'' Hello ……Hello ……सर ...... माझा आवाज येतो आहे का ?" " हा . बोल . काय झालं '' " सर आज मला जमणार नाही office ला यायला " " का ..... काय झालं ?'' " सर , पावसामुळे train बंद आहेत,कसा येणार ?" " ठीक आहे. "
सकाळपासून १० फोन येऊन गेले ," सर , आज नाही येणार " म्हणून. कारण एकच सगळ्यांचे " पाऊस " . आज संपूर्ण office रिकामं होते. काल दुपारपासून जो पाऊस सुरु झाला होता ,तो सकाळीसुद्धा चालूच होत. सगळीकडे पाणीच पाणी होत. ट्रेन बंद होत्या,काही ठिकाणी झाड पडली होती,B.E.S.T चा सुद्धा problem होता . एकूणच वेधशाळेने मुसळधार पावसाची चेतावणी दिली असल्यामुळे बहुतेक लोकांनी घरीच थांबायचे ठरवले होते .
पण समीर मात्र office ला आला होता आणि तो सुद्धा एकटाच . पावसामुळे आज त्याचा Driver सुद्धा आला नव्हता. म्हणून आज तो स्वतः Drive करत आला होता . स्वतःची कंपनी होती त्याची आणि येवढ्या मोठ्या कंपनीचा तो Boss होता . अवघ्या २७ वर्षाचा होता तो तरीसुद्धा एकटाच एवढी मोठी कंपनी Handle करायचा .
Actually , त्याच्या पप्पांनी कंपनी सुरु केली तेव्हा ती लहान होती , पण ४ वर्षापूर्वी जेव्हा समीरनी कंपनी Join केली , तेव्हापासून त्याने कंपनीला एवढया उंचीवर आणून ठेवले कि त्याच्या पप्पांनी त्याचा विचार पण केला नसेल . समीर लहानपणापासूनच हुशार आणि ४ वर्षापूर्वी U.S.A मधून शिक्षण घेऊन तो भारतामध्ये आला , अगदी त्या दिवसापासून त्याने कंपनीसाठी काम करायला सुरुवात केली .
पण आज एक महत्त्वाची meeting होती आणि पावसाने त्यावर सगळ पाणी फिरवलं होता .
" आज माझा दिवसच खराब आहे वाटते " समीर मनातल्या मनात बोलला . काहीतरी काम करावं म्हणून त्याने P.C. चालू केला आणि ५ मिनिटातच त्याच्या पूर्ण कंपनीची वीज गेली . आता समीरला खरंच पावसाचा खूप राग आला होता . त्याला पाऊस मुळी आवडायचाच नाही .
पावसातली न होणारी काम,चिखल ,सगळीकडे ओलं ओलं ,दमट वातावरण हे त्याला नकोसं असायचं . पण या व्यतिरिक्त एक कारण होत कि त्यामुळे तो पावसाला स्वतःपासून दूर ठेवायचा. अशाचं एका पावसात जेव्हा तो 8 वर्षाचा होता,त्याची आई त्याला सोडून गेली होती. कोणालाच माहित नाही ती कूठे गेली , कोणी म्हणाला ती तिच्या गाडी बरोबर वाहून गेली ,कोणी म्हणाला तिने घराच्या tension मुळे आत्महत्या केली, तर कोणी बोलायचं कि ती अजूनही जिवंत आहे. कोणास ठावूक काय ते पण तिची गाडी मात्र नदीत सापडली होती. त्याचं आईवर खूप प्रेम होतं आणि ती अश्याप्रकारे निघून गेल्याचा त्याला लहानपणीच खूप मोठठा धक्का बसला होता. याचा परिणाम असा कि पहिलाच एकलकोंडा असलेला तो अजूनच एकटा पडला.
समीर खिडकी समोर उभा राहून बाहेर बघत होता . " पाऊस थांबला कि निघूया " असे त्याने ठरवले पण पावसाला आज थांबायचे नव्हते. असाच पाऊस पडत राहिला तर निघता येणार नाही असा विचार करून त्याने मग निघायचे ठरवले . घरी फोन लावला त्याने ,त्याच्या पप्पांना . परंतु त्याचे पप्पा घरातच नव्हते ,ते त्यांच्या दुसऱ्या बायकोबरोबर बाहेर गेले होते . Mobile सुद्धा स्विच ऑफ केला होता त्यांनी .
