले अस्तित्व दाखवत होता. मावळतीचा रंग त्या ढगांवर पसरत चालला होता. गुलाबी, राखाडी, मातकट, काळा , नारंगी, मधेच शुभ्र ... असे रंग विखुरले होते. हिवाळ्यातली संधी-छाया जणू अवतरली होती. सोबतीला असणारा थंड वारा... शहारून जात होते अंग....


" किती सुंदर !! " सुप्री मोहात पडली. " तुलाही किती सुंदर फोटो काढता येतात... कुठे शिकलीस ... " सुप्रीने कादंबरीला विचारलं.
" तुमच्या आकाश कडून .... i mean ... त्याने शिकवले नाही... तरी त्याचे फोटो बघूनच शिकले.... हे असे देखावे... ते कुठे आणि कसे पाहावेत... हे नकळत का होईना ... त्याच्याकडून शिकली. " कादंबरी बोलत होती तशी सुप्रीला आकाशची आठवण आणखीच येत होती.
" काय वाटते पूजा ... आकाश ऐकेल का माझे.. " सुप्री खुप वेळाने बोलली.
" येणार तो .... नक्की येणार .... आणि आता तर त्याला यावेच लागेल... " पूजाने सुप्रीला मिठी मारली.

================================================================================

" काय मग !! झाली का सकाळ ... " आकाशने सुप्रीला विचारलं. अजूनही आळसावलेली... जांभया देतं होती.
" किती आळस तो ... ती संजना बघ.... तयार होऊन गेली सुद्धा... " संजनाचे नाव ऐकले तशी खडबडून जागी झाली ती.
" कुठे गेली संजू... " ,
" फिरायला ... बघ जरा डोळे उघडून ... बाकी सर्वच फिरायला गेले. " सुप्री डोळे चोळत जागी झाली. प्रत्येक तंबूत जाऊन पाहिलं. खरंच कोणी नव्हते.
" बघ रे गणू .... गरिबाला सोडून गेले सर्व. " आकाश हसू लागला. " पण मग तू का राहिलास मागे.... " सुप्रीने आकाशला विचारलं.
" जास्त दूर नाही गेले... इथेच जवळपास गेले आहेत. त्यात तू दिसली नाहीस.... म्हणून समजून गेलो कि मॅडमची झोप झाली नसेल. त्यासाठी इथेच.... तुमच्या तंबू बाहेरच बसून होतो. पहारा देत होतो. " ,
" बाई बाई !! किती ते प्रेम ... " सुप्रीने आकाशचा गालगुच्च्या घेतला.
" तरी .... ते गेले फिरायला.. माझ्यामुळे तू मागे राहिलास ..... सॉरी !! " ,
" त्यात काय सॉरी बोलते वेडू .... ते जाऊ दे फिरायला .. आपण वेगळे असे काही छान बघू... चल ... " आकाश असे काही बोलला कि नक्कीच काही छानच असणार हे नक्की. सुप्री लगेच तयार झाली. " मॅडम , डोळे बंद करा हा ... आणि अजिबात डोळे उघडू नकोस....... मी सांगीन तेव्हाच डोळे उघड.... " सुप्रीने आकाशचा हात घट्ट पकडला होता.

आपण डोंगर चढत आहोत हे मात्र सुप्रीला कळत होते. पुढची १०-१५ मिनिटे डोळे बंद करून चालल्यावर ते एका ठिकाणी थांबले. " हम्म ... आता हळू हळू डोळे उघड. " सुप्री अजूनही डोळे बंद करून होती. छान हवा वाहत होती. जाणवत होते तिला. डोळे किलकिले करत उघडले. हे दोघे एका उंच जागी उभे होते.

समोर एक लहानशी टेकडी होती. अजूनही नुसती चाहूल लागली होती पावसाची. अधून मधून पडणाऱ्या पावसाने समोरची टेकडी बऱ्यापैकी हिरवी झाली होती. हिरवळ नुसती, गवत असावे ते. ते असते ना कंबरेइतके गवत , तसंच काहीस. येणाऱ्या वाऱ्यासोबत एका विशिष्ठ लयीत डुलत होते ते गवत. टेकडी खाली दूरवर पसरलेली शेतं, नांगरून ठेवलेली शेतं, लालसर मातीची शेतं..... एक-दोन शेतात अजूनही बैल-नांगर दिसत होते. उरलेली कामे.... दूरवर एक अस्पष्ट नदी दिसत होती. हे सर्व पाहत असताना , वाऱ्याचा वेग क्षणभरात वाढला. आकाशने सुप्रीला एका दिशेने पाहायला सांगितले. सुप्रीचे त्याकडे लक्ष गेले. ढगांची सेना चालून येतं होती. काळे -पांढरे ढग. इतक्या खाली असतात का हे ढग.... सुप्रीच्या मनात पट्कन विचार येऊन गेला. दूरवर असलेले ढग , काही वेळातच त्या टेकडीपाशी आले. त्यातल्या त्यात एक मोठा असलेला ढग , त्या टेकडीच्या माथ्याशी अडकून पडला. लगोलग ... त्याच्या मागे असलेले ढग सुद्धा तिथे अडकून बसले. बघता बघता , एक वेगळ्याच प्रकारचा "ट्राफिक जॅम" झाला तिथे. सर्वत्र काळे-पांढरे ढग... एकमेकांत अडकलेले.. त्या टेकडीचा फक्त माथा दिसावा असेच काही होते समोर. वाहणाऱ्या नदीच्या पात्रात एखादा खडक तग धरून राहावा असंच तो टेकडीचा माथा भासत होता. सुप्री शहारून गेली. काही वेळाने बोचरा वारा आणखी थंड झाला. त्यात पाण्याचे थेंब मिसळले होते ना. " बघ ... सुप्री, पावसाची तयारी अशी सुरु होते. कुठून कुठून ढग येतात...... या अश्या डोंगररांगाना कवेत घेण्यासाठी... ... " आकाश भारावून बोलत होता. सुप्रीनेही त्याला कवेत घेतले आणि दोघे मिळून ते दृश्य न्याहाळू लागले.

