All the contents on this blog are Copyright Protected.

All the contents on this blog are Copyright Protected.

MyFreeCopyright.com Registered & Protected
Protected by Copyscape Duplicate Content Software

Saturday, 13 October 2018

" रातराणी.... (भाग १ ) "

          तोच समुद्र किनारा..... तोच निळाशार पसरलेला अथांग सागर... पायाखाली असंख्य शंख -शिंपले.... आणि .... आणि रातराणीचा सुगंध.... तेच स्वप्न... 

 विनयला जाग आली कसल्याश्या आवाजाने.. हळूच डोळे उघडले त्याने. बाजूला चंदन होताच, 
" बाहेर पाऊस पडतो आहे का रे.. "  
" नाही ...आता कसा पाऊस.. हिवाळा सुरु आहे... पावसाळा संपून २ महिने झाले... झोप तू... तूला भास झाला असेल.. " ,
" नाही रे... अजूनही आवाज येतो आहे पावसाचा मला... माझ्या कानात घुमतो आहे आवाज त्याचा... सरींचा... पागोळ्यांचा... पानावर पडणाऱ्या थेंबांचा... " चंदनला गहिवरून आलं. 
" झोप शांत... नको करुस विचार... " 

विनय तसाच उघड्या डोळ्यांनी छताकडे बघत होता. चंदन बघत होता त्याच्याकडेच. कसा होता आधी... किती बोलके , पाणीदार डोळे... आता खोल गेले होते.. निस्तेज.... कसलेच भाव नसलेले... जेव्हा पहिल्यांदा भेटला तेव्हा कसा होता ना... चंदनला आठवलं काही.. " विनय... आठवतो का तुला... तुझा ऑफिस मधला पहिला दिवस... सारखा बोलतोस ना, कधी विसरणार नाही ते दिवस म्हणून... " विनयला आठवलं ते... एक छान smile आली त्याच्या सुकलेल्या ओठांवर.... अलगद डोळे मिटले त्याने .. आणि ते दिवस आठवू लागला. 

============================================================

" ओ साहेब... तीतं नका लावू गाडी... अवि साहेब गाडी लावतात तीतं... " watchman धावत आला. तोपर्यंत विनयने त्याची bike पार्क केली होती. 
" राहू दे ना काका... याच ऑफिस मध्ये आहे मी जॉबला... ज्यांची हि पार्किंग आहे. " विनय सांगत होता. 
" हो सर.... पन अवि साहेब ऐकणार नाहीत... " आणि मागून bike चा आवाज आला. 
" घ्या.. आले ते साहेब... आता तुमीच काय ते बघून घ्या... " एक bike येताना दिसली त्याला. त्यावर जाडसर मुलगा.. जाडसर नाही... जाडाच होता तो. डोळ्यावर गॉगल... मध्यम उंची.. विनय निरखून पाहत होता त्याला. बघे पर्यंत आला तो विनय जवळ bike घेऊन. 

" ओ काका... कोणाची गाडी हाय इथं.. " अव्या bike वर बसूनच ओरडला. त्यांनी जागेवरूनच, विनय कडे बोटं दाखवलं. अव्याने विनयला पायापासून डोक्यापर्यंत निरखून पाहिलं. 
" ओ !! इथे फक्त आमच्या ऑफिस मधलेच गाडी लावू शकतात.. वाचता येतं नाही का... दुसरीकडे लावा गाडी... " ,
" मी याच ऑफिस मध्ये जॉबला आलो आहे.. जागा मोकळी होती म्हणून लावली bike .. " ,
" आमच्या ऑफिस मध्ये... कधी दिसला तर नाही...ते असुदे... माझी जागा आहे ती... तुमची गाडी काढा तिथून... " अविचा आवाज जरा वाढला. 
" अहो .. असू दे कि... इथे सावली सुद्धा आहे bike साठी.... " अवि तापला. 
" ओ काका !!! शांतपणे सांगतो तर कळत नाही का... अ पासून भ पर्यंतच्या बाराखडीच्या... सर्व शिव्या येतात मला.. आणि लिहून सुद्धा देऊ शकतो.. पण ते ऑफिसच्या बाहेर.... देऊ का example ... " अविचा चढलेला आवाज ऐकून आणखी एक मुलगा धावत आला तिथे. 

" काय झालं अव्या.. सकाळ सकाळ.... तुझा आवाज त्या गेट पर्यंत येतो आहे.. " ,
" अहो .... इथे जागा मोकळी होती म्हणून लावली गाडी... त्यात आज माझा पहिला दिवस आहे ऑफिस चा... मला काय माहित यांची जागा आहे ते.. " विनय कळवळून बोलला. 
" असं आहे तर... अव्या ... जाऊ दे ... एक दिवस माफ कर... त्याला माहित नाही ... उद्या नाही लावणार गाडी तिथे... " अव्याचा राग शांत झाला. 
" तू मध्ये आला म्हणून... नाहीतर... " अव्या पुन्हा विनय कडे पाहू लागला. " आज पहिला दिवस आहे तुझा... पहिलं दिवस देवाचा.. म्हणून सोडून दिलं तुला... उद्या दिसली ना तुझी bike इथे... तर समोर बघ, तिथे मोठा नाला आहे.. त्यात दिसेल तुझी bike पार्क केलेली.. " अविने त्याची bike दुसरीकडे लावली आणि तावातावाने निघून गेला. 

" खरंच आमच्या ऑफिसला जॉईन झालास तू.... बघितलं नाही कधी... " ,
" पाहिलंच दिवस ना माझा... ",
" अरे हा ... बोललास तू.. " ,
" but थँक्स,... तुम्ही आलात म्हणून नाहीतर मारलं असतं मला.. " ,
" हो... उद्या पासून जरा बाजूलाच लाव तुझी bike .. by the way ... मी चंदन... ", 
" Hi .. मी विनय .. " दोघांनीही हात मिळवले. 
" कोणत्या डिपार्टमेंट मध्ये आहेस.. " .
" मी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे... IT डिपार्टमेंट मध्ये जॉईन केलं आहे.. " ,
" अरे व्वा !! मी पण तर  IT डिपार्टमेंट मध्येच आहे.. छान.... बरं , चल आता... वेळ झाली ऑफिसची.. " दोघे बोलतच ऑफिस मध्ये शिरले. 
" wait !! .... तुझा interview कोणी घेतला.. IT डिपार्टमेंट मध्ये तर मीच घेतो interview ... " चंदन आश्चर्यचकित झाला. 
" actually , मोठया सरांनी घेतला interview ... " विनय हळू आवाजात म्हणाला. 

" ओह्ह !! .... मोठीच सेटिंग आहे... मज्जा आहे तुझी... " चंदन हसत म्हणाला. 
" तसं नाही सर ... मी फक्त experience साठी आलो आहे. ", 
" मस्करी केली रे... आणि सर काय... चंदन बोल... तुझ्या एवढाच आहे मी.. " ,
" तरी.. माझ्यापेक्षा जास्त वर्ष झाली ना इथे.. मोठेच तुम्ही... " विनयच्या त्या वाक्यावर चंदन हसू लागला. 

" एक सांगतो तुला.... विनय ना... हा... या आपल्या field मध्ये कोणी कोणाचे सर , मॅडम नसते..ते मोठे बॉस आहेत ना... त्यांना सर चालते बोलले तर ...  त्यामुळे एकेरी बोलला तरी चालेल सर्वांना... " ,
" सर नाही.... तर मग... friend हाक मारू का... ते चालेल ना... " त्यावर चंदन ने विनयच्या खांद्यावर हात ठेवला... 
" एकवेळ सर चालून जाते... मित्र , friendship ... नाही चालत इथे आता... office colleagues आहेत सर्व आता.. असंच बोल " विनयला काही कळलं नाही.. " चल आता कामाला लाग.. " चंदनने त्याचा PC सुरु केला. 

" मी जरा मोठ्या सरांना भेटून येतो... " विनय सरांना भेटायला गेला. चंदन आणि इतर कामाला लागले. दिवसभरात विनयने त्याचे काम समजून घेतले. ऑफिस ची थोडी तोंडओळख करून घेतली. वेळ झाली तसा संध्याकाळी घरी निघून गेला.  

पुढल्या दिवशी , विनयने आठवणीने त्याची bike दुसऱ्या जागी लावली. चंदन आणि आणखी १-२ सोबत ओळख... चंदन पहिल्या दिवशी भेटला म्हणून .... आणि बाकीचे , याची मोठया सरांची ओळख होती म्हणून विनयला ओळखत होते. हळूहळू समजलं त्याला... इथे काहीतरी वेगळं आहे. १ ऑगस्ट ला जॉईन झालेला तो... आता त्याला १२ दिवस झाले होते ऑफिस मध्ये. 

" हे चंदन... १५ ऑगस्ट जवळ आला आहे. " ,
" मग ? " , चंदनने त्याची pc मध्ये घुसलेली मान बाहेर न काढताच विचारलं... 
" अरे !! मग साजरा नाही करत का .. decoration.... पार्टी वगैरे.. " विनय किती उत्साहात सांगत होता. 
" तुला कोणी सांगतील हे असं... इथे नसते पार्टी वगैरे.. " चंदन विनय कडे पाहत म्हणाला. 
" ते लंच हॉल मध्ये ... फोटो लावले आहेत ते... " ,
" ते जुने आहेत.. आता काहीच सण साजरे होतं नाहीत ... " चंदन पुन्हा कामाला लागला. 
" का पण "...... विनय .... 
" काय करायचे आहे तुला... काम नाही का तुझ्याकडे.. नसेल तर गप्प बसून राहा.. " चंदन जरा रागात बोलला. विनय शांत बसून राहिला. मग चंदनलाच कस तरी वाटलं. 
" सॉरी यार... पण हा विषय नको... आपण lunch time ला बोलू ... चालेल ना... " विनयला पटलं. 

दुपारी जेवताना दोघांच्या गप्पा सुरु झाल्या. " हे फोटो २ वर्षांपूर्वीचे आहेत.. तेव्हा शेवटचा सण... नाताळ साजरा झाला होता. तेव्हापासुन ... गेल्यावर्षी ... एकही सण ... काही celebration झालेलं नाही या ऑफिसमध्ये... ", 
" पण व्हायचे ना .... celebration... आता का होतं नाही... " ,
" व्हायचे... म्हणजे नुसता धिंगाणा.. असायचा ऑफिस मध्ये... आता कस शांत वाटते.. बिलकुल नव्हतं असं ... गजबजलेलं असायचं... प्रत्येक दिवस छान असायचा... दर friday ला दुपारनंतर काहीतरी कार्यक्रम असायचा. आता काहीच होतं नाही... काही गैरसमज झाले... भांडणं झाली... याला एक वर्ष झालं... सगळं बंद झालं... " , 
" कोणामध्ये भांडणं झाली... " ,
" एक टीम होती आमची... म्हणजे सगळ्या ऑफिसमध्ये काही active मंडळी होती या टीम मध्ये... तशी ५ जणांची टीम होती. तेच सर्व ठरवायचे... त्यातच भांडणे झाली. टीमचं ब्रेक झाली... कोण करणार साजरे सण... "  

" पुन्हा ती टीम active होणार नाही का ... " , 
" नाही ... अशक्य वाटते... सगळयांना इगो असतो ते माहित आहे ना तुला.... या सर्वाना , इतरांपेक्षा जरा जास्तच आहे. इगो दुखावला, भांडणे झाली. सगळे वेगळे झाले... ", 
" होते कोण ... " ,
" ५ जणांची टीम.... त्यातला एक मी... बाकीचे चार... जबरदस्त आहेत... जंगलात जसा सिंह असतो, सगळ्यांवर वर्चस्व गाजवणारा... तसेच, हे ४ जण ऑफिस dominate करतात.. एकाला  तर भेटलास त्यादिवशी... " ,
" अवि सर .. ? " ,
" सर नाही... अव्या ... अविनाश, दुसरी दिक्षा, तिसरी अनुजा आणि शेवटी हेमंत... " ,
" झाली ना टीम... मग एकत्र आणूया त्यांना... " चंदन हसला या वाक्यावर... " खरंच बोललो मी, try तर करूया ना.... पण हसतो का तू... " ,
" सोप्प नाही ते... तू नवीन आहेस... एकाला तरी ओळखतॊस का.. एकदाच तो अवि भेटला तेव्हा काय हालत झाली होती ... माहित आहे ना.. " ,
" हो .. पण तू तरी ओळखतॊस ना .. तू करून दे ओळख.. तुला सगळ्यांची माहिती असेल ना.. "..... विनय 
" मग काय... ऑफिस मधल्या सगळ्यांचा biodata माझ्याकडे आहे... कुठे राहतात पासून कधी जन्म झाला , कोण कोणाची GF , BF आहे .. कोणाचे काय चालू आहे... ते सगळं सांगू शकतो मी.. " चंदनने स्वतःची कॉलर वर केली जरा. " तुझी सुद्धा बरीच माहिती आहे , बरं का " 

" माझी ? कसं काय " ,
" आपली माणसं आहेत ना ऑफिस मध्ये... माहिती काढणारी.... विश्वास नाही ना... तुझी माहिती सांगतो... पूर्ण नावं ... विनय देशपांडे... वय २७... जन्म ठिकाण : रत्नागिरी ..... मोठया सरांशी खास ओळख.... कारण गावाला शेजारीच घर.... सिंगल आहेस... घरी फक्त वडील... ते गावाला... शिक्षण : software engineer .... मुंबईत शिकलेला... पण इथे येण्याचे कारण जॉब नाही... वेगळं काही आहे... बरोबर ना... " विनय " आ " वासून पाहत होता. " सगळंच माहित आहे तुला... कमाल आहे हा... " विनयने चंदनाला टाळी दिली. 

============================================================

विनयने पुन्हा डोळे उघडले. सकाळ झालेली. त्याच्या बेडच्या बरोबर समोर एक मोठ्ठ घड्याळ होते. सकाळचे ८:३० वाजले होते. अरे ... कालपेक्षा जास्त झोपलो आज. विनय उठून बसला. आणि त्याच्या आवडीच्या सुगंधाने मन मोहून गेलं. बाजूलाच एका basket मध्ये ... रातराणीची फुले होती... व्वा !! विनयला प्रसन्न वाटलं. १-२ फुलं हातात घेतली त्याने. मनसोक्त सुगंध भरून घेतला मनात. आणि पुन्हा जागच्या जागी ठेवली ती फुलं. दिक्षा.... दिक्षाचं आणते रोज , इथे हि फुले... आणि न चुकता.. कुठे मिळतात हिला रोज...आणि काय तो सुगंध.... पूर्ण खोली भरून गेलेली त्याच सुगंधाने.... दिक्षा सारखी विचारते ना... का आवडते रातराणी... माझं एकच उत्तर... एकदा जवळ करून बघ या फुलांना.. सोडणार नाहीस कधी.. ... विनय हरवून गेला आठवणीत. 

===========================================================

" कोणते फुलं आवडते रे तुला... , मला तर लाल गुलाब आवडते... " .......दिक्षा... 
" गुलाबासारखी तर आहेस... " विनय हसत म्हणाला. 
" कधी तरी नॉर्मल बोलत जा... " ,
" नॉर्मल तर बोललो ना... एव्हडी काय रिऍक्ट करतेस लगेच.. " , दिक्षा त्यावर फुगून बसली. गप्पच झाली. आणि तिचा राग गेला नाही तर बोलणारचं नाही हे विनय ला चांगलं ठाऊक होते. विनयचं बोलला मग. 
" मला ना... रातराणी आवडते... खूप .. खूप पेक्षा जास्त.. प्रेमातच आहे तिच्या मी... " यावर दिक्षा विनय कडे बघू लागली.  
" मला गुलाब बोलतोस आणि रातराणी आवडते.... खरंच... तू ना विचित्र आहेस... " ,
" आवडते तर आवडते.... मला तर तीच सोबत असावी असे वाटते नेहमी.. ",
" काय असते रातराणीत ... जे गुलाबात नसते... " दिक्षाचा प्रश्न... 
" रात्रीचं फुलते... रात्रीचं आयुष्य तिचे... कोणाच्या अध्यात ना मध्यात.... कोणाच्या ध्यानीमनी नसतात , नकळत फुलते आणि तिच्या सुगंधाने सर्वांना जवळ ओढून घेते. मोहवून टाकते ती रातराणी.... रात्रीचं राज्य तिचं... गुलाबाला जरी फुलांचा राजा मानतात ... तरी... रात्रीची राणी तिचं .... रातराणी... " विनय कसला भारी बोलत होता. दिक्षा पहिल्यांदा त्याचे असे बोलणं ऐकत होती. नाहीतर असं काही बोलायला लागला तर तिला राग यायचा. 

" एवढी का आवडते तुला .. " दिक्षाच्या आवाज जड झाला होता भावनांनी. 
" आपलं आयुष्य तसंच असावे असं वाटते मला. या जगण्याच्या धावपळीत रातराणी सारखे फुलायचे आहे मला..... आयुष्य जरी लहान असेल तरी चालेल, तरी त्या आयुष्याच्या सुगंधाने ... काही काळ का होईना... सर्वांना जवळ आणायचे आहे... सर्व माणसं जवळ हवी आहेत मला अशीच.... कधीही सोडून न जाण्यासाठी... " विनय थांबला बोलायचा. त्याच्या हातावर पाण्याचे थेंब पडले होते. पाहिले तर दिक्षाच्या डोळ्यात पाणी. " काय गं... का रडतेस... " दिक्षाने डोळे पुसले पटकन. 
" काही नाही... चल घरी निघू.. " ,
" अरे !! ice cream राहिलं ना.. तुला पाहिजे होते ना... " ,
" नको ... राहूदे आता... नंतर खाऊ कधी.. "  

विनयला आठवलं अचानक ते संभाषण... किती वेडेपणा करायची दिक्षा.... अजूनही करतेच म्हणा.. पण कमी झाला आहे तो वेडेपणा.. का ते कळत नाही. पहिली भेट तर न विसरण्यासारखी. विनयला दिक्षा सोबतची पहिली भेट आठवली. 

" excuse me !! " विनयला मागून आवाज आला. मागे वळून पाहिलं त्याने. 
" चंदन कुठे आहे ? " एक मुलगी चंदनाला विचारत होती. 
" चंदन नाही आहे जागेवर... " विनय बोलला. 
" ते मलाही दिसते आहे... जागेवर नाही ते... कुठे गेला आहे... " तिने विचारलं. 
" माहित नाही...आला कि सांगतो त्याला.. तुम्ही आलेलात ते... नाव काय तुमचं ma'am ... " ,
" ma'am ??.... एवढी मोठी दिसते का तुला... anyway , चंदनला मेसेज करून ठेवते मी.. " एवढं बोलून निघाली... पुन्हा थांबली. " आणि तो शेजारी फोन ठेवला आहे ना.. तो वाजला कि उचलायचा असतो... show साठी नाही ठेवला.... " निघून गेली ती. विनयच्या लक्षात आलं. शेजारचा landline फोन कधी पासून वाजत होता. उचलला नव्हता त्याने. 

