All the contents on this blog are Copyright Protected.

All the contents on this blog are Copyright Protected.

MyFreeCopyright.com Registered & Protected
Protected by Copyscape Duplicate Content Software

Monday, 28 October 2013

" The Original Love Story" (Part 1)"

" अरे .... विनू ?...... अजून घरी नाही गेलास ? ", 
" हो. निघतोच आहे सर आता.",
" OK. पण लवकर घरी जा आणि सांभाळून जा.",
"असं .. का सर ?",
"अरे , बाहेर बघितलास का ? पाऊस सुरु होणार आहे म्हणून बोललो." 
"पाऊस ?.... आता ?" 
" कुठे हरवलेला असतोस कळत नाही. आज तारीख किती आहे माहित नाही वाटते ?",
" नाही सर . खरंच नाही माहित ", 
"अरे माणसा, आज ७ तारीख, ७ जून . आज पावसाची सुरवात होते , एवढं तरी माहित आहे ना ? " त्यावर विनू काही बोललाच नाही. पुढे सर बोलले ," चल निघ लवकर . पाऊस बघ किती धरलाय, कधीही सुरवात होईल . छत्री आहे ना?. " पण विनू कुठेतरी दुसरीकडेच हरवला होता. सरांच्या ते लक्षात आले, ते मनात बोलले ," जाऊ दे . हा काय माझ्याकडे लक्ष देणार नाही,त्यापेक्षा मीच जातो,राहू दे त्याला एकट्याला.  " आणि त्याचे सर निघून गेले. विनू मात्र तसाच उभा होता. 

                एका थंड हवेच्या झोताने त्याच्या office ची एक खिडकी उघडली  आणि पूर्ण office मध्ये छानसा थंडावा आला. तो थंडावा A.C. पेक्षा ही सुखद होता. कारण त्यात ओलावा होता आणि ओल्या मातीचा सुगंध होता. उघडलेल्या खिडकी जवळ विनू आला. बाहेर बघितलं त्याने. छान पाऊस सुरु झाला होता. काहीजण छत्री नसल्याने आडोश्याला उभे होते, काही जण पहिल्या पावसाचा आनंद घेत होते, एकंदरीत छान वातावरण होते ते. पण विनू कसल्या तरी विचारात होता.

                 " आज ७ तारीख, ७ जून आणि उद्या ८ जून , हो. उद्याच तिचा वाढदिवस आहे ना. उद्या ती २७ वर्षाची होईल. काय ना,कशी वर्ष गेली पटापट." स्वतःशीच हसला तो. एव्हाना त्याचं सगळ office घरी गेलं होते. तो एका software company मध्ये  job ला होता. software engineer होता तो. वय वर्षे २८. दिसायला देखणा, उंच ,गोरापान. एकूणच " Handsome" होता तो . office मध्ये सर्व त्याला ओळखायचे,कारण त्याचं काम सुद्धा चांगला होत त्याचं, "famous" होता office मध्ये तो. फक्त त्याची एक गोष्ट  खटकायची आणि ती म्हणजे त्याचा " एकलकोंडेपणा ". गप्प गप्प राहायचा, कधी कोणाशी जास्त बोलायचा नाही, मिसळायचा नाही, कोणी काही विचारलं तरी तेवढ्यापुरताच बोलायचा, कधी कधी कुठे हरवून जायचा तेव्हा तर आपण office मध्ये आहोत, हेच तो विसरून जायचा. आणि पाऊस सुरु झाला कि खिडकीबाहेर कितीतरी वेळ कूठेतरी  बघत राहायचा,अगदी पाऊस थांबेपर्यंत, उशिरापर्यंत office मध्ये थांबायचा, कधी कधी घरी सुद्धा जायचा नाही, अगदी विचित्र वागायचा. परंतु सगळ्यांना माहित होते कि तो वेडा नाही आहे. त्यामुळे त्याला कोणी काही बोलायचे नाही. पण विनू असा नव्हता पहिला.                

                       संध्याकाळचे ७ वाजले होते. watchman office मध्ये कोणी आहे का ते बघायला फिरत होता आणि Light's बंद करत होता. चौथ्या मजल्यावर त्याला विनू दिसला," हे साहेब आज पन एकडच राहनार वाटतीया" अस बोलून तो खाली निघून आला. इकडे विनूच्या मनात वेगळंच चालू होतं काहीतरी. " पहिला पाऊस……तिला पण आवडायचा ना. ती पण कूठेतरी  भिजत असेल आता.… कूठेतरी……. कूठे असेल ती, तिच्या इकडे सुद्धा पाऊस पडत असेल का ? आज इकडे असती तर छान पैकी पावसात भिजता आले असते तिला ना. ……… इकडे असती तर ना.. मग..... मग ती माझ्या जवळ पण असती आज. " ती म्हणजे विनू ची " Best Friend ", ती म्हणजे  विनू ची " कुटूंब ", ती म्हणजे विनू चं सर्व काही होती. विनू कोल्हापूर वरून मुंबई मध्ये आला होता engineering करण्यासाठी, एकटाच. कोणी नातेवाईक नव्हते मुंबई मध्ये. आणि " ती " त्याची मुंबई मधली पहिली " Friend " होती. ती म्हणजे " सुची ".   

