All the contents on this blog are Copyright Protected.

All the contents on this blog are Copyright Protected.

MyFreeCopyright.com Registered & Protected
Protected by Copyscape Duplicate Content Software

Saturday, 10 October 2015

" सूड… ( भाग दुसरा ) "

          पुढचे चार दिवस तर inspector अभिषेकला "त्या" केसमध्ये लक्षच देता आले नाही. एका मंत्र्याच्या मुलाचे लग्न असल्याने त्याची डुटी तिथे लागली होती. तर महेशकडे दुसऱ्या केसेस होत्या. अभी वैतागला होता त्या लग्नाला. लग्न उरकल्यानंतर अभिने पुन्हा केसकडे देण्यास सुरुवात केली. त्यादिवशी महेशला त्याने घरी बोलावून घेतलं. 

" हा बोल अभि…कसं झाले लग्न.…. ", महेश जरा मस्करीत बोलला. 
" गप्प रे… ते नको आता ….किती त्रास झालं ४ दिवसात, विषय काढू नकोस तो." अभि वैतागत बोलला. 
" ok… बाबा, कशाला बोलावलंसं ? ", 
" अरे… कोमल सावंत केस कडे लक्षच दिलं नाही चार दिवस.", 
" हो रे… मी पण दुसऱ्या केसेस वर होतो ना.… पुण्याला गेलो होतो ना.",
" नवीन केस ? ",
" हो, तिथे एक बेवारस प्रेत सापडलं ",
"मग ते पुणे पोलिसांचा काम आहे ना… ",
" हा… पण माझा मित्र आहे ना pune forensic expert… त्याने मला बोलावून घेतलं, माझी केस नाही ती. " ,
" ठीक आहे ते जाऊ दे… आपल्या केस मध्ये काही आहे का ? ",
" तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का?",
" कोणती ?",
" तू त्या सावंतला सांगितलं होतंस ना, मिडियामध्ये सांगायला… मग अजून मीडियात, news मध्ये काही आलंच नाही. पुन्हा ४ दिवसात त्याने call सुद्धा केला नाही." , अभिला पटलं ते. 
" मला वाटते त्यांनी मीडियात काही सांगितलंचं नसेल, कदाचित." ,
" may be… ठीक आहे, उद्या जाऊ त्यांच्या घरी. चल आता मी जातो माझ्या घरी. " म्हणत महेश घरी गेला. 

           सकाळीच त्या दोघांनी सावंतांचे घर गाठले, तर घरी फक्त मिसेस सावंत. अभिला जरा विचित्र वाटलं. " तुमची मुलगी गायब आहे ना.कोणालाच tension नाही का. " महेश मिस सावंतांना बोलला. " तसं नाही, पण ऑफिसला तर जावेच लागेल ना." महेश त्यावर काय बोलणार. " बरं… it's ok… मिस्टर सावंतांना मी हि गोष्ट मिडिया मध्ये कळवायला सांगितलं होते. मग अजून तशी news कशी नाही पेपर्स मध्ये. " त्यावर मिसेस सावंत गप्प झाल्या. अभि आणि महेश एकमेकांकडे पाहू लागले. काय समजायचे नक्की. इतक्यात राहुल आला. " Hi inspector …. काही समजलं का कोमलबद्दल ? ", एकदम tension free mind मध्ये होता राहुल. अभिच्या नजरेतून सुटलं नाही ते. " हा… ते शोधतो आम्ही. पण हि news अजून बाहेर कशी नाही. तुमचं लग्न म्हणजे मिडियासाठी मोठी event होती. आणि कोमल गायब आहे ते मिडियाला कसं माहित नाही अजून. " राहुल मिस सावंतकडे पाहू लागला. अभिला कळलं ते. " काय झालंय ? ", महेशने विचारलं. 

            राहुलने सगळी कहाणी सांगितली. मिडियामध्ये कोमल हरवली आहे हे सांगितलं तर बदनामी होईल. business shares वर परिणाम होईल. सगळीकडे गोष्ट पसरेल म्हणून काजलने सुचवलं कि कोमल काही दिवसांसाठी परदेशात गेली आहे असं सांगावं. आणि म्हणून मिडियामध्ये अशी काही गडबड नव्हती. अभिने डोक्याला हात लावला. काय माणसं आहेत हि… जवळच्या व्यक्तीपेक्ष्या business shares त्यांना जास्त महत्वाचे वाटतात. माणूसकी काय असते ते यांना माहित नसेल बहुदा.… अभि मनातल्या मनात बोलला. " Ok, then… मिस्टर सावंत आले कि मला भेटायला यायला सांगा." म्हणत दोघे बाहेर पडले.  

"काय यार… जरा विचित्र आहे. कोणालाच tension नाही. " अभि म्हणाला. 
" ऑफिस बरोबर आहे, बंद ठेवून चालत नाही.… तरीसुद्धा सावंत जरा विचित्र वागत आहे ना. सुरुवातीला काळजी वाटायची त्याला, आता काही नाही.… काय करायचे.",
"बघू… संध्याकाळी येतील ना ते. तेव्हा विचारू काय ते. ",
" चल, मी पुणेला चाललो आहे, तू भेट त्यांना. काय बोलले ते सांग.",
" पुण्याला कशाला …. ? ",
" अरे ती केस, बेवारस प्रेत… माझी केस नसली तरी, केस interesting आहे.",
"काय एवढं त्यात?", महेश खाली बसला सांगायला. 
" मी पुण्याला गेलेलो , काही काम होता म्हणून. तर माझा मित्र आहे ना… आनंद, तर त्याने मला बोलावलं होतं. एक प्रेत सापडलं होतं, अंगावर एकही कपडा नाही, त्याची ओळख कशी पटणार, चेहरा नीट होता म्हणून. परंतु तो पुण्यातला नाही हे स्पष्ट आहे. कारण त्या दिवसात कोणीच हरवल्याची तक्रार नाही. पूर्ण पुण्यातील पोलिस चौकीत त्याचा फोटो पाठवला होता. तरी त्याची काही ओळख नाही. शिवाय, काही दिवसा आधी एक गाडी देखील सापडली. तिचा नंबर सोलापूरचा आहे. कमाल आहे ना अगदी." 


" सोलापूर ? …. सोलापूरची गाडी पुण्याला… चोरून आणली असेल." ,
" असेल " महेश म्हणाला. 
" ठीक आहे, तू जाऊन ये पुण्याला." अभि म्हणाला. 
महेश निघाला आणि अभि पुन्हा " कोमल" च्या केस मध्ये डोकं घालू लागला. संध्याकाळी मिस्टर सावंत आणि काजल, पोलिस स्टेशनमध्ये आले. अभि त्यांचीच वाट बघत होता. 
" या… मिस्टर सावंत, खूप दिवसांनी आलात.",
"हो… जरा बिझी होतो ना ऑफिसच्या कामात. म्हणून जमलं नाही." , 
" आणि या काजल… या कूठे होत्या ?", अभि काजलकडे पाहत म्हणाला.
" मी… मी गोव्याच्या ऑफिसला होते." अभि संशयी नजरेने काजलकडे पाहू लागला. 
" तुम्हाला सांगितलं होता ना, केस संपेपर्यंत शहर सोडून जायचे नाही.",
" अहो… पण ऑफिसचं काम…. ",
"बर… बर, ठीक आहे." काजलच वाक्य मधेच तोडत अभी बोलला. 
" मी पण जरा दुसऱ्या कामात बिझी होतो, तर आता पुन्हा चौकशी सुरु करणार आहे.… ह्म्म्म… कोमल सावंत… ती हरवली नाही तर तिचे कोणीतरी अपहरण केलं आहे. हे तुम्हालाही कळलं असेल." दोघांनीही होकारार्थी मान हलवली.
" तर तुमचा कोणावर संशय आहे का ? किंवा तिचे कोणी शत्रू वगैरे…. कोणाबरोबर भांडण …आणि तुम्हाला कोणाचा फोन आलेला का… पैशांसाठी…", 
" नाही inspector … कोणताच फोन आला नाही…. तशी कोमल जरा short tempered होती. राग लवकर येतो तिला. हल्ली दोन भांडणे झाली तिची. " ,
" कोणाबरोबर… " ,
"एक ऑफिसमधला होता, दिपेश नावाचा. आणि दुसरा अमित, त्यांच्या ग्रुप मधला. दिपेशवर आम्ही केस केली होती. त्याला एक दिवस ठेवलं होतं पोलिस स्टेशनमध्ये. आणि अमित, तर असाच एकतर्फी प्रेम करायचा तिच्यावर, म्हणून भांडण झालं होते." अभिने दोघांचे पत्ते घेतले, सावंत आणि काजलला घरी जाण्यास सांगितले. 

          दिपेशचं घर जवळच होते, पहिला अभि तिथेच गेला. घराला कुलूप. शेजारी विचारपूस केली तेव्हा कळलं कि आई-वडिलांना दोन आठवड्याआधीच गावाला पाठवलं त्याने. शिवाय ५ दिवसापासून तोही गायब आहे. अभिला यात गडबड वाटली. त्याचा फोटो मिळवण्यासाठी तो ऑफिसमध्ये गेला. दिपेशची चौकशीही केली. सगळी माहिती गोळा करून तो आता अमितकडे निघाला.

" Hi, मी inspector अभिषेक… अमित इथेच राहतो ना. " अभिने दरवाजा उघडल्या उघडल्या प्रश्न विचारला. अमितची आई समोर होती.
" हो… अमित इथेच राहतो. any problem inspector ?," 
" मी आत येऊ का… जरा चौकशी करायची होती.",
" या आत…" अमितच्या आईने त्याला घरात घेतलं. 
" हा… बोला inspector, काय विचारायचे आहे. आणि कश्याबद्दल… " ,
" अमित आहे का घरात ?",
" नाही… तो मुंबईत नाही, पण तो कशाला हवा आहे तुम्हाला. " अभि त्यांच्याकडे बघत राहिला. 
" तुमची family आणि सावंतांची family…. खूप close relation मध्ये आहात ना… " अभिने त्यांना विचारलं. 
" हो… अमितचे वडील आणि मिस्टर सावंत हे business friends आहेत ना म्हणून, मिसेस सावंत, त्यांच्या मुली, मिस्टर सावंत… याचे जेणे-जाणे असते आमच्याकडे.",
"मग तुम्हाला कोमल बाबत माहित असेल, खर कारण… " ,
" हो कळलं मला, पण तुम्हाला अमित का हवा आहे.,",
" चौकशी…. अमितचं भांडण झालं होतं ना, कोमल बरोबर.…. एकतर्फी प्रेम… माहित आहे ना तुम्हाला. " ते ऐकून त्यांची मान खाली झुकली.
" त्यासाठी आलो आहे मी, अमित कूठे आहे आता ? ",
"अमित मुंबईत नसतो तेव्हापासून… सोलापूरला आमचे एक ऑफिस आहे, तिथे असतो तो.",
"म्हणजे मुंबईत येतंच नाही का कधी." ,
" येतो पण कधी कधी… " ,
" शेवटचा कधी आला होता ? ", 
" एक महिना झाला असेल. ",म्हणजे कोमल हरवण्याच्या खूप आधीपासून अमित मुंबईत नाही. शिवाय कोमल सोलापूर स्टेशनला दिसली होती. अमितचे ऑफिस सोलापूरला आहे. दोघांचा काही संबंध आहे का… " अमित call तर करत असेल ना… ",
"नाही…फोनसुद्धा करत नाही.",
" Last call कधी आला होता…. ",
" तेव्हाच… एक महिन्यापूर्वी…. सोलापूरला पोहोचला तेव्हा call केला होता. नंतर नाही. " अभि चक्रावून गेला.
" म्हणजे तुम्हाला काहीच वाटतं नाही, तो call करत नाही, इकडे नसतो त्याचं. " त्या गप्प झाल्या. थोड्यावेळाने बोलल्या. 
" तो आधीपासून असाच आहे. आमच्याबरोबर जास्त बोलत नाही तो. त्यात कोमलच प्रकरण झालं. अमित आधीपासून सोलापूरला जायचा. पण आठवड्याने मुंबईला यायचा. त्या भांडणानंतर तो मुंबईत नसतोच जवळपास…. आम्ही त्याला काही बोलत नाही, बिझनेसमध्ये लक्ष देतो तेच खूप आहे आमच्यासाठी." अभिने अमितचा फोटो घेतला, सोलापूरच्या ऑफिसचा पत्ता घेतला आणि तसाच घरी आला. 

              दोन दिवसांनी महेश मुंबईत परतला. थेट अभिषेकला भेटायला गेला." काय मग, inspector महेश, काय चाललंय ? " अभि जरा विचारात होता. महेशने ओळखलं,
" काय झालं रे ? ",
"काही नाही , जरा tension आले आहे या केसचे… ", 
" क्या हुआ ? ", अभिने सगळी जमलेली माहिती महेश समोर ठेवली. 
" हे बघ, कोमल हरवून म्हणजेच अपहरण होऊन एक आठवडा झाला आता. त्यांच्या घरी कोणालाच tension नाही. ते दोघे, बाप आणि त्याची पोरगी…. त्यांना सांगून सुद्धा मुंबई बाहेर गेले, ऑफिसच्या कामासाठी. तिथे अमित एका महिन्यापूर्वी सोलापूरला गेला आहे. तो काय करतो, याचं त्याच्या आई-वडिलांना काही नाही. राहुल तर विचारत सुद्धा नाही कोमलबाबत आणि कोमल……. ती कूठे आहे अजून त्याचा पत्ता नाही लागत अजून, डोकं फिरलं आहे माझं. " अभि डोक्याला हात लावून बसला होता. थोडयावेळाने तोच बोलला," तुझं सांग, काय झालं त्या केसचं…?",
" हा. ती केस ना, ती dead body भेटली होती ना, ओळख तर पटली नाही, पण त्याचा खून झालेला नक्की. गोळी लागली आहे त्याला. शिवाय एका महिन्यापूर्वीचे प्रेत आहे ते." ,
"म्हणजे कोणालाच कळले नाही एवढे दिवस.",
"अरे प्रेत जंगलात सापडलं… त्याच्या अंगावरचे कपडे कूठे गेले माहित नाही… चोराचे काम असेल कदाचित.",
"आणि ती कार भेटली होती ती. ",
"तिचे काही माहित नाही मला." तेव्हा अभिला काही आठवलं. 

"पाटील…. तुम्हाला काही काम सांगितलं होतं, केलंत का. ", अभिने आवाज दिला. 
" हो सर, त्यांना ११ वाजता बोलावलं आहे येतील इतक्यात.", महेश अभिकडे पाहू लागला,
" काय…?",
" कोमलचे bank statement चेक केला, दोन दिवसापूर्वीच तिच्या account मध्ये कोणीतरी ४००० जमा केले. आता ती तर ते account , use करत नाही किंवा तिची family सुद्धा नाही. म्हणून मी बँककडे चौकशी केली असता ते पैसे कोणीतरी बंगलोर मधून transfer केले आहेत.",
"Interesting !!!!! " ,
" तेव्हा पाटीलला सांगितलं होतं, तपास कर म्हणून." 
ते पैसे एका account मधून net banking ने direct transfer केले होते. त्यामुळे ज्या account मधून पैसे आले होते त्याची माहिती लगेच मिळाली. कोणी निलिमा नावाच्या स्त्रीचे ते account होते. त्यांना contact केला असता त्या बंगलोरला होत्या. तर त्यांना मुंबईत बोलावून घेतले अभिषेकने. 

बरोबर ११ वाजता मिस निलिमा आल्या ." Hello inspector, मी मिस निलिमा, sub inspector पाटील यांनी, तुम्ही भेटायला बोलावलं असं सांगितलं. म्हणून आले आहे मी.",
" हो… हो, please seat. " अभिने प्रथम साधी चौकशी सुरु केली. " तुम्ही मराठी छान बोलता, बंगलोरच्या वाटत नाही तुम्ही." , 
" मी मुंबईला राहते, बंगलोरला माझी आजी असते.",
"अस आहे तर…. बर मग, तुमची आणि कोमलची ओळख कशी ? ", direct प्रश्न… 
"कोमल कोण ? ",
"कोमल सावंत, तुम्ही ओळखता ना तिला… ", निलिमाने " नाही" म्हणून मान हलवली. 
" तुम्ही ओळखत नाही, मग तिच्या account मध्ये तुम्ही पैसे कसे deposit केले ? ", निलिमाच्या चेहऱ्यावर मोठ्ठ प्रश्नचिन्ह. सरते शेवटी, अभिने कोमलचं bank statement दाखवलं. आणि तेव्हा नीलिमाला click झालं. 

