दोन दिवस झाले… पाऊस थांबायचं नावं घेत नव्हता.... वादळचं आलेलं ना, त्यामुळे पुढचे दोन दिवस कॉलेज बंदच होतं. संजयने कॉलेजमध्ये फोन करून conform केलं होतं… दोन दिवस घरात राहिल्याने त्याला आता कंटाळा आला होता. त्यातून, दिवसातून दोन-तीनदा call करणाऱ्या श्वेताने,त्याला साधा miss call ही केला नव्हता. त्याने तर तीन वेळा श्वेताला call केला होता. दोनदा तर call उचललाचं नाही आणि तिसऱ्यांदा " तुला थोडयावेळाने करते call" असं सांगून call केलाचं नाही. संजय त्याचं विचारात होता कधीचा," नक्की काहीतरी बिनसलं आहे श्वेताचं.. " ,संजय खिडकीपाशी उभा राहून विचार करत होता... तेव्हाच घरातला फोन वाजला,..... " hello... कोण बोलतंय... " संजयने विचारलं... " Hi.. संजय... पायल बोलतेय.... कसा आहेस ? " ," हा.. बोल पायल.. मी ठीक आहे... काही काम होतं का... ? "," नाही रे... सहज फोन केला मी.... " ," OK... " थोडावेळ काहीचं बोलणं नाही." मग पायल बोलली... " Hello ,संजय.... तू गेलेलास का कॉलेजला... " ,"नाही.... हा, पण मी call केलेला.... बंदचं आहे कॉलेज... "," तू जाणार आहेस का उद्या .. " ,"बघू.. पाऊस नसला तर जाईन… का गं... "," नाही मी पण आले असते ना मग , खूप दिवस भेटलो नाही ना आपण म्हणून.. "," OK , अजून conform नाही उद्याच.. तुला call करतो मी रात्री, उद्या जाणार असेन तर.. "," ok .. " ," अजून काही बोलायचं होतं का .. " संजयने विचारलं. " नाही , तसं काही विशेष नाही.. " ," मग.. "," जाऊ दे..... काही नाही... Bye... Good Night , Sweet Dream's... " पायल म्हणाली... " पायल... ! ... काय करतेस तू…. शुद्धीवर आहेस ना... " संजय आश्चर्याने ओरडला... " का... काय झालं... " ," दुपारचे चार वाजले आहेत आणि Good Night काय करतेस.. ?"," Sorry ... Bye.. " म्हणत पायलने घाईतच फोन cut केला... " हिला काय झालंय.... अशी काय करते हि पायल.. " विचार करत करत त्याने mobile उचलला तर ६ miss call …. सगळे पायलचेच... संजय विचारात एवढा मग्न झालेला होता कि त्याचा mobile वाजत आहे हे देखील माहित नव्हतं.
घरात बसून कंटाळलेला तो... आणि आता पाऊसही थांबलेला, संध्याकाळचे ५ वाजले होते. रहदारी सुरु झाली होती रस्त्यावर.. त्याने श्वेताकडे जाण्याचा निर्णय घेतला... " आई... मी श्वेता कडे जाऊन येतो गं.. " संजयने mobile घेतला आणि घराच्या बाहेर पडला. पाऊस तब्बल दोन दिवसानंतर थांबलेला... काही ठिकाणी पाणी तुंबलेलं.. लोकं त्यातून वाट काढत काढत जात होती.. मध्येच एखादी गाडी पटकन निघून जाई आणि भुरकन पाणी उडवे.. मग लोकांची तारांबळ... स्वतःला वाचवण्यासाठी…. कोणी त्यात मौजमजा करायचं तर कोणी त्या गेलेल्या गाडीला शिव्या देत राहायचं.. मजेशीर अगदी.... एकाचं ठिकाणी दोन टोकांची माणसं... बाजूलाच असलेल्या मैदानात काही मुलं football खेळत होती... चिखलात... घाणेरड्या पाण्यात... त्यांना फक्त खेळायचं होतं... बस्स.... श्वेताचं घर तसं लांबच होतं जरा., पण आजूबाजूचे देखावे पाहत पाहत संजय श्वेताकडे कधी पोहोचला ते कळलंच नाही.
दारावरची बेल वाजवली. श्वेताच्या आईने दरवाजा उघडला. " काकू... श्वेता आहे... ? "," ये संजय… आत ये… " म्हणत श्वेताची आई त्याला घरात घेऊन आली... "बस... चहा घे जरा.. " ," नको काकू... श्वेताला बोलावता का जरा.. "," अरे... श्वेता नाही आहे... डॉक्टरकडे पाठवलं आहे तिला.. " ," काय झालं काकू…श्वेताला " ," गेले दोन दिवस ती सतत पावसात भिजत आहे, मग सर्दी नाही होणार, तापही आहे अंगात... कोण सांगणार तिला… जातंच नव्हती, तिचे पप्पा जबरदस्ती घेऊन गेलेत तिला डॉक्टरकडे.. ","श्वेता, कशी भिजू शकते पावसात... तिला तर आवडत नाही ना पाऊस.. "," अरे... काय झालंय तिला कळतंच नाही... गप्प गप्प असते, तिच्या रूम मधून बाहेरच पडत नाही.... कोणासोबत भांडण झालं का तर ते पण नाही.. हिच्याबरोबर भांडण करायची हिंमत फक्त तुझ्याकडे आहे.... तुझ्याबरोबर काही झालं का.. ","नाही... काही नाही..... मला माहित नाही काय झालं ते... ठीक आहे… काकू... मी नंतर call करतो तिला... " ," चालेल.. मी सांगते तिला कि तू आलेलास ते... " ," Bye काकू .. म्हणत संजय निघाला. श्वेता पावसात कशाला भिजते आहे... काहीच कळत नाही.. तेवढयात पावसाला सुरुवात झाली आणि संजयच्या लक्षात आलं कि तो छत्री घ्यायलाच विसरला. मग एका आडोशाला संजय उभा राहिला… थोडा वेळ गेला असेल… उदय तिथूनच गाडीतून चालला होता, संजयला बघितलं तसं त्याने गाडी थांबवली." संजय,…. ये लवकर.....बस गाडीत... " संजय धावतच गाडीत येऊन बसला.. " काय रे... एवढया पावसात इकडे काय करतो आहेस... आणि कॉलेजला गेलेलास का.. " उदयचा प्रश्न.. " अरे... कॉलेज बंदच आहे, मी केलेला फोन.. आणि श्वेताकडे आलेलो ना.. ती नाहीच आहे घरी म्हणून परत चाललो होतो तर पाऊस आला... " ,"ok ... ok... आता इकडे आला आहेस तर चल माझ्या घरी... "," नको रे, कशाला... "," चल रे.. काही काम तर नाही आहे.. नंतर सोडतो तुला मी घरी.. चल.. "," ok ... चल.. " संजय तयार झाला.