आकाशला आठवलं सारे. आजही तो तसाच बसून प्रवास करणारे ढग न्याहाळत होता. काल थांबलेल्या ठिकाणीच होता, आजही. अंगात जरा कणकण जाणवत होती. त्याच्यासोबतीला काळजी करणारे नव्हते ना. त्यामुळे जेव्हा जेव्हा एखाद्या गावात जायचा, तिथूनच जास्तीचं औषध-पाणी घेऊन ठेवायचा. आताही औषध घेऊन आराम करत होता. उष्णता जाणवत नव्हती, कारण पावसाचे ढग.... पावसाचे वारे..., कसं चट्कन बदलते ना वातावरण. विचार करता करता रंग बदलतात निसर्गाचे... रस्ते , पायवाटा त्याचं राहतात .... माणसं बदलतात. आपणही बदललो आहोत का .... नाही.... पण आता बदलावे लागेल... काही गोष्टीसाठी.... निदान सुप्रीसाठी.... बदलावे ... या ढगांसारखे.... त्यांनाही बदलावे लागते ना ... नाहीतर पांढऱ्या शुभ्र ढगांना काय किंमत .... बरसणाऱ्या ढगांमुळे जीवन फुलते .... काळे ढगच सर्वांना हवे असतात .. विजेचा कडकडाट नाही....

================================================================================
 
आज सकाळीच .... सुप्री , पूजा आणि कादंबरीने त्यांचे सामान भरले. " आजी ... !! येते गं ... " कादंबरीने आजीला मिठी मारली.
" आता कधी येणार .... थेट पुढच्यावर्षी ना .... ",
" हि पूजा ... तिला सांग... तिला सारखी बोलत असते ... आजी कडे जाऊ .... आजी कडे जाऊ.... ऐकतच नाही . " तसा पूजाने कादंबरीला चिमटा काढला.
" आई गं .... !! " कादंबरी कळवळली.
" किती खडूस , कुचकी .... बघितलं ना आजी... कशी वागते माझ्यासोबत.... " सुप्रीला हसू आले ते बघून. आपणही असेच बोलायचो , वागायचो. आकाश निघून गेला आणि आपणच अबोल झालो.

" चला .... निघा ..... असे बोलत नाही, तरी या परत म्हातारीची आठवण झाली कि. " या तिघी आजीचा निरोप घेऊन निघाल्या. चालता चालता , बोलता बोलता ठरलेल्या ठिकाणी येऊन पोहोचल्या.
" इथे थांबूया ... " पूजाने बॅग खाली ठेवली.
" इथे का ... " सुप्रीचा प्रश्न.
" आमचा ग्रुप यायचा असतो ना. आम्ही सर्व , या काळात शहरात येतो काही दिवसासाठी. " कादंबरी पट्कन बोलून गेली.
" हो , आमच्या ग्रुपमधले बरेच जण आपापल्या घरी जाऊन येतात. काही वस्तू पाहिजे असतील तर येतात, आम्ही दोघी आजीसाठी येतो, हि पागल ... माझ्या घरी जाऊन येते. " ,
" आणि आकाश.... त्याला भेटावे असे वाटतं नाही का कधी... " सुप्रीने लगेच विचारलं. तोपर्यंत कादंबरीने तिचे सामान खाली ठेवून , जरा पुढे कॅमेरा घेऊन निघून गेली.
" जेव्हा जेव्हा आजीला भेटायला येते ना ... तेव्हा तेव्हा येते मनात कि आकाशला जाऊन भेटू... पण मन तयार होतं नाही. " ,
" का गं ? " सुप्री...
" आपण इथेच बसू जरा ... " पूजा तिथे असलेल्या एका झाडाखाली जाऊन बसली. सुप्री तिच्या शेजारीच बसली.

" आता सांग ... काय कारण होते ... आकाशला न भेटण्याचे... " सुप्रीला उत्सुकता.
" आकाश ना ... कधी कोणाला कळलाच नाही. तुला बोलली ना , जास्त बोलायचा नाही. अबोल काहीसा. त्याच्या मनात काय सुरू असायचे हे त्यालाच माहित. पण जेव्हा बोलायचा तेव्हा छान असायचे ते. आम्ही रोज रात्री भेटायचो. रात्रीचे जेवण झाले कि पाय मोकळे करायला यायचा. तेव्हा सुद्धा फार कमी गप्पा असायच्या. नुसते चालणे आणि चालणे. " ,
" कधी बोलायचा मग तो ... " सुप्रीला गंमत वाटली.
" त्याच्या मनात असेल ना तेव्हाच... त्याला हा निसर्ग जास्त जवळचा. तिथे गेलो ना कि स्वारी खुश... !! आनंद दिसायचा त्याच्या चेहऱ्यावर... " पूजा छान आठवणीत रमली होती.
" तुम्ही रोज जायचा का ... म्हणजे दर शनिवार - रविवार... " ,
" नाही. तो सुरुवातीला जॉब करायचा ना ... " ,
" आकाश तेव्हा जॉब करायचा ... ?? ",
" हो ... प्रोग्रामिंग शिकलेला..... २-३ महिने केला जॉब ... नाही जमलं त्याला. सोडून दिला .... पण फोटोग्राफीचे वेड सुरुवातीपासूनच... ते मात्र त्याने जोपासलं. त्याचे घरी सगळेच कमावणारे. त्यामुळे जॉब सोडून घरी बसला तर काहीच फरक पडला नाही कोणाला. तोच जायचा फिरायला. आठवड्यात २-३ दिवस तरी..... मग शनिवार - रविवार ... मला काही काम नसेल तर मीही जायचे. मीच बोलली होती , मीही येईन फिरायला. तेव्हा आमचे भटकणे सुरु झाले. जास्त दूर नाही जायचो. ठिकाण सुद्धा आकाश ठरवायचा. आणि पावसातली आमची काही ठिकाणे ठरलेली होती..... तिथे जायचो दरवर्षी न चुकता.... आदल्या दिवशी सांगायचा. तशी मी तयारी करायचे. दोघांचे वेगवेगळे तंबू असायचे. मी कॅमरा खूप नंतर घेतला. त्यावेळेस त्याचाच कॅमरा वापरायचे. किती फिरायचो आम्ही... तुला सांगते ना ... आकाशचा स्टॅमिना कमाल आहे अगदी. त्याला बघून बोलणार नाही कोणी, हा माणूस इतका प्रवास करू शकतो... न थांबता. माझी तर दमशाक व्हायची. रविवार संध्याकाळी घरी आले कि पाय दुखायचे नुसते. आणि हा साहेब .... घरी सामान ठेवून पुन्हा समुद्र किनारी जायचा .... तुला तर असेल अनुभव त्याचा..... " , पूजाने सुप्रीला विचारलं .