" या होय… ओळखलं मी…. हो मीच ४००० deposit केले.",
"प्रथम तर ओळखलं नाही तुम्ही कोमलला." ,
" हो, मी ओळखलंचं  नाही तिला.",
"नक्की काय म्हणायचे आहे तुम्हाला. कोमल तुमच्या ओळखीची नाही,तरी तिच्या account मध्ये ४००० जमा केलेत, पैसे जास्त झालेत का ?",
"तसं नाही काही, तिने मला मदत केली होती म्हणून. ",
" जरा सविस्तर सांगा.आणि पाटील यांचे statement लिहून घ्या.… हम्म, बोला आता. " ,
"त्या दिवशी, माझी आजी खूप आजारी होती. त्यामुळे मला urgent जायचे होते तिला भेटायला. ऐनवेळी विमानाचे तिकीट मिळत नाही. तरी मी try केलं खूप. emergency ticket सुद्धा नव्हती. खूप विनवण्या केल्या मी, ticket counter वर. त्यांनी ऐकलाच नाही. त्यावेळेस कोमल माझ्या मागे उभी होती. तिने विचारलं मला, मी सांगितलं तसा तिने तिचे तिकीट मला दिले. तिच्या तिकिटावर मी बंगलोरला गेले. जाताना मी तिचा bank account number घेतला होता. तिकिटाचे पैसे परत देण्यासाठी." अभिने सगळं ऐकून घेतलं. म्हणजे कोमल बंगलोरला गेलीच नाही. तिच्या ऐवजी निलिमा गेली. त्यामुळे बंगलोर विमानतळाच्या passenger list मध्ये कोमलचच नाव आहे. एका ठिकाणाचा सुगावा तर लागला. तरी दोन ठिकाण बाकी आहेत अजून, अभि मनातल्या मनात विचार करत होता. 
" ठीक आहे. मिस निलिमा , thanks, तुम्ही आल्याबद्दल. तुमचा फोन नंबर आणि पत्ताही देऊन जा जाताना… " 

             संध्याकाळी महेश आला. त्यांला अभिने सगळी माहिती दिली. " याचा अर्थ, कि कोमल definitely सोलापूरला गेली होती. आणि त्या रेल्वे पोलिसांच्या बोलण्यानुसार, ती तक्रार नोंदवून बंगलोरच्या दिशेने निघाली होती." महेश म्हणाला. 
" तरी गोव्याची mystery तशीच आहे अजून." अभि बोलला. 
" सुटेल रे ती पण हळूहळू.…. बरं , दिपेशचा काही पत्ता…. ",
"हो, लागेल पत्ता त्याचा. mobile track करायला सांगितला आहे , दोघांचा.… दिपेश आणि अमितचा. " ,
"अमित तर सोलापूरला आहे ना, मग त्याचा का. ",
" असंच , त्याच्यावर सुद्धा संशय आहे ना माझा. एका महिन्यापूर्वी त्याने त्याच्या घरी contact केला होता, त्या नंतर एकदाही मुंबईत आला नाही किंवा call केला नाही." ,
"interesting आहे ना अमित, बघू त्याचा फोटो, कसा दिसतो ते… " अमितचा फोटो पाहिल्यावर महेश उडालाच. " अरे… अभि, पुण्यात याचीच तर dead body सापडली आहे." ,
" काय… ? तू शुद्धीवर आहेस ना महेश." अभि म्हणाला. 
" हो रे, definitely हाच आहे तो. थांब. " म्हणत महेश त्याची bag आणायला गेला. Bag मधून त्याने पुण्याच्या केसचे पेपर्स आणि फोटोस काढले. अभिने ते फोटो लगेच ओळखले, अमित होता तो. अमितचा खून झाला आहे… या विचाराने अभिचे डोके चक्रावून गेले. 

" हा नक्की अमित आहे आणि तू म्हणतोस, एका महिन्यापूर्वी त्याचा खून झाला आहे. म्हणजे अमित मुंबईहून सोलापूर गेला तेव्हाच त्याचा खून झाला आणि त्यामुळेच अमित महिनाभर मुंबईत आला नाही कि call केला नाही. शिवाय त्याच्या घरीसुद्धा माहित नाही." अभि म्हणाला.
" त्याच्या घरी कळवूया का आता. ? " महेश.
" कळवायला तर हवे. पण एक गोष्ट कळत नाही, त्याची आई तर बोलली कि तो सोलापूरला गेला, मग… त्याची dead body पुण्यात कशी. ?" दोघांनाही प्रश्न पडला. अजून काही माहिती गोळा करून अभिने, अमितच्या घरी कळवलं. दुःखाचा डोंगर कोसळला त्यांच्यावर. एवढया मोठ्या मुलाचा खून झाला, यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. पुण्याला जाऊन त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली. अमितच होता तो. खरंच खूप वाईट झालं होतं. एव्हाना मिडियामध्ये हि news पसरली होती. 

" एक केस होती, त्यात आता दुसरी केस सुरु झाली." अभि वैतागून म्हणाला.
" पण तो पुण्याला गेला का… काहीच कळत नाही. बरं , त्याच्या शरीरातून जी गोळी काढली, त्याची काही माहिती, ज्या गनमधून गोळी झाडली ती गन भेटली का ?",
" नाही. त्याबाबत काही माहिती नाही. पण मला वाटते ती गाडी भेटली ना , तिचा काही संबंध असेल का… कारण ती गाडी सोलापूर मधली आहे. आणि अमितचं ऑफिस सोलापूरला आहे… बरोबर ना." ,
" yes… नक्कीच ती अमितची गाडी असेल. मला वाटते आपण पुण्यात चौकशी करू. कोणीतरी पाहिली असेलच ती कार… तिथून मग सोलापूरला जाऊ, चालेल ना." म्हणत अभिने पुण्याला जायची तयारी केली. पुण्यात पोहोचून त्यांना तशी काही माहिती नाही मिळाली, परंतू सोलापूरला चौकशी केली तेव्हा वेगळीच माहिती समोर आली. 

" मला वाटते, मिसेस सावंतांना इकडेच बोलावून घेऊ. "महेशने विचार मांडला.
" नको… मुंबईत भेटू त्यांना." अभिने मुंबईत आल्या आल्या मिस्टर आणि मिसेस सावंत यांना बोलावून घेतले. 
" Hello inspector, काही माहिती मिळाली का , कोमलची. ",
" नाही, actually… मी मिसेस सावंतांना बोलावले होते, पण तुम्हाला सुद्धा कळावे म्हणून बोलावलं. " तेवढयात महेशसुद्धा आला 
" Direct विचारतो, अमितचा खून झाला हे माहित आहे ना तुम्हाला. ",
"हो… ",
" त्याचा खून एक महिन्यापूर्वी झाला, हे सुद्धा माहित असेल मग.",
" हो inspector ",
"मग ज्या दिवशी खून झाला, त्यादिवशी तुम्ही अमितला भेटायला का गेला होतात…. मिसेस सावंत… " या प्रश्नावर मिसेस सावंत अभिकडे पाहू लागल्या आणि मिस्टर सावंत त्यांच्याकडे.
" Inspector, तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे, मी कधी गेलीच नाही सोलापूरला. " मिसेस सावंत अडखळत बोलल्या. अभि त्यांच्याकडे शांतपणे पाहत होता. 
" पण मी, तुम्ही सोलापूरला गेला होतात असं कूठे म्हणालो.… बरोबर ना मिसेस सावंत." आता त्यांच्याकडे काहीच नव्हते बोलण्यासारखं, त्या गप्प बसून राहिल्या.
 "बोला मिसेस सावंत, अमित त्याच्या ऑफिसमधून ज्या दिवशी शेवटचा गेला होता, त्या दिवशी तुम्हीच त्याच्या ऑफिसमध्ये गेला होतात ना, तुमचा फोटो ओळखला तिथल्या कर्मचाऱ्यांनी. शिवाय अमितच्या mobile वर शेवटाचा call तुमचाचं होता… कारण त्या दिवसानंतर अमितचा मोबाईल बंद आहे. म्हणजेच तुम्हीच त्याला भेटलेल्या शेवटच्या व्यक्ती आहात. तुम्ही खून केलात अमितचा… ",
" नाही. " इतका वेळ शांत असलेल्या मिसेस सावंत ओरडल्या. " मी नाही मारलं अमितला…. आणि मला माहित नाही कोणी मारलं ते. " 

मिस्टर सावंत तर नुसतेच ऐकत होते." तर मग तुम्ही त्याला का भेटायला गेला होता ? " ,
"कोमल विषयी बोलायला. ",
" पूर्ण गोष्ट सांगा. ",
"अमितचे प्रेम होते कोमलवर. पण कोमलचं लग्न ठरलं होतं. अमितला ते मान्य नव्हतं. शिवाय त्याचा राग होता दोघांवर, कोमल आणि राहुलवर. तो ते लग्न होऊ देणार नव्हता.हे त्याने मला सांगितलं होते एकदा. म्हणून तो letter's पाठवायचा अमित.",
"म्हणजे…तुला माहित होतं, अमित letter's पाठवायचा ते. " मिस्टर सावंत. 
" हो…. मी पाहिलं होतं एकदा अमितला तसं करताना, तसं त्याला मी सांगितलंही, कि हे बंद कर… पण तो ऐकायला तयार नव्हता.",
"म्हणून तुम्ही त्याचा खून केलात." महेश बोलला. 
"नाही … मी नाही खून केला त्याचा. जेव्हा त्याने मला फोन करून बोलावलं तेव्हा मी त्याला भेटायला गेले. त्याला काहीतरी सांगायचे होते मला म्हणून. ",
"काय सांगायचे होते.? ",
"माहित नाही. त्या दिवसा आधी, दोन दिवस आधी मला त्याचा फोन आला होता कि मला कोमल बद्दल काही माहिती मिळाली आहे, मला सोलापूरला भेटायला या. नाहीतर मी मिडियामध्ये "ती" बातमी देईन. असं म्हणाला तो. त्यासाठी मी त्याला भेटायला गेली होती. ",
"किती वाजता? ",
" सकाळी ११ वाजता. त्याला भेटले होते मी." ,
" आणि काय बोलणे झाले तुमचे.",
"जास्त नाही बोलला तो. काही सांगणार होता. पण एक urgent मीटिंग ठरली त्याची तसा तो निघून गेला. मुंबईत आलो कि बोलू असा म्हणाला. दोन दिवसांनी येणार होता तो मुंबईत. आलाच नाही. आणि आता ही news आली." अभिने सगळे ऐकून घेतलं. त्यांचे सगळे बोलणे रेकॉर्ड करून घेतलं महेशने. 

ते दोघे घरी गेले आणि इकडे अभि , महेशची चर्चा सुरु झाली. " मला वाटते , या सगळ्या Family मध्ये गडबड आहे, काजल सोडली तर.… ",
"तिला का सोडायचं… ",
"तिचं जरा बरी वाटते यांच्यात. कोणामध्ये कधी नसतेच ती. ",
" असो, आता काय",
"या सगळ्यावर आपल्याला आता नजर ठेवावी लागेल. कारण अमितला नक्कीच काहीतरी माहित होते,म्हणून त्याचा खून झाला." अभि . 
" तसं असेलही. पण मिसेस सावंतानी खून केला असा अर्थ होतं नाही ना." महेश बोलला. 
" एक गोष्ट मिस केलीस अभि, मिसेस सावंत सांगत होत्या, ते letter अमित पाठवायचा. अमितचा एक महिन्यापूर्वी खून झाला, कोमल kidnap होऊन २ आठवडे झाले.मधल्या २ आठवडयातसुद्धा कोमलला तशी अजून ३ letter's आली. जर अमितचा खून झाला होता तर नंतरची ३ letters कोणी पाठवली." अभिच्या लक्षात आली ती गोष्ट.
" means… ती पत्र कोणी वेगळीच व्यक्ती पाठवायची… असंच म्हणायचे आहे ना तुला." महेशने होकारार्थी मान हलवली. अभि विचार करू लागला. 
" मला वाटते, या सगळ्याची history काढावी लागेल. " मिस्टर सावंत मोठे businessman होते, त्यांची सगळी माहिती काढणे सोप्पे होते. अभिने काही जणांची टीम बनवली आणि ज्यांच्यावर संशय होता त्या सर्वांची माहिती गोळा करायला सांगितली. तो स्वतः बंगलोर ऑफिसला गेला. 

            अजून काही दिवस गेले, अभिने बरीच माहिती गोळा केली होती. पुढच्या चौकशीसाठी त्याने काजलला बोलावून घेतलं. काजल तशी उशीरच आली. 
" या बसा… ","Sorry हा… जरा उशीर झाला.",
"तुम्ही सगळीकडे वेळेच्या आधी पोहोचता ना, असं ऐकलं आहे मी." त्यावर काजल आश्चर्यचकित झाली. 
" means ? काय म्हणायचे आहे तुम्हाला… ",
"नाही… तुम्ही ऑफिसमध्ये किंवा कूठे मिटिंग असेल तर १० - १५ मिनिटे आधी पोहोचता ना म्हणून बोललो." त्यावर काजल जरा relax झाली. 
" तसं होय.…. हो, मला सवय आहे लवकर जायची… बरं, तुम्ही कशाला बोलावलं ? ",
"हा… कोमल बद्दल विचारपूस करायची होती. ",
"काय विचारायचे होते?",
"कोमल बरोबर शेवटचं बोलणं झालं तेव्हा ती काही बोलली होती का तुम्हाला…. I mean, कोणी त्रास देते आहे वैगरे असा काही… ". काजल विचार करू लागली. खूप वेळाने बोलली ती." तसं काही बोलली नाही ती." अभिसुद्धा विचार करत होता. 
" मग तुम्हाला काय वाटते मिस काजल…. कोण असेल या kidnap च्या मागे.? ",
" ते मी कसं सांगू… ती तशी बिनधास्त रहायची नेहमी. कदाचित ट्रेनमध्ये कोणी तिच्या सामानावर नजर ठेवून हे सगळं केलं असेल. फक्त ती सुखरूप असू दे.",
"हं… thanks… मिस काजल. आम्ही कळवू काही सापडलं तर… तुम्ही येऊ शकता आता. " काजल निघून गेली. 

             आणखी ३ दिवस गेले. खूप काही माहिती मिळाली होती. खूप गोष्टी समोर आल्या. महेश सांगत होता ते अगदी बरोबर होते. मिस्टर सावंत यांच्यावर बंगलोरला केस चालू होती. परंतु त्यात त्यांच्या business partner ला पुराव्या अभावी सोडण्यात आलं होते. आणि तो business partner होता, राहुल.… होय, कोमलचा होणारा नवरा , राहुल…. त्याच्या विरोधात काही सापडलं नाही.पण त्याचा business पार बुडाला. इकडे दिपेशच्या mobile ची लास्ट लोकेशन गोवा हीच होती. साहजिकच त्याने नंबर बदलला असण्याची शक्यता होती. त्याचा तपास सुरु होता. आता गोवा ऑफिसला जाऊन काही मिळते का ते बघू म्हणून अभि, महेश सोबत गोवाला गेला. काजलच्या flat वर पोहोचले, काजल अर्थात मुंबईला होती. flat एकदम शानदार होता. एका व्यक्तीसाठी तो खूपच मोठा होता. तिथे त्यांनी तपास सुरु केला. घरात २ गाड्या. 
" काजल madam इकडे एकटीच राहते ना." त्यांनी तिथे कामावर असलेल्या नोकराला विचारले. 
"हो साहेब, एकट्याच राहतात madam……. आणि कधी कधी त्यांचे एक मित्र येऊन राहतात." त्यावर अभिची नजर चमकली. 
" मित्र…. कोण ? ",
"अमित सर येऊन राहतात कधी कधी. ",
"अमित ? ", महेशने लगेच त्याला अमितचा फोटो दाखवला. 
" हेच का अमित सर …. " त्याने फोटो ओळखला. " हो… हेच येतात कधी कधी.",
"अजून कोण कोण येते इथे… ? " नोकर जरा गोंधळला. त्यावर ,महेशने bag मधून काही फोटो काढून दाखवले. त्यातले आणखी काही फोटो त्याने ओळखले. 


              अभि आणि महेशला खूप महत्त्वाची माहिती त्या नोकराने दिली. केस जवळपास solve होत होती. आता दिपेश हाती लागणं गरजेचे होते. दोघे बोलत बोलत flat च्या बाहेर आले. महेशची नजर तिथे उभ्या असलेल्या कारवर गेली. दोन कार… ह्म्म्म……. महेश काहीतरी विचार करू लागला." Watchman !! " महेशने हाक मारली. 
" जी साहेब. ",
"काजल madamच्या गाडया आहेत ना दोन्ही. ",
"हो… त्यांच्याच आहेत, त्याचं वापरतात." ,
"आणि driver असेल ना… तो कूठे आहे आता. ",
" Driver होता साहेब… काजल madam बरोबर भांडण झाला म्हणून त्याला काढून टाकलं. ",
"ok… किती दिवस झाले ? ",
"दिवस नाही… ३ महिने झाले." अभि ते ऐकत होता. महेशने अभिकडे पाहिलं. महेशला काय म्हणायचे आहे ते कळलं अभिला. अजून काही विचारपूस करून दोघे निघाले. गोव्यालाच सावंतांचे कोणीतरी नातेवाईक राहतात अशी माहिती अभिकडे होती. त्यांना भेटायला ते गेले. 