जवळच उदयचा Flat होता. तिकडेच गेले ते. " घरात कोणी नाही वाटते." संजयने आल्याआल्याच विचारलं." हो रे... मम्मी पप्पा, कालचं पिकनिकला गेलेत. मी आणि नेत्रा, दोघे आहोत घरी.. " नेत्राचं नाव ऐकुन संजय जरा घाबरला.हि पण आहे घरी.. बापरे... " तू कॉफी घेणार कि चहा.. ?"... " कॉफी चालेल मला."," ok , मी सांगतो कॉफी करायला.. आणि मीही जरा फ्रेश होऊन येतो, wait कर जरा.. " ," ok …. " संजय म्हणाला. " उदय.. " संजयने हाक मारली तसा उदय थांबला. " काय रे.. "," नेत्रा कुठे आहे... खूप दिवस बोलणं झालं नाही आमचं म्हणून विचारलं .. "," तिच्या बेडरूम मध्ये असेल.. जा.. तिला भेटून ये.. मी येतो कॉफी घेऊन तिथे... " आणि उदय निघून गेला. संजयने भीत भीतच नेत्राच्या रूमचा दरवाजा ठोठावला. " कोण आहे.. ? " ," मी... संजय.. " आतून कोणताच response नाही.. " येऊ का आत मी.. ","दरवाजा उघडाच आहे.. " नेत्राचा आवाज. दरवाजा उघडून संजय आत आला. सगळ्या वस्तू कश्या व्यवस्थित आपल्या आपल्या जागी.. स्वच्छ रूम एकदम.. आणि एका कोपऱ्यात दोन bags भरलेल्या.... नेत्रा तिच्या बाल्कनीत उभी होती,पावसाला पाहत. संजयला पाहून तिला कोणताच आनंद झाला नव्हता. " कशी आहेस नेत्रा.. ?"," ठीक आहे...", पुढे काहीच प्रश्न नाही कि बोलणं नाही. नेत्रा पावसाकडे पाहत होती. " उद्या येणार आहेस का कॉलेजला." नेत्राने मान हलवून नकार दिला. पुन्हा शांतता... तेव्हा उदय कॉफी घेऊन आला. " हं… संजय कॉफी.... " ," Thanks " आणि नेत्राचा mobile वाजला तशी ती रूम बाहेर गेली. " काय झालं... नेत्रा गप्प का... उद्या कॉलेजला येणार का तर नाही बोलली... "," अरे... हो... तुला सांगायचं विसरलो मी..नेत्राने कॉलेज सोडलं.. " ,"काय ... ? " संजय दचकलाचं," अरे.... तिच्या मनात काय आलं कोणास ठाऊक .. पप्पांना बोलली , मला वेगळं काहीतरी शिकायचं आहे... म्हणून दुसरीकडे शिकायला जायचं आहे.... "," हा... मग... "," पप्पांच्या ओळखी खूप आहेत ना.. मग झालं admission लगेच... " , " पण कॉलेज बदलायचं ठरलं कधी... "," कालच.... दोन दिवस हि गप्प गप्प असायची.. म्हणून पप्पांनी विचारलं तेव्हा ती हेच म्हणाली कि कॉलेज बदलायचं आहे…. आता तिचा हट्ट पप्पा लगेच पुरवतात... " ," कुठे admission घेतलं तिने.. " ," दिल्लीला , तिकडेच रहाणार म्हणून या bag's भरून ठेवल्या आहेत, उद्या जाईल ती रात्री." संजयला तर धक्का बसला होता. नेत्रा बरोबर तर नीट बोलायला मिळालं नव्हतं… थोडावेळ संजय विचारात घडून गेला.
मग उदयनीचं त्याला विचारलं," श्वेता कशी आहे रे.. " संजय तसाचं विचारात…" संजय.. " उदयनी त्याला हलवलं. " श्वेता... श्वेता कशी आहे.. ?", " हं... हो.. बरी आहे... " संजय जागा झाला. " भेटलोच नाही दोन दिवस तिला.. असं वाटते किती महिने भेट झाली नाही तिची आणि माझी.. " उदय म्हणाला. " एक गोष्ट विचारू तुला.. " संजय कॉफी पीत पीत म्हणाला," विचार.. " ," तुला हे माहित आहे ना कि श्वेता तुला अजिबात पसंत करत नाही, सारखा insult करते तुझा... तरीही तू तिच्याच मागे का असतोस... I mean , कॉलेजमध्ये एवढया मुली आहेत तरी... राग मानू नकोस पण तुला विचारणारच होतो मी... " तशी उदयनी हलकीशी smile दिली. " प्रेम करतो रे तिच्यावर... " संजय उदयकडे पाहतच राहिला. " तिला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं ना मी…. ११वी ला, तेव्हाचं मला ती आवडली होती. तिचा स्वभाव जरी बिनधास्त असली, मोठयाने बोलत असली तरी तिच्या मनात काही नसत तसं... हे माझ्यापेक्षा तुला जास्त माहित आहे... कोणालाही मदत करायला जाते.... सगळ्या गोष्टी आवडतात मला तिच्या... " ," खरंच प्रेम आहे तुझं.. " संजयने विचारलं. " हो.. मनापासून... म्हणून कितीही मला बोलत असली तरी ते सगळं मला चालते…. आता तिचं माझ्यावर प्रेम असू दे नाहीतर नसू दे... त्याचा काही प्रोबेल्म नाही... असंही नाही कि तिने माझ्यावरच प्रेम करावं…. प्रेम कसं निस्वार्थ असावं." संजयनी उदयच हे रूप कधीच पाहिलं नव्हतं. " गेले काही दिवस ती शांत असते… मी विचारलं तर मला काही सांगितलं नाही, म्हणून माझही मन लागत नाही. तुला काही बोलली का ती.. "," नाही.. " मग दोघेही शांत... " चल ... मी निघतो... घरी जायला उशीर होईल."," थांब... मी सोडतो तुला गाडीतून.. " ,"नको... thanks... मी जातो चालत, पाऊस सुद्धा थांबला आहे." संजय निघाला तसा उदयने पुन्हा थांबवलं." Hey संजय....श्वेताला काही सांगू नकोस मी जे काही बोललो ते... आणि प्लीज तिला काय झालं आहे ते बघ ना... गप्प गप्प बरी नाही दिसत रे ती... " , "ठीक आहे.... नाही सांगणार.... Bye." म्हणत संजय निघाला. दारात नेत्रा उभी, निर्विकार चेहरा... " Bye नेत्रा… and best of luck for your future.... " संजय जाता जाता नेत्राला म्हणाला.. " same to you…. संजय." नेत्रा म्हणाली आणि वर घरात निघून गेली. संजयला जरा वाईटच वाटलं.
