All the contents on this blog are Copyright Protected.

All the contents on this blog are Copyright Protected.

MyFreeCopyright.com Registered & Protected
Protected by Copyscape Duplicate Content Software

Tuesday 14 May 2019

" त्या रात्री पाऊस होता ... "


" बोला मिस नयना.... काय झालं होते त्या रात्री... " inspector अभिषेक ने पुन्हा विचारलं. नयनाने शांतपणे त्याच्याकडे पाहिलं. 
" आधीही ५-६ वेळेला सांगून झालं आहे.. आणखी किती वेळा सांगू... " ,
" जोपर्यंत खरं समोर येतं नाही... तोपर्यत विचारणारं मी... सांगा काय झालं होते... " नयनाने दीर्घ श्वास घेतला. आजूबाजूला नजर फिरवली तिने. सर्व पोलीस स्टेशनमध्ये असलेले.... सर्वांच्या नजरा तिच्याकडेच.... जणू काही गिधाडे... कोणत्याही क्षणी झडप घालायला तयारच. 

" त्या रात्री पाऊस होता.... " नयनाने बोलणं सुरु केले. " नेहमीप्रमाणे मी रात्री ८ वाजता घरी निघाले होते. साधारण अर्धा तास लागतो मला घरी यायला कार ने. त्यादिवशी खूप पाऊस होता, तर ट्रॅफिक हि तेव्हडेच... ८:३० ला पोहोचते ते ट्राफिक मुळे ९:३० झाले. सोसायटी बाहेर आले तर गेट बंद. खूप वेळ हॉर्न वाजवला तरी watchman आलाच नाही. त्यात माझ्याकडे छत्री नव्हती. आत तर जायचे होते. गेट मीच उघडला मग. भिजून गेले. गाडी पार्क करून आले. watchman च्या रूमचा दरवाजा बंदच होता. राग आलेला त्याचा. कुठे असतो कोण जाणे... दिसला असता तर चांगली सणसणीत गालावर पाच बोटं उठवली असती. तशीच वर आली. आमच्या फ्लॅट मधून मोठ्याने music वाजत होते... शेवटचा शनिवार असला कि आमच्याकडे पार्टी ठरलेली. पप्पा ... त्यांचा मित्र आणि माझा भाऊ.. आधीच वैतागलेली त्या ट्राफिक मुळे... मग watchman डोक्यात गेला. आणि समोर यांचा धिंगाणा... अजिबात आवडायचे नाही ... ते दारू पिऊन धिंगाणा घालतात ते.. काय बोलणार त्या मुर्खांना... गाढवांना... तशीच मग माझ्या बेडरूम मध्ये गेले. सोबत आणले होते खायला. ते खाल्ले. डोकं खूप जड झालं होते. पेनकिलर घेतली आणि कानाला कापूस लावून झोपून गेली. सकाळी साधारण ६ वाजता जाग येते नेहमी. जाग आली तेव्हाहि बाहेरचे music सुरु होते.. ते जरा विचित्र होते. बाहेर येऊन बघितलं तर माझे पप्पा ..... आणि सुमित ... दोघेही .... रक्ताच्या थारोळ्यात पडलेले.... काय करावं सुचेना... लगेचच तुम्हाला कॉल केला. " आताही तिला गहिवरून आलेलं. तरी स्वतःला तिने लगेच सावरलं. " हेच आधीही सांगितलं आहे तुम्हाला... तरीही पुन्हा का बोलवता. माझे पप्पा आणि भाऊ ... दोघेही गेले. तेच ते वर्णन ... पुन्हा पुन्हा... किती त्रास होतो त्याचा.. ते आठवलं कि ... " ,

" ma'am ... आम्हाला तपासणी करावीच लागते.. ठीक आहे... तुम्ही जाऊ शकता आता. नंतर कधी बोलावले तर यावेच लागेल. " अभिने सांगितलं जायला तर नयना निघून गेली.  


Double murder case !! सोसायटीचा सेक्रेटरी आणि त्यांचा मुलगा... यांची त्यांच्याच राहत्या घरात हत्या.... नयना , त्यांची मुलगी. तिनेच कॉल करून माहिती दिलेली. inspector अभिषेक आणि डॉक्टर महेश.. यांच्याकडे केस आलेली. जरा जास्तच गुंतागुंत होती. त्यासाठीच नयनाला बोलावले होते. डॉक्टर महेश होता तिथेच. नयना गेली तसा अभिच्या जवळ आला महेश. 

" काय वाटते अभि तुला... काय असेल नक्की... " ,
" काही कळत नाही... नयना का खोटं बोलते आहे... ते कळत नाही. " ,
" ती का खोटे बोलेल... ", 
" थांब जरा .... सांगतो... आणखी एकाची जबानी घेयाची आहे. .. " ,
" कोण ? ? " ,
" नयनाचा बॉयफ्रेंड ... अमेय.. " अमेय बाहेरच बसून होता. अभिने बोलवलं तसं तो आत आला. 
" मिस्टर अमेय... काय करता तुम्ही... आणि या कुटुंबाशी कसा संबंध तुमचा.. " अभिने आल्या आल्या प्रश्नाची रांग लावली. 
" मी software developer आहे..... नयना माझी गर्लफ्रेंड आहे. गेल्या चार वर्ष आम्ही relation मध्ये आहेत. त्यामुळे त्यांच्या घरी येणे जाणे असते. तशीच ओळख त्याच्याशी. " ,
" ok ... मग ज्या रात्री खून झाला.. तेव्हा कुठे होता तुम्ही...  आणि detail मध्ये सांगा.. "

अमेयने सुद्धा आजूबाजूला पाहिलं. " त्या रात्री खूप पाऊस होता. मी तेव्हा यांच्या सोसायटीच्या बाहेरूनच जात होतो. आणि अचानक बाईक बंद पडली. रात्रीचे ८:३० वाजले होते. नयना येते त्यावेळेस घरी. पाऊसही होता. तर पाऊस थांबला कि घरी निघू , तोपर्यंत नयनाकडे थांबू असा विचार करून तिच्या घरी गेलो. गेट तर उघडाच होता. वर गेलो तर यांच्या घरात पार्टी सुरु होती शनिवारची. मग थांबून काही उपयोग नव्हता. तसाच खाली आलो आणि घरी गेलो. " ,
" हीच स्टेटमेंट आहे ना.. कि आणखी काही राहील आहे बोलायचे. " अभिने अमेयला उलट प्रश्न केला. 
" नाही ... एवढंच... आणि हेच मी आधी सांगून झालं आहे.. " अभिने एकदा त्याला निरखून पाहिलं. 
" निघा तुम्ही.. जेव्हा बोलवीन तेव्हा हजर राहा... " अमेय सुद्धा गेला. 

महेशने पुन्हा विचारलं. " त्या दोघांना पुन्हा पुन्हा का बोलवतो आहेस.. तुला या दोघांवर संशय आहे का.. " ,
" साहजिकच आहे.. काहीतरी प्लॅन नक्की आहे दोघांचा... ", 
" कस ? " ,
" सांगतो.. by the way तुला काय सापडले postmortem रिपोर्ट मध्ये... " ,
" ते दोघेही नशेत होते जेव्हा त्यांचा खून झाला. शिवाय alcohol ची मात्र दोघांमध्ये जास्त होती. so , जेव्हा खून झाला तेव्हा दोघेही शुद्धीत नसणार .. हे नक्की. हे माझं अनुमान आहे. तुझं सांग... " ,
" नयना ... ती काय बोलली... ट्राफिक मुळे लेट झाला. ८ वाजता ऑफिसमधून निघालेली. असं स्टेटमेंट आहे ना तीच. मुळात ऑफिस मध्ये विचारलं तेव्हा तिचा out time संध्याकाळी ६ चा आहे. हे एक खोटं... पाऊस होता त्या रात्री... ते मान्य करतो मी. तिच्या गाडीत मागच्याच सीटवर छत्री होती. मग भिजत जायचे कारणच नाही. अमेय तर थेट वर गेला. गेट बंद होता असं काहीच बोलला नाही. watchman जागेवर नव्हता . मग हि आली तेव्हा कोणी लावला होता गेट. शिवाय तिच्या स्टेटमेंट नुसार, ती तिच्या रूममधून बाहेर आली तेव्हा music सुरु होते. जेव्हा तिने इथे कॉल केला होता, तेव्हाही कोणतेच music ऐकू येतं नव्हतं. तिला मी स्वतः सांगितलं होते फोनवर .... कशालाच हात लावू नका. त्या फ्लॅटवर गेलो तेव्हा तुही होतास सोबत... कुठे सुरु होते music .... विचारलं तेव्हा बोलली कि मीच बंद केले ते. रिमोट वर आणि music player वर... नयनाच्या बोटांचे ठसे... " ,
" हो ... " डॉक्टर महेश बोलला. " मग अमेय सुद्धा खोटं बोलतो आहे का..." 
" हो ... तोही खोटे बोलतो आहे... bike बंद पडली असं बोलला ना.. होती त्याची bike सोसायटी बाहेर... पण बंद नव्हती . नॉर्मल पार्क करतात तशी पार्क केलेली. त्यात पेट्रोलची टाकी फुल.... म्हणजेच त्याने नुकतेच पेट्रोल भरलेले... काही अंतरावर एक पेट्रोल पंप आहे.. तिथे जाऊन विचारलं मी. तर याने तिथेच भरलं होते पेट्रोल. क्रेडिट कार्ड वापरून payment केलेलं... वेळ कधीची माहित आहे का .. रात्री ११:३० ची ... आणि हा गेलेला त्या रूमच्या आत.... बाहेरून नक्कीच नाही गेला... ", 
" ते कस कळलं तुला ... " ,
" आम्हाला त्याची receipt मिळाली ती पेट्रोल भरल्याची... तो आत गेल्या शिवाय ती पडली असेल का receipt ... सांग मला.. "  