पहिली बायको गेल्यानंतर त्याच्या पप्पांनी अगदी एका महिन्यातच दुसरा लग्न केलं होते. समीर आईला विसरू शकत नव्हता आणि दुसऱ्या कोण्या बाईला तो आपली आई मानू शकत नव्हता. ती सुद्धा त्याचा नेहमी तिरस्कार करायची . याचा परिणाम असा समीर लहानपणीच त्याच्या नातेवाईकांपासून दूर झाला . आणि आणखीनच एकटा पडत गेला .
समीरच्या आता लक्षात आले होते कि त्याच्या mobile ची battery खूप कमी राहिली आहे . पाऊस काही कमी होत नव्हता. त्याने घरी जाण्याचा निर्णय घेतला . त्याने गाडी चालू केली आणि ती निघाला . रस्ते मात्र मोकळेच होते,पाणी साठलं होते सगळीकडे. याची गाडी मात्र सुसाट चालली होती आणि पावसाचा जोर पण वाढत चालला होता,जणू काही दोघांमध्ये स्पर्धाच लागली होती. त्याची गाडी पळतच होती. आणि अचानक……
अचानक आकाशात एक वीज चमकून गेली ,अगदी त्याचवेळेला त्याची गाडीसुद्धा बंद पडली. " आता हिला काय झालं ?". त्याने गाडी सुरु करायचा खूप प्रयत्न केला पण ती बंदच होती. आता आकाशातली वीज आणि त्याची गाडी याचा काही एक संबंध नव्हता,तरीही त्याला वाटलं कि त्या विजेमुळेच गाडी बंद पडली . आता गाडीत बसून राहण्याशिवाय त्याच्याकडे काहीच पर्याय नव्हता. त्यात भर पडली ती mobile ची battery संपली याची ." येवढा महाग mobile आहे. पण वेळेला उपयोग होत नसेल तर काय कामाचा ? "
होताच त्याचा mobile महाग . त्याच्याकडे असणाऱ्या सगळ्याच वस्तू महाग होत्या, 50,000 चा mobile , Rolex चे दीड लाखाचे watch, 10,000 चे shoe , 30,000 - 40,000 चा अंगात घातलेला suit आणि फक्त 2 कोटींची गाडी. पण या सगळ्यांचा आज काहीही उपयोग नव्हता. कारण भर पावसात तो त्याच्या बंद गाडीसह अडकून पडला होता.
असाच अर्धा तास निघून गेला. हळूहळू त्याचं डोक शांत झालं. तो आता अगदी शांत झाला होता. खूप दिवसांनी म्हणाल तर खूप महिन्यांनंतर तो असा शांत बसून होता. त्यालाही बर वाटलं. त्याचं मनही आता शांत झाला होते. काही नाही तर तो गाडीच्या बाहेर काय चाललंय ते पाहू लागला. त्याची गाडी थांबली होती तो रस्ता समुद्र किनाऱ्याला लागूनच होता. फक्त मध्ये होता तो एक लांबलचक दगडी कठडा जो समुद्र आणि रस्ता यांना वेगळा करत होता.
तेवढयात त्याला एक जोडपं पावसात भिजताना दिसलं. मस्तपैकी ते पावसाचा आनंद घेत होते. एकाच छत्री होती दोघांकडे पण छत्री असूनही ते दोघे चिंब भिजलेले होते,एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत होते. त्यांना बघून समीरला कसस झालं. त्याला त्याच्या college ची आठवण झाली. त्याचा group नाही होता पण college मध्ये एक group होता त्यात त्याला जायचे होते,पण तो जाऊ शकला नाही. त्या group मधली एक मुलगी त्याला खूप आवडायची, तिला हि तो आवडायचा. पण दोघे कधी एकमेकांबरोबर बोलले नाहीत. फक्त नजरेची भाषा चालायची दोघांमध्ये.एका पावसात मात्र ती एका आडोशाला उभी होती आणि समीर गाडीमधून घरी चालला होता,समीर बाहेर पावसात जाऊ शकत नव्हता कि तो तिला गाडीत बोलावू शकत नव्हता कारण श्रीमंती.त्याच्या पप्पांना असे काही केलेले आवडायचे नाही.ती तशीच पावसात उभी राहिली आणि समीर हताश होऊन निघून गेला.नंतर समीर higher studies साठी U.S.A. ला गेला आणि ती , तो group सगळ मागे राहिलं.