संजय तसाच घरी आला, विचार करत करत..जेवलाही नाही बरोबर... मनात श्वेता, नेत्रा आणि उदयचे विचार.... त्याला करमतच नव्हतं. घरात सारख्या येरझाऱ्या घालत होता. न राहवून त्याने श्वेताला call केला. दोनदा तर उचललाच नाही आणि तिसऱ्यांदा cut केला..... " अशी काय करते हि श्वेता.. " संजय मनात बोलत होता. चौथ्यादा त्याने call केला, तेव्हा खूप वेळाने तिने तो उचलला… " Hello.... श्वेता ... Hello.. " पलीकडून काहीच response नाही. " श्वेता... मला माहित आहे कि तू ऐकते आहेस ते... फोन का उचलत नाहीस माझे... ","असचं "," काय असचं ? " ," काही नाही... काय काम होतं... " ," म्हणजे... मी तुला काम असलं तरच call करायचा का... ? सहज call करू शकत नाही... " श्वेता काही बोललीच नाही. " अगं... बोल ना काहीतरी... इतके दिवस झाले , बोलतच नाहीस…. माझ्याशी तरी बोल... काय झालं ते सांगशील का... "," काही नाही झालाय.. " ,"नाही.. आज तुला सांगायलाच लागेल मला , नाहीतर.... नाहीतर तुझ्या घरी येतो आता मी... "," प्लीज संजय… मला त्रास नको देऊस.. ","त्रास.... आणि मला काय मजा वाटते.. एवढी वर्ष आपण एकत्र आहोत... तेव्हा माझा कधी त्रास झाला नव्हता तुला.. ", " तेव्हाची गोष्ट वेगळी होती... ."," आणि आता काय बदललयं... " श्वेता पुन्हा गप्प झाली. " बोल... श्वेता... बोल.. "," तेव्हा आपली friendship होती... "," मग तोडलीस friendship .. " ," नाही.... आता.. " पुन्हा शांतता.... " काय आता श्वेता... " बाहेर पावसाने सुरवात केलेली... " आता...... आता तुझ्यावर प्रेम करू लागली आहे… damn it." श्वेता मोठयाने बोलली आणि फोन cut.... संजय तसाच फोन पकडून उभा... बाहेर पावसाने जोर धरला होता... आकाशात विजांचा तांडव सुरु झालेला, पुन्हा एका नव्या वादळाची चाहूल लागलेली... संजय अजूनही तसाच उभा… confused. काय झालंय,त्याला कळत नव्हतं. तसाच विचार करत तो बाल्कनीत उभा होता. आणि त्याचा फोन वाजला," हा पायल ... बोल.. "," हेलो संजय... उद्या जाणार आहेस का कॉलेजला... तू बोलला होतास ना call करेन म्हणून केलासचं नाही.... "," हं... हो… विसरलो मी जरा... उद्या जाईन बहुतेक कॉलेजला... " ," Wow.. मग मी पण येते…. उद्या भेटू… Bye " पायलने फोन ठेवून दिला. संजय बेडवर येऊन पडला.... पण झोप येईल तर शप्पत… डोक्यात तेच विचार…. श्वेता कशी प्रेम करू शकते माझ्यावर... आम्ही तर चांगले मित्र आहोत… तिचा विचार सुद्धा नाही आला कधी मनात... मग तिच्या मनात कस आलं प्रेमाचं… म्हणून ती पावसात भिजत होती का.. ? विचार करून त्याचं डोक दुखायला लागलं… तसाच तो झोपी गेला.
पुढचा दिवस, संजय कॉलेजला जाण्यासाठी निघाला... वर आकाशात काळ्या ढगांची गर्दी होतीच, सोबतीला वाराही होता…. श्वेताकडे जाऊया कि नको… विचार करत होता. न जाण्याचा निर्णय तो कॉलेजमध्ये आला. कॉलेजमध्ये फार कमी संख्या होती मुलांची. त्यातून एक-दोन शिक्षक आलेले फक्त... मग काय, त्यादिवशी सुद्धा कॉलेज बंद.. आलेले student's असेच परत घरी निघाले. संजय घरी जायला निघाला, तसं त्याचं लक्ष दुसऱ्या मजल्यावर गेलं. तिथे श्वेता उभी होती. संजयकडेच पाहत होती. संजयने तिला खालूनच थांबायला सांगितलं आणि तो वर आला.