चंदन आला १० मिनिटांनी, " कुठे गेला होतास... एक मॅडम बडबडून गेल्या तुझ्यामुळे... " ,
" कोण आलेलं ? " ,
" नावं नाही सांगितलं... तुला मेसेज करून ठेवते असं बोलून पुढे बोलल्या , फोन वाजला कि receive करायचा... तुझा फोन मी कसा उचलणार... बरोबर ना... " विनयने सगळी हकीकत सांगितली. 
" अशी बोलली का ... बरं " चंदनने मेसेज बघितला. 
" व्वा !! चांगलीच व्यक्ती भेटली तुला.. " ,
" का ... काय झालं... ".... विनय ... 
" आधी सांग... तिला मॅडम वगैरे काही बोललास का.... " ,
" हो रे ... पण तुला कसं कळते सगळं... " ,
" तिला आवडतं नाही.... एकेरी बोलायचे तिच्याशी... तुला ओळख करून देणारच होतो या ४ जणांची... पण असं वाटते... तूच भेटशील त्यांना अधे-मध्ये... " ,
" म्हणजे " विनयला कळलं नाही. 
" दिक्षा.... दिक्षा होती ती... या ४ जणांमधले सर्वात सुंदर असे पात्र... " इतक्यात चंदनच्या शेजारील फोन वाजला. " हो... येतो आहे... आलोच... " चंदन निघून गेला. 

१५ मिनिटांनी आला. " दिक्षा ...... विचारत होती तुला... कोण नवीन जॉईन झाला आहे.... सांगितलं तुझ्याबद्दल... गाववाली आहे तुझी... " चंदन हसत म्हणाला. 
" मी त्यांना ma'am बोललो म्हणून राग आला का त्यांना... " विनयने विचारले. 
" नाही रे... राग का येईल.. तसा राग पट्कन येतो तिला... पण जातो सुद्धा पट्कन... आणि तिला एकेरी बोल... नाही आवडतं तिला मॅडम बोललेले... " ,
" तुला कसं माहित एवढं... " विनयला नवल वाटलं. 
" हो... २ वर्ष झाली ओळखतो तिला.. ऑफिस मध्ये जे ४ महत्वाचे character आहेत ना ... त्यातले सर्वात strong character....   strong character का तर... कोणतीही परिस्तिथी असेल तरी घाबरत नाही... खूप छान मुलगी आहे... सावळी असली तरी दिसायला छान... नजर काढून टाकावी अशी... कारण एक वेगळंच सौंदर्य आहेत तिच्यात... कदाचित तिलाही हे माहित नसावे... इतकी सुंदर वाटते ती कधी कधी... मनातून सुद्धा तितकीच सुंदर.. कोणाबद्दल काहीच नसते तिच्या मनात... मुलींना कसे दुसऱ्या मुलीबद्दल राग , द्वेष असतो... jealous वाटते.. हे तिच्या मनात नाहीच... शुद्ध , सुंदर मन... कुठे असते सांग अशी मुलगी... जे मनात तेच चेहऱ्यावर... नाकी डोळस नीट... म्हणतात ना तशी अगदी... सगळ्या सोबत हसून बोलून राहणारी.. आणि हा... तिची smile इतकी सुंदर आहे ना... कोणीही वेडे होईल ते हास्य बघून.... हसली कि वाटते कळ्यांची फुले होतील.... कधी कधी वाटते एक सुंदर स्वप्न पडलं असेल देवाला .. तेव्हा इतकी सुंदर smile त्याने घडवली... कमाल आहे ना... मध्यम शरीरयष्टी... त्यात तिचा dressing sense इतका सुंदर आहे ना... विचारू नकोस.. म्हणजे तिचे ड्रेस खरंच बघण्यासारखे असतात... त्यात ती रोज नवीन hair style करून येते... तिच्या सौंदर्यात आणखी भर पडते. ग्रेट आहे ती... खरच... कामात सुद्धा चोख... कधीच टाईमपास करताना दिसणार नाही. अनोळखी सोबत कमी बोलते. पण एकदा ओळख झाली कि मग थांबत नाही बोलायची. हे आत्ताच , messaging ... chatting नाही आवडत तिला.. जे असेल ते समोर बोलावं असं तिचं म्हणणं. " चंदनने त्याचे बोलणे संपवले. 
" wow !! खूप छान आहे रे ती. " ,
" आहेच ती तशी.. वेगळीच आहे....  बघ ना, एवढ्या गोड मुलीच्या कोण प्रेमात पडणार नाही... पण तिचा विश्वास नाही प्रेमवर... तीही कोणाच्या प्रेमात नाही अजून. सगळयांना मित्र मानते. " ,
" पण मैत्रीच्या पुढेही एक विश्व आहे ना.. " ,
" ते तिला समजावणार अजूनही तिला भेटला नाही... पण तिला कोणी चांगलाच भेटणार हे नक्की..वेड्यासारखं प्रेम करणारा भेटणार बघ तिला.. यात शंकाच नाही... दिक्षाचं meaning माहित आहे का इंग्लिश मध्ये... Gift of God .... तशीच आहे ती... देवाची सुंदर अशी रचना... दिक्षा  !! " 
============================================================

विनय पुन्हा आठवणीत गेलेला. " रे भावा .... जेवायला आणले हाय.. हा घे डब्बा.. " अविनाश आवाज देतंच आला. 
" रे... तुझीच वाट बघत होतो. " ,
" आणि तू चल हा लवकर बरा होऊन... तिथे सगळे वाट बघत आहेत तुझी.. कोणाला करमत नाही तिथे... डॉक्टरला सांगतो, उद्या सोडायला तुला... जरा दम दिला कि होईल काम.. क्या !! " अविनाश विनय जवळ बसला. 
" तू पण ना ... खरच .." विनय बोलला तशी अविनाशने त्याला मिठी मारली. 
" खरंच यार ... चल लवकर.. नाही बर वाटतं त्या ऑफिसमध्ये... असाच बसून रहा.. काही नाही केलंस तरी चालेल.... पण तू ये ऑफिसला... " ....अवि.. 
" नाही रे... डॉक्टर सोडणार नाहीत.. " अवि नाराज झाला. तेवढ्यात त्याचे लक्ष रातराणीच्या फुलांवर गेले. 
" वहिनी आलेल्या वाटते... " विनयला त्याने कोपराने ढकललं. 
" गप्प रे... काही पण असते तुझं... " विनयला हसू आलं. तरी त्याचे लक्ष घड्याळात गेलं. 
" तू जा... तुला लेट होईल परत जायला ऑफिसमध्ये.. "
" ते सोड .. आपलंच ऑफिस आहे.. आधी सांग... झोप लागली का तुला बरोबर.. " विनयचा चेहरा शांत झाला त्यावर. " तेच स्वप्न का पुन्हा " अवि सावरून बसला जरा. 

" मला सांग... काय असते नक्की त्या स्वप्नात ... जरा detail मध्ये सांग... " ,
" समुद्रकिनारा .... असा दूरवर पसरलेला समुद्रकिनारा.... जरा पांढरी , जरा करड्या रंगाची मऊ मऊ वाळू.. वाळूवर जागोजागी शंख-शिंपले... थंडगार वारा.. आणि अथांग पसरलेला समुद्र.... एकटाच चालत असतो तिथे मी.. मी हि पांढरे शुभ्र कपडे परिधान केले आहेत. एक पांढरा सदरा आहे अंगावर... चालतो आहे असाच... किनाऱ्यावर नजर जाईल तिथवर कोणीच नाही... समुद्रात सुद्धा काही होड्या दिसतात दूरवर.. पुसट अश्या.. मग मी हि चालत राहतो , शंख-शिंपले वेचत.. ओंजळीत सुद्धा मावत नाही इतके.. तसाच ते ओजंळ भरून चालत जातो पुढे.. आणि अचानक एक सुगंध येतो... ओळखीचा.. रातराणीच्या फुलांचा.. विचित्र जरा, कारण सकाळी फुलतं नाही रातराणी... तरी सुवास येतो... त्या सुवासाचा माग काढत जातो तर पुढे एक मोठ्ठे झाडं दिसते रातराणीचे... तेही विचित्र.. रातराणी वडासारखी वाढत नाही... तरी तेवढ्याच उंचीचे झाड दिसते..आणि त्याखाली कोणी तरी बसलेलं दिसते... " ,
" कोण ? " अविने कुतूहलाने विचारलं. 
" नाही माहित. एका विशिष्ठ अंतरावर थांबतो मी. तिथे एक अद्रुश्य भिंत आहे... काच कशी असते , दिसत नाही ... तशी... त्यापुढे जाऊ शकत नाही.  पोहोचायचे आहे मला तिथे.... खुणावते ती रातराणी.. सारखी " विनयचं बोलून झालं. 
" का आवडते रे तुला रातराणी... " ,
" आईमुळे.. मी लहान होतो ना... गावाला राहायचो.. तेव्हाची गोष्ट.. शेजारी-पाजारी सर्वच मोठी मुले..माझ्याशी खेळायला कोणी नसायचे. मग आईनेच सांगितलं होते... झाडांशी मैत्री कर... आणि तिनेच , एक रातराणीचे रोपटे आणून दिले होते. जप बोलली तिला... खूप नाजूक असते ती... ती माझी पहिली मैत्रीण .. बरं का.. मग काय, खूप छान गट्टी जमली आमची... तिच्याशी गप्पा मारायचो... जेवायला देयाचो तिला. चपाती- भात देयाचो तिला... ते आठवलं कि हसायला येते आता. त्यात आई खूप लवकर गेली माझी देवाघरी... तीची आठवण एकच, तेच रातराणीचं रोपटं... तेव्हाही खूप रडलो होतो... त्या झाडाशी बसून.. " आताही विनयचे डोळे भरत आलेले. 

" घेऊन जाऊ का ती फुलं.... रडतो कशाला.. साल्या.. मला पण केलंस ना emotional.... " अविने डोळे पुसले. 
" नको रे... जीव आहे त्या फुलांत माझा.. म्हणून तर दिक्षा न चुकता घेऊन येते... " ,
" तू लावलं आहेस ना झाड... ऑफिसच्या बाहेर... त्याचीच फुल आहेत हि... " अविनाश निघाला. परत आला. 
" तू तयार राहा... उद्या आला नाहीस ना... उचलून घेऊन जाईन... " तडतडत निघून गेला... 
" काय माणूस आहे ना... पहिला कसा भेटला होता.. आणि आता... " विनय हसला स्वतःशी. 

===========================================================

" by the way... दिक्षा काय काम करते. " जेवता जेवता विनयने विचारलं. 
" हा रे .... तुला माहीतच नाही ना... कोण कोण काय करते ते... दिक्षा, आपले सर्व graphics चे काम असते ना... ते करते... तो ग्रुप आहे ना ... designer चा... तिथे असते ती. मोठ्या पोस्ट वर नाही तरी तिचे designing sence छान आहे म्हणून तिचेच विचार घेतात सर्व.. त्यानंतर अव्या... अव्या आपल्या sales department मध्ये आहे. " चंदन बोलत होता. 
" अविनाश आणि sales मध्ये... कसं possible आहे... " ,
" त्याच्या भाषेवर नको जाऊ.. तो मराठीत तसाच बोलतो सर्वांशी.. आणि त्याचे इंग्लिश ऐकलंस ना.. चाट पडशील... खरं सांगायचे झाले तर तो आहे म्हणून आपला sale वाढला आहे... " विनयला समजलं. 
" ४ मधले २ तर भेटले... बाकी दोघे कुठे आहेत... " विनय विचारतच होता, तर त्याला समोरून एक मुलगा येताना दिसला. तिथे जेवत असलेल्या सर्वांचे लक्ष त्याकडे गेलं. विनयच्या लक्षात आलं ते. तोही त्याकडे बघू लागला. उंच गोरापान , घारे डोळे... perfect dressing... त्याला साजेसे पायात शूज... आणि साजेशी उंची... एकदा मॉडेल यावा अशी त्याची entry झाली. विनय भारावून गेला.
" काय personality आहे यार ... " विनय चट्कन बोलला. 
" आहेच तसा तो... " चंदनही त्याकडे पाहत म्हणाला. 
" म्हणजे असं अचानक मनात आलं त्याकडे बघून ... आपण काहीच नाही रे त्यामानाने... बघ ना.... जेवण सोडून सगळेच त्याकडे बघत आहेत.. " विनयने उसासा टाकला. 
" तिसरे पात्र... हेमंत... राजबिंडा .... राजाच म्हणू शकतोस... मार्केटिंग मध्ये आहे.. ऑफिस मधल्या बऱ्याच मुली मरतात याच्यावर...  हे बघूनच कळलं असेल ना तुला... पहिले अव्या आणि हेमंत ... एकत्र काम करायचे. रोज एकत्र यायचे हि ऑफिसला... ती भांडणे झाली आणि यांचे बोलणे कमी झाले... मित्रच होते घट्ट ... हा हेमंत, त्याच्या लुक मुळे आणि बोलण्यामुळे... समोरच्याला मोहवून टाकतो.. अव्या आणि हा... दोघांनी किती नवीन प्रोजेक्ट मिळवून दिले... कसला भारी बोलतो हा.. तरी गर्विष्ठ खूप... कारण काय... त्याचे रूप... अशी personality कोणालाही भुरळ घालते. तरी जास्त बोलत नाही कोणाशी... अव्या सगळ्यांशी बोलतो.. हेमंत , त्याचे काम असेल तरच बोलतो... मुलींना आवडत असला तरी त्याचा attitude नाही आवडत. even , मुलींना देखील complex निर्माण करतो हा.. " चंदन विनयकडे पाहत बोलला. 

" मला झाला बाबा complex ... खरंच , solid आहेत सर्व... " विनयने चंदनच्या पाठीवर थाप मारली. 
" आणखी एक बाकी आहे... ", 
" कोण ? " ,
" दिसेल बघ तुला... वीज आहे... दिसेल तेव्हा डोळे दिपून जातील.." 

===========================================================


                    विनयला आज काम नव्हतं. infact , कालच त्याचे काम झालेलं. मग काय करणार, ऑफिसमध्ये असंच बसून सुद्धा कंटाळा आला. " मी जाऊन येतो खाली .. " विनयने चंदनला सांगितलं आणि तो खाली आला. त्याच्या bike वर येऊन बसला. बघितलं तर कोणीच नव्हते तिथे.... बरं झालं, निवांत गाणी ऐकूया. कानाला हेडफोन लावले आणि आवडीची गाणी सुरु केली मोबाईलवर. छान , मंद वारा वाहत होता. पावसाचे काही रेंगाळलेले ढग, उगाचच आभाळभर फिरत होते वाऱ्यासोबत. थंड हवामान...  एकंदरीत , खूपच छान वातावरण होते. त्यात मोबाईल वर त्याच्या आवडीच्या गजल सुरु होत्या. 

                   अश्यातच एक scooty आली. एक मुलगी त्यावर. विनयचं लक्ष गेलं तिच्यावर. तोंडावर स्कार्फ बांधलेला. चेहरा दिसतं नव्हता. पण डोळे... अहाहा !! काय डोळे होते ते.. एखाद्याने नजरेचे बाण चालवावे आणि ते आपण काही तक्रार न करता झेलावे , तसं झालं विनयचे. बघतच राहिला त्या डोळ्यात. तिने त्याच्या पासून काही अंतरावर scooty पार्क केली. नकळत तिची नजर विनयच्या नजरेला भिडली..... क्षणभरासाठीच... आणि विनयच्या मोबाईल वर गाणे लागले.... " होशवालों को खबर क्या.... ,बेखुदी क्या चीज़ है..... ,इश्क कीजिये फिर समझिये, ज़िन्दगी क्या चीज़ है.... " ... अगदी कमाल ना... अद्भुत होते ते काहीसं... filmy situation.. !!

                   तिने मग विनयकडे पाठ केली आणि तिची scooty सरळ उभी केली. हळूच चेहऱ्यावरचा स्कार्फ काढला. अजूनही पाठीमोरीच ... बरं का... , विनय कधीचा बघत होता तिला. फिक्कट निळ्या रंगाचा ड्रेस तिचा. महागातला असणार नक्की. पायात सॅंडल सुद्धा भारी. हवेचा झोत आला तिच्या दिशेने. तिच्या perfume चा सुगंध... विनयच्या नाकातून थेट मनात शिरला. व्वा !! शहारून सोडलं हिने तर...  सगळं slow motion मध्ये सुरु आहे असंच विनय ला भासत होते. 

                   हळूच ती मागे वळली..केसांच्या बटा चेहऱ्यावर आल्या त्या वाऱ्यामुळे. एक हलकासा झटका देतं तिने ते केस मागे नेले. दिसला पूर्ण चेहरा तिचा. डोळ्यांनी तर आधीच वेड लावलं होतं. त्यात भर पडली ती त्या आखीव -रेखीव चेहऱ्याची... गोरी.. उजळ चेहरा... विनय तर गपगार झाला ते सौंदर्य बघून .. त्यात कानात ते कातिल गाणे सुरु होते... ती हलके हलके पावलं टाकत विनयच्या बाजूने गेली. जाता जाता एक कटाक्ष टाकला तिने विनय वर... नजरानजर झालीच पुन्हा.. त्यावेळी सुरु असलेली गाण्याची ओळ विनयच्या कानात सामावून गेली.... " उनसे नज़रें क्या मिलीं.... , रौशन फिज़ाएँ हो गयीं... , आज जाना प्यार की... जादूगरी क्या चीज़ है... " ... विनयचा जीवच गेला तिथे. कोणी बघा किंवा बघू नका... मी माझं अस्तित्व दाखवणारच... , असा attitude तिचा... गेली पुढे ती, विनय तर ती पार नजरे आड होईपर्यत बघत होता. एका क्षणाला ती आत वळली. वाकून बघता बघता bike वरून तोल गेला विनयचा. पडता पडता सांभाळलं स्वतःला त्याने.  

विनय थोड्यावेळाने जागेवर येऊन बसला. आणि बसला तो बसलाच. कितीतरी वेळ तसाच बसून होता तो. 
" काय झालं रे.. " चंदनने विचारलं. 
" विचारू नकोस... काय बघितलं ते सांगता येणार नाही.... " चंदनला हे विचित्र वाटलं. 
" सकाळी सकाळी भूत बघितलंस कि काय... " ,
" नाही रे... एक मुलगी दिसली खाली... मला तिचे वर्णन करता येणार नाही... म्हणजे काहीतरी जबरदस्त होती ती... डोळे दिपून गेले. " चंदन समजून गेला. 
" हि होती का... " त्याने मोबाईल मध्ये असलेला एक फोटो दाखवला. 
" हीच... हीच होती ती... पण तुला कसं कळलं हे सुद्धा " विनय सावरून बसला. 
" बोललो होतो ना.. वीज आहे ती ... दिसेल तेव्हा डोळे दिपून जातील... तसेच झाले ना.. " ,चंदन हसत म्हणाला . 
" म्हणजे .... अनुजा... " चंदनने होकारार्थी मान हलवली. 
" yes my friend .... HR आहे ती आपल्या ऑफिसमध्ये... काही दिवस सुट्टीवर होती... आजच पुन्हा जॉईन करणार होती.. तेव्हाच तुला दिसली आज.. इतक्या उशिरा... नाहीतर ती ९ ला हजर असते. " ,
" HR ...HR  बोललास का.. " ,
" हो, HR  आहे ती... त्यामुळे जरा सांभाळून वाग तिच्याशी.. " ,
" तापट आहे का .. चेहऱ्यावरून तर वाटत नाही... " ,
" आधी माझे बोलणे तर पूर्ण होऊ दे रे... " ,
" सॉरी सॉरी... बोल तू.. " ,
" तापट नाही... पण तिला कसे सर्व perfect लागते. चुका केलेल्या आवडत नाहीत. शिस्तप्रिय आहे खूप. मोजकेच बोलते. परंतु त्या हेमंत सारखा attitude नाही हा.... बडबड अजिबात आवडत नाही. काम एके काम... तुला ती अशीच.. उगाच कुठे बोलत उभी दिसणार नाही... फिरताना दिसणार नाही... पण मला वाटते, तुझ्याशी पटेल तिचे... ", 
" कस काय .. " ,
" तीही कविता करते... तू सुद्धा.. " ,
" वा !! तुला हे हि माहित आहे तर ... मी कविता करतो ते... " ,
" मला सगळे कळते रे... कविता करतोस ... गाणी गातोस... गिटार वाजवायचे वेड आहे.. तिचे सुद्धा हेच छंद आहेत.. " ,
" तरी किती भारी दिसते ना ती.. तो हेमंत कसा handsome आहे... त्यापेक्षा सुद्धा किती सुंदर आहे हि.. " ,
" हेच आवडत नाही तीला... तिची स्तुती...ऑफिसमधल्या प्रत्येक मुलीचा एकच विषय ... अनुजा... फक्त दिक्षाच आहे, जी तिच्या समोर उभी राहू शकते. बाकी कोणालाच जमत नाही ते. घाबरत नाहीत तरी एक प्रकारचा दरारा आहे तिचा. नजर बघितली ना तिची.. काहीतरी feel झालं असेल नक्की... " ,
" अरे .... फील बोलतोस... थेट हृदयाला भिडली ती नजर.. अजूनही जाणवते आहे मला. भेदक नजर. त्यात ती दिसायला सुंदर. बघ.. आताही शहारा आला अंगावर. " .....विनय... 
" तिला वीज का बोललो ते समजलं असेल तुला.. बरेच जण, फक्त तिला बघायला येतात ऑफिसमध्ये.. . तुला माहित नाही.. तिचा time ठरलेला आहे... बरोबर सकाळी ९ वाजता येते ती... त्या पार्किंग पासून आपल्या ऑफिसच्या लिफ्ट पर्यंत मुलं उभी असतात... तिला बघायला फक्त. आणि हे सर्व तिलाही माहित आहे.. पण ती कोणाला भाव देतं नाही... हेही तितकंच खरं.... तर जरा सांभाळून .. बरं का... " चंदन पुन्हा कामाला लागला. विनयने त्याचे काम सुरु केलं तरी त्याच्या डोळ्यासमोरून अनुजा जातंच नव्हती. 

