अक्षता तशीच उभी होती मोबाईलकडे पाहत…डोळ्यातून पाणी. काकूंना काही समजण्यापलीकडे. " काय झालं अक्षता… ? कशाला रडतेस ? काही प्रोब्लेम आहे का ? " , अक्षता तरी गप्पच. काही वेळ असाच गेला. काकूंनी अक्षताला त्यांच्या रूममध्ये आणलं. " हं… बोल आता… रडू नकोस… मला कसं कळणार काय झालं नक्की ते. ", अक्षताने डोळे पुसले, घोटभर पाणी घेतलं. शांत झाली. आणि काकूंना सगळी स्टोरी सांगितली.
" त्या आजी, तुझ्या ओळखीच्या होत्या का ? " ,
" नाही. " ,
" मग आता काय करणार तू … ? " ,
" काय करू ते कळत नाही." ,
" तो रस्ता मला सुद्धा माहित आहे. तिथे खूप traffic असते. आणि त्या गोलाकार बागेजवळ तर अपघात तर जवळपास नेहमीचाच. शिवाय तू बोललीस , त्या आजींना रात्रीचं दिसत नाही बरोबर. ",
" हो ना… त्या कश्या जातील घरी आता.… काकू… " ,
" खरंच गं… " ,
" आणि त्या फोन पण करत असतील मला, माझा फोन तर बंद आहे.",
" मग लाव ना charging ला फोन. " ,
" तरीसुद्धा फोन चालू होण्यासाठी वेळ लागणारच काकू… " दोघीही विचार करत बसल्या.
" आता एकच पर्याय उरला आहे, अक्षता. " ,
" कोणता ? " ,
" जे काही झालं ते विसरून जा आता. " अक्षता काकूंकडे बघत राहिली.
" कसं काय काकू ? त्या तिकडे हतबल होऊन फिरत असतील, वयस्कर बाई… रात्रीचं दिसत नाही त्यांना, घरी जायचं आहे पण रस्ता माहित नाही. फक्त मुलाच्या ओढीने त्यांना अजून घरी जायचे आहे. आणि तुम्ही बोलता विसरून जा… शक्य नाही ते. ",
" मग तू काय करणार आहेस ? त्यांच्याकडे एकच option होता. तुझा मोबाईल नंबर आणि तू सांगितल्याप्रमाणे त्या घरी जायला निघाल्या होत्या. आता तुझा मोबाईल तर बंद आहे. मग त्या काय करणार आता ? . " ,
" म्हणजे … मला काही कळत नाही , तुम्ही काय बोलत आहात ते. " ,
" यात त्यांच्या मुलाची चुकी तर आहेच, परंतू तुझी पण चूक आहे. " ,
" माझी ? " ,
" हो… तुझी चूक आहे… तू जर तेव्हाच त्यांना सांगितलं असतेस ना कि तुम्ही जिकडे असाल तिकडेच थांबा, तर बंर झालं असतं. " ,
" कसं काय ? " ,
" तो Area निदान त्या आजींसाठी तरी safe होता. कदाचित त्यांचा मुलगा त्यांना शोधत आला असता तिथे. " काकूंचं बोलणं बरोबर होतं. मी आजींना तिथेच थांबायला सांगितलं असतं तर फार बऱ झालं असतं. आपलीच चूक आहे. अक्षता दुःखी झाली.
तशीच ती मोबाईल हातात धरून बसली होती. " काय करणार तू आता अक्षता ? ", अक्षता विचार करत होती तशीच. " चल. मी चहा करते आहे, घेतेस का तुही ? " . अक्षता तशीच बसली होती. अचानक तिच्या मनात आलं काहीतरी… ती उठली आणि तशीच बाहेर पडली. तश्या काकू तिच्या मागून गेल्या. " अक्षता… अक्षता… कूठे चाललीस ? " , विचारेपर्यंत ती जिना उतरून खाली पोहोचलीही. काकूंचा आवाज ऐकून अक्षता थांबली.
" कूठे चाललीस तू ? " ,
" आजींना त्यांच्या घरी सोडायला जाते आहे मी. " ,
" तुला काय वेड लागले आहे का ? तू बरोबर विरुद्ध दिशेला आहेस आणि आता त्या कूठे असतील ते सुद्धा तुला माहित नाही. " ,
" तरीसुद्धा मला जावेच लागेल, आजींसाठी. त्यांना मला शोधावंचं लागेल, काही झालं तरी. " काकू गप्प झाल्या.
" ठीक आहे , पण अशीच जाऊ नकोस. थांब जरा , मी येते लगेच. " म्हणत काकू वर घरात धावत गेल्या. आणि लगेच हातातून त्यांचा मोबाईल घेऊन आल्या.
" घे… हा माझा मोबाईल घेऊन जा. " ,
" नको काकू… " ,
" नको कशाला, घे… आणि तुझा मोबाईल मी charging ला लावते. " ,
" आणि तुम्हाला नको का मोबाईल . " ,
" नको… तसे कोणाचे call येत नाहीत. ठीक आहे ना ? " ,
" चालेल , Thanks काकू… तुम्ही माझा मोबाईल charging ला लावा आणि त्या आजींचा call आला पुन्हा तर तुम्ही मला call करा तुमच्या मोबाईल वर " ,
" चालेल चालेल आणि काही समजलं तर तू मला call कर , घरच्या फोन वर. आणि तिथे कशी जाणार आता ? " ,
" बघते, रिक्षाने जाते, लवकर पोहोचीन तिकडे." ,
" जा लवकर आणि आजींना घरी पोहोचलोस कि मला call कर "," नक्की " म्हणत अक्षता धावत गेली.
लगेच रिक्षाही मिळाली. आणि अक्षता निघाली. इकडे काकूंनी तिचा मोबाईल charging ला लावला. अक्षता रिक्षातून जात होती. तसं तिला बरोबर विरुद्ध दिशेला जायचे होते , त्यामुळे वेळ तर लागणारच होता. अक्षता पुन्हा विचार करू लागली. आपण निघालो तर आहे आजींना शोधायला. पण त्यांना ओळखणार कसं आपण ? …. कधी पाहिलं तर नाही त्यांना आपण. फक्त त्यांचं वर्णन आहे डोक्यात.… हो… त्यांच्या साडीवरून त्यांना ओळखता येईल. निळ्या रंगाची साडी, त्यावर मोराची नक्षी… आजींचं वय असेल ६०-६१ च्या आसपास. अक्षताच्या मनात एक चित्र उभं राहिलं, आजींचं. अश्याच असल्या पाहिजे. नाहीतर मी त्यांना ओळखूच शकत नाही.