काही वेळाने आणखी एक व्यक्ती जबानी देण्यासाठी आली. " या बसा मिस्टर सावंत... " अभि बोलला. 
" मी ५ मिनिटात आलो. " म्हणत अभि गेला कुठेतरी. परत आला तेव्हा काही कागदपत्र होती हातात. महेशच्या शेजारीच बसला. महेशच्या कानात कुजबुजला. " नयनाचे काका... "... अभि बसल्या जागेवरून बोलला. 
" तुम्ही सुरु करा.. सावंत. मी इथून ऐकतो. सांगा. कुठे होता त्यारात्री. "
" मी नव्हतो त्यादिवशी इथे. actually , या भागात नव्हतो मी. घरी light चा काही प्रॉब्लेम झालं होता. म्हणून मी हॉटेल मध्ये जाऊन थांबलो. " ,
" हॉटेल मध्ये का ... यांच्या घरी का नाही... " ,
" असंच ... " ,
" ok .. पुढे सांगा ... ", 
" संध्याकाळीच ... मी निघालो... .. तर मी आलोच नाही हॉटेल बाहेर... दुसऱ्या दिवशी , सकाळी कळलं ... भावाचा खून झाला म्हणून... " त्यांची जबानी संपली. अभिने ते पुन्हा एकदा वाचलं. 
" ठीक आहे... निघा तुम्ही. फक्त शहर सोडून जाऊ नका. "

सावंत गेल्यावर महेश अभि जवळ बोलला काही. " किती जण आहेत अजून... या सर्वांवर संशय आहे ना.. " ,
" हो.. हे तर आहेत ... यात आणखी एक आहे.. नयनाच्या वडिलांचा मित्र.." 
" मग तोही येतो आहे का ... " ,
" नाही.. त्याला नंतर भेटू .. आपण आता सोसायटी मध्ये जात आहोत. " महेश तयारच होता. सोबत चार हवालदारांना घेऊन अभिषेक आणि महेश , त्या सोसायटी मध्ये पोहोचले. सावंतांचा फ्लॅट साहजिकच सील केला होता. तिथे जाण्याची घाई नव्हती.अभिला इंटरेस्ट होता तो बाकीच्या गोष्टीमध्ये. त्याने आजूबाजूला चौकशी सुरु केली. 

" हे सावंत .. कसे होते स्वभावाला. " शेजारी राहण्याऱ्या लोकांकडे पहिली चौकशी. 
" छान .. म्हणजे बोलायला छानच होते. तरी तापट... लगेचच राग यायचा. सोसायटीचे सेक्रेटरी होते. कामात चोख अगदी. फक्त तापट स्वभावामुळे खूप जणांशी भांडणं झालेली. " अभिने हे लक्षात ठेवलं. 
" त्यांची history माहित आहे का.. आणि हे month end ला पार्टी... ती काय भानगड आहे.. " अभिने आणखी खोलात विचारलं. 
" retired navy officer.... त्यामुळे शिस्तप्रिय... पहिली बायको वारली... नयना तिची मुलगी. ती गेल्या नंतर एका वर्षातच दुसरं लग्न. सुमित तिचा मुलगा. काही वर्ष सहन केलं तिने. पण तो तापट स्वभाव नाही जमला तिला. एक दिवशी अशीच सोडून गेली. सुमितला यांच्याकडे ठेवून. तेव्हापासून दारूची सवय. त्यांचा एका best friend आहे... इथून १५ मिनिटावर घर आहे त्त्यांच... डॉक्टर आहेत... मिस्टर देशमुख... तेच असतात यांच्याकडे बहुतेक वेळेला... पार्टी यांच्या सोबतच असते. शेवटच्या शनिवारी पार्टी असते... दारू पिणे.... मोठयाने गाणी लावणे... नुसता हौदोस सुरु असतो ... संध्याकाळी ७ ला सुरु करायचे ते रात्री १२ - १२:३० पर्यंत.. त्यांच्या तापट स्वभावामुळे कोण बोलणार... साऱ्यांना त्रास .. पण कोणी त्यांचा खून करेल असं वाटलं नव्हतं. " अभि सर्व रेकॉर्ड करत होता. 

" तुम्ही यांचे शेजारी... खूप वर्ष ओळखता का त्यांना.. " ,
" हो .. " , 
" मग ... त्यादिवशी काही विशेष झाले होते का... त्यांच्या बाबतीत.. " ,
" वेगळं असं काही नाही... पण त्यादिवशी सकाळपासून तापले होते. " ,
" कोणावर ... ? " ,
" पहिलं भांडण झालं ते सकाळीच .... त्याच्या भावाशी... " महेशला यात वेगळं वाटलं. 
" कश्यावरुन भांडण झालेलं. ...माहित आहे का काही... " ,
" कारण माहीत नाही.. तरी त्यांच्यात भांडणे ठरलेली... तो येतो तेव्हा भांडण झालं नाही असं कधीच होतं नाही.. पण त्यादिवशी जास्तच झालं काही. " ,
" नयना होती का तेव्हा.. " ,
" नाही... ती जॉबला गेलेली. खूप मोठ्याने भांडत होते. शिव्या तर असतात त्यांच्या भांडणात... त्या दिवशी सेक्रेटरींनी भावाची कॉलर पकडली. हे असं पहिल्यांदा झालं होते. त्यात नयनाचा बॉयफ्रेंड आला. चुकीच्या वेळी. त्याच्याशी सुद्धा भांडण... " ,
" का .. " अभिने विचारलं. हे आता जास्तच interesting होतं होते. 

" माहित नाही. पण त्यांना तो आधी पासूनच आवडत नाही. तो येतो ना कधी कधी घरी... नयना सोबत... तेव्हा ते घरात थांबायचे नाही. " ,
" मग त्याच्याशी हि झालं का भांडण... " महेशला सुद्धा मज्जा येतं होती आता. 
" होय तर .. अमेय आला तेव्हा ते रागातच होते. त्याला बघून पारा आणखी चढला. पुन्हा आलात तर जीव घेईन तुझा ... अशी धमकी हि दिली त्याला... विचार करा ... सगळी सोसायटी जमली होती. एवढ्या चढ्या आवाजात भांडण... मीच किती घाबरलो होतो .... " अभिने सर्व रेकॉर्ड केले होते. 
" मग पुढे... " ,
" पुढे काय... watchman ला हाक मारून ... या दोघांना पुन्हा सोसायटी मध्ये घेयाचे नाही असं सांगितलं. तर watchman जागेवर नाही. झालं .. या दोघांनाच राग त्याच्यावर... " ,
" कुठे असतो ... जागेवर नसतो का तो.. " ,
" त्याला पान खायची सवय.. तिथेच गेलेला. तरी यांची सर्व कामे करतो तो .. घरातली काम सुद्धा... एक -दोनदा घरातला कचरा सुद्धा काढलेला. घरातलं बरेचसे काम तोच करायचा ,जसा यांचा नोकरच... तरी त्यादिवशी खूप बडबडले त्याला.  काही बोलला तर सर्वा समोर थोबाडीत मारली. सर्व सोसायटी बघत होती. त्याला कस वाटलं असेल सांगा... रडत होता बिचारा.. एवढं छान , साधा माणूस ... काही बोलत पण नाही कोणाला कधी... " अभिला वाटलं बरीच माहिती मिळाली. 

