All the contents on this blog are Copyright Protected.

All the contents on this blog are Copyright Protected.

MyFreeCopyright.com Registered & Protected
Protected by Copyscape Duplicate Content Software

Saturday 28 December 2013

" वाढदिवस "............ भाग १

                     " आई..... मी देवळात जाऊन येतो गं "," थांब रे , मी पण येते ". आईने महेशला हाक मारून थांबवले. आई जवळ आली तसा त्याने लगेच वाकून आईच्या पायाला हात टेकवले."काय रे ? काय झालं ?"," विसरलीस ना तू .... आज माझा वाढदिवस ना ...... काय तू पण ना आई " तशी आई थोडीशी हसली. " आता हसायला काय झालं तुला ? " . " अरे आज तुझा वाढदिवस आहे ते लक्षात आहे माझा आणि तुझ्या बाबांना सुद्धा माहित आहे. म्हणून कालच त्यांनी केक आणून ठेवला आहे. तुला माहीतच नाही." तसा महेश खजील झाला. " Sorry " त्याने कान पकडले, " चल ..... आईला कोणी sorry बोलतं का ? बरं जा तू देवळात . मी ' यांच्या ' बरोबर जाईन नंतर "," ठीक आहे , चल येतो मी . आणि तसाच मग office ला जाईन हा." , " bye . लवकर ये संध्याकाळी." , " Bye.... येतो लवकर. "

                   महेश देवळात जाण्यासाठी निघाला. तसा तो रोज न चुकता शंकराच्या देवळात जायचा, पण आज त्याचा वाढदिवस होता ना . म्हणून आज तो जरा खूषच    होता. देव वेडा होता अगदी. त्यातूनही शंकरावर त्याची जास्तच भक्ती होती. लहानपणापासूनच तो शंकराच्या देवळात जायचा आणि नेहमी काहीतरी मागायचा . ते कधी पूर्ण व्हायचे नाही म्हणा . पण त्याला ती सवयच होती. तसा तो काही गरीब वगैरे नव्हता ,पण तो कामाला लागल्या पासून जरा चांगले दिवस आले होते घराला. एका कंपनीत तो accountant होता , junior accountant. २ वर्षे झाली होती त्याला, पण पगार काय तेवढाच होता आणि आज तो देवाकडे तेच मागायला आला होता . " अरे देवा , दोन वर्ष झाली रे मला , अजून पगार नाही वाढवत माझा . आज चांगला दिवस आहे. आज तरी त्यांना थोडी बुद्धी देशील का ? ".  

                  त्याचदिवशी पहाटे, कैलाश पर्वतावर,............लगबग सुरु होती. पहाटे पहाटेच भगवान विष्णूनी महादेवांची भेट घेण्याचे ठरवले होते आणि विष्णू लक्ष्मी बरोबर कैलाश पर्वतावर आले होते. त्यामुळे धावपळ चालू होती. झोपमोड झाल्याने कार्तिकेय तसाच कूठेतरी भटकायला गेला होता. महादेवाचा " नाग ", गणेशाचा " उंदीर ", लक्ष्मीचा " घुबड " आणि स्वतः " गणेश " पकडापकडी खेळत होते. कार्तिकेयचा " मोर " आणि भगवान विष्णू चा " गरुड " खूप दिवसांनी भेट झाली म्हणून गप्पा मारत बसले होते. महादेवाचा " नंदी " मात्र वयानी आणि आकारानेही मोठा असल्याने त्यांच्यात खेळायला जाऊ शकत नव्हता. त्यामुळे उभ्या-उभ्यानेच, पायाने माती उकरत " timepass" करत होता . भगवान महादेव आणि विष्णू काहीतरी गंभीर विषयावर चर्चा करत होते. माता लक्ष्मी आणि माता पार्वती थोडंस लांब बसून कसल्याश्या गप्पा मारत होत्या . माता पार्वतीचा " वाघ " कोणाबरोबर पटत नाही म्हणून तिच्याच पायाशी बसला होता. अस सगळ चालू होता. इतक्यात " घंटानाद " झाला. तसे सगळे चमकले. परत पुन्हा सगळे आपापल्या कामात गुंग झाले. 

" काय झालं महादेवा ? " ,
" काही नाही रे , तो माझा एक भक्त आहे. " ,
"  फक्त एक भक्त ?...... खरा आणि सच्चा भक्त. " माता पार्वती महादेवाचे वाक्य मध्येच तोडत बोलली. 
" अगं लक्ष्मी, तो " महेश " अगदी लहानपणापासून यांची मनोभावे भक्ती करतो. रोज सकाळी सकाळी यांना नमस्कार केल्याशिवाय कोणतेही काम करत नाही आणि " हे " त्याची एकही इच्छा पूर्ण करत नाहीत गं.",
" हे बरोबर नाही हा महादेवा " भगवान विष्णूनी सांगितले. 
" अरे, तो रोज काहीना काही मागत असतो माझ्याकडे आता सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करत राहलो तर कसं होणार ?", 
"अहो पण सगळ्यांच्या कूठे ? याचीच तर गोष्ट चालू आहे ना... "  माता पार्वती मध्येच म्हणाली,
" हो बाबा, कराना त्याच्या मनातली इच्छा पूर्ण ... " गणेशाने मधेच आपले म्हणणे मांडले. 
" पण मला कळत नाही आज हा नेहमीपेक्षा लवकर कसा आला आज देवळात ? ", 
" देवा, आज पृथ्वी वरील नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि आज त्याचा वाढदिवस ही आहे. " ढगातून कुठूनतरी एकदम आवाज झाला. 
" नमस्कार ब्रम्हदेव  आणि माझ्या वडिलांना आठवण करून दिल्याबद्दल आभारी सुद्धा आहे मी ." गणेशाने हात जोडून आभाळाकडे पाहत म्हटले. 
" या ब्रम्हदेवांना सगळं माहित असते हा." महादेव कुतूहलाने बोलले. 

" तर काय ठरवलं आहात महादेवा ? " भगवान विष्णूनी आठवण करून दिली. 
" ठिक आहे.ठिक आहे.आता एवढे सगळे माझ्या मागेच लागला आहात तर ठिक आहे. मी त्याची एक इच्छा पूर्ण करतो.", 
" फक्त एकच ? " गणेश बोलला.
" मग दोन " ,
" दोनच ?" माता पार्वती म्हणाली .
" मग किती ? तुम्हीच सांगा.",
" एका  दिवसातल्या सगळ्या इच्छा " भगवान विष्णूनी सांगितले. 
" नाही दोन दिवस." कितीतरी वेळाने नंदी बोलला. आणि अश्याप्रकारे सगळा गोंधळ सुरु झाला. शेवटी महादेवच बोलले ," सगळ्यांनी शांत राहा जरा. सगळ्यांनी देवासारखे शांत बसा. " हे ऐकून सगळेच महादेवाकडे आश्चर्याने बघायला  लागले. " अरे हो, विसरलोच मी. आपण " देवच " आहोत ते.",
" तर मी ठरवल आहे. आज वर्षाचा पहिला दिवस आहे,आणि पुढच्या वर्षाचा पहिला दिवस म्हणजेच त्याचा पुढचा वाढदिवस पर्यंत तो जेवढ्या इच्छा मनात मागेल त्या पूर्ण होतील." ,
" थांबा..... थांबा..... महादेव." भगवान विष्णूनी मध्येच म्हटलं,
" सगळ्याच इच्छा पूर्ण झाल्या तर कस होईल , काही वाईट सुद्धा होऊ शकते देवा ." , 
" हो ते सुद्धा बरोबर आहे.", 
" ठीक आहे." महादेव विचार करत म्हणाले ." महेशला " असं मला मनापासून वाटते " असे बोलायची सवय आहे. कधीना कधी तो त्याचा वापर वाक्यात करतोच. जर त्याने येत्या वर्षात म्हणजेच त्याच्या  पुढच्या वाढदिवसाच्या रात्री १२ पर्यंत तो जे काही मागेल तर ते पूर्ण होईल. पण वाक्याच्या शेवटी , "असं मला मनापासून वाटते " असं म्हटले तरच आणि त्याने ती इच्छा माझ्यासमोर व्यक्त केली तरच ती इच्छा पूर्ण होईल. अन्यथा नाही." यावर सगळेच खूष झाले.कोणालाच काही problem नव्हता.

" नारायण.......नारायण......." असे म्हणत नारदमुनी अवतरले. 
" अगदी perfect timing हा मुनी. " भगवान विष्णूनी लगेच म्हटलं ,
" तुम्ही कधीपासून  इंग्रजीमध्ये बोलायला लागलात." महादेवांनी  भगवान विष्णूला विचारले,
" अहो शिकावं लागते ना. आजकालचे भक्त शिकलेले असतात. बहूतेक जण इंग्लिश मध्येच काहीतरी मागतात. मग ते कळायला नको का ? ",
" बरं, नारदमुनी, इकडे कसं काय येण केलंत ? " माता पार्वतीने विचारणा केली. 
" नारायण.......नारायण.......महादेवांनी आत्ताच एक वरदान दिलं आहे एका मनुष्याला. त्या संबंधी विचारणा करण्यासाठी आलो आहे मी. Infact , पिता ब्रम्हदेवांनीच मला पाठवले आहे.", 
" त्यांनी विचारलं आहे कि त्याच्या नशिबात पुढील वर्षात होणाऱ्या गोष्टी खऱ्या होतील असं वरदान दिलंत ते नक्की का ? तसं त्याच्या नशिबाच्या वहीत ते लिहिता येईल ना.",
" हो .... हो.... खर आहे ते " , 
" नारायण.......नारायण.......ठिक आहे. मी सांगतो बरं त्यांना.  नारायण.......नारायण....... " ,
" बरं देवा निघतो मी .... नारायण.......नारायण......", 
" अहो थांबा मुनीवर " भगवान विष्णूनी नारदमुनीना थांबवत म्हटलं. " माझे सुद्धा बोलणे संपलेच आहे, मी सुद्धा निघतोच आहे. तुम्हाला मी सोडतो घरी माझ्या गरुडावरून. " असे म्हणून सगळे महादेवाचा निरोप घेऊन गेले.

( इकडे पृथ्वीवर............ महादेवाच्या मंदिरात ) 
                महेशने आपली इच्छा मागितली. " देवा माझा पगार वाढू दे." पण महादेवाने सांगितल्याप्रमाणे वाक्याच्या शेवटी " असं मला मनापासून वाटते " हे वाक्यच नाही आलं होतं. मग त्याची इच्छा कशी पूर्ण होणार… ? महेश जायला निघाला. तसं त्याला पुजारींनी थांबवत म्हटलं,
" अरे प्रसाद तरी घेऊन जा.आणि देवाला सांगतोस .... पण किती पगार पाहिजे तुला कि तुझा समाधान होईल रे. " त्याने प्रसाद घेतला आणि विचार करू लागला. देवळातच होता तो, महादेवाच्या मूर्तीसमोर. 
" आता मला १८,००० आहे. निदान २२,००० ते ३०,००० तरी व्हावा , असं मला मनापासून वाटते " सगळे योग बरोबर जुळून आले होते. महादेव नेहमी प्रमाणे डोळे मिटून बसले होते. त्यांनी ऐकले ते आणि त्यांनी " तथास्तू " असे म्हटले.
                महेश office मध्ये आला. सगळ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानी त्याचा PC चालू केला. mail box तर वाढदिवसाच्या शुभेच्छानी भरलेला होता. पण एक E-mail वेगळा होता, बॉसचा mail होता. " काय असेल E-mail मध्ये . " Mail त्याने open केला. आणि त्याला आनंदाचा मोठ्ठा धक्का बसला. Salary वाढल्याचा E-mail होता तो, त्याचा कामामुळे खूष होऊन त्याला आता senior accountant ची Post मिळाली होती आणि  salary  झाली होती " ३०,०००" . महादेवाने सांगितल्याप्रमाणे त्याची इच्छा पूर्ण झाली होती. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. " चला आज बॉसचा मूड चांगला आहे वाटते." इतक्यात त्याला बॉसने केबिनमध्ये बोलावून घेतले. " अभिनंदन महेश, आज तुझा वाढदिवस सुद्धा आहे आणि तुझी post सुद्धा वाढली आहे. पण तुझ्याकडून अजून चांगल्या कामाची अपेक्षा करतो मी ." ," हो सर, नक्कीच. मी माझ्याकडून ११०% प्रयन्त करीन प्रत्येक वेळेस." ," Good ", " सर ,आज जरा लवकर जायला मिळेल का ? " ," अरे जाना, वाढदिवसाची पार्टी आहे वाटते. "," नाही सर, घरीच जाणार आहे." ," ok . पण उद्या वेळेवर ये." 