" हो ना.... आम्ही जायचो ना आधी फिरायला. नुसता पुढे पुढे पळायचा. मग मीच आयडिया केली, मुद्दाम हळूहळू चालायचे. तेव्हा त्याला कळलं, तोही माझ्यासोबत हळू हळू चालायला लागला. तरी तो बोलते ते बरोबर .... थकत नाही तो .... कितीही चालू शकतो. " सुप्री बोलत असताना , ग्रुपमधली आणखी काही माणसे आली. पूजाने सुप्रीची ओळख करून दिली.
" आले का सारे ... " सुप्रीने विचारलं.
" नाही ... अजून एक-दोघे यायचे आहेत. " ,
" ते आले कि निघणार का ... " सुप्रीला किती घाई झालेली ते पूजाला कळलं.
" बस येईल ना आपली.. ती आली कि निघणार... " ,
" बसने जातात का तुम्ही... " ,
" नाही .... शहराबाहेर गेलो कि उतरतो ... आणि यावेळेस आपल्याला वेगळ्या वाटेने जावे लागणार आहे... त्या आकाश नावाच्या ट्रेनला पकडायचे आहे ना ... नाहीतर आपण जाऊ आणि त्याची पायांची गाडी सुटली असेल " पूजाच्या या वाक्यावर सुप्री हसू लागली.

पुन्हा दोघी खाली बसल्या. कादंबरीची फोटोग्राफी संपत नव्हती.
" हे कधी भेटले तुम्हाला .... हा ग्रुप... आपण आधी भेटलो होतो तेव्हा सांगितले होतेस ... पुन्हा सांगतेस का ... " ,
" हो .... आम्ही तेव्हा दोघेच गेलो होतो फिरायला. शनिवार होता एवढे आठवते. सकाळ सकाळीच हा ग्रुप आलेला. तेव्हा फक्त ५ जणांचा ग्रुप होता. आता १२ जण आहोत. त्यावेळेस एक वाट चुकले  आणि चुकत चुकत आमच्या पर्यंत पोहोचले. आकाशला तसही कोणाला नाही बोलता येत नाही. आणि त्याला हे जिप्सी लोकांचे फिरणे चांगले ठाऊक... त्यामुळे त्यांना त्यांच्या जागी पोहोचवायचे ठरले. प्रॉब्लेम एकच , आम्ही २ दिवसांसाठी घरातून बाहेर पडलो होतो. पण आकाश होता , तर काय घाबरायचे.... त्याच्यावर विश्वास होता म्हणून मी माझी पहिली वहिली भटकंती करू शकले. पुढल्या ५ दिवसात आम्ही त्यांच्या जागी पोहोचलो. तो तसा प्रवास मात्र आकाशला खूप आवडला. आकाशने निघताना त्यांच्याकडून पूर्ण माहिती काढली. एका विशिष्ठ दिवसात ते शहरात येतात , हे सुद्धा कळलं त्याला. पुढच्याच महिन्यात ते शहरात येणार होते. डब्बू तर डब्बूच....   तो तयारच होता... ते आले तसा हा सुद्धा गेला त्याच्यासोबत. १५ दिवसांनी आलेला घरी. ज्या दिवशी आलेला ना ... त्या रात्री किती बोलत होता, त्याने काढलेले फोटो दाखवले... कदाचित तोच क्षण !! फोटोग्राफीची व्याख्या बदलून टाकली त्याने. मीच सांगितले त्याला कि हे फोटो दाखव कोणाला तरी. एका मॅगझीन ला पाहिजे होता फोटोग्राफर , wild india ... आवडले फोटो... लगेचच ठेवून घेतलं जॉबला. झालं मग .... सोमवार ते शुक्रवार .... फिरत राहायचा. शनिवारी माझ्यासाठी यायचा. मग आम्ही जायचो २ दिवस. या ग्रुप सोबत सुद्धा ३-४ वेळा फिरणे झाले. मीही होते. तेव्हाच ठरले कि शहर सोडून हि life जगावी. आकाशने सपोर्ट केला म्हणून मी हे पाऊल उचलले. तशी या ग्रुपसोबत ओळख झाली होती. लगेच घेतले मला ग्रुपमध्ये. नंतर २ वर्ष होता आकाश ग्रुप सोबत. छानच होती त्याची सोबत... पण त्याला जेव्हा वाटले कि आपण यात अडकतो आहे ... तसे सांगून सोडून गेला. वाईट तर वाटले होते. तरी त्याचा स्वभाव ... मीही थांबवू शकले नसते आणि तो थांबला हि नसता... " पूजा आठवणीत रमली. 

" तुझ्यामुळे तो बोलू लागला.. तू फरक केलास त्याच्या स्वभावात... सांगावे तर तुझ्यामुळे तो माणसात आला... ",
" आणि माझ्यामुळेच माणसापासून दूर गेला. " सुप्री पटकन बोलून गेली.
" नाही ग ... आणि तसे कधी मनात आणूही नकोस .... मलाही हेच वाटायचे कि त्याला मी भेटायला गेले तर आवडेल कि नाही ... म्हणून त्याची भेट टाळायची मी... हे कारण.. आणि हो .... डब्बूला आठवण येतं असेल तुझी .. " ,
" मला तर येते ... त्याचे माहित नाही... ",
" डब्बू ना असाच आहे ... सर्वांची काळजी असते त्याला ... करतो काळजी.... पण कधी बोलून दाखवत नाही इतकंच ... " बोलता बोलता उरलेली माणसं आली.