अक्षताची रिक्षा पळत होती. रिक्षात बसल्या पासून ती सारखी हातातल्या घड्याळाकडे पाहत होती. वेळ काय पटापट जात होता. जणू काही घड्याळाचे काटे नुसते पळत होते. ७.१० वाजता सुरु झालेला प्रवास, ७.३० झाले तरी सुरूच होता. अक्षता तर त्या ठिकाणाची वाट पाहत होती. " जरा जल्दी चलो ना " , अक्षता रिक्षावाल्याला सांगत होती. " अरे madam, ट्राफिक तो देखो… अभी उड के चलावू क्या… " तशी अक्षता गप्प बसली. ती तिथे पोहोचण्याची वाट बघण्याशिवाय काही करू शकत नव्हती. मजल दरमजल करत शेवटी अक्षता त्या गोल बागेजवळ पोहोचली. बघते तर ७.४५ वाजले होते. रिक्षावाल्याला पैसे देऊन अक्षता धावत त्या बागेजवळ गेली.
बाग तर समोरच होती. पण अक्षता आजींना शोधत होती. कूठे असतील … रस्त्यावर दिवे होते तरी काळोख होताच. ह्या आजी कूठे गेल्या… अक्षता सैरभैर पाहत होती. आजींचा शेवटचा फोन आला तेव्हा ७ वाजले होते. आणि जवळपास तासभराने ती तिकडे होती. या आजी कूठे तरी गेल्या वाटते, अक्षताला चिंता वाटू लागली. ६ रस्ते होते, कूठल्या रस्त्याने गेल्या असतील आजी… अक्षताने पहिल्या रस्त्याने जाण्याचा निर्णय घेतला. तिकडे जाणार इतक्यात बाजूलाच असलेल्या रस्त्याकडे तीची नजर गेली. खूप गर्दी जमली होती तिथे. " Ohhh … No " , अक्षता धावतच गेली तिथे. आजी असतील का तिथे ? अक्षता गर्दीत पोहोचली. खूप गर्दी… अक्षताला काय झालं ते कळत नव्हतं. डोकावून पाहिलं तरी काही दिसलं नाही, " क्या हूआ भाईसाहब ? " , अक्षताने एकाला विचारलं. " ऐ आजकल के लडके…बडी जल्दी होती है सबको… Bike से जा रहा था, स्लीप हो गयी बाईक… " , तरी अक्षता डोकवून पाहत होती. खरोखरंच एक मुलगा होता तिथे बसलेला. खूप जखमी झालेला होता. अक्षताला त्याची काही काळजी वाटली नाही, " Thank You देवा… " म्हणत अक्षता तिथून निघाली. थांबली. पुन्हा उलट फिरून त्या गर्दीत ती आजींना पाहू लागली. तिथे फक्त पुरुष मंडळीच होती. आजी इकडे तर नाहीच आहेत. मग कुठल्या रस्त्याने गेल्या असतील त्या. पुन्हा अक्षता, पहिल्या रस्त्याच्या दिशेने निघाली. बाजूलाच एक खड्डा खणून ठेवला होता. बहुतेक पाण्याचे पाईप टाकण्याचे काम चालू असेल. अक्षता कसल्याश्या भीतीने, त्या खड्यात डोकावून आली. हुश्श !!! कसला सुद्धा विचार करतेस तू… आजींना काही झालं नसेल, त्या सुखरूप असतील. फक्त कूठे तरी गेल्या असतील… पण गेल्या तरी कूठे… कूठे शोधू मी त्यांना… अक्षता विचार करत करत पुन्हा त्या गोल बागेजवळ आली. काहीच सूचत नव्हतं.
कूठल्यातरी एका रस्त्याने जायला पाहिजे आणि आजींना लवकरात लवकर शोधलं पाहिजे , नाहीतर अश्याच कूठेतरी भटकत जातील त्या.… पण जाऊ तरी कूठे , अक्षता डोक धरून तिकडेच त्या बागेजवळ उभी होती. विचार करत करत ती त्या बागेभोवती फिरू लागली. तेव्हाच, तिची नजर आत, बागेत गेली. बाग तशी रिकामीच होती. आत काही प्रेमी युगुलं तिथे गप्पा- गोष्टी , मस्करी करत बसली होती. पण तिथेच एका दिव्याखाली, एक म्हातारी बाई बसलेली दिसली. जरा निरखून पाहिलं अक्षताने. निळ्या रंगाची साडी… पांढरे केस… याच असतील का आजी… कळत नाही. निळ्या रंगाची साडी तर आहे, पण मोराची नक्षी कशी दिसणार ? जवळ जाऊन पाहूया का … तशी अक्षता आणखी जवळ गेली. एका बाजूने पाहिलं तेव्हा अक्षताला त्या साडीवर मोराची नक्षी दिसली. Perfect एकदम !! याच आजी आहेत. तशी अक्षता लगबगीने त्यांच्याजवळ पोहोचली. आजी अंग चोरून बसल्या होत्या, बाकड्यावर. घाबरीघुबरी नजर. सगळीकडे भीतीदायक नजरेने पाहत होत्या… Yes , याच आजी आहेत, पण घाबरल्या आहेत खूप.
" आजी… " , अक्षताने आजींना हाक मारली. तसं आजींनी वळून पाहिलं. आणि घाबरून लगेच मान वळवली.
" आजी… आजी…,मी अक्षता… तुम्ही मला फोन करत होतात ना … ती मी , अक्षता. " , हे ऐकून आजींनी लगेच अक्षताकडे पाहिलं. " हो… आजी तुम्ही हरवल्या आहात ना आणि तुम्ही मला फोन करत होतात … मी तुम्हाला तुमच्या घरी जाण्याचा रस्ता सांगत होते फोनवर…. आठवलं ना… " या आजी मला विसरल्या तर नाहीत ना.… हो, नाहीतर त्यांच्या काही लक्षात राहत नाही.
" हो…ग , पोरी. आठवलं … अक्षता ना तू… " ,
" बर झालं आठवलं ते, मला वाटलं विसरलात कि काय … " ,
" नाही गं, पण तू इकडे कूठे आलीस… ? तू तर तुझ्या घरी होतीस ना… " ,
"हो आजी,पण मला तुमची काळजी वाटली म्हणून आले मी शोधायला तुम्हाला. चला , तुमच्या घरी जाऊ आपण. ", ते ऐकून आजींना किती आनंद झाला.