" नमस्कार…. मी inspector अभिषेक आणि हा माझा मित्र Doctor महेश…. मी तुम्हाला call केलेला भेटण्यासाठी… ",
"हो… हो, आठवलं… या inspector, आत या." म्हणत आजींनी दोघांना घरात घेतलं. 
" काही माहिती हवी होती, सावंत कुटुंबाबद्दल.… तुम्हाला तर माहित असेल ना सध्या काय चालू आहे ते… कोमल बद्दल. " त्यावर आजी काही बोलल्या नाहीत. 
"तुमचं आणि त्यांचं काय नाते आहे, actually.",
" काजलची आजी आहे मी. सुगंधा ( मिसेस सावंत ) माझी मुलगी. ",
"ओहह… असं आहे तर. पण तुम्ही गोव्याच्या आणि सावंत मुंबईचे. मग ओळख कशी ? ",
" सावंत हे मूळचे गोव्याचेचं. नंतर त्यांनी आपले सगळे मुंबईला हलवलं. आणि तिथे स्थायिक झाले." अभि आणि आजी गप्पा मारत होते, तर महेश सगळ्या घरात नजर फिरवत होता. घर तसं नेटकं होतं. एका कोपऱ्यात काही फोटोज होते. महेश ते पाहण्यासाठी म्हणून गेला. १०-१२ फोटो होते. 

थोडयावेळाने आजीही आल्या फोटो बघायला. " हे फोटोज… ?", महेशने प्रश्न विचारला. 
" काजलचा जन्म इकडचा… गोव्याचा. ती इथेच होती, दीड वर्षाची होईपर्यंत. " आजी खूप आनंदाने सांगत होत्या. महेशला प्रश्न पडला. 
" आजी… कोमल मोठी कि काजल… ? ",
"कोमल मोठी. ",
"मग तिच्या मित्रांनी सांगितलं कि ती काजलला ताई म्हणून हाक मारायची.".
"ती अशीच… मस्करी करायची. कोमल मोठी आहे ४ महिन्यांनी.",
" ४ वर्षांनी म्हणायचे आहे का तुम्हाला ?",
"नाही, ४ महिने. "…. ४ महिने….  कसं शक्य आहे…. अभि, महेश कडे पाहू लागला. महेशच बोलला मग,
" ठीक आहे आजी. ४ महिने ना ठीक आहे. तरी सुद्धा या सगळ्या फोटोजमध्ये फक्त एकचं लहान मुल आहे.",
" काजल आहे ती. " आजी बोलल्या.
" शिवाय, मघाशी तुम्ही स्वतःची ओळख करताना "काजलची आजी" असं म्हणालात. मग मला सांगा , कोमल का नाही या फोटो मध्ये ? ",
" कारण कोमल माझी नात नाही, काजलचं आहे. " कहानी में twist. 
" मग कोमल….  कोण आहे ? ",
"माहित नाही… सुगंधा(मिसेस सावंत ) एकदा कोमलला घेऊन आली अचानक, म्हणाली रस्त्यावर कोणीतरी सोडून दिले होते. तेव्हा कोमल असेल दीड वर्षाची. ",
"मग तुम्हाला कसं माहित. कि ती ४ महिन्यांनी मोठी आहे ते.",
"सुगंधाने सांगितलं. कोमल जशी आली , त्यानंतर ३-४ दिवसातच ते मुंबईला गेले,ते आजपर्यंत. त्यानंतर सुगंधा एकदाही आली नाही मला भेटायला गोव्याला. मीच जायचे कधी कधी मुंबईत. आता वय झालं तर जमत नाही प्रवास. फोनवरचं बोलणं होते. काजल येते कधी कधी, कोमल एकदाही आली नाही.म्हणून मला कोमल आवडत नाही, काजलचं नात माझी." अभि आणि महेश निघाले. बाहेर जाऊन चहा घेतला दोघांनी. 
" मला वाटते , अजून काही दिवस जर थांबलो ना इथे तर खूप काही मिळेल मला. तू जा मुंबईला. " आणि महेश मुंबईला आला. 

       पुढच्या दोन दिवसात दिपेशला सापळा लावून पकडण्यात आले. त्याकडून खूप मोठी माहिती मिळाली. महेश तर आधीच मुंबईला आला होता, केस संपल्यात जमा होती. सगळी माहिती गोळा करून अभि , दिपेश आणि त्याची टीम मुंबईला पोहोचले. आल्या आल्या महेशने अभिवर प्रश्नाचा भडीमार केला. 
" अरे… थांब थांब… किती प्रश्न… ",
"अरे साल्या… किती उस्तुकता लागून राहिली आहे मला… आणि कोमल भेटली का…. कोणी kidnap केलं तिला, दिपेशने ना…. कि कोणी दुसरा होता… ", अभिने हातानेच महेशला "थांब" अशी खुण केली. आणि मिस्टर सावंत यांना call केला. 
" Hello… मिस्टर सावंत… मला भेटायचे आहे तुम्हाला… ",
" कोमल भेटली का तुम्हाला ? ",
"भेटेल पण तुम्हाला भेटायचे आहे… ",
" कधी येऊ मी पोलिस स्टेशनमध्ये… ",
" नको… मी येतो तुमच्या घरी… मी काही नावे सांगतो, त्यांनाही उद्या बोलावून घ्या. काही प्रश्नांची उत्तरे अजून नाही मिळाली. ती जाणून घ्यायची आहे. ok… मग उद्या भेटू." 

         ठरल्याप्रमाणे, अभिने ज्यांना ज्यांना बोलावलं होते, ते सगळे हजर होते. अभि बरोबर बरेचशे police sub inspector, ladies constable आल्या होत्या. 
" हे सगळे कशाला आले आहेत inspector ? ",
"यांची गरज लागू शकते कदाचित म्हणून… " तसे जमलेले सगळे उभे राहिले. अभिला जरा हसू आलं. हसू आवरत त्याने सगळ्यांना बसायला सांगितले. सगळेच घाबरले होते. अभिने सगळ्यावर एकदा नजर फिरवली. अभिने बोलायला सुरुवात केली. 
" OK, इकडे जमलेले सगळे , हे business field मधील मोठी नावं आहेत, corporate मध्ये सगळेच फ़ेमस आहेत.…. " सगळ्यांनी ते मान्य केलं,"तर जेव्हा मी कोमलच्या केस मध्ये गुंतलो होतो तेव्हा खूप गोष्टी समोर आल्या, त्यातल्या काही गोष्टी अजून सुटल्या नाहीत माझ्याकडून, म्हणून तुम्हा सगळ्यांना बोलावलं आहे. " आता सगळे एकमेकांकडे पाहू लागले. 

       " पहिले सगळे relax व्हा, मग मी सुरु करतो. " अभिने पुन्हा सगळ्याकडे एक नजर फिरवली. " ok, पहिला प्रश्न विचारतो… आणि खरी उत्तरे मी अपेक्षित करतो. कारण मी खूप माहिती मिळवली आहे. फक्त ती तुमच्याकडून आली तर जास्त बरं होईल." अभिने त्याच्या हातातली काही कागदपत्र तिथे असलेल्या टेबलावर ठेवली. " या एका केसमुळे खूप धावपळ झाली, आम्हा सगळ्यांचीचं… जणू काही आमच्यामध्येच स्पर्धा लागली होती. धावण्याची…. " अभि हसत म्हणाला. " चला… आता आपण सुद्धा एक खेळ खेळूया." सगळे अभिकडे पाहू लागले. 
" Inspector…. तुम्ही इथे कशाला बोलावलं आहे आम्हाला ? काय असेल ते स्पष्ट सांगा. खेळ वैगरे काय …. What is this… ? ", अमितचे वडील रागात म्हणाले. 
"शांत व्हा… मिस्टर पंडित… शांत व्हा." अभि बोलला. " तर सगळे तयार आहात का… चला सुरु करू खेळ. " अभि त्या टेबलापाशी आला. " हे पेपर्स आहेत ना… ते साधे पेपर्स नाही आहेत. इथे जमलेल्या काही लोकांचे arrest warrant आहेत… " ते ऐकून सगळेच अवाक झाले. " arrest warrant… ?" काजल बोलली.
 " हो… मिस काजल…. इकडे असलेल्या काही लोकांनी , कधी ना कधी, कोणता ना कोणता crime केला आहे. पण त्या वेळेस काही भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्यांमुळे त्या केसेस तश्याच राहिल्या किंवा पुढे गेल्याच नाहीत. त्या केसेस मी पुन्हा open केल्या. आणि आता त्यांची arrest warrant आणली आहेत, संपूर्ण माहिती सहित." अभिने काजलकडे पाहिलं. 
" मिस काजल, तुम्हीच पहिलं arrest warrant कोणाचे आहे ते बघा. नावं मोठयाने वाचा प्लीज…" काजलने पुढे होईन एक पेपर उचलला. नाव बघून चेहरा पांढरा पडला. 
" आई… तुझं नाव आहे. " मिसेस सावंत लगबगीने पुढे आल्या आणि त्यांनी पेपर्स बघितले. त्यांचं नाव होते… 
" मी… मी काय केलं आहे… मला का अटक… ? " 

अभिने त्यांना इशारा करून खुर्चीवर बसायला सांगितला.
" बसा… पहिला नंबर तुमचाच लागला, बरं झालं.",
" पण मी काय केले आहे.?" अभि त्यांच्या समोर येऊन बसला. 
" तुम्हाला २६ वर्षापूर्वीची गोष्ट आठवते का… तुमची कार… रात्र… अपघात….आठवलं का काही… " ते ऐकून मिसेस सावंत चलबिचल झाल्या. काही न बोलता त्या असंच कूठे तरी पाहू लागल्या. 
" ठीक आहे… कोमल तुमची मुलगी नाही ना… कूठे सापडली ती तुम्हाला… ?",
"रस्त्यात कोणीतरी सोडून दिलं होतं तिला.",
"हम्म… मग तुम्हाला कसं माहित कि ती ४ महिन्यांनी मोठी आहे, काजलपेक्षा… " पुन्हा चलबिचल…,पुन्हा गप्प. 
" रस्त्यावर सापडलेली तर तिचं birth certificate कसं… बोला मिसेस सावंत, मी सुरुवातीला सांगितलं कि माझ्याकडे पुरावे सुद्धा आहेत. आता गप्प बसून काही होणार नाही. बोला." ladies constable त्यांच्या शेजारी येऊन उभ्या राहिल्या. मिसेस सावंत रडू लागल्या. थोडयावेळाने रडू आवरून त्यांनी सांगायला सुरुवात केली.
"काजल तेव्हा १ वर्षाची होती. मी माझ्या आईकडे गोव्याला होते. काजलला आईकडे ठेवून मी जरा पाय मोकळे करायला बाहेर जायचे. त्यादिवशी असचं झालं, माझ्या मैत्रिणीकडे पार्टी होती. तिथून मी घरी परत येत असताना accident झाला होता. ",
"पण तू तर किती हळू चालवते कार आणि व्यवस्थित चालवतेस, तरीसुद्धा accident…. " मिस्टर सावंत मधेच बोलले. 
"Drink and Drive ची केस आहे मिस्टर सावंत… "अभिने माहिती पुरवली. काजल आता shock मध्ये होती. 
" तू ड्रिंक पण करतेस…. " मिसेस सावंत मान खाली करून बसल्या होत्या. 
" तेव्हा मी करायचे ड्रिंक… त्यादिवशी काजल एक वर्षाची झाली होती म्हणून मैत्रिणीनी जरा जास्त ड्रिंक दिलं मला. आणि रात्री घरी येताना, कंट्रोल गेला कारवरचा…. समोरून एक जोडपं जात होतं, त्यांना…. " आणि मिसेस सावंत थांबल्या बोलायच्या. 

सगळेच त्यांच्याकडे पाहत होते. अशीच घटना होती ती. " पण हि माहिती तुला कशी भेटली ? " महेशने विचारले. 
" तुला बोललो होतो ना, आणखी काही दिवस थांबलो तर खूप माहिती मिळेल. तू मुंबईला गेलास तेव्हा परत मी आजींकडे गेलो होतो. तिथेच मला कोमल आणि काजलची birth certificate मिळाली. त्यावरून मी कोमल ज्या हॉस्पिटल जन्माला आली तिथे गेलो. तिथे यांची माहिती मिळाली. यांनी कोमलला adopt केलं तेही तिथून कळलं. … मिसेस सावंत, अजून काही सांगता का… ? " त्यांनी बोलायला सुरुवात केली. 
" ते दोघेही खूप जखमी झाले होते. त्यांना तसंच गाडीत घेतलं आणि मीच admit केले. ते मिस्टर तेव्हाचं गेले होते. पण त्या बाई होत्या… त्यात कळलं कि त्या pregnant आहेत. लगेच operation केलं, मुलगी झाली होती पण त्या बाई वाचू शकल्या नाहीत. त्या मुलीला तसंच मग हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं. माझ्यावर केस झाली….  Drink and Drive ची …. मनुष्य वधाची. कोमलला नंतर अनाथश्रमात पाठवलं, गोव्यात केस होती माझी. त्या inspector ला तेव्हा १० लाख दिले होते, केस close करायला. तरी तो तयार होत नव्हता. आणखी १० लाख देऊन त्याचं तोंड बंद केलं, कोमलला बरोबर घेतलं. आणि मुंबईला आले, त्यानंतर पुन्हा गोव्याला कधी गेले नाही.",
" आणि मी ती केस re-open केली. तो inspector तर आता रिटायर झाला. पुन्हा सगळी माहिती गोळा केली आणि arrest warrant आणलं. तुमची केस संपली मिसेस सावंत. " त्या उठून बाजूला गेल्या. 
" मिसेस सावंत… जाता जाता एक नावं काढा अजून." त्यांनी एक पेपर उचलला. " मिस्टर सावंत… ? " त्यांनी आश्चर्याने बघितलं. 
" छान… चला तुमचा नंबर आहे. या बसा… ",
" काय…. मी कोणता गुन्हा केला… माझं नावं का ? ". 

" या बसा … सांगतो तुम्हाला." मिस्टर सावंत बसले.
" Thanks to महेश, मला हे कळलं ते महेशमुळे. त्याने आपला मोर्च्या आता मिस्टर सावंतकडे वळवला. 
" तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये खूप बिझी असता ना… नुकसान होऊ नये म्हणून… ", त्यांनी 'हो' म्हटलं.
" तर कोमल आता बंगलोर ऑफिसला जात नाही.मग तुम्ही का गेला नाहीत इतके दिवस, त्या ऑफिसला… आहे का उत्तर… ",
"प्लीज inspector… प्लीज. " मिस्टर सावंत विनवण्या करू लागले. 
अभिने नकारार्थी मान हलवली." २ वर्षापासून केस चालू आहे ना… smuggling ची…. बंगलोरमध्ये… बरोबर ना… ",
"हो… "
"त्यात अजून एक केस होती… मी सांगू कि तुम्ही सांगता…. " त्यांचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. 
" सांगा सावंत…. का खून केलात तुम्ही… तुमच्या manager चा…. का मारलं त्याला…",
"पप्पा !!! काय ऐकते आहे मी…" काजल बोलली. 
" हो… मी खून केला त्याचा…. कारण त्याच्याकडे खूप पुरावे होते माझ्या विरोधात…. तो मला black mail करत होता. आधीच त्याने माझ्याकडून २५ लाख घेतले होते.",
"म्हणून त्याचा खून केलात तुम्ही… आणि हि मर्डर केस दडपण्यासाठी त्या जजला पुन्हा २५ लाख दिलेत… किती बेशरेमीची गोष्ट आहे. पैशासाठी न्याय विकला जातो. लाज वाटते मला, आपण या न्याय व्यवस्थेचा भाग आहोत त्याचा." अभि उठून येरझाऱ्या घालू लागला. 
" मिस्टर सावंत…. त्या जजला तर मी अटक केली आहे. तुम्हाला… smuggling आणि मर्डर, अश्या दोन्हीसाठी अटक करावी लागेल मला." मिस्टर सावंत बाजूला जाऊ लागले. 
" तुम्हीही एक नाव काढा आता…" त्यांनी नावं वाचलं… "राहुल… ". राहुलकडे सगळे पाहू लागले. राहुलचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. 
" माझं नावं कसं… ? " राहुल पुढे येऊन म्हणाला. 