त्यावेळेस तिथे कोणीही नव्हते, फक्त श्वेता आणि संजय… " श्वेता.... काय झालंय तुला.. " श्वेता तशीच बघत होती संजयकडे…. " बोल ना श्वेता... " ," प्रेम झालंय.. " ," मग एवढी वर्ष आपण एकत्र होतो तेव्हा कधी तुला वाटलं नाही.. "," प्रेम कधी सांगून होतं नसतं संजय.. आणि मीही खूप विचार केला. गेले काही दिवस तेच चाललंय डोक्यात माझ्या.. आपलं चांगलं जुळतं, एकमेकांना समजून घेतो आपण.. मग पुढेही आपण एकत्र राहू शकतो ना.." ," श्वेता ..... " संजय रागातच बोलला.. " काय बोलते आहेस तू … तुला तरी कळते आहे का.. ? .. एकमेकांना समजून घेणं हे प्रेम नसतं. " ," म्हणजे मी तुला आवडत नाही असा अर्थ होतो."," आवडणं आणि प्रेम असणं यात खूप फरक आहे श्वेता.. ","ठीक आहे मग... " श्वेता जाताजाता म्हणाली. .... " Friendship कि प्रेम हे तुला ठरवायचं आहे आता... Friendship तर राहिली नाही आता, प्रेम तरी टिकते का ते बघू... "म्हणत ती झपझप निघून गेली. एकदम सडेतोड वाक्य.... तुटली Friendship …. एवढया वर्षांची… प्रेमामुळे… विचार करत करत संजय खाली आला. आणि कॉलेज बाहेर पडला. कुठे जाऊ ते त्याला कळत नव्हतं.… इतक्यात पायल आली…. संजय तसा बाजूलाच उभा होता, त्यामुळे पायलनी त्याला पाहिलं नाही. तशीच ती कॉलेजमध्ये आली तर कॉलेज बंद... watchman काका होते तिथे... " क्या काका.. आजपण कॉलेज बंदच है क्या... ","हा बेटा... तुम्हारे टीचर नही आये है ना कोई इसलिये"," तो अच्छ्या है ना काका... तुम्हाला पण सुट्टी…. आम्हाला पण सुट्टी…. " ," घर जल्दी जाना बेटा... बारीश आनेवाली आहे... " ," अरे काका... पावसाला कोण घाबरता है... पाऊस मै तो मस्त भिजने का... " आणि दोघेही हसायला लागले.... तेव्हा तिला आठवलं अचानक…," अरे काका.... कोणी आलेलं का माझ्या ग्रुपचं... "," हा... वो संजय तो अभी अभी बाहर गया.. ", संजयचं नावं ऐकलं आणि " चलो काका ... Bye. " म्हणत पायल पळालीच. बाहेर येऊन बघते तर संजय असाचं उभा होता एकटाचं... पायलला बरं वाटलं त्याला एकट्याला पाहून... त्याच्याकडे निघाली आणि पावसाने सुरुवात केली. पायलने पटकन छत्री उघडली आणि धावत धावत जाऊन संजयलाही छत्रीत घेतलं. " ये संजय... भिजतोस काय असा.. " संजय त्याच्याच तंद्रीत. " संजय.... संजय " पायलनी त्याचा हात धरून हलवलं त्याला." हं.. हो… काय झालं." संजय जागा झाला. पायल बाजूला उभी आणि तिच्या छत्रीत आहोत हे त्याला नंतर कळलं. " तू कधी आलीस.. ?" ," मी मघाशीच आली, तुझंच लक्ष नाही… आणि श्वेता आलेली का.. " , " श्वेता... ? " संजय पुन्हा विचारात हरवून गेला. मस्त पाऊस पडत होता…. गार वारा, रस्त्याला कोणीच नाही आणि पायल सोबत संजय. मस्त romantic वातावरण. दोघेही हळूहळू चालत होते.... " काय मस्त पाऊस पडत आहे ना… खूप दिवसांनी भेटलो आपण… आणि तू छत्री पण विसरलास वाटते... ये आपण मस्त गरमा गरम कॉफी घेऊया का…. कांदाभजी पण खाऊया... " पायल आपली एकटीच बडबड करत होती. संजय त्याच्या विचारात गढून गेलेला.
पायल बोलत होती, संजय विचार करत होता…असचं चालू होतं कितीतरी वेळ. मधेच थांबली पायल… " अरे कुठे लक्ष आहे तुझं. मी एकटीच बोलते आहे.... जाऊया का कॉफी घेयाला.. " ," हं... हो.. नको... नको आज."," चल ना रे संजय... दोघेच तर आहोत.. " ," नको… आज मूड नाही आहे माझा.. " संजय जरा त्रासिक आवाजात म्हणाला. श्वेताच्या tension ने त्याच्या डोक्याचा भुगा केला होता. " ok , मग मी छानसं गाणं म्हणते… मग तुझा मूड चांगला होईल." म्हणत पायल " आला आला वारा... संगे पावसाच्या धारा.. " गाणं म्हणू लागली. " नको… पायल प्लीज.. "," ठीक आहे, दुसरं म्हणते... " म्हणत " सावन बरसे तरसे दिल.. " म्हणायला सुरुवात केली." ," प्लीज… शांत रहा पायल." संजय जरा रागातच म्हणाला. " हे नको… मग तिसरं म्हणते." म्हणत पायल " टीप टीप बरसा पानी.. " म्हणू लागली. आणि संजय मोठ्यानेच ओरडला... "प्लीज पायल.... What's your problem... गप्प रहा जरा.. " पायल दचकली... जोरात वाऱ्याचा झोत आला, तशी पायलची छत्री उडून गेली. दोघेही पावसात भिजू लागले. तेव्हाच वीज कडाडली आणि पायलने संजयला घट्ट मिठी मारली. एकदम फिल्मी सीन…. संजय लगेच भानावर आला आणि त्याने तीची मिठी सोडवली..... " sorry संजय.... भीती वाटली मला.. " पायल लाजत संजयला म्हणाली. संजय अगोदरच tension मध्ये, त्यात पायलची भर पडली. " काय झालंय तुम्हाला, सगळ्यांना... का असे वागत आहात , माझ्याशी… ती नेत्रा , मग श्वेता आणि आता तू.. " ," काही नाही रे .... हा पाऊस आहे ना… तो असाच असतो... त्यातून बघ कसा प्रेमाचा शिडकावा होत असतो…. वेडं करून टाकतो अगदी… असं म्हणतात खरं प्रेम मिळालं कि असा प्रेमाचा पाऊस पडतो." पायल खूषीतच सांगत होती. संजय रागातच होता, त्यात पायलचं असं बोलणं... त्याने तिचे हात पकडले आणि तिला जोरात हलवलं... " जागी हो पायल…. जागी हो… असं फक्त स्वप्नात असते. रियल लाईफ मध्ये फक्त तो पाऊसच असतो…सर्वांना भिजवणारा पाऊस… स्वप्नातून बाहेर ये… " ," पण स्वप्नात तर तूच घेऊन गेलास ना मला… मग बाहेर कशी येऊ.. ? "," काय म्हणायचं तुला.. ? " ," तू वर्णन केलेली तुझी " ती " म्हणजे मीच आहे ना... "," काय अर्थ आहे याचा.. ?"," एवढं पण कळत नाही, माझंही प्रेम आहे तुझ्यावर.. " पायल बोलली आणि जणू काही संजयच्या पायाखालची जमीनचं सरकली. त्याने हातानेच दूर लोटलं तिला. " काय झालं संजय... तुझंही माझ्यावर प्रेम आहे ना.. " एव्हाना पावसाचा जोर वाढला होता.... विजा चमकत होत्या…. आणि संजयच्या मनात घालमेल सुरु झालेली. श्वेता कि पायल... "हो ना संजय... " पायलने पुन्हा विचारलं… " नाही.... माझं तुझ्यावर प्रेम नाही.... " संजय शांतपणे म्हणाला आणि मस्त वीज चमकुन गेली, जणू काही ती पायल वरच हसली होती… " मस्करी करू नको हा... मला माहित आहे…. तुझं माझ्यावर प्रेम आहे ते.. " पायलच्या चेहऱ्याचा रंग बदलला. संजय गप्पच. " बोल ना… संजय.. " ,"एकदा सांगितलं ना.... नाही आहे…. .... नाही आहे…. .... नाही आहे…. " संजय रागातच होता.… ते ऐकून पायलला रडूच आलं.संजय भानावर आला... आपण काहीतरी रागात बोललो त्यामुळे पायल रडत आहे. हे त्याला कळून चुकलं. " sorry... sorry पायल.. मला असं.. " त्याचं बोलणं मधेच थांबवत पायल बोलली… " sorry कशाला.. मीच thank's म्हणते तुला... मला स्वप्नातून जागं केल्याबद्दल ." अशी म्हणाली आणि रडत रडतचं ती धावत निघून गेली... संजय तसाच उभा पावसात...