" चला मग .... निघूया ... " पूजाने बॅग लावली पाठीवर. कादंबरी आली. सर्व एकत्र जमले. सुप्रीची पुन्हा ओळख करून दिली तिने.
" आपली बस आली कि निघालो आपण " कादंबरी बोलली.
" पूजा ... एक सांग ... " सुप्रीने विचारलं.
" नक्की कुठे निघालो आहोत आपण ... तू बोलली ना .. त्याचे एक ठिकाण ठरलेले आहे.... पावसात ... " ,
" म्हणजे बघ .... तुलाही इतकी वर्ष त्याने समजू दिले नाही. " ,
" काय ते ... " ,
" आमच्या दोघांची पहिली भटकंती.. सांगावे तर आम्ही पहिल्यांदा पावसात गेलो होतो ते ठिकाण .... राजमाची ... " ,
" wow !! " कादंबरी आनंदाने ओरडली.
" ११ जून .... तोच दिवस.... दरवर्षी तो याच तारखेला तिथे असतो.. एकटाच... " ,
" असे का ... " ,
" कारण एकच .... त्याच दिवशी आमच्या .... किंबहुना त्याच्या भटकंतीला सुरुवात झालेली.... तर तो दिवस ... खूप मानतो तो ... त्या दिवशी जातोच तिथे तो ... तुम्ही इतकी वर्ष फिरत होता , तुला एकदाही घेऊन गेला नसेल ना ... " ,
" नाही ... कधी गेलो फिरायला तर पावसाआधी ....... आम्ही पावसात जायचो ते जून अर्धा संपल्या नंतर ... जून महिन्याच्या शेवटी बोलली तरी चालेल... तेव्हा फिरायचो पावसात. हा पण , कधी कधी एकटा जायचा ... मी विचारले नाही कधी त्याला... शिवाय २ वर्ष जेव्हा शहरात होता, तेव्हाही गुपचूप जाऊन यायचा हा... मला न सांगता. एकटाच... तिथे जायचा तर ... पण सांग मला ..... राजमाची एवढ्या दूर आहे का ... कारण ११ जून यायला तसा तर अर्धा महिना बाकी आहे. " सुप्रीचा प्रश्न.

" नाही .... दूर नाही. पण डब्बू थेट जातं नाही तिथे.. काही ठिकाणावर थांबून थांबून जातो ... आम्ही २ वर्ष असेच फिरायचो ना ... तेव्हा माहित मला हे त्याचे गुपित. ... तर पहिले ठिकाण नाशिक ... तिथे एका देवीचा उत्सव असतो .. ते त्याचे पहिले ठिकाण.. तिथं पोहोचायला पाहिजे लवकर म्हणून निघालो... तिथेच भेटला तर आकाश ... शिवाय आपण पायी प्रवास करणार आहोत... वेळ तर लागेलच ना... " पूजाला सुप्रीची घाई बघून हसू आलं. बस आली. सर्वच आपापल्या जागी जाऊन बसले.
" सुप्री ... तू इथे बस .... आम्ही तुझ्या मागच्या सीट वर आहोत. काही लागलं तर सांग. " पूजाने सुप्रीसाठी जागा निवडली.
" if you don't mind.... मी मागे जाऊन बसू का ..... इतक्या वर्षांनी प्रवास करते आहे ... so , ...... आठवणी ..... " ,
" हो हो .. तुला पाहिजे तिथे बसू शकतेस ....आपले ठिकाण आले कि सांगते... तोपर्यंत कोणी डिस्टर्ब करणार नाही तुला... " पूजा तिच्या जागेवर बसली.

सुप्रीने तिचे सामान घेतले. सर्वात मागची खिडकीजवळची जागा पकडली. हळूहळू बसने वेग घेतला. दुपारची वेळ, तरी दुपार वाटत नव्हती. कारण आभाळात प्रवास करणारे ढग होते. मे महिन्याची अखेर होती. त्यामुळे सर्वच ढगांची धावपळ सुरु होती. सुप्रीला गंमत वाटली. आकाशची आठवण आली. इतक्या वर्षांनी प्रवास ... तोही आकाश शिवाय, भरून आले तिला. आकाशचा "खांदा" मिस करत होती. डोळ्यावरला चष्मा हळूच सरळ केला तिने. अश्या प्रवासात नेहमीच ती , आकाशच्या हक्काच्या खांद्यावर डोके ठेवून , ती खिडकी बाहेरील जग न्याहाळत असायची.

अचानक तिचे लक्ष , आभाळात उंचच उंच उडत असलेल्या पक्षांच्या एका मोठ्या थव्याकडे गेले. किती मोठा थवा !!!
" सुप्री !! " पूजाने सुप्रीला हाक मारली. " बघते आहेस ना ....सर्वाना वाटते कि पक्षी फक्त हिवाळ्यात प्रवास करतात.... या पक्ष्याचे नाव माहीत नाही मला... पण हे तुझ्या आकाशने दाखवले ... बर का ... " सुप्रीने छान smile दिली. आणि त्याकडे बघू लागली. किती मोठा थवा होता तो. किती सुंदर... सुप्री कधीची त्याकडेच पाहत होती. ओठांवर हसू आले. हळूच तिने , तिच्या शेजारी असलेली रिकामी सीटकडे पाहिलं. लवकरच येईल शेजारी .... हसली स्वतःशीच.... पुन्हा त्या पक्ष्यांकडे पाहू लागली. हा वारा .... हे काळे ढग ... पक्ष्यांचा थवा ... सर्वच आकाशला भेटायला निघाले आहेत, आमच्या सोबत.... विचार आला तिच्या मनात. बस वेगाने पुढे निघालेली.... पण सुप्रीचे मन .... त्याही पुढे पळत होते.
================================================================================ 

