All the contents on this blog are Copyright Protected.

All the contents on this blog are Copyright Protected.

MyFreeCopyright.com Registered & Protected
Protected by Copyscape Duplicate Content Software

Saturday 29 March 2014

चांदण्यात फिरताना.......( भाग २)

                     स्मिता हल्ली उदास उदास राहायची. तिच्या मैत्रिणींना सुद्धा कळलं होतं. " काय झालं स्मिता ...... गप्प गप्प असतेस.... " तशी स्मिता रडायला लागली. " अगं ... मी फक्त त्याला लग्नाचं विचारलं होतं ना..... कुठे गेला कळतंच नाही मला... " रडतच ती सांगत होती. " मग त्याला फोन करायचा ना... ", " नाही वापरत तो mobile .... " ," पहिलं तुझं रडणं थांबव.... आणि मला नीट सांग काय झालं ते " स्मिताने डोळे पुसले, जरा शांत झाली ती व सांगायला लागली," तुला सांगितलं होतं ना..... तसं त्याला विचारलं मी लग्नाबद्दल. त्याने उत्तरच नाही दिलं..... दुसऱ्या दिवशी सांगतो म्हणाला.... तेव्हापासून आज आठवडा झाला.... तरी तो मला भेटलाच नाही.. "," अगं उशिरा निघत असेल तो "," नाही गं.  रोज एक तास तरी थांबते मी .... नाहीच येत तो ...." ," आणि mobile च काय बोललीस ?"," तो म्हणायचा गावात रेंज नाही येत.... मग mobile कशाला वापरायचा... घरीही फोन नाही... गावातच सगळे नातेवाईक आहेत म्हणतो... कोणाशी बोलायचे असेल तर त्यांना सरळ भेटायलाच जातो , अस म्हणाला तो...  " दोघीही गप्प झाल्या. " आता काय करायचं गं... पप्पा बोलले मी येऊ का गावात... त्याची चौकशी करायला.. " , " नको.... पप्पांना नको बोलावू... मला वाटते तो ना चोर असणार ... गावात असे खूप असतात गं फसवणारे.. तो घाबरून पळाला असणार तू लग्नाचं विचारल्यावर , तरी आपण पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवूया. ..... हरवल्याची... " ," ठीक आहे. चल " असं म्हणत त्या दोघी हॉस्पिटल पासून जरा लांब असलेल्या पोलिस स्टेशन मध्ये पोहोचल्या. 
                    " सर.... आम्हाला एक व्यक्ती हरवल्याची तक्रार नोंदवायची आहे. " ," ठीक आहे. फोटो आणला आहे का हरवलेल्या व्यक्तीचा ? " तश्या दोघी एकमेकांकडे बघायला लागल्या. " नाही .... फोटो तर नाही आहे... " स्मिताची मैत्रीण म्हणाली. " फोटो नाही ... मग त्याला शोधणार कसा..... बर नाव आणि पत्ता तरी आहे त्या व्यक्तीचा… " पोलिसांचा पुढचा प्रश्न..." त्याचं नाव आहे यश. " ," पूर्ण नाव सांगा बाई.. "," माहित नाही सर " , " बर... पत्ता ? "," तोही माहित नाही." तसा तो पोलिस त्यांच्याकडे बघायला लागला. तुमच्या ड्रेस वरून तुम्ही शिकलेल्या वाटता आणि तक्रार नोंदवताना काय माहिती दयावी एवढ साधं माहित नाही तुम्हाला... " दोघी शांत बसल्या. कोणास ठाऊक.... त्या पोलिसाला त्यांची दया आली... " बर... त्या यशला कोणी पाहिलं आहे का... ", " हं.... हो मी बघितलं आहे ..." स्मिता लगेच बोलली. " तो बघा , त्या खोलीत आमचा स्केच artist आहे ...  त्याचं वर्णन करून सांगा त्याला... तो काढेल चित्र त्याचं... मग आम्हालाही बरं पडेल शोधायला.. मी आता बाहेर जातो आहे,चित्र झालं कि तक्रार नोंदवून घ्या , आम्हाला भेटला तर तुम्हाला कळवतो. " असं म्हणून तो पोलिस निघून गेला. स्मिता लगबगीने त्या रूम मधे गेली. " मला सविस्तर वर्णन सांगा... तस मी स्केच काढतो." स्मिताने लगेच त्याचं वर्णन करायला सुरुवात केली. आणि त्याने स्केच काढायला. अर्ध चित्र झालं असेल तसा तो मधेच बोलला... " थांबा... "," का.... काय झालं ? "," तुम्ही ''आधार'' हॉस्पिटल मध्ये काम करता का …?" त्या प्रश्नाने दोघीही दचकल्या. " आणि तुम्ही नक्की डॉक्टरच असणार .. "," हो .. आम्ही आधार हॉस्पिटल मधे डॉक्टर आहोत. पण तुम्हाला कसं माहित ? " , " मग हे स्केच काढायची गरजच नाही. " अस म्हणत तो उठला आणि कपाटातून कसलीशी फाईल काढली. " हि फाईल बघा.... वेगळीच फाईल बनवली आहे मी.. " फाईल उघडताच एक स्केच होतं...... यशचचं.... अगदी हुबेहूब.... " हाच..... हाच यश आहे.. " स्मिता आनंदाने म्हणाली. तिच्या मैत्रिणीने तिला गप्प केलं आणि त्यालाच उलट प्रश्न केला ," पण याचं स्केच तुमच्याकडे कसं ?" तसा तो हसला," तुम्ही नवीन आहात वाटतं इकडे..... ?" ," हो ... आम्ही दोघीही ६ महिन्यापूर्वीच जॉबला लागलो."," मग बरोबर... तुम्हाला माहीतच नसणार.. " , " काय ते ? " , "तुमच्याच हॉस्पिटल मधल्या , आतापर्यंत ९ जणींनी येते " यश " संबंधी तक्रार नोंदवली आहे .. " तश्या त्या दोघीही आश्चर्यचकित झाल्या," बघा त्या फाईल मध्ये सगळ्या तक्रारी आहेत... ७ महिन्यापूर्वीच नवीन तक्रार नोंदवली एका महिला डॉक्टरने... " ," कोणी .... संगीता नाव होत का तिचं ? "," हो ... संगीताच नाव होत तिचं …. " ," आणि पुन्हा विचार करा ... या ९ तक्रारीपैकी कोणीच नंतर विचारला आले नाही... तुम्ही उगाच तक्रार करू नका," , " पण ... त्याचं काय झालं आणि कसल्या तक्रारी आहेत ? " ," सगळ्याच्या तक्रारी ..... तो हरवल्याच्या आहेत... " ,"हे कसं शक्य आहे.... " , " ते मला माहित नाही पण तुम्ही उगाच तक्रार नोंदवू नका. .... " स्मिताला तर काही कळतच नव्हतं. बऱ्याच वेळाने तिची मैत्रीण बोलली," मग तुम्ही शोध नाही घेतला त्याचा ? " ," या ९ तक्रारी.... गेल्या १० वर्षातल्या आहेत... प्रत्येक वर्षी एक तक्रार आहे... आणि हे पोलिस स्टेशन तसं नवीन आहे, चार वर्ष झाली फक्त... जुन्या पोलिस स्टेशन मधले सगळे अधिकारी, शिपाई त्यांची बदली झाली... इकडे आता सगळेच नवीन आहेत.... त्यामुळे जुन्या तक्रारींच तसं काही माहित नाही... पण आम्ही आल्यापासून ४ तक्रारी आल्या… त्याची तपासणी केली आम्ही तरी त्याचा काही पत्ता नाही लागला आम्हाला.. आता एवढा माणूस जाणार कुठे.... तरी मला वाटते तो चोर असावा.... शहरातल्या मुलींना फसवत असावा आणि काम झालं कि पळून जात असेल... पुन्हा तिकडे घनदाट जंगल आहे... त्या जंगलातच तो लपत असेल कदाचित ..... आम्हाला permission नाही आहे जंगलात जाण्याची... नाहीतर गेलो असतो तिकडे पण... तुम्ही तसच करा.. तक्रार करू नका... तुमचा पत्ता आणि फोन नंबर देऊन ठेवा.... मी कळवतो काही कळल तर ...." त्या दोघींना काय चाललंय ते कळतच नव्हतं.
                 " हे कसं शक्य आहे…? जो माणूस मला रोज भेटायचा…तो १० वर्षापूर्वी कसा काय हरवू शकतो…?" स्मिता तिच्या मैत्रिणीला बोलली. " काही तरी नक्कीच गडबड आहे... मला तर वाटते... " , " काय ? " ," तो खरंच चोर असेल गं…. " ," अगं ... मग तो पोलिसांना कसा भेटत नाही. " , " माझं डोकं गरगरायला लागलं आहे आता .. " विचार करतच घरी पोहोचली ती. काहीच कळत नव्हतं तिला..... अचानक तिला आठवलं.... त्याच्या ऑफिस मधून त्याचा पत्ता मिळू शकतो. " काय नाव होतं.... कंपनीचं.. हा... " Eco" ... तेच नाव होतं..... त्याच्या बोलण्यातून एक-दोनदा ऐकलं होत मी.. "आठवून तिने दुसऱ्या दिवशी तिकडे जाण्याचा निर्णय केला. सकाळीच निघाली स्मिता...त्याचं ऑफिस शोधायला. विचारत विचारत तिला कळल कि "Eco" नावाची एक कंपनी होती ,शहरापासून थोडी अलीकडे ...शेवटी पोहोचली एकदाची तिकडे. तिथे पोहोचल्यावर ज्याला त्याला विचारलं , त्यापैकी कोणालाच त्याची माहिती नाही.... अगदी बॉसलाही... तिलाच सगळ्यांनी वेडयात काढलं... स्मिताला रडूच आलं... आता कुठे शोधू मी त्याला... रडत रडतच ती कंपनी बाहेर आली.तेवढयात मागून " थांबा .. madam" असा आवाज आला. ... वॉचमननी हाक मारली होती . " काय झालं madam ? .. कशाला रडता… बसा इकडे .. उनाचा बाहेर नका जाऊ... पाणी प्या.. " स्मिता शांत बसली. आणि पाणी पिऊन बंर वाटलं " काका ... मी इकडे आले होते एकाला शोधायला .. पण इकडे कोणालाच माहित नाही"," कोणाला ? " ," यश नाव आहे त्याचं" ," यश साहेब .. " वॉचमन बोलला... तशी स्मिता आनंदाने उभीच राहिली. " तुम्ही ओळखता त्याला ? कुठे आहे आता तो " ," माहित नाही madam ... यश साहेब होते इकडे कामाला, पण १० वर्षापूर्वी ... नंतर कुठे गेले माहित नाही.. आणि इकडे मी सोडलो तर सगळेच नवीन आहेत .. " या बोलण्याने स्मिताचा आनंद नाहीसा झाला. " हा पण आमचे जुने साहेब ... त्याचा पत्ता आहे माझ्याकडे... त्यांनी यश साहेबांबरोबर काम केलं आहे... त्यांना माहित असेल " ते ऐकून थोडीशी आशा पल्लवीत झाली स्मिताची. वॉचमन कडून पत्ता घेऊन ती पोहोचली शहरात.खूप शोधाशोध केल्यानंतर तिला सापडलं त्याचं घर. 