महेश आणि अभि... दोघेही त्या फ्लॅट वर आले. seal केलेली होती रूम ती. " finger prints तर मिळाले ना... पुन्हा कशाला आलो. " महेशने विचारलं. 
" असच जरा... खून कसा झाला ते इमॅजिन करायला आलो. " अभि निरखून पाहत होता. 
" सोप्प आहे... मी त्यादिवशीच... खून कसा झाला असेल ते इमॅजिन केले... " ,
" सांग मग ... कस झालं असेल... " अभिने कुतूहलाने विचारलं. 

महेशने जागा घेतली. " हे बघ... सुरुवात करतो... खुनी... हा ओळखीचा माणूस असावा... कारण कोणतीही फोर्स एन्ट्री नाही घरात.. दरवाजा , लॉक असे आहेत तसेच आहेत... तोडफोड नाही. एकच दरवाजा... तोच दरवाजा उघडून ती व्यक्ती आत आली. " ,
" ठीक ... पुढे... ",
" खून करायचे हत्यार... त्या सुमितची क्रिकेटची बॅट... सुमित घरात बॅट कुठे ठेवायचा ते देखील माहित त्या आरोपीला... तो दरवाजा उघडून आत आला. त्याला माहीत होते, सावंत नशेत आहेत. त्याने बॅट उचलली आणि ते खुर्चीवर बसलेले असताना ... इथून मागून वार केला. " अभिला खुर्चीवर बसवून महेशने action करून दाखवली. 

" पहिल्या फटक्यात सावंत खाली पडले... आणि मग त्याने एकामागोमाग एक असे ..... at least... सात वार केले... डोक्यावर... , सावंतचा जीव गेला असं वाटलं तेव्हा तो थांबला असावा.. दमला म्हणून त्याने ती बॅट .... इथे सोफ्याला टेकवून ठेवली. .. त्या सोफ्याच्या बाजूला रक्त लागलेले आहे... आणि त्याच वेळेस सुमित बाहेर आला. तोही नशेत होता, तरी पपांना बघून घाबरला, समोर खुनी उभा ... मागच्या मागे पळाला... आरोपीने त्याला पकडल... तरी सुमित धडपड करू लागला. खाली पडला. आरोपीने तीच वेळ साधली. तीच बॅट घेतली आणि सुमितच्या डोक्यावर वार केले. ३-४ फटक्यात सुमित गतप्राण झाला. एक-दोन फटके त्याच्या हातावर लागले. आपण बघितले ते... " डॉक्टर महेशने काही फोटो आणले होते सोबत. त्यातला एक अभि समोर धरला. 
" हे बघ.... हातावर सूज आहे. जोरात लागले असतील ते फटके... नंतर खुनी शांत झाला. wash basin कडे आला. त्याला wash basin कुठे हेही माहित. इथे त्याने हात धुतलेले... कपडे साफ केले असतील. wash basin जवळ रक्ताचे डाग दिसले. हे सर्व झाल्यावर , खुनी बाहेर गेला. बॅट तर तिथे ठेवू शकत नव्हता. so , या सोसायटी बाहेर एक नाला आहे. त्यात त्याने ती बॅट फेकून दिली.. त्याला वाटले असेल कि जाईल वाहून ती. पण ती अडकून राहिली.. म्हणून दुसऱ्या दिवशी भेटली आपल्याला.. " महेशचे झाले बोलून. 

" काय सॉलिड हुशार आहेस तू... चल , आता काय करू .... त्या watchman ला भेटायचे होते. भेटून घेऊ... " अभि बोलला. " एवढं सगळं झालं आणि तो जागेवरच नव्हता. " अभि बोलला. 

" तोही संशयित आरोपी आहे का... " महेशने विचारलं. 

" नाही रे ... तरी तो जागेवर का नव्हता.. ते तरी विचारावे लागेल. त्याचीही रूम सील केली आहे. " ,
" पण त्याची का रूम सील केली. तो तर watchman आहे ना .... means तू त्याला आरोपी समजतो आहेस तर ... " महेश पुन्हा बोलला. 
" नाही... आरोपी नाही पण काहीतरी बघितलं असेल त्याने , शिवाय त्याची रूम त्या फ्लॅट च्या खाली आहे बरोबर.. काहीतरी ऐकलं असेल त्याने. " अभिने सांगितलं. 

" पण आता आहे कुठे तो.. " महेश आजूबाजूला बघत बोलला. 
" तो काय तिथे.. " एका कोपऱ्यात खुर्चीवर बसून होता. हे दोघे जवळ गेले तसा तो उभा राहिला. 
" काय मग निलेश साहेब.... " ,
" साहेब ?? कशाला चेष्टा करता सर.. " निलेश हसला. 
" तर direct विचारतो. त्या रात्री नक्की कुठे होतास तू... ३ जणांचे स्टेटमेंट आहे.. त्यात त्यांचे हेच म्हणणे आहे कि तू जागेवर नव्हता... सांग. " अभिच्या त्या प्रश्नावर तो जरा चपापला. 

"सर ... ताप होता अंगात. म्हणून गोळ्या घेऊन झोपलो होतो. म्हणून जाग आली नाही. पाहिजे तर डॉक्टरला विचारा. हे शेजारी दवाखाना आहे ना.. तिथेच जातो.. ओळखीचे आहेत डॉक्टर.. " ,
" एवढी हॉर्न वाजवत होती नयना... एकदाही ऐकला नाहीस हॉर्न... " महेशने विचारलं. 
" साहेब ... गोळ्या घेऊन झोपलो होतो ना.. त्यात किती जोराचा पाऊस होता त्यारात्री.... नाहीच आले ऐकायला. ",  निलेश... 
" ठीक आहे. आताही आजारीच दिसतो आहेस तू.... " महेश त्याकडे पाहत म्हणाला. 
" साहेब ... मी खरंच काही नाही केलं... " निलेश रडत म्हणाला.
 " हो रे .... रडतो काय.. मी फक्त चौकशी करतो आहे. " महेशचे लक्ष सोसायटी मध्ये लावलेल्या cctv कॅमेरा कडे गेले. " कॅमेरात शूट झालं असेल ना काही... " महेशने watchman निलेशला विचारलं. 
" नाही.. गेल्या महिन्यापासून बंद आहेत .. अजून repair नाही केले. " अभिनेच माहिती दिली. 
" ok ... चल मग निघू... तू आराम कर .. फक्त शहर सोडून जाऊ नको कुठे... " निलेश ला सोडून ते दोघे पुढे निघाले. 

" आता कुठे... " महेशचा प्रश्न. " एक काम करूया ... " अभि त्यांच्या सोबत आलेल्या हवालदारांकडे पाहत म्हणाला. " यांना जाऊ दे पोलीस स्टेशन मध्ये.. आपण जरा पुढे जाऊ... त्या डॉक्टरला भेटून येऊ... " 
" का रे ... औषध घेयाचे आहे का डॉक्टर कडून.. " महेश हसत म्हणाला. 
" निलेश याकडे औषध घेयाला गेलेला..... ज्या डॉक्टरच बोलला ना.. तो चौथा संशयित आरोपी आहे... सावंतच्या मित्र .... देशमुख.. " 

कसली गुंतागुंत केस मध्ये... महेशचे कुतूहल वाढले. दवाखान्यात पोहोचले तेव्हा देशमुख तर होतेच, शिवाय एक वकील देखील होते. ते बघून महेशला आश्चर्य वाटलं. " त्यांनी .... वकील सोबत असेल तरच स्टेटमेंट देणार असं सांगितलं. मी त्यांना आधीच सांगितलं होते कि आपण येणार आहोत ते. त्यासाठीच त्यांनी त्यांच्या वकिलाला बोलावून घेतले. " अभिषेक बोलला. ओळख करून झाली. अभिने थेट प्रश्न केला. " तुमच्याबद्दल माहिती पाहिजे आहे. त्यांच्या कुटुंबाशी कशी आणि कधी पासून ओळख..... " 

