आज मला सगळ जुनं आठवतेय ,
तुझं ते वाट बघायला लावणं ,उशिरा येऊनही ते हसणं ,
माझं ते उगाचचं रागावणं ,पण पुन्हा आपला एकत्र येणं.
आज मला सगळ जुनं आठवतेय ,
ते तुझं रुसणं ,उठून निघून जाणं ,
पण जाताना मागे वळून मी बोलावतो आहे का ते पाहणं .
आज मला सगळ जुनं आठवतेय ,
माझ्या प्रत्येक क्षणात बरोबर असण ,मला समजून घेणं,
माझ्या सुखात बरोबर असणं , दुःखातही साथ देणं.
आज मला सगळ जुनं आठवतेय ,
ते तू मला फुल देणं, "मी परत येते " हे सांगणं ,
मी तुझी वाट पाहणं , पण तू कधीच परत न येणं.
आज मला सगळ जुनं आठवतेय ,
तू अशीच अकाली निघून जाण ,माझं वेड्यासारखं तुला शोधणं ,
तू आलीस ,तू येणार .....हे स्वतःच मनाला समजावणं.
पण .............पण आता भूतकाळात जगत आहे,
जुन्या आठवणी वेचत आहे ,
तू येणार नाही तरी तुझी वाट बघत आहे ,
त्याच आठवणी पुन्हा पुन्हा काढत आहे ,
त्यांना विसरण्याचा प्रयन्त करतोय .
पण .................अजूनही मला सगळ ,सगळ जुनं आठवतेय ,
Chaan aahe kavita...! great aahes tu...lai bharri...sir
ReplyDeletekhup chan ahe kavita ................. ekdam manala lafnari
ReplyDeletenice
ReplyDeleteशेवटी आठवणीच असतात सोबतीला , कधी हसू बनून ओठावर येतात तर कधी आसू बनून डोळ्यात .....
ReplyDeleteसुंदर आहे कविता !!!!
mast ahe....
ReplyDeletemast ahe......
ReplyDelete