" म्हणजे एक कळलं " विनय थोड्यावेळाने बोलला. चंदन त्याकडे वळला... " सगळेच ग्रेट आहेत... " ,
" बोललो होतो आधीच.. हे चार जणं या ऑफिस वर राज्य करतात. आपले मोठे सर आहेत बॉस म्हणून.. तरी हे आहेत म्हणून ऑफिस आहे. आणि म्हणूनच हे ४ होते त्या टीम मध्ये... घट्ट मित्र चौघेही... आता फक्त कामापुरतेच बोलतात. " , 
" त्यात तुही होतास ना.. " ,
" होतो.. अजूनही आहे... पण हे चौघे खूप छान मित्र होते.. एकत्र जेवण.. एकत्रच निघायचे घरी. यात एकी होती म्हणून हे सर्व ऑफिस छान आनंदी होते... आता बघ कस शांत शांत असते.. ", 
" एकत्र आणू यांना.. ", 
" सोप्प नाही ते... पाहिलंस ना... किती जबरदस्त आहेत ते... ते एकत्र होते ती देवाची कृपा... पुन्हा एकत्र येतील का माहित नाही... प्रत्येकाला सांभाळणे ... खरच कठीण आहे.. " ,
" मी करतो प्रयन्त... " विनय मनापासून बोलला. 
" कर try .. पण बघ... सांभाळून जरा... " 

===============================================

विनयच्या डोळ्यासमोरुन गेला हा सर्व सिनेमा. काय दिवस होते ना ते.... मंतरलेले दिवस अगदी. किती प्रयन्त केले या सर्वांना एकत्र आणण्यासाठी. पण सुरुवात झाली ती ... त्या दिवशी. 

" चंदन .... तू सगळ्यांना मेल करू शकतोस ना एकाचवेळी... " ,
" सगळे म्हणजे कोण ? " ,
" पूर्ण ऑफिसला.. " ,
" का... आणि कसला मेल " ,
" अरे आज दुपारी ४ वाजता मी एक कार्यक्रम ठेवला आहे. मी गाणी गाणार आहे. " चंदन हसला त्यावर.... 
" कोणी permission दिली... " , 
" मोठ्या सरांनी... " ,
" हो हो... विसरली मी.. तुझी ओळख मोठ्या केबिन मधली आहे... तरी , माझ्या मित्रा... तुला आजच एक महिना झाला इथे... तुला कोण ओळखते... एक मी सोडलो तर इतर ४-५ जण.. कोण येणार ऐकायला .. " ,
" तरी कर ना मेल... " शेवटी चंदनने त्याचे काम थांबवले आणि विनय समोर बसला. 
" हे बघ विनय.. तुला गाणी गायची आहेत, गिटार वाजवायचे आहे ... मी येतो ऐकायला. पण हे मेल वगैरे नको... तसही इथे कोणाला interest नाही या सर्व प्रकारात आता...त्यात पुन्हा भांडणे वगैरे नको.. तुला permission मिळाली आहे... तू वाजव... मी इथे वेळेवर.. बाकीच्यांना मेल नकोच.. ठीक आहे ना ... " एवढं बोलून चंदन त्याच्या कामात गुंतला. 

              सगळे कामात होते. अचानक गिटारचा आवाज येऊ लागला. चंदनने घड्याळात पाहिलं. ४ वाजले होते. " याने सुरुवात केली वाटते .. " चंदन मनातल्या मनात बोलला. खरंच त्याने गाणे सुरु केले होते. चंदनने त्याचे हातातले काम पटापट संपवून १५ मिनिटांनी पोहोचला तिथे. त्या आधीच १०-१५ जण होते तिथे. अरे व्वा !! मला तर वाटलं होते कि मीच असेन ... इथेतर आधीच आले आहे audience... सुंदर आवाज लागला होता विनयचा शिवाय आवाजही खणखणीत.. गिटार वर सुद्धा छान सूर लागले होते. एकंदरीत पाहता पहिलं गाणे फारच छान झालं. टाळ्या वाजल्या. चंदनने आजूबाजूला पाहिलं ... किती गर्दी झाली होती. पण महत्वाचे... एका कोपऱ्यात दिक्षा आणि चहाच्या मशीन जवळ अविनाश... हे सुद्धा होते. आवाजच इतका छान होता... सगळेच आकर्षित झाले. दुसरे गाणे सुरु केले त्याने. ते गाणे मध्यावर असताना, अनुजाची entry झाली. बहुदा , ती सुद्धा गाणी ऐकायलाच आली असावी. कारण परत फिरून न जाता , एका ठिकाणी उभी राहिली ती सुद्धा... सुंदर झालं दुसरं गाणे हि... पुन्हा टाळ्या वाजल्या... चंदनने नजर फिरवली. जवळपास सर्व ऑफिस होते आता तिथे... कमाल केली याने. 


                 आणखी १५ मिनिटे विनयचा कार्यक्रम झाला.  खास करून मोठे सर सुद्धा काही वेळेसाठी आलेले. एकंदरीत छान झालं सगळं. एका वर्षानंतर असं काही झाले होते ऑफिस मध्ये, त्यामुळे तिथे जमलेले सारेच खुश झाले. थोडे काही बोलावं म्हणून विनयने गिटार बाजूला ठेवली आणि उभा राहिला. " Hi ... मला ओळखत नाहीत जास्त लोकं अजूनही... मी विनय... आजच मला १ महिना झाला या ऑफिसमध्ये. मला कोणालाही इंप्रेस करायचे नव्हते. फक्त इथल्या लोकांशी ओळख करायची होती. मी ऐकलं आहे कि इथे आता पाहिल्यासारखे कार्यक्रम होतं नाहीत, खरंही असेल ते.. तरी मी एक छोटा प्रयन्त करून पाहिला... I hope ... तुम्हाला आवडला असेल... " सगळ्यांनी " हो !! " म्हटले. " thanks !! " विनयला आनंद झाला. " आणखी काही बोलू का... मी एक महिना बघतो आहे.. कोणी कोणाला साधं " good morning " सुद्धा बोलत नाही. का ते माहित नाही... निदान त्याला पैसे खर्च करावे लागत नाहीत असे वाटते मला... हेच बोलायचे होते... आजचा दिवस आणि हा आठवडा सुद्धा गेला. येणाऱ्या सोमवार पासून .. मी सुरु करणार आहे हे असे बोलायला... तुमचा समोरून रिप्लाय आला नाही तरी काही नाही... मी बोलणार.. चालेल ना.. " सर्वांनी माना डोलावल्या. हे ऐकायला त्या ४ पैकी फक्त अव्या थांबला होता. हेमंत तर आलाच नाही. दिक्षा , अनुजा आधीच निघून गेलेल्या. 

चंदन हळूच अविनाशच्या शेजारी जाऊन उभा राहिला. " काय अव्या... काय बोलतोस.. इथे कसा... " ,
" असाच...काय नाय....  आपल्या ऑफिस मध्ये कोण आलं गिटार घेऊन.. ते बघायला आलो... बरा भेटला हाय timepass .... पण सांग त्याला.. जास्त दिवस चालणार नाय ते... " ,
" का ? " ,
" माहित आहे ना तुला चंद्या... आणि परत विचारतोस... कोणाला आवडत पण नाय आता हे.. " ,
" आवडत नाही... हि गर्दी आपल्या ऑफिसमधलीच आहे ना.. आणि आवडलं म्हणून तुही थांबलास ना... बघ... बदलेलं आता सर्व.. " अव्याने चहाचा कप घेतला... एकदा चंदनकडे , नंतर विनयकडे एक नजर टाकून निघून गेला. 

आणि खरंच, फरक तर जाणवतं होता. कारण त्या दिवसापासून विनयला सगळेच ओळखायला लागले होते. शिवाय " गुड मॉर्निंग " बोलणे सुरु झालेलं. सर्वच बोलत नसले तरी सुरु तर झाले होते. 
" Good morning दिक्षा... " चंदन दिक्षाच्या डेस्क जवळ आला. दिक्षाने कामातून डोकं वर काढलं. 
" हे काय नवीन.. " ,
" सहज... रिप्लाय तर दे Good morning चा... " ,
" हो हो ... Good morning .. पण मधेच का.. " ,
" मधेच कुठे दिक्षा... हे आपण आधीही करायचो... विसरलीस का... " ,
" हो... विसरले... आणि तुही विसरून जा... " ,
" दिक्षा... काही नवीन होते आहे... तर होऊ दे ना ... " चंदनच्या या वाक्यावर दिक्षा काही न बोलता कामात गुंतली. 

                दिवस पुढे जात होते तशी विनयची ओळख वाढत होती. दर शुक्रवारी त्याचा गाण्याचा कार्यक्रम ठरलेला. आतातर सगळे यायचे, हेमंत सोडला तर बाकी सगळयांची हजेरी असायची. तो "फरक " सगळ्यांनी आपलासा करून घेतला होता. पण आता विनयला काहीतरी वेगळं करायचे होते. चंदनला त्याने त्याचे मनोगत सांगितले. 
" अरे बाबा.... काय वेड-बीड लागलं आहे का... ", 
" वेडेपणा काय त्यात... तिला जाऊन फक्त बोलवायचे आहे... " .... 
" हे बघ... तू तिला फक्त बघितलं आहेस ... ३-४ वेळेला.. मी ओळखतो तिला.... सांगतो ते ऐक... नको भलता प्रयत्न करुस... ",
" ok .... एक काम करू... मला घेऊन चल तिच्या पाशी... मीच बोलतो ... " हा काही ऐकणार नाही... म्हणत चंदन तसाच त्याला घेऊन गेला अनुजाकडे. 

" Hi अनुजा... " चंदन, तसं अनुजाने मागे वळून पाहिलं. विनयशी नजरानजर झाली. तीच ती घायाळ करणारी नजर, विनय तर वेडाच होता त्या नजरेचा. पण यावेळेस त्याने सांभाळलं स्वतःला. 
" बोल चंदन... " अनुजा बोलली. 
" हा विनय... याला ओळखतेस ना.. " अनुजाने एकदा नजर फिरवली विनय वर. 
" हम्म " अनुजाने पुन्हा कामात डोकं घातले. " याला काही बोलायचे आहे तुझ्याशी... मी निघतो... " चंदन सटकला तिथून. 

" बसा मिस्टर विनय... " अनुजाने कामात लक्ष असतानाच त्याला बसायला सांगतले. " तुम्ही बोला.. मी ऐकते आहे. " ,
" या महिन्यात तुमचा birthday होता ना.... " विनयच्या या वाक्यावर तिने तिचे काम थांबवले क्षणभर. 
" So ... then ... ??" , 
" उद्या महिन्याचा शेवटचा दिवस आहे... या महिन्यात ज्याचे वाढदिवस होते , त्या सर्वांचा एकत्र बर्थडे सेलेब्रेट करणार आहोत.. मोठ्या सरांची permision आहे... " ,
" तर ... " ,
" तर उद्या या बरोबर ४ वाजता केक कापण्यासाठी.... " अनुजा बघत राहिली त्याकडे... थेट आमंत्रण... 
" मिस्टर विनय ... तुम्ही गाता छान ... गिटार वाजवता... कामात छान आहात... याचा अर्थ असा नाही कि तुम्ही जी गोष्ट कराल ती छान च असेल.." ,
" छानच आहे ना... सगळयांना आवडलं, म्हणून तयार झाले ना.. तुम्ही राहिला होता म्हणून सांगायला आलो. " ,
" मग जे तयार आहेत ना... त्यांना घेऊन करा celebration.. मला काही interest नाही...  तुमचे बोलणे झाले असे समजते मी. जाऊ शकता तुम्ही....  "  आणि अनुजा पुन्हा कामाला लागली.  

" मला माहित आहे, मी नवीन आहे इथे.. तरी बोलतो... दिवसाचे २४ तास, त्यातले झोपेचे ८ तास सोडले तर उरलेल्या १६ तासातले.... जवळपास १० तास आपण इथे ऑफिस मधे असतो. घरी गेल्यावर सुद्धा घरातल्याशी इतके बोलणे होतं नाही , जेव्हडे आपण  इथल्या लोकांशी बोलतो. एक प्रकारचे कुटुंबच आहे ना हे सगळे.. आणि कुटुंबातील सदस्यांचा वाढदिवस आपणच साजरा करणार ना.. माहीत आहे तुम्ही कामात सतत बिझी असतात.. म्हणून ... जास्त नाही... फक्त १०-१५ मिनिटांसाठी वेळ काढा... थँक्स.. " म्हणत विनय निघून गेला. 

                   विनय निघून गेला तरी अनुजा तिच्या बोलण्याचा विचार करत होती. कारण पहिल्यांदा असं कोणी तरी थेट बोलत होते कोणी. बरेच जण बोलायचे तिच्याशी, काही कामानिमित्त ... आणि उरलेले तिची स्तुती करण्यासाठी फक्त....एक दिक्षा सोडली तर तिच्याशी पर्सनल बोलायला कोणीच नव्हते. आतातर दिक्षाशी बोलणे होतं नाही. आधी बोलायचो तरी. तिलाही आठवलं, घरी कोणाच्याही लक्षात नाही , या महिन्यात माझा वाढदिवस होता ते. संद्याकाळी घरी पोहोचली तेव्हा तिने पहिले आईला विचारलं. " मॉम .... या महिन्यात काही होते का... माझ्या लक्षात नाही. तुला आठवते का बघ. " आईला तर नाहीच , तिच्या वडिलांनाही विसर पडलेला. अनुजा रात्री न जेवताच झोपली. हे आपल्या जगात बिझी असतात, पप्पा त्यांच्या बिजनेस मध्ये आणि आई तिच्या मैत्रीणी मध्ये... माझ्यावर लक्ष तरी कुठे असते यांचे.... आज जेवली नाही ,ते सुद्धा माहित नाही यांना. ऑफिस मधल्या सगळ्या लोकांचे मेल आले वाढदिवसाच्या शुभेच्छाचे. पण खरच का ... इतके सगळे बिझी झालेत कि आपणच वेगळे राहत आहोत या पासून... रात्रभर विचार करत होती. 

                ठरल्याप्रमाणे, पुढल्या दिवशी सर्व ४ वाजता जमा झाले. विनयने नजर टाकली सर्वावर. त्या " ४ " पैकी कोणीच नव्हते. जरासा नाराज झाला स्वतःवर. पण पुढच्याच क्षणाला जरा कुजबुज सुरु झाली. कारण अनुजा आलेली ना. सगळयांना आश्चर्य वाटलं. त्याचीच कुजबुज होती ती. पण ती आली तशी एका कोपऱ्यात जाऊन उभी राहिली. विनय त्यावर काही बोलणार तर अनुजाचं बोलली... " मी फक्त cake cutting .... बघायला आली आहे.. जास्त कोणी फोर्स करू नका.. " ती आलेली हेच खूप होते. उरलेल्या लोकांनी केक कापला, मिळून खाल्ला. सारेच आनंदात. पहिले असे असायचे सोहळे इथे. त्यामुळे सगळ्यांना आवडले हे. अनुजा केक खाण्यास थांबली नाही. तरी विनयने ४ डिश मध्ये केक घेतला. " त्या " चौघांसाठी ४ डिश... पहिला तो अनुजाकडेच गेला. तिच्या पुढ्यातच केक ठेवला. 

" मला माहित आहे, तुम्ही असलं काही खात नसणार. तुमचा फिटनेस पाहिला कि कळते ते, तरी लहानसा तुकडा आणला आहे... तुम्ही आलात , खूप बरं वाटलं... प्लिज .. एवढंसं खा... प्रेमाने आणला आहे. " विनय केक ठेवून पट्कन निघून गेला. अनुजाला हसू आले. पण काही म्हणा... तिलाही बरं वाटलं. 


पुढचा स्टॉप , अव्या.. विनय जरा घाबरतच त्याच्या डेस्क वर गेला. स्वारी कामात बिझी. विनयने गुपचुप त्याच्या समोर डिश ठेवली आणि सटकला. अव्याने एकदा पाहिलं केक कडे... आणि विनयला हाक मारली.. 
" अय बुलेट... " ,विनय थांबला 
" बुलेट ?? " विनयने उलट विचारलं. 
" बुलेटचं आहे ना तुझ्याकडे... तुझं नावं लक्षात नाही... ये इकडं... " अव्या केक खात म्हणाला. विनयला जरा भीती वाटली. " बस " घाबरतच बसला. 
" मी येणार होतो.. मुद्दाम आलो नाय .. पुन्हा कोणी बघितलं तर भांडणं होतील म्हणून.. तुला का थांबवलं... बोलायचं होता तुझ्या बरोबर... " ,
" बोला ... " ,
" गेल्या महिन्याभरात तुला सगळं ऑफिस ओळखायला लागलं... हिरो झालास तू.. गाणी म्हणतोस ... गिटार वाजवतो... हे आवडते सगळ्यांना... पण त्यापेक्षा सगळे जमतात एकत्र ... ते आवडलं मला... महिन्याभरात वातावरण बदलून टाकलास मित्रा... मानलं पाहिजे तुला... सगळे एकत्र जमतात.. गप्पा मारतात.. हसतात , बोलतात , मस्करी करतात.. छान वाटते.. असंच होते पहिले ऑफिस... फक्त एक... हे जे सुरु केलं आहेस ना.. ते सांभाळून कर.. कारण तुला भूतकाळ माहित नाही.. असो, छान वाटलं... केक सुद्धा लय आवडला. तूच आणला असणार.. आणि हा अनुजाच्या आवडीचा आहे... हेही माहित आहे मला.. ", 
" हो.. आधी तुमच्याकडे होते ना हे.. कोणता केक आणायचा ते... चंदन ने सांगितलं मला.. " ,
" बरं... आता आला आहेस तर जरा माझ्या PC च काम आहे बघ... " ,
" ५ मिनिटांनी येतो.. " चंदन हेमंतच्या दिशेने गेला. 