" चल… चल पोरी… " , आजींना उभं राहताना सुद्धा किती त्रास होत होता. किती दमल्या असतील ना.
" चला आजी, आपण रिक्ष्याने जाऊ… मग लवकर पोहोचू. " ,
" नको, चालत चालत जाऊया. नाहीतरी ते रिक्ष्यावाले नाही आवडत मला. शिवाय घर जवळ आहे ना.",
" तुम्ही दमल्या असाल ना म्हणून " ,
"नाही… चल चालत जाऊया.… बोलत बोलत. ", या आजींना बोलायला खूप आवडते.चालेल ना. माझं पण चालणं होईल ना तेवढं .तेव्हा अक्षताच्या लक्षात आलं कि आजींच्या कमरेला बटवा नाही आहे.
" आजी… तुमचा बटवा कूठे आहे ? पडला कि काय … " ,
" माहित नाही गं… पडला असेल नाहीतर विसरले असेन कुठेतरी. " बागेत तर नाही आहे, अक्षताने शोधलं. मग गेला कूठे ? … हा… आजी त्या फोनबूथ वर विसरल्या असतील, कदाचित.
" चला आजी… कदाचित तुम्ही त्या फोनबूथ वर विसरलात बटवा. कूठे आहे तो फोनबूथ ? " ,
" लक्षात नाही, असेल इकडेच कूठेतरी. ". विसरल्या… आजी पण ना… अक्षताला काहीतरी आठवलं. तिने लगेच काकूंना call लावला.
" Hello… " ,
" Hello, काकू… मला भेटल्या आजी. " ,
" हो का, बर झालं… कश्या आहेत त्या. " ,
" बऱ्या आहेत आणि मी त्यांना त्यांच्या घरी घेऊन जात आहे. " ,
" हो. का . छान. " ,
" हा, काकू … माझा मोबाईल आता सुरु झाला असेल ना… ? " ,
" अरे हो… विसरले मी. थांब हा , चालू करते. " ,
" OK आणि चालू झाला कि सांगा मला. " ,
" हा… चालू झाला मोबाईल… काय करू आता ? " ,
" शेवटी ज्या नंबर वरून call आला होता , तो नंबर सांगता का मला . " ,
" शेवटी ना… कोणी शलाका नावाच्या मोबाईल वरून call आला होता. " . शलाका ? काकू अश्या का बोलत आहेत.
" अहो काकू… शेवटचा नंबर बघा, या आजी त्या टेलिफोन बूथ वर त्यांचा बटवा विसरल्या बहुतेक, त्यांनी तिथून call केलेला शेवटी. शलाकाने त्यांच्या आधी call केलेला मला. " ,
" अगं अक्षता, शेवटचा call शलाकाचाच आहे. " ,
" कसं काकू ? " ,
" अगं call आलाच नाही तर तो दिसेलच कसा मोबाईल वर ? " . या काकूंना काय झालंय … वेड्यासारखं बोलत आहेत , अक्षता मनातल्या मनात बोलत होती.
तेव्हा आजी म्हणाल्या," जाऊ दे गं अक्षता… नाहीतरी त्यांत पैसे तर नव्हतेच. जाऊ दे बटवा… शिवाय जुना पण झालेला. " ,
" तरी सुद्धा " ,
" नको तो बटवा मला, मला घरी सोड लवकर. मंदारला बघायचे आहे मला." नाईलाजाने अक्षताने काकूंचा call कट केला.
" चला मग , जाऊया तुमच्या घरी. " निघाल्या दोघीही.
" तुला माहित आहे ना रस्ता , माझ्या घराचा ? " ,
" तसा माहित नाही मला, पण विचारत विचारत जाऊ. " ,
" चालेल." तसं अक्षताने एकाला त्या गोल मंदिराचा रस्ता विचारला. पाचवा रस्ता. त्या रस्ताने चालत गेलं कि गोल मंदिर लागते, " चला आजी, कळला रस्ता. "
चालता चालता आजीने अक्षताला विचारले, " तुला नंतर फोन लावत होते मी, पण लागलाच नाही म्हणून या बागेत येऊन बसले मी. " ,
" अहो आजी, माझा मोबाईल बंद झाला, मग तुमचा फोन कसा लागणार मला, बरं … इकडे कोणालाही विचारलं असता ना , तर कोणीही सोडलं असतं घरी तुम्हाला. एव्हाना, तुम्ही मंदार सोबत असता आता.",
" नको गं , मला भीती वाटते अनोळखी लोकांची. " … खरंच या आजी म्हणजे ना… विचारायचे ना जरा, जाऊ दे…. या घरी गेल्या असत्या तर मला कश्या भेटल्या असत्या ना, बरं झालं , कोणाला विचारलं नाही ते… पण यांचा मुलगा तर नसेल ना फिरत यांना शोधत.
" आजी, तुमचा मुलगा मोठा आहे ना… " ,
" हो . लग्न झालं आहे, चांगला मोठा आहे तो.",
"मग तुम्हाला शोधायला कसा आला नाही तो.",
"असेल गं, तोही फिरत असेल. मी एकदा घरी पोहोचले कि मग येईल तोही. " . किती आनंदाने सांगत होत्या आजी. खूप प्रेम करतात वाटते आजी, मुलावर .
" खूप प्रेम आहे वाटते तुमचं मंदारवर… ",
" हो..ग, खूप लाडाचा आहे तो. आणि माझी काळजी पण घेतो खूप." . आजींच्या चेहऱ्याची कळी खुलली मंदार विषयी बोलताना.
" चांगला उंच आहे,अगदी वडिलांवर गेला आहे. " ,
" हो… आणि सून कशी आहे ? ".चालता चालता छान गप्पा चालू होत्या त्यांच्या.
" आहे बरी. पण मंदार सारखी नाही. जरा राग करते माझा. वय झालेली माणसं तिला आवडत नाहीत बहुतेक. " आजींच्या आवाजातला आंनद कमी झाला जरा.
" का… ओरडली का तुम्हाला ? " ,
" ओरडते कधी कधी. विसरते ना मी. मग ओरडते मला ती. कूठे काही वस्तू ठेवली कि विसरून जाते ना मी. " नको विषय काढायला सुनेचा... त्यांना आवडत नाही ते... मंदारचा विषय काढते. अजून तरी यांची इमारत लांब आहे तशी.
