तुझ्या डोळ्यांच्या पापण्या वर उचलून बघ , तर तुला समजेल…………
उगवणाऱ्या सूर्याकडे जर तू बघू शकली असतीस ,
तर तुला समजलं असतं कि माझ्या मनात काय आहे ते …
वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर जर तू विहरू शकली असतीस ,
तर तुला समजलं असतं कि माझ्या मनात काय आहे ते …
गाणाऱ्या पाखरांबरोबर जर तू गाऊ शकली असतीस ,
तर तुला समजलं असतं कि माझ्या मनात काय आहे ते …
सागराच्या लाटा पलीकडे जर तू बघू शकली असतीस,
तर तुला समजलं असतं कि माझ्या मनात काय आहे ते …
नदीच्या पाण्याबरोबर जर तू वाहू शकली असतीस,
तर तुला समजलं असतं कि माझ्या मनात काय आहे ते …
झाडांच्या पानांची सळसळ जर तू समजू शकली असतीस,
तर तुला समजलं असतं कि माझ्या मनात काय आहे ते …
बरसणाऱ्या पावसाला मनात साठवलं असतंस,
तर तुला समजलं असतं कि माझ्या मनात काय आहे ते …
मला तर तू कधी ओळखू शकली नाहीस,
पण मी तुझा मनातच होतो.
माझ्या मनात जरासं डोकावून बघितलं असतंस ,
तर तुला समजलं असतं कि माझ्या मनात काय आहे ते …
khup........chan
ReplyDeletesundar
ReplyDelete