" लहानपणापासून ओळख माझी आणि सावंत ची. एकाच शाळेत होतो. आणि एकाच चाळीत राहायचो. कॉलेज मध्ये एकत्र. फक्त जॉब वेगळे होते. स्वभाव तर तापट होता त्याचा. राग चट्कन यायचा. तरी चांगला होता तो. सोसायटी मध्ये विचारलं तर सांगेल कोणीही. मदतीला नेहमी पुढे. त्याच्या सोबत असं कोणी करेल असं वाटलं नव्हतं. " ,
" त्यांची आणि त्यांच्या भावाशी भांडण होती का... " , महेशचा प्रश्न. 
" हो... खूप आधी पासून.... एकतर तो वाया गेलेला आहे. शिवाय नयना च्या जवळ जायचा सारखा प्रयत्न त्याचा... म्हणून जास्ती राग.. " ,
" तिच्याशी जवळीक...?? " ,
" हो.. जरा जास्तच कधी कधी.. नजर वाईट आहे त्याची. त्यामुळे तो कधी आला कि राग करायचा सावंत.... पैसे मागायला सारखं सारखं यायचा.... कंटाळला होता त्याला... त्यादिवशी सुद्धा सकाळी यांचे पैश्यावरूनच भांडण झालं. " अभिने हे लक्षात ठेवले. 
" नयनाचे कसे relation होते तिच्या वडिलांशी... " अभिने वेगळाच प्रश्न केला. 

" actually ... नयनाला तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले ते आवडले नाही. सावत्र आईचा आणि तिचा मुलगा सुमित... दोघांचा राग करायची. त्यात ती आई सोडून गेली. सावंत रिटायर्ड... या दोघांचा खर्च तिच्याच गळ्यात.. आणखी राग... ", 

" तरी देखील... ते तर तिचेच वडील होते ना... तरी राग.. " ,
" त्या मागे कारण ... तिचा Boyfriend .. ",
" त्याचे काय... " ,
" अमेय... त्याला कधी आवडलाच नाही. नयना सोबत त्याचे राहणे नाही आवडायचे. नयनालाही तस सांगितलं होते, यामुळे नयना राग करायची तिच्या वडिलांचा. " ,
" अमेय ... वाईट आहे का ... " ,
" नाही... चांगला मुलगा.. जॉब सुद्धा छान आहे. त्याला का आवडायचा नाही माहित नाही... आदल्या दिवशी सुद्धा या तिघांचे बोलणे झाले होते लग्नाचे.. तेव्हासुद्धा यांचे मोठे भांडण झाले होते. दुसऱ्या दिवशी सुद्धा.. या भावांचे भांडण सुरु होते आणि हा आलेला... मग आणखी जोरात भांडण झाले. ",
" मग तुम्हाला काय वाटते... अमेयने .. खून .... " ," माहित नाही... या बद्दल नाही बोलू शकत... तरी तो त्या रात्री आलेला तिथे...." हि माहिती जबरदस्त होती.
" अमेय आलेला ... रात्री... ?? " महेश आश्यर्यचकित..
" हो .... रात्री साधारण ११:४५ , १२ च्या सुमारास... मीच त्याला शांत राहायला सांगितले. घरी आला होताच... तरी त्याला बसवलं घरात. ५-१० मिनिटात त्याला जबरदस्ती बाहेर पाठवलं. पुन्हा भांडण नको म्हणून. मग तो पुन्हा आलेला का माहित नाही मला. मी १२ नंतर मी गेलो. " हे मात्र खरं होते. कारण त्या दोघांचे खून रात्री १ ते १:३० मध्ये झालेला.

" ok ,... आणि हे पार्टी ... दारू पिणे... हा काय प्रकार आहे.. " महेशचा प्रश्न...
" प्रत्येक महिन्याच्या शेवटी शनिवारी... तो अशी पार्टी करतो... पहिली बायको वारली. दुसरी सोडून गेली. त्याचंच परिणाम... तेव्हा तर किती दारू पियाचा.... मीच थांबवलं त्याला. कधीतरी ठीक आहे. असं बोललो तेव्हा त्याने ऐकलं. त्यानेच ठरवलं मग.... अशी पार्टी करू. मीही सोबत करतो मग... " ,
" आणि watchman ला का मारलं त्याने. " ,
" भाऊ आलेला ना ... त्या दोघांचा राग त्याने त्याच्यावर काढला. त्याला आधीच बरे नव्हते. त्यात हा किती काम करून घेयाचा त्याच्याकडून.. भांडी घासून घेयाचा, कचरा... लादी पूस... भाजी आणून दे ... सगळं मुकाट्याने करायचा. तरीही त्याला मारलं. बिचारा .... रडत होता. मीच त्याला औषध दिली त्यादिवशी... " 

आता या दोघांकडे बरीच माहिती जमा झाली होती. निघाले तिथून. मधेच महेशने अभिला थांबवलं. " नक्की कोणावर संशय आहे तुझा. "
" जास्त करून नयनावर... तीच खोटं बोलते असं वाटते. बघ... फ्लॅटला एकच दरवाजा. घरात ३ जण.. दोघांचा खून झाला. एक गाढ झोपेत... खुनीने या दोघांना मारलं. मग तिला का सोडून दिले... " ,
" तरीही... तिनेच कॉल करून सांगितलं ना.... आणि वडिलांना कशाला मारेल ती.. " महेशने उलट विचारलं.
" काही कळत नाही रे .. यांच्या स्टेटमेंट मुळे गुंतागुंत वाढत चालली आहे. " अभिषेक बोलला.
" आता कुठे ? " महेशचा प्रश्न. 

अभिने समोर बोटाने दाखवलं. समोर wine shop ... " दारू कधी पासून सुरु केलीस... " महेश हसत म्हणाला.
" त्या शॉप मधूनच सावंत कडे दारू जाते नेहमी... म्हणून चाललो आहे.. " अभिलाही हसायला आले. दोघे हसत हसत आले तिथे. अभिने आधीच सांगितले होते त्यांना, त्यामुळे त्या शॉपचा मालक त्यांना घेऊन आतच गेला.
" हा सर... विचारा ... काय विचारायचे आहे ते..  " ,
" किती वर्ष ओळखता सावंतला...",
" झाली असतील ४-५ वर्ष ... इथे शॉप open केल्या पासून ओळख.. हा इथे देशमुख डॉक्टर आहेत ना... त्यांनीच ओळख करून दिली... " ,
" बरं ... त्याच्या पिण्याच्या सवयीबद्दल काय सांगाल तुम्ही... " ,
" सुरुवातीला जास्तच घेयाचे ते.. प्रमाणाबाहेर... नंतर हळूहळू कमी केली... बियर घेऊ लागले. फक्त महिन्याच्या शेवटच्या शनिवारी जोरात पार्टी करायचे. तेव्हा जास्त मागवायचे. " ,
" जास्त म्हणजे किती ... " ,
" बियरचा १ बॉक्स .... " , महेशने त्याच्याकडचा एक फोटो बाहेर काढला.
" हाच बॉक्स का .. ? " त्याने निरखून पाहिलं.
" हो .. ह्याच ब्रँडची बियर .... " ,
" किती बॉटल असतात बॉक्स मध्ये... " ,
" १२ !! " ,
" मग १२ च्या १२ पितात हे दोघे... ",
" दोघे कुठे ... जास्त करून सावंत... १-२ सुमित ... आणि देशमुख १.. कधीतरी २.. रिकाम्या बॉटल , दुसऱ्या दिवशी आमचाच माणूस घेऊन येतो. ",
" आणि हे , स्वतः घेऊन जातात का बॉक्स ... कि तुमचाच माणूस जातो घेऊन.. " ,
" नाही... त्यांचा watchman आहे ना ... तोच घेऊन जातो दरवेळी... सील असतो ना बॉक्स ... " ,
" watchman ... त्यालाही आहे का सवय.. ",
" हो ... आहे कि.... पण कधी तरी घेतो... " ,
" तोही हीच घेतो का बियर... " महेशच्या त्या प्रश्नावर हसला तो. 