" Hi हेमंत.. हे तुझ्यासाठी ... " विनयने हेमंत समोर डिश धरली. 
" हे बघ.. तुझं नाव काय आहे माहित नाही मला.. आणि त्यात इंटरेस्ट पण नाही. " ,
" अरे पण केक आणला आहे फक्त तुझ्यासाठी.. तू नव्हता ना तिथे... " विनय बोलला. 
" तो घेऊन जा... आणि सरळ सांगतो... मी नेहमी तोंडावर बोलतो... सरळ बोलतो... ते फिरवून फिरवून बोलणे जमत नाही. ऐक... हे जे तू सुरु केलं आहेस ना... सगळा बनाव आहे. कोणाला इंप्रेस करायचे आहे माहित नाही... मोठ्या सरचा चेला आहेस म्हणून सगळं खपवून घेतो आहे.. तरी... जोपर्यंत मी आहे इथे तोपर्यंत दुसरं कोणीच माझ्या समोर उभं राहू शकत नाही.. जास्त दिवस टिकणार नाही हे... हेमंत नाव आहे माझं.... लक्षात राहू दे...  " असं म्हणत हेमंत निघून गेला. काय झालं याला... मी तर फक्त केक देयाला आलो होतो. आणि मी कुठे कोणाला इंप्रेस करतो आहे. येडाच आहे हा... स्वतःशीच हसला विनय आणि दिक्षा कडे गेला. 

" Hi .... " विनयने दिक्षाला हाक मारली. तिने कानाला इअरफोन लावले होते. " Hi .. " विनयने पुन्हा हाक मारली. तरी तीच लक्ष नाही. मग विनयने केक तिच्या पुढ्यात ठेवला. 
" हे काय ? " तिने वळून पाहिलं विनयकडे. 
" याला इंग्लिश मध्ये cake असे म्हणतात ... तुझ्यासाठी आणला. ", 
" थँक्स .. पण नको आहे मला... नाही खात मी... नाही आवडत मला... " , 
" पहिलं तर आवडायचे ना... " विनयच्या या वाक्यावर दिक्षा काही बोलली नाही. " काही नसते असे.. मज्जा करायची. छान जगायचे... का कोणावर रुसून राहायचे.. कोणाशी अबोला धरायचा ... कशाला ते.. आणि तुम्ही आधी तर मित्र होता ना सगळे छान.. मग... " दिक्षा केक कडे पाहत होती. 
" खा ... तुझ्यासाठीच आणला आहे... तू आली नाहीस तिथे... आली असती तर बर वाटलं असते मला..नक्की खा... पुन्हा सांगतो.. असं नाही राहायचे गप्प गप्प... एकच life आहे ना... जगून घेयाचे प्रत्येक वेळेस .. " दिक्षाने केक घेतला हातात. " आणि हा आणखी एक.. " विनयने आणखी एक डिश ठेवली तिच्या समोर. 
" हा कशाला आता... " ,
" हा तुझ्या ड्रेस साठी.. मला blue color खूप आवडतो... आणि तुझे ड्रेस खूप छान असतात, त्याबद्दल खूप ऐकलं होते... म्हणून एक माझ्याकडून केक.. दुसरं कारण, तुझ्या आता येणाऱ्या smile साठी... .. आली बघ... " खरच , ते बोलणं ऐकून दिक्षाच्या चेहऱ्यावर smile आली. " मला तुझी smile खूप आवडते... " विनय हसतच निघून गेला. 

                 विनयला सगळं आठवतं होते. दोन महिने झाले ना आज. आपण हॉस्पिटल मधेच आहोत. सगळे येतात चौकशी करायला. हे चौघे येतात अधूनमधून .... अव्या रोज येतो डब्बा घेऊन दुपारचा. दिक्षा, मी सकाळी जागे होण्याआधी रातराणीची फुलं घेऊन येते. अनुजा फार कमी वेळेस येते. हेमंत तर येतोच , दर २ दिवसांनी... सुरुवातीला खूप विचित्र होता ना... पण नंतर चांगला बोलायला लागला. नेहमी कसा राग राग करायचा माझा. तशीच एक भेट आठवली त्याला.   

त्यादिवशी, विनय ऑफिसच्या आवारात असलेल्या बागेत काही करत होता. चंदन आणि अव्या होता तिथेच. हेमंत आला गेटमधून. विनयला बघितलं त्याने. मुद्दाम हसला त्याला बघून. 
" हेच होणार होते... सारखा पुढे पुढे करतो ना... कचरा उचलायला लावला शेवटी.. " चंदनने ऐकलं ते.. 
" हेमंत... नीट बघ... रोपटं लावतो आहे तो... कचरा नाही उचलत... " हेमंत ने पुन्हा बघितलं त्याकडे. 
" तरीही... मातीतच राहणार तू... माझी बरोबरी करू शकत नाही तू.... " गॉगल लावला डोळयांवर आणि निघून गेला. अव्याने सुद्धा ऐकलं ते.. 
" याला देऊ का खर्चापाणी... " अव्या बडबडला. 
" नको.. राहू दे... प्रत्येक वेळेला काय मारामारी.. आणि विनय... आवर आता तुझे.. झालं ना झाड लावून... " ,
" झाडं नाही रे... रातराणी... " विनय प्रेमाने म्हणाला. 
" हो हो... रातराणी... चल आता.. " अव्या बोलला. दोघे गेले पुढे. विनय बागेतून बाहेर आला. तर समोरून दिक्षा येतं होती. तसाच झट्कन वळला आणि दिक्षा कडे पाठ केली त्याने. तिलाही त्याचा तो अवतार बघून हसायला आले. 

" wow !! congratulation... !! " , दिक्षा मागून पुढे आली. विनयला कसंसं झालं.. 
" कश्याबद्दल.. " विनयला कळलं नाही. 
" promotion झाले म्हणून... " आणि दिक्षा स्वतःच हसली. 
" हाहाहा.... very funny ... मी जरा बागेत काम करत होतो. ", 
" कोणी सांगितलं का हे झाड वगैरे लावायला.. कि माळी तुला पैसे देतो याचे पण... " पुन्हा हसली... 
" by the way .... त्याला झाडं नाही... रोपटे असे म्हणतात... शुद्ध मराठीत... समजलं का मॅडम.. " ,
" हो हो... समजलं " दिक्षाने मान हलवली. हे दोघे बोलत बोलत लिफ्ट जवळ आले. 
" जरा ते बटन दाबा ना मॅडम.. माझे हात खराब आहेत म्हणून... नाहीतर मीच मदत केली असती तुम्हाला.. " उगाचच टोमणा मारला विनयने. 
" हो सर... करते हा तुम्हाला मदत... " लिफ्ट आली तसे दोघे आत शिरले. विनयला तिने निरखून पाहिलं. 
" काय ते ध्यान... असाच बसणार आहेस का ऑफिस मध्ये... ", 
" किती काळजी करतेस ना माझी तू .... थँक्स... " विनय मस्करी करत बोलला. 
" excuse me... काळजी वगैरे काय... कपडे खराब आहेत... ऑफिस मध्ये सगळे मातीचे पाय उमटणार.. म्हणून बोलते आहे. ... बाकी काही नाही.. " ,
" हो हो... तुझा ड्रेस पण खराब होईल ना मग.. पण एक सांगू का.. means तुला इंप्रेस करायला बोलत नाही... चंदन बोलला होता.. तुझे dressing sense छान आहे खूप... दिसते रोज ते... तुला बघितलं ना ऑफिसमध्ये तर बघावंसं वाटते सारखं.. तरी असं वाटते कि तुझ्यामुळे त्या ड्रेसना चारचाँद लागत असतील... बरोबर ना... " दिक्षा लाजली जरा.. पण तिने लगेच आवरलं ते लाजणे... लिफ्ट सुद्धा थांबली होती. 
" मस्का लावून झाला असेल तर.. जा कपडे change करून ये... माती लागली आहे सगळी कडे... " असं बोलून दिक्षा लगेचच निघून गेली. actually , तिला हसू येतं होते विनयच्या बोलण्याचे... ते हसू थांबवत पळतच जागेवर आली. विनयलाही समजलं होते ते. कपडे साफ करण्यासाठी जावे लागणारच होते, नाहीतर मागून गेलो असतो. विनय मनातल्या मनात हसला. 

काय छान दिवस होते ना ते. दूर गेलेले एकत्र येतं होते हळू हळू. हेमंत तेव्हा नाटकं करायचा उगाचच. अव्या तर मित्रच झालेला. अनुजा सोबत तेव्हाही भीती वाटायची.. आताही वाटते म्हणा. त्याचे विचार सुरु होते. आणि अनुजा आलीच त्याला बघायला. विनय जिथे ऍडमिट होता.. त्या रूमला लागूनच एक बाल्कनी होती. तिथेच उभा होता विनय. 
" काय रे... आराम करायला सांगितलं ना.. मग इथे काय करतोस... " आल्या आल्या विचारलं तिने. 
" आठवणी... आपले जुने दिवस आठवतं होतो... " ,
" पुन्हा तेच तेच... " ,
" काय करू... आठवणी आहेत त्या... येणारच पुन्हा पुन्हा परतुनी... बरं ते जाऊदे .. तू कविता करणार होतीस ना... केलीस कि नाही... " ,
" हो...  केली आहे...तुला आवडेल का माहित नाही... तू बोलला म्हणून केली. " ,
" बरं आहे ना मग... मी बोललो म्हणून लिहिते तरी..किती मुडी असतात ना कवी... " तशी अनुजाने त्याच्या पाठीवर चापट मारली. 
" किती आगाऊ आहेस तू... " ,
" ऐकव आता .. कि मुहूर्त काढणार आहेस... " विनय हसत बोलला. 
" थांब ... " अनुजाने एक दीर्घ श्वास घेतला. 

" Comeback like rains.
Be the soft drizzle ,
or  be the storm if you may.
And I promise to hold my hands out of the window,
And listen to the thunder without flinching my eyes.
But you have to comeback like rains,
All of sudden-
Taking over my entire sky,
Not leaving a space behind,
So you must comeback like rains." 

झाली कविता... छान संध्याकाळ होती. मावळतीचा सूर्य होता सोबतीला. विनयला गलबलून आलं. अनुजाला समजलं ते. " बघ ... म्हणून करत नव्हते कविता. तुला वाईट वाटलं ना..... सॉरी, खरच सॉरी... " आता अनुजाच्या डोळ्यात पाणी आलेलं. तशीच " Bye " म्हणत धावतच बाहेर आली. विनय समोर रडायचं नाही कोणी, असं ठरवलं होते सर्वानी. एका झाडाआड गेली. मनसोक्त रडली. नाहीच थांबवू शकली स्वतःला. तिची scooty सुरू केली आणि परतीची वाट धरली तिने.  तरी पाणी होतेच डोळ्यात... बाजूलाच एक बाग दिसली तिला. जाऊन बसली तिथेच. " का केलंस विनय तू असं... का नाही सांगितलं आधी ... का आलास माझ्या life मध्ये.. " एकटीच रडत बसली. थंडीचे दिवस. कातरवेळ.. संधीछाया.....  आठवलं तिला काही.... 

===========================================================

अनुजा एका महत्वाच्या कॉल वर होती. त्यामुळे वर ऑफिसमध्ये न बोलता, खाली पार्किंगमध्ये फोनवर बोलत होती. पुढच्या १५-२० मिनिटांनी तिचे बोलणे संपले. निघायला वळली तर समोर विनय. त्याच्याच बुलेट वर बसलेला आणि कानात इअरफोन... गाणी ऐकत बसलेला. अनुजा तशीच त्याच्या जवळ आली. ती जवळ आली तस त्याने कानातले इअरफोन काढले. 
" मिस्टर विनय... आपले ऑफिस वर आहे. हा तळमजला आहे... शिवाय पार्किंग...मध्ये आहात.. " ,
" मग ... " ,
" मग तुम्हाला काम नसते का... ऑफिस मध्ये... पहिल्यांदा भेटलात तेव्हा हि इथेच.. अगदी याच जागी पाहिलं होते तुम्हाला... आताही इथेच.. " ,
" हा ... ते.. " विनयला काय उत्तर द्यावे सुचेना... घाबरला नव्हता.. तरी समोर अनुजा होती ना... बाकी मुलींसोबत बोलताना काही वाटायचे नाही. पण हिचे डोळे इतके बोलके होते ना... नशिले होते, धारदार होते.. कि विनय विसरून गेला उत्तर... शब्दच फुटेना तोंडांतून.. अनुजाला समजलं ते. ऑफिसमध्ये बरेच तिच्या मागे होते, त्यात आणखी एक " Add " झाला, असा विचार करत निघाली.  

" excuse me ... अनुजा miss.. " विनयने हाक मारली. " तुम्ही कविता करता ना..." अरेच्या !! याला कसे कळले .. अनुजा विनय जवळ आली. 
" तुम्हाला कसं कळलं ते... " ,
" मला माहित आहे... शिवाय तुम्ही गाता आणि गिटार सुद्धा वाजवता ना... बरोबर ना... " याला कसे माहित हे सर्व... अनुजाच्या चेहऱ्यावर मोठ्ठ प्रश्नचिन्ह.. " का बंद केलंत ... तुम्ही तर ऑफिसमध्ये सुद्धा गायचा ना... मग आता का बंद केलंत सारे... " यावर मात्र अनुजाकडे उत्तर नव्हते आणि तिला तो विषयही नको होता. तशीच वळली आणि चालू लागली. विनय काही बोलू लागला मोठयाने.  

" कोण आहेस तू...
सकाळी डोळे उघडल्या वर पहिल्यांदा होणारा किरणांचा स्पर्श,
की हवेत दरवळणारा मोगर्‍याचा सुवास.
कोण आहेस तू...
कोणी तरी मला हळूच बघतय़ ह्याचा होणारा आभास,
की वा-या सोबत मानेवरुन घसरण्यार्‍या केसांमध्ये तुझा होणारा खट्याळ भास.
कोण आहेस तू...
सकाळी किलबिलणार्‍या पक्ष्यांच्या सुरेल गीतां मध्ये
तुझ्या निखळ हास्याचा होणारा भास,
की मी तुझ्या सोबतच आहे असा प्रत्येक क्षणी
येणारा तुझा दिलासा.
कोण आहेस तू...
मन म्हणतं की मी ओळखलयं तुला,
पण दुसर्‍याच क्षणी मनात येणारा प्रश्न,
खरचं, खरचं ओळखलय का मी तुला..
अजून ही माझ मन एकच विचारतो प्रश्न,
काय सांगू ह्या मनाला कोण आहेस तू...
कोण आहेस तू... "
ते ऐकून अचानक थांबली ती. आपलीच कविता हि... तशीच वळून ती विनय जवळ आली.
" तुला ... i mean तुम्हाला कशी माहित हि कविता... " विनयला माहित होते अनुजा नक्की येणार फिरून.
" तुमच्या लॅपटॉपमध्ये सापडली. सॉरी हा... but त्यादिवशी तुम्ही चंदनकडे दिला होता ना लॅपटॉप ... रिपेअर साठी. तर त्याला काहीतरी वेगळे काम होते म्हणून माझ्याकडे दिला. रिपेअर करून झाल्यावर तुम्हाला परत देणार होतो तर तुम्ही निघून गेला होता. मग विचार केला.. आतमध्ये डोकावून बघूया... तर खूप आतमध्ये ... हि कविता सापडली. खूप छान आहे.... मीच किती वेळा वाचली माहित नाही... पाठ सुद्धा झाली बघा. खरच खूप छान आहे. थांबवू नका लिहिणे.. " आता याला काय रिप्लाय करू ... खरच ती कविता अनुजाला खूप जवळची होती. 
" तुम्हाला माहित आहे का ... मला का आवडली कविता... कारण ती तुम्हाला आवडली.. बघा... आपल्या आवडी किती जुळतात... मीही कविता करतो... तुम्हीही करता... गाणी , गिटार तर आहेच... गजल ऐकायला आवडतात... " , 
" जगजीत सिंग ... ना " अनुजा पट्कन बोलली. 
" हो.. तेच तर...आपल्या आवडी खूप same आहेत ना... खरंतर , आपल्याला आधीच मित्र असायला पाहिजे होते... " विनय पट्कन बोलून गेला. अनुजा हसली त्यावर. " सॉरी हा... पट्कन बोललो.. " ,
" its ok .. no problem ... पण मी नाही बनवतं नवीन मित्र आता ... आणि गाणी, गिटार ... सगळे सोडून दिल आहे सध्या... हि कविता कोणालाही ऐकवू नका... please ... " , 
" इतकी छान तर आहे कविता.. तुमच्या आवडी का बंद करता.. वाहू दे त्यांना वाऱ्यासारख्या... बाकीचे जाऊ दे... मित्र तर होऊ शकतो ना आपण.. जर तुम्हाला वाटतं असेल तर.. ".... विनय... 
" मिस्टर विनय ... खूप फास्ट आहात तुम्ही ... आणि मैत्रीचं ... बघूया.. आता ऑफिसमध्ये जाते... तुम्ही सुद्धा या आता ऑफिस मध्ये... काम असते ना.. कि देऊ माझ्याकडेच... " अनुजा हसतच गेली. 

             विनयला सुद्धा मोकळं मोकळं वाटलं बोलून. मग निघाला तोही. लिफ्ट जवळ आला. लिफ्ट वरून खाली आली. दरवाजा उघडला तर दिक्षा लिफ्ट मध्ये. ती काही बोलणार ते विनयचं बोलला. " का सारखं माझ्या मागे मागे... बघावं तिथे मागून येतेस... काय सुरु आहे तुझं... " विनय भरभर बोलून गेला. आणि लिफ्ट मध्ये शिरला.  अरे !! याला काय वेडबिड लागलं आहे का ... दिक्षा बघतच राहिली त्याकडे. पण लिफ्ट चा दरवाजा बंद होताना विनय हसताना दिसला तिला. तिलाही हसू आलं. खरच पागल आहे हा ... 

============================================================

दिक्षाच लक्ष नव्हतं आज कामात. राहून राहून तिला विनयची आठवण येतं होती. काम तसंच बाजूला ठेवलं आणि ऑफिस मधून खाली आली.. कुठे जाऊ आता... मनात म्हणत असताना तीच लक्ष बागेत गेलं... विनयची रातराणी होती तिथे ना.. बहरून आलेली.... कितीतरी कळ्या... रात्रीची वाट बघत होत्या... उमलायचे होते ना त्यांना...  दिक्षा आली तिच्याजवळ. रातराणी वरून मायेने हात फिरवला. विनय असंच करायचा ना ... गोंजारायचा तिला. तिथेच बसली दिक्षा. विनयची आठवण काढत... का आले ते रिपोर्ट... पण .... विनयचं का आला माझ्या life मध्ये... ये ना विनय ... वाट बघते आहे तुझी.. रातराणी तिला आता अस्पष्ठ दिसू लागली .... डोळ्यात पाणी जमा झालेलं ना... 



to be continued.........................................................