          अभिने स्वतः त्याला जबरदस्ती बसवलं खुर्चीवर. " तुझी सगळी history मी सांगतो.… राहुल…. हुशार मुलगा, स्वतः काहीतरी करून दाखवायचे होतं म्हणून बिझनेस सुरु केला, तो पैसे उसने घेऊन. त्यात नफा मिळाला पण साहेबांची स्वप्न मोठी… झटपट होण्यासाठी याने smuggling सुरु केलं. तेही मोठया व्यक्ती बरोबर… मिस्टर सावंत बरोबर… एका वर्षात खूप पैसे कमावले दोघांनी. पण जास्त काळ ते सुख अनुभवता आलं नाही. सावंत वर केस लागली त्या manager मुळे… याच्यावर सुद्धा केस होती. परंतु तेच लाच देणे… त्यामुळे राहुल सुटला. सावंत already मर्डर केससाठी पैसे देऊन बसले होते. ते अडकले यात. राहुल मोकळा… काय बरोबर ना राहुल… ".
"अगदी बरोबर inspector… मग आता का पकडलं आहे मला… तुमच्याकडे त्याबाबत कोणता पुरावा नाही आहे… मी निर्दोष आहे. " राहुल खुशीत बोलला. आणि उभा राहिला. 
" बस रे… अजून संपलं नाही माझं… पुन्हा राहुलने बिझनेस सुरु केला. तो एकटा तर सुरु करू शकत नाही , म्हणून वेगळा पार्टनर निवडला. I mean…. पार्टनर निवडली…. कोमल सावंत…. पुन्हा तेच डोक्यात smuggling …. यावेळी सगळं सुरक्षित वातावरणात…. कोकेनची smuggling…. " यावर राहुल गप्प झाला. " आम्ही खोलवर चौकशी केली… कोकेन सापडली आम्हाला… कोमल आणि राहुलच्या घरी तपास केला तिथे सापडली कोकेन… व्वा !!! राहुल सर …. खूप मोठ्ठ काम केलंत तुम्ही…. जा, बाजूला जाऊन उभा रहा. " अभि आता त्या टेबलाजवळ येऊन उभा राहिला. एकच arrest warrant राहिलं होतं आता, " चला… हे नावं मीच वाचतो आता… " अभिने नाव पाहिलं… " Mr. पंडित… " आता तर वेगळंच काहीतरी… 

" काहीतरी चुकते आहे तुमचे…. ",
"नाही सर… या बसा hot seat वर." अभिने त्यांच्या खांद्यावर हात टाकला आणि खुर्चीवर आणून बसवलं.
" पण मी कोणताच गुन्हा केला नाही… " मिस्टर पंडित म्हणाले. 
" ते मी सांगतो… तुम्ही tension घेऊ नका… " अभिने काही कागदपत्र काढली. 
" मी जेव्हा मिस्टर सावंतची केस study करत होतो तेव्हा असं कळलं कि राहुलने कोणाकडून तरी पैसे घेतले होते. आणि त्या बिझनेसमध्ये सुद्धा २५% ची भागीदारी होती. केसमध्ये सावंत पूर्ण अडकले होते. दुसरा पार्टनर राहुल , सुटला होता. त्यामुळे राहुलला पैसे देणारा कधी पुढे आलाच नाही. आता कळल सगळ्यांना , कोणी पैसे पुरवले ते." अभिने पंडित याच्या खांद्यावर हात ठेवला. ते घाबरेघुबरे झाले. " एका केसमधून अगदी सही सलामत बाहेर आल्यावर यांची हिंमत अजून वाढली. जेव्हा राहुलने नवीन smuggling सुरु केली तेव्हा सुद्धा यांनीच पैसे पुरवले, पण ५० % भागीदारीवर. तेही नाव पुढे न आणता… आता हि सगळी माहिती मला राहुलच्या ऑफिसमधून कळली…. तर सांगायचा मुद्द्दा असा कि तेव्हा सुटलात तुम्ही… आता केस माझ्याकडे आहेत… आता बघतो मी एकेकाला… " म्हणत तो स्वतः खुर्चीवर बसला. 

            शांतता… चार जणाविरुद्ध arrest warrant होतं. ते सगळे मान खाली घालून उभे होते. अभि सगळ्याकडे पाहत होता. काजल रडत होती. महेश अजूनही अभिकडे पाहत होता. " कसं ना…. सगळेच गुंतले आहेत crime मध्ये…. एखाद्या movie सारखं झालं… मी आता हल्लीच एक movie बघितला होता मी. त्यातसुद्धा असंच दाखवलं होतं, सर्व लोकांना एकत्र बोलावून सगळ्यासमोर आरोपीला आणायचे. मला असंच करायचे होते एकदा. तरी एवढया लवकर संधी येईल अस वाटलं नव्हतं मला.… मस्त एकदम. " अभि स्वतःच हसत होता. बराच वेळ महेश, अभिकडे पाहत होता. त्याने न राहवून अभिला विचारलं,
" अरे पण, आपली main केस राहिली ना… कोमल कूठे आहे… ",
"हो रे… ते विसरलो मी…. सांगतो. चल सगळ्यांनी बसून घ्या. आता एक नवीन movie सुरु होते आहे. " वातावरण गंभीर होतं. त्यात अभि काय काय बोलत होता. " ok…. sorry, जरा गंभीर होतो मी पण." आता सगळ्याचे लक्ष अभि काय बोलतो त्यावर होतं.

" कोमल कूठे असेल… तुम्हाला काय वाटते मिस काजल… " सगळे काजलकडे पाहू लागले. तशी काजल जरा दचकली. 
" म… मला कसं ठाऊक ते… ",
"Its ok… मिस काजल… relax… असंच विचारलं मी." अभि बोलत बोलत काजल जवळ आला. 
" मिसेस सावंत… तुम्ही म्हणता ना, कि काजलला गाडी चालवता येत नाही.",
"हो… म्हणून तिचा पास आहे ट्रेनचा. मुंबई ते गोवा… ", अभि पुन्हा काजलकडे आला,
" तुमचा driver आहे ना मिस काजल… गोव्याला… ",
"हो….",
" त्याला तर तुम्ही ३ महिन्यापूर्वी काढून टाकलं ना…. मग driving कोण करते… " काजल गप्प. थोड्यावेळाने बोलली ती,
" गाडी नाही use करत… अशीच जाते ऑफिसला " अभि स्वतः शीच हसला.

" गोव्याला flight ने का जात नाही तुम्ही…. ?",
"असंच… भीती वाटते मला म्हणून… ",
"ट्रेनचा पास बघू शकतो का मी… " काजलने पास दाखवला. 
"तीन मेल आहेत ना … मुंबई ते गोवा… तिन्ही ट्रेननी जाऊ शकता का… ",
"हो… पण मी दोनच use करते… तिसऱ्या ट्रेनने जास्त वेळ लागतो.",
"साधारण किती वेळ लागतो … मुबई ते गोवा…",
"१०.३० ते ११ तास लागतात.",
"बरोबर … आणि गोवा ते मुंबई…. त्याला किती वेळ लागतो.?",
"तेवढाच वेळ लागणार ना… inspector " अभि काजलच्या समोर येऊन बसला. 
" गोव्याला तुमच्या flat आहे, तिथे तसेच अजून ८ flats आहेत ना… तिथे प्रत्येक व्यक्तीचा in-out time नोंदवला जातो… बरोबर ना. ", आता काजल चुळबुळ करू लागली. " गेल्या ३ आठवडयात तुम्ही… एकूण ८ वेळा गोव्याला गेलात.… मुंबई ते गोवा…. तो time बरोबर match होतो… परंतु गोवा ते मुंबई… तो वेळ जरा गडबड आहे. " ,
"काय म्हणायचे आहे तुम्हाला inspector…. " मिस्टर सावंत. 
" ८ वेळा त्या ९ तासाच्या आत मुंबईत आल्या आहेत. even, तुमच्या मुंबईच्या सोसायटी मध्ये सुद्धा In-out time नोंदवला जातो…. गेल्यावेळी म्हणजेच ५ दिवसांपूर्वी तुम्ही गोव्यावरून सकाळी ७ वाजता निघालात. आणि मुंबईला ३ वाजता हजर होता. जर मेल कमीत कमी १०.३० तासात मुंबईला पोहोचते, तर तुम्ही ८ तासात कश्या आलात मुंबईला… " काजल घाबरली आता.
" बर… ते सगळं असू दे… तुम्हाला मी शेवटी जेव्हा भेटायला बोलावलं होतं, तेव्हा तुम्ही एक वाक्य बोलला होतात… आठवतंय काही…",
"कोणतं… ",
"तुम्ही म्हणाला होतात कि ट्रेनमध्ये तिच्या सामानावर नजर ठेवून कोणीतरी केलं असेल… ",
"हो … मी बोलले होते असं… ",
"छान… कोमल ट्रेनने बंगलोरला निघाली होती ते कोणी सांगितलं तुम्हाला… कोमलने शेवटचा call केला तेव्हा ती मुंबईत होती, म्हणजेच ८ वाजता केला होता… तोही तुम्हाला नाही. त्यावेळेस तुम्ही गोव्याला होता. शिवाय ही माहिती फक्त आमच्याकडे होती… आम्हीही तुम्हाला कोणाला सांगितलं नाही त्याबद्दल… तर प्रश्न असा आहे, कि तुम्हाला कसं माहित कि कोमल ट्रेनने प्रवास करत होती." काजल चलबिचल झाली. 
" मला जरा बरं वाटतं नाही… मी जाऊ शकते का ? "काजल डोक्याला हात लावत बोलली. 

" नाही… थांबा जरा, जाऊ सगळेच आरामात… " अभिने हाताने खुण करून ladies constable ला काजलजवळ बोलावलं. काजल उगाचच इकडे तिकडे पाहत होती. " मुद्यावर येऊ आता… कोमलला का kidnap केलंत तुम्ही… मिस काजल. " आता सगळेच…. तिथे जमलेले पोलिस, हवालदार, ladies constable, महेश …. सगळेच…. अभि आणि काजलकडे बघू लागले. 
" काय बोलत आहात तुम्ही… मी… मी का करीन तसं… " काजल मोठयाने बोलली. 
" ते तुम्हीच सांगा… " ,
"मला बर वाटत नाही… मी चालले. " काजल उठून जाऊ लागली. तसं मागे उभ्या असलेल्या ladies constable ने तिला जबरदस्ती खाली बसवलं. अभिने एका हवालदाराला बोलावलं. त्याला काही सांगितलं. तसा तो बाहेर गेला आणि गाडीतून दिपेशला घेऊन आला. त्याला पाहून काजल अजूनच घाबरली. 

" आता बोला मिस काजल, दिपेशने आधीच सगळं सांगितलं आहे. त्यामुळे आता खरं सांगावं लागेल तुम्हाला." काजल गप्पच… अभि काजलकडे पाहत होता . महेश पुढे आला. 
" अभि… काजल कशाला kidnap करेल तिला… दिपेश तसं बोलला का तुला… " अभिने नाही म्हटलं. 
" तुला कसं कळलं पण… काजलच आहे ते." ,
" सांगतो… " अभिने पुन्हा एकदा काजलकडे कटाक्ष टाकला. 
" पहिल्यादा आपण जेव्हा यांच्याकडे आलो होतो, तेव्हा काजल नुकतीच गोव्यावरून आली होती. तिने सांगितलं ट्रेनने आली. पण माझं लक्ष तिच्या सामनावर गेलं. तिच्या bag वर ते विमानतळावर check in आणि check out करताना, जी तपासणी होते, तेव्हाचे tag's तसेच होते. मला तेव्हाच संशय आला होता कि काजल खोटं बोलत आहे. त्यानंतर गोवा ते मुंबई time… ते तर फक्त Flight ने शक्य आहे. शिवाय गोव्याच्या flat वर काही तिकिटे मिळाली मला. त्यावरून हे सिद्ध होते कि काजल विमानाने travel करते. तिला driving येते हे सुद्धा गोव्याला कळलं. तिथल्या security guard ने सांगितलं. पुण्यात सापडलेली गाडी ही सोलापूरची होती. तिथून ती भाड्याने घेतली होती, काजलच्या नावाने… हिचा फोटो ओळखला त्या कार मालकाने, जिथून गाडी भाड्याने घेतली होती. याचा अर्थ, काजलला driving पण येते." अभि काजलकडे पाहू लागला. ती शांतपणे सगळं ऐकत होती. अभि उभा राहिला आणि चालत चालत मिसेस पंडित ( अमितची आई ) यांच्याकडे आला. " ती काही बोलत नाही… तर तुम्ही तरी सांगा… " राहुल "आ"वासून पाहत होता. 
" काय ? ", मिसेस पंडित. 
" हो… काजलच्या नोकराने सांगितलं आम्हाला… पहिला अमित असायचा तिथे… त्यानंतर दिपेश, मिसेस पंडित… या दोन व्यक्ती सुद्धा गोव्याला जायचे काजलला भेटायला. का ते आता काजल सांगेल." पुन्हा अभि काजलकडे आला. " बोला… मिस काजल, बोला… " अभि ओरडला , तशी काजल मोठयाने दचकली. 

"हो…हो, मीच kidnap केलं तिला… भेटलं उत्तर तुम्हाला. " काजल रडत रडत म्हणाली. सगळेच वेडे झाले ते ऐकून. मिस्टर सावंत तर धावत काजलकडे आले. 
" बेटा… खर सांग… तू केलंस हे… " काजलने हो म्हटलं,तशी एक जोरदार थोबाडीत बसली तिच्या. 
" का… का केलंस असं … तुझी बहिण होती ना ती. का केलंस असं… ? " दोन हवालदार पुढे आले आणि सावंतांना पकडून बाजूला नेलं. अभि हे सगळं शांतपणे पाहत होता. 
" सांगा मिस काजल, का kidnap केलंत तिला ? ",
"अमितच्या खुनाचा सूड घेण्यासाठी… ",
"काय… ? " यावेळी अभिला shock लागला. " काय बोलताय तुम्ही… कोमलने अमितचा खून केला आहे.… ?" ,
"हो… ",
"हे तुम्हाला कसं माहित… " काजलने डोळे पुसले. 
" कोमल आणि राहूलने नवीन बिझनेस सुरु केला होता. आमचा बिझनेस सांभाळून नवीन बिझनेस…. पण तो बिझनेस नसून smuggling आहे, हे मला फार उशिरा कळलं… आणि मलाच उशिरा कळलं ते… माझ्या या आईला , सख्या आईला ते आधीपासून माहित होतं. पण पैश्यासमोर नाती काय चीज आहेत… " अभिने मिसेस सावंतकडे पाहिलं. " अमितला हि गोष्ट कळली होती, म्हणूनच तो कोमलला ती letters पाठवायचा. राहूलला कळल कि अमित black- mail करतो आहे आणि पोलिसांना सगळं सांगणार होता. म्हणून कोमल, राहूल आणि माझी आई… या तिघांनी अमितला मारायचा प्लान केला. आई जेव्हा अमितला भेटायला सोलापूरला गेली होती, तेव्हाच राहूलने अमितला भेटायला बोलावलं. त्या मिटिंगमध्ये भांडणे झाली. कोमलचा आधीच राग होता अमितवर. त्यात हे सगळं. अमित मिटिंग मधून निघाला आणि कोमलने त्याला गोळी मारली." सांगता सांगता काजलला रडू आलं. तिथे अमितच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. " सगळ्या गोष्टी झटपट झाल्या. राहूलने ती गन लपवली, कोमल बंगलोरला गेली आणि आईने अमितची dead body पुण्यात, स्वतः drive करत आणून जंगलात टाकून दिली. त्या चोरांनी, त्याच्या अंगावरचे कपडे, अंगठया, चैन… काढून घेतलं. प्रेत उघड्यावर आणलं. त्यामुळेच ते पोलिसांना भेटलं."

सगळेच स्तब्ध झालेले ते ऐकून.… अरे बापरे !!! काय विचार केलेला आणि काय समोर आलं…. great… अभि मनातल्या मनात बोलला. महेशच डोकं चक्रावलं. तरीसुद्धा त्याला kidnap कसं केलं ते जाणून घ्यायचं होतं. " काजल तुला हे सगळं कस समजलं आणि kidnap … ते कसं केलंस… "काजल सांगायला लागली. 
" कोमलची एक गोष्ट आहे, माझ्या बरोबर सगळं share करते ती, अमितच्या खून कसा केला, कसं त्याला फसवून आणलं… सगळं सांगितलं मला तिने. खूप रडले होते तेव्हा. कोमल एवढी क्रूर कर्म करू शकते…. पण याचा सूड घ्यायचा हे मनात पक्क केलं. माझं नशीब चांगलं होतं. कारण त्याचं रात्री घरी येताना मला दिपेश भेटला. त्याला पैसे देऊन माझ्या बाजूने केलं. अमितच्या बाबतीत काय झालं ते मी त्याच्या आईला आधीच सांगितलं होतं. त्यांनाही खूप वाईट वाटलं, पण मला साथ द्यायचे कबूल केले. माझा प्लान तयार होता फक्त संधीची वाट पाहत होते. नशीब खूष होतं माझ्यावर. संधी चालून आली. दिपेश कोमलवर नजर ठेवून होता. त्यानेच मला call करून सांगितलं कि ती ट्रेनने निघाली आहे बंगलोरला. तेव्हाचं तिला kidnap करायचं ठरलं.त्यादिवशी योगायोगाने अमितच्या आई सोलापूरला होत्या. कोमलला सोलापूरला अडवायचं , हे त्यांनीच पक्क केलं. मी तेव्हा गोव्यावरून निघत होती. दिपेश त्याचं ट्रेनमध्ये होता. त्यानेच वेळ साधून तिची bag पळवली. कोमल सोलापूरला उतरली ती तक्रार नोंदवायला. दिपेशने call करून अमितच्या आईला ती स्टेशनवर आहे हे सांगितलं." अभिने हाताने "थांब" अशी खुण केली काजलला. 
" तुम्ही सांगा मिसेस पंडित… ",त्यांनी सांगायला सुरु केलं. 
"कोमलची ट्रेनसुद्धा सुटली होती तेव्हा. तिला मी स्टेशनवर बघितलं. आणि उगाचच तिच्या समोरून गेली. कोमलनेच हाक मारली मला. मग बोलता बोलता तिला मी हॉटेलमध्ये घेऊन गेले. खाण्यात गुंगीचे औषध मिसळले. तोपर्यत काजल आली होती गोव्यावरून सोलापूरला. कोमल बेशुद्ध झाली होती. तिला मी काजलकडे सोपवलं." 