                " नमस्कार सर .. तुम्ही Eco कंपनीत जॉबला होतात ना... ? " दरवाजा उघडताच स्मिताने प्रश्न केला," हो … पण तुम्ही कोण ? " आता त्यांना खर तर सांगू शकत नाही ... " मी स्मिता... यशची मैत्रीण ... तुम्ही ओळखता ना यशला .. " ," तुम्ही प्रथम आतमध्ये या... मग बोलू आपण ." तशी स्मिता त्यांच्या घरात जाऊन बसली," हं ... बोला आता... काय काम होतं तुमचं... आणि यशची कशी ओळख ... " ," मी त्याच्या college मधली मैत्रीण आहे." स्मिताला खोटंच बोलावं लागलं. " खूप वर्षांनी आली मी भारतात.. यशने त्याच्या ऑफिसचा पत्ता दिला होता मला ... मी जाऊन आले तिथे. तर यशला तिथे कोणीच ओळखत नाही. वॉचमनने तुमचा पत्ता दिला म्हणून आले मी तुमच्याकडे.. " ,"यश .... Actually .... मलाही माहित नाही तो कुठे असतो सध्या.. " , "म्हणजे .. ? "," तो होता माझ्या हाताखाली कामाला... चांगला होता.. पण १० वर्षापूर्वी.... " ," १० वर्षापूर्वी ? " , " हो ..... मग अचानक कुठे गेला ते माहित नाही.. "," नक्की काय ते मला कळलं नाही सर ... " तो अचानक जॉबला येईनासा झाला.. नंतर काही तो आला नाही कधी." सर बोलत होते. " मग तुम्ही त्याला शोधण्याचा प्रयत्न नाही केला का ? " ," केलेला ... एक - दोनदा त्याच्या घरी जाऊन आलो..... पण त्याच्या पप्पांनी सांगितलं कि त्यांनाही माहित नाही तो कुठे आहे ते."," तुमच्याकडे पत्ता आहे त्याचा ."," आहे ना. " कुंभार " गावात सरकारी कॉटर्स आहेत ना... त्यापासून थोडयाच अंतरावर त्याचं घर आहे. " धर्माधिकारी " नाव आहे घराचं.. " ... " अरे.. माझ्या रूम च्या मागेच आहे घर वाटते.. " स्मिता मनातल्या मनात बोलली." तरी तुम्हाला काय वाटत सर..... कुठे गेला असेल तो... "," तसं नक्की काही सांगू शकत नाही. पण तो हुशार होता.त्याला परदेशातून नोकरीच्या ऑफर सुद्धा आल्या होत्या. आम्ही काही त्याला सोडू दिलं नव्हतं आमचं ऑफिस, म्हणून तो परदेशात गेला असेल न सांगता आणि परदेशात जाण त्याच्या कुटुंबाला सुद्धा मान्य नव्हतं. त्यामुळे त्यांना देखील माहित नसेल ते... परंतू त्याच्या बायकोला माहित असेल कदाचित.. " ," बायको ?" स्मिता उडालीच.... ,"तशी बायको म्हणता येणार नाही... पण लग्न करणार होते ते लवकरच.... मग तिच्या बरोबर तो गेला असेल. " ," काय ... काय नाव होतं तिचं ? "," नाव ... सरिता... हा.... सरिताच नाव होतं तिचं..... डॉक्टर होती ती... इकडे पुढे " आधार " नावाचं हॉस्पिटल आहे ना... तिकडे डॉक्टर होती ती..... नंतर ती सुद्धा हॉस्पिटल मध्ये दिसली नाही.. " ," बरं .... Thanks Sir " असं म्हणत यशचा गावातला  पत्ता घेऊन ती निघून आली.... सगळंच काही विचित्र होतं.... पोलिस स्टेशनमध्ये त्याच्या तक्रारी आहेत. १० वर्षापूर्वी ऑफिस मध्ये, १० वर्षापूर्वी कामाला होता... बायको... काहीच नाही... कदाचित मग तो परत आला असेल परदेशातून,..... कदाचित.
                  त्यांनी दिलेल्या पत्तावर ती पुन्हा गावात आली , तिच्या सरकारी कॉटर्स पासून अर्ध्या तासावर " धर्माधिकारी" अस पाटी लावलेलं एक मोठ्ठ घर होतं. आणि घराला मोठ्ठ कुलूप.. आजूबाजूस चौकशी केल्यावर कळलं कि त्याचं नाव होते यशराज धर्माधिकारी... तो आणि त्याचं कुटुंब राहायचं येते. दोनच वर्षापूर्वी ते घर सोडून कुठेतरी शहरात गेले राहायला...  " आता काय करायचं.... सगळे रस्ते बंद झाले... कुठे शोधायचं यशला " अचानक तिला आठवलं ... त्यांनी सांगितलं होतं... सरिता नावाची डॉक्टर होती ,त्यांच्याच हॉस्पिटल मध्ये.. स्मिता लगबग करतच पोहोचली हॉस्पिटलमध्ये.... " काय झाल गं ? काही मिळाली का माहिती यशची ? " , स्मिताच्या मैत्रिणीने तिला विचारलं. " अगं... हा ... त्याचं घर सुद्धा आहे गावात.. पण ते गेले घर सोडून २ वर्षापूर्वी... "," हे कसं शक्य आहे... मग तो तुला कस काय भेटायचा…?","मला काहीच कळत नाही ,पण काहीतरी नक्कीच मोठ्ठी गडबड आहे... " ," आणि तू काय शोधते आहेस इकडे"," अगं त्याच्या जुन्या बॉसने पत्ता दिला मला आणि त्याच्या बायकोची माहिती सांगितली... " ,"त्याचं लग्न झालेलं होतं ... ?"," नाही गं होणार होतं .... पण ती इकडेच डॉक्टर होती,अस त्यांनी माहिती दिली... तिचा पत्ता तर भेटेल ना... " तेव्हा तिची मैत्रीण पण शोधायला लागली. खूप शोधल्यानंतर एका जुन्या फाईल मध्ये तिची माहिती मिळाली,फोटो सहित," तिची लास्ट entry पण १० वर्षापूर्वीचीच आहे गं ... हिची माहिती पण नाही मिळणार इथे... " स्मिताने तिचा पत्ता बघितला.. " अरे ... " स्मिता ओरडलीच जवळपास... " काय झालं गं ? " तिच्या मैत्रिणीने तिला विचारलं ," अगं ... ही तर मी राहते तिथे रहायची ,सरकारी कॉटर्स मध्ये... हे बघ... " ," हो गं... पत्ता तर तोच आहे.. " स्मिताने तिचा शहरातला पत्ता बघितला,मुंबईतला होता तो.. " आमच्या मुंबईतल्या घराच्या बाजूलाच आहे घर याचं... स्मिताने पत्ता लिहून घेतला आणि तडक शहरात पळाली. एव्हाना , स्मिताने तिच्या घरीसुद्धा हे सगळं प्रकरण सांगितलं होत. त्यांनाही त्याच आश्चर्य वाटलं होतं.  
                  " हं ... सरिता इकडेच राहते.. का ? " सरिताच्या घरी जाऊन स्मिताने प्रश्न केला ." हो , आपण कोण ? " ," मी स्मिता.. " पुन्हा ती खोटं बोलणार होती, " मी यशची मैत्रीण आहे.. college मध्ये होती त्याच्या... त्याचा पत्ता नाही मिळाला मला.. सरिताचा भेटला तिच्या हॉस्पिटल मधून ... " ," पण सरिता राहत नाही इकडे ." ," मग कुठे राहते ती ?","तुम्हाला काय करायचं आहे तिचं ? " , अशी तिची आई बोलली आणि घरात आत निघून गेली. स्मिताला काय बोलायचं तेच कळलं नाही. तेवढयात एक मुलगा बाहेर आला... " Sorry , माझी आई बोलली त्याबद्दल माफी मागतो मी. "," It's OK ... पण त्या असं का बोलल्या... काही प्रोब्लेम आहे का " ,"सरिता ... हॉस्पिटल मध्ये असते... ", " हो . मला माहित आहे ती डॉक्टर आहे ते "," डॉक्टर होती ती , आता नाही आहे......  हॉस्पिटल मध्ये treatment चालू आहे तिची." , " का ... काय झालं तिला .. बरं नाही आहे का तिला ? "," तिची मानसिक अवस्था बरोबर नाही म्हणून तिला psychiatrist कडे admit केले आहे. " हे ऐकून स्मिताला shock च बसला. " कस ... काय झालं नक्की ? " ," नक्की काय झालं मलाही माहित नाही. मी तेव्हा पुण्याला होतो... यश बरोबर हीच लग्न ठरलं ठरलं होतं.... यशही तिच्या हॉस्पिटलच्या बाजूच्याच कंपनीत होता... लग्नाला २ दिवस बाकी असताना... अचानक तो कुठेतरी निघून गेला... तेव्हाही ती चांगलीच होती.. पण ४ दिवसानंतर काहीतरी घडलं तिकडे... त्यामुळे सरिता बेशुद्धच होती.... चार दिवस तरी ती शुद्धीवर नव्हती. नंतर जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हापासून ती वेडयासारखी करायला लागली. म्हणजे इतकी वेडी की कोणालाच तिला control करता येत नव्हतं. तेव्हापासून ती हॉस्पिटल मध्ये आहे." ," अरे बापरे.... इतकं सगळ झालं ..... आता कुठे असते ती ? " ," कोल्हापूरला कुंभार गाव आहे.... तिकडून  जरा पुढे गेलं तर आधार नावाचं हॉस्पिटल आहे, तिकडेच होती ना ती डॉक्टर म्हणून.. त्याच्या मागेच त्यांचंच एक मनोरुग्णाच हॉस्पिटल आहे. तिकडे असते ती. माझे पप्पा सुद्धा त्याच गावात राहतात हल्ली,तिची देखरेख करण्यासाठी.", " आणि यश .... त्याचा काही पत्ता नाही लागला का...", " नाही ... त्याचे घरचे सुद्धा काही नीटसं सांगत नाहीत, तो कुठे आहे ते... मग आम्हीही त्यांच्याशी संबंध तोडून टाकले. "..... काय करायचं आता... स्मिता विचार करत होती..... " तुम्हाला यशचा शहरातला पत्ता हवा असेल तर देतो मी .. " ," हो .. हो .... नक्की.. " अस म्हणून तिने यशचा शहरातला पत्ता मिळवला. ... " आणखी एक... यश संबंधी काहीही माहिती मिळाली तर मलाही सांगा, माझ्या बहिणीची अवस्था त्याच्यामुळे झाली आहे, मला जाब विचारायचा आहे त्याला .. " ," नक्की कळवते तुम्हाला " अस म्हणत स्मिता घराबाहेर पडली. 
                  स्मिता स्वतःच्या घरी आली, मुंबईतल्या... आई-वडिलांना तिने काय काय घडलं ते सगळ सविस्तर सांगितलं.... " मला वाटते ना ... हा यश नक्की मुलींना फसवत असेल आणि त्यांच्याकडून पैसे वगैरे घेऊन पळून जात असेल. " स्मिताची आई बोलली. " अगं आई , .... मग माझ्याकडून त्याने कधीच पैसे मागितले कसे नाहीत."," पण एक गोष्ट आहे ... तो त्या गावातून नक्कीच शहरात आला असेल आता. पोलिसही मागावर आहेत ना त्याच्या." , " हो पप्पा ,...... ९ तक्रारी आहेत त्याच्या नावावर. " ," बरं... त्याचा पत्ता आहे ना .... चल... आम्हीही येतो तुझ्या बरोबर... आम्हालाही कळू दे नक्की काय भानगड आहे त्या यशची .. " आणि स्मिता बरोबर तिचे आई-वडील निघाले त्यांच्या घरी. पत्ता होता त्यामुळे घर शोधायला जास्त मेहनत करायला लागली नाही. दारावरची बेल वाजवली,"कोण पाहिजे आहे आपल्याला ? " ," धर्माधिकारींच घर आहे ना हे ? " ," हो .. आपण कोण ? " ," आम्ही ... आम्ही या मुलीचे पालक आहोत. हिला यश सोबत लग्न करायचे आहे." ," काय बोलताय तुम्ही ? " दारातल्या बाई किंचाळल्या. आवाज ऐकून घरातून एक माणूस बाहेर आला," काय झालं आणि कोण तुम्ही ? " , " यांना यश बरोबर बोलायचे आहे ","  बरं ... ठीक आहे... पहिलं तुम्ही घरात या... मग बोलू सविस्तर... " त्यांच्या अश्या बोलण्याने स्मिताच्या जीवात जीव आला.... म्हणजे यश नक्कीच इकडे असणार.... कदाचित आपल्या लग्नाचं बोलायला आला असेल गावातून …. स्मिता मनातल्या मनात बोलली. " मी यशचा पप्पा आहे आणि हि त्याची आई आहे. बोला ... काय बोलायचे आहे तुम्हाला… " , " माझी मुलगी आणि तुमचा यश .... दोघेही एकमेकांना पसंत करतात.... आणि त्या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला आहे. " , " यश बोलला का तुम्हाला तसं " यशच्या पप्पांनी त्यांना विचारलं . " तो बोलला नाही .... पण त्याला आवडायची मी. म्हणून मीच त्याला लग्नाचं विचारलं होतं. " , " तुला भेटायचा यश... " ," हो ... अगदी रोज भेटायचो आम्ही.... तेव्हाच ओळख आमची.. " , " कस शक्य आहे ते.. " यशची आई बोलली. " का शक्य नाही.. तो रोज हिला भेटायचा ... रोज एकत्र घरी यायचे.. प्रेम होत स्मिताचं यश वर.... आणि तो इकडे आला पळून लग्नाचं विचारल्यावर.... त्याला बोलवा आधी बाहेर " ........ " यश कोणाचीच फसवणूक करू शकत नाही. " , " का ... शक्य नाही ? " स्मिता चिडून बोलली. " तो कोणालाच फसवू शकत नाही . कारण ....... आता तो या जगातच नाही आहे. " यशचे पप्पा बोलले, तसे सगळे गप्प झाले. यशची आई रडतच घरात आत पळत गेली. 