दुसऱ्या दिवशी, पाऊस थांबलेला त्यामुळे कॉलेज सुरु होतं. संजयचं tension कमी झालं नव्हतं, तरी तो आलेला कॉलेजला…. lecture पुन्हा सुरु झालेलं. student's बऱ्यापैकी होते वर्गात. संजयने नजर फिरवली वर्गात… उदय आलेला, नेत्रा तर कॉलेजचं सोडून गेलेली. श्वेता आलेली नाही आणि कालच्या घटनेमुळे पायल येण्याची शक्यता कमी होती. संजयला फार वाईट वाटत होतं, पायलबाबत. पण काय करणार…. डोक्यात एवढे विचार चालू होते कि त्याला काहीच कळत नव्हतं काय करावं ते. आलेलं वादळ निघून गेलं होतं. त्यामुळे पाऊसही जवळपास बंद झाला होता. कॉलेज, practical's, lecture नेहमी सारखे सुरु झाले होते.... Back to normal life... पण यांची Friendship जरा विखुरली होती..... उदय आणि श्वेता बोलायचे... पण संजयशी तेवढं बोलणं व्हायचं नाही. फक्त .... " Hi... Bye... कशी आहेस.. " एवढंच त्याचं संभाषण संपायचं. संजय अजूनही त्याच्या relation बाबत विचार करत होता.. आणि पायल... ती तर हिरमसून गेलेली अगदी... कोणाबरोबर बोलणं नाही, हसणं तर नाहीच. शेवटच्या बेंचवर येऊन बसायची. कॉलेज सुटलं कि तडक बाहेर पडायची, घरी जाण्यासाठी. संजयने एक-दोनदा बोलायचा प्रयन्त केला होता , परंतु ती आलीच नाही समोर त्याच्या. सगळ्यांच्याच तोंडच हसू नाहीसं झालं होतं, Friendship नाहीशी झाली होती.
त्यादिवशी, practical's संपल्या,नेहमीप्रमाणे पायल लगेचच निघून गेली… श्वेता आणि उदय , संजयची वाट पाहत थांबले… संजय बाहेर आला तसे तेही निघाले. " उदय... मला जरा note's काढायच्या आहेत. तुम्ही जा पुढे... " संजय उदयला म्हणाला," चल उदय... तो नाही येणार आपल्याबरोबर... " म्हणत श्वेता पुढे निघून गेली. उदयला देखील कळलं होतं कि हे दोघे बोलत नाहीत ते. त्याला तो काही न बोलता निघाला. संजयला त्यांच्याबरोबर जायचंचं नव्हतं. खोटंच बोलला तो. ते दोघे जसे गेट बाहेर गेले, तसा संजय निघाला. आणि मागून आवाज आला," संजय.. थांब जरा... " मागे सायली madam…. " Yes, ma'am... काही काम होतं का... ? " ," तुला वेळ असेल तर जरा बोलायचं होतं.. " संजय विचारात पडला,त्या काय बोलणार ते. " आहे का वेळ.. ","हो…ma'am..बोला.. ","इकडे नको... चल… माझ्या कॅबीनमध्ये." ," ठीक आहे.. चला.. " दोघेही टीचर रूम मध्ये आले."हा, बोला ma'am..आता.. "," खूप दिवसापासून विचारायचं होतं तुला... तुमच्या ग्रुपमध्ये भांडण झाली आहेत का.. " यावर संजय काही बोलला नाही. " काय झालं संजय.. मला उत्तर नाही दिलंस आणि सगळं खरं खरं सांगायचं मला... " ," काय सांगू ma'am..सगळी tension माझ्याचं डोक्यावर आहेत असं वाटते... " ," म्हणून तुझं आजकाल लक्ष नसते lecture आणि practical मध्ये… मला सांग, काही tension आहे का.... " संजयला कुठून सुरुवात करावी ते कळत नव्हतं. "हि सगळी चुकी माझी आहे ma'am..त्यादिवशी मी मनातलं सांगितलं नसतं तर हे सगळं confusion झालंच नसतं." ," काय confusion आहे .. ? " ," नेत्राने कॉलेज सोडलं.. का तर माझ्या मनात तिला जागा नाही... उदयचं श्वेतावर प्रेम आहे, श्वेताचं माझ्यावर प्रेम आहे आणि पायलला वाटते,…. माझं तिच्यावर प्रेम आहे…. श्वेता म्हणते... Friendship कि प्रेम... याची निवड तू कर.. तिकडे उदय तिच्यासाठी काहीही करायला तयार आहे.. पायलला तर स्वप्नातून बाहेरच पडायचं नसते. " ," मग.... तुझं काय मत आहे .? " ," श्वेतावर कसा प्रेम करू शकतो मी.. ती तर माझी Best Friend आहे… आणि उदयचं काय करू... त्याला सांगू तिच्या आयुष्यातून निघून जा... पायलचे तर मी स्वप्नाचं जगच मी नष्ट केलं आहे, जवळपास. पाहिलत ना तुम्ही कशी असते ती आता… वेडा होणार आहे मी." संजय डोकं पकडून बसला होता.…. खूप वेळानंतर सायली madam बोलल्या. " एक सांगू का संजय… प्रेम हे जबरदस्ती कोणावर केलं जात नाही रे.. … श्वेता आणि तू चांगले मित्र आहात. श्वेताचं असं वागणं मलाही खटकलं जरा. उदयला मी observe केलं आहे. खूप काळजी घेतो तिची तो.…. तुम्ही बोलायचं बंद झाल्यापासून तर जास्तच. प्रेम हे मनापासून केलं जातं…. माझ्याही मनात जोडीदाराची एक संकल्पना होती, परंतु माझं arranged marriage झालं आणि मनातल्या आशा-आकांशा राहून गेल्या.