"हम्म… पुढे मिस काजल… " अभिने काजलला सांगितलं. 
" कोमलला मी तसंच पुण्याला घेऊन जायचे ठरवलं होतं. पण विमानाने जाऊ शकत नव्हती. कारण उगाच चौकशी झाली असती विमानतळावर. मग सोलापूरला गाडी rent वर घेतली. गाडीने पुण्याला आली, आमची एक रूम आहे तिथे, तिथे कोमलला ठेवलं. तशीच सोलापूरला जाणार होते, तोपर्यंत गाडी 'no parking' मध्ये ठेवल्याने जप्त झाली होती. मग पुण्यालाच थांबले. दिपेशने कोमलच सामान गोव्याला flat वर जाऊन ठेवलं आणि अमितच्या आई मुंबईला आल्या.पप्पांचा call आला, तशी मी flight ने मुंबईला आली." काजलच बोलणं संपलं. अभिने सुरु केलं. 
" दिपेश सामान घेऊन गोव्याला गेला तेव्हा कोमलचा मोबाईल सुद्धा त्या सामानात होता. म्हणूनच कोमल गोव्याला गेली नव्हती, तिचा मोबाईल गोव्याला होता… आठवलं महेश… तिसरी लोकेशन. " महेशने मान हलवली. 
" By the way, कोमल इतके दिवस बाहेर कशी आली नाही मग… ",
"yes… मला वाटलेच होते कि तू विचारणार ते." अभि हसत म्हणाला. " तुला बोललो होतो ना, या सगळ्यांवर पाळत ठेवली पाहिजे.… आणि जेव्हा काजलच्या गोवा ते मुंबई या वेळेत गडबड वाटली तेव्हा दोघांना तिच्या मागावर ठेवलं. काजल गोव्यावरून पुण्याला यायची, कोमलची तब्येत बघायची, थोडावेळ थांबून मुंबईला यायची. ती रूमसुद्धा भेटली आम्हाला. कोमल लगेच सापडली. पण मुद्धाम मी काजलला अटक नाही केली, सगळी स्टोरी मला ऐकायची होती. " अभि, महेशजवळ आला. " आणि madam नी कसं ठेवलं होतं तिच्या बहिणीला माहित आहे… कोकेनच्या अमलाखाली… नशेमध्ये. शिवाय देखरेख करायला २ बायका पण होत्या. त्यांना काजलने बरोबर सांगून ठेवलं होतं, कोकेनचे injection किती वाजता देयाचे ते.… just a perfect plan……. ना. ",
"मग आता… ",
"आता कोमलला आम्ही हॉस्पिटलमध्ये ठेवलं आहे. काही दिवसात होईल ठीक ती. " 

                सगळ्यांच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव होते. कोणीच काही बोलत नव्हतं. काजल शांत होती. अभि,महेश सगळ्यांकडे पाहत होते.… शांतता.… 
"एक प्रश्न विचारू… अमितचा खून कोमलने स्वतःला वाचवायला केला, मिसेस सावंतानी, कोमल अडकू नये म्हणून तिला मदत केली. तर तू कोमलला kidnap का केलंस ?. " काजल शांतपणे ऐकत होती. खूप वेळाने तिने चेहरा पुसला. डोळे पुसले. 
" कारण…. कारण अमितवर माझं प्रेम होतं. " पुन्हा कहानी में twist.… अभिषेक, महेश एकमेकांकडे पाहू लागले. 
" हो… माझं प्रेम होतं अमितवर… तो शाळेत असल्यापासून… फक्त त्याला कधी सांगू शकले नाही. मनापासून प्रेम केलं त्यांच्यावर. पण अमितचं कोमलवर प्रेम होतं. कोमलचं प्रकरण त्याने मलाच सांगितलं होतं पहिलं… कोमलने खूप मोठी चूक केली त्याचा खून करून…. खूप रडले होते मी." काजल मख्ख चेहऱ्याने सांगत होती. 
" कोमल माझी सख्खी बहिण नव्हती, हे मला माहित होतं. तिला त्याची कल्पना नव्हती. ती माझ्यापेक्षा मोठी होती, असं आईने सांगितलं होतं. पण ती प्रत्येक गोष्टीत माझ्या पुढेच असायची, प्रत्येक गोष्टीत मधे मधे करायची. त्याचा विशेष राग यायचा मला. मी कोणाशी बोलायचं , कूठे जायचे हे ती ठरवायची. अरे !!!… माझी life मला जगूच द्यायची नाही. अमित तिला आवडायचा नाही, मला सांगायची, बोलू नकोस त्याच्याशी. त्यात अमितला, कोमलने थोबाडीत मारली होती… त्याचा राग होता मनात माझ्या. पप्पा, आई… तिचीच प्रशंसा करायचे, तिचेच लाड करायचे. त्यामुळे तिच्याबद्दल राग वाढत गेला मनात.… आणि अमितला मारलं तिने. मग मी स्वतःला नाही थांबवू शकले.…. सूड घ्यायचा या सगळ्याचा.… ठरवलं…. मीही काही करू शकते हे तिला दाखवायचं होतं… बाकीच्या गोष्टीसाठी तिला माफ केलं असतं, पण… अमित… माझ्या प्रेमाच्या आड आली ती… प्रेम होतं त्याच्यावर…. त्यासाठी माफी नाही." 

           सगळेच मुकाटपणे ऐकत होते. काय बोलणार आता… अभि गप्प होता. महेश शांत होता. आता सगळचं कळलं होतं. थांबून राहण्यात काही अर्थ नव्हता. अभिने सगळ्यांवर नजर फिरवली. " माझ्याकडे actually काजलच्या विरोधात कोणताच पुरावा नव्हता. त्यामुळे तिने स्वतःच कबूल करणं गरजेचे होते.… मिस काजल, मी तुम्हाला kidnap आणि कोकेनचा एका व्यक्तीवर वापर करण्यासाठी अटक करतो." काजलच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते. " घेऊन जा रे सगळ्यांना." एकेकाला गाडीत घेऊन जाऊ लागले. सगळ्यात शेवटी काजलला घेऊन जाऊ लागले. अभि कधीपासून तिच्याकडे पाहत होता.… ती गाडीत बसणार,तितक्यात अभिने तिला थांबवलं. 
" एक शेवटचा प्रश्न… कोमलवर एवढा राग होता तुमचा…. आधीपासूनच… त्यात अमितचा खून केला तिने… मग कोमलला तू सुद्धा मारू शकत होतीस ना… तसं न करता तिला पुण्यात डांबून ठेवलंस.… नशेमध्ये… मारलस का नाही… ? ". काजलने शांत नजरेने अभिकडे पाहिलं. 
" लहानपणापासून एकत्र होतो आम्ही. राहूल पेक्षाही माझ्यावर जास्त प्रेम होतं तिचं…. रक्ताचं नातं नसलं तरी…. शेवटी बहिण आहे माझी ती. " काजलने स्मित हास्य केलं आणि स्वतः गाडीत जाऊन बसली. 

           सगळ्या पोलिसांच्या गाड्या रवाना झाल्या. अभि आणि महेश, त्या बंगल्याबाहेर बसले होते. " congrats… अभिषेक… अजून एक केस solve केलीस. आता पुढे काय ?" महेश बोलला.
" आता… आता काय केसेस सुरु होतील कोर्टमध्ये. त्यात गुंतावे लागेल. दिपेशचा actually काही गुन्हा नाही. त्याने फक्त मदत केली. तो सुटू शकतो. बाकीच्या लोकांना, तर शिक्षा होईलच. कोमल पूर्ण ठीक झाल्यावर तिच्यावर गुन्हा दाखल होईल.… पण… ",
"पण काय अभि ? ",
"बघ ना… सगळे कसे एकमेकांत गुंतलेले होते, Mr. पंडित ज्या smuggling मध्ये ५० % चे पार्टनर होते, त्यासाठीच त्यांच्या मुलाचा खून झाला. कोमलने Mr. सावंतच्या पुढे काम केलं… शांत वाटणाऱ्या काजलने एवढं मोठं पाऊल उचललं. … मोठी माणसं आहेत, पैसेवाली… पैसे देऊन bail वर सुटतील. पण त्यांच्या नात्यावर ज्या जखमा झाल्या आहेत, त्या पैसे भरून सुद्धा भरणार नाहीत.… तश्याच राहतील, जन्मभर. " महेशने अभिच्या खांदयावर हात ठेवला. 
" चल निघूया. " महेश म्हणाला. "हो… या केसमध्ये खूप ठिकाणी पळायला लागलं नुसतं. आता मस्त घरी जातो. आणि आरामात एखादा movie बघत बसतो." अभि म्हणाला. " पुन्हा पोलिसांचा movie…. " महेश हसत म्हणाला. त्यावर अभि दिलखुलास हसला. हसत हसत, गप्पा मारत, चालतच ते दोघे निघाले.    


------------------------------------------  The End  ----------------------------------------                       


Saturday, 27 June 2015

" सूड… ( भाग पहिला ) "

                     "खाड्ड…",दिपेशच्या डोळ्यासमोर सकाळी सकाळीच तारे चमकले. भानावर आला तेव्हा गाल लाल होता, हे त्याला लगेच कळलं. गालावर हात ठेवून समोर बघितलं तर कोमल त्याच्याकडे डोळे वटारून पाहत होती. हिने माझ्या गालावर हाताचा ठसा उमटवला बहुतेक,दिपेशने मनातल्या मनात ओळखलं. काजलला तो शोधू लागला. तर ती कोमलच्या मागे उभी राहून पाहत होती. बरं, ती काही एकटीच नव्हती बघणारी. संपूर्ण ऑफिस तो scene पाहत होता. एव्हाना कुजबुज सुरु झालेली. दिपेशला काय बोलावं ते कळत नव्हतं. गालावर हात ठेवून तो तसाच त्या दोघींकडे पाहत होता. 


"काय रे…. बोल आता… काय बोलायचं आहे ते." दिपेश गप्प. 
" बोल कि आता, कि दातखिळी बसली तुझी…नालायक माणसा… " कोमल रागातच होती. 
" हे बघ कोमल… काहीतरी misunderstanding झाली… ",
" misunderstanding ? ", त्याचं बोलणं मधेच तोडत कोमल बोलली. " ती काही बोलत नाही म्हणून चालून जाते सगळं, अस वाटते का तुला… पण तसं नाही आहे आणि misunderstanding कशी रे … ? मला काय दिसत नाही, काय चालू आहे ते… एक- दोनदा ठीक आहे. पुन्हा पुन्हा तेच चालू तुझं… ",
"sorry बाबा…. पुन्हा नाही होणार… ",
" पुन्हा करशीलच कसा… जीव घेईन तुझा मी." कोमल तर भलतीच भडकली होती. 
" पाया पड तिच्या…. आणि माफी माग तिची… " ,दिपेशला काय करावं ते कळत नव्हतं. 
" जाऊ दे ना कोमल… ", काजल हळू आवाजात बोलली. 
" जाऊ दे कसं… या पुरुषांना " मुलगी " म्हणजे काय खेळणं वाटते का… कसही वापरा, खेळून झालं कि फेकून द्या… मग नवीन खेळणं. " तशी काजल गप्प झाली. " हा माणूस… रोज तुझी छेड काढतो. ऑफिसमध्ये येताना, घरी जाताना. ऑफिसच्या बस मध्ये… आणि जाऊ दे त्याला…. या अश्या नालायक माणसांना धडा शिकवायलाच पाहिजे.… पाया पड दिपेश… लवकर.", दिपेश थोडावेळ तसाच उभा राहिला. सगळ्या नजरा त्याच्याकडेच होत्या." तुझ्याकडे २ मिनिटे आहेत. पाया पड तिच्या, नाहीतर बघ पुढे काय करते मी.", दिपेश चूपचाप खाली वाकला , काजलच्या पायाला हात लावला,
" Sorry… पुन्हा कधीच होणार नाही असं… ", दिपेशला मेल्याहून मेल्यासारखं झालं. तो निघण्यासाठी वळला. तशी त्याची कॉलर पकडली कोमलने. 
" हे बघ… आता तुला या ऑफिसमध्ये सुद्धा रहायची गरज नाही. पप्पांना सांगितलं आहे मी… आज दुपारपर्यंत तुझं " Resignation letter " तुझ्या टेबलवर येईल. तोपर्यंत तुझं सामान आवरायला घे." 

              ते ऐकून दिपेश उडालाच. " असं करू नकोस कोमल… तुझ्या पाया पडतो. आणि एवढ्या लवकर कूठे शोधू मी जॉब… प्लीज… असं नको करूस… माझं घर चालते माझ्यावर… प्लीज… प्लीज… प्लीज…" ,
" याचा आधी विचार करायला हवा होतास…. काजलला त्रास देण्याआधी…तुझं " Resignation letter " येईल ते घे आणि चालता हो…तुमच्या सारख्या माणसांना हेच पाहिजे. म्हणजे पुन्हा कोणा मुलीवर नजर नाही पडणार तुमची." दिपेश चुपचाप जागेवर बसला. 
" काजल…. जा कॅबिनमध्ये… " काजल कॅबिनमध्ये गेली. कोमल अजून काजलकडे पाहत होती. सर्व ऑफिस अजून तसंच उभं होतं. 
" सगळ्यांना आताच बजावून ठेवते. काजलला एकटी समजू नका. तिची बहिण आहे इकडे, समजलं ना सगळ्यांना.… चला, आता कामाला लागा सगळे." तसे सगळे कामाला लागले. 

                       दुपारी दिपेशला त्याचं लेटर मिळालं आणि तो निघून गेला. आजच्या गडबडीमुळे ऑफिसमध्ये कमालीची शांतता होती. कोणीच कोणाशी बोलत नव्हते. ऑफिस सुटल्यावर काजल, बाहेर उभी राहून कोमलची वाट पाहत होती. तेव्हा कोमलची ऑफिस मधली friend स्वाती बाहेर आली," Hi काजल… ठीक आहेस ना." काजलने होकारार्थी मान हलवली.
" बरं… पण हे तू आधी का नाही सांगितलं, कि तो दिपेश तुला त्रास देतो ते.",
"कसं सांगू आणि कोणाला सांगू… मला भीती वाटायची त्याची.",
"मग कोमलला कसं कळलं ते.",
" त्या दिवशी त्याने माझी bag ओढली घरी जाताना आणि ती तुटली. कोमलने विचारलं तेव्हा मला सांगावं लागलं. त्यादिवसापासून ती दिपेशवर नजर ठेवून होती. आज त्याने हात पकडला तेव्हाच कोमल आत आली आणि पुढचं तर सगळ्यांनी पाहिलं. ",
"जाऊ दे , पण चांगलं झालं तो गेला ते. मी कोमलला काही बोलली नाही, तिचा राग शांत झाला नसेल अजून. पण तुला सांगते. तो चांगला माणूस नाही. 'कोमलला बघून घेईन' असं म्हणत गेला तो. त्याच्या शेजारी बसतो ना त्याने सांगितलं मला. तिला जरा सांभाळून राहायला सांग.",
"ठीक आहे, सांगते. ",
"चल bye… and happy weekend…. see you on Monday… " म्हणत स्वाती निघून गेली. 

                     १० मिनिटांनी कोमल आली. काजलकडे न बघताच ती parking lot मध्ये गेली. गाडी चालवत गेटजवळ आणली आणि थांबवली. काजल गाडीकडे पाहत होती." आता काय श्रीफळ आणि शाल देऊ तुला. बस गाडीत." कोमल बोलली, तशी काजल पटकन गाडीत बसली. कोमल काही न बोलता गाडी चालवत राहिली. ३० मिनिटांनी घरी पोहोचल्या दोघी. काजल निमूटपणे गाडीतून उतरली आणि तिच्या रूममध्ये गेली. गाडी पार्क करून कोमलसुद्धा आली. काजलकडे न पाहताच ती तिच्या कामाला लागली. काजल पुढे होऊन कोमलला sorry म्हणाली. तशी कोमल वळली. काजलकडे कितीतरी वेळ पाहत होती. डोक्यावर टपली मारली तिच्या. 
" मूर्ख… गाढव… " बोलता बोलता कोमल थांबली. " असं समजू नकोस कि मला शिव्या देता येत नाहीत, आणि तुला पण माहित आहे ते. बहिण आहेस म्हणून. नाहीतर मला किती प्रकारच्या शिव्या देता येतात ते तुला कळलं असतं." कोमल अजून रागात होती.
"Sorry कोमल… " म्हणत काजल तिच्या बेडवर जाऊन बसली आणि रडायला लागली. 
" अरे… रडूबाई… रडतेस काय… मस्करी केली मी. sorry…sorry…" काजलला मिठी मारली कोमलने. " डोळे पूस पहिले… नाहीतर आज जेवणार नाही मी." तसं काजल रडायची थांबली. 
" तू कशाला मारलस त्याला, राग आला आहे तुझा त्याला…. वाईट माणूस आहे तो.",
" हे बघ… तू त्याचं tension नको घेऊस… तसे खूप बघितले आहेत मी, आणि तो पुन्हा माझ्यासमोर येणार नाही हे नक्की. तू पण आता धीट हो… अशी राहत जाऊ नकोस.… "अरे" ला " का रे" बोलायला पाहिजे. नाहीतर जग आपल्याला घाबरट समजते. समजलं का काकूबाई…. " कोमल हसत म्हणाली.  