" दम नाही लागला ना तुम्हाला…",
" नाही … सवय आहे मला चालायची. " ,
" आजी , मंदारला काय आवडते ? ",
" मंदारला ना… फिरायला खूप आवडते. पुन्हा , त्याला ना माझ्या हातचं जेवण आवडते. मग मी सुनबाईला सांगत नाही जेवण करायला, मीच करते. तुला सांगते ना अक्षता, कधी कधी मी मीठ टाकायला विसरते, तरी तो काही बोलत नाही गं… सुनबाई लगेच बोलून दाखवते.… कूठे लक्ष असते तुमचं,मी करते जेवण… मग मी ऐकून घेते तिचं, पण जेवणाच्या बाबतीत नाही. " आजी हसत सांगत होत्या.
" मग मंदार काही बोलत नाही का बायकोला, तुम्हाला ओरडते तेव्हा. " ,
" मंदार ना… शांत आहे तो खूप. ती ओरडली तरी तिला काही बोलत नाही तो, त्याला पण ते आवडत नाही. मग मला सांगतो तो कि देवळात जाऊन बस तू .मग मी आपली , देवळात येऊन बसते जप करत देवाचा. " आजीबाई चा मुलगा शांत आहे, पण सून जरा तापट वाटते, अक्षता विचार करत होती.
बोलता बोलता त्या दोघी गोल मंदिराजवळ पोहोचल्या ते कळलचं नाही. " आजी… आज्जी , पोहोचलो आपण मंदिराजवळ. " . आजींचा चेहरासुद्धा उजळला. समोरच मंदिर होतं. अक्षता अगदी बरोब्बर घेऊन आली होती आजींना. मंदिराच्या बाजूलाच दोन इमारती होत्या , अगदी लागूनच.
" आजी… कोणत्या इमारतीत राहता तुम्ही. आजींच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. बहुतेक विसरल्या वाटते या. इमारती तर खूप उंच आहेत.
" आजी, तुम्हाला जमेल का जिने चढायला. लिफ्ट तर असेल ना. " ,
" अक्षता… मला जरा दम लागला आहे गं. मी इकडे बसते देवळात. तू मंदार भेटला कि सांग त्याला, मग तो येईल खाली." ,
" पण आजी, मी कूठे पाहिलं आहे मंदारला. " ,
" अगं, तिकडे पाटी वर त्याचा नांव आहे ना, तुला कळेल. " , OK .. OK , name list मध्ये असेल नावं मंदारच.
" पण आजी, एवढया इमारतीत मंदार नावाचा एकंच मुलगा आहे का ? " ,
" मला तरी आठवत नाही दुसरा मंदार कोणी आहे ते. " ,
" ठीक आहे आजी. तुम्ही इकडे देवळात बसून राहा, मी येते पटकन. " अक्षता पळत पळत एका इमारतीत गेली. पहिल्याच इमारतीत एक नांव होतं. मंदार सोनावणे. ५ वा मजला.
अक्षता लिफ्टने लगेच पोहोचली. ५०७ नंबरची रूम. मंदार सोनावणे. अक्षताने बेल वाजवली. एका बाईने दरवाजा उघडला.
" नमस्कार.. ",
" नमस्कार..कोण पाहिजे तुम्हाला ? " .
" तुम्ही , मिसेस सोनावणे का ? ",
" हो.. मीच." ,
" आणि तुमचे मिस्टर आहेत का घरात ? ".
" नाही,अजून आले नाहीत ते. " ,
" कूठे गेले आहेत ? " .
" हो, पण तुम्ही कोण आहात आणि कशाला एवढी चौकशी करत आहात ? ",
" त्यांची आई मला सापडली आहे, त्या हरवल्या होत्या ना." हे ऐकून त्या बाईंच्या चेहऱ्याचा रंग उडाला.
" कोण… कोण बोललात तुम्ही ? " ,
" तुमच्या मिस्टरांची आई…म्हणजे तुमची सासू. त्या हरवल्या होत्या ना, भटकत होत्या घर शोधत… त्यांना आणलं आहे मी. " अक्षता आनंदाने सांगत होती. परंतू त्या बाईंच्या चेहऱ्याचे भाव काही वेगळे होते, शिवाय त्या आता गप्प झाल्या होत्या अगदी.
न राहवून अक्षताने त्यांना विचारलं," तुमचे मिस्टर कूठे आहेत… ? ते सुद्धा त्यांच्या आईला शोधायला गेल्या आहेत ना, त्यांना सांगा फोन करून कि आई भेटल्या आहेत . " तरीही त्या गप्पच. आता मात्र अक्षताला राग आला. आजी बोलल्या त्या बरोबर होतं, त्यांच्या सूनेला वयस्कर मंडळी आवडत नाहीत. मी एवढया लांबून आले, त्या आजींना घरी सोडायला. आपला हरवलेला माणूस घरी आला आहे, त्याचं काहीनाही यांना.
" अहो… तुमच्या मिस्टरला फोन लावत आहात ना तुम्ही… बोलवा त्यांना. " अक्षताच्या वाढलेल्या आवाजाने त्या बाई दचकल्या,
" हं… हो, येतील ते आता कामावरून… ". कामावरून ? काय मुलगा आहे. आपली आई हरवली आहे आणि हा चक्क कामाला गेला आहे , कमाल आहे … म्हणून आजींना तो भेटलाच नाही. मला वाटते , मंदारने आजींना मुददाम सोडून दिलं. किंवा मी वेगळ्या घरात आले असेन.
" Madam… मला वाटते, मी चुकीच्या घरात आले असेन. त्या बाजूच्या बिल्डींगमध्ये आहे का कोणी मंदार नावाचा. ? " ,
" नाही. " ,
" अहो मग… तुमच्या सासू हरवल्या आहेत आणि त्यांचा मुलगा कामाला गेला आहे. तुम्हाला कसलाही आनंद झाला नाही, त्या आल्याचा. कसली माणसं आहात तुम्ही. " तरीही ती बाई शांतच. अक्षता आता जाम भडकली होती. ती पुढे काही बोलणार इतक्यात , मागून आवाज आला.