              महेश आनंदातच होता आज,बॉस पण खूष झालेला,salary आणि post सुद्धा वाढलेली आणि त्यात घरी लवकर निघायची Permision मिळालेली. सगळं आवरून खुशीतच निघाला तो. बाहेर पडणार इतक्यात समोर दरवाजातून एक सुंदर मुलगी येताना दिसली आणि तो तसाच बघत राहिला तिच्याकडे. किती सुंदर होती ती. straight आणि shining केस आणि तसाच तजेलदार गोरा चेहरा, पाणीदार डोळे आणि चेहऱ्यावर हलकीशी smile. Perfect एकदम. बघतक्षणीच तो तिच्या प्रेमात पडला. ती तशीच त्याच्या समोरून निघून गेली. पण जाताना एक नजर त्याच्याकडे बघून गेली. तिकडेच त्याची विकेट पडली. नजरेआड होईपर्यंत तो तिच्याकडे बघत होता. " कोण होती ती कोणास ठाऊक ? पहिल्यांदा कधी बघितली नाही हिला... " विचार करतच तो बाहेर पडला . वाटेतच त्याला मंदिर लागलं तर तो पुन्हा महादेवाला " Thank  You " म्हणायला गेला. " खूप खूप आभारी आहे देवा , salary वाढली, मोठी Post भेटली , Thank  You." जायला वळणार इतक्यात त्याला " ती " आठवली ." देवा, ती कोण होती माहित नाही पण मला खूप आवडली रे ती. तिच्याबरोबर ओळख व्हावी,असं मला मनापासून वाटते " . " तथास्तू " महादेवाने पुन्हा एकदा डोळे न उघडताच म्हटलं. 

             २ जानेवारी, महेश नेहमीप्रमाणे office  मध्ये आला. " कालचा दिवस खूप चांगला होता. " मनातल्या मनात महेश म्हणाला. कामाला सुरुवात करणार इतक्यात " तीच " मुलगी पुन्हा एकदा त्याच्या समोरून गेली. तो तसाच तिला पाहत राहिला अगदी नजरेआड होईपर्यंत." मला भास तर नाही होत ना.ती फक्त मलाच दिसते ,बाकी कोणाला नाही ? " त्याने बाजूला बसणाऱ्या मित्राला विचारले ,
" ती आता गेली ती कोण होती रे. पहिलं कधी बघितले नाही तिला ." तसा तो बोलला , 
" ती होय. जास्त बघू नको तिला. नाहीतर job जाईल.", 
" का रे ?",
" अरे boss ची एकूलती एक मुलगी आहे ती. कालच आली दिल्ली वरून, office  join करणार आहे बहुतेक.", " काय ? boss ची मुलगी ?" झालं. उगाचच आपण तिला बघत होतो. जाऊदे नाहीतर boss लाथ मारून बाहेर काढेल. आणि तिचा विचार सोडून तो कामाला लागला. १५ - २० मिनिटे झाली असतील. इतक्यात boss ने त्याला केबिन मध्ये बोलावून घेतले. तसा महेश घाबरला. " आपण तिच्याकडे बघत होतो,त्याची complaint केली असेल तिने, गेला job,काल post वाढली आणि आज office च्या बाहेर." तो स्वतःच्याच विचारात गुंतला होता. पुन्हा एकदा boss ने त्याला बोलावले. "आता तर जावेच लागणार". म्हणत तो केबिन मध्ये गेला . 

" बस. महेश बस " तसा महेश बसला. 
" meet my daughter उमा "असे म्हणत boss नी त्याची आणि तिची ओळख करून दिली. तसा त्याला सुखद धक्का बसला. तिनेही त्याला " Hi " केलं. 
"बरं.... तुमची ओळख झाली असेल तर मी पुढे बोलतो. " ,
" उमा आताच " दिल्ली " तून तिचा graduation पूर्ण करून आली आहे. आणि तिला आपली कंपनी join करायची होती. नुकतीच junior accountant ची post रिकामी झाली आहे. आणि तिला accounts मधले काही बारकावे शिकायचे आहेत. तर तुझ्या हाताखाली ती चांगली शिकेल असं मला वाटते. आज पासून उमा तुझ्या हाताखाली "training" घेईल. " केवढा मोठा सुखद धक्का. महादेवाने त्याची अजून एक इच्छा पूर्ण केली. " हर हर महादेव..... "


-----------------------------------------------to be continued---------------------------------------

Saturday 14 December 2013

" स्वप्न "

लहानपणी स्वप्नांच्या मागे रांगत रांगत गेलो,
                        पण , पहिलं पाऊल कूठे टाकलं हेच विसरून गेलो.


पावलं तेव्हा थोडी नाजूकच होती , स्वप्नही थोडी धुरकट होती,
                        तरीही मी रांगतच होतो, धुरकट स्वप्न वेचत होतो ,
रांगता रांगता पायावर उभे राहायचे हे समजून गेलो,
                        पण , पहिलं पाऊल कूठे टाकलं हेच विसरून गेलो.

उभे राहिल्यावर माझे जग अजून विस्तारायला लागले ,
                        जे प्रथम बघू शकत नव्हतो ,ते आता दिसायला लागले,
उभे राहिल्यावर चालायला सुद्धा पाहिजे हे मी शिकलो,
                        पण , पहिलं पाऊल कूठे टाकलं हेच विसरून गेलो.

चालता चालता अनेक स्वप्न जवळ येतात हे मला समजले,
                        पण स्वप्न कशी मिळवायची हेच मला नाही उलगडले,
त्यांच्या मागे धावल्यावर स्वप्न मिळवता येतात हे मी समजलो,
                        पण , पहिलं पाऊल कूठे टाकलं हेच विसरून गेलो.

धावल्यावर मात्र अनेक स्वप्न मिळवत गेलो ,
                        काही लहान स्वप्न तशीच पायाखाली चिरडत गेलो,
धावण्यापेक्षा स्वतःच्या मेहनतीवर स्वप्न पूर्ण करत गेलो,
                        पण , पहिलं पाऊल कूठे टाकलं हेच विसरून गेलो.

जशी स्वप्न पूर्ण होत गेली तश्या अपेक्षाही वाढल्या,  
                       परंतु मनात आता कोणत्याही भावना नाही राहिल्या,
फक्त स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यासच मनात ठेवत गेलो.
                        पण , पहिलं पाऊल कूठे टाकलं हेच विसरून गेलो.

जसा मोठा होत गेलो, तशी स्वप्नही मोठी झाली ,
                        स्वप्नही हाताच्या ओंजळी बाहेर सांडू लागली,
स्वप्न मिळवण्यासाठी ओंजळ मोठी करत गेलो ,
                        पण , पहिलं पाऊल कूठे टाकलं हेच विसरून गेलो.

स्वप्नांच्या मागे धावता धावता अनेक मित्र , नाती मागे सोडून गेलो ,
                        सांगायचेच झाले तर " माणुसकीच  " विसरून गेलो,
आता , जरा थांबायाला पाहिजे हे मी समजून गेलो,
                        पण , कूठे थांबायचे हेच विसरून गेलो.  

वय झाल्यावर स्वप्न पुन्हा धुरकट झाली,
                       काही तर आभाळाच्याही पलीकडे निघून गेली,
अंगात ताकद नसली तरीही मनात अजूनही होती,
                       पण स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणाचीच सोबत नव्हती,

थांबल्यावर मात्र थोडं मागे वळून बघायचे असते हे मी समजलो,
तेव्हा लक्षात आले,
"अरेच्या..... शेवटी , कधी मनापासून जीवन " जगलो " होतो हेच विसरून गेलो . "                   

Tuesday 5 November 2013

" The Original Love Story" ( Part 2)

                      " सुची भेटलेली ...... ? पुण्याला ..... ? " थोडावेळ विनू तसाच उभा होता गोंधळलेला , काहीच कळलं नाही त्याला , अचानक एक वीज कडाडली , तसा विनू दचकला . ,
" बापरे , किती मोठयाने वीज कडाडली , पडली असेल कूठेतरी नक्कीच . " विनू भानावर आला .
" आपण फोन घेऊन कशाला उभे आहोत ? खरंच फोन आलेला की भास झाला ? " काहीच समजत नव्हतं. अश्यातच १० मिनिटं गेली , फोन काही वाजला नाही, " आपल्याला भासच झाला असणार ." असं बोलून तो पुन्हा बाल्कनीत आला.
                        थोडयावेळाने पुन्हा फोन वाजला , " hello , .......  अरे आहेस का विनू . " , " हो ..... हो … आहे , बोल बोल , मला वाटलं भास झाला मला .",
"अरे माझ्या फोन चा problem आहे रे म्हणून कट् झाला." ,
" अरे तू काही तरी सांगत होतास ना.. ",
"अरे ...... आपली सुची भेटली होती पुण्याला... ",
"कोण ? " ,
" अरे ' सुची ' .... आपली .... तुझी ' सुची '. " पुन्हा एकदा वीज कडाडली ..... आणि शांतात ... सगळं शांत झालेलं ,..... " Hello ..... Hello ..... ." विनू फोन पकडून तसाच उभा होता . कूठेतरी हरवून गेलेला ,
" Hello ..... Hello ..... .विनू ... विन्या " ,
 " खरंच भेटली होती का रे ती ?" विनू पुन्हा भानावर आला .
" कशी आहे रे ती ? ",
" छान आहे पहिल्यासारखीच , विचारात होती सगळ्यांना .... आणि तूलाही विचारला तिने , विनू कसा आहे म्हणून ." टचकन पाणी आलं त्याच्या डोळ्यात," अजूनही लक्षात आहे मी तिच्या ." विनू मनातल्या मनात बोलला.
" जास्त काही बोलली नाही , घाईत होती , मी तूझा फोन नंबर दिला आहे , करेल बोलली फोन तुला . " आणि फोन पुन्हा कट्ट झाला. " सुची भेटली होती ,माझी सुची " विनूला विश्वासच बसत नव्हता, पण सुची कधी फोन करणार हे तो बोललाच नाही . मग विनू त्याला फोन करायला लागला. त्याचा फोन तर बंदच होता , खूप वेळा "try " केला पण व्यर्थ. थोडयावेळाने विनू शांत बसला, रात्री चे १२. ३०  वाजले होते. इतक्यात फोन वाजला " बर झाले , याने call केला परत." पण अनोळखी नंबर होता .
" Hello .... Hello .... अरे बोल ना .... " पलिकडून काही आवाज आला नाही . फोन तर चालू होता .
 " Hello .... विनू " हळूच आवाज आला फोन मधून , तो आवाज ऐकून विनू स्तब्ध झाला . सहा वर्षानंतर त्याने तो आवाज ऐकला होता.
 "Hello .... विनू ... आहेस ना रे ... ओळखलंस का मला ?",
" तूला कसं विसरणार " ,
" कसा आहेस ? ",
" ठीक आहे , तू कशी आहेस ?" ,
" बरी आहे . " आणि दोघेही गप्प . खूप वेळ दोघेही काहीही बोलले नाहीत .
एकदम विनू बोलला ," मला तुला भेटायचं आहे , कधी भेटशील ?" ,
" मलाही भेटायचं आहे तुला, मी सध्या पुण्यात आहे , येशील का पुण्याला ?",
" येईन ना , कधी आणि कुठे ते सांग ?",
" पुणे स्टेशनलाच भेटूया . उदया येशील स्टेशनला , सकाळी ११ वाजता .",
" आणि १ नंबर platform च्या शेवटला एक लाकडी बाक आहे, तिथे भेटूया " असे बोलून तिने फोन ठेवून दिला. विनूला तर आपण सुची बरोबर बोललो हे खरंच वाटत नव्हता. तेवढयात त्याला आठवलं उदया पुण्याला जायचे आहे , गाडीची वेळ बघितली पाहिजे,  Net वर त्याने वेळ बघितली .सकाळी ६ ची गाडी होती , मुंबईवरून. " बस्स , हीच गाडी पकडायची आणि सुची ला भेटायला जायचं ." खूप खुश होता तो. कूठलातरी मोठा खजिनाच हाती लागला होता जणू काही.