" नाही सर.. त्याला कुठे परवडणार ते.. साधीच... गावठी बोलतात ना... तीच घेतो तो.. " ,
" ठीक आहे.. आम्ही निघतो.. आणखी काही माहिती हवी असेल तर येईन... " दोघे निघाले तसं त्याने आणखी एक प्रश्न विचारला.
" पण यात माझा काय संबंध... " तो मालक बोलला.
" ड्रिंक मध्ये सुद्धा काही मिसळले असावे असा संशय आहे... किंवा तुमच्या पैकी कोणी तिथे जाऊन खून केला असेल तर .. त्यासाठीच... " अभि बोलला. आणि निघाला. उशीर झालेला तर दोघेही आपापले घरी निघाले.

पुढे ४-५ दिवस आणखी गेले. तरी खूप confusion होते. पुरावे कमीच, संशय जास्त होता. अभिने महेशला बोलावून घेतले.
" काय रे .... बोलवून घेतले .. " ,
" हो ... बस्स जरा .... केस पुढे जात नाही... म्हणून तुला बोलावलं उजळणी करायला. " ,
" हो चालेल... कर सुरु.. " अभिने एका प्लास्टिक बोर्ड वर या चौघांचे फोटो लावले. नयना, तिचे काका, तिचा boyfriend अमेय आणि देशमुख...
" या चौघांवर संशय आहे. " अभिने महेशला सांगितलं.
" पहिलं सांग ... देशमुख तर मित्र आहे ना.... मग तो का संशयीत... " ,
" actually , त्याची हि history काढली. त्याला माहित होती सावंतची सवय. देशमुख चा प्लॅन त्याची प्रॉपर्टी साठी होता. " महेश यावर चक्रावला.
" तुला कस कळलं हे.. " ,
" त्यांने वकील arrange केला होता तेव्हाच मला विचित्र वाटलं होते. तेव्हापासून त्याच्यामागे काही माणसं लावली होती. " महेश अजूनही confused होता.
" म्हणजे तुला वाटते देशमुखने खून केला. " ,
" maybe ... कारण सावंतला भेटणारी शेवटची व्यक्ती म्हणजे देशमुख... शिवाय , बियरचा प्लॅन त्यांचा... मित्र असून सुद्धा त्याने मित्राला दारूचे दुरुपयोग सांगितले नाही त्यांनी. त्याकडेच सावंतची डायबेटीसची ट्रीटमेंट सुरु होती. तरीही बियर सुरु होती. त्यांच्यामुळेच सुमितला इतक्या लहानपणी व्यसन लागलं ना.. नयनाच्या लग्नाला सुद्धा यांचा सपोर्ट होता. लग्न होऊन ती गेली कि हा फ्लॅट त्यांचाच.. त्यामुळे या खुनाचा जास्त फायदा देशमुखला होता.. " 

"नयनाचा वडिलांवर राग... एकतर सावत्र आई आणि सावत्र भाऊ ... दोघेही हिला आवडत नव्हते. सुमितला तिने एकदाही राखी बांधली नाही... त्याचा रागच करायची ती. दुसरे कारण अमेय.... अमेय सोबतच लग्न करायचे आहे तिला, तरी वडिलांची परवानगी नाही. या सर्वामुळे नयनावर संशय... त्यात सोसायटी मध्ये तीच चर्चा. ती एकटीच कशी वाचली. " ,
" तिचा boyfriend अमेय.. त्याचे काय... ",
" मी आणखी चौकशी केली त्याची... देशमुख बोलले होते ना... आदल्या दिवशी यांची मिटिंग झाली होती. नयना , तिचे वडील आणि अमेय... लग्नावरून भांडण सुद्धा झालेले.. त्यात अमेय भलताच चिडलेला सावंत वर... आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा तो लग्नाचेच विचारायला आलेला. त्यांचे आधीच एक भांडण सुरु होते भावाशी... त्यात यालाही सामील करून घेतलं. रात्री आलेला तो bike ठेवून गेला कि विसरून ते कळलं नाही... वेळ सुद्धा त्याने खोटी सांगितली... आणि सर्वात interesting म्हणजे... याचाही डोळा होता यांच्या प्रॉपर्टी वर.... " अभिने सांगितलं.  

यावर महेश confused झाला. " सगळ्यांना प्रॉपर्टी पाहिजे होती... कमाल आहे.. अशी किती प्रॉपर्टी आहे त्यांची... " महेशचा प्रश्न साहिजकच होता.
" नयनाचे वडील ... मिस्टर सावंत...मोठे ऑफिसर होते. त्यामुळे पगार जास्त.. चार फ्लॅट आहेत मुंबईत.. गावाला मोठा बंगला आहे. बँक बॅलन्स तर आहेच... शिवाय इतर  प्रॉपर्टी ... हे सर्व धरून....  १० ते १२ कोटी च्या घरात जाते सर्व ....त्यात मृत्यूपत्र ... तेही केले आहे, काय आहे माहीत आहे का... प्रॉपर्टीचे ३ भाग होणार.. सुमित , नयना आणि देशमुख... त्यात काही कारणास्तव या तिघांपैकी एकच जिवंत असेल तर त्याला सगळी प्रॉपर्टी.. सुमित आणि नयनाही नसेल तर सगळे देशमुखला.. त्यात त्यांच्या भावाचा काहीच उल्लेख नाही... त्या नावासाठीच त्या भावांचे भांडण व्हायचे... " 

" सॉलिड गुंतागुंत आहे ना ... काय पण बनवलं आहे मृत्यूपत्र ... " महेश डोक्याला हात लावत बोलला. " त्यात त्यांनी हल्लीच बदल केला त्यात... नयनाचे लग्न त्यांच्या मर्जी विरोधात झाले तर नयनाला काहीच मिळणार नाही... या साठीच देशमुख नयनाच्या लग्नाला सपोर्ट करत होते. कारण तिचे लग्न अमेय सोबत झाले कि ती प्रॉपर्टी मधून आपोआप बाहेर जाणार... आणि लग्न केल्यावर सुद्धा प्रॉपर्टी नयनाला मिळावी यासाठी अमेयची धडपड ... त्यांचा भाऊ तर आधी पासून बाहेर आहे प्रॉपर्टीच्या .... बघितलं ना .. कसे सगळे मागे आहेत ते पैशाच्या... म्हणूनच हे सर्व प्रॉपर्टी साठी तरी खून करतील असेच वाटते... " अभिचे झाले बोलून... 

महेश जरा विचारात होता. " मला वाटते ... आपण पुन्हा एकदा त्या फ्लॅट वर जाऊन येऊ... काय माहित ... काही नवीन मिळेल असं वाटते.. " अभिलाही पटलं ते. सोसायटी मध्ये आले तेव्हा watchman निलेश समोरच... अभिला काही वाटलं. त्याच्या जवळ आला.

" ये जरा ... बोलायचे होते... " त्याला एका कोपऱ्यात घेऊन आला.
" काय झालं साहेब !! " ,
" त्या रात्री एवढी झोप कशी काय लागली तुला... म्हणजे ... नयना गाडीचा हॉर्न वाजवत होती... ते एकदाही ऐकलं नाही तू ... " ,
" सर ... ते औषध घेतले होते ना... झोप लागली. ",
" नक्की औषध मुळेच झोप लागली ना ... " अभिच्या या वाक्याने निलेश गडबडला. " दारू ... पितोस ना ... त्यानेच झोप लागली ना... " अभि direct बोलला. आता तर खरं बोलावंच लागेल.
" हो सर ... पितो.. पण कमी... सावंत सरांना माहित होते... बाकी कोणाला सांगू नका हा ... नोकरी जाईल.. " ,
" तरी किती पितोस ... गाढ झोप लागावी इतकी ... " ,
" जास्त नाही ... कधी कधीच ... " ,
" पण त्याच्याकडे पार्टी असते तेव्हा तर नक्की घेतोस तू दारू... ",
" हो सर.. त्याच्याकडे बॉक्स घेऊन जातो ना बियर चा.... तेव्हा सावंत सरच बोलतात ... घे दारू म्हणून... गावठीच जमते मला... त्यादिवशी जरा जास्त झाली... म्हणून झोप लागली. नयना मॅडम काय ... अमेय सर आलेले ते सुद्धा कळलं नाही मला... दुसऱ्या दिवशी तुम्ही सांगितलं तेव्हा कळलं ... मी खरच काही केलं नाही साहेब... मला माहित सुद्धा नव्हते असे काही झाले ते .. सकाळीच कळलं मला.. " निलेश रडत होता.   