पुन्हा एकदा वीज कडालली आणि समीर भानावर आला. "त्यादिवशी जर आपण गाडीतून उतरलो असतो तर बर झालं असतं,निदान ती आता माझ्या बरबोर असती." त्याला त्याच्या तश्या वागण्याचा राग आला होता, परंतु ती वेळ तर केव्हाच निघून गेली होती.थोडंस त्याला हतबल वाटायला वाटायला लागलं होतं.ते जोडपं तर कधीच निघून गेलं होतं,पण समीरच मन तिथेच घुटमळत होतं.विचार करताकरता गाडीच्या दुसऱ्या बाजूला त्याचं लक्ष गेलं.तिथे सगळ गढूळ पाणी साठलं होतं आणि त्याच पाण्यात एक 6 -7 वर्षाचा मुलगा खेळत होता,त्याचे सगळे कपडे खराब झाले होते,चेहऱ्यावर चिखल लागला होता,तरीसुद्धा त्याला त्याची पर्वा नव्हती.तो पाण्यात खेळण्यात एकदम मग्न होता. ते बघून समीरला प्रथम किळस वाटली,पण नंतर त्याला त्याची मजा वाटायला लागली," आपण अशी मजा कधी केलीच नाही,पावसात कधी भिजलो नाही,घराच्या बाहेरच कधी पडलो नाही,माझी खेळायची जागा एकच , माझी room." स्वतःशीच तो हसला,स्वतःला किती लहान समजायला लागला होता तो त्या मुलासमोर.
लहानपणापासून तो एकटाच वेगळ्या Room मध्ये राहायचा,मोठया बंगल्यातली स्वतंत्र Room,आई - वडिलांची वेगळी Room.त्यात ते नेहमी भांडतच असायचे,लहान समीरला कितीही वाटलं तरी तो त्यांच्या Room मध्ये जात नसे. मग तो त्याच्याच room मध्ये खेळत राहायचा,अभ्यास करत राहायचा. सारखा सारखा अभ्यास ,त्यामुळे त्याला कोणी मित्र हि नव्हते.ना शाळेत ना college मध्ये. तो त्याच्या Room च्या खिडकीतून कधी कधी बाहेर बघत राहायचा,तिथे खेळणाऱ्या मुलांकडे ,त्यालाही वाटायचे त्यांच्यासोबत जाऊन खेळावे,पण तसं तो करू शकत नव्हता. त्याचं लहानपण असंच होत " एकट,एकट ".
त्या मुलाकडे बघताबघता त्याचं लक्ष त्याच्या थोडया बाजूलाच उभ्या असलेल्या एका बाईकडे गेलं. " त्याची आई असावी बहुतेक " समीर बोलला. थोड्यावेळाने तिने त्या मुलाला हाक मारून पाण्याबाहेर बोलावले पण तो कसला ऐकतोय ? त्याने तर तिच्यावर सुद्धा पाणी उडवायला सुरुवात केली होती.मग ती सुद्धा पाण्यात उतरली आणि आपल्या मुलासोबत खेळू लागली.
ते आई-मुलाचं प्रेम बघून त्याला त्याची आई आठवली. त्याचं मन एकदम भरून आलं. समीरच्या पप्पांबरोबर कितीही भांडण झाली तरीही ती समीरला कधीही दूर करायची नाही. समीरला सुद्धा वडिलांपेक्षl आईच खूप जवळ होती. ती त्याच्याबरोबर खेळायची,त्याला जेवण भरवायची, त्याच सगळ करायची. तीच तर समीर वाचून पानही नाही हलायचं. येवढं ती प्रेम करायची समीरवर. आणि सगळ्यांना ते माहित होते,तरीही ती त्याला सोडून गेली होती.
