All the contents on this blog are Copyright Protected.

All the contents on this blog are Copyright Protected.

MyFreeCopyright.com Registered & Protected
Protected by Copyscape Duplicate Content Software

Saturday 8 February 2014

सोनेरी दिवस ………( भाग २)

               अशी होती विवेकची "प्रेमकथा". दोन वर्ष झाली तरी पुढे काही सरकत नव्हती. आणि तिच्याकडून सुद्धा तसा काही response येत नव्हता. महत्त्वाचे म्हणजे संकेत आणि नितीन ने हे " सिक्रेट " कोणालाच कळू दिले नव्हते. तसाच विवेक सकाळी  ७.०५ वाजता तिकडे तिची वाट पाहायचा आणि ती पुढे निघून गेल्यावर तिच्या मागून शाळेत यायचा. असाच एक दिवस , पावसाळ्यातला. विवेक नेहमीच्या time ला निघाला. पाऊस धरलेला होता," याला काय आत्ताच यायचं होतं काय ?" विवेक मनातच बोलतं निघाला. नेहमीसारखा वेळेवर पोहोचला 'तिथे'. ती सुद्धा आली वेळेवर तिथे. सई थोडी पुढे जाणार इतक्यात पावसाला सुरवात झाली. विवेकने त्याची छत्री पटकन बाहेर काढली. पण सईकडे छत्री नव्हती. घरीच विसरली ती. काय करणार मग,आडोशाला उभी राहिली बिचारी. इथे विवेक बावरून गेला , " थांबू कि पुढे जाऊ ?". त्याने छत्री उघडून झपझप चालण्यास सुरुवात केली. तेवढ्यात " excuse me,..... " सईने त्याला लांबूनच हाक मारली. विवेक दचकला पण थांबला नाही. " विवेक ...... ये विवेक थांब जरा... मी पण येते थांब." विवेक जागेवरच थबकला. " आयला.... हिला माझं नाव माहित आहे ? " तशी ती धावतच आली छत्रीमध्ये . विवेकला तर पाय उचलणं हि कठीण झालं होतं. " चल लवकर , नाहीतर आपण दोघे पण भिजू " तसे ते दोघे चालू लागले, विवेकला तर विश्वासच बसत नव्हता. " मी पकडू का छत्री ? " सई बोलली तसा विवेक भानावर आला.
              विवेकच्या लक्षात आलं कि त्याची छत्री तुटलेली होती आणि त्याचं बाजूला सई होती. त्यामुळे ती भिजत होती.विवेकनी लगेच तुटलेली छत्री त्याच्या बाजूला केली. जशी शाळा जवळ आली तशी तीने छत्री सोडली आणि धावतच गेली ती शाळेत. विवेक पुन्हा तसाच उभा राहिला. " अरे…. Thank You  तर बोल.. " पण ती तर केव्हाच शाळेत पोहोचली होती. " काय यार .... या छत्रीने तर इज्जतच काढली आज. माझाच आळस.. आज शिवून आणली पाहिजे." छत्री तशीच फेकून दयावी असं वाटलं त्याला. पण त्याच्याकडे एकच छत्री आहे आणि नवीन तर यावर्षी तरी मिळणार नाही याचा विचार करून त्याने त्याचं मन आवरलं. " काय रे विक्या....छत्री होती ना .. मग भिजलास कसा बे ? " राकेशने विवेकला टोमणा मारला. " त्याची छत्री तुटली आहे रे " विवेक बोलण्याच्या आत नितीनने माहिती पुरवली, " असं होय... नायतर आजकाल खूप राकेश " भू ... भू… " करत फिरत असतात रस्त्यातून , एखादा मागे लागला तर पळायलाच लागते आणि त्यात पाऊस असेल तर भिजणारच माणूस " संकेतने राकेशला चिडवत म्हटले. " संक्या ... तू मेलास आता " म्हणत राकेश उठला आणि संकेतच्या पाठीत जोरात धपाटा मारला, " अगं आई गं …" संकेत मोठयाने कळवळला ,तसा सगळ्या वर्गात हसा पिकला. " कोणाला आईची आठवण येते आहे ? " , वर्गशिक्षिका वर्गात येत म्हणाल्या , तसा वर्ग शांत झाला. वर्ग सुरु झाला आणि विवेकच्या डोक्यात एक विचार आला," अरे , लक्षातच नाही आलं माझ्या. शाळा सुटताना पण पाऊस आला पाहिजे, तिची कोणी मैत्रीण पण राहत नाही तिकडे. मग काय ? मज्जाच मजा माझी . " विवेक आनंदातच बोलला , जरा मोठयाने बोलला तसं सगळ्या वर्गाचं लक्ष त्याच्याकडे गेलं ," कसली मजा ? आणि पुस्तकात लक्ष दे जरा.समजलं का " वर्गशिक्षीका विवेकला ओरडल्या.  