" असच विचारतो आहे रे ... तू नको tension घेऊस. " ,
" साहेब .. तुम्ही माझी खोली का बंद केली आहेत. मला बाहेर झोपावे लागते ना ... त्यात पाऊस सुद्धा आहे. थंडी वाजते झोपताना. " ,
" उघडेल तुझी रूम... थोडे दिवस थांब... " अभिने त्याला तिथेच सोडले आणि महेशला घेऊन फ्लॅटवर आला. दोघांनी लगेचच शोधाशोध सुरु केली. काहीतरी मिळालेच पाहिजे , असं महेशला मनापासून वाटतं होते. 

आणि महेशलाच सापडलं. अभिला लगेचच त्याने समजावून सांगितलं. अभिला सुद्धा पटलं ते, लागलीच त्याने माणसं कामाला लावली. बरोबर ३ दिवसांनी पुन्हा भेटले दोघे. " एक काम करूया ... " अभि बोलला. " तू जा नयनाच्या काकांकडे... ",
"अरे !! मी कसा .. मी डॉक्टर आहे. मी कसा जाऊ त्यांना आणायला... " ,
" जा रे ... उगाचच नाटक करतो आहे ... जा चल .... हे बाकीचे आहेत ना ओळखीचे... " अभिने त्याच्या सहकाऱ्यांकडे बोट दाखवलं.
" ते आहेत सोबत.. त्यात मित्र सुद्धा आहेत तुझे ... जा ना रे .... मला दुसरं काम आहे. " अभिने त्याला जायलाच सांगितलं. महेश हसतच गेला. अभि मात्र आणखी काही हवालदार सहित सोसायटीच्या दिशेने निघाला. 

अमेयला आधीच फोन करून बोलावलं होते. नयना तिथेच होती पण वेगळ्या फ्लॅट मध्ये. देशमुखांना अभि सोबत घेऊन आला. पोलिसांच्या गाडीच्या सायरन ने सोसायटी मध्ये असलेले सर्व खाली आले. काही त्यांच्या बाल्कनीतून बघत होते. अभि उतरला त्याच्या गाडीतून. त्याच्या गाडीत देशमुखला बघून एक जण बोलला.
" मला वाटलंच होते ... यांनीच मारलं असेल सावंतांना... " अभिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला.
" तुम्ही बघितलं होते का मारताना.. " ,
" नाही .... तुमच्या सोबत आले ना म्हणून बोललो... ",
" तस तर मी सुद्धा आलो त्याच्या सोबत .. मग मीही केला का खून .. " तसे ते गप्प बाजूला झाले. 
महेश सुद्धा आला पुढच्या १५ मिनिटात, नयनाच्या काकांना घेऊन. नयना , अमेय तिथेच उभे होते. नयनाने त्यांना गाडीत बघून अभिला विचारले. " you mean .... काकांनी केला ... खून ... " अभिने तिच्याकडे बघितलं. " थांबा जरा .... किती घाई ... मी आहे ना ... सांगतो ... " अमेयने नयनाला मागे घेतलं. 

आता महेशच पुढे आला आणि अभिला विचारलं. " तुला नक्की माहित आहे ना .. कि उगाचच आपलं हिरो बनायला आला आहेस.. " ,
" किती घाई लावली आहे तुम्ही सर्वानी... सांगतो थांब... " अभिने आजूबाजूला नजर फिरवली. आता जवळपास सर्वच सोसायटी जमा झाली होती.

" मला माहित आहे असं करणे बरोबर नाही , हे असं सर्वांसमोर... सर्व सोसायटी समोर कोणालातरी अटक करणे. किती अपमानकारक आहे , हेही कळते मला. तरी ... काही गोष्टी सांगाव्या सर्वाना ... त्यामुळे पुढे ... future मध्ये चुका होणार नाहीत.  तर.... आता सर्वच संशयित आरोपी आलेले आहेत... " अभि बोलत होता तर नयनाने मधेच त्याचे वाकय तोडलं.

" आरोपी आणि मी ... माझ्यावर का संशय... मी माझ्या पपांचा खून का करिन .... inspecter असला तरी... काहीही बोलून देणार नाही.. " नयना रागात बोलली. 

" शांत व्हा ... !! संशयित आरोपी असा शब्द वापरला मी... आरोपी असं बोललो का .. " नयना गप्प झाली.
" चला ... आता काही प्रश्न विचारीन ... आणि सर्वानी खरं बोलायचे ... कारण मी जे प्रश्न करणार आहे ना ... त्याची उत्तर माहित आहे मला ... फक्त तुमच्या कडून ऐकायची आहेत .. खरी उत्तर.. " ,
" मग ... आम्ही काय खोटे सांगितलं का तुम्हला ... " या वेळेस अमेयचा आवाज वाढला. तसं अभिने त्याकडे रागात पाहिलं.

" मिस्टर अमेय .. " अभि त्याच्याजवळ गेला. " खोटं नाही बोलत ना तुम्ही... मग सांगा ... त्यारात्री .. रात्री ८ वाजता आलेला कि रात्री ११:४५ वाजता... " अभि अमेयकडे बघत बोलला. काय बोलणार अमेय...

" अमेय कशाला खोटं बोलेल... " नयना अमेयची बाजू घेऊ लागली. " हो का ... " आता नयनाकडे वळला. 

" तो खोटं बोलत नाही... ठीक आहे मग ... त्यादिवशी , किती वाजता निघाला होता तुम्ही ऑफिसमधून... स्टेटमेंट मध्ये असं लिहून दिले आहेत कि रात्री ८ वाजता सोडलं ऑफिस... आणि ऑफिस मध्ये तुमचा out time आहे संध्याकाळी ६ वाजता... आता सांगा ... कोण खोटं बोलते आहे ... मी कि तुम्ही... " नयना सुद्धा गप्प... अभि दोघांकडे पाहत होता.

" कोणीच बोलत नाही... ठीक आहे... मी बोलतो. ... त्यादिवशी तुम्ही संध्याकाळी ६ वाजता ऑफिस मधून... तिथून घरी न जाता , पोहोचलात ते थेट अमेयच्या ऑफिस मध्ये... तिथे visiter च्या रजिस्टर मध्ये तुमचे नाव आहे .. काय बरोबर ना.... तिथे तुमच्या गप्पा रंगल्या. ते बोलणे काय होते ... ते तुम्हाला माहित.. तेच तुम्हाला सांगायचे आहे आता ... आणि खरं पाहिजे मला .... नाहीतर माझ्याकडे खूप गोष्टी आहेत सांगायला... " अभि बोलला.  

नयनाने आजूबाजूला पाहिलं. " पप्पा लग्नाला तयारच होतं नव्हते. आणि मला अमेयशीच लग्न करायचे होते. आदल्या दिवशी , अमेय आलेला घरी ... पप्पांना तयार करायला. तेव्हाही भांडण झालेलं. म्हणून मी अमेयला ... आपण आधी कोर्ट मॅरेज करू , हे सांगायला आले होते. त्यावरच बोलत होतो आम्ही... " अमेयने सुद्धा मान डोलावली त्यावर.

" ok ... मग हा एवढ्या रात्री ... ११: ४५ ला का आलेला ... तुला भेटायला तर नक्कीच नाही... कारण तुम्ही आधीच भेटला होतात.. " अमेय इकडे -तिकडे बघू लागला.

" कोणता प्लॅन सुरु होता डोक्यात.. सावंतांचा खून करायचा ... हेच ना ... " अभिच्या या वाक्यावर अमेय खवळला.
" काय बोलता आहात तुम्ही... मी कशाला खून करिन... तोंड सांभाळून बोला.. " अभिने ' थांब ' असा हाताने इशारा केला. " याचे पण उत्तर आहे माझ्याकडे ... आणा रे त्याला .. " ते ऐकून हवालदारांनी गाडीतून आणखी एकाला बाहेर काढला. 

अमेय त्याला बघून कावरा-बावरा झाला. अभिने त्याला अमेय समोरच उभं केलं. " याला ओळखतॊस ना .. " अभिने विचारलं. अमेय काहीच बोलला नाही.