                   उदया सकाळी ६ वाजता जायचे होते , पण त्याला झोप येईल तर शप्पत. ' सूची' ला भेटणार या आनंदात त्याला झोपच लागत नव्हती. झोप येत नाही म्हणून त्याने त्याची जुनी bag उघडली. त्यात सर्व जुन्या गोष्टी होत्या त्यात,आठवणीच त्याच्या. college च्या वस्तू, सुचीने दिलेल्या. तो त्या बघत बसला. त्याची जुनी डायरी सुद्धा होती, त्यात तो दिवसाच्या महत्वाच्या गोष्टी लिहून ठेवायचा. डायरी उघडून वाचू लागला तो , खूप काही गोष्टी होत्या त्यात, मोगऱ्याचं एक सुकलेलं फूलही होतं त्यात. " सुचीला मोगरा खूप आवडायचा ना ..... " एकदा तिच्या डोक्यातील फूल विनूने गुपचूप काढून त्याच्या डायरीत ठेवलं होतं. तिला तर ते कळलचं नव्हता, किती मज्जा करायचो आम्ही college मध्ये , विनू रमून गेला आठवणीत. एका पानावर सुचीने गाणं लिहून ठेवलं होतं, किती छान अक्षर होतं तिचं. गाण्यावरून त्याला आठवलं.

                त्याचा group सर्वात आधी वर्गात येऊन बसायचा. अगदी एक तास अगोदर,मग यांची गाणी सुरु व्हायची. Group ने प्रत्येकाला एक गाणं ठरवलं होतं. मग तो किवा ती उशिरा आली कि ते गाणं सगळा group म्हणायचे. तसं विनू आणि सुचीला सुद्धा गाणं ठरलं होतं पण ती दोघं एकमेकांसाठीच गाणी म्हणायचे," तुम आये तो आया मुझे याद , गली मे आज चांद निकाला " हे गाणं विनू म्हणायचा सुची साठी आणि " ये लडका हे दिवाना दिवाना " गाण विनू साठी निवडलं होतं सुची ने. सुचीला ते गाणं  आवडायचं , त्याही पेक्षा ते गाणं विनू तिच्यासाठी म्हणतो आहे हे जास्त आवडायचे. म्हणून कधी कधी ती मुद्दाम उशिरा यायची वर्गात. अर्थात विनूलाही ते माहित होतं , Infact , सगळ्या group ला माहित होतं. विनूला हसायला आलं, किती दिवसानंतर तो हसला होता मनापासून. पुढे पान उलटच गेला तर त्याला एक फोटो सापडला , group फोटो . केवढा group होता त्यांचा ४० जणांचा, नाही ३९ जणांचा. एक जण नंतर सोडून गेलेला. ते सुद्धा त्याला आठवलं, " जगदीश नाव होतं त्याचं , हो ...... आम्ही सगळे त्याला ' जग्गू ' म्हणायचो " तसा तो चांगला होता, पण त्याला एक वाईट सवय होती. कोणाचीही मस्करी करायचा तो , त्याला विनूने खूप वेळा समजावलं होतं, तो काही ऐकलं नाही.
                 त्याने एकदा सुचीची मस्करी केली. ते काही विनूला आवडला नव्हता, परंतु मित्र असल्याने तो काही बोलला नव्हता. पुन्हा एकदा त्याने सुचीची मस्करी केली तेव्हा विनूला राग आला, रागाच्या भरातच तो जगदीशला बोलला,"उद्यापासून तू आमच्यात राहणार नाहीस. समजलं .... ?", " अरे, एका मुलीवरून तू मला group बाहेर काढतोस? काय मोठ्ठी शहाणी लागून गेली वाटते ती ." असं  तो बोलला आणि ''खाड्....... " कसली थोबाडीत मारली विनूने त्याच्या. इतका जोर होता त्यात की त्याचा ओठ फुटून रक्त आलं , एक दातही पडला. विनूचा तो पवित्र बघून जगदीश पळून गेला. तो नंतर काही त्यांच्या समोर कधीच आला नाही.

               विनूच्या अंगात किती ताकद आहे हे सगळ्यांनी पाहिलं, सुचीने सुद्धा. हा आपल्यासाठी काहीही करू शकतो , हे तिला कळल, पण तिला हे बरोबर नाही असं वाटलं. तिने विनूला शप्पत घेण्यास सांगितली , " आज पासून मी कोणावर हात उगारणार नाही, कोणावर रागावणार नाही,राग मनातल्या मनात ठेवीन , कोणालाही त्या बद्दल सांगणार नाही " असे मोठ्ठे वचन विनूने सुचीला दिले आणि अजूनही तो ते वचन पाळत होता. आठवणीतून बाहेर आल्यावर विनूला कळल की सकाळचे ५ वाजले आहेत,झोपालाच नाही तो . गेली ६ वर्ष विनू 'शांत ' असा कधी झोपलाच नव्हता, रात्री अधून मधून त्याला जाग यायची, मग तसाच तो विचार करत राहायचा. त्याने पटापट तयारी केली आणि ६ ची गाडी पकडली. गाडी सुद्धा वेळेवर निघाली,त्यात त्याला आठवलं, आपण काही " Gift " नाही घेतलं सुची साठी. तरीही तिला कूठे  " Gift " आवडायची .
           
               मुंबईवरून गाडी निघाली तेव्हा आभाळ मोकळेच होते, जेव्हा गाडी पुण्याला पोहचत होती तेव्हा मात्र आभाळ जरा कांडवळलेला होतं, विनूला जरा भीतीच वाटली ," पुन्हा पाऊस . आज तरी नको यायला हवं तू ? " . विनू वेळेच्या आधीच पोहोचला ठरल्या जागी. " अरे आपण तिचा mobile no घ्यायला पाहिजे होता. तिला फोन लावला असता आता ? " १० . ३० वाजत होते सकाळचे. पाऊस धरलेला. सुट्टीचा दिवस असल्याने स्टेशन वर सुद्धा गर्दी नव्हती, मग विनू आजुबाजूच न्याहाळत बसला. अगदी platform संपतो तिकडचा बाक,तिथे फारसं कोणी नसायचं तरीही जागा स्वच्छ होती. पावसाळा सुरु झालेलाच होता, त्यामुळे सगळीकडे रानटी झाडं उगवली होती आणि त्यावर रानटी फुलं ..... नावं नव्हतं त्यांना ,निव्वळ रानटी फुलं . वाऱ्याने डोलत होती , वर आभाळ कांडवळलेला सकाळपासून . थंड बोचरा वारा . आसपास कोणीच नाही . मन अस्वस्थ करणार वातावरण अगदी.

                  ११ वाजत आले होते. सुची  कधीही येईल आता. भयाण शांतता पसरली होती सगळीकडे. त्यातच विनूच्या कानावर एक गाणं आलं , " कूठेतरी एका चहाच्या टपरीच्या  radio वर गाणं लागलं असावं बहूतेक , " Jab We Met "  सिनेमातलं , " आओगे  जब तुम ओ सजना अंगना फूल खिलेंगे , बरसेगा सावन.... बरसेगा सावन झूम झूम के दो दिल ऐसे मिलेंगे " किती छान गाणं होतं  ते. पावसाला सुद्धा सुरुवात झालेली आणि दुरून त्याला कोणीतरी येताना दिसलं ," सुची ...... ?" सुचीच होती ती. अगदी त्या गाण्याप्रमाणे होते सगळं तिथे. ती आली तेव्हा फुलं उमलली होती, पाऊस पडत होता आणि विनूच्या डोळ्यात पाणी दाटलं होतं. ६ वर्ष..... ६ वर्ष त्याने वाट पाहिली होती तिची. कसा जगला होता तो त्या काळात हे कोणालाच समजणार नव्हतं.

                  सुची आली त्याच्या समोर, काय बोलावं हे त्याला कळतच नव्हतं. अगदी तसीच होती ती अजून, जशी college मध्ये असायची. पण चेहऱ्यावरचं तेज कूठेतरी हरवलं होतं तिच्या. तिनेच विनूला " बस्स " असं सांगितला, तसे दोघेही बसले. पुन्हा शांतता, विनू तिच्याकडे कधीचा बघत बसला होता,सुची मात्र पावसाकडे बघत होती . खूप आवडायचा तिला पाऊस .

" अजूनही भिजतोस का रे पावसात ? " सुचीचा पहिला प्रश्न विनूसाठी . तसा विनू जागा झाला. त्या प्रश्नावर त्याला हसायला आलं,पण त्याने ते दाखवलं नाही ,
" हो कधी कधीच.... कामातून वेळ मिळत नाही आता." खोटंच बोलला तो, नेहमी पावसात भिजायचा तो , तिच्यासाठी.
 " कविता , " Love story " लिहितोस का अजून ?",
 " नाही ग , वेळच नसतो हल्ली, कधीच सोडून दिलं लेखन ".
पुन्हा शांतता. आता दोघेही पावसाला पाहत बसले होते.
" तुला एक विचारू का ?" ,विनूने प्रश्न केला. तिने मानेनेच नकार दिला.
" मला माहित आहे तू काय विचारणार आहेस ते ?",
" मग सांग मला , का सोडून गेलीस मला , एकट्याला टाकून .?" ती काहीच बोलली नाही .
" तुला माझी शप्पत आहे, सांग मला, का सोडून गेलीस ?",
" नाही सांगू शकत .",
" मला कळलं आता,तेव्हाही मी तुझा कोणी नव्हतो आणि आजही नाही आहे "असं म्हणून तो निघून जाऊ लागला, तसं सूचीने हात पकडून त्याला थांबवलं ,
" बस्स , सांगते.",
" मला तुला ते सांगायचे नव्हते .",
" तरीही सांग मला, काय झालं ते .",
" बर ऎक.........  ७ जूनला रात्री खरेदी करून मी घरी येत होते , नेहमीचा रस्ता असल्याने एकटीच होते मी , अचानक ३-४ जणांचा घोळका माझा समोर आला,दारूच्या नशेत होते सगळे . मी बाजूला जाण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी मला जाऊ दिले नाही. एकटीच होते ना तिथे . त्यांचा प्रतिकार केला मी , काहीही फायदा झाला नाही. खूप ओरडले, त्यांना मारलं मी, काहीच जमलं नाही मला. त्यांची विनवणी केली मी , नाही ऎकले माझं त्यांनी, काहीच नाही राहिलं माझ्याकडे रे.सगळं लुटून नेलं त्यांनी माझं....... ,दागिने, पैसे आणि ..... माझी अब्रू " विनू स्तब्ध होऊन ऎकत होता. त्याचं मन भरून आलं होत , सुची मात्र निर्विकार पणे सांगत होती.

" तशीच मी घरी आले,धडपडत ,जखमी. घरी आई - वडील चिंतेत. त्यांनाही कळली माझी अवस्था,तसंच मला हॉस्पिटल मध्ये admit केलं. पोलिसात तक्रार केली तर पोलिसांनी त्याचा पुरावा मागितला, काय करणार होते मी. लाज वाटत होती मला सगळ्यांसमोर यायची,लाज वाटत होती घराबाहेर यायची, माझ्या आई-वडिलांना सुद्धा. " ,

"त्यांनीच निर्णय घेतला मुंबई सोडून जाण्याचा. रात्रीच्या रात्री सगळे गेलो , साताऱ्याला. १० जूनच्या रात्री. " ,
 " एवढं सगळं झालं आणि तुला एकदाही मला सांगावसं वाटलं नाही.",
" तुझ्या समोर यायची हिंमत झाली नाही माझी ",
" एवढाही विश्वास नव्हता माझ्या वर, हेच ओळखलंस का मला ." पुन्हा एकदा शांतता. पाऊस आता मुसळधार कोसळू लागला होता. सुची तशीच पावसाकडे पाहत बसली होती, कोणतेच भाव तिच्या चेहऱ्यावर नव्हते. नेहमी हसत असणारी आज कोमेजलेल्या फुलासारखी दिसत होती.