तुला बघितलं तेव्हा मला तू आवडला होतास. पण याचा अर्थ असा नाही कि तुही माझ्यावर प्रेम करावसं, बरोबर ना.. " संजय ऐकत होता," मी कधीकधी उगाचच तुझ्याबरोबर बोलण्याचा प्रयन्त करते , ते माझ्या मनाला चांगलं वाटते म्हणून... त्याच्यापुढे काही नाही मनात माझ्या… प्रेमाचा अर्थचं बदलून जातो अगदी. प्रेमात कोणताही स्वार्थ नसावा. खरी गोष्ट सांगू... तू जेव्हा तुझ्या मनातली " ती " चं वर्णन केलंस ना…. तेव्हा माझ्या डोळ्यासमोर एकच चेहरा होता… " पायल " चा.. " संजय ऐकतचं राहिला. " हा संजय... अगदी सगळं वर्णन तंतोतंत बरोबर नसलं तरी बहुतेक वर्णन हे पायलला शोभेल अस होतं. तिलाही तू पहिल्यापासून आवडायचास ना... श्वेता आणि नेत्रा... तुझ्या वर्णनात कुठेच बसत नाहीत. " बोलता बोलता madam उठल्या. " निर्णय तुझ्यावर आहे संजय… मला वाटते तू श्वेता बरोबर एकदा बोलायला हवंस... जीवनात काही जणांना त्यांच्या मनासारखं कधीच मिळत नाही, तुझ्यासमोर जे काही आहे … ते तू सोडू नकोस, असं माझं म्हणणं आहे… बाकी निर्णय तूच घेणार आहेस… Bye ." म्हणत सायली madam निघून गेल्या. संजयलाही थोडं हलकं वाटतं होतं. श्वेता सोबत बोलायला हवं हा निर्णय पक्का केला आणि संजय घरी परतला.
संध्याकाळी, संजयने श्वेताला फोन केला.. " Hello, श्वेता... " ," हं… बोलतेय... " ," आहेस का घरी… जरा बोलायचे होते, तुझ्याशी.. " ," हो… आहे घरी... ये.. " म्हणत श्वेताने call cut केला. अगदी लगेच नाही परंतु एका तासाने संजय श्वेताच्या घरी गेला.. दारावरची बेल वाजवली तेव्हा तिच्या आईनेच दरवाजा उघडला. " हा ये संजय... " ," काकू…. श्वेता घरात आहे कि गेली बाहेर.. ", " अरे आहे बघ.. तुझीच वाट बघते आहे, गच्चीवर आहे बहुदा.. " ,"Thanks काकू.. " म्हणत संजय गच्चीवर आला. संध्याकाळचे ५.३० - ६ वाजले होते. पावसाचे दिवस त्यामुळे हवेत थंडावा होता. जरा वारा सुटला होता आणि श्वेता त्यांच्या घरासमोर असलेल्या झाडाकडे टक लावून पाहत होती... " श्वेता.. "संजयने तिला हाक मारली. तिने संजयला पाहिलं, तोंडावर बोट ठेवून शांत राहायला सांगितलं आणि हाताने इशारा करून बोलावले. संजय गेला तिच्या जवळ... " काय…?" संजयने हळू आवाजात विचारले. श्वेताने झाडाकडे बोट दाखवलं. चिमणी तिच्या पिल्लांना खाऊ भरवत होती. छान देखावा होता. चिमणी जशी उडून गेली, तेव्हा श्वेताने संजयला विचारलं," काही बोलायचं होतं तुला.. " संजय अजून त्या घरट्याकडे पाहत होता… थोडयावेळाने संजय बोलला," ये... तुला आठवते आहे का गं, तुझी एक मैत्रीण होती तिसरीत... तोंड एवढंसं होतं…. चिमणी म्हणायचे सगळे तिला... " ," हो.. हो.. , आठवलं आणि एकदा तर मला तिचा राग आलेला तेव्हा तिचा डबाच तोडला होता.. "," का.. गं " ," असंच.. मी चिमणी म्हणते म्हणून मला कावळा बोलली होती… मग काय तोडला डबा.. " ,"आणि घरी येउन काकांचा मार खाल्ला होता." तसे दोघेही हसले. " अरे हो... कालच तुझी जुनी मैत्रीण उषा भेटली होती…. Art's ला आहे ती… भेटते कि नाही तुला.. " संजय म्हणाला ," नाही रे… नाही भेटत ती आता… विसरली मला... " ," तिची गंमत आठवते तुला… मी एकदा तू समजून तिच्याच पाठीत धपाटा मारला होता… " ," हो आणि मी तुझ्या पाठीत... " दोघेही हसले. " तो प्रकाश आठवतो का ? तुझ्या मागे मागे असायचा शाळेत... " ," त्याला कसं विसरीन, माझ्या हाताचा मार खाणारा पहिलाच मुलगा तो... आणि ती होती ना, संगीता…. मला सारखी सांगायची, संजयशी मैत्री करून दे… मी बोलली जा उडत.. " ," हो हो आठवलं.... तुझं एक सिक्रेट माहित आहे मला. ते सांगितलं नाही घरी तुझ्या…. पैसे चोरून एकदा तू सिगरेट ओढली होतीस, शाळेत असताना." , " हो… आणि तुला माझी शप्पत घातली होती… आठवलं." श्वेता म्हणाली. " तुमचा छान ग्रुप होता ना... शाळेत, किती जणी होतात …. सहा जणी .. " ," हो पण आता वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. " ," तुला शाळेतली आठवीतली पिकनिक आठवते आहे... तुमच्या सहा जणींचे बुट लपवले होते कोणीतरी.. "," ते कसं विसरणार.... किती रडलो होतो आम्ही.. पण लगेच आणून दिले होते कोणीतरी दुसऱ्या दिवशी. " ,"आणि सेंड ऑफ चा दिवस आहे का लक्षात.. " ," आहे मग... " ," तुझी best friend दीपा, अगदी मिठी मारून रडत होती तुला.. " ,"हो रे …. खरच छान दिवस होते ते... " थोडावेळ तसाच गेला. " ये तुला ११वीतली गोष्ट आठवते आहे का… तुझी नवीनच friendship झालेली, त्या मोहित बरोबर आणि त्याने तुला propose केल होतं... "," बघ ना... चार दिवस झालेले …. friendship करून आणि लगेच propose…. Friend होता म्हणून मारलं नाही त्याला तेव्हा... " ," मला माहित आहे... तू त्याला नंतर थोबाडीत मारली होतीस ते... " ," जाऊ दे रे…. तो नंतर कुठे आला समोर… " श्वेता म्हणाली."