आज दुपारीच आकाशने पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. त्याला कदाचित पावसाची चाहूल लागलेली. आज त्याने ठरवलंच होते, जेवढे जास्त अंतर पार करता येईल तितके करायचे. कालचा दिवस पूर्ण आराम करण्यात गेलेला ना ... तो भरून काढण्यासाठी. त्यामुळे तो न थांबता चालत होता. मध्ये मध्ये १०-१५ मिनिटांचा ब्रेक घेयाचा, पुन्हा निघायचा. संद्याकाळी झाली तेव्हा कुठे थांबला. त्यामानानं खूप अंतर पार केले. स्वतः वरच खुश झाला. पण एक मोठा प्रश्न. तंबू कुठे लावावा. काही वेळाने रात्र होईल. समोर एक डोंगरकडा. तो होता हि आता एका डोंगरावरच. डोंगर उतरून जावे तर रात्र होईल. शिवाय पुढची वाट माहित नाही. तंबू तर लावला पाहिजेच ना ... असे उघड्यावर झोपणे योग्य नाही. त्यापेक्षा आपण या डोगंराच्या माथ्यावर जाऊ, तिथे रात्रभर थांबता येईल. शिवाय , आता नक्की कुठे आहोत ते माहित नाही... त्यामुळे सकाळी उजाडले कि पुढची वाट ठरवू , असा विचार करत आकाश त्या डोंगर शिखराकडे निघाला. पुढल्या अर्ध्या - पाऊण तासात तो पोहोचला.

बऱ्यापैकी अंधार झालेला , तरी अंधुक प्रकाशात त्याने अनुभवाने एक सपाट जागा शोधली. काळोखात कुठे तंबू उभा करणार. तरी रात्री झोपण्यासाठी लगेच काहीतरी उभे केले त्याने. दुपारी निघताना काही कंदमुळे त्याने भाजून घेतली होती सोबतीला. आज रात्री तेच जेवण... मावळतीच्या सूर्याच्या साक्षीने रात्र झाली. त्यात आज खूप चालणे झालेलं त्याचं. दमलेला... कंदमुळं खात खात विचार सुरु होते डोक्यात. सुप्रीची आठवण येणारच मग.

" तुला रोज कंदमूळं दिली तर चालतील ना ... जेवणात ... " सुप्रीच्या या अश्या अचानक आलेल्या प्रश्नावर आकाशला हसावे कि रडावे , तेच कळेना.
" हे काय खुळ मधेच .... " ,
" असंच ... कधी कधी तुला ऑफिसला उशीर झाला निघायला... तर हे बरं आहे ना.... पट्कन .... कंदमुळं भाजायची किंवा पाण्यात उकळत ठेवायची..... डब्यात भरून दिली कि लगेच निघालास कामाला .... काय .... मस्त आहे ना झटपट रेसेपी. " सुप्रीच्या या बोलण्यावर आकाशने हात जोडले तिला.
" हो हो .... का चालणार नाही ..... आवडेल मला. अगदी रोज दिलीस तरी आनंदाने खाईन.... तुला जेवण बनवता येत नाही तर काय करणार गरीब माणूस.... " आकाश असे बोलला तसे दोघेही हसू लागले.

आकाश ते आठवून हसू लागला. किती त्या आठवणी. मी बोलायचो सुप्रीला ... आठवणी काढू नयेत, आता गेली ४ वर्ष मी तर त्या आठवणीवरच जगतो आहे ना .... आकाशने वर आभाळात पाहिले. ढगांचा प्रवास सुरु होता. त्यात मध्ये मध्ये चांदोबा डोकावत होता. पाऊस पडणार नाही आता तरी थंडावा जाणवतो आहे ना ... किती प्रवास केला गेल्या ४ वर्षात ... दरवर्षी वेगवेगळ्या मार्गाने महाराष्ट्रात आलो... आता काय माहीत कुठे आहे नक्की मी... आणि सुप्री काय करत असेल आता... काय माहित ना .... असो, झोपूया .... उद्या जमलं तर लवकरात लवकर निघू... प्रवासाला सुरुवात करू. असा विचार करत त्याने मनगटावरील घड्याळात 'अलार्म ' सेट केला. थकलेला खूप .... लगेच डोळा लागला त्याचा.


गजर ना होताच त्याला पहाटे जाग आली. घड्याळात पाहिले तर सकाळचे ६:३० वाजले होते. जाग कशी आली मला, विचार करत उठून बसला. सभोवती ओळखीची .... धुक्याची चादर... त्यात वारा हळुवारपणे खेळत होता. पाण्यावर लाटा याव्यात तसेच काही भासत होते. एक कमालीची शांतात होती तिथे. वाऱ्याचे नुसते फरफरणे सोबतीला. आकाशची पावलं आपसूकच पुढे जाण्यास वळली. काही पावलं चालून गेल्यावर , एका ठिकाणी " आता थांबावे " असा मनातून वाटलं त्याला. तसा थांबला. डोंगररांगा समोरून खुणावत होत्या. त्याआडून सूर्यदेवाचे आगमन होईल थोड्यावेळाने. आकाश न्याहाळत होता. त्याच्या बरोबर समोर ... काही खूपच .... शुभ्र चादर पसरावी असे होते काही. अरेच्या !! दरी आहे तिथे ना ... तिनेच मस्त पैकी धुक्याची चादर ओढून घोरत पडली आहे... आकाश सुखावला. वाऱ्याच्या बासरी सोबत आता अस्पष्ठ असा आरत्या , भजनांचा आवाज कानी येऊ लागला. नक्कीच खाली एखादे गाव असणार... बघायचा प्रयन्त तरी किती करावा , त्या दाट धुक्यामुळे काहीच दिसणार नव्हते. पूर्वेकडच्या कडा आताशा .... तांबूस - नारंगी होऊ लागल्या होत्या. पावसाचे काळे-पांढरे ढग ... त्या धुक्यात मिसळून जात होते. एक वेगळीच "भेळ" तयार होतं होती. स्वर्गीय अनुभव !! सुप्रीची आठवण दाटून आली. काही दवबिंदू त्याच्या गालावर पडले आणि ... आणि , खूप वर्षपूर्वी वाचलेली एका कविता नकळत त्याच्या ओठांवर आली.