                        " सुची " हे काही तिचा खर नाव नव्हते. पण college मध्ये तिला सगळे " सुची " असेच म्हणायचे आणि विनय चे " विनू "   हे नामकरण करण्यामागे तिचाच हात होता. तर त्याची ओळख झाली ती college मध्ये, पहिल्या वर्षालाच. पहिल्यातला विनू म्हणजे डोक्यात सुसाट वारा भरलेला मुलगा. चंचल, बडबड्या, थोडासा मस्तीखोर. पण मनानी मात्र चांगला. सगळ्यांना मदत करायला सतत पुढे. धडपड्या होता अगदी. प्रत्येक नवीन गोष्ट आपल्याला आलीच पाहिजे, या वृत्तीचा. तो उत्तम " Dancer " होता, डोक्याने हुशार असल्याने "chess" त्याला कोणी हरवायचे नाही, असा होता विनू . त्याला अनेक गोष्टी आवडायच्या. पण २ गोष्टी तो मनापासून करायचा. पहिल म्हणजे पावसात भिजणं आणि दुसरं - पावसावर कविता करणे. पावसासाठी अगदी वेडा होता तो. पाऊस सुरु झाला कि नुसता धावत सुटायचा भिजायला. त्यामुळे आई वडिलांची अनेक वेळा त्याने बोलणी खाल्ली होती,पण ते तेवढ्या पुरताच. नंतर परत सुरुवात. तो कविता छान करायचा आणि उत्तम अशा कथा सुद्धा लिहायचा, फक्त " Love  Story's ". " फक्त " Love  Story's " का ? " असा कोणी विचारलं तर सांगायचा , " प्रेम असे काही नसते म्हणून मी त्यावर गोष्टी लिहितो." हे काय बोलायचा ते कोणालाच कळायचं नाही. पण त्याच्या  " Love  Story's "  सगळ्यांना आवडायच्या. 

          college च्या पहिल्या वर्षी, एका दूपारी विनू घरी चालला असताना अचानक पाऊस सुरु झाला . त्याने पटकन छत्री काढली , कारण त्याचाकडे त्यावेळेस काही Book's होती. ते भिजले तर Problem. म्हणून त्याने छत्री उघडली पण त्याच मन त्याला भिजायला सांगत होता. मग तो काय करायचा, हळूच छ्त्री बाजूला करायचा, जरा भिजायचा परत छत्री सरळ करायचा. तो पण भिजायचा आणि book's पण भिजण्यापासून वाचायची. मज्जा ना, छान idea होती त्याची . त्याचा तो प्रताप बाजूला उभी असलेली एक मुलगी कधी पासून बघत होती आणि अचानक तिने त्याला हाक मारली, " ऐ वेडया.... तूला भिजायचे असेल ना तर ती छत्री मला दे. मला घरी जायचे आहे. " त्याने चमकून मागे बघितलं, बंद दुकानाच्या बाजूला एक मुलगी उभी होती , छत्री नव्हती तिच्याकडे. त्याच्या एवढीच उंची होती तिची जवळपास. गोलाकार चेहरा , जराशी सावळीच होती ती. प्रथम त्याला तिचा राग आला , " मला वेडा म्हणते " , पण नंतर त्याला तिची दया आली. तो तिच्या जवळ गेला आणि बोलला ," मी तुला ओळखत नाही, तर मी माझी छत्री कशी देऊ तुला ? " ," अरे , पण मी तुला ओळखते , तू माझ्याच वर्गात आहेस. बर ते जाऊ दे मला छत्री दे . मला उशीर होतो आहे. तू भिज पावसात. " असं म्हणून तिने छत्री ओढली आणि ती पटापट निघून गेली, त्याला काय घडलं तेच कळल नाही. 

          अशी त्यांची पहिली भेट होती. त्याची छत्री तर त्याला मिळालीच नाही,नवीन मैत्रीण मात्र भेटली. त्यांचे पहिले वर्गात कधी पटले नाही, सारखे भांडत असायचे ते. नंतर हळूहळू दोघांना एकमेकांची सवय होऊ लागली. तो एकटाच आला होता मुंबईला,तिच्यामुळे त्याचा केवढा मोठा group तयार झाला होता. विनू तर पहिल्यापासूनच famous होता college मध्ये. त्याचा लूक सगळ्यांना आवडायचा. त्याच्या कविता , " Love story's " college मध्ये खूप famous झाल्या होत्या. सगळ्या मुलींना तो आवडायचा. खूप जणींनी तर त्याला Propose सुद्धा केलं होतं, विनूचा " प्रेम " या गोष्टी वर विश्वास नव्हता,विश्वास होता तो " Friendship " वर आणि "सुची "वर . पण  तिच्या मनात काही वेगळच होत . सुरवातीला जरी त्यांचे पटत नसले तरीहि नंतर तिला विनू आवडायला लागला होता. त्याच्या वाचून तिचा काही करमायाचेच नाही. तिला सारखं विनू जवळ असावा अस वाटायच, विनू ला तिच्या मनातला काहीच माहित नव्हतं. तिनेही त्याला काही कळू दिले नाही. 