" चल .. मीच सांगतो... हा अमेयचा मित्र ... राघव... आता हा आम्हाला कुठे भेटला.... अमेय - नयनाची मिटिंग संपली, नयना घरी आली. अमेय तापलेला.... डोक्यात राग... तोच राग शांत करायला राघव कडे गेला.... अमेयचा एकमेव मित्र ... हि माहिती कळली ती ऑफिसमधून...कारण राघव वरचेवर अमेयला भेटायला येत असतो ऑफिसमध्ये .. तर .... अमेय आपले तापलेलं डोकं थंड करायला राघव कडे आला. दारू पिणारच ना ... ते हि झालं तिथे आणि त्याच ठिकाणी प्लॅन झाला ... सावंतच्या खुनाचा.. आणि अमेय... राघव ने हे आधीच कबुल केले आहे... त्यामुळे ते तू टाळू शकत नाही. पुढे सांगतो.. राघवला का पकडलं. अमली पदार्थ म्हणजेच drugs विकतो..... illegal weapon आहेत याच्याकडे...  त्यातलेच एक घेऊन आलेला सावंतकडे... त्यांना मारायला ... नशेत. रात्री ११: ४५ वाजता... तिथे देशमुखांना बघून घाबरला. थोडावेळ थांबला ... ५-१० मिनिटे.. मग निघाला घरी. नशेत आपण bike आणली , ते विसरून गेला. आणि नयना मॅडम... हा नशा करतो.. drugs च्या आहारी गेला आहे .. हे तुमच्या पप्पाना माहीत होते.. तुमचे प्रेम होते म्हणून कधी बोलले नाही तुम्हाला.. त्यासाठीच तुमच्या लग्नाला विरोध होता... " 

नयनाला हे सर्वच नवीन. तशी तिने अमेयच्या कानाखाली मारली. " का मारलस पपांना... किती घाण माणूस आहेस तू... का केलंस हे.. " नयनाला काही बायकांनी बाजूला केलं.

" अमेय नाही खुनी ... जरा थांबा ... सांगतो ... आधी देशमुखांची चौकशी करू.. " अभि त्यांच्याकडे वळला.

" तुमच्या मित्राला डायबिटीस होता ना ... हे माहित असून सुद्धा त्यांना दारूच्या आहारी नेलंत. त्या लहान सुमित ला व्यसन लावलत. का .... आणि राघवला सुद्धा ओळखता ना ... सावंतांच्या बियर मध्ये हळूहळू drugs add करायचा ना तुम्ही.. नाही म्हणू नका... माझ्याकडे हि डॉक्टर आहे एक.. तसही तुम्हाला drugs चा illgal वापर केल्याबद्दल अटक करणारच आहे .. त्या आधीच कबूल केले तर बर होईल. " देशमुखांना पर्याय नव्हता.

" होय ... राघव मलाच drugs विकण्यासाठी देयाचा ... वय वाढत आहे , इतके रोगी सुद्धा येतं नाहीत दवाखान्यात ... पैसे संपत चाललेले... तेव्हा अमेय भेटला, त्यानेच राघव ची ओळख करून दिली. तरी सावंत माझा बालपणीचा मित्र ... त्याला मारण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही मी.. "

देशमुख गप्प झाले. " आता राहिले नयनाचे काका.. ते एकटेच खरं बोलत होते. आधी संशय होता त्यांच्यावर , कारण त्या रात्री कुठे होते तेच त्यांना आठवत नव्हते. एका हॉटेल मध्ये होते असं सांगितलं पण कोणते हॉटेल ते माहित नाही. आधी वाटलं खोटं बोलत आहे . नंतर कळलं त्यांना गोष्टी लक्षात राहत नाहीत. आम्ही आणखी तपास केला तेव्हा कळलं ते नव्हतेच इथे. ते आम्ही पक्के केलं. त्यामुळे यांनी खून केला नाही. " अभि बोलला.

महेशला आता राहवलं नाही. " आता काय उद्या सांगणार आहेस का ... खुनी कोण आहे ते ... " ,
" सांगतो रे ... " अभिने एकदा जमलेल्या सर्वाकडे नजर टाकली. " काही योगायोग इतके कमालीचे असतात कि वेगळंच वाटते. आता मला सांग महेश, जगात right handed आणि left handed व्यक्तींची संख्या सारखी आहे का ? " ," नाही रे ... left handed कमी आहेत... "

" हा... हेच, मीही त्यादिवशी खूप विचार केला ... खून नक्की कोणत्या अँगल ने झाला. आणि अचानक कळलं कि खून करणारी व्यक्ती right handed आहे. पण योगायोग माहिती आहे का ... हे सर्व ... नयना , अमेय , काका आणि देशमुख ... इतकंच नाही तर राघव सुद्धा left handed आहे... आहे ना कमाल...  " ,

" मग खुनी ? " ,

" तूच सांग ... त्यारात्री ... ४ जण गेलेले त्या फ्लॅट वर... नयनाचे काका नव्हते इथे. राहिले हे सर्व ... watchman निलेश, नयना, अमेय आणि देशमुख... " अभिचे बोलणे संपले तस सगळेच watchman कडे बघू लागले. 

" you mean ... watchman ने खून केला.. " महेश त्याकडे पाहत होता. हवालदारानी लगेच पकडलं त्याला.

" म... मी ... क ... काही नाही केलं .... सोडा मला .. " निलेश ओरडत होता.

" अभि .. काय नक्की.... त्यानेच खून केला आहे का ... ?? " ,
" हो तर ... त्यानेच मारलं दोघांना... " ,
" साहेब ... काय बोलता तुम्ही... मी का करिन खून ... " अजूनही तो ओरडून सांगत होता.
" खरच सांग.. कस ओळखल तू... " महेशने विचारलं. 

"  मी जरा बसू का.. पाय दुखले माझे.. " म्हणत अभि निलेशच्या शेजारी जाऊन बसला. " हे तर नक्की झालं कि right handed माणसाने खून केला. म्हणजेच निलेश... आता पुढे... याची स्टेटमेंट , त्या रात्री पाऊस होता... हीच सुरुवात आहे अमेय आणि नयनाची. अर्थात या दोघांनी मिळून हि स्टोरी बनवली होती. कारण अमेयची bike तिथे सापडली. ती पावसात बंद पडली. ती कश्यामुळे .. त्यासाठी पाऊस आला स्टोरी मध्ये. नयना उशिरा का आली तर पावसामुळे ट्राफिक लागलेलं ... त्यारात्री काय .. पूर्ण दिवसभर पाऊस नव्हता. " अभि बोलला तस सर्वच एकमेकांकडे पाहू लागले. 

" हो.... ते खोटंच बोलले. देशमुखांच्या स्टेटमेंट मध्ये पाऊस नव्हता. नयनाचे काका विसराळू... तरी त्यांनी सांगितलं कि आदल्या दिवशी पावसाने त्यांच्या घरची light गेली होती. त्यामुळे या watchman निलेश ने दिलेली स्टेटमेंट खोटी होती असच वाटत होते सुरुवातीपासून. तोही बोलला होता ना .. त्या रात्री पाऊस होता ते. ",

" खोटं आहे हे ... हे inspecter काहीही बोलत आहेत. " निलेश ओरडून सांगत होता. अभि उभा राहिला आणि निलेश समोर आला.

" अमेय त्या रात्री आलेला ते फक्त देशमुख आणि स्वतः अमेयला माहित होते. त्यानंतर ते महेश आणि मला कळलं. तुला कस माहित " आता निलेश घाबरला. " म्हणजे तू तेव्हा जागा होतोस.. अमेयला बघितले तू... बरोबर ना .. " निलेश गप्पच.

" पुढे ऐकायचे आहे ना .. तर महेश, सावंतच्या घरी बियर चा बॉक्स होता. जो आपण जप्त केला होता . घरात आणि बॉक्स मध्ये मिळून किती बॉटल सापडल्या. आपण त्याचा एक फोटोही काढला होता. तुझ्याकडे आहे बघ. " महेशने आधीही बघीतला होता तो फोटो, पुन्हा बघितला. त्याने बॉटल मोजल्या. 