Friday, 17 August 2018

भटकंती.... पुन्हा एकदा ( भाग चौथा )



             पहाटे पहाटे आलेल्या वादळाने पूर्ण रात्र भिजवून टाकली होती. दुसरा दिवस, सुरु झाला तेव्हा वारा त्याच्या स्वभावानुसार इकडून -तिकडे नुसता उडत होता. पहाट होतं होती, कालच्या पावसाने सारा परिसर धुवून निघाला होता. हिरवा रंग काय उठून दिसत होता सांगू , पण अमोलच्या मनात मात्र संध्याकाळ दाटत होती. काल आलेल्या वादळात... तो स्वतःही वाहून गेला होता. राहिला होता तो फक्त हाडा-मांसाचा देह. भावनाहीन झालेला बहुदा. पुढचे २ दिवशीही तेच. चल बोललं कि चालायचं .... आणि बस बोललं कि बसायचं. ना खाण्यात लक्ष ना कश्यात.. कॅमेरा त्या वादळात बॅगमध्ये ठेवला तो ठेवलाच. कोणाशी बोलणं नाही... अगदी बुजगावण्यासारखा झालेला. 

              तिथे आकाश सुद्धा काही विचारात होता. वादळात पलीकडे दिसलेले गोलाकार रचनेत असलेले तंबू ... काही केल्या त्याच्या डोक्यातून जात नव्हते. कुठेतरी नक्की बघितलं आहे मी. हाच विचार त्याच्या डोक्यात. त्यामुळेच गेले २ दिवस , या सर्वांचा मुक्काम एकाच गावात होता. आकाशच जात नाही पुढे तर ते तरी पुढे कसे जाणार ना. 

अश्याच एका दुपारी , सई आणि तिचे मित्र त्यांनीच काढलेले फोटो , लॅपटॉप मध्ये transfer करत होते. सईचे झालेलं काम. पण तिची एक मैत्रीण , ती खूप confused वाटत होती. सई तिच्या शेजारी येऊन बसली. 

" Hey .. what happened.. ? " , 
" see ... " तिने सईला एक फोटो दाखवला. 
" wow !! amazing क्लिक किया है तुने... " सईने तिला शाबासकी दिली. 
" Wait ... my friend ... अभी दुसरा image देखो . . " सईला तिने पुढचा फोटो दाखवला. तोही सुंदर ... 
" दोनो क्लीक amazing है... तो confusing क्या है... " सईने उलट प्रश्न केला. 
" means ... तुम्हे अभी भी समज आया ..."  तिने आता सईला विचारलं.
 " क्या ? " ,
" ये first क्लिक मेरा नही है .. " ,
" तो किसका है ? " ,
" आकाश !! " .... सईचा चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह... 
" आकाश !! who ? " .... तिने सईच्या डोक्यावर टपली मारली. 
" आकाश ... famous photographers.. !! जिसको हम सब ... follow करते है... वो आकाश.. " तेव्हा कुठे सईची लाईट पेटली. 
" त्याचा क्लिक आहे हा... हो... हो, असे क्लिक त्याचेच असतात.. पण आता का बघत आहेस तू हे सर्व.. ", 
" means ... अभी तक तुम्हे कुछ समज नही आया.. " सईने नकारार्थी मान हलवली. 


" OK ... तुम्हारे पुराने क्लीक देखो... जो हमने इधर आने से पहिले क्लिक किये थे... और अभी के... just compare... " सईने खरच पडताळणी केली. 
" हा... means ... ये भटक्या... उसने दिखाया, तभी तो फोटो मिले.. इतने सुंदर फोटो मिले.. " ,
" exactly... ये मेने पहिले भी discuss किया ग्रुप मे... ये जो फोटोग्राफी चल रही है ना ... वो आकाश जैसी हि है.. " .
" what do you mean !! " ,
" आकाश ... उसेही ऐसी फोटोग्राफी करने का experiences है  ... non of other photographer.... have exactly same taste as आकाश... are you getting me... " तिने पट्कन बोलून टाकलं. सई अवाक झाली. 
" म्हणजे ... तो भटक्या .. तोच आकाश आहे .. असं म्हणायचं आहे का तुला... " , 
" Yes ... but not sure about my theory.. " ,
" पण खरंच ग ... हे मलाही लक्षात आलं नाही... अशाप्रकारची दृश्य फक्त आकाशच बघू शकतो. "
" अभी ... उसे कुछ past का याद नही , but हम try तो कर सकते है ना... and ... मेमरी कुछ ऐसी चीज नही ... जो एक बार गई तो गई.. " सई ऐकत होती फक्त. खरं होते ते. हे सईच्या आधीच मनात आलेलं. तरी भटक्याला सर्व आठवलं तर तो आपल्यापासून दूर जाईल हेच खटकत होते.  

==============================================================

" काय रे गप्प गप्प असतोस ... गेले २ दिवस बघते आहे तुला ... कुठे हरवलेला असतो... " कोमल शेवटी अमोलला विचारायला आलीच. अमोल गप्पच. " बोल ना काहीतरी... " बोललाच अमोल. 
" काही नाही... जरा निराश झालो आहे इतकंच... " ,
" तरीही ... " कोमल काही बोलणार पुढे तर अमोलने तिचं वाक्य तोडलं. 
" नको विचारू ... नाही सांगता येणार... काही गोष्टी आयुष्यात पहिल्यांदा घडतात. काहींनी आनंद होतो , काहींनी दुःख वाटते. तसंच काहीसं झालं आहे माझं. " असं बोलून निघून गेला. या सर्वापासून थोड्या दूर अश्या अंतरावर जाऊन बसला. त्याला तर अजूनही विश्वास वाटतं नव्हता कि सुप्रियाच प्रेम आहे कोणावर तरी. रागातच होता जरा. कॅमेरा होता सोबतच. सुरु केला कॅमेरा. आणि सुप्रीचे जेवढे फोटो काढले होते, सगळेच डिलीट करून टाकले. स्वतःवर सुद्धा चिडला. पण राग काढायचा कोणावर. बसून राहिला तसाच. 

"अमोल सर .. " मागून आवाज आला. संजना होती मागे. अमोलने तिला उत्तर दिलं नाही. " अमोल सर बोलायचे आहे... बसू का .. " संजना. 
" मला नाही बोलायचं कोणाशी... प्लिज !!! जा तू.. " ,
" प्लिज सर... बोलू दे ... नाहीतर उगाचच गैरसमज राहतील मनात.. " संजनाच्या या वाक्यावर मात्र अमोलने मागे वळून बघितल. 
" गैरसमज ??... काय बोलायचे आहे तुला... तुम्ही कोणी सांगितलं का ... हि पिकनिक नाही .. शोधमोहीम आहे ते. बोल.. " संजना काय बोलणार त्यावर... 
" पण मला बोलू दे ... ५ मिनिट तरी... प्लिज .. " अमोल तर ऐकायच्या तयारीत नव्हता, तरी संजनाला खाली बसायला सांगितलं. 

" आकाश ... आमचा जुना मित्र ... त्याला भटकायला खूप आवडते. तसाच तो एक वर्षांपूर्वी गेला तो आलाच नाही. सुप्रीने सांगतील ना...किती शोधलं त्याला.. नाही सापडला, तो कायमचा गेला असच वाटत होतं तर कोमलच्या मैत्रीणीला एक माणूस भेटला तिच्या गावात .... वर्णन जरी त्याच्या सारखं नसलं तरी त्याच्या सवयी आकाश सारख्या होत्या. म्हणून आम्ही सगळे पुन्हा त्याला शोधायला बाहेर पडलो. सुप्री तयार नव्हती या साठी. पण आता तो जिवंत आहे , हे समजल्यापासून नवी उमेद निर्माण झाली आहे तिच्या मनात. " एव्हाना अमोल शांत झाला होता. 
" मग तो एक वर्ष का आला नाही परतून... आणि ज्याला शोधत आहात.. तो "तोच " आहे हे कश्यावरुन... " ,
" तो का आला नाही गेल्या वर्षभरात तेच कळत नाही.. पण तो आकाशचं आहे... सुप्रीने त्याच्या खुणा ओळखल्या.. या सर्व गावांमध्ये त्याच्या खुणा मिळतात... आपण त्या खुणांच्या मागेच जातो आहोत... गावात त्याला "भटक्या" म्हणतात ... अपघातातून वाचला तर नक्की.. परंतु त्याचा तसा अवतार का आणि कसा झाला ते , तो भेटेल तेव्हाच कळेल... " संजनाने पूर्ण माहिती सांगितली. अमोलला पटलं ते. किती प्रयत्न करत आहेत सगळे... फक्त एका माणसासाठी.. किती प्रेम असेल या सर्वांचे त्याच्यावर. आपणच हट्टीपणा करतो आहोत. पण खरच.. खूप चांगला माणूस असणार... 

" कोण आहे आकाश... " अमोल आता शांत झाला होता.. 

" आकाश ना !! ... जीवाला जीव देणारा... perfect मित्र ... म्हणजे मी त्याचं वर्णन सुद्धा करू शकत नाही इतका छान आहे तो... सुप्री आणि त्याची जोडी किती छान दिसते.. " संजनाने लगेच त्याला त्यांचा ग्रुप फोटो दाखवला. त्या फोटोत फक्त एकच वेगळा व्यक्ती होता. अमोलने ओळखलं. 
" आणि ... तुम्ही त्याला ओळखत असणार... " ,
" मी ? " ,
" आकाश फोटोग्राफर आहे... wild India मॅगजीन चे फोटो काढणारा ... फेमस फोटोग्राफर... आकाश.. " 

अमोल तर त्याचा फॅन होता... आयडॉल होता त्याचा आकाश... हा तोच आकाश... कमाल आहे ना... अमोल त्याच्या फोटोकडे बघतच राहिला.  

==============================================================

आकाश तर भलत्याच विचारात गढून गेलेला. त्यात सई त्याच्या मागे कधी येऊन उभी राहिली, हे त्याला कळलं नाही. 
" कॅमेरा कधी वापरला आहेस का... तू .. " आकाशने सई कडे पाहिलं. 
" नाही .... का ? " ,
" तुझ्या गळयात असतो ना... तो कोणाचा आहे मग... " , 
" सांगितलं ना आधीच... माझ्यासोबतच आहे आधीपासून.. पण आता का पुन्हा विचारते आहात .. " 

सईने वाचलं होते कुठेतरी. memory lose झालेल्या व्यक्तींना , त्याच्या आठवणीतील गोष्टी , रोजच्या वापरातील गोष्टी समोर आणल्या तर त्यांची गेलेली memory परत येते. आता भटक्या हाच आकाश असेल तर त्याची नित्याची गोष्ट म्हणजे... साहजिकच कॅमेरा ... म्हणून ती कॅमेरा घेऊन आलेली. पण आकाशचा मूड नव्हता. ते गोलाकार रचना केलेले तंबूच त्याच्या डोळ्यासमोर होते. आकाश पुन्हा विचारात गढून गेला. सईनेही पुढे काही विचारलं नाही.  

               संध्याकाळी जेव्हा पुन्हा आकाश आला तेव्हा जरा तणावात वाटला. कोणाशीच न बोलता तसाच बसून होता. सई आणि तिचा ग्रुप मग गावात निघून गेला. सामान सगळं तिथेच होते. अचानक त्याची नजर सईच्या कॅमेराकडे गेली. डोक्यात सुरु असलेल्या त्याच त्या विचारांनी वैतागला होता तो. काहीतरी विरंगुळा म्हणून त्याने कॅमेरा उचलला. का सांगत होती मॅडम ... मला फोटो काढण्यासाठी. सहजच त्याने बसल्याजागी कॅमेरा उलट-पुलट करून पाहिला. काही आठवलं , सई कॅमेरा कसा पकडते ... फोटो काढण्यासाठी. तसाच कॅमेरा त्याने डोळयांसमोर धरला. काय झालं कुणास ठाऊक... आठवणींची एक कळ सणकून आकाशच्या डोक्यात शिरली. बेशुद्ध झाला तो. 

==============================================================


अमोल बऱ्यापैकी नॉर्मल झालेला. पण सुप्रिया बोलत नव्हती अजूनही. तसं बघावं तर तिलाही थोडं दुःखच वाटलं होतं. अमोलला तसं नाही बोलायला पाहिजे होते. अचानक बोलून गेलेली ती. तरी आकाशला भेटायची ओढ लागली होती सुप्रीला. त्यामुळे संजना बोलली होतीच, दोघांपैकी एकाला सांभाळावे लागेल. तिने आकाशला निवडलं. फक्त अमोलचे मन दुखावले गेले हे कुठेतरी टोचत होते तिला. 

==============================================================

" आकाश .... आकाश !! " सुप्रिया कधीपासून त्याला हाका मारत होती. 
" काय ग ... झोपू दे जरा... काल किती दमलो मी. रात्री ३ वाजता झोप लागली. आता तुला काय झालं एव्हडं .. जा , झोपू दे जरा.. " आकाश पेंगत होता. 
" उठ ना रे.. चल सूर्योदय बघायला.... च... ल ... ना .... रे !!  सकाळचे ५ च तर वाजले आहेत. ",
" वेडीबिडी झाली आहेस का... ५ वाजता कुठे सूर्योदय होतो,... ती संजना बरोबर बोलते तुला.... पागल.. " आकाश पुन्हा झोपला. 
" थांब हा आता.. पाणीच ओतते,... मग होशील जागा ... " सुप्रीने पाणी ओतलं. 

                  आकाशला जाग आली. डोकं अजूनही दुखत होते. हलकेच त्याने डोळे उघडले. बाजूला सई होतीच. आकाशला शुद्ध आली तशी ती डॉक्टरला बोलवायला पळाली. आकाशला काही कळत नव्हतं. थोडावेळ गेला त्याला समजायला. सई डॉक्टर सोबत आली. डॉक्टरने तपासलं आकाशला. 

" नॉर्मल आहे, तरी आजचा दिवस त्याला आराम करू दे इथेच... उद्या सकाळी जाऊ शकतो पुन्हा भटकायला... " डॉक्टरने आकाशच्या पाठीवर थोपटलं आणि निघून गेला.
" कसा आहेस... " सईने विचारलं आकाशला. एव्हाना सईचा बाकीचा ग्रुप आलेला. 
" ठीक आहे, डोकं ठणकते आहे जरा... पण आहे कुठे आता मी... " आजूबाजूला बघितल्यावर कळलं , दवाखाना आहे असं वाटते. 
" तू बेशुद्ध झाला होतास, म्हणून इथे आणलं... ", 
" तुम्ही घेऊन आलात का... ", 
" मी नाही... गावातल्या लोकांनीच आणलं. " आकाशला आठवलं. कॅमेरा घेतला होता हातात. पुन्हा एक कळ त्याच्या डोक्यात भिनली. 
" हो... काल संध्याकाळी काय झालं माहित नाही.. कॅमेरा हातात घेतला आणि बेशुद्ध झालो... " ,
" काल संद्याकाळी ?? २ दिवस झाले तुला .... असाच झोपून आहेस... " यावर आकाश उठून बसला. 
" २ दिवस !! " उठून बसला तरी त्याचे डोके दुखत होते. डोकं पकडून बसला तो. 
" काय झालं नक्की तुला... " सईने काळजीत विचारलं. 
" माहित नाही.. पण काहीतरी डोक्यात शिरलं आहे असंच वाटते... आणि मघाशी एक स्वप्न पडलं होते... त्यात तीच मुलगी होती.. पण ते स्वप्न नसून आधीही घडलं आहे माझ्यासोबत असंच वाटते. मी ना .. झोपतो जरा... खूप दुखते आहे डोकं ... " आकाश झोपला पुन्हा. 

सई आणि तिचे मित्र बाहेर आले. " मुझे लगता है...उसे पुराना याद आ रहा है... " एकजण पट्कन बोलून गेला. सईलाही कळत होते ते. कॅमेरा हातात घेतला कि काहीतरी आठवणार नक्की... तसेच झाले होते. फक्त आता तो निघून जाईल याचे तिला वाईट वाटतं होते. 

==============================================================


" कोमल.... " अमोलने कोमलला एका बाजूला बोलावलं. " मला निघावं लागेल... ",
" कुठे ? " ,
" दिल्लीला ... " तोपर्यंत कोमलला सुप्री- अमोल बद्दल संजना कडून कळलं होतं. 
" काय चाललास ... means ... मला समजलं तुझं गप्प राहण्याचं कारण ... sorry for that ... but असा जाऊ नकोस... " कोमल... 
" नाही नाही... उगाच गैरसमज नको करुस... सकाळीच पप्पांचा कॉल आलेला... त्यांना तिथे मदत पाहिजे होती, विचारत होते.. येशील का... जावे लागेल मला.. म्हणून निघातो आहे... " ,
" सुप्रीला सांगितलं का तू... " ,
" ती तशीही बोलत नाही आता माझ्याशी, पुन्हा तिला सांगायला गेलो तर तिलाही हीच misunderstanding होईल... त्यापेक्षा असाच जातो... " कोमलला पटतं नव्हतं ते.. तिने थांबवलं अमोलला. 

==============================================================

                      सूर्योदय होत होता दूरवर, पक्षांचा मोठ्ठा थवा, दुथडी भरून वाहणारी नदी... सोसाट्याचा वारा.. झाडाच्या पानांची प्रचंड सळसळ.. जोराचा पाऊस... विजांची चकमक.... आणि एका दगडावर ... दूरवर पाहत बसलेली सुप्री.. आकाश खाड्कन उठून बसला. आपण अजूनही त्या दवाखान्यात आहोत, ते लगेचच त्याच्या ध्यानात आलं. बाजूलाच घड्याळ होतं. रात्रीचे २ वाजले होते. दवाखान्यात तसे ४-५ बेड होते. त्यावर असलेले पेशंट झोपेत होते. बाकी कोणी नव्हतं. आकाश सगळीकडे नजर टाकत होता. बाहेर अर्थात पाऊस... खिडकीजवळ आला. जोराचा पाऊस सुरु होता. सर्व आठवलं नाही , तरी स्वतःची ओळख त्याच्या लक्षात आली. 

                    बाजूला आरसा होता. तिथेही लक्ष गेलं. वाढलेले केस .. दाढी, स्वतःलाच किती वेळ बघत होता तो.आणि हो ... सुप्री , कुठे असेल .. आपण कुठे आहोत.. तिच्याजवळ जायला हवे.. आकाश पुन्हा त्या बेडवर जाऊन झोपला. 

सकाळ झाली तशी सई .. आकाशला बघायला आली. आकाश जागा होता. 
" कसं वाटते आहे आता... बरा आहेस ना.. " सईचा पहिला प्रश्न. आकाशला मागचं आठवलं तरी यांना तो अजूनही ओळखत होता. 
" ठीक आहे तो.. घेऊन जाऊ शकता त्याला... काय भटक्या ... बरोबर ना ... " डॉक्टर हसत बोलला. आकाशने हसूनच उत्तर दिलं. 
" हो , निघतोच आहे. " सईचा ग्रुप आलेला. त्यांनी आकाशला सोबत घेतलं. आणि बाहेर आले.  


आकाश अजूनही confused, कुठे जावे.. या मॅडमला सांगायला पाहिजे ना... " थांबूया का जरा.. काही बोलायचं होते. " आकाश बोलला. सईला याची कल्पना होतीच. सगळ्यांनाच तिने थांबायला सांगितलं. 

" म्हणजे कसं सांगू ते समजतं नाही.. तो कॅमेरा डोळयाला लावला आणि काय झालं ते कळत नाही.... जुन्या आठवणी आल्या... माझी ओळख कळते आहे आता मला.. माझं नाव आकाश , हे आठवलं मला. मी काय करायचो आधी ते नाही आठवतं. पण ती मुलगी, जी मला सारखी दिसायची... तिचं नाव आठवलं... सुप्री... आम्ही फिरायचो खूप.. आठवते अंधुक असं... " सई सोडून बाकी सर्वाना आनंद झाला. 
" and .... और कुछ .... means तुम्हारा घर... कहा रहाते हो... " ,
" नाही... ते नाही आठवलं... किंवा कुठे राहतो तेही नाही...फक्त ती आठवते.... सुप्री. बाकीचे आठवेल हळूहळू... " ,
" मग आता काय " सई .. 
" शहरात जावे असंच वाटते. कधीपासून आहे इथे आठवत नाही... " ,
" खरच जाणार तू... आम्हाला सोडून... " सईच्या डोळ्यात पाणी जमा होतं होते. 