             शाळा सुटण्याची वेळ झाली तसा विवेक अस्वस्थ झाला. पाऊस सुद्धा चांगलाच धरला होता. आणि ती वेळ आली , शाळा सुटण्याची. विवेकला हेच पाहिजे होतं ना. एक प्रोब्लेम होता " Group ला कसं कटवायचं ? " . सई पुढे जाऊ लागली तसा विवेक चलबिचल होऊ लागला. " चल यार .. आज मी जातो इकडून. घरी काम आहे जरा." विवेकने राकेशला जाताजाता सांगितलं." OK Boss " विशालने विवेकला permission दिली. " थांब विवेक " नितीनने विवेकला थांबवत म्हटलं , " चल न्या.... त्याला जाऊ दे ना , मोठ्ठ काम आहे ना त्याचं घरी. " राकेशने रागातच म्हटलं."हा .. हो पुढे आलोच मी ." असं सांगितल्यावर राकेश पुढे निघून गेला. " विवेक .... मला माहित आहे काय काम आहे तुजं "," नाही रे , खरंच काम आहे.","मी सकाळी बघितलं तुला आणि मला माहित आहे तू का भिजला होतास ते. " तसा विवेक गप्प बसला," बघ , तुला मित्र म्हणून सांगतो , आपण अजून शाळेतच आहोत. या गोष्ठीसाठी अजून खूप वर्ष आहेत."," अस काय बोलतोस रे नितीन, तुला वाटते तसं काही नाही आहे. मला फक्त मदत करायची होती तिला."    
" तशी मी सुद्धा आज छत्री आणली नव्हती. " यावर विवेकला काही बोलताच आलं नाही. " बरं जा तू ... पण लक्षात ठेव, तुटलेली छत्री जोडता येते, मन नाहीत ." असं म्हणून नितीन निघून गेला. विवेकला कूठे जाऊ तेच कळत नव्हतं. त्याने विचार करून सईच्या मागे जाण्याचा निर्णय घेतला. सई थोडी पुढे गेली होती. तेवढ्यात तिला घेण्यासाठी कोणीतरी आलेलं त्याने पाहिलं आणि तो जागेवरच थांबला," आई असावी तिची " विवेकने अंदाज लावला, आणि त्याला नितीनची आठवण झाली तसा तो धावतच नितीनच्या मागे गेला. त्याला बघून नितीन खुष झाला. " साल्या... घरी काम होत ना.. आता का आलास ?" नितेश रागातच बोलला." छत्री तुटलेली असली तरी मन तुटलेली नसावीत म्हणून आलो मी ." बाकी कोणाला कळलं नसलं तरी नितीनला ते कळलं होतं. त्याने विवेकच्या खांद्यावर हात टाकला आणि तसेच चालत चालत गेले. एकदम छान ना.... असेच दिवस होते ते . विवेकचे ... सईचे आणि त्याच्या मित्रांचे ... पण असंच राहत नाही ना ... शेवटपर्यंत ... 