" excuse me… काही हवं आहे का तुम्हाला ? " . अक्षताने मागे वळून पाहिलं. एक माणूस उभा होता, ३३-३५ वय असेल . त्याला बघून त्या बाई लगेच बोलल्या,
" मंदार … यांना काहीतरी सांगायचे आहे तुला. ",
" काय सांगायचे आहे ? " , त्यावर अक्षता चिडून म्हणाली,
" तुमच्या आई सापडल्या आहेत मला. " त्यावर त्याचा चेहरासुद्धा पाहण्यासारखा होता. अक्षता दोघांकडे पाहतच राहिली. अरे… काय चाललंय हे… " तुम्हाला… जाऊ दे , तुला तुझी आई नको आहे का ? ". अक्षता मंदारकडे रागाने पाहत म्हणाली.
"एक मिनिट… तुम्ही जरा शांत रहा. आणि आपण आत घरात जाऊन बोलूया. ठीक आहे ? ". मंदार म्हणाला.
" अरे … पण तुझी आई तिकडे खाली देवळात बसली आहे. कधीपासून त्या भटकत होत्या. त्यांना तर घरात घेऊन ये. " ,
" ठीक आहे, पहिलं तुम्ही घरात तर चला. मी सांगतो सगळं. " . अक्षता रागात होती, तरी तीही दमली होती. आजींना देवळात बसू दे थोडावेळ. त्याही दमलेल्या आहेत आणि इकडचे वातावरण काही बरोबर नाही. सूनबाईला सासू आलेल्या आवडलेलं नाही बहुतेक, थोडावेळ जाऊ दे. वातावरण शांत झालं कि आजींना घरात घेऊन येऊ. अक्षता बसली.
" मी मंदार आणि हि माझी बायको, स्वाती. " ,
" हो… बोलल्या होत्या मला आजी. सून आहे म्हणून. " .
" हो का… " स्वाती म्हणाली.
" मग… खूप सांगत होत्या त्या , आम्ही चालत चालत आलो ना. छान गप्पा मारत होतो आम्ही. त्यांना बोलायला खूप आवडते ना. " अक्षता सांगत होती.
" पण तुम्हाला त्यांचा काही प्रोब्लेम आहे का… त्यांना घेऊन ये ना वरती तू . " मंदार आणि स्वाती तशीच बसून होती. यांना सांगून काही फायदा नाही. " मीच घेऊन येते त्यांना " , अक्षता जाण्यासाठी उठली.
तसं मंदारने तिला थांबवलं, " थांबा जरा, बसा खाली. " ,
" काय आहे आणि काय चाललंय तुमच्या दोघांच ? त्या वस्यकर बाई… कधीपासून एकटया फिरत आहेत… रात्रीचं दिसत नाही म्हणून नाहीतर कधीच पोहोचल्या असत्या घरी. कशाला येत आहेत, फक्त मुलाला बघायचं आहे म्हणूनच ना… आणि इकडे तर कोणाला काहीच फरक पडत नाही. मुलगा कामाला गेलेला, तर सुनेला त्या नकोच आहेत घरात… " ,
" हे बघा …. तुम्ही शांत बसा जरा.. तुम्हाला सगळं सांगतो मी. " मंदार म्हणाला.
" प्लीज… बसा खाली. " स्वाती म्हणाली तेव्हा अक्षता खाली बसली.
" तुम्ही ज्या आजींचे वर्णन केलंत, त्या कश्या होत्या दिसायला ? तो तिकडे फोटो आहे, त्या होत्या का ? " , अक्षताने फोटोकडे पाहिलं. भिंतीवरच्या फोटोमधल्या आजी त्याचं होत्या. अक्षता उठून त्या फोटो जवळ गेली.
" हो … याच तर आहेत. म्हणजे मी बरोबर घरात आले आहे.",
" हो… ती माझीच आई आहे. " ,
" हा…. मग त्या आहेत ना बसलेल्या तिथे… त्यांना घेऊन ये ना वर… " .
" माझी आई, तिला ६ वर्ष झाली हरवून." अक्षता ते ऐकतच राहिली.
" ६ वर्ष… कसं शक्य आहे ? त्या तर बोलल्या कि आम्ही दोघे फिरायला गेलो होतो आणि तुमची चुकामुक झाली." ,
" हो… बरोबर आहे ते.. ६ वर्षापूर्वी तसंच झालं होतं. आम्ही दोघे गेलेलो फिरायला. मी आणि माझी आई. तेव्हा गर्दी खूप होती,आईचा हात सुटला आणि गर्दीत ती कूठे चालत गेली ते कळलचं नाही मला. " ,
" मग त्या आजी आणि त्या फोटोतल्या आजी तर एकच आहेत… आणि तू बोलतोस कि ६ वर्षापूर्वी हरवल्या. मग त्या कोण आहेत ? " ,
" एक मिनिट ." म्हणत स्वाती उठून आतल्या खोलीत गेली आणि एक फोटो घेऊन आली. अक्षताने फोटो बघितला.
" अरे हो… हीच साडी नेसली आहे त्यांनी… In fact, याच तर आहेत त्या आजी." ,
" हा… फोटो, त्याचं दिवशी सकाळी काढलेला होता." स्वाती सांगत होती.
" आजच्याच दिवशी त्यांचा वाढदिवस असतो. तेव्हा त्यांचा ६० वा वाढदिवस होता. म्हणून संद्याकाळी घरी पार्टी होती. सासुंना साड्या खूप आवडायच्या, म्हणून मीच हि साडी त्यांना आणली होती. आवडलेली त्यांना. हीच साडी नेसून त्या फिरायला गेलेल्या. आणि हरवल्या. " स्वाती सांगत होती. अक्षताच्या ते सगळं डोक्यावरून गेलं.
" तुम्ही काय बोलत आहात ते मला कळत नाही. तुम्ही खरं सांगत आहात कि खोटं ते माहित नाही. या फोटोमधल्या आजी , त्याचं आहेत … ज्यांना मी इकडे घेऊन आले. आणि अजूनही त्या तिथेच बसलेल्या आहेत,देवळात. " अक्षता म्हणाली.
" OK , तुम्हाला कूठे भेटल्या त्या आजी ? " ,
" म्हणजे मला एक call आला होता, मोबाईल वर . त्याचं आजींनी call केलेला. तुझा नंबर समजून त्यांनी मला फोन लावला. त्याचं बोलल्या, त्या हरवल्या आहेत ते. मग त्यांना मी सांगितलं कसं घरी जायचे ते. तू त्यांना तुझा नवीन नंबर का नाही दिलास ? माझाही मोबाईल बंद झाला तेव्हा मी आले शोधत त्यांना आणि नशीब भेटल्या मला त्या. मग त्यांना इकडे आणलं मी. "
" तुमचा नंबर कोणता आहे, मोबाईलचा ? " ,
"८३१९५०७८९० " तो नंबर ऐकून दोघांनाही अचंबा वाटला. अक्षताला ते लगेचच कळलं.