तुझी अजून एक मैत्रीण होती ना , १२ वीला. काय नावं होतं तिचा… " ,"हा... हो… नम्रता… तिचं काय " ," तिचं बाहेर लफडं होतं ते माहित होतं मला.. "," हो... मग मला का नाही सांगितलं कधी तू ? " ," अगं, तिने शप्पत घातली ना तुझी.. म्हणून सांगितलं नाही... त्याच्याच कॉलेजला तिने आता , १३वीला admission घेतलं आहे."," असा होय.. लबाडा... मला कळू दिलंस नाही कधी.. " म्हणत तिने संजयच्या डोक्यावर टपली मारली. खूप दिवसांनी ते गप्पा मारत होते..... मनापासून हसत होते. " काय रे.. बऱ्याच दिवसांनी शाळेतल्या आठवणी काढल्यास... " श्वेता म्हणाली. " हो... असंच वाटलं म्हणून... " संजय म्हणाला.. मग थोडावेळ गेला…. दोघेही शांत... श्वेता बऱ्याच दिवसांनी tension free वाटत होती. " एक विचारू का श्वेता…?" संजय तिच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाला." विचार ना… " , " मी मघापासून तुझ्या सगळ्या जुन्या आठवणी काढल्या…. तुझ्या शाळेतल्या Best Friends ची नावं सांगितली.…. माझ्या एका तरी मित्राचं नावं तुला आठवते का आता... ? " श्वेता विचार करू लागली. " नाही रे.. "," निदान... ११ वी, १२ वी मधले मित्र, एखादी आठवण.. " श्वेता मेंदूवर जोर देऊन आठवत होती... " नाहीच आठवत असं काही.. ".
" ह्या वरून काही कळलं का तुला.. ?", संजय म्हणाला. " काय ते ? " श्वेताच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं. " पहिल्यापासून तू स्वतःच्याचं जगात हरवलेली असायचीस…. माझं जीवन, माझे friends, माझ्या आठवणी… बस्स. दुसरीकडे कधी लक्षचं नाही दिलंस तू... स्वतःला नेहमी तू मोठ्ठ समजत आलीस… आपल्या वागण्याने, बोलण्याने… समोरच्यावर काय परिणाम होतो, त्याचा कधी विचार केलास का... ? " श्वेताने मानेनेच नकार दिला. " तरी प्रत्येक वेळेस मी तुझ्या सोबत राहिलो… एक सच्चा मित्र म्हणून.… सुरुवातीला मलाही तशीच treatment मिळाली तुझ्याकडून… पण नंतर मी तुझा मित्र झालो. Best Friend तर कधीच नव्हतो ना तुझा,…. शाळेतले Best Friend, कॉलेजमधले Best Friend होते तुझे… त्यात मी कधीचं नव्हतो… प्रत्येक वेळेस तुझ्या पाठीशी उभा राहिलो, सावली सारखा… तुझ्या प्रमाणे मी माझ्या आवडी-निवडी बदलल्या… " संजय श्वेताकडे पाहत म्हणाला… आभाळात जरा ढगांची पुन्हा गर्दी होऊ लागली होती… " ये श्वेता …. तुला आठवतेय का… शाळेत असताना एकदा मी पावसात भिजत होतो, तेव्हा तू मला बोलली होतीस कि तुला आवडत नाही पाऊस... आठवलं... तेव्हा पासून मीही भिजत नाही पावसात... कारण माझ्या Best Friend ला म्हणजे तुला पाऊस आवडत नाही... एवढं करूनही, तू बोलतेस Friendship नाही राहिली आता... " संजय जरासं उगाचच हसत म्हणाला.… वारा पुन्हा सुरु झाला होता. संजय दुसरीकडेच कुठेतरी पाहत होता, श्वेता मान खाली करून उभी होती.." ती... ती पायल…. बोलते, तुझ्यावर प्रेम आहे…. नाही... नाहीच बोललो तिला, मनात नसताना… मलाही ती आवडते, तरीसुद्धा नाही बोललो मी तिला... का... का तर माझी Best Friend माझ्या प्रेमात पडलीय… रडवलंचं त्यादिवशी मी पायलला... कोणाची चुकी होती यात... त्या पायलचीचं चूक होती... विचारून प्रेम करायचं ना तिने... मग रडणं, फुगणं आलचं नसतं तिच्या वाटयाला.. " पुन्हा पावसाचं वातावरण निर्माण झालं होतं.... " श्वेता... तू तुझ्याचं जगात आहेस अजून,…. एवढंच काय... तुझा वाढदिवस दरवर्षी मोठया धडाक्यात साजरा करतो मी… माझ्या वाढदिवस तर तुझ्या लक्षातच नाही ना… शाळेपासून एकदाही तुला विचारावंसं वाटलं नाही कि तुझा Birthday कधी असतो ते.. " श्वेताकडे शब्दचं नव्हते. " जाऊ दे… तू अजूनही " मी , माझं आणि मला " या त्रिकोणी जगात वावरतेस…. त्यातून बाहेर पड. आपली Friendship टिकवणं तुझ्या हातात आहे आता... मीच होतो तुझ्यासाठी प्रत्येक वेळेस.... पण तू माझ्यासाठी कधीच नव्हतीस गं... Friendship कि प्रेम , आता तुझ्या हातात आहे. ज्याची निवड करशील ते मला मान्य आहे. चल , निघतो मी… Bye… " आणि संजय निघाला, पुन्हा पाऊस... श्वेता पुन्हा भिजत होती पावसात...