                 सगळं कसं विचित्र वाटतं होतं," काय बोलताय तुम्ही .... तुम्हाला तरी कळत आहे का ? " स्मिताच्या आईने यशच्या पप्पांना प्रश्न केला. स्मितातर स्तब्ध झाली होती. यशचे पप्पा उठले आणि कपाटामधून त्यांनी एक फाईल काढली. त्यातून एक फोटो स्मिताला दाखवला. " हाच यश आहे ना.. " तिने फोटो पाहिला आणि होकारार्थी मान हलवली... " आजपासून १० वर्षापूर्वीची गोष्ट, आम्ही कुंभार गावात राहत होतो. यशही तिकडेच जॉबला होता ना म्हणून शहरात राहण्यापेक्षा गावातच राहणं पसंत होतं यशला... तिकडच्याच हॉस्पिटल मध्ये सरिताची ओळख झाली. तो डॉक्टर आणि हा इंजीनियर.. चांगली जोडी होती.. लग्नही ठरलं होतं दोघांच... दोघेही एकाच वेळेस घरी यायचे.. एकच वाट ना दोघांची.... त्या दिवशी सुद्धा रोजच्या सारखे निघाले घरी येण्यासाठी दोघेही... लग्नाच्या गप्पागोष्टी करत.... नेहमीचीच वाट त्यांची.. त्यामुळे जरा बिनधास्त होते दोघेही.... अचानक कोणीतरी त्यांच्यावर हल्ला केला... कोण होते माहित नाही ते .. डाकू , गुंड.. सरिताला कसबसं सोडवलं यशने.. आणि पुढे जाऊन मदत घेऊन ये अस सांगितलं सुद्धा त्याने... मात्र तो अडकला त्यांच्यात.... सरिता धावत धावत आली आमच्याकडे... तसे आम्ही लगेचच पोहोचलो तिकडे... तर कोणीच नव्हतं तिकडे.. खूप शोधलं आम्ही यशला त्या रात्री... मिट्ट काळोख तिकडे ... काहीच दिसत नव्हतं" , " मग पुढे काय झालं ? " स्मिताने धीर करून विचारलं.. " पोलिसात तक्रार केली तर ते म्हणाले तो आमचा एरिया नाही.. त्यांनीही हात वरती केले. गावात ना शहरात.. कोणीच तक्रार नोंदवायला तयार नव्हतं..... यश काही घरी आला नाही... ४ दिवसांनी मात्र एक हवालदार आला आमच्याकडे आणि सगळ्यांना घेऊन गेला... सरिताही होती आमच्या सोबत... जिथून यश बेपत्ता झाला होता .. तिथूनच खूप आतमध्ये .... जंगलात..... एक प्रेत सापडलं होतं.... त्याच्या कपड्यावरून आणि सामानावरून तो यशच होता , याची खात्री पटली आम्हाला." अस बोलले आही सगळे गप्प झाले. " संपूर्ण शरीर जंगली प्राण्यांनी ओरबाडलं होतं... चेहरा ओळखता येत नव्हता... पोलिसांना तिथे त्याच ओळख-पत्र मिळालं... तो यशच होता.... आमचा यश.. सरिताही होती तिकडे.... ते बघून ती बेशुद्ध झाली... मग तिला तिच्याच हॉस्पिटल मध्ये admit केलं. यशच प्रेत गावात घेऊन जाऊ शकत नव्हतो, दुर्गंध पसरला होता..... पोलिसांनी सांगितलं कि काहीच पुरावे नाही आहेत कि याचा खून झाला आहे..... जंगली प्राण्याचं ही काम असेल हे... त्याला तसंच टाकून जाता येत नव्हतं.... तरी त्याचे उरले सुरलेले शरीराचे अवयव आम्ही जंगलाबाहेर आणले आणि त्या वाटेवर एक मोठ्ठ मोगऱ्याच झाड आहे... त्याच्या शेजारीच यशला जमिनीत पुरल..... " आणि यशचे पप्पा रडायला लागले. स्मिता काही बोलतच नव्हती. तिच्या पप्पानी यशच्या पप्पांना आधार दिला. तेव्हा ते शांत झाले. " या फाईल मध्ये त्याची death certificate आहे " अस म्हणत त्यांनी ती फाईल स्मिता पुढे केली. .... त्या फाईल मध्ये होतं सगळं..... ,तो हरवल्याची तक्रार केलेले पेपर्स , त्याचे फोटो आणि death certificate... आता तर काहीच राहिलं  नव्हतं बोलण्यासारखं... तरी ती बोलली," पण .... मला अजूनही विश्वास बसत नाही आहे.... तो जर १० वर्षापूर्वी गेला आहे तर ..... तो मला कसा भेटायचा .... पुन्हा त्याच्या नावावर इतक्या तक्रारी आहेत पोलिस स्टेशन मध्ये..... आणि त्यांनी मला कसं सांगितलं नाही कि तो आता जगात नाही आहे .... death certificate पण त्यांनीच बनवली असेल ना..  " 
             " तुलाही कळलं असेल ... कि ते पोलिस स्टेशन नवीनच बांधलं आहे,कारण जुन्या पोलिस स्टेशनला आग लागली होती... त्यातच बरेचसे कागद जळून गेले.... योगायोगाने तो हरवल्याची फाईल तेवढी जळण्यापासून वाचली... शिवाय , त्या वेळेस जे पोलिस होते.... त्यापैकी एकही आता तिथे नाही .... नवीन आहेत त्यांना फक्त तो हरवला आहे यांचीच माहिती असेल.. " ," आता राहिला .... त्या तक्रारी आणि तुझा प्रश्न..... सरिता ४ दिवस बेशुद्ध होती... जेव्हा शुद्धीवर आली ... तेव्हा ती ठीक होती . पुन्हा कामालाही जाऊ लागलेली.... पुढच्याच दिवशी, आम्हाला फोन आला, तिच्या हॉस्पिटल मधून... तसे आम्ही लगबगीने पोहोचलो तिकडे.... सरिता एकदम hyper झाली होती.... वेड्यासारखं वागत होती.... "," नक्की काय झालं तिला ? " स्मिताच्या आईने विचारलं ," तिचं म्हणणं होतं कि तिने यशला पाहिलं होतं..... त्याच वाटेवर ... त्याचा तिचा मानसिक धक्का बसला होता मोठा " स्मिताला आता काय चाललंय ते हळूहळू कळत होतं. " आणि त्या तक्रारी सुद्धा त्याच सांगतात .... सगळ्यांनी त्याला बघितलं होतं.... कसं ते कळत नाही .... आम्ही गेलो तिथे..... आम्हाला तो दिसला नाही कधी ..... भूत , आत्मा ..... यावर आमचाही विश्वास नाही ... पण या सगळ्यांचे अनुभव आणि तुझा अनुभव हेच सांगतो ना ...... " सगळेच भेदरलेल्या अवस्थेत, त्या घराबाहेर पडले.... सगळच विचित्र होतं, जे होतं ते खरं होतं... कि भास तेच समजण्यापलीकडे होतं... स्मिताला आता तिकडे काम करणं शक्यच नव्हतं. तिने राजीनामा दिला आणि आपलं सामान आणण्यासाठी पुन्हा ती त्या हॉस्पिटल मध्ये आली. सामान घेऊन ती निघणार होती... इतक्यात तिला आठवलं कि .... सरिताची treatment इकडेच चालू आहे ... एकदा जाऊन भेटूया तिला... तशी ती गेली हॉस्पिटल मध्ये.
              तिला भेटण्याअगोदर तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरशी बोलावसं वाटलं तिला.... त्यासुद्धा महिला डॉक्टरच होत्या... स्मिताच्या मनात काही प्रश्न होते.. " डॉक्टर , हे सगळं खरं आहे का ... सरिताच्या बाबतीत घडले ते.. " , "हो .... खर आहे "," म्हणजे तुम्ही विश्वास ठेवता ? " , " तसं नाही म्हणता येणार .. पण यांचे अनुभव ऐकून विश्वास ठेवावा वाटतो." ," तसे अनुभव मलाही आले आहेत. " , " खरंच ... ? " ," पण मला नक्की काय घडलं ते कळत नाही.... " ," तू एकटीच नाही आहेस... तुझ्यासारख्या अजून ९ आहेत. " , " म्हणजे त्या सगळ्या जणी , ज्यांनी पोलिसात तक्रार केली होती. " , " हो ... सगळ्याजणी इकडेच होत्या , treatment साठी..... त्यातल्या सात जणी ठीक होऊन निघून गेल्या. दोन आहेत अजूनही." ," पण इकडेच कश्या सगळ्याजणी " , " सगळी गोष्ट सांगते तुला मी समजावून..... सगळ्या गोष्टींची फाईल बनवली आहे मी.... मीही थोडा research केला सगळ्यांवर. " त्यांनी फाईल स्मिता पुढे केली... , " यात जर बघितलस ना... तर सगळ्यांचे अनुभव सारखेच आहेत... तुलाही तेच आले असतील अनुभव..... सगळ्यांच एकचं वर्णन यशच..... तो येण्याअगोदर थंड हवा यायची.. मग मोगऱ्याचा सुगंध...पौर्णिमेला तो नसायचा..... अमावस्येला चेहरा अधिक उजळलेला असायचा.. रोज संध्याकाळी मोगऱ्याची फुलं घेऊन यायचा..... हेच अनुभव असतील ना तुला..... " स्मिताने मानेनेच होकार दिला..... " अजून काही गोष्टी common आहेत..... त्याच्या होणाऱ्या बायकोचं नाव होतं सरिता..... तुझं नाव आहे स्मिता..... शिवाय बाकीच्या इतर जणींच नावही 'स' वरूनच सुरु होते... स्नेहा, सुषमा..... शेवटची तक्रार सुद्धा ' संगीता' चीच होती ना.... बरोबर ना.... " , " शिवाय…सरिता ' आधार ' हॉस्पिटल मध्ये डॉक्टर होती, ती त्या सरकारी कॉटर्स मध्ये रहायची.... त्यांच्या जाण्यायेण्याचा रस्ता एकच होता... इतर ८ जणीही त्याचं हॉस्पिटल मध्ये डॉक्टर होत्या,त्याचं रूम मध्ये राहायच्या आणि तो रस्ता use करायच्या.... तुझं पण असंच असेल ना... " , " हो..... पण याचा अर्थ काय… "   
            " मी सुद्धा यशच्या घरी जाऊन आले. तेव्हा मला हे सगळं कळलं..... सगळ्यांनाच मानसिक धक्का बसला होता. सरिता अजून त्याचं अवस्थेमध्ये आहे.... तुझ्या अगोदरची डॉक्टर संगीता , तिही माझ्याकडे treatment घेत आहे. त्या सगळ्या इकडेच का treatment घेत होत्या ते तुला कळलं असेल ना..... कारण ज्याच्यामुळे सगळ घडलं ... त्याचं 'मूळ' इकडेच आहे ना. " स्मिता नुसतंच ऐकत होती.... " त्याला मोगऱ्याच्या झाडाखाली पुरलं होतं.... म्हणून तो येताना मोगऱ्याचा सुगंध यायचा.... मोगऱ्याची फुलं आणायचा... अशी संगीता म्हणते कधी कधी... त्यावर मी काही बोलत नाही. पण त्याने कोणाला फसवलं नाही गं... त्या मुलींना आणि तुला पण... जेव्हा तुम्ही अडचणीत आलात तेव्हाच तो आला तुमच्या मदतीला... " ," पण आम्हालाच का.... तिकडेच राहणाऱ्या,त्याचं हॉस्पिटल मध्ये काम करणाऱ्यांनाच का ... ? " , " मला वाटते........ तो त्याच्या बायकोला शोधात असेल…. तुझ्यामध्ये.... आणि त्या इतर मुलींमध्ये सुद्धा... त्यामुळे जेव्हा जेव्हा तू आणि त्यांनी त्याला लग्नाचं विचारलं .... तेव्हाचं तो गायब झाला... बरोबर ना... " स्मिता सरिताला भेटायला आली होती. तिला न भेटताच अनेक गोष्टी स्मिताला कळल्या होत्या. ती काहीही न बोलता तशीच निघाली. ...... " एक गोष्ट सांगू का.... स्मिता तुला... " डॉक्टरनी तिला थांबवत म्हटलं तशी स्मिता थांबली." या सर्व गोष्टी अनाकलनीय आहेत. प्रथम माझाही विश्वास नव्हता या गोष्टींवर ..... पण या सगळ्यांमुळे मला विश्वास ठेवावा लागतो... शेवटचं सांगते तुला... जर आपण देव आहे अस म्हणतो तर भूतांवर सुद्धा विश्वास ठेवावा लागेल आपल्याला.... " स्मिता तशीच निघून गेली... काहीही न बोलता... 
             स्मिताने राजीनामा दिला होताच... त्याचबरोबर तिने शहरही सोडलं आणि परदेशात गेली ती कुटुंबाबरोबर कायमची..... तिची जागा भरून काढण्यासाठी अजून एक महिला डॉक्टर आली… तिचं नाव होतं... " सायली " ... पहिलाच दिवस हॉस्पिटल मधला.... " काय गं ..... ती जुनी डॉक्टर .... एवढ्या लवकर गेली सोडून.. " ,"माहित नाही... पण ती परदेशात गेली. कदाचित तिकडून ऑफर आली असेल तिला... " ," किती छान ... मलाही भेटली पाहिजे अशी ऑफर... " तश्या दोघी हसू लागल्या... त्याचं सरकारी कॉटर्समध्ये राहायला आलेली होती... नवीन होती ती गावात.... त्यामुळे बसची वेळ विसरली..... धावतच बाहेर आली तेव्हा बस निघून जाताना तिने पाहिली..... आता चालण्याशिवाय पर्याय नाही. " त्याचं " वाटेवर आली ती आणि रस्ता विसरली.... वाट चुकली.... त्यात अमावस्येची रात्र.... आकाशात लाखो चांदण्या- तारे चमचम करत होत्या... मिट्ट काळोख.... कुत्रे भुंकत होते... रातकिडे आवाज करत होते... भयावह वातावरण अगदी... एकटीच होती ती ...... घाबरली..... तिथेच एका दिव्याखाली बसून ती रडू लागली.... ५-१० मिनिटं झाली असतील... थंड हवेची झुळूक आली…,त्याचबरोबर मोगऱ्याचा सुगंध.... किती छान वाटलं तिला... आणि अचानक तिच्यामागून आवाज आला....... ," Excuse me..... madam .. काही मदत करू का मी तुम्हाला ..... ?"

