सांगेन पुन्हा कधीतरी ......
एका खुल्या आकाशाखाली
बसायला मिळाले तर सांगेन
एक मन मोकळी लाट अंगावर
झेलायला मिळाली तर सांगेन
पावसाच्या थेंबात बरसताना सांगेन
पाखराच्या पंखांत उडताना सांगेन
सांगेन माझ्या आयुष्याची कथा
कसा एक एक दिवस पाखरा सारखा
उडून गेला ते सांगेन ........
No comments:
Post a Comment