असच एक वर्ष निघून गेलं. " सुची " विनूची " Friend " पासून " Best Friend " झाली होती,एकत्र college ला जायचे ,घरी एकत्र निघायचे ,एकाच डब्यात जेवायचे , एकमेकांसाठी जागा अडवून ठेवायची आणि एक गोष्ट दोघांमध्ये common होती ती म्हणजे पावसात भिजणे . एकत्रच भिजायचे . ८ जून ला तिचा वाढदिवस असायचा , त्या दिवशी तर किती मजा  केली होती सगळ्यांनी ,पण केक कापण्याच्या अगोदर " सुची '' एक वाक्य बोलली, " हा वाढदिवस मला जन्मभर लक्षात राहील,कारण आज मला कळल कि खर प्रेम काय असते ते, आणि आज मला ते भेटलं आहे" हे अस का बोलली ती ते कोणालाच कळल नाही , त्या वाक्याचा तो रात्र भर विचार करत होता ,आणि अचानक बाहेर पाऊस  सुरु झाला . मग काय , विनू बाहेर पडला पावसात भिजायला ."एका ठिकाणी उभा राहून काय भिजायचे ?" म्हणून तो चालू लागला . चालता चालता अचानक तो थांबला . विचार करता करता विनू , " सुची " च्या घरासमोर आला होता नकळतपणे . त्याला कळलंच नाही तो तिकडे कसा आला. आणि समोर " सुची " होती पावसात भिजत, तिलाही आश्चर्य वाटलं विनूच. दोघे कितीतरी वेळ एकमेकांना बघत उभे होते. पाऊस थांबला तरी ते तसेच होते. थोडयावेळाने दोघे ही भानावर आले, एकमेकांना काही बोलले नाहीत फक्त हातानेच " bye " केले आणि विनू घरी आला . पावसात त्याला नेहमीच आनंद देणाऱ्या गोष्टी मिळाल्या होत्या, या पावसात त्याला वेगळाच अनुभव आला होता , " याला मैत्री नाही म्हणत ना , मग हे काय प्रेम आहे. इतके सुंदर असते प्रेम ?" आज त्याला  झोप येत नव्हती, एका वेगळ्याच आनंदात होता तो , दुसऱ्या दिवशी college ला जायचे म्हणून त्याला बळजबरीने झोपावे लागले.     

           " साहेब, आज घरी जानार आहात काय ? नायतर मी दरवाजा बंद करतोय , झोपायचे आहे मला ." watchman च्या या शब्दांनी विनू भानावर आला , " निघतो आहे ५ मिनिटात ." अस बोलून त्याने त्याचं सामान उचलल आणि office  च्या बाहेर पडला. पाऊस थांबला होता , छान थंडावा आला होता ,विनूच मनही शांत झालं होत. विनू घरी आला आणि सामान ठेवून त्याच्या बाल्कनी मध्ये येऊन उभा राहिला . पावसाने पुन्हा सुरुवात केली होती , " त्या  दिवशी पण असाच पाऊस होता ना . ज्या दिवशी " सुची " मला पहिल्यांदा भेटली होती." आणि विनू पुन्हा त्याच्या आठवणीत गेला.

           " विनू " आणि " सुची " यांची friendship अजूनच घट्ट झाली होती आणि संपूर्ण college मध्ये त्यांची Friendship famous होती, विनू तिथे सुची ,सुची तिथे विनू असच झालं होत काहीसं . त्यांच्या सर्व मित्रमैत्रिणीनाही ठाऊक होते कि दोघांमध्ये प्रेम आहे. तिलाही तो सुरुवातीपासून आवडायचा आणि विनू लाही ती आवडायची मनापासून ,फक्त कोणी पुढाकार घेऊन मनातली गोष्ट सांगत नव्हत. विनूला मित्रांनी खूप समजावलं कि,"तू पूढे होऊन तिला propose कर " , पण त्याला ते कधीच जमलंच नाही . दिवस असेच आनंदात , मजेत जात होते , दोघे मनानी आणखीनच जवळ आले होते आणि कोणीच पुढे जात नव्हते. आता त्यालाही कळून चुकले होते की खूप उशीर करून फायदा नाही. आपणच तिला विचारलं पाहिजे . त्याने मनाची तयारी केली . फक्त दिवस कोणता तो ठरत नव्हता. तिचा पुढचा वाढदिवस सुद्धा जवळ आला होता. विनूने ठरवलं कि ८ जून हाच दिवस आहे. याच दिवशी त्याला प्रेमाची सावली मिळाली होती ." yes. ८ जूनलाच तिला सर्वांसमोर Propose करायचं ". तिच्या वाढदिवसाची संपूर्ण तयारी झाली होती. ७ जून हा दिवस जाता जात नव्हता , कसाबसा गेला दिवस, त्या दिवशी ती लवकरच गेली college मधून " उद्याची तयारी  करायची आहे " असे म्हणून ती गेली. त्याच्या मनात तर खूप आनंद  झाला होता ,कधीच सांगतो आहे मनातलं  अस त्याला झालं होत.

             ८ जून ............... सकाळीच त्याला जाग आली. आज त्याच्या साठी मोठा दिवस होता ,Infact तो झोपलाच नव्हता रात्रभर. सगळा plan ठरला होता . सकाळी वर्गात वाढदिवस करायचा , मग college सुटल्यावर फिरायला आणि संध्याकाळी पार्टीत तिला Propose करायचा. अगदी perfect plan होता . लवकर उठल्याने तयारी सुद्धा लवकर केली त्याने . छानसा शर्ट ,कडक इत्री केलेला आणि निघाला college साठी बाहेर. बाहेर आल्याआल्या त्याचं लक्ष आभाळाकडे गेलं "आज काय पाऊस पडणार वाटत" असे विनू मनात बोलून , भिजू नये म्हणून झपझप पावलं टाकत college मध्ये आला. Group तर अगोदरच आला होता . फक्त " सुची " आली कि party सुरु . " आज मुद्दाम उशिरा येणार वाटते ही " एक कोणीतरी बोललं तसे सगळे हसले. रोज ७ वाजता येणारी आज ८ वाजले तरी कूठेच दिसत नव्हती. ८ चे ९ , ९ चे १० , १० चे १२ वाजले तरी ती आलीच नाही , त्यावेळी mobile एवढे कोणी वापरायचे नाही आणि तिच्या घरी फोनही नव्हता. शेवटी कंटाळून एक एक जण निघाले .

