All the contents on this blog are Copyright Protected.

All the contents on this blog are Copyright Protected.

MyFreeCopyright.com Registered & Protected
Protected by Copyscape Duplicate Content Software

Thursday, 29 November 2012

थोडसं..........मनातलं...लिहिलेले................

दिवस नकळतच जातो ....,संध्याकाळ रेंगाळत राहते...,
दिवसामागून दिवस जात राहिले ......तरी तुझी आठवण राहते.

तुझी ती पहिली भेट प्रत्येक वेळेस आठवत राहतो,

ते एखाद्या धुक्यासारखे क्षण कणाकणातून साठवतो,
आठवणीचे ते रान मग धुक्यामध्ये हरवून जाते ,
सुर्याप्रकास जरी आला, ......तरी तुझी आठवण राहते.

कधी पावसाळ्यातील नभाप्रमाणे मन भरून येते ,

कधी मातीच्या सुगंधासारखे मन दरवळते ,
माझ्या मनातला आभाळ असच भिजत राहते,
पाऊस थांबला तरीही .....................तरी तुझी आठवण राहते.

बरसणाऱ्या पावसासारखा सूर्य कधी बरसत राहतो ,

दुपारला निरोप देऊन तोही मग विश्रांती घेतो ,
दुपारही जाऊन मग संध्याकाळ घरी येते ,
रात्र येऊन गेली ..........................................तरी तुझी आठवण राहते.

नियती आपले खेळ असेच खेळत राहते ,

जीवनात कधी सकाळ , दुपार...तर कधी संध्याकाळ घेऊन येते .
तू सोडून गेलीस ,.पण नियती मात्र तशीच राहते,
कधी मीही सोडून गेलो ..............तरी त्या जागी तुझी माझी आठवण राहते.

5 comments:

Followers