" कोण आहे काकूबाई ?", त्या दोघींची आई आत येत म्हणाली.
" हि काय, बसली आहे… " कोमल हसत बोलली. तशी आईने तिच्या पाठीवर चापटी मारली. 
" कशाला चिडवतेस तिला…. काही बोलत नाही म्हणून काहीपण बोलायचे का… काजल, हीच आहे काकूबाई… " तशा तिघी हसू लागल्या. 
"बरं, मम्मी…. पप्पा आले का ?",
"नाही… येतील आता. on the way आहेत. ते आले कि सगळे एकत्र जेवायला बसू. "

अर्ध्या तासाने पप्पा आले. " Hi Dad… " कोमलने पप्पांना मिठी मारली. " कशी झाली ट्रीप ? " ,
"मस्त एकदम… आणि माझं ऑफिस कसं आहे ? ", 
" हा हा हा " , कोमल हसू लागली. 
" काय गं … काय झालं आणि काजल कूठे आहे ? ","
 Hi पप्पा… कसे आहात आणि कसं आहे बंगलोरचं ऑफिस ? ",
" मस्त चालू आहे तिथे… very nice… ",
"अरे !! आलात तुम्ही. ",
"हे बघ…. आतच आलो आणि या दोघींनी पकडलं मला. ",
" अगं त्यांना आत तर येऊ दे आधी. ",
" OK , पप्पा…. तुम्ही फ्रेश होऊन या… जेवणाच्या टेबलवर गप्पा-गोष्टी करू. " म्हणत कोमल बाहेर निघून गेली. रात्री जेवणाच्या टेबलवर गप्पा सुरु झाल्या. 
" OK… ऐका सगळ्यांनी… आपली तिन्ही ऑफिस चांगली चालू आहेत. दोन्ही नवीन ठिकाणी आता चांगला जम बसला आहे. तर मी काहीतरी विचार केला आहे.",
"कोणता विचार ?", काजल बोलली. 
" मला काही जमत नाही दोन्ही ठिकाणी जायला. आता तुम्ही मोठया झाला आहात. का नाही तुम्हाला पाठवू तिथे." ,
" Brilliant idea पप्पा. " कोमल आनंदाने ओरडलीच. 
" गप्प बस कोमल… " मम्मी ओरडली. 

" का……. काय झालं? ", पप्पा म्हणाले.
" एवढया लांब कशाला पाठवायचे… अजून लहान आहेत दोघी. " मम्मी म्हणाली. 
" हि काजल लहान असेल…. मी नाही." कोमल बोलली. 
" मी तयार आहे जायला. कधी जायचे ते सांगा." ,
" कोणी कूठे जाणार नाही. " मम्मी बोलली. 
" जावे तर लागेलच ना आणि दोघींना आता व्यवहार चांगला कळतो. इकडचे ऑफिस कसं सांभाळलं दोघींनी आठवडाभर…" तसं कोमलला हसू आलं.
" काय गं… हसतेस काय ?" पप्पांनी विचारलं.
" नंतर सांगते. पहिलं कधी जायचे ते सांगा.",
"हे बघा… तिथे जाऊन राहायचे नाही आहे. Friday ला जायचे आणि Sunday ला यायचे मुंबईला. फक्त एक दिवस त्या ऑफिसचे काम बघायचे, आठवडयाचा हिशोब चेक करायचा,एवढंच… एक दिवसाचा प्रश्न आहे. तसा सगळा ऑफिस स्टाफ खूप चांगला आहे,मेहनती आहे. फक्त आपल्या घरातलं पाहिजे तिथे कोणीतरी लक्ष देण्यासाठी म्हणून.",
" एक दिवस , मग माझी संमती आहे." मम्मी बोलली. 
" Thanks मम्मी.… तर पप्पा… कधी जाणार मी… " ,
" तू एकटी नाही, काजल पण जाणार तुझ्यासोबत… ",
" कूठे ? " काजलच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. 
" कूठे म्हणजे ? आपल्या बंगलोर ऑफिसला… ",
" कोमल असेल ना सोबत ?",
"हो गं ताई… ",
" तर या Friday ला  बंगलोर ऑफिसला जा तुम्ही आणि next week मध्ये गोवा ऑफिसला भेट देऊन या. ",
" Wow !!! गोवा पण… ",कोमल नाचू लागली आनंदाने. तिला काजलने हात पकडून खाली बसवलं. 
" हो आणि त्या दिपेशला काढून टाकलं ना…. त्याचं लेटर मी mail केलं होतं तुला. ", 
" लेटर सोबत प्रसाद पण मिळाला.",
" प्रसाद ? ",
" माझ्या हाताचा प्रसाद… ",
"तरीच ती हसत होतीस… ",पप्पा म्हणाले.
" ऑफिसमध्ये मारामाऱ्या करायला जातेस का तू…. ", मम्मी म्हणाली. 
" नाही गं, तरी मी सांगायचे हिला…. ऑफिसच्या बसमधून नको जाऊस… आपली गाडी आहे… नाहीतर माझ्याबरोबर ये, तर हिला सकाळी ऑफिस open करायला जायचे असते. आपण बॉस आहोत हे काजल विसरली. आणि त्याचं tension संपलं मग, हिची मस्करी करायचा, आज हात पकडला. दिली ठेवून त्याला एक… ", पप्पा सगळं ऐकत होते. 

"तुझं नावं " कोमल ", तुझ्या स्वभावाला match नाही होतं ना… नावं change केलं पाहिजे. " पप्पा हसत म्हणाले. तसे सगळे हसले. 
" तरीसुद्धा ताईने धीट होयाला पाहिजे आता. एक idea आहे , सांगू का ? ",
"हो… हो… सांग ना… ",
" बंगलोर आणि गोवा… दोन्ही ठिकाणी जायचे आहे ना… दर आठवडा, मग मी गोवाला जाते. ताईला बंगलोर ला पाठवू.",
" नको हा… मी एकटी नाही जाणार… ",
" खूप छान idea, कोमल… ",
"नाही पप्पा…. एकटीला भीती वाटते मला. आणि एवढया लांब नको… मी नाही जाणार.", काजल म्हणाली.
" OK… मग, अदलाबदल करू, तू गोवाला जा आणि मी बंगलोरला. गोवा काय जवळच आहे ना… ",
" तरी पण नको. ". मम्मी काजलच्या बाजूला येऊन बसली. 
" हे बघ, बाळा… कोमलचं म्हणणं बरोबर आहे. हिम्मत तर वाढली पाहिजे तुझी. शिवाय , आपला बिझनेस सुद्धा सांभाळावा लागेल ना. एक दिवसाचा तर प्रश्न आहे. बघ जरा , जग फिरून. घाबरतेस कशाला… आपलीच माणसं आहेत तिथे.",
" आणि काही वाटलंच तर मला call कर. मी धावत येईन माझ्या ताईसाठी." कोमल, काजलला मिठी मारत बोलली. 
" चालेल… मग ठरलं तर… दोघी next Friday पासून दर आठवडयाला जाणार… कोमल बंगलोरला आणि काजल गोवाला… Done ना… ","Final पप्पा." दोघी बोलल्या आणि जेवत जेवत पुढे गप्पा सुरु राहिल्या. 

                    सावंत कुटुंब, चौकोनी कुटुंब… दोन मुली,मम्मी आणि पप्पा. वडिलांचा बिझनेस, त्यात दोन्ही मुली गुंतलेल्या. त्या दोघींमुळेच अजून दोन ठिकाणी नवीन ऑफिस सुरु केलेली. खूप मेहनती होत्या दोघी. मोठी काजल, लहान कोमल. एकत्र शिकलेल्या, शाळा एकच, कॉलेज एकचं. फक्त फरक होता तो स्वभावात. काजल जरा घाबरट स्वभावाची होती. शांत राहायची नेहमी. कोणी काही बोलेल म्हणून कोणालाही उलट बोलायची नाही. कोमल नावाप्रमाणे मुळीच नव्हती. शाळा,कॉलेज दोन्ही ठिकाणी मारामारी करून झालेल्या होत्या तिच्या. अन्याय सहन करायची नाही ती. बिनधास्त स्वभावाची, मनात येईल ते बोलणारी आणि मनात येईल ते करणारी. पण काजलवर खूप प्रेम होतं तिचं. दोघीही business management शिकून ऑफिस जॉईन झालेल्या. दोघी कमालीच्या हुशार. काजल फक्त कमी पडायची ती तिच्या स्वभावामुळे. पण कोमल नेहमीच तिच्या सोबत असायची. तिची bodyguard जणू काही. आता दोघीही मोठया झाल्या होत्या, कोमलचं बिनधास्त वागणं तिच्या मम्मीला थोडं खटकायच. तरीसुद्धा ती काजल सोबत असते, तिची काळजी घेते म्हणून बरं वाटायचं. दोघींची छान मैत्री होती. काजलला बाहेर फिरणं आवडायचं नाही, कोमल तिला जबरदस्ती घेऊन जायची. सोबत त्यांचा कॉलेजचा ग्रुप असायचा. त्यातल्यात्यात राहुल त्या दोघींचाही best friend होता. शाळेपासून एकत्र होते तिघे. कॉलेजमध्ये एकाच वर्गात. त्यानंतर, राहुलने स्वतःचा बिझनेस सुरु केला. बिझी असायचा तो, तरी वेळात वेळ काढून दोघींना भेटायला घरी यायचा. मग तिघे फिरायला जायचे. छान दिवस होते. दोघींच्या नवीन ऑफिसला फेऱ्या सुरु झालेल्या. तिथल्या बिझनेसमधे प्रगती होताना दिसत होती. 

                 एक दिवस, कोमलची तब्येत ठीक नव्हती. म्हणून ती ऑफिसला न जाता घरीच थांबली होती. काजलला driving येत नसल्यामुळे ती पुन्हा ऑफिसच्या बसने गेली होती. संध्याकाळी काजल आलीच ती घाबरीघुबरी झालेली. कोमलला कळलं ते.
" काय झालं ताई… ",काजल तशीच थरथरत होती.पाणी आणून दिलं कोमलने. जरा तिला नॉर्मल होऊ दिलं. 
" हं… आता बोल. काय झालं ते…एवढी घाबरलीस ते.",
" दिपेश… ",
" दिपेश…. दिपेशच काय… ", 
" दिपेश आला होता… ऑफिस सुटल्यावर… ",
" मग… काही केलं का त्याने… ", कोमल रागात होती. 
" काही नाही. फक्त बोलला, तुझ्या बहिणीला सांग… जपून रहायला, माझं आयुष्य बरबाद केलं तिने. तिचं पण आयुष्य असंच करणार मी.",
" त्याच्या तर….एवढी मजल गेली त्याची… तुरुंगातच पाठवते त्याला आता." ,
" नको कोमल… प्लीज… प्लीज. " 

" का नको… गप्प बसं तू " आणि कोमल तिच्या पप्पांना घेऊन पोलिस स्टेशन गेली आणि रीतसर तक्रार करून आली. दिपेशला पोलिसांनी एक दिवस तुरुंगात ठेवले आणि नंतर समज देऊन सोडून दिलं. त्यादिवसापासून काजल जरा जास्तच घाबरायला लागली होती. मम्मीला जास्त काळजी वाटू लागली होती. 
" मला तर वाटते… काजलचं लग्न करूया आता, नाहीतरी दोघींचं वय झाले आहे लग्नाचे." मम्मीने विषय काढला. 
"हे बरोबर आहे. तरीसुद्धा दोघींना पहिलं विचारून घेऊ. love marriage कि arranged marriage… मगच निर्णय घेऊ. ",
"ठीक आहे , जेवताना विषय काढा तुम्ही."

जेवताना पप्पानी विषय काढला. 
" हे बघा… तुम्हा दोघींचं लग्नाचं वय झाले आहे. तरी हिने माझ्याकडे विषय काढला. तर तो निर्णय मी तुमच्यावर सोपवत आहे.", कोमल आणि काजल एकमेकींकडे बघू लागल्या. 
"लग्न आणि एवढयात ? मला तर अजून खूप काही करायचे आहे. " कोमल बोलली. 
" अगं, मग लग्न झाल्यावर सुद्धा त्या गोष्टी होऊ शकतात ना…. ", पप्पा बोलले , त्यावर कोमल काही बोलली नाही. 
" OK, मग ठीक आहे. काजल तयार आहेस ना… ", काजल गप्प. 
" चला … मग , जर तुमचं कोणावर प्रेम वगैरे असेल तर आताच सांगा. नाहीतर यैन वेळेला गडबड नको.… चालेल ना… ",
"हो… ", कोमल बोलली. 
" हो ना… मग सांगा… आहे का कोणी… काजल तू सांग… आहे कोणी , तुला पसंत असा.", मम्मी बोलली. काजल काही बोलली नाही , फक्त चेहऱ्यावर हसू आलं तिच्या. पपांनी पहिलं ते. " काजल … कोण आहे ? नावं सांग… ", काजल बोलणार इतक्यात कोमलच बोलली,
" नाही… पहिलं मी सांगणार… ताईचा कोणी boy-friend असेल तर ते नवलच आहे. मलाही कळू नाही दिलं तिने. लबाड आहे ताई… " हळूच काजलला तिने चिमटा काढला. 
" मीच सांगते पहिलं… माझं एका मुलावर प्रेम आहे. तोही मला like करतो. ताई ओळखते त्याला.तुमच्या पण ओळखीचा आहे. ",
"कोण ? ",
"राहुल… ",सगळेच आनंदाने आश्चर्यचकित झाले. 
" राहुल… means आपला राहुल अभ्यंकर.… ",
" हो.",
" अरे व्वा !!!… छान, मला वाटायचं फक्त मित्र आहात तुम्ही. " ,
" नाही… तो येणार होता पुढच्या महिन्यात मागणी घालायला.पण आज तुम्ही विचारलं म्हणून मी बोलले. छान ना… ",
" एकदम छान !! ",मम्मी म्हणाली. काजल तर कोमलकडे पाहत होती किती वेळ. 
" हेल्लो !!!….  ताई…. काय झालं ? कूठे हरवलीस ?", काजल भानावर आली. 
" नाही… कूठे नाही. मलाही वाटलं, तुम्ही फक्त 'friends' आहात. पण असो… congrats… ",
"thanks ताई… आता तुझी पसंत सांग, कोण आहे ते.", तशी कोमल शांत बसली. 
" सांग ना , कोण आहे ते. ",
"कोणी नाही गं … ",
" अरे !!! असं कसं… मघाशी हसलीस ती.",
"ते असंच… आणि मी कोणाच्या प्रेमात पडणार… शिवाय माझ्याही कोणी प्रेमात पडलं पाहिजे ना… घरात तर असते नेहमी बसून." कोमलला जरा वाईट वाटलं. 
" खरं ना ताई… " ,
" हो गं… अगदी खरं… ",
" मग तुला आम्ही स्थळ बघू का ? ",पप्पा म्हणाले.
" ठीक आहे. पण एवढयात नको. पहिलं कोमलचं लग्न करू. एकीने तरी ऑफिस सांभाळायला पाहिजे ना… कोमल तर तयारच आहे. मला पसंत पडेल असा मुलगा भेटायला वेळच लागेल ना. ", पप्पांना पटलं ते. 
" चालेल. तुम्ही दोघी मला सारख्याच आहात.मी राहुलच्या घराच्या बरोबर बोलतो आणि पुढचं ठरवतो." कोमल आनंदात होती. 
काजल आज त्यामानाने लवकर झोपली. राहुलला कोमलने call करून सांगितलं. त्याला आनंद झाला. येत्या week end ला सगळ्या ग्रुपमध्ये हि गोष्ट सांगायची,असं दोघांनी ठरवलं. 