बूंदों के मोतियों में खुल के अहसास आया ,
वक्त से निकल के लम्हा दिल के पास आया ,
जो के गुजरा था तब दिल को ना महसूस हुआ ,
अब जो देखा तो वो लम्हा दिल को रास आया ,

युँ  की तय करना पाऊ ,
दिल की बात मैं हवा के जरिये पहुँचाऊ ,
या खुद हवा पे चकले जाऊ ,
तुमसे प्यार हैं ये खुल के फिर मैं बतलाऊ रे। .....  

सुप्रीचा चेहरा आता त्याला त्या धुक्यात दिसतं होता. डोळ्यात पाणी तरळले , सर्व भावना , आठवणी दाटून आल्या. थांबवू शकला नाही स्वतःला , आकाशने हात पसरले  आणि मोठयाने ओरडला , " I ........ Love ....... You ....... सुप्री !!! "

त्या डोंगर रांगात काही काळ आवाज घुमत राहिला. आणि धुक्यातचं विरून , विरघळून गेला. एक वेगळेच चैतन्य आलेलं त्याच्या शरीरात. आळस झटकला त्याने. पटापट सामान आवरून निघूया म्हणत त्या धुक्यातून धावतच त्याच्या सामानाकडे पोहोचला. पुढल्या १०-१५ मिनिटात सामान आवरून बॅग तयार झाली. तीच वेळ साधून सूर्यदेवाने entry केली होती. बघता बघता धुक्याचे साम्राज मागे हटू लागले. आकाश त्याची बॅग हातात घेऊन , मघाशी उभ्या असलेल्या जागी पुन्हा येऊन उभा राहिला. 

आधीच्या अस्पष्ट दिसणाऱ्या डोंगररांगा आता ठळकपणे , उठून दिसत होत्या. ओळखीच्या रांगा ... आकाशच्या ओठावर हसू अवतरले. सूर्यदेवाची किरणे पसरू लागली आणि धुक्याची चादर दूर होऊ लागली. थोड्या हिरव्या - करड्या रंगाच्या डोंगररांगा.... पायथ्याशी असलेलं मोठे देऊळ.... अगदी तो कातळ कोरून बनवले असावे ते देऊळ.... तिथूनच भजनांचा आवाज येतं होता. दऱ्या-खोऱ्याच्या कवेत पहुडलेली गावं.... .अजूनही निपचित , झोपेत असावीत. त्या गावाच्या पायवाटांवर अजूनही धुक्याचे अस्तित्व होतेच. देवळाजवळच काय ती ... काही डोकी दिसतं होती. देवळाच्या कळसाचा सोनेरी रंग डोळ्यात भरत होता. त्या शेजारीच असलेला भगव्या रंगाचा झेंडा अभिमानाने वाऱ्यासवे फडफडत होता. त्याच्याच वर असलेल्या डोंगर कड्यावर ... एक इवलसं इंद्रधनू .... आकाशला दिसले. सुंदर !!! ...... मधेच एक पक्षांचा थवा ... त्या सुंदर देखाव्यातून आपली ओळख सांगत निघून गेला. नजर जाईल तिथे हिरवळ .... आभाळात ढग आणि वाहणारा वारा... तुकोबांच्या भजनांचे आवाज ....... महाराष्ट्रात पोहोचलो वाटते....आकाशने अंदाज लावला. खरे हि होते ते.... वेशीवर होता अगदी.... आनंदाने डोळे सुरुवातीलाच भरून आलेले .... आता दवबिंदु सोबत गालावरून ओघळत होते. आनंदाचे पाणी डोळ्यात !!!!

" चला ... मिस्टर आकाश... आता खरी भटकंती सुरु झाली, असे म्हणायला हरकत नाही.... " स्वतःशीच बडबडत हसत होता. कॅमेरा बाहेर काढून , त्या निसर्गाचा सुरु असलेल्या सोहळा, त्याने पट्कन कॅमेरात कैद केला. सूर्यदेवाला एका "सलाम" ठोकला. खाली वाकून जमिनीला हात लावला आणि तोच हात छातीशी धरला ..... वाहणारा वारा श्वासात भरून घेतला. बॅग खांदयावर लावली. आणि पुढच्या प्रवासाला निघाला... पावसाला भेटायला .... त्याच्या आवडत्या ठिकाणी.


---------------------------- to be continued    

Tuesday 29 October 2019

तिच्या मनातला " तो " आणि त्याच्या मनातली "ती " (भाग दोन )

तो :-   शीट यार !! या पावसाने तर कमालच केली. इतके ट्रॅफिक करून काय मिळवले याने ,देव जाणे. आणि किती तो कोसळतो आहे. माझी बस तरी येईल का माहित नाही... चालत जाऊ का ... छत्री तर आहे ... नाही , नको .... चिखल झाला असेल पुढे. त्यापेक्षा वाट बघतो बस ची.... ह्म्म्म .... तीही किती वाट बघायला लावायची. जेव्हा जेव्हा भेटायचो तेव्हा तेव्हा उशीर करायची... कमीत कमी एक तास तर ठरलेला तिचा. पण आवडायचे तिची वाट बघणे. आली कि छान smile दिली कि झालं. वाट बघणे सार्थकी लागायचे. जॉबला लागल्या पासून आमचे बंद झालेलं " भेटणे ", पुन्हा सुरु झाले. पण भेटणार कधी , हा मोठा प्रश्न... कारण ठरलेल्या वेळेत घरी गेलो नाही तर घरी कळणार.... तेव्हा तर लग्न फिक्स सुद्धा झाले नव्हते. मग काय करावे , मीच आयडिया काढली मग. शनिवार , रविवार सुट्टी ... दोघांनाही....तर ऑफिसचा बहाणा करून निघायचो भटकायला. एकच ठिकाण असे नव्हते. कुठे कुठे फिरत बसायचो, हा ... पण आमच्या एरिया पासून दूर.