----------------------------------------------------------The End ---------------------------------------------------------- 





Sunday 23 March 2014

"चांदण्यात फिरताना.........." ( भाग १ )

                   " आज उशीर केलास तू ...... कूठे होतास... कधीची वाट बघते आहे तुझी.... " स्मिताने यशला आल्याआल्याच विचारलं. थोडीशी रागावलीच ती. " अगं..... काम होता थोडं .... बॉसनी सोडायला नको ... म्हणून थोडासा उशीर झाला " तरीही ती रुसलेलीच होती. यश सुद्धा मग तसाच बसून राहिला तिच्या शेजारी. थोडावेळ असाच गेला. " बोल ना काहीतरी ... गप्प का झालास ? " ," तू बोलतच नाही आहेस आणि मी एकटाच बडबड करत आहे. लोकांना वाटेल मी वेडा आहे. " तशी स्मिता हसली. " काय छान सुगंध येतो आहे ? " स्मिता म्हणाली ," मोगऱ्याची फुलं आणली होती, आता तू रागावली आहेस ,मग यांचा काय उपयोग .... देतो टाकून... " ,"नको ... नको ... वेडा आहेस का ? .... मला आवडतात ती ." असं म्हणत तिने स्वतः हूनच फुलं घेतली. " काय रे ... तुझ्या ऑफिस मधे मोगऱ्याचं झाडं - बीड आहे वाटते ." ," हो गं ... ऑफिसच्या बाहेर एक झाड आहे मोगऱ्याचं . कोणी हात लावत नाही त्याला. मग मीच ती फुल घेऊन येतो तुझ्यासाठी." ," अरे ... पण फुलं तर सकाळचीच फुलतात ना....मग तुला कुठून भेटतात हि फुलं... जादूचं झाड आहे वाटते.... बघितलं पाहिजे एकदा ." , " तसं काहीनाही गं जादू-बिदू ... कळ्यांना सांगतो मी ... आपल्याला स्मिताला भेटायला जायचे आहे कि फुलतात ती आपोआप." तशी स्मिता लाजली. ," मुलींना इम्प्रेस कसं करावं हे तुझ्याकडून शिकावं .... ना." स्मिता म्हणाली,तसं यशला हसायला आलं. त्याचबरोबर छान थंड हवेची झुळूक आली. " मघापासून किती उकडत होतं.... तू आलास आणि सगळ कसं छान थंड थंड झालं. मी observe केलं आहे खूपदा कि तू आलास कि छान गार गार वारा सुटतो, आजुबाजूच शांत शांत होते.. कसं काय रे... "," त्याचं काय आहे ... निसर्ग जरा जास्तच खुश असतो नेहमी माझ्यावर आणि तू असल्यावर तर असं होणारच ना जादू केल्यासारखं... " ," मी काय जादुगार आहे ? " ," मग .... माझ्यावर नाही केली आहेस का जादू .... " ,"गप्प रे काहीही बोलतोस.... " तिला हसायला आलं ," अजून एक गोष्ट ... आज सुद्धा मोगऱ्याचा सुगंध आला.. तू येण्याआधी....मोगऱ्याचं अत्तर लावतोस वाटते..... हो ना.. " तो नुसताच हसत होता... " आणि तुला गेल्यावेळेस विचारलं होतं ,त्याच उत्तर अजूनही नाही दिलंस मला... " ," कोणता प्रश्न ? "," दर पोर्णिमेला तू गायब असतोस आणि अमावस्या असली कि तुझा चेहरा जास्तच उजळत असतो, मेकअप वगैरे करतोस का अमावस्येला ? " ," चंद्राला लाज वाटू नये म्हणून मी पोर्णिमेला बाहेर पडत नाही आणि अमावस्या असली कि मी जास्त उजळत असतो ना म्हणून चंद्र येत नाही," ," सांग ना रे... " ,स्मिता लाडातच म्हणाली," खर तर आमचा बॉस आहे ना तो जरा भित्रा आहे आणि अंधश्रदाळू पण... त्याला कोणीतरी सांगितलं आहे कि पोर्णिमेला केलेली काम फायदा करून देतात म्हणून तो सगळ्यांना थांबवतो रात्रभर. आणि अमावस्या आली कि तो दुपारीच पळतो घरी. त्यामुळे आम्ही सगळे मोकळे असतो. त्यादिवशी काहीच tension नसते म्हणून तुला माझा चेहरा उजळतो आहे असं वाटत असेल. " , " असेल ... असेल तसच काहीतरी." स्मिता म्हणाली ," अरेच्या... बोलता बोलता कधी आपल्या वाटेवर आलो ते कळलंच नाही." यशच्या बोलण्याने स्मिता जागी झाली ," हो रे .... कळलंच नाही "   ," चल बाय .... उद्या भेटू संद्याकाळी , " ," आणि हो.... उद्या लवकर ये .... फुलं घेऊन ये... " , " रोज तर आणतो... उद्या सुद्धा आणीन... बाय.... " असं म्हणत यश आणि स्मिता आपापल्या वाटेने घरी जाण्यास निघाले.
              स्मिता आणि यशची ओळख तशी ६ महिन्यांपूर्वीची. स्मिता Actually मुंबईत राहणारी, डॉक्टर होती ती. शिक्षण पूर्ण झाल्यावर मुंबई मध्येच एखाद्या मोठया आणि चांगल्या हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळेल असं तिला वाटत होतं आणि तसं झालं ही. मुंबईत मोठया हॉस्पिटलमध्ये तिला job मिळाला पण तो आनंद फक्त तीन महिनेच टिकला. कारण त्या हॉस्पिटल मधून कोल्हापूरला गेलेली एक महिला डॉक्टर आजारी पडली म्हणून  तिची जागा भरून काढण्यासाठी स्मिताला तिकडे पाठवलं गेलं. " काय वैताग आहे ..... मला कशाला पाठवत आहेत ? " स्मिता रागातच तिच्या मैत्रिणीशी बोलत होती, " अगं.... त्यात काय रागवायचे. तू नवीन आहेस म्हणून तुझं नाव पुढे केलं आणि तुला चांगला अनुभव मिळेल ना गावात सुद्धा. " ," ठीक आहे गं. पण तिला काय झालं नक्की ? " ," माहित नाही .... कोणालाच माहित नाही .....आणि  कोणी सांगतही नाही बरोबर .....सरांकडून ऐकलं जरासं.... कि ती वेडी झाली . " ," वेडी ? " ," अगं... म्हणजे तशी वेडी नाही.... मानसिक धक्का बसला आहे असं म्हणतात."," म्हणजे मी पण वेडी होणार .... " आणि दोघीही हसायला लागल्या. आठवड्याने तिला कोल्हापूरला जायचं होतं. जरा वाईटच वाटत होतं तिला. गावात कधीच गेली नव्हती ती,अगदी लहानपणापासून. लहानाची मोठी ती शहरातच झाली होती." पण ठीक आहे " अस म्हणत ती कोल्हापूरला दाखल झाली. तिकडे तिची राहण्याची व्यवस्था सरकरी क्वाटर्स मध्ये केली होती. प्रोब्लेम तर वेगळाच होता. हॉस्पिटल आणि तिची रूम यामध्ये खूप अंतर होतं. हॉस्पिटलच्या आजूबाजूस कोणतीच व्यवस्था नव्हती. तिच्याकडे कोणताच पर्याय नव्हता. जशी तिने हॉस्पिटलमध्ये जाण्यास सुरुवात केली तसे वेगवेगळे प्रश्न समोर यावयास लागले. गावातली वस्ती तेवढी सुधारलेली नव्हती. एकच शाळा होती तीसुद्धा मोडकळीस आलेली होती. कच्चे रस्ते.... वाहन जवळपास नाहीच. प्रवास चालायचा तो बैलगाडीतून. एकदोघांकडे सायकल होत्या. सरपंचाकडे तेवढी गाडी होती,तीसुद्धा कधी कधीच घराबाहेर यायची. S.T. च्या बसेस यायच्या गावात.... ठरलेल्या वेळेत. सकाळी ६.३०ला आणि संद्याकाळी ५ ला., काळोख होण्याच्या आत. गावात वीज तर नुकतीच आली होती, तीपण लोड-शेडींग असलं कि रोज ५ तास जायची. फक्त स्मिताच्या रूमची वीज असायची कारण ती सरकारी घरात रहायची म्हणून. रस्त्यावरती दिवे होते पण दिव्यांची संख्या खूप कमी होती.
              एक दिवा इथे तर दुसरा खूप लांब असायचा. त्यामुळे रस्त्यावर प्रकाश तसा नाहीच. बर..... हॉस्पिटल जवळ घर बघावं तर तिथे सगळे रूम अगोदर पासूनच बुक झालेले. त्याहून तिकडे पैसे जास्त. मग तिने तिकडेच राहण्याचा निर्णय घेतला. रोज ती लवकर निघायची घरी जाण्यासाठी. बस सुद्धा वेळेवर असायची  ना. एका दिवशी मात्र तिला निघायला वेळ झाला. धावतच ती बाहेर आली. तर तिला तिची बस जाताना दिसली. " आता काय करायचं ? " , " पुन्हा हॉस्पिटल मध्ये जाऊया का ? " हॉस्पिटल मध्ये कोणीच थांबत नव्हतं. त्यामुळे तिकडे जाऊन काहीच उपयोग होणार नव्हता. तसंच तिने पायी पायी जाण्याचा निर्णय घेतला. स्मिताला रस्ता माहित होता. परंतु तोच रस्ता बरोबर आहे कि नाही याची शंका होती. तेवढयात एक बैलगाडी येताना दिसली," काय व्हो.... कोनीकड चालता आहात वो बाई.... " , " अहो मला गावात जायचे आहे ... बस सुटली माझी." ," मंग .... एकटया जावू नका.... बसा .... म्या सोडतो तुमाला.. " तिला बर वाटल. हळूहळू करत बैलगाडी एका ठिकाणी येउन थांबली. " बाई.... इकडून तुमाला एकटीला जावं लागेल .... माजी वाट दुसरी हाय... " नाईलास्तव तिला उतरावं लागलं." मी कुठून जाऊ आता ? " ,"दोन वाटा हायत .... हि एक सरल वाट हाय .... पन तिकडून कोनी जात नाय ...... दुसरी वाट हाय ती मोठी हाय ..... तिकड असत्यात लोक .... तिकडून जावा ... बरा ... म्या निगतो हा... सांभाळून जावा " अस म्हणत तो निघून गेला. दोन रस्ते होते ... एक मोठा आणि दुसरा short -cut ... खूप वेळ सुद्धा झालेला ... " काय करूया.... short -cut घेऊया." असा विचार करून स्मिता short -cut ने निघाली. 