पुढचा दिवस , …. श्वेता नेहमीप्रमाणे कॉलेजला आलेली… संजय मात्र आलेला नाही. उदय आलेला. lecture सुरु होती नेहमी सारखी…. श्वेताने हळूच शेवटच्या बेंचवर नजर टाकली, पायल होती बसलेली तिथे…. एकटीच. चेहरा कोमेजलेल्या फुलासारखा… श्वेताला जरा वाईटच वाटलं. पुढच्या दिवशी, संजय आलाच नाही कॉलेजला… श्वेताने माहिती काढली तर कळलं, त्याचं काही काम होतं म्हणून तो आला नाही २ दिवस कॉलेजला. त्यादिवशी एक lecture ऑफ होता. सगळे मग निघाले वर्गाबाहेर. श्वेता उदयसोबत बाहेर निघाली, तर तिचं लक्ष पायलकडे गेलं... " उदय... तू हो पुढे... मी येते नंतर.. " ," ok.. " म्हणत उदय निघून गेला. ती पायल जवळ आली.. " Hi पायल.. ","Hi… " पायल उसनं हसू चेहऱ्यावर आणत म्हणाली. " बोलू का तुझ्याशी जरा.. ", पायल "हो" म्हणाली आणि दोघी गप्पा मारू लागल्या, बऱ्याच दिवसांनी.
संजय तीन दिवसांनी कॉलेजला आलेला. तिन्ही दिवस त्याने पायलला call करण्याचा प्रयन्त केलेला, पण तिने तो उचललाच नाही. lecture सुरु झाले आणि संपले… Practicals ला जाणार तर काही कारणात्सव रद्द केलेल्या होत्या…. सगळेच घरी निघाले. पायल नेहमीप्रमाणे आधीच निघून गेली,संजयने तिला अडवण्या अगोदर... संजय नाराज झाला जरा.... तसाच तो कॉलेजच्या बाहेर आला. आभाळ तर सकाळपासून काळवंडलेले होते, कधीचा भरून राहिलेला पाऊस.…. वर पाहत पाहत चाललेला संजय… आणि समोर बघतो तर श्वेता उभी… " Hi संजय.. " , " Hi श्वेता.. " ," थांबशील जरा... " संजय नाईलाजास्तव थांबला. " काही नाही रे... विचार केला खूप... प्रेम नाहीच जमत आपल्याला, त्यापेक्षा Friendship बरी... आणि मी काही त्याग वगैरे करत नाही हा.... तू सुद्धा उगाच मोठेपणा करू नकोस… समजलं ना.. पायल सोबत बोलणं झालं माझं... कशाला रडवलंसं रे तिला.. मनात होतं ना... तर म्हणे, माझी Best Friend माझ्या प्रेमात आहे... , साल्या filmy dialogue… हा.. " म्हणत तिने संजयच्या पोटात गुच्चा मारला. संजय बघतच राहिला तिच्याकडे. श्वेता पहिल्यासारखी वागत होती.. " त्या दिवशी एवढं lecture ऐकलं ना तुझं... कान जरा मोकळे झाले… आणि डोकंही... पायलचं prefect आहे तुला... मी तर उगाच म्हणत होते रे... माझी अक्कल जरा कमी पडली, ठीक आहे ना, लवकर शहाणंपण आलं ते... असो... Friendship च बरी बाब्बा... " संजय हसायला लागला. " जा... ती पायल आहे बघ तिकडे... तिला थांबवलं मघाशी मी... ती बघ समोर बसली आहे.. " संजयने पाहिलं तर समोरच एका बेंच वर पायल पाठमोरी बसली होती. " Thank You … श्वेता... " संजयने तिला मिठी मारली.. "जा लवकर.... आणि वेळ मिळाला तर तुझा बर्थडे कधी असतो ते सांग.... यावर्षी मोठ्ठी पार्टी करूया... " संजय हसला आणि धावतच पायलकडे पोहोचला. एव्हाना पाऊस चांगलाच धरलेला होता... कोणत्याही क्षणी सुरुवात करणार असं वातावरण होतं.
संजय पायल समोर येऊन उभा राहिला... पायलने संजयकडे पाहिलं, तिच्या डोळ्यात अश्रू जमा झालेले. पावसाने सुरुवात केली... " या पावसाचं एक बरं असते ना… पायल.. कोणी रडत असलं तरी ते दिसतं नाही पावसात.. " दोघे तसेच होते भिजत पावसात... पायल काहीच बोलली नाही. संजयने आपला हात पुढे केला… " चल.. " पायलचा no response... " चल पायल... " ," कुठे.. ? " ," तुला पुन्हा स्वप्नात घेऊन जायला आलो आहे... "," म्हणजे.. ? " पायल उभी राहिली… " वेडीचं आहेस तू... " त्याने टपली मारली... " माझ्या मनातली " ती " म्हणजे तूच आहेस... माझंही तुझावर प्रेम आहे… येडपट.. " पायल हसायला लागली. वीज चमकली तशी पायलने संजयला घट्ट मिठी मारली.. "काय गं... आजपण भीती वाटते का वीजेची... " संजय हसत म्हणाला... " आता कशाला घाबरू... तू आहेस ना सोबत आता.. " आणि ते तसेच भिजत राहिले पावसात…. खरं प्रेम मिळालेलं दोघानाही... खऱ्या अर्थाने आज पावसाला सुरुवात झालेली.
श्वेता त्यांना दुरूनच पाहत होती.... तिच्याही डोळ्यात आनंदाश्रू आले,… तीसुद्धा तशीच भिजत होती पावसात. अचानक, कोणीतरी तिच्या डोक्यावर छत्री धरली… बघते तर उदय होता… " काय गं... तुला तर आवडत नाही ना पाऊस... मग पावसात कशी भिजत आहेस... ? " उदयला पाहून ती हसली… " तू भिजलास का कधी पावसात... ? " ," नाही गं... तुला आवडत नाही म्हणून मी सुद्धा... " उदय बोलता बोलता थांबला. श्वेताने हाताने छत्री बाजूला केली… " मग आज भिजून बघ, कसं वाटते ते पावसात... " उदय भिजू लागला पावसात... डोळे मिटून भिजण्याचा आनंद घेत होता तो... श्वेताने एक नजर टाकली , पायल आणि संजय कडे. ते दोघे अजूनही तसेच भिजत होते, एकत्र... जराशी हसली श्वेता... उदयकडे पाहिलं तिने… त्याचा हात पकडला आणि " चल.. " म्हणाली. उदय हसला... दोघेही एकमेकांचा हात पकडून चालत होते, भर पावसात.... प्रेमाच्या पावसात................
---------------------------------------------The End-------------------------------------------------