" संध्याकाळी भेटूया नक्की हा . मोठ्ठी party करूया . मी घेऊन येतो तिला ." असे विनूने सगळ्यांना सांगितले आणि सर्व Group आपल्या घरी निघून गेला. विनू अजूनही थांबला होता . त्याने वर आभाळात पाहिले . अजूनही सकाळचाच पाऊस धरलेला होता . " आज खरंच काहीतरी बिनसलं असणार दोघांच पावसाचं  आणि "सुची" च सुद्धा." तोही घरी निघून आला . " का नाय आली ती . सगळा मूड ऑफ केला . आता भेटू दे संध्याकाळी. भांडणच करतो ." संध्याकाळ झाली तरी ती त्याच्या घरी आली नाही. आता खरोखरच विनूला " सुची "चा राग आला होता. तो तसाच तिच्या घरी गेला. तर दरवाजाला कूलूप. ते बघून तर तो तसाच घरी आला . " एकटीच गेली फिरायला Family बरोबर . आणि मी कोणीच नाही का ? उद्या येऊ दे . बोलणारच नाही." डोक्यात राग घालून तो झोपून गेला. दुसऱ्या दिवशी ती आली नाही . त्याचा राग काही गेला नव्हता. असे ५ दिवस गेले . ती आलीच नाही college ला . आता त्याला तिची काळजी वाटू लागली . " बर नाही वाटतं तिला " college सुटल्यावर तो तिच्या घरी गेला तर कूलूप तसचं होतं. " बहुतेक डॉक्टर कडे गेली असेल " असा विचार करून तो परतला. आणखी ४ दिवस गेले. ती काही college ला आली नाही की त्या दारावरच कूलूप उघडलं नाही. 

विनू तर अगदी वेडा झाला होता. सगळीकडे त्याने विचारलं , शेजारी , तिच्या मैत्रिणीना, तिच्या नातेवाईकांना. कोणालाच माहित नव्हत. एकाकी गायब झाली होती ती. बघता बघता १ महिना झाला,परंतु ती काही आली नाही. विनू तर जवळ जवळ वेडाच झाला होता . ना जेवणात लक्ष ना अभ्यासात . अगदी कोमेजून गेला होता तो . नेहमी हसरा , धडपड्या विनू आता एकटा एकटा राहत होता . कोणीतरी सांगितलं कि ती तिच्या गावी गेली असावी . तसा तोही तिच्या गावी जाऊन आला , ती तिकडे गेलीच नव्हती. आता परीक्षा जवळ आल्या होत्या. आणि शिक्षकांना विनूच असं वागण बघवत नव्हत . त्यांनी त्याच्या आई वडिलांना मुंबई ला बोलावून घेतले, त्यांना सुद्धा विनुला बघून धक्का बसला. थोडे दिवस त्यांनी विनू जवळ राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी विनू च मन पुन्हा वळवलं. विनू परत माणसात परतला, तिची आठवण त्याला सोडवत नव्हती, असेच महिने गेले, वर्षही उलटलं. पुन्हा ८ जून. सुची चा वाढदिवस. त्यादिवशी सुद्धा आभाळ भरलेलं होत आणि  लवकरच पावसाला सुरवात झाली ." आज तरी सुची येणार " त्याला आठवलं तिलापण पावसात भिजायला आवडायचं. मग तोही गेला पावसात भिजायला ." कदाचित ती सुद्धा येईल भिजायला ." पाऊस आला तसा गेला , ती काही आली नाही. मग ही त्याची सवयच होऊन गेली. पाऊस पडायला लागला कि विनू भिजायला जायचा जेणेकरून त्याला सोडून गेलेली " सुची " पुन्हा त्याला भेटायला येईल पावसात.      

               " आज ६ वर्ष झाली. सुची कूठे असेल काय माहित ? " विनू विचार करत उभा होता बाल्कनी मध्ये. ६ वर्ष . ती कूठे गायब झाली अचानक. विनू त्या धक्क्यातून बाहेर आला होता, पण तो तिला विसरला नव्हता. कूठूनही तिची बातमी आली की तो तिथे जायचा, अगदी लगेच. गेल्या ६ वर्षात अर्धे भारतभ्रमण केले होते त्याने, मनापासून प्रेम केलं होत त्याने. तिला शोधण्यातच त्याने इतका वेळ घालवला होता. त्यात त्याचं कविता लिहिण, " Love Story " करणे कधीच मागे पडलं होत. फक्त " सुची " ला शोधायचं हेच त्याला माहित होत. 