" लग्न करशील माझ्याशी ? " विनूने सुचीला विचारलं तेव्हाही सुचीने मानेनेच " नाही" म्हटलं .
" माझं लग्न ठरलं आहे, लग्नासाठीच मी पुण्याला आली आहे." आणि एकदम वीज चमकून गेली. विनूला काय बोलावं तेच कळत नव्हतं. " साताऱ्याला गेल्यावर सगळं नव्याने सुरु करावं लागलं. त्यातच बाबांना 'paralysis' चा झटका आला, अर्ध शरीर लूळ पडलं. मग माझ्याकडे job करण्यावाचून पर्याय नव्हता. तिकडे एका call center मध्ये job ला लागली. त्या पगारात बाबांची औषधं,घरचा खर्च  कसाबसा भागायचा. माझी परिस्थिती माझ्या Boss ला कळली, त्याला माझी दया आली. त्याने मला खूप मदत केली. बाबांची औषधं, त्यांचे operation, सगळं त्याच्यामूळे शक्य झालं. घरची परिस्थिती सुद्धा सुधारली. आणि ३ महिन्यापूर्वी त्याने मला लग्नासाठी विचारलं, तुझ्या एवढाच आहे तो,जवळपास तुझ्यासारखाच. एवढे माझ्यावर उपकार  केले त्याने . मी त्याला " नकार " देऊ शकले नाही. माझ्यावर काय प्रसंग झाला होता ते माहित असूनसुद्धा त्याने मला स्वीकारलं, त्याच्या कुटुंबाने स्वीकारलं. अजून काय पाहिजे होतं मला ?",
" तू खुश आहेस ना ? .",
" आहे ना. माझ्या कडे बघून तुला वाटत नाही.",
" नाही." विनू बोलला, तशी सुची शांत झाली.
" लग्नाला येशील माझ्या, माझ्या कुटुंबाकडून " विनूने मानेनेच " हो " म्हटलं." नावं काय आहे त्याचं ?",
" यशराज",    
" ok, चल मी निघतो आता " असं म्हणून विनू निघू लागला. थोडा पुढे गेल्यावर सुचीने विनूला हाक मारली,तसा विनू थांबला.
" घरी येतोस,आई-बाबांना बरं वाटेल." विनू तयार झाला. पाऊस तसाच कोसळत होता,विनू सुचीच्या घरी आला. बाबांना बघून त्याला वाईट वाटले,झोपले होते ते तेव्हा. सुचीच्या आईने विनूला ओळखलं ,किती आनंद झाला तिला. पण विनूला जास्त वेळ तिथे थांबवलं नाही. निघताना त्याने सुचीच्या आईला mobile no देऊन ठेवला," काहीही गरज वाटली तर मला फोन करा." असं सांगितलं त्याने. तो निघाला , तीही त्याच्या मागून आली. " तू जा आता. निघतो मी. येईन तुझ्या लग्नाला मी, पत्रिका घेतली आहे. जा तू." सुचीने पुन्हा त्याला अडवलं ," एक शेवटचा प्रश्न विचारू ?"," विचार ." ,"तू पुन्हा कोणावर प्रेम करू शकशील का ?". त्यावर विनूकडे काहीच उत्तर नव्हते. उत्तर न देता तो तसाच निघाला भर पावसात. college मध्ये एक वाक्य famous होतं ," विनू कभी हारता नाही ".  तसाच होता तो,तो कूठल्याच गोष्टीत हार मानायचा नाही. जे काम हातात घेईल ते पूर्णच करायचा. त्याला हार कधी माहीतच नव्हती. पण आज तो हरला होता, नशिबाने त्याला हरवले होते. आज तो " Looser" ठरला होता.

                             विनूने लागलीच मुंबईला येणारी गाडी पकडली आणि तो मुंबईला आला. काहीच हाती नाही लागलं त्याच्या. घरी येऊन बसला. काहीच झालं नाही जणूकाही. दोन दिवस असेच गेले. विनू दोन्ही दिवशी कामाला गेला. नेहमीची कामं केली. नेहमीचं रुटीन सुरु झालं. " सुचीच्या लग्नाला अजून आठवडा बाकी आहे. काहीतरी घेऊया तिच्यासाठी." म्हणून तो बाहेर निघत होता. इतक्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली , तसा तो थांबला. संध्याकाळचे ४. ३० वाजले होते तरीही पावसामुळे रात्रीसारखं वाटत होतं. तेव्हढ्यात त्याचा फोन वाजला, अनोळखी नंबर होता,

" Hello........Hello.....विनू ...... विनूच आहे ना फोन वर.. " ,
" हो.. विनूच आहे,आपण कोण ?",
"मी सुचीची आई बोलतेय रे ",
" हा बोला आई, पण तुमचा आवाज असा का येतोय ? काय झालं ",
" अरे ..... सुचीचा accident झालाय. लवकर ये..... "  हे ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तरीसुद्धा सावरून तो बोलला ," कूठे आहे आता ती ... मला सांगा मी येतो ."," अरे मुंबईलाच आहे, टाटा हॉस्पिटल मध्ये, तू लवकर ये . मला खूप भीती वाटते आहे ." तसा विनू धावतच निघाला, धावता धावता अडखळून पडला, डोक्याला लागलं,पण त्याला त्याची पर्वा नव्हती. तो पोहोचला हॉस्पिटल मध्ये, सुचीची आई रडत होती. विनूला बघितल्यावर त्याच्याकडे धावत आली. विनूने त्यांना शांत केलं. सुची कूठे आहे ते विचारलं . तिला I.C.U. मध्ये ठेवलं होतं. तो तिला बघत होता काचेच्या दरवाजातून.
 
                " कसं झालं असं ?" विनू ने तिच्या आईला विचारलं. यशराज ने ठरवलं कि कुटुंबासोबत मुंबई फिरायला जायचं, तशी त्याने गाडी बाहेर काढली. सुची नको म्हणत असताना सुद्धा ते भर पावसात निघाले. गाडीत यश , सुची आणि यशचे आई-वडील होते. मुंबई-पुणे महामार्ग तसा चांगला पण पावसामुळे निसरडा झालेला. तरी यशराज गाडी हळू चालवत होता. मागून येणाऱ्या ट्रकने overtake करण्याच्या नादात यशच्या गाडीला धडक दिली. धडक हळू असली तरीही निसरड्या रस्त्यामुळे गाडी out of control झाली आणि मोठ्ठा अपघात झाला. त्या अपघातात यश आणि त्याचे आई-वडील जागीच गतप्राण झाले. एकटी सुची तेवढी वाचली. मुंबई जवळ असल्याने पोलिसांनी तिला मुंबई मध्ये admit केला व सुचीच्या आईला कळवलं. सुची वाचली होती पण प्रचंड जखमी झाली होती. " पुढचे २४ तास खूप महत्त्वाचे आहेत " असे डॉक्टर विनूला बोलले. विनू सुचीच्या बाजूला जाऊन बसला, ती शुद्धीत नव्हती. खूप critical होती ती. डॉक्टर काही सांगतील ते विनू लगेच घेऊन यायचा, नुसता धावतच होता तो. तिच्या तब्येतीत काहीच फरक नव्हता. एक दिवस असाच गेला, विनूने काहीही खाल्लेलं नव्हता की त्याने आराम केला होता. तिची तब्येत तशीच होती. दोन दिवस झाले, तसंच सगळं, विनूची झोप कूठल्याकूठे पळाली होती. पोटात काही नाही. सुचीच्या आईला ते कसस वाटत होतं. शेवटी विनूला " सुची " ची शप्पत घातली तेव्हा त्याने कूठे थोडीशी पोळी-भाजी खाल्ली. " जा. थोडावेळ पड जरासा. " आईने त्याला सांगितलं. गेले ४८ तास तो झोपलाच नव्हता.

                                      बाजूलाच एका बेंच वर झोपणार, इतक्यात डॉक्टरने त्याला बोलावून घेतले. " तुझं नावं घेते आहे ती. जा तिच्याजवळ. " विनूला जणू काही कळून चुकलं. तो त्यावेळेला एका खिडकी समोर उभा होता. बाहेर पाहिलं त्याने. पावसाने पुन्हा मुसळधार सुरुवात केलेली." यावेळी तरी माझ्यापासून दूर नको नेऊस तिला " विनूने पावसाला सांगितले. तिकडे सुचीची आई रडत होती. डॉक्टरने नातेवाईकांना बोलावयास सांगितले. विनू तिच्या जवळ जाऊन बसला. सुचीने त्याला ओळखलं होतं, किती छान हसली ती आज,अगदी मोगऱ्याच्या फुलाप्रमाणे. विनूने तिचं डोकं त्याच्या मांडीवर घेतलं. सुचीलाही ते बरं वाटलं. तिला काहीतरी बोलायचे होते,तसा विनूने कान जवळ केला. " पुढच्या वेळी नक्की भेटू " असे ती बोलली. विनूनेही " नक्की " म्हटलं. अलगद तिने डोळे मिटले, कायमचे. पाऊसही थांबला होता. यावेळीही त्याने डाव साधला होता, यावेळीही सुचीला तो बरोबर घेऊन गेला होता, पण यावेळी कायमचाच. विनू बाहेर आला, डॉक्टरने तिला check केला, ती केव्हाच सोडून गेलेली. तिचे नातेवाईक येणार होते. विनूने तिच्या आईला " निघतो मी " असं सांगितल आणि तो निघून आला. पाऊस आता पूर्णपणे थांबला होता.

                                  विनू घरी आला. ४८ तासांपेक्षा जास्त वेळ झाला होता, विनू झोपला नव्हता. तो घरी आला तेव्हा संध्याकाळचे ५ वाजले होते, तसाच तो बेड वर जाऊन पडला. पडल्या पडल्या झोप लागली त्याला. शांत झोप. ६ वर्षांनी तो आज शांत झोपलेला. शांत ...... अगदी शांत.………………………… कसल्याश्या आवाजाने त्याला जाग आली तेव्हा रात्रीचे ९ वाजले होते. अगदी शांत वाटत होतं त्याला. नुकताच पाऊस पडून गेलेला, छान थंडावा आला होता बाहेर. विनूचे मनही शांत झालं होतं अगदी , गेली ६ वर्ष एक वादळ त्याच्या मनात घोंघावत होतं, ते आज शांत झालं होतं, शमलं होतं. आज एकदम fresh वाटतं होतं त्याला. एक कप चहा घ्यावासा वाटला त्याला. तसा gas वर त्याने चहा करत ठेवला. अचानक त्याला काही लिहावसं वाटलं. इतक्या वर्षात पहिल्यांदा. विनूने त्याची जुनी वही काढली. त्यात तो त्याच्या कविता , " Love story " लिहायचा. टेबलावर बसला लिहायला. त्याला एक नवीन स्टोरी मिळाली होती , त्याची Love story . त्याने लिहिलेल्या प्रत्येक Love story , शेवटी पूर्ण व्हायच्या, एक त्याचीच Love story अर्धवट राहिली होती. त्याने शिर्षक लिहिलं ," The Original Love story " . पुढे काही लिहिणार, इतक्यात जोरदार विजेचा आवाज झाला आणि पावसाला सुरुवात झाली. सवयीप्रमाणे विनुचे मन त्याला पुन्हा पावसात घेऊन गेलं. इतक्या वर्षांची सवय थोडीच जाणार होती . तसाच तो उठून बाहेर आला पावसात.

                                    Gas वरचा चहा निवांतपणे उकळत होता, त्याची Love Story त्या नावावरच लिहायची थांबली होती , पंखा उगाचच गरगर फिरत होता. आणि विनू कूठे होता,......... तो तर कधीच बाहेर पडला होता पावसात भिजायला. पुन्हा एकदा  " सुची " ला शोधायला. ती तर केव्हाच निघून गेलेली, पण त्याचं मन मात्र तयार होतं नव्हतं. म्हणून तो पावासात भिजत होता. कोणाचीतरी वाट  बघत. ........ कदाचीत , यंदाच्या पावसाळ्यात तरी , ...... कधीतरी …… भेटेल ती मला.................... कदाचीत ...........................


                                                                                     ( THE END)...............................