==============================================================

अमोल निघाला आहे , हे सर्वाना कळलं होतं. " जायलाच पाहिजे का ... अमोल सर ... ? " संजनाने विचारलं. सुप्री दुरूनच अमोलला बघत होती. 
" पप्पांना मदत पाहिजे आहे तिथे. जावे लागेल. नाहीतरी आता प्रवास संपला आहे माझा. " अमोलच्या या वाक्यावर संजनाने सुप्रीकडे वळून बघितलं. 
" असं का बोलतो आहेस अमोल ... " कोमल 
" म्हणजे तुम्ही पुढे जाणार आता... मी दिल्लीला चाललो.. मग संपला ना प्रवास इकडचा... " अमोलचे तर नक्की झालेलं निघायचे. थांबून तर चालणार नाही. 
" तुम्ही जाणार कसे दिल्लीला... " एका मुलीने विचारलं. प्रश्न तर बरोबर होता तिचा. अमोलनी कोमलकडे पाहिलं. कोमलला समजलं. 
" मला नक्की माहित नाही. but एक दिवस तरी थांब. चौकशी करावी लागेल पुढे. उद्याचा दिवस थांबणार का तू... " काही पर्याय नव्हता. थांबावेच लागेल. या सर्व चर्चेत दुपार कधी झाली कळलं नाही.
==============================================================

सईचा ग्रुप रात्री जेवल्यानंतर आराम करत बसला होता. आकाश एकटाच शेकोटी जवळ बसला होता. सई मात्र घुटमळत होती. चलबिचल नुसती मनात. आकाश त्याच्याच दुनियेत मग्न. पण मागे सई उभी आहे हे त्याच्या लक्षात आलं.
" काय झालं मॅडम... " आकाशच्या शेजारी येऊन बसली. 
" बोलू कि नको ... कळत नाही मला... पहिल्यांदा असे होते आहे मला. नेहमी मी काही मनात न ठेवताच बोलते, आज नाही येतं मनातलं बाहेर... ", 
" बोला ... मनात काही ठेवू नका.. " सई जरा धीट झाली. 
" मला तू आवडायला लागला आहेस.. खरंच ... तुझं वागणं ... स्वभाव ... बोलणे... म्हणजे... तू वेगळाच आहेस... " आकाशला ते ऐकून हसू आलं. 
" मला माहित होते.... तू हसणार ते... आणि हे सुद्धा माहित आहे .. तू माझ्यापेक्षा मोठा आहेस ते...तरी प्रेम झालं आहे मला.. " ,
" थॅक्स ma'am .... पण माझी कोणीतरी वाट बघते आहे... हे माहित आहे ना तुम्हाला... " ,
" सगळं माहित आहे मला... तू कोण आहेस... तुझ्या life मध्ये कोणी आहे ... त्याने काय फरक पडतो. प्रेम असेल तर काय फक्त लग्न .... हाच option आहे का... प्रेम कोणावरही होऊ शकते... वय नसते प्रेमाला... आणि तुझ्यावर प्रेम करते, याचा अर्थ असा नाही कि तू मला भेटलाच पाहिजे... " आकाशला पटलं ते. 

" इतके दिवस सांगणार होती. आता , तू काय जाशील सोडून... म्हणून सांगून टाकलं. " 
" काही प्रॉब्लेम नाही... होते कधी कधी असं....  असंच असते मन.. असो, तुम्हाला कर्नाटकला जायचे आहे ना. " ,
" लगेच चाललास का तू... " सईने पुन्हा विचारलं. 

आकाशने वळून पाहिलं. " आधी कसं... कोण आहे मी... तेच माहित नव्हतं. आणि आता, तिची ओढ लागली आहे. कदाचित ती भेटली तरच बाकीच्या गोष्टी आठवतील मला, असं वाटते. " सई ऐकत होती. 
" इथून गाड्या जात नाहीत.. उद्या सकाळी निघालो ना... तर पुढचा रस्ता सांगीन. कदाचित २-३ गाड्या बदलून जावे लागेल शहरात.. पावसाने रस्ते बंद केले आहेत ना... एकदा का शहरात गेलात कि तिथून जाऊ शकता तुमच्या घरी... ", 
" आणि तू... तुला नाही जायचे का घरी... " ,
" हो तर... जायचेच आहे... पण तुमची वाट वेगळी आहे... शिवाय पुढे गावात जायचे होते मला... तुम्हाला ज्या गाडीने जायचे आहे ती गाडी जवळच्या गावातून जाते, तुम्हाला सोडलं कि जाईन पुढे. " आकाशने बोलणं संपवलं. दोघेही गप्प. शेकोटी एकटीच काय ती जळत होती. आकाश पुन्हा विचारात गढून गेला. सईदेखील त्याला त्याच्याच आठवणींच्या स्वाधीन करून निघून गेली. 


==============================================================

"अमोल .. " कोमलने अमोलला हाक मारली. " पलीकडे एक गाव आहे. तिथे जाऊन एक s.t. पकडावी लागेल. ती तुला दुसऱ्या गावात घेऊन जाईल. तिथून पुढे आणखी एक गाडी पकडून शहरात जावे लागेल. तिथून तु दिल्लीला जाऊ शकतोस. " अमोलला कसं कळणार देव जाणे. 
" माहित आहे जरा confusing आहे ते.. पण तोच option आहे तुला.. " कोमल ... 
" ok ... बघतो मी... निघावे तर लागेल.. ",
" बघ ... अजून विचार कर.. नको राग ठेवूस डोक्यात.. " ,
" हे बघ कोमल.. , कोणावर राग नाही आहे. फक्त पप्पांनी बोलावलं म्हणून चाललो आहे. आणि आता काहीच नाही मनात माझ्या. सुप्रियालाच नाही बोलायचे माझ्याशी. मित्रसुद्धा मानत नाही आता ती. जाऊ दे, तुम्ही जमलं तर समजवा तिला. मी निघतो. " ,
" पण जाणार कसा.. नदी आहे मधेच... पलीकडे जायचे आहे तुला.. " ,
" मग ? पुढे ब्रिज वगैरे असेल ना.. " ,
" नाही .. पण एक होऊ शकते. नदी किनाऱ्यावर होड्या असतात. त्यांना बोलून जाऊ शकतोस " अमोल काही विचार करून निघाला. अर्थात वाईट वाटलं सुप्रीला. तरी काही करू शकत नव्हती ती. 

==============================================================

finally, आकाश - सईचा ग्रुप एका ठिकाणी पोहोचला. " इथून पुढे एक वाट आहे. जी तुम्हाला पुन्हा गावात घेऊन जाईल... तिथे विचारलं तर सांगेल कोणीही... कुठली गाडी पकडावी ते. " सईने सगळ्यांना सांगितलं. 
" तू आता कुठे चाललास.... " ,
" इथून पुढे एक गाव आहे... तिथे एक आजी राहते. शेवटी जेव्हा आलेलो तेव्हा ४ दिवस तिने राहायला दिलं होते तिच्या झोपडीत. अर्धी भाकरी मला देयाची ती , तिच्या वाटणीची... तिला भेटूनच निघीन पुढे.... " ,
" मग आज शेवटची भेट का... " सईने आकाशकडे पाहिलं. 
" सांगू शकत नाही... गणूच्या मनात आलं तर.... त्यालाच माहित... " आकाश... 
" आम्हाला लक्षात ठेवणार का... मला तरी...  " सई पुन्हा भावुक झाली. 
" अजूनही सगळं आठवलं नाही मला.... तर आताच कसं विसरणार.... तुम्ही नेहमीच लक्षात राहणार माझ्या... आणि एक प्रॉमिस करतो मी.... जुने सगळं जरी आठवलं तरी .... तुम्हाला कधीच नाही विसरणार... " 

साधारण , सकाळचे ८:३० वाजले होते. छान थंड हवा वाहत होती. आजूबाजूला छान हिरवाई होती. गेले २ दिवस पावसानेही उसंत घेतली होती. तीच संधी साधून नवे कोंब जमिनीतुन वर डोकं काढून बसलेले भासत होते. पायवाट अधिक हिरवी दिसतं होती. काही पक्षांचे थवे निघाले होते पुन्हा..... पोटा-पाण्यासाठी.... आणि आकाश निघायच्या तयारीत होता. सईसहित सगळयांना भरून आले. मग एकेकाने मिठी मारली त्याला. आलिंगन देऊन भटक्याला निरोप... सईची मिठी जरा लांबली. 
" कधी भेटशील पुन्हा... " ,
" भेट होईल... कधी ते माहित नाही... " 
" तू कधी आलास तर कसं कळेल मला.... मोबाईल तर वापरत नाहीस.... " सईचे प्रश्न संपत नव्हते. आकाश हसला त्या प्रश्नावर... 
" पाऊस आहे ना.. तोच सांगेल तुम्हाला... मी जेव्हा येईन... " आकाशने पाटीवर त्याची सॅक लावली. सगळ्यांकडे एक नजर टाकली...आणि निघाला तो... वाईट वाटतं होते सईला... पण त्याची माणसं भेटली पाहिजे ना त्याला... स्वच्छ निळंशार आभाळ .... एक मोठ्ठा डोंगर समोर... सोबतीला हिरवाई... हिरवीचं पायवाट... आणि मोठ्या कॅनव्हास वर निघून चाललेला आकाश... सई त्याला नजरेआड होऊ पर्यंत बघत होती. 

==============================================================

" कसं वाटेल ग... मी कधी तुला सोडून गेलो तर.. " आकाशने सुप्रीला अचानक विचारलं. 
" का ... कंटाळा आला का माझा... इतक्या लवकर.. " ,
" असंच विचारलं.. सांग तर ...  " ,
" नाही... विचार केला.. खरंच .. तुझ्याशिवाय जगणं काय... ते नाही imagine करू शकत.... " ,
" खरंच का ... " ,
" हो.... असंच वाटायचं... गणूने माझी सगळी पुण्याई..... आतापर्यंत जेव्हडी चांगली कामे केली आहेत.. त्याचा प्रसाद म्हणजे तू... असंच वाटते अजूनही मला. काही गोष्टी आपल्याला न मागताच मिळतात..पण आठवणींचा शाप जाता जात नाही. किती वर्ष मी तो शाप घेऊन फिरत होते. तुझ्यामुळे त्या गोष्टी विसरण्यास शक्य झाल्या.... नाहीतर माहित नाही... आणखी किती वर्ष मी अशीच हरवत गेली असती स्वतःला... तुझ्यामुळे जगण्याला अर्थ मिळाला. तू जाण्याचा गोष्टी का करतोस... तू कधी जाणार नाहीस हे माहित आहे मला... आणि तुझी पाठ तर कधीच सोडणार नाही मी... " सुप्रीने आकाशला गच्च मिठी मारली. 

अश्या खूप आठवणी होत्या दोघांच्या. पण सद्यातरी फक्त सुप्रीलाच ते आठवत होते. सुप्री अशीच विचार करत बसली होती. कुठे असेल आकाश... काय करत असेल... त्यात अमोल निघून गेलेला. कारण वेगळं असलं तरी, शेवटी अमोलने असे निघून जाणे तिला आवडलं नव्हतं. रात्रही खूप झालेली. उद्या सकाळी लवकर निघूया... असा विचार करत झोपायला गेली. 

==============================================================

            " शट्ट यार !! ..... बॅटरी पुन्हा संपली. " अमोल मोबाईल कडे बघत म्हणाला. " एकतर रस्ता माहित नाही, त्यात याने पण दगा दिला. " अमोल वैतागला होता. कसाबसा तू नदी पार करून पलीकडे आलेला होता. एका नावाड्याने त्याला नदी पार करून दिली होती. तरी गावातल्या पायवाटांनी फसवलं होते त्याला. सुप्री-संजनाचा ग्रुप पुढे निघून गेलेला. त्यामुळे त्याच्या मागे सुद्धा जाऊ शकत नव्हता. शिवाय नदी होतीच वाट अडवायला. दिल्लीला जायला निघाला आणि पुरता गोंधळून गेला. 

            दमला आणि एका जागी बसला. " थांब अमोल... जरा एकाग्र हो... शांत डोक्याने विचार करूया... " असं स्वतःलाच तो समजावत होता. डोळे मिटून बसला १० मिनिटं. .... ok , पहिलं काय... मोबाईल charge करावा. त्यावर गूगल मॅप वरून रस्ता कळेल. .... डोळे उघडले. समोर काही घरे दिसली. गाव असावे.तिथे कुठेतरी चार्जिंग होऊ शकते. मनात बोलून निघाला अमोल. १५-२० मिनिटे चालून एका घराजवळ पोहोचला. जवळ वाटणारे ते घर इतक्या दूर होते. दमलेला अमोल आणखी दमला. ते घर नसुन गावातले एक दुकान आहे , हे लगेच समजलं त्याला. तिथेच पाण्याची बाटली विकत घेतली. आणि जरा विनंती करून मोबाईल चार्जिंगला लावला. आता १ तास तरी आराम करायला मिळेल म्हणत तिथेच खाली डोळे मिटून बसला. 

" नाही ...  एक मोबाईल अगोदरच लावला आहे चार्जिंग साठी... तुमचा कॅमेरा कुठे लावू... " दुकानदाराचा त्या मोठ्या आवाजाने अमोलला जाग आली. एक मुलगी कॅमेरा घेऊन उभी होती. 
" काय झालं .. " , अमोल उभा राहिला. 
" अहो , साहेब... तुमचा मोबाईल charge करू कि यांचा कॅमेरा... " दुकानदार बोलला. 
" ओह्ह ... तुमचा मोबाईल आहे का... मी बघितलेच नाही तुम्हाला... " सई होती ती. 
" एक मिनिट... तुम्हाला बघितलं आहे कुठेतरी... " अमोल सईकडे पाहत म्हणाला. 

" हा ....  हा ....  हा .... खूप जुनी ट्रिक आहे हि... मुलींची ओळख काढायची. " सई रागात बोलली. 
" no ... no ... don't misunderstand... actually बघितलं आहे तुम्हाला.. one sec... तुम्ही त्या वादळात ... आमच्या ग्रुपला क्रॉस झालेलात ना... आठवला का ब्रिज.. " सईला आठवलं... एक ग्रुप तर गेला होता बाजूने... 
" पण तिथे तर धुकं होते खूप... तुला कशी दिसली मी.. " ,
" तुम्हीच तर आलेलात पहिल्या धुक्यातून बाहेर.. तेव्हा मी तिथेच होतो. " अमोलने explain केलं. 
" मग तुझा ग्रुप कुठे आहे... आजूबाजूला ...दूरवर तर कोणीच नाही.. " सई बघत होती. 
" मी दिल्लीला निघालो आहे... but ... वाट चुकलो मी.. कदाचीत... " अमोल डोकं खाजवत बोलला. सईला हसू आलं. 
" आम्ही थांबलो आहोत... म्हणजे माझा ग्रुप... काही help लागली तर सांग... " सई निघाली...  
" कुठे चाललात... " ,
" कॅमेरा चार्जिंग साठी... तुझा मोबाईल आहे ना... दुसरीकडे बघते कुठेतरी... आम्ही आहोत गावात आज.. तिथे पुढे आमचे tent आहेत... बाय... " सई निघून गेली. 

अमोल आणखी अर्धा - पाऊण तास थांबला तिथेच. मोबाईल charge झालेला , तरी वाट चुकलेला. आणखी चुकण्यापेक्षा, म्हणून त्यांना विचारून पुढे जाऊ.. असा विचार करून सईच्या ग्रुप कडे निघाला. दुरूनच त्याला हे सगळे tent दिसले. सई होतीच तिथे. 

" Hi " अमोलला आलेलं बघून सई पुढे आली. " मला फक्त रस्ता सांगा.. कसं कुठे जायचे ते.. त्यांनी सांगितलं होते कि इथून बस मिळेल, ती पकडून दुसरी बस... म्हणजे हे खूप confused आहे... म्हणून मी पण गोंधळून गेलो. अमोलच्या या वाक्यावर ग्रुप मधली एक मुलगी हसली. 
" हम भी तो खो गये है... " अमोलला कळलं नाही. 
" मी सांगते... आम्हालाही शहरात जायचे होते.. रस्ताही सांगितला होता त्याने... but हरवलो.. " सई हसू लागली. 

आता काय... हे सुद्धा हरवले आहेत.. अमोल विचार करू लागला. पुढे तर जायला पाहिजे ना. 
" तुमच्या सगळ्यांकडे कॅमेरे ???? .... फोटोग्राफर आहात का... " अमोलचा प्रश्न. 
" हो... आम्ही सर्व फोटोग्राफी साठी आलो आहोत महाराष्ट्र मध्ये... कर्नाटक मधून आलो आहोत... " सईने सांगितलं. 

" व्वा !! मराठी छान बोलता तुम्ही.. " अमोलला अचानक काही वेगळं वाटलं. " तुम्ही इथले नाहीत... शिवाय फोटोग्राफी करत फिरत आहात... ते कसे.. आणि आता हरवला आहात... means काहीच लिंक लागत नाही.. " अमोल आणखी confused ... 

" एक था हमारे साथ... उसने help कि हमारी... अब वो आगे निकल गया.. और हम खो गये... " एकाने छान समजावलं. 

" शट्ट ... कोण होता तो.. पाहिजे होता आता... दिल्लीला गेलो असतो मी... " अमोल हिरमुसला. 
" मग तुझा ग्रुप... त्यांनी का सोडलं तुला... कोणीतरी यायला पाहिजे होते ना तुझ्यासोबत... " सई. अमोल बसला खाली. 
" काय सांगू... शोधत आहेत कोणाला तरी. त्यांना कुठे घेऊन येऊ.. आणि आलेही नसते सोबत.. " ..... 

कोणाला तरी शोधत आहेत ... !! हे वाक्य सईला interesting वाटलं. सईने पुढे विचारलं. " कोणाला शोधत आहेत. "
" त्याचं नाव वेगळं आहे ... आणि इथे त्याला वेगळ्या नावाने ओळखतात. एक वर्षांपूर्वी हरवला आहे तो. आणि आता तो जिवंत आहे हे कळलं आहे त्यांना.. इथे तो भटकत असतो सारखा.. लोकांना मदत करतो.... काय नाव त्याचे.. हा ... भटक्या.. " ,

" भटक्या !! " सई आणि अमोलने एकदम नाव घेतलं. अमोलला आश्यर्य वाटलं.... 
" तुम्हाला कसं माहित ते नाव... " ,
" सांगते.. आधी त्याचं खरं नावं सांग.. " सई excited झाली. 
" आकाश ... माझा आयडॉल आहे तो.. त्याची फोटोग्राफि बघूनच शिकलो मी फोटो काढायला.... तू ग्रुप आहे ना... तो आकाशचा ग्रुप आहे. त्याला भेटायची आशा होती. पण वडीलांनी दिल्लीला बोलावून घेतलं. पण खरंच... भेटला पाहिजे त्यांना ... तो " 

सई ताड्कन उभी राहिली. " but ... तुम्हाला कसं माहित.. त्याच नाव... भटक्या भेटलेला का तुम्हाला कधी या प्रवासात.. " अमोल सुद्धा excited झालेला. 

