वाट ओळखीची , आज चुकलो मी .................
जुन्या पाऊलखुणा , उगाचच शोधतो मी.........
ऋतूने बदल केला ,पुन्हा फसलो मी ...............
सगळे हसतात मला ,कोण अनोळखी मी ........
काय दिले या प्रेमाने ,विचार करतो मी............
आपले क्षण आठवतात ,त्यांनाच वेचतो मी ......
वळलो पुन्हा जायला ,मागे बघतो मी ............
तुझा उंबरठा दिसतो आणि उगाच रडतो मी ........
पुढे एका वळणावर ,पुन्हा थांबेन मी ............
हाक मार मला .............अपेक्षा करतो मी..........