Monday 28 October 2013

" The Original Love Story" (Part 1)"

" अरे .... विनू ?...... अजून घरी नाही गेलास ? ", 
" हो. निघतोच आहे सर आता.",
" OK. पण लवकर घरी जा आणि सांभाळून जा.",
"असं .. का सर ?",
"अरे , बाहेर बघितलास का ? पाऊस सुरु होणार आहे म्हणून बोललो." 
"पाऊस ?.... आता ?" 
" कुठे हरवलेला असतोस कळत नाही. आज तारीख किती आहे माहित नाही वाटते ?",
" नाही सर . खरंच नाही माहित ", 
"अरे माणसा, आज ७ तारीख, ७ जून . आज पावसाची सुरवात होते , एवढं तरी माहित आहे ना ? " त्यावर विनू काही बोललाच नाही. पुढे सर बोलले ," चल निघ लवकर . पाऊस बघ किती धरलाय, कधीही सुरवात होईल . छत्री आहे ना?. " पण विनू कुठेतरी दुसरीकडेच हरवला होता. सरांच्या ते लक्षात आले, ते मनात बोलले ," जाऊ दे . हा काय माझ्याकडे लक्ष देणार नाही,त्यापेक्षा मीच जातो,राहू दे त्याला एकट्याला.  " आणि त्याचे सर निघून गेले. विनू मात्र तसाच उभा होता. 

                एका थंड हवेच्या झोताने त्याच्या office ची एक खिडकी उघडली  आणि पूर्ण office मध्ये छानसा थंडावा आला. तो थंडावा A.C. पेक्षा ही सुखद होता. कारण त्यात ओलावा होता आणि ओल्या मातीचा सुगंध होता. उघडलेल्या खिडकी जवळ विनू आला. बाहेर बघितलं त्याने. छान पाऊस सुरु झाला होता. काहीजण छत्री नसल्याने आडोश्याला उभे होते, काही जण पहिल्या पावसाचा आनंद घेत होते, एकंदरीत छान वातावरण होते ते. पण विनू कसल्या तरी विचारात होता.

                 " आज ७ तारीख, ७ जून आणि उद्या ८ जून , हो. उद्याच तिचा वाढदिवस आहे ना. उद्या ती २७ वर्षाची होईल. काय ना,कशी वर्ष गेली पटापट." स्वतःशीच हसला तो. एव्हाना त्याचं सगळ office घरी गेलं होते. तो एका software company मध्ये  job ला होता. software engineer होता तो. वय वर्षे २८. दिसायला देखणा, उंच ,गोरापान. एकूणच " Handsome" होता तो . office मध्ये सर्व त्याला ओळखायचे,कारण त्याचं काम सुद्धा चांगला होत त्याचं, "famous" होता office मध्ये तो. फक्त त्याची एक गोष्ट  खटकायची आणि ती म्हणजे त्याचा " एकलकोंडेपणा ". गप्प गप्प राहायचा, कधी कोणाशी जास्त बोलायचा नाही, मिसळायचा नाही, कोणी काही विचारलं तरी तेवढ्यापुरताच बोलायचा, कधी कधी कुठे हरवून जायचा तेव्हा तर आपण office मध्ये आहोत, हेच तो विसरून जायचा. आणि पाऊस सुरु झाला कि खिडकीबाहेर कितीतरी वेळ कूठेतरी  बघत राहायचा,अगदी पाऊस थांबेपर्यंत, उशिरापर्यंत office मध्ये थांबायचा, कधी कधी घरी सुद्धा जायचा नाही, अगदी विचित्र वागायचा. परंतु सगळ्यांना माहित होते कि तो वेडा नाही आहे. त्यामुळे त्याला कोणी काही बोलायचे नाही. पण विनू असा नव्हता पहिला.                

                       संध्याकाळचे ७ वाजले होते. watchman office मध्ये कोणी आहे का ते बघायला फिरत होता आणि Light's बंद करत होता. चौथ्या मजल्यावर त्याला विनू दिसला," हे साहेब आज पन एकडच राहनार वाटतीया" अस बोलून तो खाली निघून आला. इकडे विनूच्या मनात वेगळंच चालू होतं काहीतरी. " पहिला पाऊस……तिला पण आवडायचा ना. ती पण कूठेतरी  भिजत असेल आता.… कूठेतरी……. कूठे असेल ती, तिच्या इकडे सुद्धा पाऊस पडत असेल का ? आज इकडे असती तर छान पैकी पावसात भिजता आले असते तिला ना. ……… इकडे असती तर ना.. मग..... मग ती माझ्या जवळ पण असती आज. " ती म्हणजे विनू ची " Best Friend ", ती म्हणजे  विनू ची " कुटूंब ", ती म्हणजे विनू चं सर्व काही होती. विनू कोल्हापूर वरून मुंबई मध्ये आला होता engineering करण्यासाठी, एकटाच. कोणी नातेवाईक नव्हते मुंबई मध्ये. आणि " ती " त्याची मुंबई मधली पहिली " Friend " होती. ती म्हणजे " सुची ".   

                        " सुची " हे काही तिचा खर नाव नव्हते. पण college मध्ये तिला सगळे " सुची " असेच म्हणायचे आणि विनय चे " विनू "   हे नामकरण करण्यामागे तिचाच हात होता. तर त्याची ओळख झाली ती college मध्ये, पहिल्या वर्षालाच. पहिल्यातला विनू म्हणजे डोक्यात सुसाट वारा भरलेला मुलगा. चंचल, बडबड्या, थोडासा मस्तीखोर. पण मनानी मात्र चांगला. सगळ्यांना मदत करायला सतत पुढे. धडपड्या होता अगदी. प्रत्येक नवीन गोष्ट आपल्याला आलीच पाहिजे, या वृत्तीचा. तो उत्तम " Dancer " होता, डोक्याने हुशार असल्याने "chess" त्याला कोणी हरवायचे नाही, असा होता विनू . त्याला अनेक गोष्टी आवडायच्या. पण २ गोष्टी तो मनापासून करायचा. पहिल म्हणजे पावसात भिजणं आणि दुसरं - पावसावर कविता करणे. पावसासाठी अगदी वेडा होता तो. पाऊस सुरु झाला कि नुसता धावत सुटायचा भिजायला. त्यामुळे आई वडिलांची अनेक वेळा त्याने बोलणी खाल्ली होती,पण ते तेवढ्या पुरताच. नंतर परत सुरुवात. तो कविता छान करायचा आणि उत्तम अशा कथा सुद्धा लिहायचा, फक्त " Love  Story's ". " फक्त " Love  Story's " का ? " असा कोणी विचारलं तर सांगायचा , " प्रेम असे काही नसते म्हणून मी त्यावर गोष्टी लिहितो." हे काय बोलायचा ते कोणालाच कळायचं नाही. पण त्याच्या  " Love  Story's "  सगळ्यांना आवडायच्या. 

          college च्या पहिल्या वर्षी, एका दूपारी विनू घरी चालला असताना अचानक पाऊस सुरु झाला . त्याने पटकन छत्री काढली , कारण त्याचाकडे त्यावेळेस काही Book's होती. ते भिजले तर Problem. म्हणून त्याने छत्री उघडली पण त्याच मन त्याला भिजायला सांगत होता. मग तो काय करायचा, हळूच छ्त्री बाजूला करायचा, जरा भिजायचा परत छत्री सरळ करायचा. तो पण भिजायचा आणि book's पण भिजण्यापासून वाचायची. मज्जा ना, छान idea होती त्याची . त्याचा तो प्रताप बाजूला उभी असलेली एक मुलगी कधी पासून बघत होती आणि अचानक तिने त्याला हाक मारली, " ऐ वेडया.... तूला भिजायचे असेल ना तर ती छत्री मला दे. मला घरी जायचे आहे. " त्याने चमकून मागे बघितलं, बंद दुकानाच्या बाजूला एक मुलगी उभी होती , छत्री नव्हती तिच्याकडे. त्याच्या एवढीच उंची होती तिची जवळपास. गोलाकार चेहरा , जराशी सावळीच होती ती. प्रथम त्याला तिचा राग आला , " मला वेडा म्हणते " , पण नंतर त्याला तिची दया आली. तो तिच्या जवळ गेला आणि बोलला ," मी तुला ओळखत नाही, तर मी माझी छत्री कशी देऊ तुला ? " ," अरे , पण मी तुला ओळखते , तू माझ्याच वर्गात आहेस. बर ते जाऊ दे मला छत्री दे . मला उशीर होतो आहे. तू भिज पावसात. " असं म्हणून तिने छत्री ओढली आणि ती पटापट निघून गेली, त्याला काय घडलं तेच कळल नाही. 

          अशी त्यांची पहिली भेट होती. त्याची छत्री तर त्याला मिळालीच नाही,नवीन मैत्रीण मात्र भेटली. त्यांचे पहिले वर्गात कधी पटले नाही, सारखे भांडत असायचे ते. नंतर हळूहळू दोघांना एकमेकांची सवय होऊ लागली. तो एकटाच आला होता मुंबईला,तिच्यामुळे त्याचा केवढा मोठा group तयार झाला होता. विनू तर पहिल्यापासूनच famous होता college मध्ये. त्याचा लूक सगळ्यांना आवडायचा. त्याच्या कविता , " Love story's " college मध्ये खूप famous झाल्या होत्या. सगळ्या मुलींना तो आवडायचा. खूप जणींनी तर त्याला Propose सुद्धा केलं होतं, विनूचा " प्रेम " या गोष्टी वर विश्वास नव्हता,विश्वास होता तो " Friendship " वर आणि "सुची "वर . पण  तिच्या मनात काही वेगळच होत . सुरवातीला जरी त्यांचे पटत नसले तरीहि नंतर तिला विनू आवडायला लागला होता. त्याच्या वाचून तिचा काही करमायाचेच नाही. तिला सारखं विनू जवळ असावा अस वाटायच, विनू ला तिच्या मनातला काहीच माहित नव्हतं. तिनेही त्याला काही कळू दिले नाही. 

असच एक वर्ष निघून गेलं. " सुची " विनूची " Friend " पासून " Best Friend " झाली होती,एकत्र college ला जायचे ,घरी एकत्र निघायचे ,एकाच डब्यात जेवायचे , एकमेकांसाठी जागा अडवून ठेवायची आणि एक गोष्ट दोघांमध्ये common होती ती म्हणजे पावसात भिजणे . एकत्रच भिजायचे . ८ जून ला तिचा वाढदिवस असायचा , त्या दिवशी तर किती मजा  केली होती सगळ्यांनी ,पण केक कापण्याच्या अगोदर " सुची '' एक वाक्य बोलली, " हा वाढदिवस मला जन्मभर लक्षात राहील,कारण आज मला कळल कि खर प्रेम काय असते ते, आणि आज मला ते भेटलं आहे" हे अस का बोलली ती ते कोणालाच कळल नाही , त्या वाक्याचा तो रात्र भर विचार करत होता ,आणि अचानक बाहेर पाऊस  सुरु झाला . मग काय , विनू बाहेर पडला पावसात भिजायला ."एका ठिकाणी उभा राहून काय भिजायचे ?" म्हणून तो चालू लागला . चालता चालता अचानक तो थांबला . विचार करता करता विनू , " सुची " च्या घरासमोर आला होता नकळतपणे . त्याला कळलंच नाही तो तिकडे कसा आला. आणि समोर " सुची " होती पावसात भिजत, तिलाही आश्चर्य वाटलं विनूच. दोघे कितीतरी वेळ एकमेकांना बघत उभे होते. पाऊस थांबला तरी ते तसेच होते. थोडयावेळाने दोघे ही भानावर आले, एकमेकांना काही बोलले नाहीत फक्त हातानेच " bye " केले आणि विनू घरी आला . पावसात त्याला नेहमीच आनंद देणाऱ्या गोष्टी मिळाल्या होत्या, या पावसात त्याला वेगळाच अनुभव आला होता , " याला मैत्री नाही म्हणत ना , मग हे काय प्रेम आहे. इतके सुंदर असते प्रेम ?" आज त्याला  झोप येत नव्हती, एका वेगळ्याच आनंदात होता तो , दुसऱ्या दिवशी college ला जायचे म्हणून त्याला बळजबरीने झोपावे लागले.     