                बैलगाडी वाला च्या बोलण्याप्रमाणे कोणीच नव्हते तिथे एकटीच चाललेली होती. दिवे होते लांब लांब. .... नशीब तिच्याकडे torch होता. मिट्ट काळोख. त्यात भर पडली ती अमावस्येचि. चंद्र असता तर थोडा प्रकाश तरी असता ...त्यातून कसले कसले आवाज येत होते. गावात पहिली कधीही न आलेली आज एकटी चालत होती काळोखातून. प्रचंड घाबरलेली. अचानक कुठून तरी एक कुत्रा भुंकत आला. तशी ती धावतच सुटली. आणि रस्ता चुकली. कुत्रा तर गेला कुठेतरी. " आता कुठे जायचे..... ? " विसरलीच ती. आजूबाजूला कोणीच नाही. काळोख सगळीकडे, mobile ला रेंज नाही. तिला रडूच आलं. दिव्याखाली ती रडत बसली. ५-१० मिनिटं झाली असतील. एकदम थंड हवेची झुळूक आली. हवेच्या झोताबरोबर मोगऱ्याचा सुगंध आला. छान वाटलं तिला..... आणि मागून आवाज आला .. ," Excuse me.... , मी काही मदत करू का तुम्हाला....... "
               स्मिताने मागे वळून बघितलं. एक मुलगा उभा होता. उंच, गोरापान,मजबूत शरीरयष्ठी,पाणीदार डोळे आणि तेजस्वी चेहरा. वय असेल २७-२८ च्या आसपास. अगदी राजबिंड व्यक्तिमत्व. " Hello..... madam ... काय झालं तुम्हाला? कशाला रडत आहात.... काही मदत करू का... " आणि स्मिता भानावर आली. " हं... हो.. मी रस्ता चुकले आहे..... इकडे नवीन आहे मी आणि इकडे कोणीच नव्हते ..... घाबरले मी आणि रडायला आलं मला. " ," घाबरू नका तुम्ही... कुठे राहता तुम्ही... " ," तिथे कुंभार गाव आहे ना... तिथे सरकारी क्वाटर्स मध्ये राहते मी.. " ," ठीक आहे... तिकडे, मी पण तिकडूनच जात आहे..... पाहिजे तर तुम्ही येऊ शकता माझ्या बरोबर... " स्मिताने त्याला निरखून पाहिलं.... छान असा कडक इत्री केलेला निळ्या रंगाचा शर्ट, त्यावर लाल रंगाची टाय,पांढऱ्या रंगाची trouser, polish केलेले शूज आणि खांद्यावर Laptop ची मोठी bag..... " चांगला माणूस वाटतो, निदान सोडेल तरी घरी आपल्याला." असा विचार करून ती त्याच्याबरोबर जाण्यास तयार झाली," तुम्ही नवीन असूनही या वाटेवर कशाला आलात ? इथून कोणी जात नाही सहसा. सकाळी वेगळी गोष्ट आहे. पण रात्री कोणी नसते इथे. Actually.. माझी बस miss झाली आणि बैलगाडीतून इकडे आले. लवकर पोहोचण्यासाठी short-cut घेतला आणि वाट चुकले...... पण तुम्ही कसे या वाटेवर .... कोणी येत नाही अस म्हणता तुम्ही ... मग तुम्ही कसे "स्मिताने उलट प्रश्न केला. त्यावर तो हसला," माझी हीच वाट आहे. मला short-cut घ्यावाच लागतो. माझ गाव तुमच्या गावापेक्षा अजून खूप लांब आहे आणि मला भीती वाटत नाही त्यामुळे मी इथूनच जातो नेहमी. "," त्यात आज अमावस्याही आहे ना.... चंद्र असता तर थोडा प्रकाश तरी असता वाटेवर. " स्मिता चालता चालता म्हणाली," नाही ... तिकडे तरीही काळोख असतोच...... पण अमावस्येचा एक फायदा असतो. " ,"कोणता ?"," वर आकाशात बघा जरा…" तिने चालता चालताच वर पाहिलं. असंख्य तारे लुकलुक करत होते. अस द्रुश्य ती पहिल्यांदाच बघत होती. शहरात सगळीकडेच प्रकाश पसरलेला असतो. चंद्रच असतो फक्त आभाळात. पण गावात तसं नसत ना. ती बघतच राहिली आभाळाकडे. " किती चांदण्या-तारे आहेत बापरे.... " आश्चर्याने बोलली स्मिता. तशीच चालत होती ती. "चला madam .... तुमचं गाव आलं "," अरे हो ... कळलंच नाही.... चांदण्यांकडे पाहता पाहता...  आणि तुम्ही कुठे चाललात?"," माझा हा रस्ता ..... तुमचा तो ... मी जातो या रस्त्याने..... सांभाळून जावा घरी. " ," ok ... thanks " म्हणत तिने त्याचे आभार मानले आणि एकदाची घरी पोहोचली ती."किती बर झालं ना ... तो भेटला ते नाहीतर कशी आले असते घरी मी.. "मनातल्या मनात स्मिता बोलली , चालून चालून दमलेली स्मिता लगेचच झोपी गेली. 
                 पुढच्या दिवशी, हॉस्पिटल मध्ये कामात गढून गेली. संध्याकाळी तेच झालं, उशीर. पुन्हा धावाधाव ... पुन्हा बस सुटली. यावेळी कालचा बैलगाडीवाला देखील नव्हता. पायी पायी ... चालत चालत थोडयावेळाने ती त्या ठिकाणी येऊन पोहोचली. दोन वाटा ... कोणती निवडू ...... वेळ पण खूप झालेला. स्मिता त्याच वाटेने निघाली पुन्हा...कालचीच वेळ.... वाट निर्मनुष्य.... आभाळात चांदण्या-तारे.... , बस .. बाकी कोणी नाही. कसलेसे आवाज येत होते. मधेच एक कुत्रा कुठेतरी लांब ओरडायचा. घुबड काळोखातून आवाज करायचा. भीतीदायक वातावरण अगदी. काय करावं सुचेना. पुन्हा ती दिव्याखाली जाऊन उभी राहिली. थोडयावेळाने थंड हवेची झुळूक आली,सोबत मोगऱ्याचा छान सुगंध.... लगेच तिने त्या दिशेने पाहिलं. पुन्हा तोच कालचा ओळखीचा चेहरा.. " काय madam .... आज पण रस्ता चुकलात वाटते... दुसऱ्या वाटेने जायचे ना घरी... " त्याने येतायेताच सांगितले. " रस्ता नाही चुकले पण जराशी भीती वाटली म्हणून इकडे उभी राहिले ." , " चला मग ... जास्त थांबू नका इथे. " तसे ते दोघे निघाले. " तुमची काय हीच वेळ आहे का घरी जाण्याची ? " ," तस काही नाही पण बहुतेक याच वेळेस जातो मी घरी. तिने लगेच घड्याळ बघितलं , संध्याकाळचे ७.३० वाजले होते. " तुमचं गाव येवढ्या लांब आहे मग एखादी गाडी वगैरे नाही आहे का ? " , " नाही आणि गावात कुठे इंधन मिळते गाडीसाठी.... त्यापेक्षा चालल्याने व्यायाम सुद्धा होतो ना... मग गाडीची काय गरज ? " चालता चालता असे वेगवेगळे विषय निघत होते. वेळ कधी गेला ते कळलच नाही." चला.... तुमची वाट आली समोर... बाय .... " अस म्हणून तो निघून गेला. 
               आता स्मिताला रोजच उशीर व्हायचा.... मुद्दाम नाही. निघायच्या वेळेसच काहीतरी काम यायचं आणि रोज तिला चालतच जावं लागायचं. रोज ती त्या दिव्याखाली थांबायची, मग " तो " यायचा आणि दोघे गप्पा मारत मारत आपापल्या घरी जायचे. अस जवळपास महिनाभर चालू होतं... मधेच ती लवकर घरी गेल्याने त्यांची भेट झाली नव्हती. चांगली ओळख झाली होती त्यांची. " अगं.... हल्ली तू रोज उशिरा जातेस घरी... भीती नाही वाटत का तुला ? " , स्मिताच्या हॉस्पिटल मधल्या मैत्रिणीने तिला विचारलं." भीती कसली ... आणि मला एक मित्र सुद्धा भेटला आहे." , " कोण गं ? " ," अगं त्याचा आणि माझा एकच रस्ता आहे. फक्त माझं गाव आधी येत... त्याचं जरा पुढे आहे.... "," ok... नाव काय .... विचारलं नाहीस का ? " ," हो ... सांगते थांब... यश नाव आहे त्याच ... इकडेच पुढे ऑफिस आहे त्याचं… engineer आहे… तिकडे मोठ्या पोस्ट वर आहे." ," हं... हुशार आहे वाटते." ," हो... छान आहे दिसायला... आणि स्वभाव सुद्धा छान आहे ." ," मी कुठे विचारलं तुला ... कसा दिसतो ते ... प्रेमात पडल्या वाटते madam."," चल गं.... काहीतरी काय ... " लाजली स्मिता. खरच तिला आवडायला लागला होता तो. यश सुद्धा तसाच होता, कोणालाही आवडेल असा. स्मिता आता काम नसेल तरीही उशीरच निघायची आणि त्याची वाट पाहत थांबायची. यश येतो आहे हे तिला लांबूनच कळायचे... त्यादिवशी सुद्धा ती उशीरच निघाली. त्याचं ठिकाणी येऊन पोहोचली. त्या वाटेकडे जाणार इतक्यात... " ये बाय .... थांब . " असा आवाज आला मागून... मागे बघते तर एक म्हातारी होती." काय झालं आजी ? " तिने विचारलं," अगं बाय .... तिकडून कुठं चालली व्हतीस.... या इकडाना जा... " ," आजी माझी रोजची वाट आहे ती.","गे बाय .... नग जावू तिकडन ... भूत हाय तिकड... " अस म्हणत ती गेली भरभर निघून. स्मिताही थांबली नाही मग. दिव्याजवळ येऊन यशची वाट बघत राहिली..... यश आल्याबरोबर ती त्याच्याबरोबर चालू लागली. " काय आज गप्प गप्प…?" यशने स्मिताला विचारले," नाही रे असंच.. " ," काहीतरी आहे... मला सांग काय झालं.. " ," तुझा भूत... आत्मा .. यांवर विश्वास आहे का ? " तसा यश थांबला. " वेडीच आहेस गं तू ... " आणि मोठयाने हसायला लागला. " हसायला काय झालं तुला ? " ," अगं .... तू डॉक्टर आहेस ना .... मी engineer.... आणि भुतांच्या गोष्टींवर विश्वास ठेवतेस तू .. म्हणून हसायला आलं मला.. पण मधेच कुठे आलं भूत ? " यशने स्मिताला विचारलं. ", " नाही रे ... तिकडे एक म्हातारी भेटली होती... ती बोलली... इकडून जाऊ नकोस... भूत आहे तिकडे." यशला पुन्हा हसायला आलं," वेडी गं वेडी... भूत असता तर त्याने मलाच पकडलं असताना पहिलं... कारण तुझा अगोदर पासून मी प्रवास करतो इकडून... काही नाही गं.... गावातली माणस जरा अंधश्रदाळू असतात.... त्यांना काही भास झाला तरी भूत आहे अस म्हणतात............. बाकी काही नाही... भूत वगैरे काही नसत ... ते त्यांच्या मानण्यावर असतं सगळ... " तशी स्मिता शांत झाली. अचानक कुठूनतरी एक घुबड तिच्या डोक्यावरून उडत गेलं. स्मिताने यशचा हात घट्ट पकडला. " एक सांगू का तुला..... " ," सांग ना." ," मला एक मराठी गाण आठवलं लगेच." ," कोणतं ... " स्मिताने विचारलं. " चांदण्यात फिरताना ... माझा धरलास हात ... " आणि यश पुन्हा हसायला लागला." गप रे " , " काय गप्प... आज अमावस्या आहे...... वर आभाळात चांदण्या आहेत  आणि तू माझा हात पकडला आहेस ... मग तेच गाण आठवणार ना... " तशी स्मिता हसली. बोलता बोलता आपापल्या घरी कधी आले ते कळलंच नाही स्मिताला. 
                 अश्याप्रकारे त्या दोघांची चांगली friendship झाली होती. ६ महिने झाले त्यांच्या  friendship ला. स्मिता त्याच्या प्रेमात पडली होती. पण ती , यश कधी विचारतो आहे याची वाट पाहत होती. मग तिनेच ठरवलं कि आपल्या आई-वडिलांना यश बद्दल सांगायचे. तसं तिने सांगितलं ही. तिच्या आई-वडिलांना काहीच हरकत नव्हती. यश काही विचारात नाही ... मग आपणच त्याला विचारूया लग्नाचं, असं तिने ठरवलं. 
त्यादिवशी ती ठरवूनच गेली हॉस्पिटल मधे. संध्याकाळ कधी होते आहे याची वाट पाहू लागली. झाली एकदाची संध्याकाळ आणि निघाली ती यशला भेटायला. थोडयाच वेळात यशही आला, " तुला एक गोष्ट आज मला सांगावीच लागेल ." ," कोणती गं ? " ," तू येण्याअगोदर मोगऱ्याचा छान सुगंध येतो. नक्कीच तो फुलांचा नसावा. कारण एवढया लांबून सुद्धा फुलांचा सुगंध नाही येणार. " ," ते एक सिक्रेट आहे ." ," सांग ना रे " ," अगं सिक्रेट वगैरे काही नाही. ..... आमच्या गावात कपडे धुण्यासाठी साबण मिळतो ना, त्याचा वास मोगऱ्याचा आहे , इतका strong आहे कि तो सुवास दिवसभर राहतो. त्यामुळे अत्तर लावायची गरजच नाही." स्मिताने पुढे येउन त्याच्या शर्टचा वास घेतला. " हो रे... मला पण घेतला पाहिजे तो साबण... " , " चल .. पहिल घरी तर जाऊ.. " असं बोलून त्याने चालण्यास सुरुवात केली. " तुला एक विचारू का यश ? " , "विचार ना... " , " लग्न करशील माझ्याशी ? " तिच्या प्रश्नाने यश जागीच थांबला. " बोल ना काहीतरी... उत्तर हव आहे मला. " स्मिता एकटीच बोलत होती." चल ... आपल्याला उशीर होतो आहे.. " ," थांब ना.... उत्तर दे ना मला," ," काय उत्तर हवं आहे तुला... आपल्याला अजून एकमेकांना समजायला पाहिजे ना.. लगेच लग्न कुठे काढलसं तू ... आणि मी तुला चांगली मैत्रीण मानतो.... माझ्या मनात तसं काहीच  नव्हतं....शिवाय माझ्या आणि तुझ्या घरी पण सांगावं लागेल ना… " ," माझ्या घरी सांगितलं आहे मी . तू तुझ्या घरी जाऊन विचार....... नाहीतर मी माझ्या पप्पांना बोलावू का.... बोलणी करायला ... ", " नको ... थांब जरा . घाई नको... मलाही विचार करू दे जरा... " तोपर्यंत त्याची वाट आली होती... " चल bye " , " मला promise कर ... उद्या मला उत्तर देशील ... नाहीतर मी जाणारच नाही घरी... " ," हो बाबा ... तुला उद्या नक्की सांगतो हा ... आता घरी जा.. " आनंदातच स्मिता घरी पोहोचली. 