" अरे ... तोच तर आम्हाला फिरवत होता. इतके दिवस तोच होता आमच्या सोबत.. " सई... 
" शट्ट यार ... !! आता कुठे आहे तो... सुप्रिया तर कधी पासून शोधते आहे त्याला... कुठे आहे आता भटक्या ... i mean आकाश... ", 
" तो गेला पुढे ... पुढच्या गावात.... " अमोलने डोक्याला हात लावला. इतक्या जवळ येऊन सुद्धा... काय करायचे आता... सुप्रिया आली डोळ्यासमोर त्याच्या... मदत तर केली पाहिजे तिला. किती प्रेम आहे, तिच्या डोळ्यासमोर दिसतं होते ते... कसं सांगू तिला... तिचा आकाश इथेच फिरत आहे ते... 
" त्यांना सांगायला हवे ना... आकाशच्या ग्रुपला... " ,
" हो.. पण ते हि पुढे गेले आहेत... शिवाय पलीकडल्या तीरावर आहेत. " अमोल ... 
" कॉल कर ना त्यांना... मोबाईल वर कॉल कर ना.. " सई... 
" ते एवढे येडे आहेत ना सर्व ... मी सोडलं तर कोणीच मोबाईल आणला नव्हता... काय करायचे आता... " अमोल विचारात पडला.
" एकच option आहे.. " सईने आयडिया लढवली. 

" तू रिटर्न जाऊ शकतोस का... तुझ्या ग्रुपकडे... मी इथून पुढे जाते... आकाश भेटेल मला.. मग तुला कॉल करून सांगते कुठे भेटायचं ते.. " ,
" चालेल ... पण जाऊ कसा.. नदी पार करून देयाला कोणीच तयार होतं नाही. ", 
" करावं तर लागेल ना.. आकाशला त्याची माणसं भेटली पाहिजे ना... " सई भावूक झालेली. 
" त्याला आठवते का काही... " ,
" सध्याचं त्याला काहीतरी आठवू लागलं आहे. अरे हो.... तुमच्या ग्रुपमध्ये कोणी आहे का सुप्री नावाची.. तीच आठवते त्याला... आहे का कोणी.. " ,
" हो तर.. सुप्रिया नावं तीच.. तिचा फोटो असेल ना कॅमेरात तुझ्या... असेल तर दाखव ना... " अमोलला आठवलं. सुप्रीचे सगळे फोटो delete केलेले. स्वतःचाच राग आला त्याला. हा ... मोबाईल मध्ये असेल एखादा. लगेच त्याने चेक केलं. एक होता फोटो. 
" व्वा... माझ्या मोबाईलवर सेंड कर... तो आकाश भेटला ना कि त्याला दाखवते.. आपण त्यांना भेटवूया... करशील ना help ... ", 
" हो... तुमचा नंबर द्या... ते भेटले कि तुम्हाला लगेच फोन करतो. तुम्ही तयारीत रहा. " अमोल धावतच निघून गेला. 

अमोल लगेच निघाला. सईने सुद्धा आपल्या लहानग्या ग्रुपला समजावलं. आकाश बोलला होता.. पुढच्या गावात २ दिवस तरी थांबेन. तर तो आजही असेल तिथे... एकच दिवस झाला ना त्याला पुढे जाऊन... सगळेच भरभर निघाले. सईला चालता चालता लक्षात आलं. तिच्या मैत्रिणीने लावलेला अंदाज अगदी बरोबर निघाला. तोच आकाश हा... जो निसर्गाचे इतके , वेड लावणारे फोटो काढतो. तो इतका छान माणूस असेल... असं कधीच वाटलं नव्हत तिला. किंवा ... तो आपल्यासोबत अशी अद्भुत भटकंती करेल... स्वप्नांत सुद्धा शक्य नव्हतं. खरंच.. भेटला पाहिजे तो... लवकरात लवकर... 

==============================================================

खूप साऱ्या विनवण्या ... request करून अमोल पुन्हा पलीकडल्या तीरावर पोहोचला. परंतु आता नवीन प्रश्न.. या सर्वाना शोधायचं कुठे.... धावतच तो नदी पासून दूर आला आणि एक थंड हवेच्या झोताने शहारून गेला. मागे वळून पाहिलं त्याने. पाऊस भरून येतं होता. बापरे !! घाई करावी लागेल आता.. समोरच एक पायवाट दिसली... नक्की गावात जाईल हि वाट... अमोल तिचं वाट पकडून धावत गेला. 

पलीकडल्या तीरावर, सई सुद्धा आकाशने सांगितलेल्या गावात पोहोचली. एव्हाना वाऱ्याने चाहूल दिलेली... पाऊस येतं असल्याची. आकाशला लवकर शोधलं पाहिजे. गावात पोहोचली तर कोणालातरी विचारता येईल... सईच्या मनात चलबिचल. तरी एकाला विचारलं तिने .. 

" भटक्या ना... आज सकाळीच निघून गेला..... पुढल्या गावाला " सईचा चेहरा एवढासा झाला. 
" तरी ... तो गावाच्या वेशीवर एक म्हातारी राहते .... तिथे होता.. आता आहे का बघा.. " पुन्हा पळापळ... सकाळचे ११ वाजत होते. तरी काळोख झालेला. जोराचा वारा झेपावला सईच्या ग्रुपकडे. वीज कडाडली मोठयाने. सर्व वर आभाळात बघू लागले. 

जोरात येणार वाटते.... २ दिवस आला नाही ना पाऊस... आता येईल असं वाटते.. अचानक  तिला आठवलं... आकाश बोलला जाताना.. " पाऊसच सांगेल... मी आलो आहे ते... " तिने आजूबाजूला नजर फिरवली. त्या ठिकाणापासून ... थोड्या अंतरावर .. एका कठड्यावर ... एक जण पाठमोरा उभा होता... आकाश... हो ... आकाशच तो... सई एकटीच त्याच्या दिशेने धावत सुटली. " आकाश !! " सईने जोराने हाक मारली. त्याने मागे वळून बघितलं. सईला बघून तोही आश्यर्यचकित झाला. सई धापा टाकत त्याच्याजवळ पोहोचली. बाकीचे मागून आले. 
" तुम्ही इथे ?  आणि किती दमला आहात सगळे.. " , 
" तुझी सु ... " सई काही बोलणार इतक्यात मागे जोराचा आवाज झाला. मागे असलेल्या वाटेवर मोठे मोठे दगड येऊन पडले. म्हणजे मागे जाण्याचा रस्ता बंद झाला. 
" इथे थांबणे.... सुरक्षित नाही. पुढे चला.. " आकाशने या सर्वाना पुढे आणलं. पुन्हा मागे गेला. काही गावकरी अडकले होते. त्यांना बाहेर काढायला मदत केली. तरी तो रस्ता आता बंदच झालेला

सईकडे पुन्हा परतला. " तुम्ही का आलात इथे... आता मागे जाऊ शकत नाही. ती वाट बंद झाली आता... घरी कसे जाणार तुम्ही.. " , 
" अरे !! तुझ्यासाठी आलो आम्ही.. तू बोलायचा ना ... सुप्री दिसते... सापडली ती.. " सई बोलली आणि आभाळात विजांचा आवाज झाला. आकाशने पुन्हा वर पाहिलं. 
" जोराचा पाऊस येणार वाटते... " आकाश पुटपुटला. सईकडे पाहिलं त्याने. " सुप्री... !! खरंच भेटली का ती ... तेही पावसात.. खरं आहे का " सईने अमोलने send केलेला फोटो दाखवला. 

" हीच.. ती... मला स्वप्नांत दिसते ती.... तीच हि सुप्री... " आकाशच्या डोळ्यात पाणी आलं. सगळेच भावुक झालेले... थोडावेळ तसाच गेला. इतक्यात पावसाने सुरुवात केली. सारेच आडोशाला आले. 

==============================================================

अमोल पूर्ण भिजलेला , धावून थकलेला. एका गावात वेशीपाशी येऊन थांबला. " ओ... काका , इथे कोणी शहरातली मंडळी आली आहेत का ... ? " एकजण बाजूने चालला होता. त्याला विचारलं त्याने... " अमोलचा तो अवतार बघून घाबरला तो. त्याने अमोलला एका आडोशाला बसवलं. 

" पावसात कशाला पळतोस रे बाबा " ,
" काय करू काका ... खूप घाई आहे... " अमोलला दम लागलेला. 
" सांगा ना .. कोणी आलेलं का शहरातले.. ", 
" होते ते काल... सकाळीच निघून गेले ते.. " अमोल नाराज झाला. 
" चला काका .. मला थांबून चालणार नाही.. निघतो मी ..  " म्हणत अमोल पुन्हा धावत निघाला. 

एव्हाना दुपार झालेली. अमोल तरी किती धावणार... थकला शेवटी. थांबायला पाहिजे आता. हि लोकं काय दिसतं नाहीत. किती जलद चालतात हे.... एकाकडे जरी मोबाईल असता ना... किती काम सोप्प झालं असत. अमोल मनातल्या मनात बोलत होता. आता नाही जाऊ शकत पुढे. ताकदच नाही आता. थांबू इथेच आज.. त्याने पाठीवरती सॅक खाली ठेवली. tent उभा करायला लागला.. 

==============================================================

" आता सांगा... तुम्ही परत आलात... आणि सुप्रीचा फोटो कसा तुमच्याकडे... " आकाश आनंदांत होता. 
" तुला आठवते का... ते वादळ आलेलं.. तेव्हा एक ब्रिज क्रॉस केलेला... आपल्या बाजूने एक मोठ्ठा ग्रुप गेलेला... " आकाशला आठवण झाली. 
" तो .. तुझा ग्रुप होता... आकाश, तुझा ग्रुप ... तुला आठवते ना.. सुप्री सोबत भटकायचा ते... तोच ग्रुप होता तो.. " सई खूप उत्साहात सांगत होती. बाहेर पाऊस सुरूच होता. आकाशला आधीच भरून आलेलं. त्यात सई बोलत होती तर अधिक भारावून गेला. " त्यातला एक... अमोल नावाचा.. तो भेटला होता आम्हाला.. त्यानेच सांगितली माहिती. अरे हो !! ... त्याला कॉल करायचा आहे. " सईच्या लक्षात आले. लगेचच तिने अमोलला कॉल लावला. 

" हॅलो अमोल ना.. " , 
" हो .. बोलतोय.. " ,
" सई बोलतेय.. मला आकाश भेटला आहे. तुझं काम झालं ना... सुप्री असेल तर दे ना फोन तिच्याकडे.. " ,
" नाही भेटले... ते पुढे निघून गेले आहेत. त्यात माझ्या अंगात आता त्राण नाहीत.. पुढे जायचे... पाऊसही खूप आहे... म्हणून थांबलो... ", 
" घाई करावी लागेल ना आपल्याला... प्लिज  " ,
" हो... सगळं कळते आहे मला... पण पाऊस आणि वारा इतका आहे ना... possible नाही पुढे जाणे. " आकाशने आधीच अंदाज लावला होता पावसाचा. तिला समजलं कि नाही शक्य ते, शांत झाली ती. 
" OK ... ते भेटले कि नक्की कॉल कर ... बाय " सईने कॉल कट्ट केला. 

" पाऊस आज थांबू शकत नाही. " आकाशने अंदाज लावला पुन्हा. 
" आपण मागे जाऊ.. अमोलला सांगते, त्यांना घेऊन ये तिथे. ... तुझे सगळे जुने मित्र भेटतील तुला.. " सईलाच किती आनंद झाला होता. 
" मागे जाता येणार नाही.. " आकाश .. 
" what happens... " त्या ग्रुपमधल्या एकीने विचारलं. 
" त्या वाटेवर दरड कोसळली आहे.. त्यामुळे पुढेच जावे लागेल.. ते सुद्धा पुढे गेले आहेत ना.. मागे फिरणं त्यांना किती शक्य होईल सांगू शकत नाही. नदी तीरावर जाऊ शकत नाही. पाणी वाढले असेल.. त्याचा फोन आला तर पुढेच भेटू असं सांगा... " आकाश शांतपणे विचार करून बोलत होता. 


आकाशचा अंदाज खरा ठरला. पावसाने जराही आराम केला नाही. रात्रीपर्यंत तरी तसाच पडत होता. दुसऱ्या दिवसाची पहाट झाली तर आकाश नव्हता जागेवर... सई खडबडून जागी झाली. कुठे गेला हा आता... त्याच सामान तर तिथेच होते. सगळेच आकाशला शोधायला बाहेर आले. थोडेच पुढे गेले असता आकाश येताना दिसला. 

" कुठे गेला होतास... " सई रागावली. 
" या गावातील लोकांचा निरोप घेण्यासाठी गेलो होतो... पुन्हा इथे येईन का माहित नाही.. माझी माणसं तुम्ही शोधून काढलीत ना... यांनी मला सांभाळलं इतके दिवस... त्यांना bye तर करावं लागेल ना... " आकाशचं बोलणं बरोबर होतं. 
" चला... निघूया... रात्रभर झोप नाही.. सुप्रीला भेटायचं आहे ना.. चला भरभर.. " सामान घेऊन निघाले सर्व. 


अमोलने तर पहाटेच प्रवास सुरु केलेला... पहाटेच्या ६ :१५ च्या सुमारास तो निघाला. कधी चालत , कधी धावत... त्याला जलद पोहोचायचे होते. कालच्या पावसात ते सर्व नक्की थांबले असणार, त्यामुळे ते आणखी पुढे जाण्याच्या आधीच गाठूया त्यांना, असं ठरवलं त्याने. पोहोचला ही पुढच्या गावात. गाव अजूनही झोपत असावं... कोणीच दिसतं नव्हतं. तरी तो पुढे चालत गेला. एका ठिकाणी , २-३ माणसं दिसली त्याला. धावत पोहोचला त्यांकडे. " अहो... तुमच्या गावात .. कोणी शहरातली माणसं ... पाठीवर मोठ्या बॅगा असलेले आले आहेत का... " ," हो... आहेत ... कालपासुन थांबली आहेत तिथे... " एका दिशेला त्याने बोट दाखवलं. त्या दिशेने धावत सुटला. पोहोचला तर कोणीच नव्हतं तिथे... कुठे गेले यार... आजूबाजूला नजर फिरवली. तंबू तर ठोकले होते इथे. शेकोटी हि सकाळी पेटवली असेल, कारण निखारे अजूनही धुमसत होते. घाईतच निघालेले असावेत. म्हणजे जास्त दूर गेले नसतील. 

अमोल धावत सुटला पुन्हा. त्याचा तो अंदाजही बरोबर निघाला. काहीच अंतरावर त्याला हे सगळे चालताना दिसले. ओरडत , धावत निघाला तो... " सुप्रिया ... संजना... कोमल ... " किती वेगाने धावत होता, ओरडत होता. त्याचा आरडा-ओरडा ऐकून सारेच थांबले. त्याला बघून आश्चर्यचकित झाले. अमोल धावून धावून एवढा दमलेला होता ना, त्यात कालपासून पोटात काही नाही... काय होणार... कोसळला त्याजवळ पोहोचून. सर्वानी उचलून त्याला एका बाजूला आणले. शुद्धीवर तर होता, तरी थकला असल्याने बोलता येतं नव्हते. पाणी पाजलं आणि थोडं पोटात खाऊ गेल्यावर त्याला बरं वाटलं. " हं .. आता बोल, का धावत होतास एवढा... " कोमलने विचारलं. " तुम्ही तर दिल्लीला निघाला होता ना.. " संजनाने विचारलं. 

" सांगतो... सगळं सांगतो... सुप्रिया कुठे आहे... " सुप्री मागेच होती. तिला बोलायचे होते, तरी मन तयार नव्हतं. अमोलने विचारलं तसं ती पुढे आली. " सॉरी सुप्रिया... मी काही वाईट बोललो असेन तर सॉरी. but तुम्ही मला आधी सांगितलं असतं तर मी accept केलं असतं ना.... असो, आकाशला शोधत आहात ना.. त्यासाठीच आलो आहे मी परत. .... तुझा आकाश आहे ... भेटला मला.. " यावर सुप्री अवाक झाली. 

" काय ... कुठे ... " ,
" पलीकडल्या तिरावर आहे तो... " ,
" पण तुम्हाला कसं माहित .. तोच आकाश आहे तो.. " ,
" संजनाने फोटो दाखवला होता मला..... आणि जसा तो तुमचा मित्र आहे... तसा माझा गुरू आहे तो... त्याला बघूनच मी फोटो काढायला शिकलो. मी इथून गेलो ना पलीकडे... तेव्हा मला एक ग्रुप भेटला तिथे.. आठवते का... ते वादळ, त्या ब्रिजवर आपल्याला एक ग्रुप भेटला होता. त्यात आकाश सुद्धा होता. " मग अमोलने सगळी कहाणी सांगितली... तेव्हा कुठे पटलं तिला. 

" तुम्ही पाहिलं का त्याला... " सुप्री भावुक झालेली. 
" नाही... तो नव्हता त्याच्या सोबत तेव्हा... पण काल संध्याकाळी बोलणं झालं ना , तेव्हा होता तो. थांब.... आताच कॉल लावतो त्यांना... " अमोलने लगेचच कॉल केला सईला. 

" हॅलो .. हॅलो.. अमोल बोलतोय... आकाश भेटला ना तुम्हाला... मला सुप्री वगैरे भेटले आहेत.. " ,
" very good अमोल.. भेटू लवकरच... बरं , आकाश बोलला कि मागे वळून येता येणार नाही. शिवाय नदीला पूर येण्याची शक्यता आहे. तर नदी किनारी सुद्धा येऊ नका. पुढे चालत रहा. असं सांगितलं आहे त्याने. " सुप्रीने अमोलच्या हातातून फोन घेतला. 
" आकाश आहे का तिथे... " पलीकडून मुलीचा आवाज आला. सईला कळलं. हि सुप्रीच असणार. 
" सुप्री ना तू.. आकाशची सुप्री... " ,
" हो ... मीच ती... आहे का आकाश तिथे... " ,
" नाही .... आता तरी नाही आहे आकाश इथे.... जरासा जाऊन येतो म्हणत गेला कुठेतरी.पण तू काळजी नको करुस... आहे आमच्याजवळ तो... नाही सोडणार कुठे त्याला. " ,
" तुला माझं नावं कसं माहित... " ,
'' आकाशने सांगितलं.... तूच आहेस त्याच्या लक्षात.. बाकी काही आठवत नाही.. " सई... 
" म्हणजे ? ... बाकी काही आठवतं नाही म्हणजे..  " सुप्री. 


" काय झालेलं माहित नाही मला.. आकाश... भटक्या म्हणून फिरत असतो गावातून.... त्याला जुनं काहीच आठवतं नाही.... त्यामुळे तो असा फिरत असतो सगळीकडे... आम्हाला भेटला तेव्हा सुद्धा त्याला तुझाच चेहरा आठवतं होता. आता आणखी थोडं आठवते त्याला..... तुझं नावं... तुम्ही फिरायचे ते... बघ ना गंमत... एकटी तूच आठवते त्याला. त्याचे आई-वडील ... फॅमिली आहे का माहित नाही... पण तुझ्यावरच त्याचं जास्त प्रेम आहे असं वाटते. बरोबर ना.. " सई बोलतानाही इमोशनल झालेली. सुप्रीच्या डोळ्यात पाणी आलं. 

" मी तुम्हाला फोन करतं राहीन. जास्त बोलून चालणार नाही. मोबाईलची बॅटरी charge करायला प्रत्येक वेळेला मिळेल असं नाही ना.... तर भेटू लवकरच... " सईने कॉल कट्ट केला. 

व्वा !! सगळयांना आनंद झाला. finally,... आकाशची भेट होणार... सगळेच आनंदात.. आकाशने सांगितल्याप्रमाणे पुढे चालायचे ठरले. एक वेगळी ऊर्जा निर्माण झालेली या सर्व गोष्टीमूळे. 