           " साहेब, आज घरी जानार आहात काय ? नायतर मी दरवाजा बंद करतोय , झोपायचे आहे मला ." watchman च्या या शब्दांनी विनू भानावर आला , " निघतो आहे ५ मिनिटात ." अस बोलून त्याने त्याचं सामान उचलल आणि office  च्या बाहेर पडला. पाऊस थांबला होता , छान थंडावा आला होता ,विनूच मनही शांत झालं होत. विनू घरी आला आणि सामान ठेवून त्याच्या बाल्कनी मध्ये येऊन उभा राहिला . पावसाने पुन्हा सुरुवात केली होती , " त्या  दिवशी पण असाच पाऊस होता ना . ज्या दिवशी " सुची " मला पहिल्यांदा भेटली होती." आणि विनू पुन्हा त्याच्या आठवणीत गेला.

           " विनू " आणि " सुची " यांची friendship अजूनच घट्ट झाली होती आणि संपूर्ण college मध्ये त्यांची Friendship famous होती, विनू तिथे सुची ,सुची तिथे विनू असच झालं होत काहीसं . त्यांच्या सर्व मित्रमैत्रिणीनाही ठाऊक होते कि दोघांमध्ये प्रेम आहे. तिलाही तो सुरुवातीपासून आवडायचा आणि विनू लाही ती आवडायची मनापासून ,फक्त कोणी पुढाकार घेऊन मनातली गोष्ट सांगत नव्हत. विनूला मित्रांनी खूप समजावलं कि,"तू पूढे होऊन तिला propose कर " , पण त्याला ते कधीच जमलंच नाही . दिवस असेच आनंदात , मजेत जात होते , दोघे मनानी आणखीनच जवळ आले होते आणि कोणीच पुढे जात नव्हते. आता त्यालाही कळून चुकले होते की खूप उशीर करून फायदा नाही. आपणच तिला विचारलं पाहिजे . त्याने मनाची तयारी केली . फक्त दिवस कोणता तो ठरत नव्हता. तिचा पुढचा वाढदिवस सुद्धा जवळ आला होता. विनूने ठरवलं कि ८ जून हाच दिवस आहे. याच दिवशी त्याला प्रेमाची सावली मिळाली होती ." yes. ८ जूनलाच तिला सर्वांसमोर Propose करायचं ". तिच्या वाढदिवसाची संपूर्ण तयारी झाली होती. ७ जून हा दिवस जाता जात नव्हता , कसाबसा गेला दिवस, त्या दिवशी ती लवकरच गेली college मधून " उद्याची तयारी  करायची आहे " असे म्हणून ती गेली. त्याच्या मनात तर खूप आनंद  झाला होता ,कधीच सांगतो आहे मनातलं  अस त्याला झालं होत.

             ८ जून ............... सकाळीच त्याला जाग आली. आज त्याच्या साठी मोठा दिवस होता ,Infact तो झोपलाच नव्हता रात्रभर. सगळा plan ठरला होता . सकाळी वर्गात वाढदिवस करायचा , मग college सुटल्यावर फिरायला आणि संध्याकाळी पार्टीत तिला Propose करायचा. अगदी perfect plan होता . लवकर उठल्याने तयारी सुद्धा लवकर केली त्याने . छानसा शर्ट ,कडक इत्री केलेला आणि निघाला college साठी बाहेर. बाहेर आल्याआल्या त्याचं लक्ष आभाळाकडे गेलं "आज काय पाऊस पडणार वाटत" असे विनू मनात बोलून , भिजू नये म्हणून झपझप पावलं टाकत college मध्ये आला. Group तर अगोदरच आला होता . फक्त " सुची " आली कि party सुरु . " आज मुद्दाम उशिरा येणार वाटते ही " एक कोणीतरी बोललं तसे सगळे हसले. रोज ७ वाजता येणारी आज ८ वाजले तरी कूठेच दिसत नव्हती. ८ चे ९ , ९ चे १० , १० चे १२ वाजले तरी ती आलीच नाही , त्यावेळी mobile एवढे कोणी वापरायचे नाही आणि तिच्या घरी फोनही नव्हता. शेवटी कंटाळून एक एक जण निघाले .

" संध्याकाळी भेटूया नक्की हा . मोठ्ठी party करूया . मी घेऊन येतो तिला ." असे विनूने सगळ्यांना सांगितले आणि सर्व Group आपल्या घरी निघून गेला. विनू अजूनही थांबला होता . त्याने वर आभाळात पाहिले . अजूनही सकाळचाच पाऊस धरलेला होता . " आज खरंच काहीतरी बिनसलं असणार दोघांच पावसाचं  आणि "सुची" च सुद्धा." तोही घरी निघून आला . " का नाय आली ती . सगळा मूड ऑफ केला . आता भेटू दे संध्याकाळी. भांडणच करतो ." संध्याकाळ झाली तरी ती त्याच्या घरी आली नाही. आता खरोखरच विनूला " सुची "चा राग आला होता. तो तसाच तिच्या घरी गेला. तर दरवाजाला कूलूप. ते बघून तर तो तसाच घरी आला . " एकटीच गेली फिरायला Family बरोबर . आणि मी कोणीच नाही का ? उद्या येऊ दे . बोलणारच नाही." डोक्यात राग घालून तो झोपून गेला. दुसऱ्या दिवशी ती आली नाही . त्याचा राग काही गेला नव्हता. असे ५ दिवस गेले . ती आलीच नाही college ला . आता त्याला तिची काळजी वाटू लागली . " बर नाही वाटतं तिला " college सुटल्यावर तो तिच्या घरी गेला तर कूलूप तसचं होतं. " बहुतेक डॉक्टर कडे गेली असेल " असा विचार करून तो परतला. आणखी ४ दिवस गेले. ती काही college ला आली नाही की त्या दारावरच कूलूप उघडलं नाही. 

विनू तर अगदी वेडा झाला होता. सगळीकडे त्याने विचारलं , शेजारी , तिच्या मैत्रिणीना, तिच्या नातेवाईकांना. कोणालाच माहित नव्हत. एकाकी गायब झाली होती ती. बघता बघता १ महिना झाला,परंतु ती काही आली नाही. विनू तर जवळ जवळ वेडाच झाला होता . ना जेवणात लक्ष ना अभ्यासात . अगदी कोमेजून गेला होता तो . नेहमी हसरा , धडपड्या विनू आता एकटा एकटा राहत होता . कोणीतरी सांगितलं कि ती तिच्या गावी गेली असावी . तसा तोही तिच्या गावी जाऊन आला , ती तिकडे गेलीच नव्हती. आता परीक्षा जवळ आल्या होत्या. आणि शिक्षकांना विनूच असं वागण बघवत नव्हत . त्यांनी त्याच्या आई वडिलांना मुंबई ला बोलावून घेतले, त्यांना सुद्धा विनुला बघून धक्का बसला. थोडे दिवस त्यांनी विनू जवळ राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी विनू च मन पुन्हा वळवलं. विनू परत माणसात परतला, तिची आठवण त्याला सोडवत नव्हती, असेच महिने गेले, वर्षही उलटलं. पुन्हा ८ जून. सुची चा वाढदिवस. त्यादिवशी सुद्धा आभाळ भरलेलं होत आणि  लवकरच पावसाला सुरवात झाली ." आज तरी सुची येणार " त्याला आठवलं तिलापण पावसात भिजायला आवडायचं. मग तोही गेला पावसात भिजायला ." कदाचित ती सुद्धा येईल भिजायला ." पाऊस आला तसा गेला , ती काही आली नाही. मग ही त्याची सवयच होऊन गेली. पाऊस पडायला लागला कि विनू भिजायला जायचा जेणेकरून त्याला सोडून गेलेली " सुची " पुन्हा त्याला भेटायला येईल पावसात.      

               " आज ६ वर्ष झाली. सुची कूठे असेल काय माहित ? " विनू विचार करत उभा होता बाल्कनी मध्ये. ६ वर्ष . ती कूठे गायब झाली अचानक. विनू त्या धक्क्यातून बाहेर आला होता, पण तो तिला विसरला नव्हता. कूठूनही तिची बातमी आली की तो तिथे जायचा, अगदी लगेच. गेल्या ६ वर्षात अर्धे भारतभ्रमण केले होते त्याने, मनापासून प्रेम केलं होत त्याने. तिला शोधण्यातच त्याने इतका वेळ घालवला होता. त्यात त्याचं कविता लिहिण, " Love Story " करणे कधीच मागे पडलं होत. फक्त " सुची " ला शोधायचं हेच त्याला माहित होत. 

       रात्रीचे १२ वाजत होते. विनूला काही झोप येत नव्हती. पाऊस तसाच पडत होता. त्याला एकदम आठवलं " पहिली भेट पावसात झाली होती, मैत्री पावसात झाली होती , प्रेम कळल तेव्हाही पाऊस होता आणि........ आणि ती गेली तेव्हासुद्धा पाऊसच होता . Indirectly , आपण पावसालाच जबाबदार धरत आहोत या सगळ्यांसाठी . तरीही पाऊसच का आवडतो मला ? " या गोष्टी वर त्याला हसायला आल. तो तसाच उभा होता पावसाला बघत, इतक्यात फोन वाजला. तसा विनू वर्तमान काळात परतला. त्याच्या मित्राचा फोन होता , पुण्यावरून. तो पुण्याला JOB ला होता.
 " एवढया रात्री काय काम असेल याच ? " ,
 " Hello…. Hello…विनू .... अरे विन्या जागा आहेस का ? " ,
 " हो ..... रे ... काय झालं ? " , 
" अरे ,, एक गोष्ट सांगायची आहे .", 
" सांग ना.... तुझा आवाज बरोबर नाही येत आहे.…… ",
" ऎक जरा…... नाहीतर फोन बंद होईल…" ,
" हा .... सांग ","मला पुण्यात आपली " सुची " भेटली होती रे ." ,
" काय ......... ? " आणि फोन कट झाला…  

                                                                                                to be continued.............

Tuesday 24 September 2013

" वडीलांस पत्र ..........."

प्रिय  " बाबा " यांस ,
                             
                           आज थोडं एकट एकट वाटलं,
                           बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……


चालायला लागल्यावर तुम्हीच पहिला हात दिला होतात,
                           पण मी पुढे गेल्यावर नकळतच कधी दूर गेला होतात,
आज, स्वतःच्या पायावर उभा असलो तरी धडपडल्यासारखं वाटलं.
                           बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……

जेवताना काऊ चिऊ शिवाय कधी घास पोटात गेला नाही,
                           आता तर चिऊ बघायला सुद्धा मिळत नाही,
 काऊ चिऊ साठी पुन्हा एकदा रुसवासं  वाटलं.
                           बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……

लहानपणी तुमच्यासोबत पावसात भिजताना खूप मजा वाटायची,
                           फाटका रेनकोट , तुटकी छत्री असूनही ती दोघांना पुरायची,
आज , नवी कोरी छत्री असूनही पावसात थोडं भिजावस वाटलं.
                           बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……

एकदा घरात एकटा असताना, सर्व घर रडून डोक्यावर घेतलं होत,
                           पण तुम्ही धावत पळत येउन ' मी आहे 'असं सांगितलं होत,
आज , स्टेशनच्या गर्दीत सुद्धा " एकट एकट " वाटलं .
                           बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……

आठवतय… एकदा मी पडलो होतो,मला खूप लागलं होत ,
                            त्यादिवशी तर पूर्ण आभाळ तुमच्या डोळ्यात दाटलं होत,
आज , उगाचंच अडखळून पडावसं वाटलं…
                           बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……

रात्री झोपताना तर तुमची मांडीच माझी " उशी " असायची ,
                            तुम्ही नसताना आईच्या कुशीतही झोप नसायची,
आज , पुन्हा एकदा तुमच्या जवळ झोपावं वाटलं….
                           बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……

तुमचा हात सोडून शाळेत जाणे नकोसे वाटायचे,
                           पण तोच हात पकडून घरी जाताना मात्र कसलेच भान नसायचे,
आता मोठा झालो तरी " तो " हात पकडून शाळेत जावंसं वाटलं…
                           बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……

"तुझे बाबा , देव बाप्पा कडे गेले " अस मला कुणीतरी सांगितलं होत,
                           मात्र देव बाप्पा कुठे राहतो हेच मला कोणी सांगितला नव्हतं,
लहानपणीच्या त्या प्रश्नावर आज थोडं हसावसं वाटलं ….
                           बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……

जीवनातली तुमची कमी आईने कधीच भासू दिली नाही ,
                            पण तुमची आठवण मनातून कधीच जाऊ शकली नाही,
आज , भरलेल्या आभाळाबरोबर डोळ्यात पाणी दाटल्यासारखं वाटलं….
                           बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून थोडसं रडावसं वाटलं……  
   
                           बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून थोडसं रडावसं वाटलं……
           











       

Friday 23 August 2013

थोडसं…………" Vibration........ "

काही दिवसांपासून कसस वाटतंय..............
                      थोडसं हृदय "Vibrate" झालं असं वाटतंय.............