                पूर्ण दिवस ती हवेतच होती...... संध्याकाळची वाट पाहत होती ती . आणि यशचा होकार कधी ऐकते आहे अस तिला झालं होतं. संध्याकाळी वेळेत पोहोचली ती. यशची वाट बघत उभी होती कधीची. " आज खूप वेळ झाला यशला." रोज ७.३० ला येणारा ... ८ वाजले तरी आला नाही. " काम असेल बहुतेक त्याला " घड्याळात ९ वाजले तेव्हा ती निघाली...... पुढच्या दिवशीहि तेच झाले.... यश काही आला नाही... असच आठवडा गेला. यशचा काहीच पत्ता नाही. " कुठे गेलास रे मला सोडून.... काय चूक केली मी …" एकटीच बसून स्मिता रडत बसली होती. त्याच दिव्याखाली... ५ - १० मिनिटं गेली... थंड हवेची झुळूक आली ... पण .... मोगऱ्याचा सुगंध नाही आला कि यश नाही आला .... तशीच रडत होती ती ...... अचानक कुठे गेला यश ..........
-------------------------------------------------------to be continued------------------------------------------------------








Thursday 6 March 2014

" सोनेरी दिवस " .( भाग ३)

           त्यादिवसापासून विवेकचा ग्रुप जरा गप्प गप्प असायचा. राकेशच तसं वागणं कोणालाच आवडलं नव्हतं. तरीसुद्धा त्याने जे केलं होतं त्याचा चांगला परिणाम दिसून आला. बंड्या त्या गल्लीत दिसेनासा झाला होता. आणि इतर वात्रट मुलांना देखील कळलं होतं , राकेशने बंड्याला कसं झोडपलं होतं ते. त्यामुळे ती मुलं देखील आता शांत झाली होती. भडकमकर काकांनी तर त्या ग्रुपला शाबासकी दिली. त्यामुळे आता सगळ्यांचा राकेशवरचा राग कमी झाला होता. काय झालं बे सगळ्यांना .......आजकाल सगळे गप्प झालात ..... कि माज्या बरोबरच बोलत नाय कोणी ... " मधल्या सुट्टीत राकेशने सगळ्या ग्रुपला एका कोपऱ्यात घेऊन विचारलं. कोणीच काही बोललं नाही. " माज्या बरोबर बोलला नाही ना तर एकेकाला .... " असं म्हणत त्याने संकेतला पकडलं आणि जोरात पाठीत धपाटा मारला. " आई … गं .. कुत्र्या .... साल्या .... मलाच काय मारत असतोस सारखा.... "संकेत पाठ चोळत म्हणाला. तसे सगळे हसायला लागले. " अरे तुझी जरा खेचत होतो रे सगळे. कोणीच रागावलं नाही आहे तुझावर. " नितीन बोलला ," बाकी कोणाचा माहित नाय मला ..... पण मी नाय बोलणार याच्या बरोबर कधी."संकेत अजूनही पाठ चोळत होता त्याची. " अले ......अले ......माज्या बाबूला लागलं वाटते. " राकेश संकेतची मस्करी करत बोलला. " घरी जा .... नायच बोलणार तुज्याबरोबर ... नायतर तुज्यासारख्या भटक्या जमातीला B.M.C. शिवाय कोण विचारते." , "म्हणजे ? " राकेशने संकेतला विचारलं. " अरे ... ती नाय का....  B.M.C. ची गाडी असते. भटक्या कुत्र्यांना उचलणारी.... "," साल्या .... संक्या.... मेलास आता ." म्हणत राकेश संकेतच्या मागे पळाला. ..... आणि ग्रुप पुन्हा एकत्र आला. 
          वार्षिक स्पर्धा सुरु व्हायच्या होत्या.विवेकचा ग्रुप चांगलाच होता सर्व खेळात . त्यातल्यात्यात दुसऱ्या वर्गाची चांगलीच ठसन होती त्यांच्या वर्गाशी,आणि स्पर्धा सुरु झाल्या सुद्धा. पहिल्या सर्व मुलींच्या स्पर्धा झाल्या. त्यात बहुतेक वेळेस दुसराच वर्ग जिंकला. त्यामुळे विवेकच्या ग्रुपला जरा tension आलं होतं. " विक्या .... नित्या ..... संक्या ..... काहीही करा.... पन आता आपल्यावर जबाबदारी आहे वर्गाची. आपल्याच जिंकावा लागणार आता. " राकेशने घोषणा केली . राकेश स्वतः कब्बडीचा कॅप्टन होता आणि त्यानेच टीमला एकहाती सामना जिंकून दिला. पुढे नितीनने बुद्धीबळ मध्ये सगळ्यांना हरवून बाजी मारली. नितेश आणि विशालनी " प्रश्न-मंजुषा " जिंकून ग्रुपच नाव राखलं. आता राहिले संकेत आणि विवेक. ते दोघेही फुटबॉलमधे best होते. शेवटची match होती फुटबॉलची आणि match च्या सुरुवातीलाच त्याला मुद्दाम पाडलं. त्याच्या पायाला लागलं होतं.चांगला खेळाडू बाहेर बसला कि काय होते ते माहितच आहे. दुसऱ्या टीमनी २ गोल सुद्धा केले.  विवेकला ते  बघवत नव्हत आणि एकटा संकेत कमी पडत होता. शेवटी न राहवून विवेक तसाच लंगडत लंगडत खेळायला उतरला. त्याला बघून वर्गातील मुले-मुली " विवेक ..... विवेक ..... " असं आनंदाने ओरडायला लागली. त्याने हळूच सईकडे नजर टाकली. ती सुद्धा   " विवेक ..... विवेक ..... " असं ओरडत होती. हे बघून त्याच्या अंगात वेगळीच ताकद आली. पायाचं दुखणं तर कधीच विसरला होता तो. आता संकेत आणि विवेक दोघेही मैदानावर धुमाकूळ घालत होते. विवेकने ३ तर संकेतनी १ गोल करून match जिंकून दिली. विवेक तर वर्गाचा हिरो झाला होता पण त्याचा पाय आता सुजून लाल झाला होता. सगळे येऊन त्याला शाबासकी देत होते,अगदी मुलीसुद्धा.घोळका केला होता त्याच्या भोवती ," विवेक .... "अचानक मागून आवाज आला,तसा तो मागे वळला, तर सई....... तिच्याकडेच तो बघत राहिला. तिने हात पुढे केला," तुझ्यामुळे आज match जिंकलो आपण .... thank you " विवेक तर तसाच बसला होता तिचा हात पकडून," अबे... आमाला पन हात मिलवायचे आहेत हिरो लोकांचे" असं राकेश मुद्दामच बोलला. तशी सई जराशी लाजली आणि बाजूला हसत हसत गेली. विवेक जाम खूश होता आज. सगळे त्याच्याविषयीच बोलत होते ना. त्यावेळी सगळे होते मैदानावर. फक्त एकाला सोडून ... " बंड्या" .... तो नव्हताच तिथे. थोडयावेळाने शाळेच्या पायऱ्या उतरताना विवेकने त्याला पाहिलं. तसं त्याने नितीनला पण सांगितलं,"राकेशला नको सांगूस... नाहीतर पुन्हा तापेल तो." म्हणत नितीनने विवेकला गप्प केलं.
         सगळे आपापल्या वर्गात गेले. छान झाल्या होत्या स्पर्धा.सगळे त्याच धुंदीत होते. तेव्हाच.... " सर ... माझ्या bag मध्ये मी माझे पैजण आणि कानातली रिंग काढून ठेवली होती.... ती नाही आहे bag मध्ये."अशी एक मुलगी रडत रडत म्हणाली. " अबे ... या पोरी ना... कुठेतरी ठेवायचं आणि नंतर रडत बसायचं " राकेश हसतच म्हणाला."कोणाला हसायला येतंय " सुरेश सर म्हणाले ... " अबे ... राक्या गप... तवा आला आहे .. गप की ... "संकेतने हळूच राकेशला खुणावले. [ सुरेश सर खूप रागीट होते. सगळी मुले त्यांना घाबरायची. कोणाचीही चूक सापडली तर त्याला ते सर किती मारायचे हे त्यांनाच माहित होते. अगदी लगेच तापायचे ते .. म्हणून त्यांना सगळे " तवा " म्हणायचे. ] " काय झालं ? कुठे ठेवले होते पैजण ? " , " bag मध्ये सर , स्पर्धा होत्या म्हणून madam नी bag मध्ये सांगितलं होतं ठेवायला,आता नाही आहे " ती रडत रडत सांगत होती. सुरेश सरने सगळ्या वर्गावर नजर फिरवली. " कोणी घेतलं असेल तर आत्ताच देऊन टाका. खूप झाली मस्करी. " सगळा वर्ग एकमेकांकडे बघत होता. " ठीक आहे ,तुम्ही असे ऐकणार नाहीत. चला .... सगळ्यांनी आपापल्या bag आणि खिशे दाखवा. " ,"आणि आता कोणाकडे सापडलं तर बघा .... मी काय करतो ते. ..... ","अबे ... तापला बघ तवा...... चल लवकर ... डब्यातल्या चपात्या गरम करूया " राकेश हसत म्हणाला "गप बस साल्या .... " विशालने राकेशला टोचल. तो गोंधळ ऐकून आजूबाजूच्या वर्गातली मुल-मुली " काय चालू आहे वर्गात " म्हणून जमा झाली होती. " कोण आलेलं वर शाळेत ? कोणी पाहिलं नाही का ? " सुरेश सर bag चेक करत म्हणाले. " राकेश आलेला सर शाळेत ..... स्पर्धा सुरु असताना " सई मागूनच हळू आवाजात म्हणाली. तसा सगळा वर्ग राकेश कडे बघायला लागला. सुरेश सर सुद्धा आता त्याच्याकडेच बघत होते. " राकेश .... तू आलेलास खरोखर." , " अबे पानी प्यायला आलो व्हतो बे ... " राकेश हळू आवाजात पुटपुटला. " काय रे ... सई खर बोलते आहे का ? " सुरेश सर रागात म्हणाले." नाय ... हो ...... हो ... सर..... पन मी वर्गात नाय आलो व्हतो ... पानी पियाला आलो व्हतो सर  ..... " ," ते कळेलच आता .. " म्हणत सरांनी त्याची bag हिसकावून घेतली. आणि तशीच bag उलटी केली सर्वासमोर. bag मधून वह्या पुस्तक तर पडलीच पण त्याच बरोबर चांदीचे पैजण आणि कानातली रिंग सुद्धा पडली. सगळा वर्ग चाट पडला. त्याच्या मित्रांना तर विश्वासच बसत नव्हता. सुरेश सर तर रागाने लाल झाले होते. तसेच ते झपझप राकेश जवळ आले आणि खाड्कन थोबाडीत मारली त्याच्या. " चोरी करतोस .... भिक लागली का तुला…बोल " सुरेश सर तोंडाबरोबर हातही चालवत होते." नाय .... सर .... मी नाय चोरलं ... " राकेश स्वतःला वाचवत म्हणाला,पण त्याचं ते सर कुठे ऐकत होते. " थांब.....  