आकाश कुठे गेलेला त्यालाच माहित. परतून आला. " एक लाकडी पूल आहे. नक्की कुठे आहे ते माहित नाही. पण तिथूनच पलीकडे जाता येईल. चला मग निघूया का.. " आकाश आला तसा निघायचे बोलत होता. 
" आकाश... थांब जरा... आताच बोलणं झालं सुप्री सोबत... विचारत होती तुला. " सईने सांगितलं. आकाश त्यावर काही react होणार तर अचानक काही ध्यानात आलं त्याच्या. वर आभाळात बघू लागला. 
" मला वाटते पुन्हा वादळ येणार आहे.. " सारेच वर बघू लागले. काळोखी दाटत होती. वारा जरी हळू वाहत असला तरी, आकाशचं भाकीत होते ना. ते खरंच होणार... 
" चला आपल्याला घाई करावी लागेल आता " निघाले पुढे. पावसाने रिमझिम सुरुवात केलेली. तरी यांनी चालणे थांबवले नाही. थोड्यावेळाने , वाराही पावसाच्या साथीने हजर झाला. दुपार उलटून गेलेली... आता पुढचे काही दिसतं नव्हते, एवढा पाऊस सुरु झालेला. मग थांबायला लागलं. तसाच पाऊस संध्याकाळ पर्यत होता. 
" आजची रात्र इथेच काढू... उद्या सकाळी पुढचा प्रवास करू.... " आकाशचे बोलणं ऐकलं साऱ्यांनी. 

" थांबू... पण एक काम करशील का.. " सई मधेच बोलली. 
" तुम इतने दिनो बाद अपने फ्रेंड्स से मिल रहे हो.. तो जरा .... हेअर कट... शेविंग कर लो.. " एकजण लगेच बोलला. आकाशला काही कळलं नाही. 
" सुप्री आणि तुझे मित्र... तुला तुझ्या नॉर्मल लुक मध्ये ओळखतात... हा अवतार ..... आम्हाला आणि या गावातल्या लोकांना माहित आहे.. तसही आता कुठे जात नाही ना आपण.. ते तेव्हढं काम उरकून घे... उद्या सुप्री भेटलीच तर तुलाच घाबरायची ती... " 

सईच्या या वाक्यावर आकाशलाही हसायला आलं. बरोबर होतं तीच. आकाश गेला केस कापायला. गावात तर असतात न्हावी. भटक्याला ओळखायचे सर्वच.. कोणीही त्याला मदत केली असती. 

रात्र झाली तेव्हा पावसाने विश्रांती घेतली. सगळेच आरामात होते आज. उद्या सकाळी भेट होईल आकाशची... याच विचारात सर्व. अमोल शेकोटी पेटवत होता. सुप्री आली त्याच्याजवळ. 
" अमोल सर... बोलू का जरा... " अमोल उभा राहिला. 
" बोल ना ... ", 
" सॉरी... " ,
" अरे !! ... आता का सॉरी.. " ,
" मी वाईट वागले तुमच्याबरोबर... पण खरंच .... माझं खूप प्रेम आहे आकाशवर... " , 
" अरे ... अजून तू तेच घेऊन बसली आहेस का... मी विसरलो ते.. मलाही कळते, किती वाट बघते आहेस त्याची.. याला तर म्हणतात खरं प्रेम... नको ठेवू मनात काही... फक्त मैत्री तोडू नकोस... तू बोलत नाहीस तर कसं होते मला काय सांगू तुला...बोल माझ्याशी... तुझ्या बोलण्याची सवय झाली आहे ना... राहवत नाही... चालेल ना friendship तरी... तेवढा तर हक्क आहे ना माझा.. " अमोलने हात पुढे केला. 
" हो .. मित्र आहोत आपण... आणि राहू पुढे ही.. तुम्ही एवढं आलात परत.... माझ्यासाठी आणि आकाश साठी... तुमचे उपकार कधीच नाही विसरणार मी... " ,
" कुछ भी... मैत्री साठी काही पण.... " 

==============================================================

रात्री आकाश कधी आला कळलं नाही. सई सकाळी जागी झाली तेव्हा नहमीपेक्षा जास्त काळोख होता. घड्याळात पाहिलं तिने. सकाळचे ८ वाजत होते. आकाश अजूनही tent मधेच होता. " आकाश !! आकाश !! " सईने त्याला बाहेरूनच आवाज दिला. सईचा ग्रुप बाहेर आलेला होता. आकाश आवाज ऐकून बाहेर आला. केस कापून , दाढी केलेला आकाश... वेगळाच भासत होता. "wow !! " त्यातली एक मुलगी पट्कन बोलली. सईसुद्धा बघत राहिली त्याच्याकडे. आकाश आला तिच्यासमोर... आणि टिचकी वाजवली. तेव्हा सई भानावर आली. " मी असाच दिसतो नॉर्मल.. " आकाश हसला. पण त्याचं ते हसू जास्त काळ टिकलं नाही. कारण पावसाचे मोठे मोठे ढग चालून येतं होते. " वादळ ?? " सईने आकाशकडे बघत म्हटले. " हो ... लवकर निघावे लागेल... आज सुप्रीला भेटणारच... " आकाश सामानाची आवरा-आवर करू लागला. 

सईने लगेच अमोलला कॉल लावला. " अमोल ... वादळ येते आहे... कळते आहे ना... " ,
" हो हो ..मग काय करायचे... आम्ही confused झालो आहे.. निघायचे कि नाही... " ,
" आम्ही निघालो आहे... पाऊस यायच्या आधी निघा... आकाश बोलला, पुढे एक लाकडी पूल आहे.. तो ओलांडून येतो आम्ही. भेटू त्याचं ठिकाणी ... " सईचा कॉल कट्ट झाला. अचानक मोबाईलची range गेली. 

पावसाने सुरुवात केली नव्हती. तरी वारा एवढा प्रचंड वेगाने वाहत होता कि धड नीट चालता हि येत नव्हतं. आकाश तरी पुढे होता या सर्वांच्या. पुढे वाटेवर काही मोठे दगड पडलेले दिसले त्याला. थांबला तो. " पुढे जाणे सुरक्षित नाही.. आपल्याला दुसरी वाट शोधावी लागेल. " आकाश आजूबाजूला बघू लागला. दूरवर त्याला लाकडी पूल दिसला. तिथे जाण्याचा एकच रस्ता .. तोही दगडांनी बंद केलेला.... दुसरी वाट म्हणजे ... समोर असलेलं जंगल... 
" जंगलातून जावे लागेल... सुप्रीला सांगा.. मी येतो आहे तिथे... ते कुठे आहेत आता... " सईने कॉल केला अमोलला. 
" पोहोचलात का तुम्ही... " ,
" आवाज तुटतो आहे... तुमचा... आम्ही चालतो आहे अजूनही... पण वारा खूप आहे.. " कॉल पुन्हा कट्ट झाला.... अमोलही थांबला चालता चालता... सारेच थांबले होते. समोर प्रचंड झाडे-झुडूप.... या पुढेच तो लाकडी पूल असावा, कोमलचा अंदाज... कारण एकाने सांगितलं होते असाच रस्ता. सुप्री आणखी tension मध्ये... आणखी एक अडचण... का कोणाला भेटायला देयाचे नाही मला ... आकाशशी. आणि वातावरण आणखी खराब झालं... अडचणीत भर पडली... पूर्ण ताकदीनिशी पाऊस कोसळत होता. तरी आज भेट होणारच , या उद्देशाने निघाली सुप्री. 

प्रचंड पाऊस, त्यात झाडे-झुडुपे... त्यात खाली जमिनींचा भरवसा नाही. पायाखाली खड्डा कि झाडाची फांदी... काहीच कळत नव्हतं. काटेरी झाडे.. टोचत होती... जखमा करत होती. तरी चालत होते. मोबाईलची range गेलेली. सुप्री किती पुढे होती सर्वांच्या... आकाशला आज भेटणारच... सगळेच भिजलेले. चालून चालून दमले, तरी जंगल काही संपत नव्हतं... कधी संपणार हे जंगल... पाऊससुद्धा एवढा होता कि समोरचं काही दिसतं नव्हत... डोळे उघडले तर पाणी नुसतं टोचत होते डोळ्यात... काय दिसणार समोरचे .... कोण कुठे चालते आहे .. तेही कळतं नव्हतं. 

==============================================================

"अमोलला फोन लागत नाही " सईचा प्रयन्त सुरूच होता. त्यात पावसाने नुसता धुमाकूळ घातला होता. थांबायला तयारच नाही. आकाश अजूनही पुढेच चालत होता. त्याला ना पावसाची चिंता ना त्या रानाची, फक्त सुप्रीला आजच भेटायचं ... या ओढीने भरभर चालत होता. 

" अमोल !! ... अरे बघ ना ... सईचा कॉल लागतो का ते... " संजनाने पुन्हा अमोलला सांगितलं. 
" अगं ... try करतोच आहे... रेंजच नाही... मी तरी काय करणार.. " अमोल. 
" तरी... तो ब्रिज आसपास असेल ना.. पावसाने तर काही दिसत नाही आहे... आकाशला तरी कळेल ना तिथे यायला... " कोमल जरा काळजीने बोलली. पुन्हा वादळ नको आहे.. आतातरी.....  सुप्री पुढे होती या सर्वांच्या... आज तरी भेट होऊ दे रे... गणू, खूप झाली परीक्षा आता.. सुप्री मनातल्या मनात देवाचा धावा करत होती. वाराही सुसाट वाहत होता. वर विजांचा आवाज होताच सोबतीला. संजना, बरोबर सुप्रीच्या मागे होती. , तिला सांभाळण्यासाठी. 

पुढे १० मिनिटं ते असेच त्या जंगलातून वाट काढत चालत होते. सगळेच भिजलेले , दमलेले ... पोटात काही नाही. तरी चालत होते. वेगळीच शक्ती आलेली सर्वामध्ये. जुना मित्र भेटणार होता ना आज. काही झालं तरी आज त्याला भेटायचेच.. या आशेने सर्व चालत होते. पुढे मोकळी जागा दिसू लागली. 

         " आता लागेल कॉल ... " अमोल मोबाईलकडे बघतच त्या जंगलातून बाहेर आला. " आता मोबाईल ची गरज नाही... " कोमलने अमोलचा हात पकडून थांबवलं. अमोल सुद्धा थांबला. कारण सगळेच थांबले होते. समोर बघत होते. पलीकडल्या तीरावर, काही माणसे दिसली त्याला. अरे !! सईचा ग्रुप.. लगेच ओळखलं त्याने. सईसुद्धा होतीच. पण आकाश कुठे आहे यात. अमोल बघू लागला. त्या ग्रुप पासून थोडं पुढे ... आकाश उभा होता. तो याच दिशेने बघत होता. कारण बरोबर समोर .. सुप्री उभी होती. दोघे एकमेकासमोर... मध्ये फक्त एक मोठी नदी... ओसंडून वाहणारी.... सुप्रियाला भरून आलेलं... स्तब्ध झालेली ती... त्याला बघून. पावसाचा जोर वाढत चालला होता. आकाश सुद्धा सुप्रीलाच बघत होता कधीचा. अचानक त्याची नजर , तिथून काही अंतरावर असलेल्या एका लाकडी पुलावर गेली. सुप्रीला हि समजलं .. आकाश कुठे बघतो आहे ते. 

         जोराने वीज कडाडली. काही कळेना काय झालं. सुप्री धावत सुटली त्या पुलाच्या दिशेने. ते बघून आकाश सुद्धा धावला. फक्त दोघांना भेटायचं होते आता. बस्स... कोणतीही ताकद त्यांना अडवू शकत नव्हती. या दोघांना धावताना पाहून सगळेच त्यांच्या मागोमाग धावू लागले. आधीच दमलेले , तरी धावत होते. कमाल आहे ना... यालाच म्हणतात खरं प्रेम... कसली ओढ होती ना दोघांना. पावसाचा जोर आणखी वाढला. त्यालाही आनंदाचे उधाण आलेलं. पण अचानक , धावता धावता सुप्रीचा पाय निसरडला. आणि खाली पडली. हाताला लागलं .... परंतु डावा पाय मुरगळला. " सुप्री !! " आकाश पलीकडून ओरडला. तो हि थांबला. संजना तोपर्यत सुप्री जवळ पोहोचली होती. तिला तिने उभं केलं. हातातून रक्त येतं होते. पायाने चालता येतं नव्हतं तरी कशीबशी उभी राहिली. संजनाचा हात सोडला तिने. तशीच लंगडत लंगडत पळू लागली पुन्हा.... आता नाही थांबयाचे... त्याला आज भेटायचंच... आकाश सुद्धा धावू लागला. शेवटी दोघेही त्या पुलाजवळ पोहोचले. दमलेले.. आकाश धापा टाकत थांबला एका टोकाला. सुप्रीनेही दुसऱ्या टोकाचा आधार घेतला क्षणभरासाठी. 

पाऊस तर कोसळतच होता. दोघे पुन्हा समोरासमोर उभे. पण या वेळेस परिस्तिथी भिन्न. सुप्रीने पुन्हा जोर लावला. लंगडत लंगडत धावली. आकाश सुद्धा पुढे आला. एका क्षणाला सुप्री धावता धावता खाली , गुडघ्यावर बसली. आकाश जवळ आलेला ना. अंगात ताकद होती चालायची , पण भावना एवढ्या ओसंडून बाहेर येते होत्या ... नाही चालवलं तिला पुढे. आकाश पोहोचला तिच्याजवळ. तोही गुडघ्यावर बसला. गालावरून हात फिरवला तिच्या. आणि गच्च मिठी मारली तिला. त्याच क्षणाला आभाळात केव्हढ्याने वीज चमकली.... जणू , त्या निसर्गालाही आनंद झाला असावा. 

कितीवेळ ते तसेच बसून होते दोघे. सईचा ग्रुप , संजनाचे मित्र-मैत्रिणी... सर्वच हे पाहत होते. साऱ्यांचे डोळे अश्रूंनी वाहत होते. ते पुसण्याचे काम पाऊस चोख बजावत होता. काही वेळाने सुप्रीने मिठी सोडवली. 

" next time ... माझ्यसोबतच भटकंती करायची. कितीही बावळट असली तरी.. माझा हात सोडायचा नाही आता... समजलं ना... नाहीतर आईला नाव सांगेन... " सुप्री आकाशला सांगत होती. " नक्की !! गणू शप्पत ... " आकाश बोलला. आणि पुन्हा मिठी मारली सुप्रीने. त्याचबरोबर, संजना... तिचा ग्रुप ... सर्वच धावत आले.. सर्वानी या दोघांना मिठीत घेतलं. काय सोहळा होता तो.. छान झालं ना.. 


यथावकाश , आकाशचे आगमन शहरात झाले. सई तिच्या घरी तर अमोल दिल्लीला निघून गेला. आईवडील आनंदात.. त्याच्या ऑफिस मधले खुश.. सुप्री - संजना सहित आकाशचा सगळा मित्रपरिवार खुश.. सगळेच खुश . तरी सुप्रीचा पाय चांगलाच मुरगळला होता धावताना. त्यामुळे तिला निदान २ आठवडे तरी घरीच थांबायला सांगितले होते डॉक्टरने. आकाश ठीक होता तरी जवळपास एक वर्षाहून जास्त काळ त्याने गावात , जंगलात घालवला होता. शिवाय खूप अशक्त सुद्धा झालेला होता. काही दिवस हॉस्पिटल मध्ये काढावे लागणार होते त्याला. सुप्री घरी तर आकाश हॉस्पिटलमध्ये. पुन्हा दुरावा. असो , पण रोज फोन असायचे. हो... आकाशला खास मोबाईल गिफ्ट केलेला या सर्वानी. त्यावरच गप्पा होतं असत. अगदी डॉक्टर सांगतो तसं.. सकाळ ... दुपार ... संद्याकाळ ... रात्र.. कधी कधी विडिओ कॉल असायचे. अश्यातच, २ आठवडे भुर्रकन निघून गेले. आकाश घरी परतला हॉस्पिटलमधून. सुप्रीचा पाय ठीक होतं होता. 

पुढच्या २ दिवसांनी, आकाशने सगळ्यांना भेटायला बोलावलं. त्यांच्या आवडत्या ठिकाणी... समुद्र किनारी. सगळेच सोबत निघाले. आकाश दूर एका कठड्यावर बसून होता. सगळेच जलद चालत होते. सुप्री तेवढी लंगडत लंगडत मागे राहिली. आकाश समुद्राकडे तोंड करून बसला होता. " काय आहेत रिपोर्ट ? " संजनाने आकाशला लगेचच विचारलं. आकाशने शांत चेहऱ्याने एक कागद संजनाकडे दिला. तिने उघडून बघितल.. गंभीर झाली ती. तिने कागद पुढे दिला. ... सगळेच तो कागद बघत होते आणि काळजीत पडत होते. सुप्रीने दुरुनच बघितलं , हे सगळे tension मध्ये आहेत ते. 

" काय झालं.. "  लंगडत लंगडत आली सुप्री... आकाश पुन्हा समुद्राकडे बघत होता. संजनाने तोच कागद पुन्हा घडी केला आणि सुप्री समोर धरला. " बोल ना ... काय आहेत रिपोर्ट ? " सुप्री तरीही विचारत होती. सगळेच tension मध्ये.... तिने घाबरतच कागद उघडला. कागदावर एक नकाशा (map ) होता. 

" अरे !! हे काय ... रिपोर्ट कुठे आहेत... " सुप्रीला कळेना. 
" मी बरा आहे ग... ठणठणीत बरा... रिपोर्ट काय देऊ ... औषध आहे माझं ते... " आकाश आता बोलू लागला. 
" म्हणजे हे सगळे acting करत होते का... " सुप्री रागावली. 
" त्या एका वर्षात... तुझी smile तेव्हडी आठवायची... तुझं रागावणं बघायचं होते मला... म्हणून या सर्वांना आधीच सांगून ठेवलं होते. ... ", 
" नाटक ... acting  हा... राग बघायचा आहे ना ... थांब दाखवते तुला... " म्हणत लंगडतच सुप्री त्याच्या मागे पळाली. आकाश हसत पुढे पळाला. सगळेच हसत होते. 

शेवटी छान होते ना सगळे. आई-वडिलांना .. त्यांचा हरवलेला मुलगा भेटला. सईला नवीन मित्र , शिक्षक भेटला. अमोलला त्याचा आयडॉल मिळाला. संजनाला तिचा जुना मित्र नव्याने भेटला. आणि सुप्रीला ... तिचा जोडीदार ... नव्या रूपात भेटला. प्रवास तर होतंच राहतात.. पण हा प्रवास कोणीच कधी विसणार नाही हे नक्की... !! 

            काहींचा , श्वास घुसमटतो शहरात... त्यांना निसर्गातच प्राणवायू मिळतो. त्या जमातीतलाच आकाश एक... एवढं होऊन सुद्धा पुढच्या प्रवासाचा प्लॅन बनवलाच त्याने. अर्थात सुप्री होतीच सोबतीला.  एकवेळ आकाश स्वतःला थांबवू शकतो... पण मनाला... ते तर कधीच पुढे गेलेलं एका नवीन प्रवासाला... आकाशही तयार झाला मग. पावसासारख्या " मित्राचा " हात पकडून आणि मनात उधाणलेला वारा घेऊन... एका नवीन प्रवासाला....  नवीन प्रवास... नवीन ठिकाण... नवा दिवस आणि नवीन भटकंती .... भटकंती पुन्हा एकदा ... !! 

================================= the end ===============

Followers