             सहामाही परीक्षा नुकतीच संपली होती. त्यात राकेशला सगळे पेपर्स वाईट गेले होते. परीक्षेच्या काळातच नितेश आजारी पडल्याने राकेशला शिकवणे त्याला जमलंच नव्हतं आणि उरलेल्यापैकी राकेशला अभ्यास शिकवण्याची कोणाला हिंमतच नव्हती. नितेश कसाबसा परीक्षेला यायचा. तो स्वतःचा अभ्यास बघेल कि राकेशला बघेल. परीक्षेनंतर वर्ग पुन्हा सुरु झाले," फक्त नापास होऊ दे मी , मग बगतो एकेकाला....साल्यांना मला मदत करत नाय काय ? " खरच त्याचा तो पवित्रा बघून सगळ्यांना घाम फुटला. कोणीच काही बोललं नाही आणि पहिल्याच Lecture ला त्यांच्या वर्गशिक्षिकने " बॉम्ब " टाकला ," चला , आज तुमचे इतिहासाचे पेपर्स मिळणार आहेत. बहुदा आज सगळेच पेपर्स मिळतील तुम्हाला."," आणखी एक , वर्गातल्या कोणीच बरोबर लिहिले नाही आहेत पेपर्स, फक्त विवेकने जरा चांगला लिहिला आहे पेपर. सहामाहीत टीक आहे पण वार्षिक परीक्षेत असं चालणार नाही." म्हणत इतिहासाचे पेपर्स दिले आणि विवेकला सगळ्यात जास्त मार्क होते. विवेकची कॉलर टाईट झाली. पण सगळ्यात महत्वाचा म्हणजे राकेश पास झाला होता इतिहासात. " बर झालं ," भू ... भू .... पास झाला. " ," अरे, एकातच पास झाला आहे तो. अजून सगळी " match " बाकी आहे." विवेक आणि संकेत एकमेकांत बोलत होते. पुढचा तास गणिताचा, नितेश अजून tension मध्ये," आज " मोगली " आला नाही पाहिजे रे " [ गणिताच्या madam च्या केसांची style मोगली सारखी होती म्हणून मुलांनी त्यांना " मोगली " हे टोपण नाव ठेवलं होतं ] ," येणारच रे बघ तू ." संकेत अस बोलला आणि madam दारात हजर. "किडे पडोत तुझ्या तोंडात संक्या " राक्या मागूनच बोलला,"आजकाल तुम्ही खूप दिवे लावायला लागला आहात, अभ्यास करा जरा." madam  आल्याआल्या सगळ्या वर्गाला बोलल्या," मग पेपर जरा सोपे काढायचे ना."विवेक हळूच पुटपुटला,तसा सगळ्या वर्गात हशा पिकला. " कोण ... कोण बोलला ?" madam नी वळून बघितलं,वर्ग पुन्हा गप्प. पेपर्स वाटायला घेतले त्यांनी आणि पुन्हा एकदा विवेकच्या ग्रुपचं tension कमी झालं.  
          राकेश पुन्हा पास झालेला आणि अश्याप्रकारे राकेश सगळ्या पेपर्स मध्ये पास झालेला. सगळे मित्र tension free . शाळा सुटली राकेश तर खूष होता ," अबे , जरासाठी वाचलो ना..... नायतर आज घरी माझ्या पप्पानी माजी काढलीच असती . "," थांबा रे पोरांनो.. " मागून आवाज आला. तसे सगळे थांबले. " भडकमकर मामा, ....... अहो कुठे होता तुमी.... दिसला नाय ते " राक्याने विचारलं. 'भडकमकर काका ' म्हणजे शाळेतले साफसफाई कामगार ,पण ते सगळ्यांचे लाडके होते. जरा वयस्कर होते, वाढलेलं पोट,पिकलेले केस,पिळदार मिशी आणि सदैव हसरा चेहरा."अरे गावाला गेलो व्हतो ना .... हि घ्या .... बोर आनलीत तुमच्यासाठी." भडकमकर काकांना शाळेत सगळे " काका " म्हणूनच हाक मारायचे पण विवेकचा ग्रुप त्यांना " मामा " म्हणून बोलायचे आणि भडकमकर काकांना सुद्धा इतरांपेक्षा हा ग्रुप जास्त जवळ होता. मग ते कधी गावाला गेले कि त्यांना काही ना काही घेऊन यायचे त्यांच्यासाठी , विवेकचा ग्रुपसुद्धा त्याचं कोणतही काम असलं कि लगेच करून द्यायचे." वा मामा.