       रात्रीचे १२ वाजत होते. विनूला काही झोप येत नव्हती. पाऊस तसाच पडत होता. त्याला एकदम आठवलं " पहिली भेट पावसात झाली होती, मैत्री पावसात झाली होती , प्रेम कळल तेव्हाही पाऊस होता आणि........ आणि ती गेली तेव्हासुद्धा पाऊसच होता . Indirectly , आपण पावसालाच जबाबदार धरत आहोत या सगळ्यांसाठी . तरीही पाऊसच का आवडतो मला ? " या गोष्टी वर त्याला हसायला आल. तो तसाच उभा होता पावसाला बघत, इतक्यात फोन वाजला. तसा विनू वर्तमान काळात परतला. त्याच्या मित्राचा फोन होता , पुण्यावरून. तो पुण्याला JOB ला होता.
 " एवढया रात्री काय काम असेल याच ? " ,
 " Hello…. Hello…विनू .... अरे विन्या जागा आहेस का ? " ,
 " हो ..... रे ... काय झालं ? " , 
" अरे ,, एक गोष्ट सांगायची आहे .", 
" सांग ना.... तुझा आवाज बरोबर नाही येत आहे.…… ",
" ऎक जरा…... नाहीतर फोन बंद होईल…" ,
" हा .... सांग ","मला पुण्यात आपली " सुची " भेटली होती रे ." ,
" काय ......... ? " आणि फोन कट झाला…  

                                                                                                to be continued.............

Tuesday, 24 September 2013

" वडीलांस पत्र ..........."

प्रिय  " बाबा " यांस ,
                             
                           आज थोडं एकट एकट वाटलं,
                           बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……


चालायला लागल्यावर तुम्हीच पहिला हात दिला होतात,
                           पण मी पुढे गेल्यावर नकळतच कधी दूर गेला होतात,
आज, स्वतःच्या पायावर उभा असलो तरी धडपडल्यासारखं वाटलं.
                           बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……

जेवताना काऊ चिऊ शिवाय कधी घास पोटात गेला नाही,
                           आता तर चिऊ बघायला सुद्धा मिळत नाही,
 काऊ चिऊ साठी पुन्हा एकदा रुसवासं  वाटलं.
                           बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……

लहानपणी तुमच्यासोबत पावसात भिजताना खूप मजा वाटायची,
                           फाटका रेनकोट , तुटकी छत्री असूनही ती दोघांना पुरायची,
आज , नवी कोरी छत्री असूनही पावसात थोडं भिजावस वाटलं.
                           बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……

एकदा घरात एकटा असताना, सर्व घर रडून डोक्यावर घेतलं होत,
                           पण तुम्ही धावत पळत येउन ' मी आहे 'असं सांगितलं होत,
आज , स्टेशनच्या गर्दीत सुद्धा " एकट एकट " वाटलं .
                           बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……

आठवतय… एकदा मी पडलो होतो,मला खूप लागलं होत ,
                            त्यादिवशी तर पूर्ण आभाळ तुमच्या डोळ्यात दाटलं होत,
आज , उगाचंच अडखळून पडावसं वाटलं…
                           बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……

रात्री झोपताना तर तुमची मांडीच माझी " उशी " असायची ,
                            तुम्ही नसताना आईच्या कुशीतही झोप नसायची,
आज , पुन्हा एकदा तुमच्या जवळ झोपावं वाटलं….
                           बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……

तुमचा हात सोडून शाळेत जाणे नकोसे वाटायचे,
                           पण तोच हात पकडून घरी जाताना मात्र कसलेच भान नसायचे,
आता मोठा झालो तरी " तो " हात पकडून शाळेत जावंसं वाटलं…
                           बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……

"तुझे बाबा , देव बाप्पा कडे गेले " अस मला कुणीतरी सांगितलं होत,
                           मात्र देव बाप्पा कुठे राहतो हेच मला कोणी सांगितला नव्हतं,
लहानपणीच्या त्या प्रश्नावर आज थोडं हसावसं वाटलं ….
                           बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……

जीवनातली तुमची कमी आईने कधीच भासू दिली नाही ,
                            पण तुमची आठवण मनातून कधीच जाऊ शकली नाही,
आज , भरलेल्या आभाळाबरोबर डोळ्यात पाणी दाटल्यासारखं वाटलं….
                           बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून थोडसं रडावसं वाटलं……  
   
                           बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून थोडसं रडावसं वाटलं……
           











       

Friday, 23 August 2013

थोडसं…………" Vibration........ "

काही दिवसांपासून कसस वाटतंय..............
                      थोडसं हृदय "Vibrate" झालं असं वाटतंय.............

सकाळी उठल्यापासूनच कामाला सुरुवात होते,
                     आणि घरातले tension बघून माझ्या tension मध्ये वाढ होते,
घरातली बडबड ऐकून वैतागायला होतंय..................
                     म्हणून  थोडसं हृदय "Vibrate" झालं असं वाटतंय.............

Office साठी बस , ट्रेन , रिक्षा ,
                     सगळ्यांमागे नुसतं पळायला लागते ,
धावून धावून जरा दमल्यासारखं वाटतंय…………
                     म्हणून  थोडसं हृदय "Vibrate" झालं असं वाटतंय.............

Office मध्ये आधी कामाचे, मग Boss चे दडपण नकोसे वाटते,
                    डोंगराएवढे काम करूनही "salary" मुंगी एवढी वाटते,
कमी salary ,वाढती महागाई बघून गरगरल्या सारखं वाटतंय………
                     म्हणून  थोडसं हृदय "Vibrate" झालं असं वाटतंय.............

संध्याकाळी घरी जाताना सुद्धा मनशांती मिळत नसते,
                    ट्रेनच्या "Second Class" मध्ये तर मुंगीला सुद्धा जागा नसते,
" First Class " कडे बघितल्यावर लाजल्यासारखं वाटतंय.........
                     म्हणून  थोडसं हृदय "Vibrate" झालं असं वाटतंय.............