" काय झालं ? " ,
" तुम्ही ५ व्या व्यक्ती आहात. ".
" Means what ? " .
" हा नंबर पहिला मंदारचा होता, पण सासू हरवल्या त्याचं दिवशी त्याचा मोबाईल सुद्धा हरवला होता. नंतर त्याने त्यांचा मोबाईल नंबर बदलला होता. आता वेगळा आहे. " ,
"हा… मग त्याचा काय प्रोब्लेम आहे ? " , अक्षताने विचारलं.
" मी सगळं सविस्तर सांगतो तुम्हाला. मग तुम्हीच ठरवा कि खरं काय नी खोटं ते." .
" पण तुझी आई, ती देवळात बसून असेल ना अजून. तिला तर घेऊन ये आधी. " अक्षता म्हणाली.
" तुम्ही पहिलं ऐकून तर घ्या, पुढंच नंतर बघू. " स्वाती म्हणाली. अक्षताला काहीतरी गडबड जाणवली. " ठीक आहे, सांगा काय ते ? "
" OK, ६ वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आईचा ६० वा वाढदिवस होता. तिला माहित नव्हत ते. actually तिच्या काहीच लक्षात राहायचं नाही. पण स्वातीच्या लक्षात होतं ते, म्हणून आम्ही सकाळी घरच्या घरी पार्टी केली, केक वगैरे कापून. आणि संध्याकाळी मोठी पार्टी ठरवली होती, आईला फिरायला खूप आवडायचं. मी तिला घेऊन जायचो नेहमी. त्या दिवशीसुद्धा असंच आम्ही फिरत होतो. काहीतरी होतं त्यादिवशी. नक्की आठवत नाही मला, पण खूप गर्दी होती. त्या गर्दीत माझा मोबाईल कोणीतरी चोराला. त्यात नकळत आईचा हात कधी सुटला ते कळलंच नाही मला. मीही विसरलो मोबाईलच्या नादात. दरम्यान आई कूठेतरी चालत गेली गर्दी सोबत. संध्याकाळची वेळ होती ना आणि आईला काळोखात दिसायचे नाही. कूठे गेली ते कळलंच नाही मला. कितीतरी वेळ तिला शोधत होतो मी. रात्री ११ वाजता घरी आलो. मला वाटलं आली असेल घरी ती. पण आलीच नाही ती. खूप रडलो मी तेव्हा. मोबाईल च्या नादात आईला विसरलो मी. ",
" मग काय केलंत तुम्ही ? आईला शोधायचा प्रयन्त नाही केलास का ? " अक्षताने पुढे विचारलं.
" केला, खूप प्रयन्त केला शोधायचा. मी आणि मंदारने. जवळपास ६ महिने शोधत होतो. पण त्या भेटल्याच नाही. पोलिसांना सुद्धा नाही. त्यांची Missing Person मध्ये अजून केस चालू आहे, पोलिस स्टेशनमध्ये. " स्वातीने माहिती पुरवली.
पुन्हा अक्षताच्या डोक्यात काही शिरलं नाही.
" ठीक आहे. मग मला भेटल्या त्या… त्या तर तुझ्या आईचं आहेत ना कि कोणी सारखी दिसणारी दुसरी व्यक्ती आहे ? आणि मघाशी तू बोललीस , ५ वी व्यक्ती… म्हणजे काय ? " , अक्षताने विचारलं.
" तुम्हाला जी बाई भेटली किंवा नाही भेटली, त्यावर मी काही बोलू शकत नाही. पण तुमचा मोबाईल नंबर आणि या घटनेचा संबंध आहे. " ,
" कोणता संबंध ? " ,
" आई हरवली तेव्हा,तिच्याजवळ तिचा बटवा सोडला तर बाकी काहीच नव्हतं. पैसेही नव्हते. असतील ते पण थोडेच होते. आणि मी माझा मोबाईल नंबर त्या बटव्यात एका कागदावर लिहून ठेवला होता." ,
"हो … आजी बोलल्या तसं मला. " ,
" तर गेल्या ४ वर्षात तुमच्या सारख्याच, ४ व्यक्तींनी मला हेच सांगितलं कि तुमच्या आई भेटल्या मला. पहिल्या वेळेस जेव्हा एक माणूस मला सांगत आला होता आईबद्दल तेव्हा मला किती आनंद झालेला ना. मी तर धावतच गेलेलो, आईला भेटायला. पण ती नव्हतीच तिथे. मला वाटलं, तो माणूस माझ्याबरोबर मस्करी करत आहे. परंतु त्याने मला किंवा माझ्या आईला पहिलं कधीच बघितलं नव्हतं, तरीही त्याने आईचा फोटो बरोबर ओळखला. तुमच्या सारखंच तो आईला मंदिरात बसवून मला बोलवायला आला होता. आई नव्हतीच मंदिरात. तेव्हा सुद्धा खूप शोधलं मी आईला. नव्हतीच ती. तेव्हा त्या माणसाचा मोबाईल नंबर घेऊन ठेवला होता. दुसऱ्या वर्षीही तसंच झालं. तेव्हाही मी नंबर घेऊन ठेवला होता. थांबा जरा."म्हणत मंदार उठला आणि त्याने कपाटातून एक फाईल काढली.
त्या फाईल मध्ये, आजींचा फोटो, त्यांची हरवल्याची तक्रार आणि काही कागदपत्र होती.
" हे बघा. त्या ४ व्यक्तींचे पत्ते आणि नंबर लिहून ठेवले आहेत. तुम्हीही चेक करा." अक्षताने फाईल घेतली. अक्षताचा चेहरा आता बघण्यासारखा होता.