तू असा कबूल नाही होणार "म्हणत त्यांनी आता लाकडी पट्टी घेतली आणि त्याला मारणार इतक्यात … गोंधळ ऐकून मुख्याध्यापक वर्गात आले," थांबा .... काय चाललाय ? कशाला मारताय त्याला ? " ," चोरी .... चोरी केली आहे त्याने." ," नाय सर ..... नाय ... मी नाय चोरी केली ." असं म्हणत राकेश मुख्याध्यापकांकडे धावला. सुरेश सर त्याला मारण्याच्या तयारीत होते. राकेशला तर खूप मारलं होतं त्यांनी." सुरेश , तो काय बोलतो ते ऐकून तर घ्या. " मुख्याध्यापक सुरेश सरला म्हणाले. तशी त्यांनी हातातली पट्टी खाली ठेवली. " बर... तू चोरी केली नाहीस ना... मग तुझ्याकडे कसं आलं सगळे" मुख्याध्यापक राकेश कडे बघत म्हणाले," माहित नाय सर.... " ," मग तू कशाला आलेलास वर शाळेत , जेव्हा सगळे खाली स्पर्धा बघत होते.","सर ... मी पानी प्यायला आलो व्हतो... पायजे तर भडकमकर मामांना विचारा."," ठीक आहे ... अरे ... त्या भडकमकर काकांना बोलवा कोणीतरी. " सर म्हणाले , तस कोणीतरी जाऊन त्यांना घेऊन आलं. " व्हय .... सर ..... त्यो राकेश पानी प्यायलाच आला व्हता.... मी पन बघितला त्याला.... " , " बर ... ठीक आहे … जा तुम्ही .. आणि बाकीच्या मुलांनी सुद्धा आपापल्या वर्गात जा ... काहीही झालेलं नाही." मुख्याध्यापक म्हणाले. " सुरेश , आपल्याकडे काहीच पुरावा नाही कि याने चोरी केली आहे. आणि तो पाणीच पिण्यासाठी आलेला हे सुद्धा सिद्ध झालेलं आहे, मग कशाला विषय वाढवायचा ? " , " आणि राकेशने चोरी केलीली नाही. कोणीतरी मस्करी केली असावी. आताच्या वेळेस मी माफ करतो सगळ्यांना पण पुढील वेळेस मोठी शिक्षा करण्यात येणार." वर्गाला उद्देशून मुख्याध्यापक म्हणाले आणि सुरेश सर ला सोबत घेऊन गेले. सगळा वर्ग गप्प होता. राकेशचा सगळं अंग ठणकत होतं, किती मारलं होतं त्याला. त्यानंतर लगेचच शाळा सुटली . विवेकचा ग्रुप एकत्रच होता पण विवेक जरासा अस्वस्त होता. तेवढ्यात विवेकला सई दिसली तसा तो धावतच तिच्याकडे गेला. बाकी सगळे त्याच्याकडे बघतच राहिले. कारण तिच्यामुळेच राकेशला मार पडला होता विनाकारण.... " सई .. " विवेकने तिला लांबूनच हाक मारली. तशी ती थांबली," सई ... तुला एक विचारू का ?" , " काय विचारायचे आहे ? " जरा घाबरतच म्हणाली ती. " तू फक्त राकेशलाच बघितलंसं का .... ? " ," असं का विचारतो आहेस? मी खरंच बोलली " ," नाही ... तू खर नाही बोललीस ... मी पुन्हा विचारतो ... तू फक्त राकेशलाच बघितलस का ... वर शाळेत येताना ? " सई जरा घाबरीघुबरी झाली होती ," बोल काहीतरी सई .... ", विवेक रागातच बोलला. " मी घाबरले होते रे विवेक ... आणि तो खूप वाईट आहे रे ... ", " तो कोण ? " ," बंड्या ... " , " मग तू राकेशच नाव का घेतलस ? " ती काहीच बोलली नाही. " तुझ्या कडून मला अशी अपेक्षा नव्हती…तुझ्यामुळे माझ्या मित्रावर चोरीचा आळ आला... तुला नाही माफ करणार कधी मी... ," पण मी त्याला बघून खूप घाबरली होती रे ." विवेकने ते ऐकले नाही. विवेक आपल्या ग्रुप जवळ आला. " एक कानफडात मारायची ना तिच्या. माझं नाव घेतलं तिने." राकेश विवेकला बोलला. विवेक शांत होता. " बोल ना ... काय बोललास तिला. " नितेश आता मोठ्या आवाजात बोलला," विवेक गप्पच," बोला ना .... साल्यानो…. काय चाललंय?आणि तू काय बोलत होतास तिच्याबरोबर." राकेश आता रागाने लाल झाला होता. " तिने तुलाच नाही बघितलं होतं फक्त "," मग..... आणखी कोन होता." , " बंड्या "," साला ... आता बघ काय करतो मी त्याचा . त्याच्यामुळे मार पडला मला.... आणि तिला पन बघून घेतो. " राकेश बोलला ," तिची काही चूक नाही " विवेक मधीच बोलला," मी पण बघितलं होतं त्याला " विवेक अस बोलला आणि सगळे त्याच्याकडे बघू लागले. " मला हे त्याने सांगितले होते,पण मीच त्याला गप्प राहा म्हणून सांगितले होते." कोणी बोलायच्या आधीच नितीन बोलला. " अबे ...... पन जेव्हा तो तवा मला कुत्र्यासारखा मारत होता तेव्हा तुला तुजा तोंड उघडता नाय आला " नितीन आणि विवेक गप्प ," बोल ना साल्या ..... तेवा तुला तुजा मित्र नाय आठवला....... "...... " हो .... शेवटी तू " त्याचाच भाव ना. एकच रक्त आहे ना दोघात ... " , " राक्या गप्प आता .... खूप बोलतो आहेस .... " , विशाल मधेच बोलला. " तुमी पन गप्प बसा सगळे .... कोणी आलं नाय मदतीला माजा ... सगळेच सारखे.... परत येऊ नका माजा जवळ .... समजलं ना ... "असं म्हणत राकेश एकटाच निघून गेला रागात. " सगळ तुझ्यामुळे झालं आहे विक्या..... तुला बोलायला काय झालं होतं." नितेश म्हणाला," अरे .... पण मी बंड्याला बघितलं याचा अर्थ त्याने चोरी केली असा नाही होत. " ," म्हणजे राक्या ने चोरी केली अस म्हणायचे आहे तुला… अजूनही तू त्याचीच बाजू घेतो आहेस. आमच्यावर तुझा विश्वास नाही आहे वाटते. " संकेतने विवेकला विचारले. विवेक तर काहीच बोलण्याच्या तयारीत नव्हता. " मला वाटते आपल्याला उत्तर मिळालं आहे. तुझ्यासारखे मित्र असतील तर नसलेलेच बरे.... " अस म्हणत नितेश .... विशाल आणि संकेतला बरोबर घेऊन निघून गेला. आता उरले फक्त नितीन आणि विवेक. विवेकनी नितीनकडे बघितलं.... नितीनने त्याच्या खांदयावर हात ठेवला आणि म्हणाला , " तुझी काहीही चूक नाही आहे, हे मला माहित आहे. मी तुला नाही सोडणार कधी एकटा." 
                त्यादिवसापासून सगळा ग्रुप वेगळा झाला. संकेतनी विवेकच्या बाजूची जागा सोडून दुसरीकडे बसला होता. त्यामुळे विवेकच्या बाजूला आता नितीन बसला होता. विशाल आणि नितीन आजूबाजूलाच बसायचे पण विवेकपासून लांब. राकेश तर २ दिवस आलाच नाही शाळेत. वर्गातली सगळी मजाच निघून गेली होती जणूकाही. सगळा वर्ग गप्प असायचा. ४ दिवसांनी शाळेने एक कार्यक्रम आयोजित केला होता. शाळेपासून जरा लांबच होता. विवेकचा सगळा ग्रुप होता आणि राकेश सुद्धा आलेला. आज प्रथमच सगळ्या शाळेने त्यांना वेगळं झालेलं पाहिलं होतं. सगळेच वेगवेगळ्या ठिकाणी बसले होते. कार्यक्रम संपला तेव्हा संध्याकाळ झाली होती. त्यामुळे शाळेतल्या मुली घोळक्या-घोळक्याने घरी निघाल्या होत्या, राकेश मुद्दामच मागे थांबला होता , पुन्हा ग्रुपमधला कोणी समोर यायला नको म्हणून. सगळे लांब गेलेले बघून राकेश निघाला. इतक्यात बाजूच्या गल्लीतून जोरात किंचाळी ऐकू आली. राकेश धावतच गेला तिकडे.तिकडे एक शाळेतली मुलगी जमिनीवर निपचित पडलेली. आणि कोणीतरी धावत जाताना राकेशने पाहिलं. त्याच्यामागे जाणार होता तो पण तो तिला बघून थांबला तिथेच. " हिला काय झाल ? " तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. " काय करायचा आता? " असा तो विचार करत होता. तो खाली बसला आणि तिला जागं करण्याचा प्रयत्न करू लागला. ती तर बेशुद्धच होती. काय कराव हे राकेशला कळतच नव्हतं. आणि तिला तसं एकटीला टाकून जाण्यात काहीच अर्थ नव्हता. तेवढ्यात तिथे सुरेश सर आले. त्यांचा तोच रस्ता होता घरी जाण्याचा आणि त्यांनी राकेशला बघितलं. " काय रे .... काय केलंस तिला ? " अस म्हणत सुरेश सर धावतच त्यांच्या जवळ पोहोचले, " मी काय नाय केला सर ... " राकेश म्हणाला, सुरेश सरांनी तोपर्यंत त्याची कॉलर पकडून मागे ढकललं होत. ते त्या मुली जवळ बसले. तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयन्त केला त्यांनीही. पण ती अजूनही बेशुद्धच होती. एकटीच जात होती ती तिकडून,काळोखातून, त्यावेळी कोणीच नव्हते तिकडे. अचानक कोणास ठाऊक, बंड्या कसा आला तिथे. एकटी मुलगी बघून तो तिच्यामागे गेला. आणि त्याने तिला गाठलंच. काळोखाला घाबरलेली ती बंड्याला बघून अजूनच घाबरली. त्याने पटकन पुढे होऊन तिचा हात पकडला. आणि तिने जोरात किंचाळी फोडली, मानसिक धक्का बसला होता तिला त्यामुळेच ती इतका वेळ बेशुद्धच होती. बंड्या मात्र राकेशला येताना बघून पळाला होता. उगाचच राकेश अडकला होता. सुरेश सरनी एव्हाना गोंधळ करून एका-दोघांना बोलावून घेतलं होतं . त्यांनी त्या मुलीला हॉस्पिटल मधे नेलं होतं. सुरेशनी तेवढयात पोलिसांना फोन करून बोलावून घेतलं होतं. सुरेश सरचा नाहीतरी राकेशवर रागच होता, कारण त्यादिवशी मुख्याध्यापाकानी त्यानाही चांगलाच दम दिला होता. पोलीसही आले नव्हते अजून. सुरेश सरचे हात शिवशिवत होते ,राकेशला मारायला. " बोल काय केलस तिला ? " , सुरेश सरनी राकेशला पुन्हा विचारलं. राकेशने मानेनेच नाही म्हटलं. सुरेश सरला तो अपमान वाटला. त्यांनी त्याला उगाचच मारायला सुरुवात केली. " बोल .... बोल .... काय केलंस तिला.... "त्याला ते मारतच होते..... ,हाताने .... पायाने . पोलिस येईपर्यंत राकेश अर्धमेला झाला होता मार खाऊन. पोलिस मग राकेश आणि सुरेश सर अस दोघांनाही घेऊन गेले. सुरेश सरला ताकीद देऊन सोडण्यात आलं,पण राकेश मात्र अजूनही पोलिस स्टेशन मध्येच होता. 
                  दुसऱ्या दिवशी सगळ्या शाळेत ती बातमी पसरली. विवेक आणि सगळ्या मित्राचं भांडण झालेलं असलं तरी सगळ्यांना तेच वाटत होतं कि राकेश कसाही असला तरी अस काही करणार नाही. राकेशला दोन दिवसांनी जामीनीवर सोडण्यात आलं. ती मुलगी ३ दिवस झाले तरी शुद्धीवर आली नव्हती त्यामुळे ती शुद्धीवर येईपर्यंत राकेशला सोडण्यात आलं होतं. कारण तिलाच नक्की काय घडलं , तिथे कोण होतं हे माहित होतं. तिच्या जबानीवर राकेशच भविष्य ठरणार होतं. 
                 राकेश आता शाळेत यायला लागला होता,पण गप्प गप्प असायचा. सगळ्यात शेवटी बसायचा वर्गात,सगळ्यांपासून लांब अगदी. कोणाशीच बोलायचा नाही विवेकला त्याचीशी बोलायचं होतं ,परंतु जाणार कसा त्याच्या जवळ. वर्ग सुद्धा गप्प असायचा. विवेकनी " त्या " जागी थांबणं आता सोडून दिलं होतं. शाळेची वेळ झाली कि तो न थांबता शाळेत यायचा. त्याला आता सईकडे बघणही पसंत नव्हतं. तिच्यामुळे राकेश बरोबर भांडण झालं होतं ना. सईलाही विवेक तिथे तिची वाट पाहतो हे माहित होतं,परंतु तिने त्याला कधी त्याची जाणीव होऊ दिली नव्हती. तिला आता रोज चुकल्या चुकल्या सारखं वाटत होतं. कारण विवेक तिथे थांबत नव्हता ना. वर्गात तरी काय ? विवेक आणि नितीन बोलायचे एकमेकांबरोबर. मधलीसुट्टी झाली कि संकेत जायचा खेळायला दुसऱ्या मुलांबरोबर. नितेश आणि विशाल डबा खाऊन झाला कि सरळ लायब्ररीत जाऊन अभ्यास करत बसायचे. राकेश नसायचा वर्गात, मधली सुट्टी झाली कि तो जायचा कुठे तरी. एक दिवस , शाळा सुटल्यावर भडकमकर काकांनी विवेकला थांबवलं ," काय झालं रे पोरांनो हे..... सगले कसे वेगले झालात रे ... " विवेकच्या डोळ्यात पाणी आलं, काहीही न बोलता तो निघून गेला.