…. आज तो दिल खूष कर दिया " राकेश बोर खात खात म्हणाला,तसं सगळ्यांनी माना डोलावल्या. " बोला मामा ..... काय काम होतं कि फक्त बोरंच द्यायची होती." नितेशने पुढचा प्रश्न विचारला," कामचं होत रे तुमच्याकडे पण विवेक समोर नाय बोलायचं हाय ","का वो, त्याने काय केला तुमचा ? " , " तसा काय नाय रे ..... सांगतो हा."," मी ४ दिवसाअगुदरच आलो हाय इकड. आनी तुमाला माहित हाय ना कि २ दिवसाअगुदर सालेतल्या एका पोरीची कोनीतरी छेड काडली व्हती " ," कोण ? " नितीनने विचारले," हा.... हा.... मामा मला माहित आहे. अबे ती नाय का.... सातवीत आहे ती... काय छपरी पोरगी आहे यार... तिला त्या गल्लीत कोणीतरी.... " ,"गल्लीत काय ? " विशालने विचारलं. " अरे त्या गल्लीत कोणीतरी तिचा हात धरला होता रे " ," कोणी? " ," अरे ती सांगतच नाही ना..... नायतर ती तसलीच आहे." राकेशने माहिती पुरवली," तो कोन व्हता , मला माहित हाय ." भडकमकर काका म्हणाले " कोण कोण ?" संकेतने घाईतच विचारलं,भडकमकर काकांनी विवेककडे पाहिलं आणि बोलले ,....... " बंड्या.... "..... " बंड्या.. तुम्हाला कोणी सांगितलं? " नितीनने विचारलं," अरे, तवा मी तिकडनाच चाललो व्हतो ना .... मला बघितल्यावर ती पोरगी पलून गेली... बंड्या तसाच व्हता उभा नालायाकासारखा," " या बंड्याची दादागिरी वाढतच चालली आहे. " नितीन बोलला."साल्याची एवढी मजल गेली काय ? " राकेश रागातच बोलला.
        विवेकला जरा वाईटच वाटलं,कारण बंड्या त्याचा चुलत भाऊ होता, त्याच्या काकांचा मुलगा. त्याचं खर नाव होतं " विक्रम " पण सगळे त्याला बंड्या का म्हणायचे हे त्यालाच ठाऊक. विवेकपेक्षा २ वर्षांनी मोठा होता तो , २ वर्ष नापास झाल्याने आता तो विवेक बरोबरच म्हणजे ८ वी ला होता. परंतु वेगळ्या वर्गात होता. त्याची आई तो ६ वर्षाचा असताना सोडून गेली होती, त्याच्या वडिलांच्या त्रासाला कंटाळून. वडीलसुद्धा दारू पिऊन असायचे नेहमी. त्यामुळे त्याला लहानपणापासूनच वाईट सवयी लागल्या होत्या. वडील सकाळी कामाला जाणार आणि रात्री दारू पिऊन घरी,मग तो तरी कसा चांगला राहणार. हल्ली त्याला मुलींना त्रास द्यायची खूप वाईट सवय लागली होती. शाळेत कितीतरी तक्रारी होत्या त्याच्या. आता त्याने हद्द पार केली होती. विवेक त्याच्याशी कधीच बोलायचा नाही आणि त्याच्या घरचे सुद्धा . " बघा हा पोरांनो, तुमी माझं ऐकता म्हनुन तुमाला सांगितलं मी. उगाच काय व्हयला नको म्हनून हा."," मामा, तुमी काही कालजी करू नका,बघतो मी." राकेशने भडकमकर काकांना सांगितले. तसे ते निघून गेले. " चला रे गडयांनो, चला त्या गल्लीकडे." संकेतने घोषणा केली. " तुम्ही जावा , मी नाही येत." विवेक म्हणाला," अबे चल्ल रे …. घाबरतोस काय .... मी आहे ना … चल." राकेशने त्याला ओढतच नेलं. सगळे पोहोचले त्या गल्लीत. " तो बघ……तिकडे बसला आहे बंड्या ", नितीनने त्याला लांबूनच बघितलं. " चल .... त्याला बघतोच आज " राकेश रागातच म्हणाला. तेवढ्यात त्यांच्या शाळेतली एक मुलगी त्यांच्या बाजूने पुढे गेली. बंड्याने सवयीप्रमाणे शिटी वाजवली व तिच्या मागोमाग जाऊ लागला.