" त्यात तुम्हाला एक गोष्ट कळली असेल. सगळ्यांचे मोबाईल नंबर एकच आहेत, जो आता तुमचा नंबर आहे.",
" अरे… हो… नंबर तर एकच आहे, माझाच नंबर आहे हा… पण सगळ्यांचे नंबर सेम कसे ? " ,
" पहिला हा नंबर माझा होता, तो नंतर मी बदलला. तो फिरून पुन्हा use मध्ये आला. तेव्हा तो त्या माणसाला भेटला, त्यानेही तो change केला तेव्हा दुसऱ्याला भेटला. तिसऱ्या आणि चौथ्या वेळेला, त्यांना मीच सांगितलं होतं कि नंबर change करा तुमचा. शिवाय मोबाईल कंपनीतसुद्धा मी एक अर्ज केलेला, कि हा नंबर कायमचा बंद करण्यासाठी. आणि आता तो नंबर तुम्हाला मिळाला. बरोबर ना… " अक्षताने होकारार्थी मान हलवली.
" म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे आहे ? त्या देवळात बसलेल्या आजी…. " अक्षता बोलता बोलता थांबली.
" आम्हालाही तेच कळत नाही. जर तुम्हाला आणि त्या इतर ४ जणांना आई दिसली तर मग मला का नाही दिसत." मंदार दुःखी झाला. अक्षता तर अशीच बसून राहिली होती गप्प. थोडावेळ तर कोणीच काही बोलले नाही. आता इकडे थांबून काही उपयोग नाही, अक्षता मनात बोलली.
" निघते मी." अक्षता म्हणाली.
" थांबा… मी पण येते सोबत." स्वाती म्हणाली आणि दोघीही इमारतीच्या खाली आल्या. अक्षताने पुन्हा एकदा त्या मंदिरात डोकावून पाहिलं. मंदारच बोलणं बरोबर होतं, त्या नाहीच होत्या तिथे बसलेल्या. स्वातीला ते कळलं होतं.
" हे बघा, तुम्ही जास्त विचार करू नका आता. तो तुम्हाला भास झाला असेल. नाहीतर वेगळं काहीतरी. इतरांचे अनुभव सुद्धा असेच होते, विलक्षण जरा. " ,
" असेच म्हणजे ? " .
" तुम्ही सांगितलं ना… तुम्हाला call आला, मी हरवले आहे. घरी जायचे आहे. वगैरे वगैरे… तसेच इतर जणांना call आले.",
" हो ? ",
" आणि तुम्हाला call आला तेव्हा ६.३० वाजले असतील ना… ",
"तुम्हाला कसं माहित ? " ,
" कारण इतर जणांनीसुद्धा तेच सांगितलं. शिवाय ६ वर्षापूर्वी मंदारची आई हरवली तेव्हा ६.३० चा कालावधी होता." अक्षता आता गांगरून गेली होती.
" माझ्या सासुंना तेव्हा वयामुळे काही लक्षात राहायचं नाही. नाहीतर त्या हरवल्या तेव्हाच घर शोधत आल्या असत्या. लक्षात राहायच्या त्या फक्त दोन गोष्टी. एक म्हणजे मंदार आणि दुसरं म्हणजे त्याचा मोबाईल नंबर. शिकलेल्या नव्हत्या त्या , पण तो नंबर मात्र त्यांच्या बरोब्बर लक्षात राहिला होता. म्हणून कदाचित तुम्हाला फोन येत होते. " अक्षता नुसतं ऐकत होती. तितक्यात देवळातले पुजारी बाहेर आले.
स्वातीने त्यांना थांबवलं." काका,… यांना तुम्ही पाहिलंत का देवळात आलेल्या ते… ? " ,
" हो " .
" या एकट्याच होत्या का ? कि कोणी सोबत होतं ? " ,
" नाही. एकट्याच होत्या आणि काहीसं बडबडत होत्या एका बाजूला बघून. मला वाटलं कि काही माणस देवाकडे साकडं घालतात ना , तसं काहीतरी करत आहेत. " आणि पुजारी निघून गेले.
" पाहिलंत का … त्या पुजारी काकांनी सुद्धा पाहिलं नाही त्यांना. तुम्ही फक्त ५ जण आहात,ज्यांना त्या दिसल्या आणि इथं पर्यंत आल्या. ",
" पण तुम्हाला का दिसत नाहीत त्या, आम्हालाच का दिसल्या ? " अक्षता बऱ्याच वेळाने धीर करून बोलली.
" माहित नाही का ते आणि त्यांचं काय झालं ते ही माहित नाही मला. पण एक होतं, त्यांचा खूप जीव होता मंदारवर. कधी मंदारला उशिरा झाला तरी त्या घाबरायच्या. त्यांना नेहमी मंदार त्यांच्या जवळच राहावा असं वाटायचं. आता माझा भूत, प्रेत, आत्मा यांवर विश्वास नाही. पण मंदार खूप अंधश्रदाळू आहे. तो म्हणतो ती मला शोधत असेल. म्हणून जो नंबर पहिला मंदारचा होता आणि त्यांच्या लक्षात होता, त्याचं नंबर वर call आले, तेही आजच्याच दिवशी, त्यांच्या वाढदिवशी, त्या हरवल्या त्याचं वेळेला. फक्त त्या या देवळापर्यंत येतात आणि नंतर त्यांचा काही पत्ता लागत नाही. आता ते काय आहे ते मला माहित नाही." अक्षताला काय बोलावं ते कळत नव्हतं.
" मला वाटते, जे इतरांनी केलं तेच तुम्ही सुद्धा करा. मोबाईल नंबर बदला तुम्ही. आणि मीही पुन्हा अर्ज करते , तो नंबर कायमचा बंद करण्यासाठी.… खूप जणांना त्याचा त्रास होतो आहे. " . अक्षता अजूनही देवळात पाहत होती.
" मला वाटते, तुम्हाला आता निघायला हवे. खूप लांबून आला आहात तुम्ही." ,
" हो " , अक्षता भानावर आली. " निघते मी , तुम्ही जा तुमच्या घरी. " ,
" Take Care, आणि सांभाळून जा घरी…. Bye Bye. "
अक्षता निघाली घरी… काय झालं नक्की… आपण खरोखर भेटलो का आजींना… कि भास झाला आपल्याला. विचार करत करत ती त्या गोल बागेजवळ आली. अचानक तिला काहीतरी आठवलं, काकूंना विचारलं तेव्हा त्या काय म्हणाल्या, कि call आलेच नाहीत तर ते मोबाईल वर कसे दिसणार ?… याचा अर्थ काय ?, तिने काकूंना पुन्हा फोन लावला.
" Hello काकू… " ,
" कोण बोलतंय ? " ,
" अक्षता बोलतेय. ",
"हा बोल गं अक्षता… आजींना घरी सोडलंसं का ? " ,
" ते नंतर सांगते मी. पहिलं तुम्ही माझ्या मोबाईल वर चेक करा जरा… आणि शेवटचा call कोणाचा होता ते सांगा. " ,
" थांब हा जरा. " म्हणत काकूंनी आलेले नंबर चेक केले.