                   ठरल्याप्रमाणे,दोघांनी एक छोटी पार्टी arrange केली. काजल मात्र पार्टीला गेली नाही. पार्टीतच दोघांनी ' आम्ही लग्न करत आहोत.'अस घोषित केलं. 
" हा जोक होता ना राहुल… ", अमित पुढे येत म्हणाला.
 "what joke ? आम्ही खरंच लग्न करत आहोत.",
" हे कसं शक्य आहे ?",
"काय प्रोब्लेम आहे अमित… ",कोमल बोलली. 
"प्रोब्लेम हा आहे कि माझं प्रेम आहे तूझ्यावर… आणि तेही कॉलेजपासून…",
"shut up अमित… ",
" का गप्प बसू… प्रेम करतो तूझ्यावर….आणि हा राहुल , हा कूठे आला मधेच. ",
"गप्प बस अमित… college friend आहेस म्हणून नाहीतर… ",राहुल बोलला.
" अरे… जारे, माझं प्रेम आहे तिच्यावर… तू कोण मोठा लागून गेलास रे… कोमल, तुला किती मदत केली मी,विसरलीस. या राहुलला बिझनेससाठी पैसे कमी पडत होते. तेव्हा मीच दिले होते त्याला आणि तू याच्याबरोबर लग्न करतेस… " पुढे काही बोलणार तेवढयात कोमलने त्याच्या थोबाडीत मारली.
" get out…i said get out…. चालता हो आणि पुन्हा माझ्यासमोर येऊ नकोस अमित.", अमित रागाने लाल झाला होता.
" पैशाचा माज आला आहे तुला कोमल… आणि हा राहुल… दोघांना सांगतो… लग्न करून दाखवाच तुम्ही, कसं लग्न होते ते बघतो मी." 

                 सगळ्या पार्टीचा मूड निघून गेलेला. अमित, कोमलला कॉलेजमध्ये असल्यापासून ओळखायचा. अमितचे वडील आणि कोमलचे वडील बिझनेस friends. तरीदेखील अमित आणि कोमलची ओळख कॉलेजमध्ये झालेली. घडलेला प्रकार कोमलने लगेच पप्पांना सांगितला. पप्पांना आश्चर्य वाटलं. हे भांडण बिझनेसमध्ये येऊ नये म्हणून त्यांनी अमितच्या वडिलांबरोबर बोलणं केलं. त्यांनाही अमितचं वागणं आवडलं नाही. अमितकडून त्यांनी माफी मागितली. काजलला ती गोष्ट समजली परंतु तिने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. 

                 या सगळ्यासोबत बिझनेसने जोर पकडला होता. गोवा आणि बंगलोरच्या branch आता बऱ्यापैकी settled झाल्या होत्या. बंगलोर तर कोमलला खूप आवडलं होतं आणि तिथेच लग्न करायचं तिने ठरवलं. सगळयांना तो निर्णय आवडला. शिवाय राहुलने तिकडेच स्वतःचा नवीन बिझनेस सुरु करायचं ठरवलं. त्यामुळे लग्नानंतर कोमल आणि राहुलने तिथेच राहायचे ठरवले. छान सगळं. लग्नाची तारीख ठरली. साखरपुडा झाला. लग्नाचा हॉल बुक झाला. कोमलला मनासारखा जोडीदार मिळाला म्हणून काजल खूष होती. मम्मी-पप्पा सुद्धा. २ महिन्यांनी लग्न. त्यामुळे कोमलच्या बंगलोर ऑफिसच्या फेऱ्या वाढल्या होत्या. सकाळी ऑफिसला जायची आणि संध्याकाळी लग्नाची तयारी. तिथे काजलने गोवाची branch अजून मोठी करायची ठरवलं होतं. म्हणून ४-५ दिवस ती तिथेच रहायची. कामात गुंतून गेलेली. छान चालू होतं.


---------------- X-------------------X--------------------X----------------------X------------- 

" हेलो ….inspector अभिषेक बोलतो आहे…",
" हेलो inspector… मी Mr. सावंत बोलतो आहे. प्लीज तुम्ही माझ्या घरी याल का ?… एक मोठा प्रोब्लेम झाला आहे… ",
"Mr. सावंत म्हणजे, तुम्ही ते बिझनेसमन ना… ",
"हो… हो… तोच मी.",
"ठीक आहे… अर्ध्या तासात येतो मी." आणि inspector अभिषेक निघाला. पाऊण तासाने inspector अभिषेक सावंतच्या घरी पोहोचला.

 " हेलो… Mr. सावंत. sorry जरा ट्राफिक लागलं म्हणून उशीर झाला.",
" no problem inspector, या…  आता या." ,
"OK.",
"काही चहा ,कॉफी घेणार का.",
"नको… thanks. तुम्ही call केला होतात, काहीतरी प्रोब्लेम झाला म्हणून. ",  

"हो… जरा प्रोब्लेमच आहे… ",जरा काळजीत होते Mr. सावंत.
" मग फोनवर का नाही सांगितलं. serious matter आहे का काही ? ",
" हो… माझी मुलगी.… कोमल सावंत, हरवली आहे.",
" मुलगी हरवली… मग तुम्ही शांत कसे एवढे आणि फोनवर का नाही सांगितलं मग तूम्ही…",
" नको मला भीती वाटते. ती नक्की कूठे आहे ते माहित नाही." सावंत रडू लागले.
" हे बघा… रडू नका. मला सविस्तर सांगा, नक्की काय झालं." अभिषेक बोलला.
" पाटील … यांची जबानी लिहून घ्या.… हं, सांगा आता… नक्की काय झालं ते. कूठून हरवली ती." ,
" माहित नाही…" Mrs. सावंत म्हणाल्या. 
" माहित नाही म्हणजे ?", inspector अभिषेक. 
" मी सांगतो… , नेहमीसारखी काल, कोमल बंगलोरच्या ऑफिसला निघून गेली. आज दुसरा दिवस, ती ऑफिसला गेलीच नाही. आणि तिथल्या flat वर पण पोहोचली नाही. फोन स्विच ऑफ येतो आहे. काळजी वाटते तिची खूप.",
" ठीक आहे. ". इतक्यात काजल आणि राहुल एकत्र आले.
" काय झालं पप्पा… एवढया तातडीने बोलावून घेतलं आणि कोमलने फोन बंद का करून ठेवला आहे ? " काजलने आल्या आल्या विचारलं. समोर पोलिस बघून तिला आश्चर्य वाटलं. 
" पोलिस ?? पप्पा काय झालं … आणि कोमल कूठे आहे ? ". राहुलने विचारलं. 
" एक मिनिट… तुम्ही दोघे खाली बसा." inspector अभिषेक. "यांची ओळख कोण करून देईल मला.… ",
"हो… मी सांगते." Mrs. सावंत. 
" हा राहुल… याच्याबरोबर कोमलचं लग्न आहे, पुढच्या आठवडयात. आणि हि काजल… कोमलची मोठी बहिण.",
"पण झालय काय नक्की ?" काजल… 
" तुमची बहिण, कोमल सावंत… या हरवल्या आहेत. ",
" काय? ", काजल किंचाळली.   

"OK , मी आता काही प्रश्न विचारतो. त्यानंतर तपासाला काही सुरुवात करता येईल. आणि खरी उत्तरे द्या. ",
" ठीक आहे.",
"कोमल बंगलोरला कशाला गेली होती.?",
"बंगलोरला आमचं ऑफिस आहे. ती तिकडचा व्यवहार बघायची. दर Friday ला ती तिथे जाते. शनिवारी त्या ऑफिसचा आठवडयाचा व्यवहार चेक करून रविवारी दुपारी मुंबईला यायची.",
"तिथे तुमचा flat आहे तर ",
" हो. तिला राहण्यासाठी घेतला होता. शिवाय लग्नानंतर राहुल आणि कोमल तिथेच राहणार होतो.", अभिषेक सगळं ऐकत होता. 
" आता सांगा. कोमल सावंत कधी निघाल्या इथून.?",
"नेहमी सारखी… संध्याकाळी ७ वाजता. रात्री १०.३० ची flight असते तिची, बंगलोरसाठी.",
"एकटीच गेली होती का airport ला ?", 
"नाही… driver असतो सोबत, तिला येते driving पण गाडी पुन्हा आणायची असते ना.",
"जरा driver ला बोलवा.",driver आला." किती वर्ष काम करत आहात इथे ? ",
" १२ वर्ष झाली साहेब.",
" मला जरा सविस्तर सांगा, त्यादिवशी काय केलात नक्की.",
" कोमल madam ला airport ला सोडलं आणि गाडी परत आणली.",
"किती वाजता सोडलत? ",
" ८ वाजले होते.",
"इथून एक तास लागतो का airport साठी?",
"नाही… पण जरा ट्राफिक लागलं होतं तेव्हा.",
" आणि निघालात किती वाजता?",
"लगेच… त्यांना सामान उतरवून दिलं आणि निघालो.",
" सामान ? ",
"हो… inspector. तिचं लग्नाचं सामान.",
"किती वाजता गाडी घरी आली. ? ",
"साधारण ८.३० ला.",
"म्हणजे अर्ध्या तासात… येताना ट्राफिक नव्हतं का… ? ", driver मान खाली घालून उभा राहिला. अभिने त्याच्याकडे एक नजर टाकली. आणि तो Mr. सावंत कडे वळला. 

" सामानात काही महागडी, मौल्यवान वस्तू वगैरे… ",
"हो… आमच्या दोघींचे लग्नाचे ड्रेस आणि दागिने… ", काजल खूप वेळाने बोलली. अभिला आश्चर्य वाटलं. 
" हे तुला कसं माहित… तिच्या सामानात काय होतं ते… ",
" मीच bag भरली होती. शिवाय माझ्यासोबतच जाणार होती ती बंगलोरला.",
"मग… ",
"मला एक urgent काम आलं. म्हणून ती एकटीच गेली.",
"तू कूठे गेलीस ?",
"आमच्या गोवा branch ला. दोन दिवसापूर्वीच गेले मी. सकाळी पप्पांनी call केला,घाबरलेले वाटले म्हणून जी ट्रेन मिळाली, त्या ट्रेनने आले मुंबईला.",
"ट्रेनने ? ते पण गोवावरून… ", अभी काजलच्या सामानाकडे पाहत म्हणाला. 
" नक्की तुम्ही ट्रेननेच आलात ना… ",
"का inspector?",
"नाही… एवढया लवकर बुकिंग होत नाही ट्रेनचं… तिकीटसुद्धा भेटलं पाहिजे ना.",
"inspector, काजलला भीती वाटते विमानाची… एवढंच काय… तिला गाडी चालवता पण येत नाही. म्हणून तिला स्पेशल पास काढून दिला आहे. Mumbai to Goa.",
"या madam, गोवाला असतात का?",
"हो… कोमल बंगलोरला आणि काजल गोवा ब्रांचला. दोन दिवस ती तिथेच होती." Mrs. सावंतनी माहिती दिली.
" आणि तुम्ही कूठे होतात Mr. राहुल ?",
"मी इथेच, मुंबईत. सामानाची तयारी. उद्या मी पण निघणार होतो बंगलोरला." सगळ्याच बोलणं ऐकून घेतलं अभिषेकने. 
" पाटील… सगळं लिहून घेतलंत ना.",
"हो साहेब…" ,
"चला Mr. सावंत. मी निघतो मग. तुमच्या मुलीचा एक फोटो दया मला. मग तपासाला सुरुवात करू.", तरी Mr. सावंत विचारात गढून गेलेले. अभिषेकला नवलं वाटलं. " Mr. सावंत, any problem.… अजून काही आहे का सांगायचं बाकी, आताच सांगा मग." काजल पप्पांच्या बाजूला येऊन बसली. " मला वाटते पप्पा… आता तरी सांगूया पोलिसांना." ते ऐकून inspector अभिषेकचे डोळे चमकले. 

                   " आतातरी म्हणजे …. काही लपवून ठेवलं आहे का.", अभिषेक. Mr. सावंत काजलला काहीतरी बोलले. तशी काजल, कोमलच्या बेडरूममध्ये गेली. आणि कसलीशी कागदपत्रे घेऊन आली. " inspector…. कोमल आणि राहुलचा साखरपुडा झाला. त्याचदिवशी हे एक पत्र आलं होतं." अभिने पत्र वाचलं. ' हे लग्न खूप महागात पडेल.… कोमलला.'…. अभिने मजकूर वाचला. 
" कूठे मिळालं हे पत्र ?",
" दारात… आणि त्यानंतर अशीच १० पत्र आली.", अभिने सगळी पत्र वाचली.
" हम्म… सगळ्यात एकचं मजकूर आहे. शेवटचं लेटर कधी आलं.?",
"गुरुवारी.",
" म्हणजे कोमल निघायच्या एक दिवस अगोदर.",
"हो inspector…", अभिला काहीतरी गडबड वाटली. 
" आणि हे तुम्ही पोलिसांना सांगितलं नाही कधी… बरोबर ना. ", सावंत गप्प बसले. 
" का तक्रार केली नाहीत तेव्हाच.… ",
"माझं नावं आहे business industry मध्ये. तक्रार नोंदवली असती तर मिडियाने खूप मोठा इशू केला असता. माझ्या 'Image' ला ते सूट झालं नसतं." अभिला राग आला. 
" आणि मुलगी गेली त्याचं काय ? 'Image' सांभाळत बसलेत… हं. ", सगळे शांत बसले होते." कोणी केलं असेल हे, लेटरचं. तुम्हाला कोणावर संशय आहे का? … Mr. राहुल, तुम्हाला काही बोलायचे आहे का… ","नाही.",अभिने सगळ्यावर एक नजर फिरवली. "ठीक आहे मग… एक काम करा. तिचा मोबाईल नंबर, फोटो, बंगलोरच्या flat पत्ता, ऑफिसचा पत्ता. आणि अजून काही माहिती असेल ती सगळी जमा करा. आणि पोलिस स्टेशनला या. तिकडेच बोलू. शिवाय तिचा बेडरूम सील करतो आहे. " बोलून अभी पोलिस स्टेशनकडे निघाला.  

रात्रीपर्यंत सगळी माहिती गोळा झाली. Mr. सावंत पोलिस स्टेशनमधेच होते. 
" हेलो महेश… ",
"हा बोल रे…",
"कूठे आहेस तू ? ",
"मी निघतो आहे lab मधून… का रे ?",
"येतोस का इकडे जरा ?",
"ठीक आहे. १५ मिनिटात येतो." फोन ठेवून अभिने Mr. सावंत कडे लक्ष दिलं. 
" आता एक गोष्ट करावी लागेल तुम्हाला. लग्न तर next week मध्ये आहे ना. मिडियाला सुद्धा माहित असेल ते. मग कोमल सावंत हरवली आहे, ते सुद्धा तुम्हालाच सांगावं लागेल मिडियाला. नाहीतर आमच्या पोलिस स्टेशन मधून कोणीतरी बातमी लिक करेल. कळते ना, मी काय बोललो ते. ", Mr. सावंतानी होकारार्थी मान हलवली. " आणि एक करा. पुन्हा लेटर किंवा फोन आला तर लगेच कळवा." तेवढयात महेश आला. 
" ये… महेश, Mr. सावंत… हा डॉक्टर महेश. आमचा 'forensic expert'," ,
"हो… यांना ओळखतो मी, खूप नावं ऐकलं आहे, तुमच्या दोघांचं… ",
"आणि तुम्ही बिझनेसमन , Mr. सावंत… Sorry, The Mr. Sawant.… तुमचा मुंबईमध्ये खूप मोठा बिझनेस आहे ना.",
"हो हो, तोच मी.","OK… Mr. सावंत, निघा तुम्ही आणि काही कळल तर नक्की कळवतो.","Thanks." म्हणत सावंत निघून गेले. 

"बस रे महेश… ",महेश खूर्चीवर बसला. 
" हं… बोल आता, कशाला बोलवलस रे ? ",
"असंच… time pass करायला.",
"अबे… एक दिवस लवकर घरी निघत होतो तर इकडे timeless ला बोलावलस. चल मी निघतो.",
"थांब रे, मस्करी केली. आणि त्या Mr. सावंतांना असा का बोललास, The Mr. Sawant." ते ऐकून महेश हसला. 
" ते नंतर सांगतो. पहिलं सांग. ते इकडे कशाला आलेले कि पकडून आणलास त्यांना.",
" त्यांना कशाला पकडू… त्यांना मीच बोलावलं होतं. ",
"कशाला ?",
" त्यांची मुलगी… कोमल सावंत, हरवली आहे.",
" लहान मुलगी…. शाळेतून हरवली असेल.",
"अरे मोठी मुलगी, लग्न होतं पूढच्या आठवडयात आणि गायब.",
"हा… मग पळून गेली असेल… जबरदस्ती लग्न करत असेल हा सावंत तिचा… ", ते ऐकून अभिषेकने महेशच्या पाठीत धपाटा मारला. 
" अरे, जरा respect ने बोल जरा… मोठे बिझनेसमन आहेत ते." 
" कशाला respect देऊ ?",
"का… काय झालं ?",
"नंतर… पहिलं सांग, मला कशाला बोलवलं तिथे?",
"उद्या बंगलोरला जायचे आहे.",
"कशाला ?",
"अरे, तपास करायला… , कोमल सावंत ? ",
"मग मी कशाला ? तुझं काम आहे ते… ",
"माझं काम , तुझं काम करू नकोस… येतोस का ते सांग. ",
"येतो पण तिथे कशाला जायचे. तिथल्या पोलिसांना कळव. तिथून हरवली आहे ना ती.",
"मला तसं नाही वाटत.… ही letter's बघ.", डॉक्टर महेशने लेटर वाचली. 
"छान …. म्हणजे 'missing person' ची केस नाही , kidnapping ची केस आहे तर. ",
"Yes… मला तर तसंच वाटते. तिच्या सामानात दागिने होते, पैसे होते. जवळपास ३ लाखाचे दागिने होते.",
"हो… लेटर सुद्धा type केलेली आहेत. त्यामुळे handwriting analysis करायचा प्रश्नच मिटला. हूशार आहे लेटर लिहिणारा.",
" आजकालचे आरोपी हूशार झाले आहेत.",
"हो रे… मी कोमलचे mobile details मागवले आहेत. उद्या पर्यंत माहिती येईल सगळी.","ठीक आहे, मग उद्या सकाळी निघू. चल …. Bye." 