कधी कधी मॉल मध्ये सकाळी जायचो... तिथेच गप्पा -टप्पा , खाणे ... मग कंटाळा आला कि मॉलभर फिरणे... पाय दुखले कि पुन्हा कुठेतरी जागा पकडून पुन्हा गप्पा. तिला बोलायला जास्त आवडायचे... आता फारच कमी बोलते, तरी तेव्हा प्रचंड बडबड... मी नुसता ऐकत रहायचो आणि तिला बघत. एव्हडे बोलायची ती. ice-cream चे भारी वेड तिला .... एका वेळेस २ -२ फस्त करायची. मला थंड चालायचे नाही , खोकला होणारच ना .... तरी तिला आवडते म्हणून खायचो आणि घरी गुपचूप खोकत बसायचो..... इतके त्या ठिकाणी आणि इतका वेळ असायचो ना , कि त्या मॉल मधल्या लोकांची ओळख सुद्धा झालेली..... फिरून , खाऊन झालं कि वेळेवर निघायचो ... आणि वेळेत घरी. कधी कधी कोणतीही ट्रेन पकडायची आणि त्यात बसून दिवसभर फिरत बसायचे... तिच्या गप्पा तर कधीच संपायच्या नाहीत.... सोबत छानच होती तिची. शाळेत असताना बस आणि आता ट्रेन .... इतकाच काय तो फरक. ... पण घरी फसवून असे निघण्यात सुद्धा एक वेगळी मज्जा यायची ना !! 


ती :-   शी बाबा !! पावसाने तर कहर केला अगदी. केवढा तो उशीर .... माझा छकुला वाट बघत असेल माझी. नाहीतर बोलतोच तो कधी कधी... किती वाट बघायला लावतेस आई..... हीहीही !! .. सवयच आहे मला ती... त्यालाही अशीच वाट बघायला लावायची. पण तोच लवकर येऊन उभा राहायचा स्टेशनला. कोणी सांगायचे. मग मी आली कि कुठून यायचा काय माहित. त्याला बघून नेहमीच surprise होयाची मी. एकदा ठरवलं , त्यालाच आपण surprise देऊ. माझ्या नेहमीच्या वेळेला पोहोचले. आणि त्याला कॉल केला. मी नेहमीच्या जागी उभी न राहता , वेगळीकडे उभी होती. तो आला आणि मी दिसलीच नाही. शोधता होता कसा मला ... बघितलं ..... छान वाटलं... मनात बोलले कि जास्त वाट बघून नये अजून, कॉल करून सांगितलं , अजून कशी दिसत नाही मी तुला ... तो बोलला , नाहीच दिसत तू .... आहेस कुठे... , तेव्हा बोलले ... मागे वळून बघ... त्याने लगेच मागे वळून पाहिलं. आणि ..... !!! माझे कडे बघून तोंडाचा किती मोठा " आ " केला त्याने. full surprise !! आवडले त्याचे expression, हेच तर पाहिजे होते मला.


तो : - एकदा तर कमाल केलेली तिने , एकतर उशिरा आली आणि दुसरं , नेहमीच्या जागेवर उभीच नव्हती. आली तर बोलली मग गेली कुठे.... स्वतःच कॉल करून बोलते कशी , अजून कशी दिसत नाही तुला. पागल मुलगी !! ... मागे वळून बघ बोलली , तेव्हा येताना दिसली.... कसले भारी वाटले होते , काय सांगू.... एकदम समोर आली ना ती .... सफेद कुडता होता तो ... अजूनही आठवते.... डोळ्यावर चष्मा ... केस मागे बांधलेले... बघून वाटलंच तिला मिठीत घेऊ , पण तिला असं कोणी उगाचच touch केलेलं आवडलं नाही , माझा स्पर्श ही नाही... मिठी वगैरे सगळं लग्नानंतर... शहाणी बस मध्ये झोपायची बरोबर , माझ्या खांद्यावर... असो, तिला तसही सारेच रंग खुलून दिसायचे... किंबहुना तिच्यामुळे रंग खुलायचे. पण त्यादिवशी वाटलं मिठी मारावी तिला .... दिवसभर फिरणे झाले आणि निघताना बोललो कि एक मिठी मारू शकतो का .... नाराजीने तिने मिठी मारली , घट्ट नाही हा .... हलकीशी मिठी... मला छान वाटलं , तरी जाताना पोटात टोसा मारला होता तिने.


ती : - बस मध्ये किती वेळ अजून ... !! झोप यायला लागली. त्याची आठवण येते ना अशी ..... त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपायला छान वाटायचे. आमचे प्रेम असले तरी आमच्यात अंतर होते. जे काही करायचे , लग्न झालं कि ... मला उगाचच कोणाचा स्पर्श आवडला नाही. माझा भावाचाही !!! त्याला आधीच सांगितले होते हे... त्यामुळे आमचे प्रेम असले तरी त्याने माझ्या पासून नेहमीच एक अंतर ठेवले होते. सुरुवातीचे आमचे सेल्फी ... ते कधी बघत असायचे , तेव्हा कळायचे... actually सेल्फी नसायचा तो ... मी मोबाईलने क्लिक करायचे , तो मात्र माझ्या मागे किंवा असा शेजारी .... जवळ आलाच नाही कधी .... फोटोसाठी सुद्धा नाही... त्यादिवशी मिठी मारली तेव्हा मला आवडलं नव्हते. हे त्यालाही कळलं नंतर... सॉरी बोलला होता दुसऱ्या दिवशी.



तो : - वाट बघायला स्थायी स्वभाव तिचा. नेहमीचेच... हा ... दिवाळी पहाट ... आठवते ती .... लग्नाच्या आधीची... म्हणजे आम्ही जेव्हा लपून भेटायचो ना .. तेव्हा... घरी ऑफिसचे कारण सांगून पुन्हा निघालो.. तिची आयडिया हि... पहिल्या दिवशी फिरायला जाऊ. मी आधी निघून वेळेत पोहोचलो. हि मात्र , तयारी नाही अजून , म्हणून वाट बघ आणखी असा मेसेज केला. किती वाट बघावी माणसाने... २ तास  !! ... २ तास त्या स्टेशनवर बसलेलो. आली तेव्हा हि तसे... मला घेऊन जायला ये .... उलट सुलट प्रवास.... तरी केला. आणि २ तासाने आली. पुन्हा तेच.... समोर आली नाहीच... मागून आली. आणि आली ती काय !!!  पुन्हा डोळ्याचे पारणे फिटावे असे ...