जीव वाचवून घरी आल्यावर बायको जीव खायला तयारच असते,
                     दुसरीकडे Girl Friend , call वर call करून सतावत असते,
बाहेरचं "लफड" कि घर , यात गोंधळल्यासारखं वाटतंय............
                     म्हणून  थोडसं हृदय "Vibrate" झालं असं वाटतंय.............

बायकोने मारलेले टोमणे आता असह्य होत असतात,
                     " घरी आराम मिळतो " अशा गोष्टी Life मध्ये अस्तित्वात नसतात,
असाच उठून आता तिचा गळा दाबावा असं वाटतंय.............
                     म्हणून  थोडसं हृदय "Vibrate" झालं असं वाटतंय.............

मनशांती साठी घरातून मग बाहेर पडलेला असतो,
                     " बार " मध्ये जाण्याइतका सुद्धा खिशात " money " नसतो,
रस्त्यावरच्या भिकाऱ्यांच्या बाजूला जाऊन बसावसं वाटतंय.................
                     म्हणून  थोडसं हृदय "Vibrate" झालं असं वाटतंय.............

आता मी माझ्या " Life " लाच कंटाळलेला असतो ,
                     समोरच्या नाल्यात जीव देण्याचा विचार मनात आलेला असतो,
पण आत्महत्या करायला थोडसं घाबरायला होतंय.................
                     म्हणून  थोडसं हृदय "Vibrate" झालं असं वाटतंय.............

पूर्ण ताकद एकत्र करून मी " जीव " दिलेला असतो ,
                     माझा श्वास सुद्धा बंद झालेला असतो,
डॉक्टरने मला " Dead " म्हणून घोषित केलेलं असतं,
                     पण माझ्या बायकोला त्याचं जराही दुःख झालेलं नसतं,
माझी मुलं मात्र मलाच शोधत असतात,
                     पप्पा कुठे गेला म्हणून रडतं असतात,
माझी चूक आता मला समजलेली असते,
                     पण अजूनही वेळ निघून गेलेली नसते ,
माझ्या या " Dead " शरीरात अजूनही " जीव " असल्यासारखं मला वाटतंय.............
                  कारण .... कुठेतरी एका कोपऱ्यात अजूनही थोडसं हृदय "Vibrate" झालं असं वाटतंय.............    