तशी ती मुलगी घाबरून जोरात किंचाळली आणि धावत सुटली. तसा बंड्या जोरजोराने हसायला लागला. ते बघून राकेश अजूनच चेकाळला. धावतच जाऊन त्याने बंड्याची कॉलर पकडली. " काय रे साल्या ..... पोरींची छेड काढतोस........ हा…" खाडकन थोबाडीत पडली बंड्याच्या. तिरमिरीत गाल पकडत खाली पडला तो. राकेश तर रागाने लाल झाला होता. राकेशला बघून बंड्या पण त्याला मारायला पुढे आला. तसं विवेकने पुढे येऊन त्याला धरलं. बाकी राकेशला इतर जणांनी अडवलं. " अबे….तुजी बहन होती का ती .... " बंड्या रागातच बोलला. " माजी नाय पन कोनाची तरी असलं ना."," साल्या , तुला काय करायचाय त्याचा. "," मला काय करायचाय " अस म्हणत राकेश त्याला मारायला त्याच्याकडे झेपावला. पण बाकीच्यांनी त्याला घट्ट पकडून ठेवलं होतं." बंड्या.....  तुला शेवटचं सांगतो .... शाळेत राहायचं असलं ना ... तर नीट राहायचं… पोरींच्या वाटेला जायचं नाय ... या गल्लीत फिरकायचं नाय… पुन्हा तुजी तक्रार कोनी केली .... तर तू आहेस आणि मी आहे. " ," जारे ... तुजा सारके खूप बगितले हायत ...हि जागा तुजा बापाची हाय काय.... "अस बंड्या बोलला आणि तिकडून राकेशने सगळ्यांना बाजूला करत बंड्याच्या अंगावर उडीच मारली. दोन फटक्यातच त्याने त्याला लोळवले. " बस कर राक्या... बस कर आता... सोड त्याला " विवेकने जोर लावून राकेशला बाजूला केलं. तसा बंड्या उठला,"राक्या.... बघून घेईन तुला .... " असं म्हणत तो पळून गेला. ," मच्चर ची ओलाद .... हा.... पोरिसमोरच दादागिरी कर... " राकेश अजूनही रागात होता. हळूहळू तो शांत झाला तसे सगळे आपापल्या घरी निघाले. " असं व्हायला नको होता " असा विचार करत विवेक घरी आला. संद्याकाळी शिकवणी वरून घरी येत असताना विवेकला बंड्याने त्याला अडवलं," थांब विक्या .... ", तसा विवेकला घाम फुटला. " हा कूठे आला इथे? " विवेक मनातल्या मनात बोलला. बंड्या समोर आला. त्याच्या गालावर अजूनही राकेशच्या हाताचे ठसे होते," विक्या तुला एक सांगून ठेवतो...... मी तुजा वाटला येत नाय ..... तू माजा वाटला यायचं नाय... कलल... नायतर मी इसरून जायन तू माजा भाव हायस ते..... " विवेक गप्प ," आणि त्या राक्याला बोल...... गलत आदमी से पंगा लिया हे उसने.... त्याला तर बघून घेइनच... पन तू लांब राहा त्याच्यापासून..... नायतर तुला पन.... " अस बंड्या हाताची मुठ वळवत म्हणाला आणि निघून गेला. 
दुधामध्ये मिठाचा खडा पडला कि कसं सगळं दुध खराब होते ना. राकेशच्या एका चुकीमुळे तसंच काहीसं होणार होतं का विवेकच्या सुंदर जगात. बोलतात ना कि एकच कारण लागते चांगल्या गोष्टीच वाईटात रुपांतर होण्यासाठी.... तसंच काहीतरी झालं... कोणाची तरी नजर लागली त्या ग्रुपला.... वाईट नजर ........

                                                                                                  to be continued................................


Followers