" ११ बॉटल होत्या त्यादिवशी त्या फ्लॅट मध्ये... " ,
" बरोबर ... आणि बॉक्स मध्ये किती असतात .. त्या wine shop मालकाने सुद्धा सांगितले... किती असतात.. " ,
" १२.....  म्हणजे एक कमी.. " महेश लगेचच बोलला.
" १ बॉटल कुठे होती माहित आहे का .. " अभिने आता निलेशच्या रूममधला फोटो दाखवला. " निलेश झोपतो ना.. त्या कॉट खाली... " अभिचे बोलणे बरोबर होते. तशीच बियर बॉटल होती तिथे.

" याने त्या दोघांना मारलं आणि अजाणतेपणी का होईना... त्या बॉक्स मधली... एक स्वतःच्या घरी आणली. सकाळी हा सर्व गोंधळ झाला. आणि नशेत त्याला कळलंच नाही कि बॉटल घरातच राहिली. " आतातर निलेश कळलं होते कि संपलं आहे सर्व.

" आणखी सांगतो. याला मी इथे आल्यापासून बघतो आहे. हा watchman आहे ना.. पायात साध्या चप्पल आहेत याच्या. ड्रेस सुद्धा एकच वापरतो. CCTV आता बंद असले तरी एका महिन्यापूर्वीच काही विडिओ बघितले मी. त्यात तर याच्या पायात शूज दिसतात.. " ,
" मग कुठे गेले शूज याचे.. " ,
" आपण त्यादिवशी आलेलो ना पुन्हा .. तेव्हा तुलाच बुटाचे ठसे मिळालेले ना... याचेच होते ते... खून करताना रक्त शूज आणि कपड्यावर उडालेले असेल, मग मीच शोधाशोध सुरु केली. त्याच नाल्यात पुढे... याचा watchman चा ड्रेस आणि शूज मिळाले. " अभिने बरेच पुरावे सादर केले. 

" याच्या पेक्षा जास्त कोणाला माहित सावंतचा फ्लॅट. हाच असायचा तिथे ... कचरा काढायचा, लादी पुसुन देयाचा. सुमितची बॅट कुठे....  हे सुमित नंतर यालाच माहित. असो... आता याची history सांगतो. या काही गोष्टी मला आधीच कळलेल्या तर विचार केला याची काही history तर नक्कीच असावी. निलेशची माहिती काढली. निलेश ६ वर्षांपूर्वी जेलमधून सुटून आलेला आहे. हे इथे कोणाला माहित आहे का... " अभिच्या या वाक्यावर जमलेले सारेच आश्चर्यचकित....

" एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न म्हणून हा आत गेलेला. बाहेर आल्यावर काहीतरी नोकरी करावी तर इथे आला. सावंत ची ओळख झाली. सोसायटीला watchman पाहिजे होताच.. जास्त आढे-वेढे न घेता सावंतनी त्याला ठेवून घेतले. इथेच चूक झाली. अनोळखी व्यक्तीवर विश्वास... म्हणून निलेश त्यांची सर्व कामं करायचा. गुन्हेगार शेवटी गुन्हेगारच... काहींना सुधारता येतं नाही. दोन दिवसापूर्वी, शेजारच्या सोसायटीच्या watchman बोलता बोलता बोलून गेला. सावंत साहेबांना ... बसलेले असताना मागून वार केला. समोरून कोणाची हिंमत झाली नसती... यावरूनच कळलं कि निलेशनेच खून केला. " अभि...

" कस काय ?? " नयनाने विचारलं. 

" इथे जमलेल्या लोकांपैकी फक्त डॉक्टर महेश आणि मलाच माहित आहे कि खून कसा झाला ते... याचाच अर्थ , निलेशने त्यांना मारलं. त्यालाच माहित ना कस मारलं त्याने. so ... मला वाटते कि आता खूप पुरावे सादर केले आहेत मी... आतातरी निलेश.... कबूल कर .. " अभि बोलला. 

निलेश आता शांत झाला होता. मान खाली घालून उभा होता . " हो... मीच मारलं त्यांना. " निलेशने कबूल केलं. " राग  आलेला त्यांचा.... आधीच वैतागलेलो होतो मी. किती काम करून घेयाचे ते. त्या सगळयाचा राग होता मनात. त्यादिवशी, सर्वासमोर थोबाडीत मारली. वाईट वाटलं पण जास्त रागच आला. तेव्हाच ठरवलं कि यांना धडा शिकवीन. दारू पीत बसलो होतो, पण कधी संधी मिळते ते बघत होतो. एकटे भेटत नव्हते. अमेय आलेला , देशमुख आलेला... नयना आली तेव्हाहि जागाच होतो... रागात झोप कशी लागणार. शेवटी देशमुख गेले तेव्हा संधी मिळालेली. त्यांना मारायचे नव्हते, फक्त जखमी करायचे होते. रागाच्या भरात गेलो. एक चावी तर माझ्याकडे असते याच्या फ्लॅट ची. दरवाजा उघडून हळूच गेलो आत. सावंत पेंगत होते. काहीतरी पाहिजे होते वार करायला. नजरेसमोर पहिली ती क्रिकेटची बॅट आली. मारली डोक्यातच.  खाली पडले खुर्चीवरून ते. पण इतका राग होता मनात कि मारतच राहिलो... कितीवेळा मारलं माहित नाही. शांत झालं मन तेव्हा थांबलो. निघत होतो तर सुमितने पाहिलं. त्याला सुद्धा मारायचे नव्हते. केवळ त्याने मला त्या अवतारात बघीतलं म्हणून त्याला बेशुद्ध करायचे होते. पण नशेत कुठे काय सुचते. पळू लागला तो .. पळालाच असता पण खाली पडला .. तेव्हा मारलं त्याला. वाटलं दोघे बेशुद्ध झाले असतील. हात धुतले तिथेच ... पण रक्त लागलेलं कपड्याना. ते धुवून कुठे वाळत घालणार. दिले टाकून त्या नाल्यात. घरी येईपर्यत दारू उतरली होती. मग पुन्हा गेलो त्यांच्याकडे... तिथं तर पूर्ण बॉक्स होता. उचलली त्यातली एक बियर..नाहीतर सकाळी उठून ते कुठे पिणार बियर ... आधी डोक्याला औषध लावतील ना .. हाच विचार केला मी...  तसाच झोपून गेलो. सकाळी आरडा - ओरडा ऐकून कळलं कि ते जिवंत नाहीत. पळणार होतो तोपर्यंत तुम्ही ... पोलीस आलेले. " निलेशने एका दमात सांगून टाकलं. 

" घेऊन जा याला ..  सोबत अमेय , त्याचा मित्र राघव ... आणि देशमुख.. यांना हि घेऊन जा.. Drug चा व्यवसाय आणि वापर .. दोन्ही गैरकानूनी... अटक तर झालीच पाहिजे. " अभिची ऑर्डर... घेऊन गेले सर्वाना. बाकीचे तसेच होते. " पुन्हा सांगतो ... अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवला सावंतनी. काय झालं ते पाहिलं सर्वानी. हे सर्व कळावं म्हणून इथे आलेलो. शिवाय राग आणि दारू किती वाईट ... हेही कळलं असेल... आणि जेव्हा या दोन गोष्टी एकत्र येतात तेव्हा माणूस राक्षस होऊन जातो... हे नक्की झालं. तर चला... आम्ही निघतो.. नवीन watchman  नेमा आणि CCTV रिपेअर करून घ्या. चला... " अभि गाडीत बसला. 

 " पावसाने मदत केली ना.. " अभि महेशला बोलला.
" कसं काय ? " , महेशने विचारलं.
" पाऊस नव्हता म्हणून तर पुरावे राहिले .. नाहीतर वाहून गेले असते. शिवाय त्यांच्या स्टेटमेंट मध्ये पाऊस होता म्हणून कळलं कि निलेश खोटे बोलतो आहे ते. यात सर्वात आवडलं ते नयनाची style ... बोलण्याची style ज्या पद्दतीने बोलली ती.... " त्या रात्री पाऊस होता ... " तेव्हा वाटलं कि movie आहे कि काय.. पण होऊ शकतो ना असा movie .. स्टोरी तर आहेच आपल्याकडे... Title नयनाने सुचवलं ....... " त्या रात्री पाऊस होता ... " त्यावर गाडीतले सर्वच हसले. आणि गाडी पोलीस स्टेशनच्या दिशेने निघाली.

--------------------------------------------------- The End -----------------------------------





1 comment:

  1. he abhi ani mahesh chi jodi bhari ekdum must vatali story ek no

    ReplyDelete

Followers