Tuesday, 16 July 2013

" त्याचा पाऊस "………

  '' Hello ……Hello ……सर ...... माझा आवाज येतो आहे का ?" " हा . बोल . काय झालं '' " सर आज मला जमणार नाही office ला यायला " " का ..... काय झालं ?'' " सर , पावसामुळे train बंद आहेत,कसा येणार ?" " ठीक आहे.  "
    सकाळपासून १० फोन येऊन गेले ," सर , आज नाही येणार " म्हणून. कारण एकच सगळ्यांचे " पाऊस " . आज संपूर्ण office रिकामं होते. काल दुपारपासून जो पाऊस  सुरु झाला होता ,तो सकाळीसुद्धा चालूच होत. सगळीकडे पाणीच पाणी होत. ट्रेन बंद होत्या,काही ठिकाणी झाड पडली होती,B.E.S.T चा सुद्धा problem होता . एकूणच वेधशाळेने मुसळधार पावसाची चेतावणी दिली असल्यामुळे बहुतेक लोकांनी घरीच थांबायचे ठरवले होते . 
      पण समीर मात्र office ला आला होता आणि तो सुद्धा एकटाच . पावसामुळे आज त्याचा Driver सुद्धा आला नव्हता. म्हणून आज तो स्वतः Drive करत आला होता . स्वतःची कंपनी होती त्याची आणि येवढ्या मोठ्या कंपनीचा तो Boss होता . अवघ्या २७ वर्षाचा होता तो तरीसुद्धा एकटाच एवढी मोठी कंपनी Handle करायचा . 
    Actually , त्याच्या पप्पांनी कंपनी सुरु केली तेव्हा ती लहान होती , पण ४ वर्षापूर्वी जेव्हा समीरनी कंपनी Join केली , तेव्हापासून त्याने कंपनीला एवढया उंचीवर आणून ठेवले कि त्याच्या पप्पांनी त्याचा विचार पण केला नसेल . समीर लहानपणापासूनच हुशार आणि ४ वर्षापूर्वी U.S.A  मधून शिक्षण घेऊन तो भारतामध्ये आला , अगदी त्या दिवसापासून त्याने कंपनीसाठी काम करायला सुरुवात केली . 
              पण आज एक महत्त्वाची meeting होती आणि पावसाने त्यावर सगळ पाणी फिरवलं होता . 
   " आज माझा दिवसच खराब आहे वाटते " समीर मनातल्या मनात बोलला . काहीतरी काम करावं म्हणून त्याने P.C. चालू केला आणि ५ मिनिटातच त्याच्या पूर्ण कंपनीची वीज गेली . आता समीरला खरंच पावसाचा खूप राग आला होता . त्याला पाऊस मुळी आवडायचाच नाही . 
    पावसातली न होणारी काम,चिखल ,सगळीकडे ओलं ओलं ,दमट वातावरण हे त्याला नकोसं असायचं . पण या व्यतिरिक्त एक कारण होत कि त्यामुळे तो पावसाला स्वतःपासून दूर ठेवायचा. अशाचं एका पावसात जेव्हा तो 8 वर्षाचा होता,त्याची आई त्याला सोडून गेली होती. कोणालाच माहित नाही ती कूठे गेली , कोणी म्हणाला ती तिच्या गाडी बरोबर वाहून गेली ,कोणी म्हणाला तिने घराच्या tension  मुळे आत्महत्या केली, तर कोणी बोलायचं कि ती अजूनही जिवंत आहे. कोणास ठावूक काय ते पण तिची गाडी मात्र नदीत सापडली होती. त्याचं आईवर खूप प्रेम होतं आणि ती अश्याप्रकारे निघून गेल्याचा त्याला लहानपणीच खूप मोठठा धक्का बसला होता. याचा परिणाम असा कि पहिलाच एकलकोंडा असलेला तो अजूनच एकटा पडला.    
    समीर  खिडकी समोर उभा राहून बाहेर बघत होता . " पाऊस थांबला कि निघूया " असे त्याने ठरवले पण पावसाला आज थांबायचे नव्हते. असाच पाऊस पडत राहिला तर निघता येणार नाही असा विचार करून त्याने मग निघायचे ठरवले . घरी फोन लावला त्याने ,त्याच्या पप्पांना . परंतु त्याचे पप्पा घरातच नव्हते ,ते त्यांच्या दुसऱ्या बायकोबरोबर बाहेर गेले होते . Mobile सुद्धा स्विच ऑफ केला होता त्यांनी . 
   पहिली बायको गेल्यानंतर त्याच्या पप्पांनी अगदी एका महिन्यातच दुसरा लग्न केलं होते. समीर आईला विसरू शकत नव्हता आणि दुसऱ्या कोण्या बाईला तो आपली आई मानू शकत नव्हता. ती सुद्धा त्याचा नेहमी तिरस्कार करायची . याचा परिणाम असा समीर लहानपणीच त्याच्या नातेवाईकांपासून दूर झाला . आणि आणखीनच एकटा पडत गेला .  
    समीरच्या आता लक्षात आले होते कि त्याच्या mobile ची battery खूप कमी राहिली आहे . पाऊस काही कमी होत नव्हता. त्याने घरी जाण्याचा निर्णय घेतला . त्याने गाडी चालू केली आणि ती निघाला . रस्ते मात्र मोकळेच होते,पाणी साठलं होते सगळीकडे. याची गाडी मात्र सुसाट चालली होती आणि पावसाचा जोर पण वाढत चालला होता,जणू काही दोघांमध्ये स्पर्धाच लागली होती. त्याची गाडी पळतच होती. आणि अचानक……
     अचानक आकाशात एक वीज चमकून गेली ,अगदी त्याचवेळेला त्याची गाडीसुद्धा बंद पडली. " आता हिला काय झालं ?". त्याने गाडी सुरु करायचा खूप प्रयत्न केला पण ती बंदच होती. आता आकाशातली वीज आणि त्याची गाडी याचा काही एक संबंध नव्हता,तरीही त्याला वाटलं कि त्या विजेमुळेच गाडी बंद पडली . आता गाडीत बसून राहण्याशिवाय त्याच्याकडे काहीच पर्याय नव्हता. त्यात भर पडली ती mobile ची battery संपली याची ." येवढा महाग mobile आहे. पण वेळेला उपयोग होत नसेल तर काय कामाचा ? "
  होताच त्याचा mobile महाग . त्याच्याकडे असणाऱ्या सगळ्याच वस्तू  महाग होत्या, 50,000 चा mobile , Rolex चे दीड लाखाचे watch, 10,000 चे shoe , 30,000 - 40,000 चा अंगात घातलेला suit आणि फक्त 2 कोटींची गाडी. पण या सगळ्यांचा आज काहीही उपयोग नव्हता. कारण भर पावसात तो त्याच्या बंद गाडीसह अडकून पडला होता.