                 १० दिवसांनी ती मुलगी शुद्धीवर आली. भडकमकर काकांनी विवेकला शाळेत आल्याआल्या त्याला ही बातमी दिली. " राकेश आला आहे का मामा ? " , " नाय रे ... मला वाटता .... पोलिस घेऊन गेले असतील त्याला…त्या पोरीची जबानी हाय नव्हं.... " वर्ग तर सुरु झाले होते पण विवेकच लक्षच वर्गात नव्हतं. "काय झालं असेल रे नितीन .... "," माहित नाही रे ... " . मधली सुट्टी झाली. सगळी मुलं डबा खाऊन खेळायला जाणार इतक्यात पोलिस आले, राकेशही होता त्यांच्या बरोबर. त्यांच्यासोबत अजून एकजण होता परंतु पोलिस असल्यामुळे तो कोणालाच दिसला नाही. पोलिस तडक दोघांना घेऊन मुख्याध्यापकांच्या ऑफिस मध्ये गेले. बाकी कोणालाच काही माहित नाही. मधली सुट्टी संपली . वर्ग पुन्हा सुरु झाले. आणि तेव्हा मुख्याध्यापक वर्गात आले. सोबत पोलिस , राकेशला घेऊन आले , मागोमाग " बंड्या" ही होता. त्याला बघून सगळेच आचर्यचकित झाले. " मुलांनो.... राकेश दोषी नाही आहे. त्या मुलीने सांगितलं आहे पोलिसांना. आरोपी "विक्रम" उर्फ " बंड्या" आहे. आपण राकेशला उगाचच दोषी ठरवत होतो." भडकमकर काकाही तिथे होते.त्यांनी बंड्याच्या डोक्यात टपली मारली आणि म्हणाले," काय रे..... आजून काय नाय सांगायचा तुला." तसा बंड्या थोडासा घाबरला पण पोलिस होते ना बाजूला , मग त्याला बोलायलाच लागलं., " त्यादिवशी...... राक्याला मी बघितला होता, पानी प्यायला आला होता. म्हनून मी पन त्याला मार बसावा म्हनून त्याच्या bag मधे त्या पोरीचे दागिने ठेवले व्हते."," म्हणजे अजून एक आरोप ... चोरीचा," अस म्हणत पोलिस त्याला मारतच घेऊन गेले. " राकेश जा , जाऊन बस वर्गात. तू निर्दोष आहेस. तुला झालेल्या त्रासाबद्दल मी सगळ्या शाळेकडून माफी मागतो." अस मुख्याध्यापक म्हणाले आणि आपल्या ऑफिसमधे निघून गेले. राकेश पुन्हा मागच्या बाकावर येउन बसला. विवेकला आता हलक हलक वाटत होतं. tension गायब झालं होतं. थोडयावेळाने शाळा सुटली. जाताना वर्गातील प्रत्येक जण राकेशला जाऊन sorry म्हणत होता. विवेक आणि त्याच्या मित्रांपैकी कोणीच गेलं नाही. विवेक आणि नितीन सुद्धा राकेशला न भेटताच बाहेर आले. शाळेच्या गेटबाहेर जाणार, " ये पोरानो... थांबा... थांबा.. जरा" अशी हाक आली कानावर, तसे विवेक आणि नितीन मागे वळले. काकांनी त्यांना खुणेनेच " थांबा" म्हणून सांगितलं, तर त्यांच्याबरोबर संकेत ,विशाल आणि नितेश सुद्धा होते. " थांबा हा इकडच.... आलो पटकन... " म्हणत पटापट निघून गेले. खूप दिवसांनी ते असे एकत्र उभे होते. पण कोणीच बोलत नव्हत. तेवढयात भडकमकर काका राकेशला घेऊन आले." पोरांनू..... मी आता म्हातारा झालो आहे… निदान माज्यासमोर तरी एकत्र राव्हा ना... सगल विसरून जावा हा आता..... " अस म्हणत ते निघून गेले. ," Sorry राक्या..... " विवेक हळूच बोलला. तसा राकेशने टपली मारली त्याच्या डोक्यावर ," अबे तू काय sorry बोलतोस ... मीच बोललो व्हतो तुला ना रागात.... तेव्हा मीच sorry ," अस म्हणत राकेशने त्याला घट्ट मिठी मारली. बघता बघता सगळ्यांनी त्या दोघांना मिठी मारली. खूप दिवसांनी ते असे भेटत होते. " बाकी .... सर्वांनी मला माफ केल ना... " राकेशने विचारलं. ," हो रे.... आणि ...... sorry विवेकला सुद्धा... वाईट वागलो ना... आम्ही. " संकेतने नितेश आणि विशाल तर्फे माफी मागितली. " तू आहेसच वाईट " अस म्हणत राकेशने संकेतच्या पाठीत धपाटा मारला.... " अगं आई गं ..... " संकेत कळवळतच पाठ चोळत उड्या मारत होता," साल्या ... तुला आता जिता नाय सोडत" म्हणत संकेत राकेशच्या मागे धावत गेला. " चला.... आपला राकेश आला परत." नितीन म्हणाला तसे सगळे मनापासून हसले आणि त्या दोघांच्या मागे मागे चालत निघाले.    
                  पुढच्या दिवशी, विवेक वर्गात आला तेव्हा त्याला बर वाटलं. कारण संकेत पुन्हा त्याच्या बाजूला येऊन बसला होता. त्यामुळे नितीनला तिथून दुसरीकडे बसावं लागल. नितीन राकेशच्या बाजूला जाऊन बसला होता,संकेत आणि विवेकच्या बरोबर मागच्या बाकावर आणि उरलेले विशाल आणि नितेश त्या दोघाच्या मागे. राकेशला बरोबर मध्येच बसवलं होतं सगळ्यांनी. वर्ग सुरु व्हायचा होता अजून. तेव्हाच सईने वर्गात प्रवेश केला. पुढे जाताना तिने विवेककडे एक कटाक्ष टाकला. परंतु विवेकचा तिच्या वरचा राग अजून गेला नव्हता. विवेकने तशीच मान वळवली दुसरीकडे. सईला वाईट वाटलं. ती तशीच जाऊन बसली तिच्याजागी. " विक्या.... वाहिनी आपल्याला sorry बोलल्या बर का .... " राकेशने विवेकच्या कानात सांगितलं. ," कोण वाहिनी.... " विवेक बावरला," साल्या ..... मला काय येडा समजतोस काय ..... सगल माहित आहे माला ... आनी म्हनतो कोन वहिनी. " तसा विवेक लाजला जरासा. " अबे .... लाजतोस काय .... आनी तिची काही चुकी नवती हे नंतर कलल मला ... मी पन sorry बोललो तिला .... आता तू पन बोल तिला... " विवेक गप्प ," तिला sorry बोल ... नायतर मारीन असा... " राकेश म्हणाला आणि गुपचूप बसलेल्या संकेतच्या पाठीत धपाटा मारला,"कुत्र्या .... तुला काय मीच भेटतो काय.... कशाला मारलास ... " ," साल्या .... तुमाला पन माहित होतं ना ... याचा लफड .... मला सांगितलं नाय म्हणून मारलं ... " ," हो रे ... तिला sorry बोलला पाहिजे मी ." विवेक राकेशला बोलला. मधली सुट्टी झाली तशी सगळी मुल डब्बा खाऊन मैदानावर खेळायला पळली. मुली वर्गातच बसून गप्पा मारत होत्या. विवेकला सईला वर्गाबाहेर बोलावयाचे होते पण तिचं लक्षच नव्हतं. " तुम्ही व्हा पुढे ... मी येतो नंतर ... माझं काम आहे जरा... ","चला रे ... भावोजींना …. वहिनींना काहीतरी सांगायचे आहे." असे म्हणत विशालने विवेकला चिडवलं आणि सगळे मैदानावर गेले. विवेकने सईला खुण करूनच बाहेर बोलावले तशी ती वर्गाबाहेर आली ," Sorry... माझं चुकलं... मला असं नाही वागायला पाहिजे होतं." , " नाही रे... थोडं माझं पण चुकलं.. मी जर बोलले असते तर एव्हढं सगळ झालं नसतं.... Sorry ." दोघांनी एकमेकांना Sorry म्हटलं. आणि तसेच उभे राहिले... मग सईनेच हात पुढे केला... " आपण चांगले मित्र होऊ शकतो ना " त्यानेही हात पुढे करून मैत्री केली तिच्याबरोबर.   
                 दुसऱ्या दिवशी , विवेक नेहमीच्या वेळेला घरातून निघाला, " ७.०५" ला पोहोचला त्या जागी... आज त्याला तिथे थांबावस वाटलं.... सगळ तर पुन्हा नेहमी सारखंच झालं होतं ना... सई सुद्धा त्याचं वेळेस त्या गल्लीतून बाहेर पडली. विवेकच्या बुटांची लेस " उगाचच " सुटली. ... ती बांधण्यासाठी तो खाली वाकला," सई पुढे गेली असेल आता" असा विचार करून तो पुन्हा उभा राहिला तर सई समोरच उभी. तो जरासा सैरभैर झाला. सईला जरासं हसायलाच आलं. " आता असं काही खोट नाटक करायची गरज नाही. मला सगळ माहित आहे. " ते ऐकून विवेकला सुद्धा हसायला आलं. " चल .. निघूया का ? , नाहीतर शाळेत जायला उशीर होईल."तसे ते चालत चालत निघाले. त्याला आता कसलीच भीती नव्हती. त्याला जुनं सगळ परत भेटलं होतं. वर्ग सुरु झाले. पुन्हा तीच मजामस्ती वर्गात. पुन्हा तेच मैदानावर जाऊन खेळणं सुरु झालं. सगळीकडे आनंदी आनंद. शाळेतला शेवटचा तास सुरु झाला " मराठीचा " . मराठीच्या बाई खूप चांगल्या होत्या. शाळेतल्या सगळ्या मुलांना त्या आवडीच्या होत्या. " चला ... आज मी " मराठी निबंध" या विषयावर बोलणार आहे . गेल्या परीक्षेला कोणीच चांगले लिहिले नव्हते म्हणून आज जरा practise करूया हा... " , " या बाई बोलायला लागल्या कि एकदम माझी आई बोलते अस वाटते रे ," राकेश नितीनला म्हणाला." आज शाळा या विषयावर बोलूया. प्रत्येक मुलाने काहीना काही बोलायचे. चला सुरुवात करा. " आणि एकेका मुलाने बोलायला सुरुवात केली. विवेकच लक्ष दुसरीकडेच होतं. तो विचार करत होता," सगळ कस पहिल्या सारखं झालं . राकेश पुन्हा मस्करी करायला लागला आहे, ग्रुप एकत्र झालेला आहे , बंड्या तुरुंगात आहे , तो काही आता शाळेत येत नाही पुन्हा, सुरेश सर ला शाळेतून काढलं आहे आणि सई बरोबर चांगली मैत्री झाली आहे , अजून काय पाहिजे मला." बाईचं लक्ष विवेककडे गेलं ," विवेक बाळा... कुठे लक्ष आहे तुमचं , " तसा विवेक हसला. " चल ... आता तू सांग शाळेबद्दल काहीतरी.... " ..... विवेक उभा राहिला बोलायला ... खूप विचार करून त्याने बोलायला सुरुवात केली. ," शाळा .... म्हणजे फक्त एक दगड-मातीची वास्तू नसते. त्यात दडलेलं असते प्रेम... चार भिंती तर घराला सुद्धा असतात, पण तिथे रागीट वाटणारे ,आतून प्रेमळ असणारे सर नसतात, घरापासून लांब असलो तरी आईची आठवण येऊ न देणाऱ्या बाई नसतात , लवकर येऊन वहीतला अभ्यास न समजला तरी लिहून घेणारे, पाठीवर शाबासकी देण्याऐवजी डोक्यावर टपली मारणारे, चूक झाली तर हक्काने दम देणारे, स्वतःपेक्षा मित्राचं पोट भराव म्हणून डब्बा घेऊन येणारे आणि भांडण झाली तरी जिवाला जीव देणारे मित्र नसतात, ........... खोडकर फुलपाखरांच एक छोट जग, त्यात असतात सुंदर अशी आठवणीची फुल. त्यातील गोड मध चाखत चाखत हे जीवन पुढे जात असते,ते कधीच संपू नये असे वाटते. असंच एक ठिकाण असत, जिथे आमच्या सारखी मुल बाईच्या शांत अश्या सावलीत मोठी होतात.... हे एक मित्रांच्या , त्या दिवसांच्या कडू - गोड आठवणीनी वसलेलं एक छोटंसं गाव असतं आणि त्या गावाला " शाळा " हे नाव असतं." विवेकने आपलं बोलणं संपवलं तसा वर्गात टाळ्यांचा कडकडाट झाला. सगळी मुल-मुली मनापासून टाळ्या वाजवत होते. बाईंच्या डोळ्यात तर पाणी आलं. बाईंनी डोळे पुसत सगळ्यांना " शांत राहा " अस सांगितले. " खरंच .... खूप सुंदर वर्णन केलस तू.... अगदी मनातलं बोललास तू... आणखी एक .... एव्हढ्या छान निबंधाला एक छान नावही असलं पाहिजे... तूच सांग एखादं " ,विवेकने त्याच्या मित्रांकडे बघितलं. सगळ्यांचे चेहरे आनंदाने फुलले होते..... सईकडे पाहिलं .... तीही खूप छान हसत होती ... त्याने पुढे येऊन बाईंच्या हातातला खडू घेतला आणि त्याने फळ्यावर लिहिलं ,......... " कधीही न विसरता येणारे ..... " सोनेरी दिवस " ......... 

---------------------------------------------------------The End-------------------------------------------------------------

Followers