" हा… तुला मघाशी बोलले ना मी… शेवटचा नंबर शलाकाचा आहे. ",
" आणि त्यांच्या आधी कोणाचा नंबर आहे ? " ,
"मला वाटते कि तो कोणतातरी कंपनीचा सर्विस call आहे. आणि त्यांच्या आधी तुझ्या एका मित्राचा call आहे.",
" Thanks काकू. " म्हणत अक्षताने call बंद केला.
मग आजींनी मला call केलेचं नाही का, विचित्र आहे काहीतरी. आजींचा शेवटचा call , या बागेजवळूनच आला होता… इकडे कूठेतरी टेलिफोन बूथ असला पाहिजे. अक्षताने संपूर्ण बागेभोवती फेरी मारली. एकही टेलिफोन बूथ तिच्या नजरेस पडला नाही. हि गोष्ट जरा डोकं सुन्न करणारी होती. तरीही , अक्षताने तिथेच उभ्या असलेल्या, ट्राफिक पोलिसाला विचारलं, "अहो काका… इकडे एखादा टेलिफोन बूथ आहे का कूठे जवळपास ? " , " नाही madam , इकडे नाही आहे कूठेच, परमिशन नाही आहे इथे टेलिफोन बूथ . मोठा रस्ता आहे ना म्हणून. " , "Thank You . " म्हणत अक्षता पुढे आली चालत चालत. तीन रस्त्यांच्या सुरुवातीला आली ती. इकडे त्या आजी घाबरल्या होत्या म्हणून त्या टेलिफोन बूथ मधल्या बाईंनी त्यांना रस्ता सांगितला होता. तो तरी टेलिफोन बूथ असला पाहिजे इथे. तिने पाहिलं सगळीकडे. एका कोपऱ्यात एक टेलिफोन बूथ दिसला तिला. तशी ती धावत गेली तिथे. एक माणूस होता उभा तिथे. " काका… इथून मघाशी कोणी आजींनी फोन केलेला का … ? आणि इथल्या बाई कूठे गेल्या टेलिफोन बूथ मधल्या. ? " . तो माणूस तिच्याकडे बघतच राहिला. " कोण बाई आणि हा टेलिफोन बूथ , मी २ दिवसांनी उघडला आहे, मला बंर नव्हतं म्हणून. मग कोण कसा फोन करेल इथून." डोकं बधीर होतं आलेलं अक्षताचं.
काकूंचं बोलणं बरोबर होतं मग. संध्याकाळी मित्राचा call आला म्हणून मला जाग आली. तो call , त्यानंतर एक लोन साठी call आलेला आणि नंतर शलाकाचा call आला तो…. म्हणजे मला भास होतं होता… कसं काय… काकूंचा बोलणं तिला आठवलं पुन्हा," call आलेलेच नाहीत तर दिसणार कसे ? " … call आलेलेच नाहीत मला. … आजींनी call केलेलेच नाहीत, म्हणजे आजी…. त्या थंड हवेत सुद्धा अक्षताला घाम फुटला.
आजींनी … मला चुकून call केलेलाच नव्हता. त्यांनी त्यांच्या मुलाच्या मोबाईल वर call केलेले होते सगळे. त्यात त्या आईची काही चुकी नव्हती, त्या आईला मुलाशी भेटायचं होतं फक्त… call चुकीचे नव्हतेच मुळी. अक्षताला आठवलं… आपणच तो मोबाईल नंबर निवडून घेतला होता, आवडला होता म्हणून . आजींचा पहिला call आला तेव्हा आपण त्यांना बोललो होतो , कि तुम्ही चुकीचा नंबर लावला आहे. call चुकीचा नव्हताचं. तो नंबरचं चुकीचा निवडला होता, चुकीचा नंबर…… Wrong Number …. !!!!
----------------------------------------------------The End-----------------------------------------------
Wrong Number…!! ( ( भाग दुसरा ) KHUP CHAN AAHE..... mala aani mazya friends pn khup aavdla.... Great job. Apratim.....vachtana ekdam bharaoon gelo hoto.
ReplyDeletekhup chan...............
ReplyDeleteNice Story....Kahani Mein Twist Hain.... good !!!!
ReplyDeletereally nice story vinit i ike it......good.........
ReplyDeletekhup sundar..........
ReplyDeleteछान खुलवत नेली आहे गोष्ट पण शेवटी असा प्रश्न पडला की मुलाने तो क्रमांक का बंद करावा? जर असा फोन येतो मुलाचा म्हणून तर उलट त्याने तो फोन नंबर स्वत:ला मिळतो का ते पहायला हवं.
ReplyDeleteStory chan aahe... Pan shevti mandar to number aaplykade badlun gheto ase lihles tar aankhinach chan hoil...
ReplyDeleteMulane number badlayla nako hota.
ReplyDeleteKhup chhan story ahe
ReplyDeletecorrect mulane no. badalayla nako hota.
ReplyDeletenice best
ReplyDeletewrong no .........................its best
ReplyDeletevachayla suruvat keli tevha tya aajji nchi khup kalji vatat hoti, as vatat hot ki tya pohachtil ki nahi ghari, but 2 part mde samprn chitrach badalun gel........
ReplyDeleteपहिल्या भाग आणि दुसर्या भागात खूपच फरक आहे, पहिल्यांदा खरी वाटणारी गोष्ट अचानक काल्पनिक झाली !!!
ReplyDeletemobile च्या अधीन झालेलं लोक आजच्या mobile च्या युगात mobile ला charging नसली कि माणूस कसा अस्वस्त होते अगदी हुबेहूब explain केलाय !
आणि हा या लेखात पाउस दिसलाच नही कुठे .............☺
Its Really awesome story
ReplyDeletedonhi bhag he ek mekanashi vegli aahet, kahani chann aahe, shevti mandar ne to no swathala gheun aajichya vad-divsi swatha tyanchyasi bolun end kela asta ter ajun chan vatla aste.
ReplyDeleteAwesome story....
ReplyDeleteNice story......no badalla nasta tr story made twist kutun ala asta?
ReplyDeletenice....ending
ReplyDeleteYes he has to take that mob number again to meet his mother, if he really love his mother......
ReplyDeleteछान स्टोरी...
ReplyDelete