                      महेश आणि अभिषेक airport ला पोहोचले. अभीने कालच air control कडे शुक्रवारची passenger list मागवली होती. 
" हे बघ, सावंत बरोबर बोलत होते. रात्री १०.३० च्या Flight मध्ये कोमलच नावं आहे. म्हणजे त्यांचा driver खरं बोलत आहे. कोमलने flight पकडली होती वेळेवर." त्या दोघांनी मग बंगलोरची flight पकडली आणि ते पोहोचले. तिथे गेल्या गेल्या त्यांनी air control ला contact केला आणि त्या flight ची passenger list मिळवली.
" OK… त्यादिवशी flight वेळेवर पोहोचली होती आणि कोमल सावंतचं नाव आहे इथेही. म्हणजेच ती आली होती इथे, airport ." महेश त्या लीस्टमध्ये पाहत म्हणाला.
" त्यांच्या flat चा पत्ता आहे माझ्याकडे. तिथे जाऊन काही माहिती मिळते का बघू.",अभी बोलला. 
" चालेल. बाहेर taxi आहेत. लवकर पोहोचू." महेशने taxi थांबवली. दोघे आत बसले आणि अभीने taxi driver ला पत्ता देत म्हटलं,"इस address पे जाना हे।  ". taxi driver ने दोघांकडे एक नजर टाकली." आप नये हो क्या इधर… ? ","क्यू… क्या बात हे। "," अरे साहब … वो सामने बिल्डींग दिख रही हे। वही का address हे ये। " दोघेही taxi मधून उतरले. त्याने दाखवलेल्या बिल्डींगमध्ये आले. बाहेर watchman कडे विचारपूस केली, बरोबर पत्ता होता. कोमलचा फोटो ओळखला त्याने. त्याच्याकडे असलेल्या एन्ट्री लिस्ट मध्ये, शुक्रवार किंवा शनिवारी बिल्डींगमध्ये आलेल्या व्यक्तींमध्ये कोमलच नावं नव्हतं. watchman ची कसून चौकशी केली दोघांनी. शिवाय संपूर्ण बिल्डींगमध्ये विचारणा केली. कोमल आलीच नव्हती. 
" कसं शक्य आहे ? मग ती गेली तरी कूठे ?",
"कदाचित direct तिच्या ऑफिसमध्ये गेली असेल.",
"तिथे जाऊन बघू." ऑफिसमध्ये पोहोचले तेव्हा उत्तर तेच होतं. कोमल तिथेही पोहोचली नव्हती.
" काहीतरी गडबड आहे ,महेश. ",
"हो रे… ", महेश आणि अभिषेक, एका हॉटेलमध्ये चहा पीत बसले होते. 
" हे बघ… कोमल मुंबईवरून निघाली रात्री १०.३० वाजता. साधारण १.३० तास लागतो बंगलोरला पोहोचायला. तशी ती आलीही १२.०० वाजता. flat तर इथेच आहे.… १० मिनिटांवर, walking distance. आणि एवढया रात्री ती ऑफिसला जाणे शक्य नाही. तरीसुद्धा , airport पासून ऑफिस, चालत गेला तरी २० मिनिटे, आणि flat पासून १० मिनिटं. ", महेश बोलला,
" म्हणजेच airport ते flat… या अंतरातच काहीतरी झालं आहे. ",अभी बोलला. 
" मला नाही वाटतं असं काही झालं असेल. एवढयाश्या अंतरात कसं काय शक्य होईल.शिवाय airport आहे. गजबज तर असणारच. तिच्याकडे सामान होते. इकडून kidnap शक्य नाही." दोघे विचार करत बसले. आणि बंगलोर पोलिस स्टेशन मध्ये कोमल हरवल्याची तक्रार नोंदवून ते मुंबईला आले. 

                            पुढचा दिवस, महेश त्याच्या lab मध्ये गेला. अभी पोलिस स्टेशनमध्ये त्याच केसचा विचार करत होता. दुपारी महेशला अभिने call लावला… ,"काम नसेल तर ये लवकर इकडे. ". महेशने त्याचं काम संपवलं आणि आला अभिला भेटायला. 
" काय रे, एवढया urgent बोलावलंसं… ",
" आधी खाली बस… मग सांगतो." महेश खुर्चीवर बसला.
" कोमलच्या मोबईल फोनचे details आले आहेत." अभी बोलला आणि त्याचा फोन वाजला.पलीकडून Mr. सावंत बोलत होते. 
" हेलो, inspector अभिषेक.…. काही कळलं का माझ्या मुलीबद्दल ? ",
"नाही अजून… प्रयत्न चालू आहेत आमचे.",
"हो पण जरा लवकर हा… काळजी वाटते मला. ",
"तुम्ही काळजी करू नका, आम्ही सांगतो तुम्हाला, काही कळलं तर." म्हणत अभिने call कट्ट केला. 
"एवढी काळजी वाटते ना…. मग कशाला पाठवायचं मुलीला…. स्वतः जायचे ना." अभी नाराज स्वरात बोलला.
" तो कसा जाईल…. पकडला नाही जाणार का… ",
"अरे… तुला काय राग आहे त्यांचा आणि त्यांना कोण कशाला पकडेल ? " अभी बोलला.
" तुला सांगितलंच नाही ना.… सांगतो, या सावंतचा कसला बिझनेस आहे… माहित आहे का तुला ?",
" हो… import export चा… त्यात काय." ,
"बंगलोरला, याच्यावर केस चालू आहे. smuggling ची.… हे माहित आहे तुला. "महेश म्हणाला तसं अभिला आश्चर्याचा धक्का बसला.
" हे तुला कोणी सांगितलं ? ",
" वर्षापूर्वी, मी बंगलोरला गेलेलो माहित आहे ना, एका केससाठी. तेव्हा याची news होती तिथे. केससुद्धा चालू आहे. मला वाटते म्हणून याने मुद्धाम मुलीला त्या ऑफिसवर पाठवलं असेल. किती लोकं मागे आहेत त्याच्या…. भित्रा साला… नाहीतर त्या कोमलला याचं काहीतरी कळलं असेल, म्हणून यानेच तिला गायब केलं असेल. " महेश बोलला. 
" चल रे… असं असतं तर त्याने मला कशाला बोलावलं असतं… तक्रार नोंदवली नसती. त्यांनाच माहिती आहे कि कोमल हरवली होती ते.",
"असेल तसं, बरं मला का बोलावलं ?",
"अरे बघ… विसरलो. हे बघ, जरा विचित्र वाटते, शेवटचा call मी पाहिला तेव्हा तुला बोलावलं मी. तो शेवटचा नंबर बघ आणि वेळ बघ." महेश सुद्धा ते पेपर वाचता वाचता विचारात पडला. 
" कोणाचा नंबर आहे माहित आहे का… सोलापूर रेल्वे पोलिसांचा. ",
" What… ? हे कसं शक्य आहे. ",
"मलाही विचित्र वाटते ते. म्हणून रात्रीचं मी तिथल्या एका अधिकारीला बोलावून घेतलं आहे. तो निघाला कालच, एवढयात येईल. तो आला कि कळेल नक्की काय आहे ते." अभी बोलला. 
" ह्म्म… आणखी एक कर, अभी…. तिचा मोबाईल "track" कर… म्हणजे खर काय ते कळेल. "," हो… ते लक्षात नाही आलं माझ्या." आणि लगेच त्याने तिचा मोबाईल track करायला सांगितले.    


अर्ध्या तासानी, सोलापूर रेल्वे पोलिस स्टेशनमधून एक अधिकारी आले. "नमस्कार सर, मी inspector कदम. तुमच्या बरोबर बोलणं झालं माझं.","हो हो, बसा… हं… हा नंबर तुमच्याच पोलिस स्टेशनचा आहे ना… ", त्यांनी नंबर चेक केला. 
" हो सर… आमचाच आहे.",
"OK… कोमल सावंतच्या मोबाईलवर तुम्ही call केला होता ना. ",
"means…. काही कळले नाही मला." महेशने त्यांना कोमलचा फोटो दाखवला,
" या…हो… आता आठवलं, हो… यांना मीच फोन लावला होता.",
" तुमची कशी ओळख… कोमल सावंतशी.… ",
"ओळख कशी असेल ? त्यांना तर पहिल्यांदा बघितलं मी त्यादिवशी.",
"मग फोन वगैरे काय ? ",
" अहो… या madam , त्यांची bag राहिली ट्रेनमध्ये. म्हणून तक्रार घेऊन आल्या होत्या.",
"काय ?",अभी उडालाच. " सविस्तर सांगा जरा." महेश बोलला.
" शनिवारी, माझीच Duty होती. आणि या madam आलेल्या तक्रार घेऊन.… ",
" नक्की याच होत्या ? ",
" हो… १००% " ,
" किती वाजता आल्या होत्या ?",
"साधारण १० वाजता, सकाळी. त्यांची bag राहिली ट्रेन मध्ये आणि त्या ट्रेन बाहेर. ट्रेन बरोबर bag पण गेली. ","मग… ",
" यांची तक्रार लिहून घेतली.",
"आणि त्या कूठे गेल्या त्यानंतर.",
"ते माहित नाही, हा… पण बंगलोरचा पत्ता दिला आहे त्यांनी. सामान भेटलं कि त्या पत्तावर पाठवा अस म्हणाल्या." ,
" मग तुम्ही कशाला फोन केलेला त्यांना… ?",
"असंच… miss call केलेला.… त्या तेव्हा होत्या पोलिस स्टेशनमधेच.… नंबर बरोबर आहे का ते बघण्यासाठी miss call केलेला." दोघेही विचार करू लागले. 
" साधारण किती वेळ लागतो … सोलापूर ते मुंबई.… तुम्हाला किती वेळ लागला.? ",
" १० तास पकडून चाला… तुम्ही मला रात्री फोन केलात तेव्हाचं निघालो मी. ",
" ठीक आहे,… कोमल सावंत तिथे सकाळी १० वाजता पोहोचल्या होत्या, मग मुंबईवरून कोणती गाडी आहे ?,",
" आहे… रात्री ११.३० ची एक गाडी आहे. ती ९ ते १० दरम्यान सोलापूरला येते. आणि पुढे बंगलोरसाठी निघते.",
" या गाडीचं तिकीट मिळते लगेच… ",
" हो… आता कूठे सुट्ट्याचा time आहे…. शिवाय हीच शेवटची गाडी आहे रात्रीची. त्यामुळे जास्त कोणी नसते या गाडीला. तिकीट ना, लोकल ट्रेन सारखंच मिळते या काळात." ,
" हम्म्म…. " अभीने सगळं नीट ऐकून घेतलं. " बरं, ठीक आहे. तुम्ही आता जाऊ शकता… पुन्हा काही वाटलं तर बोलवू आम्ही…" ," Thanks sir …. येतो मी. " म्हणत ते निघून गेले.  

                     महेश आणि अभिषेक दोघेही अजून विचारात गुंतून गेले. शांतच बसले होते दोघेही. तितक्यात कोमलच्या मोबाईलच लोकेशन मिळालं. " अभिषेक सर, जरा मुश्कीलनेच भेटलं, त्या मोबाईलच लोकेशन… मोबाईल बंद आहे बहुदा. शेवटचा तो शनिवारी use झाला होता. त्यानंतर स्विच ऑफ…. ", त्याने माहिती पुरवली. 
" शनिवारी… किती वाजता ? आणि लोकेशन काय आहे…. ?",
"शनिवारी रात्री… साधारण ११.१५ ते ११.३० च्या दरम्यान… त्यानंतर स्विच ऑफ…. आणि लोकेशन आहे, Goa airport… ", आता तर अभी वेडाच होणार होता. 
" तू नक्की याचं मोबाईलचं लोकेशन काढलंसं ना… बघ जरा. सोलापूरच्या आसपास असेल लोकेशन." ,
"नाही सर. तो मोबाईल शेवटी Goa airport लाच होता… last location तेच आहे.",
" Are you sure ?",
" Absolutely sure sir…. माणूस चुका करतो, मशीनस्स नाही. तेच last location आहे."," Thanks " म्हणत अभी आणि महेश पुन्हा त्यांच्या केबिनमध्ये आले. 

                           दोघांनाही काही कळत नव्हतं. महेश बोलला खूप वेळाने."OK… मला वाटते पुन्हा एकदा उजळणी करूया." अभिने होकारार्थी मान हलवली. " कोमल सावंत… शुक्रवारी रात्री ७ वाजता Mumbai airport ला निघाली, कारने. ती ८ वाजता तिथे पोहोचली. म्हणजे driver खर बोलत आहे. रात्री १०.३० ची flight… वेळेवर take off.… , Passenger list मध्ये कोमलचं नाव होतं. १२ वाजता, flight बंगलोरला पोहोचली, वेळेवर अगदी. उतरणाऱ्या प्रवाशांच्या लिस्ट मध्ये पुन्हा कोमलच नाव … म्हणजेच ती बंगलोरला पोहोचली होती. Right ? ",महेश म्हणाला. 
" अरे पण १० मिनिटांवर flat तिचा. आणि ती गायब… ", अभी बोलला. 
" हो… पुढे तुला mobile company तिच्या call ची लिस्ट मिळाली, त्यात शेवटचा call सोलापूर रेल्वे पोलिसांचा. त्यांच्या म्हणण्यानुसार, कोमल स्वतः तिथे गेली होती, तक्रार नोंदवण्यासाठी. साधारण सकाळी १० वाजता.… त्यानंतर आता mobile track केला तर कळलं, last location होतं Goa airport…२४ तासात, तीन वेगवेगळी location's… " महेश बोलला. 
" तेच तर… एकच व्यक्ती… २४ तासाच्या आत… तीन वेगवेगळ्या ठिकाणी, कस शक्य आहे हे… शिवाय तिच्यासोबत सामान, एवढया जलद प्रवास करणं, जवळपास impossible… ",
" असं कसं म्हणू शकतोस तू अभी ", महेश म्हणाला. 
"जरा विचार कर. कोमलला जायचे होते, बंगलोरला… ऑफिससाठी आणि लग्नाचं सामान, जे तिने bag मध्ये भरलं होतं, त्यासाठी.… बरं, तशी ती पोहोचली वेळेत. मग मला सांग, ती सोलापूर रेल्वे स्टेशनला काय करत होती… ? त्या ऑफिसरने तर तिचा फोटोसुद्धा ओळखला. एक व्यक्ती विमानाने पहिली बंगलोरला गेली. पुन्हा तीच व्यक्ती सोलापूरला, तेही ट्रेनने कशी काय जाऊ शकते. त्यात, कोमल बंगलोरच्या दिशेने निघाली होती, असं त्या ऑफिसरचे म्हणणे आहे. आता तो ऑफिसर कशाला खोटं बोलेलं… बरं ते राहू दे, तिची गाडी मिस झाली सोलापूरला, ते मान्य करतो मी. मग कोमल, Goa airport ला कशी जाऊ शकते… तिला तर बंगलोरला जायचे होते ना… पुन्हा सोलापूर ते गोवा, किती उलट प्रवास आहे. त्यापेक्षा ती मुंबईला परत येऊ शकली असती. तर ती मुंबईत पण नाही. " आता महेश गांगरून गेला. 

" काय म्हणायचं आहे अभी… ", महेश खूप वेळाने विचार करून बोलला. 
" एकच व्यक्ती… तीन वेगवेगळ्या ठिकाणी, तेही एका दिवसात शक्य नाही. ", 
"म्हणजे कोणीतरी चुकते आहे, तीनपैकी एका ठिकाणी.….बरोबर ना." महेश… ,
" नाही महेश… तिन्ही लोकेशन बरोबर आहेत… पहिलं… Bangalore airport, तिथली passenger list, ती खरी आहे.… नंतर ते रेल्वे पोलिस, त्यांनी तर तिला पाहिलं प्रत्यक्ष आणि नंतर हा… त्याचं म्हणणं बरोबर आहे, मशीन चुका करत नाहीत." ,
" म्हणजे ? ",
" म्हणजे महेश… काहीतरी खूप मोठी गडबड आहे… तीन ठिकाणी… एकच व्यक्ती… कोमल सावंत… " बोलता बोलता अभी खिडकी जवळ गेला. " कोमल सावंत… … कोमल नक्की गेली तरी कूठे ? "  



------------------------------------------------ to be continued---------------------------------------     


Followers