सकाळी उठल्यापासूनच कामाला सुरुवात होते,
                     आणि घरातले tension बघून माझ्या tension मध्ये वाढ होते,
घरातली बडबड ऐकून वैतागायला होतंय..................
                     म्हणून  थोडसं हृदय "Vibrate" झालं असं वाटतंय.............

Office साठी बस , ट्रेन , रिक्षा ,
                     सगळ्यांमागे नुसतं पळायला लागते ,
धावून धावून जरा दमल्यासारखं वाटतंय…………
                     म्हणून  थोडसं हृदय "Vibrate" झालं असं वाटतंय.............

Office मध्ये आधी कामाचे, मग Boss चे दडपण नकोसे वाटते,
                    डोंगराएवढे काम करूनही "salary" मुंगी एवढी वाटते,
कमी salary ,वाढती महागाई बघून गरगरल्या सारखं वाटतंय………
                     म्हणून  थोडसं हृदय "Vibrate" झालं असं वाटतंय.............

संध्याकाळी घरी जाताना सुद्धा मनशांती मिळत नसते,
                    ट्रेनच्या "Second Class" मध्ये तर मुंगीला सुद्धा जागा नसते,
" First Class " कडे बघितल्यावर लाजल्यासारखं वाटतंय.........
                     म्हणून  थोडसं हृदय "Vibrate" झालं असं वाटतंय.............

जीव वाचवून घरी आल्यावर बायको जीव खायला तयारच असते,
                     दुसरीकडे Girl Friend , call वर call करून सतावत असते,
बाहेरचं "लफड" कि घर , यात गोंधळल्यासारखं वाटतंय............
                     म्हणून  थोडसं हृदय "Vibrate" झालं असं वाटतंय.............

बायकोने मारलेले टोमणे आता असह्य होत असतात,
                     " घरी आराम मिळतो " अशा गोष्टी Life मध्ये अस्तित्वात नसतात,
असाच उठून आता तिचा गळा दाबावा असं वाटतंय.............
                     म्हणून  थोडसं हृदय "Vibrate" झालं असं वाटतंय.............

मनशांती साठी घरातून मग बाहेर पडलेला असतो,
                     " बार " मध्ये जाण्याइतका सुद्धा खिशात " money " नसतो,
रस्त्यावरच्या भिकाऱ्यांच्या बाजूला जाऊन बसावसं वाटतंय.................
                     म्हणून  थोडसं हृदय "Vibrate" झालं असं वाटतंय.............

आता मी माझ्या " Life " लाच कंटाळलेला असतो ,
                     समोरच्या नाल्यात जीव देण्याचा विचार मनात आलेला असतो,
पण आत्महत्या करायला थोडसं घाबरायला होतंय.................
                     म्हणून  थोडसं हृदय "Vibrate" झालं असं वाटतंय.............

पूर्ण ताकद एकत्र करून मी " जीव " दिलेला असतो ,
                     माझा श्वास सुद्धा बंद झालेला असतो,
डॉक्टरने मला " Dead " म्हणून घोषित केलेलं असतं,
                     पण माझ्या बायकोला त्याचं जराही दुःख झालेलं नसतं,
माझी मुलं मात्र मलाच शोधत असतात,
                     पप्पा कुठे गेला म्हणून रडतं असतात,
माझी चूक आता मला समजलेली असते,
                     पण अजूनही वेळ निघून गेलेली नसते ,
माझ्या या " Dead " शरीरात अजूनही " जीव " असल्यासारखं मला वाटतंय.............
                  कारण .... कुठेतरी एका कोपऱ्यात अजूनही थोडसं हृदय "Vibrate" झालं असं वाटतंय.............    