" का …… का सोडून गेलीस मला आई ? " समीर मनातल्या मनात बोलत होता. "जाताना एकदाही माझा विचार तुझा मनात आला नाही का ? " बाहेर पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या,बरसणाऱ्या प्रत्येक सरीबरोबर आईची आठवणही गडद होत जात होती. ढगांची अजूनच गर्दी होऊ लागली होती,आणि इकडे बाहेरचा पाऊस समीरच्या डोळ्यात साठू लागला होता. त्याला आता गाडीत बसून राहणं असह्य झालं होतं.
त्याला आईचं एक गाणं आठवलं, " मेघ मल्हार ". तो लहान असताना जेव्हा जेव्हा पाऊस पडायचा ,तेव्हा त्याची आई " राग मेघ मल्हार " गायची. खूप छान आवाज होता तिचा आणि त्यावेळी जरी समीरला ते कळत नसलं तरीही त्याला ते ऐकायला खूप आवडायचे. आज त्याला " मेघ मल्हार " चा अर्थ कळत होता.हळूच त्याच्या डोळ्यातून एक थेंब त्याच्या हातावर पडला अन त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळायला लागले. त्याला पाऊस बाहेर बोलावत होता. गाडीच दार त्याने उघडलं आणि तो गाडीच्या बाहेर आला. पहिला कधीच तो पावसात भिजला नव्हता,त्यामुळे त्याला खूप वेगळं वाटत होत. समोर समुद्र पण उधाणलेला होता,वर जोरात वाहत होता, समीर खूप वेगळं वाटत होता सगळं, त्याने हे कधीच अनुभवलं नव्हतं,मग त्याने समुद्राकडे बघितले व त्याच्या दिशेने चालू लागला,आईच्या गाण्याचे प्रत्येक स्वर त्याच्या कानात घुमत होते. त्याच्या महाग shoe मध्ये पाणी शिरलं म्हणून त्याने ते काढून फेकून दिले होते, त्याचा 50,000 चा mobile पाण्यात तरंगत होता, त्याचं दीड लाखाचं घडयाळ तर कधीच पाणी गेल्याने बंद पडलं होतं,त्याचा 40,000 च्या suit ला चिखल लागला होता आणि 2 कोटीच्या गाडीत आता पाणी भरू लागलं होतं,पण त्याचं त्यांकडे लक्षच नव्हतं, तो चालतच होता पावसात. वाटेत एका अणुकुचीदार दगडावर त्याचा पाय पडला , पायातून रक्त येऊ लागलं,पण त्याला त्याची पर्वा नव्हती. तो चालतच होता.
जणू काही पूर येणार होता इतकं पाणी होतं आणि समीरच्या मनात आठवणींचा पूर आला होता. चालता चालता तो किनाऱ्यापाशी आला. पायातून रक्त वाहतच होतं आणि कानात " मेघ मल्हार " घुमत होता. तिकडेच एका दगडावर बसला तो मनातील " मेघ मल्हार " ऎकत. एकटाच. पावसात. त्याला आता कसलंच tension नव्हतं, ना meeting चे , ना त्याच्या भविष्याचे आणि ना त्याच्या घरचे.
तो फक्त आता त्याचाच होत. डोळ्यातले अश्रू पावसात वाहून जात होते, जणू काही त्याची आईच त्याचे अश्रू पुसत होती. त्याने पावसाला स्वतःला समर्पित केलं होता. त्याच्या कानात घुमणारे स्वर,आता त्याच्या ओठांतून बाहेर पडू लागले होते.
भर पावसात एका उधाणलेल्या समुद्राच्या किनारी बसून तो " मेघ मल्हार " चे स्वर आळवत होता,सगळ काही विसरून. तो पाऊस त्याचा होता,फक्त आणि फक्त " त्याचा पाऊस "………