मोरपिशी बोला किंवा निळा रंग .... त्या रंगाची साडी परिधान केलेली तिने. दागिने नव्हते जास्त तरी खुलून दिसत होती. इतकी सुंदर दिसत होती कि क्षणभर माझे हृदय थांबले असे वाटले मला. किती बघू तिला असे झालेलं... तिचे मात्र नेहमीच बडबड.... अरे दागिने नव्हते या साडीवर......  त्यात घरात अंघोळीची गडबड... तयारी करायला वेळ लागला... म्हणून उशीर ..... मला तर ते ऐकूच येतं नव्हते. तिलाच तर बघत होतो मी कधीचा... क्षणभर का होईना .... डोळ्यात पाणी आलेल... दाखवल नाही तिला.... घाम पुसण्याच्या बहाण्याने डोळे पुसून घेतले. कारण एवढे सौंदर्य कधीच पाहिले नव्हते कधी.... देवालाही हेवा वाटावं अशी ती दिसत होती तेव्हा.... माझ्याशी लग्न केले तिने हेच किती मोठी गोष्ट होती माझ्यासाठी..... तरी त्या दिवशी ... बहुतेक लोकांच्या नजरा तिच्याकडे होत्याच... कोणाला आणि किती जणांना अडवू.... माझीच नजर लागू नये असे वाटून गेले. त्यादिवशी फार कमी फिरलो... फोटो काढले... तिचेच ... माझा एकही नाही... किंवा तिला माझा लाल रंगाचा कुडता दिसला हि नसेल.... तिचे सर्व लक्ष तिच्या साडीकडे.... ती सावरण्यात.... देवळात गेलो तिथून.... गणपतीच्या देवळात... असे ऐकलं होते कि लग्न ठरण्याआधी गणपतीचे दर्शन घेऊ नये... जुळणारे लग्न तुटते.... त्यात किती खरं ते त्या गणरायाला माहीत.... आमचे तर झालेल लग्न..... देवळात गर्दी होती... दिवाळी पहाट ना ... एकच दिवस आठवण येते बहुतेक लोकांना देवाची.... असो. गर्दी होती म्हणून बाहेरच उभं राहून पाया पडली ती देवाला.... मला वाटलं तिच्या समोर नतमस्तक व्हावे .... पाया पडलो तिच्या.... पायाला हात लावून... जमलेल्या गर्दीने ते बघितले. काही लोकांच्या चेहऱ्यावर ... याला काय वेड लागले आहे का , असे भाव.... पण त्यादिवशी निश्चित ती त्या गणरायाच्या एक पाऊल पुढे होती.

ती : - वाट बघायचा तो ..... दिवाळी पहाट आठवते... २ तास पेक्षा जास्त वेळ थांबला होता तो... पण जेव्हा समोर गेले तेव्हा तर मला पाहून तोंड लपवले होते त्याने... इतक्या भावना त्याच्या चेहऱ्यावर.... माहित नाही का ... पण वाटून गेलं कि त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं. त्यानंतर तो गप्प होता आणि माझी बडबड... दिवाळी पहाट आणि गर्दी... माझी चिडचिड झाली.... तो मला छान सांभाळायचा तरी त्यावरच राग माझा.... त्यानेच मग गर्दी पासून दूर नेले. किती काळजी त्याची. माझ्या पुढे राहात होता सारखं सारखं... माझी पुढची वाट मोकळी करण्यासाठी.... ओरडली त्याच्यावर.... मागे राहून काळजी करतात .... पुढे पळून नाही.... पण नंतर कळलं होते मला ते... का करतो माझ्यासाठी... माझ्या पायावरून जाणारी bike स्वतःच पाय पुढे करून स्वतःला इजा करून घेतली. मला वाटलं होते कि मला पडतो आहे कि काय.... नंतर पाय सुजलेला त्याचा.... सांगितलं नाही त्याने तेही.

मला कोण कोण बघत होते... त्याला आवडत नव्हते ते... jealous feeling असतात ना अगदी तश्या.... हॉटेल मध्ये जेवायला गेलो तिथे सुद्धा ... एक जण बघत होता तर माझ्या मागे मेनू कार्ड घेऊन उभा कधीचा.... मी बोलले कि साधे ऑर्डर सुद्धा करता येत नाही तुला .... तिथेही चिडचिड माझी.... शहाण्याने घरी गेल्यावर सांगितलं तसा का उभा होता ते.... हा ... रिक्षाने घरी येताना .... सिंग्नल लागला होता. तेव्हा समोर एका ट्रक मध्ये बसलेला मुलगा मला बघत होता. त्याला आवडलं नाही. ऑफिसची बॅग होती सोबतीला. काय करावे त्याने.... माझ्या समोरच बॅग ठेवून दिली, जेणेकरून त्या मुलाला मी दिसू नये.... तेव्हा कळलं किती काळजी करतो माझी.... देवळात गेलो तर गर्दी... बाहेरूनच पाया पडावे तर डोळे मिटून हात जोडले देवासमोर... तर पायाला हातांचा स्पर्श झाला, बघते तर हा पाया पडतो आहे... विचारलं तर बोलला , देवी लक्ष्मी सारखी भासतेस ... म्हणून.... नंतर पुन्हा थोड्यावेळाने गर्दी कमी झाल्यावर आत जाण्यास मिळेल , तेव्हा सुद्धा मी देवाकडे बघत होते आणि हा माझ्याकडे बघून हात जोडून उभा....  गणरायाला एक फेरीही मारली तेव्हा ही माझ्या मागूनच.... काय बोलावे त्याला .... हसायला आले. तोच दिवस ..... त्यानंतर देवाकडे कधी मुद्दाम गेले असेन असे आठवत नाही.... आम्हीही एकत्र कधी गेलो नाही मग .... लग्न झाले तेव्हा गेलो होतो तेवढेच.... त्यानंतर त्या गणरायाशी अबोला धरला मी ... तो अजून पर्यंत........ !!


=========================================== to be continued



Followers