Tuesday 16 July 2013

" त्याचा पाऊस "………

  '' Hello ……Hello ……सर ...... माझा आवाज येतो आहे का ?" " हा . बोल . काय झालं '' " सर आज मला जमणार नाही office ला यायला " " का ..... काय झालं ?'' " सर , पावसामुळे train बंद आहेत,कसा येणार ?" " ठीक आहे.  "
    सकाळपासून १० फोन येऊन गेले ," सर , आज नाही येणार " म्हणून. कारण एकच सगळ्यांचे " पाऊस " . आज संपूर्ण office रिकामं होते. काल दुपारपासून जो पाऊस  सुरु झाला होता ,तो सकाळीसुद्धा चालूच होत. सगळीकडे पाणीच पाणी होत. ट्रेन बंद होत्या,काही ठिकाणी झाड पडली होती,B.E.S.T चा सुद्धा problem होता . एकूणच वेधशाळेने मुसळधार पावसाची चेतावणी दिली असल्यामुळे बहुतेक लोकांनी घरीच थांबायचे ठरवले होते . 
      पण समीर मात्र office ला आला होता आणि तो सुद्धा एकटाच . पावसामुळे आज त्याचा Driver सुद्धा आला नव्हता. म्हणून आज तो स्वतः Drive करत आला होता . स्वतःची कंपनी होती त्याची आणि येवढ्या मोठ्या कंपनीचा तो Boss होता . अवघ्या २७ वर्षाचा होता तो तरीसुद्धा एकटाच एवढी मोठी कंपनी Handle करायचा . 
    Actually , त्याच्या पप्पांनी कंपनी सुरु केली तेव्हा ती लहान होती , पण ४ वर्षापूर्वी जेव्हा समीरनी कंपनी Join केली , तेव्हापासून त्याने कंपनीला एवढया उंचीवर आणून ठेवले कि त्याच्या पप्पांनी त्याचा विचार पण केला नसेल . समीर लहानपणापासूनच हुशार आणि ४ वर्षापूर्वी U.S.A  मधून शिक्षण घेऊन तो भारतामध्ये आला , अगदी त्या दिवसापासून त्याने कंपनीसाठी काम करायला सुरुवात केली . 
              पण आज एक महत्त्वाची meeting होती आणि पावसाने त्यावर सगळ पाणी फिरवलं होता . 
   " आज माझा दिवसच खराब आहे वाटते " समीर मनातल्या मनात बोलला . काहीतरी काम करावं म्हणून त्याने P.C. चालू केला आणि ५ मिनिटातच त्याच्या पूर्ण कंपनीची वीज गेली . आता समीरला खरंच पावसाचा खूप राग आला होता . त्याला पाऊस मुळी आवडायचाच नाही . 
    पावसातली न होणारी काम,चिखल ,सगळीकडे ओलं ओलं ,दमट वातावरण हे त्याला नकोसं असायचं . पण या व्यतिरिक्त एक कारण होत कि त्यामुळे तो पावसाला स्वतःपासून दूर ठेवायचा. अशाचं एका पावसात जेव्हा तो 8 वर्षाचा होता,त्याची आई त्याला सोडून गेली होती. कोणालाच माहित नाही ती कूठे गेली , कोणी म्हणाला ती तिच्या गाडी बरोबर वाहून गेली ,कोणी म्हणाला तिने घराच्या tension  मुळे आत्महत्या केली, तर कोणी बोलायचं कि ती अजूनही जिवंत आहे. कोणास ठावूक काय ते पण तिची गाडी मात्र नदीत सापडली होती. त्याचं आईवर खूप प्रेम होतं आणि ती अश्याप्रकारे निघून गेल्याचा त्याला लहानपणीच खूप मोठठा धक्का बसला होता. याचा परिणाम असा कि पहिलाच एकलकोंडा असलेला तो अजूनच एकटा पडला.    
    समीर  खिडकी समोर उभा राहून बाहेर बघत होता . " पाऊस थांबला कि निघूया " असे त्याने ठरवले पण पावसाला आज थांबायचे नव्हते. असाच पाऊस पडत राहिला तर निघता येणार नाही असा विचार करून त्याने मग निघायचे ठरवले . घरी फोन लावला त्याने ,त्याच्या पप्पांना . परंतु त्याचे पप्पा घरातच नव्हते ,ते त्यांच्या दुसऱ्या बायकोबरोबर बाहेर गेले होते . Mobile सुद्धा स्विच ऑफ केला होता त्यांनी . 
   पहिली बायको गेल्यानंतर त्याच्या पप्पांनी अगदी एका महिन्यातच दुसरा लग्न केलं होते. समीर आईला विसरू शकत नव्हता आणि दुसऱ्या कोण्या बाईला तो आपली आई मानू शकत नव्हता. ती सुद्धा त्याचा नेहमी तिरस्कार करायची . याचा परिणाम असा समीर लहानपणीच त्याच्या नातेवाईकांपासून दूर झाला . आणि आणखीनच एकटा पडत गेला .  
    समीरच्या आता लक्षात आले होते कि त्याच्या mobile ची battery खूप कमी राहिली आहे . पाऊस काही कमी होत नव्हता. त्याने घरी जाण्याचा निर्णय घेतला . त्याने गाडी चालू केली आणि ती निघाला . रस्ते मात्र मोकळेच होते,पाणी साठलं होते सगळीकडे. याची गाडी मात्र सुसाट चालली होती आणि पावसाचा जोर पण वाढत चालला होता,जणू काही दोघांमध्ये स्पर्धाच लागली होती. त्याची गाडी पळतच होती. आणि अचानक……
     अचानक आकाशात एक वीज चमकून गेली ,अगदी त्याचवेळेला त्याची गाडीसुद्धा बंद पडली. " आता हिला काय झालं ?". त्याने गाडी सुरु करायचा खूप प्रयत्न केला पण ती बंदच होती. आता आकाशातली वीज आणि त्याची गाडी याचा काही एक संबंध नव्हता,तरीही त्याला वाटलं कि त्या विजेमुळेच गाडी बंद पडली . आता गाडीत बसून राहण्याशिवाय त्याच्याकडे काहीच पर्याय नव्हता. त्यात भर पडली ती mobile ची battery संपली याची ." येवढा महाग mobile आहे. पण वेळेला उपयोग होत नसेल तर काय कामाचा ? "
  होताच त्याचा mobile महाग . त्याच्याकडे असणाऱ्या सगळ्याच वस्तू  महाग होत्या, 50,000 चा mobile , Rolex चे दीड लाखाचे watch, 10,000 चे shoe , 30,000 - 40,000 चा अंगात घातलेला suit आणि फक्त 2 कोटींची गाडी. पण या सगळ्यांचा आज काहीही उपयोग नव्हता. कारण भर पावसात तो त्याच्या बंद गाडीसह अडकून पडला होता.
असाच अर्धा तास निघून गेला. हळूहळू त्याचं डोक शांत झालं. तो आता अगदी शांत झाला होता. खूप दिवसांनी म्हणाल तर खूप महिन्यांनंतर तो असा शांत बसून होता. त्यालाही बर वाटलं. त्याचं मनही आता शांत झाला होते. काही नाही तर तो गाडीच्या बाहेर काय चाललंय ते पाहू लागला. त्याची गाडी थांबली होती तो रस्ता समुद्र किनाऱ्याला लागूनच होता. फक्त मध्ये होता तो एक लांबलचक दगडी कठडा जो समुद्र आणि रस्ता यांना वेगळा करत होता. 
     तेवढयात त्याला एक जोडपं पावसात भिजताना दिसलं. मस्तपैकी ते पावसाचा आनंद घेत होते. एकाच छत्री होती दोघांकडे पण छत्री असूनही ते दोघे चिंब भिजलेले होते,एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत होते. त्यांना बघून समीरला कसस झालं. त्याला त्याच्या college ची आठवण झाली. त्याचा group नाही होता पण college मध्ये एक group होता त्यात त्याला जायचे होते,पण तो जाऊ शकला नाही. त्या group मधली एक मुलगी त्याला खूप आवडायची, तिला हि तो आवडायचा. पण दोघे कधी एकमेकांबरोबर बोलले नाहीत. फक्त नजरेची भाषा चालायची दोघांमध्ये.एका पावसात मात्र ती एका आडोशाला उभी होती आणि समीर गाडीमधून घरी चालला होता,समीर बाहेर पावसात जाऊ शकत नव्हता कि तो तिला गाडीत बोलावू शकत नव्हता कारण श्रीमंती.त्याच्या पप्पांना असे काही केलेले आवडायचे नाही.ती तशीच पावसात उभी राहिली आणि समीर हताश होऊन निघून गेला.नंतर समीर higher studies साठी U.S.A. ला गेला आणि ती , तो group सगळ मागे राहिलं.
 पुन्हा एकदा वीज कडालली आणि समीर भानावर आला. "त्यादिवशी जर आपण गाडीतून उतरलो असतो तर बर झालं असतं,निदान ती आता माझ्या बरबोर असती." त्याला त्याच्या तश्या वागण्याचा राग आला होता, परंतु ती वेळ तर केव्हाच निघून गेली होती.थोडंस त्याला हतबल वाटायला वाटायला लागलं होतं.ते जोडपं तर कधीच निघून गेलं होतं,पण समीरच मन तिथेच घुटमळत होतं.विचार करताकरता गाडीच्या दुसऱ्या बाजूला त्याचं लक्ष गेलं.तिथे सगळ गढूळ पाणी साठलं होतं आणि त्याच पाण्यात एक 6 -7 वर्षाचा मुलगा खेळत होता,त्याचे सगळे कपडे खराब झाले होते,चेहऱ्यावर चिखल लागला होता,तरीसुद्धा त्याला त्याची पर्वा नव्हती.तो पाण्यात खेळण्यात एकदम मग्न होता. ते बघून समीरला प्रथम किळस वाटली,पण नंतर त्याला त्याची मजा वाटायला लागली," आपण अशी मजा कधी केलीच नाही,पावसात कधी भिजलो नाही,घराच्या बाहेरच कधी पडलो नाही,माझी खेळायची जागा एकच , माझी room." स्वतःशीच तो हसला,स्वतःला किती लहान समजायला लागला होता तो त्या मुलासमोर.   
   लहानपणापासून तो एकटाच वेगळ्या Room मध्ये राहायचा,मोठया बंगल्यातली स्वतंत्र Room,आई - वडिलांची वेगळी Room.त्यात ते नेहमी भांडतच असायचे,लहान समीरला कितीही वाटलं तरी तो त्यांच्या Room मध्ये जात नसे. मग तो त्याच्याच room मध्ये खेळत राहायचा,अभ्यास करत राहायचा. सारखा सारखा अभ्यास ,त्यामुळे त्याला कोणी मित्र हि नव्हते.ना शाळेत ना college मध्ये. तो त्याच्या Room च्या खिडकीतून कधी कधी बाहेर बघत राहायचा,तिथे खेळणाऱ्या मुलांकडे ,त्यालाही वाटायचे त्यांच्यासोबत जाऊन खेळावे,पण तसं तो करू शकत नव्हता. त्याचं लहानपण असंच होत " एकट,एकट ".
  त्या मुलाकडे बघताबघता त्याचं लक्ष त्याच्या थोडया बाजूलाच उभ्या असलेल्या एका बाईकडे गेलं. " त्याची आई असावी बहुतेक " समीर बोलला. थोड्यावेळाने तिने त्या मुलाला हाक मारून पाण्याबाहेर बोलावले पण तो कसला ऐकतोय ? त्याने तर तिच्यावर  सुद्धा पाणी उडवायला सुरुवात केली होती.मग ती सुद्धा पाण्यात उतरली आणि आपल्या मुलासोबत खेळू लागली.     
  ते आई-मुलाचं प्रेम बघून त्याला त्याची आई आठवली. त्याचं मन एकदम भरून आलं. समीरच्या पप्पांबरोबर कितीही भांडण झाली तरीही ती समीरला कधीही दूर करायची नाही. समीरला सुद्धा वडिलांपेक्षl आईच खूप जवळ होती. ती त्याच्याबरोबर खेळायची,त्याला जेवण भरवायची, त्याच सगळ करायची. तीच तर समीर वाचून पानही नाही हलायचं. येवढं ती प्रेम करायची समीरवर. आणि सगळ्यांना ते माहित होते,तरीही ती त्याला सोडून गेली होती. 
   " का …… का सोडून गेलीस मला आई ? " समीर मनातल्या मनात बोलत होता. "जाताना एकदाही माझा विचार तुझा मनात आला नाही का ? " बाहेर पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या,बरसणाऱ्या प्रत्येक सरीबरोबर आईची आठवणही गडद होत जात होती. ढगांची अजूनच गर्दी होऊ लागली होती,आणि इकडे बाहेरचा पाऊस समीरच्या डोळ्यात साठू लागला होता. त्याला आता गाडीत बसून राहणं असह्य झालं होतं. 
   त्याला आईचं एक गाणं आठवलं, " मेघ मल्हार ". तो लहान असताना जेव्हा जेव्हा पाऊस पडायचा ,तेव्हा त्याची आई " राग मेघ मल्हार " गायची. खूप छान आवाज होता तिचा आणि त्यावेळी जरी समीरला ते कळत नसलं तरीही त्याला ते ऐकायला खूप आवडायचे. आज त्याला " मेघ मल्हार " चा अर्थ कळत होता.हळूच त्याच्या डोळ्यातून एक थेंब त्याच्या हातावर पडला अन त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळायला लागले. त्याला पाऊस बाहेर बोलावत होता. गाडीच दार त्याने उघडलं आणि तो गाडीच्या बाहेर आला. पहिला कधीच तो पावसात भिजला नव्हता,त्यामुळे त्याला खूप वेगळं वाटत होत. समोर समुद्र पण उधाणलेला होता,वर जोरात वाहत होता, समीर खूप वेगळं वाटत होता सगळं, त्याने हे कधीच अनुभवलं नव्हतं,मग त्याने समुद्राकडे बघितले व त्याच्या दिशेने चालू लागला,आईच्या गाण्याचे प्रत्येक स्वर त्याच्या कानात घुमत होते. त्याच्या महाग shoe मध्ये पाणी शिरलं म्हणून त्याने ते काढून फेकून दिले होते, त्याचा 50,000 चा mobile पाण्यात तरंगत होता, त्याचं दीड लाखाचं घडयाळ तर कधीच पाणी गेल्याने बंद पडलं होतं,त्याचा 40,000 च्या suit ला चिखल लागला होता आणि 2 कोटीच्या गाडीत आता पाणी भरू लागलं होतं,पण त्याचं त्यांकडे लक्षच नव्हतं, तो चालतच होता पावसात. वाटेत एका अणुकुचीदार दगडावर त्याचा पाय पडला , पायातून रक्त येऊ लागलं,पण त्याला त्याची पर्वा नव्हती. तो चालतच होता.  
जणू काही पूर येणार होता इतकं पाणी होतं आणि समीरच्या मनात आठवणींचा पूर आला होता. चालता चालता तो किनाऱ्यापाशी आला. पायातून रक्त वाहतच होतं आणि कानात " मेघ मल्हार " घुमत होता. तिकडेच एका दगडावर बसला तो मनातील " मेघ मल्हार " ऎकत. एकटाच. पावसात. त्याला आता कसलंच tension नव्हतं, ना meeting चे , ना त्याच्या भविष्याचे आणि ना त्याच्या घरचे. 
      तो फक्त आता त्याचाच होत. डोळ्यातले अश्रू  पावसात वाहून जात होते, जणू काही त्याची आईच त्याचे अश्रू पुसत होती. त्याने पावसाला स्वतःला समर्पित केलं होता. त्याच्या कानात घुमणारे स्वर,आता त्याच्या ओठांतून बाहेर पडू लागले होते.
      भर पावसात एका उधाणलेल्या समुद्राच्या किनारी बसून तो " मेघ मल्हार " चे स्वर आळवत होता,सगळ काही विसरून. तो पाऊस त्याचा होता,फक्त आणि फक्त " त्याचा पाऊस "………    

Saturday 15 June 2013

थोडासा पाऊस

थोडस भरलेलं आभाळ आणि पावसाची वाट पाहणारी ती ,
                             थोडासा पाऊस आणि थोडासा मी . 

पावसाची रिमझिम सुरु होतच ती अगदी वेड्यासारखी होते. 
पण मला येताना बघताच घाबरून लपून बसते. 
अशाचं रिमझिम पावसात थोडीसी बावरलेली ती,
                             थोडासा पाऊस आणि थोडासा मी .

पाऊस सुरु होतच मग मी थोडा मुददामच आडोशाला जातो,
लपून छपून मग तिलाच बघत बसतो,
मला अगदी हळूच लपून बघणारी ती ,
                             थोडासा पाऊस आणि थोडासा मी .

पाऊस धो धो सुरु होताच मग मात्र तिला राहवत नाही,
बाहेर पडून पावसात भिजण्याची मजा ती सोडत नाही,
पावसात भिजणारी तरीही पागोळ्यात रमणारी ती,
                             थोडासा पाऊस आणि थोडासा मी .

पावसात ती भिजत असते , पण मनातून मी भिजलेला असतो. 
तिचं ते फुलाप्रमाणे भिजलेलं रूप बघून मी स्वप्नात गेलेला असतो. 
पावसात भिजताना मोगऱ्याच्या फुलासारखी फुललेली ती,
                             थोडासा पाऊस आणि थोडासा मी .

पावसाला मात्र थांबायचे नसते, तो नुसता बरसतच असतो,
मध्येच एखादी वीज चमकवुन तिला घाबरवत असतो,
वीजेलाच जीभ बाहेर काढून वेडावून दाखवणारी ती,
                             थोडासा पाऊस आणि थोडासा मी .

मी अजूनही तीलाच बघत असतो,तीच्या त्या स्वच्छदी जगात हरवलेला असतो,
तिला कशाचेच भान नसते,कारण तीला या जगाचाच विसर पडलेला असतो,
स्वतःचा जगात या जगालाच विसरून गेलेली ती,
                             थोडासा पाऊस आणि थोडासा मी .

अशी आमची कहाणी सुरूच राहते,
                     दरवर्षी येणाऱ्या पावसाबरोबर वाढतच राहते,
तिच्यात गुंतलेला मी , आणि बरसणाऱ्या पावसात गुंतलेली अशी ती,
 आता बराच मोठ्ठा पाऊस आणि त्यात मनसोक्त भिजणारा मी . 


Wednesday 12 June 2013

थोडसं ……… माझं मन

तुझ्या डोळ्यांच्या पापण्या वर उचलून बघ , तर तुला समजेल…………

उगवणाऱ्या सूर्याकडे जर तू  बघू शकली असतीस ,
                                   तर तुला समजलं असतं कि माझ्या मनात काय आहे ते …
वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर जर तू विहरू शकली असतीस ,
                                   तर तुला समजलं असतं कि माझ्या मनात काय आहे ते …
गाणाऱ्या पाखरांबरोबर जर तू गाऊ शकली असतीस ,
                                   तर तुला समजलं असतं कि माझ्या मनात काय आहे ते …
सागराच्या लाटा पलीकडे जर तू बघू शकली असतीस,
                                   तर तुला समजलं असतं कि माझ्या मनात काय आहे ते …
नदीच्या पाण्याबरोबर जर तू वाहू शकली असतीस,
                                   तर तुला समजलं असतं कि माझ्या मनात काय आहे ते …
झाडांच्या पानांची सळसळ जर तू समजू शकली असतीस,  
                                   तर तुला समजलं असतं कि माझ्या मनात काय आहे ते …
बरसणाऱ्या पावसाला मनात साठवलं असतंस,
                                   तर तुला समजलं असतं कि माझ्या मनात काय आहे ते …
मला तर तू कधी ओळखू शकली नाहीस,
                                    पण मी तुझा मनातच होतो. 
माझ्या मनात जरासं डोकावून बघितलं असतंस ,
                                   तर तुला समजलं असतं कि माझ्या मनात काय आहे ते …

Followers