असाच अर्धा तास निघून गेला. हळूहळू त्याचं डोक शांत झालं. तो आता अगदी शांत झाला होता. खूप दिवसांनी म्हणाल तर खूप महिन्यांनंतर तो असा शांत बसून होता. त्यालाही बर वाटलं. त्याचं मनही आता शांत झाला होते. काही नाही तर तो गाडीच्या बाहेर काय चाललंय ते पाहू लागला. त्याची गाडी थांबली होती तो रस्ता समुद्र किनाऱ्याला लागूनच होता. फक्त मध्ये होता तो एक लांबलचक दगडी कठडा जो समुद्र आणि रस्ता यांना वेगळा करत होता. 
     तेवढयात त्याला एक जोडपं पावसात भिजताना दिसलं. मस्तपैकी ते पावसाचा आनंद घेत होते. एकाच छत्री होती दोघांकडे पण छत्री असूनही ते दोघे चिंब भिजलेले होते,एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत होते. त्यांना बघून समीरला कसस झालं. त्याला त्याच्या college ची आठवण झाली. त्याचा group नाही होता पण college मध्ये एक group होता त्यात त्याला जायचे होते,पण तो जाऊ शकला नाही. त्या group मधली एक मुलगी त्याला खूप आवडायची, तिला हि तो आवडायचा. पण दोघे कधी एकमेकांबरोबर बोलले नाहीत. फक्त नजरेची भाषा चालायची दोघांमध्ये.एका पावसात मात्र ती एका आडोशाला उभी होती आणि समीर गाडीमधून घरी चालला होता,समीर बाहेर पावसात जाऊ शकत नव्हता कि तो तिला गाडीत बोलावू शकत नव्हता कारण श्रीमंती.त्याच्या पप्पांना असे काही केलेले आवडायचे नाही.ती तशीच पावसात उभी राहिली आणि समीर हताश होऊन निघून गेला.नंतर समीर higher studies साठी U.S.A. ला गेला आणि ती , तो group सगळ मागे राहिलं.
 पुन्हा एकदा वीज कडालली आणि समीर भानावर आला. "त्यादिवशी जर आपण गाडीतून उतरलो असतो तर बर झालं असतं,निदान ती आता माझ्या बरबोर असती." त्याला त्याच्या तश्या वागण्याचा राग आला होता, परंतु ती वेळ तर केव्हाच निघून गेली होती.थोडंस त्याला हतबल वाटायला वाटायला लागलं होतं.ते जोडपं तर कधीच निघून गेलं होतं,पण समीरच मन तिथेच घुटमळत होतं.विचार करताकरता गाडीच्या दुसऱ्या बाजूला त्याचं लक्ष गेलं.तिथे सगळ गढूळ पाणी साठलं होतं आणि त्याच पाण्यात एक 6 -7 वर्षाचा मुलगा खेळत होता,त्याचे सगळे कपडे खराब झाले होते,चेहऱ्यावर चिखल लागला होता,तरीसुद्धा त्याला त्याची पर्वा नव्हती.तो पाण्यात खेळण्यात एकदम मग्न होता. ते बघून समीरला प्रथम किळस वाटली,पण नंतर त्याला त्याची मजा वाटायला लागली," आपण अशी मजा कधी केलीच नाही,पावसात कधी भिजलो नाही,घराच्या बाहेरच कधी पडलो नाही,माझी खेळायची जागा एकच , माझी room." स्वतःशीच तो हसला,स्वतःला किती लहान समजायला लागला होता तो त्या मुलासमोर.   
   लहानपणापासून तो एकटाच वेगळ्या Room मध्ये राहायचा,मोठया बंगल्यातली स्वतंत्र Room,आई - वडिलांची वेगळी Room.त्यात ते नेहमी भांडतच असायचे,लहान समीरला कितीही वाटलं तरी तो त्यांच्या Room मध्ये जात नसे. मग तो त्याच्याच room मध्ये खेळत राहायचा,अभ्यास करत राहायचा. सारखा सारखा अभ्यास ,त्यामुळे त्याला कोणी मित्र हि नव्हते.ना शाळेत ना college मध्ये. तो त्याच्या Room च्या खिडकीतून कधी कधी बाहेर बघत राहायचा,तिथे खेळणाऱ्या मुलांकडे ,त्यालाही वाटायचे त्यांच्यासोबत जाऊन खेळावे,पण तसं तो करू शकत नव्हता. त्याचं लहानपण असंच होत " एकट,एकट ".
  त्या मुलाकडे बघताबघता त्याचं लक्ष त्याच्या थोडया बाजूलाच उभ्या असलेल्या एका बाईकडे गेलं. " त्याची आई असावी बहुतेक " समीर बोलला. थोड्यावेळाने तिने त्या मुलाला हाक मारून पाण्याबाहेर बोलावले पण तो कसला ऐकतोय ? त्याने तर तिच्यावर  सुद्धा पाणी उडवायला सुरुवात केली होती.मग ती सुद्धा पाण्यात उतरली आणि आपल्या मुलासोबत खेळू लागली.     
  ते आई-मुलाचं प्रेम बघून त्याला त्याची आई आठवली. त्याचं मन एकदम भरून आलं. समीरच्या पप्पांबरोबर कितीही भांडण झाली तरीही ती समीरला कधीही दूर करायची नाही. समीरला सुद्धा वडिलांपेक्षl आईच खूप जवळ होती. ती त्याच्याबरोबर खेळायची,त्याला जेवण भरवायची, त्याच सगळ करायची. तीच तर समीर वाचून पानही नाही हलायचं. येवढं ती प्रेम करायची समीरवर. आणि सगळ्यांना ते माहित होते,तरीही ती त्याला सोडून गेली होती. 
   " का …… का सोडून गेलीस मला आई ? " समीर मनातल्या मनात बोलत होता. "जाताना एकदाही माझा विचार तुझा मनात आला नाही का ? " बाहेर पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या,बरसणाऱ्या प्रत्येक सरीबरोबर आईची आठवणही गडद होत जात होती. ढगांची अजूनच गर्दी होऊ लागली होती,आणि इकडे बाहेरचा पाऊस समीरच्या डोळ्यात साठू लागला होता. त्याला आता गाडीत बसून राहणं असह्य झालं होतं. 
   त्याला आईचं एक गाणं आठवलं, " मेघ मल्हार ". तो लहान असताना जेव्हा जेव्हा पाऊस पडायचा ,तेव्हा त्याची आई " राग मेघ मल्हार " गायची. खूप छान आवाज होता तिचा आणि त्यावेळी जरी समीरला ते कळत नसलं तरीही त्याला ते ऐकायला खूप आवडायचे. आज त्याला " मेघ मल्हार " चा अर्थ कळत होता.हळूच त्याच्या डोळ्यातून एक थेंब त्याच्या हातावर पडला अन त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळायला लागले. त्याला पाऊस बाहेर बोलावत होता. गाडीच दार त्याने उघडलं आणि तो गाडीच्या बाहेर आला. पहिला कधीच तो पावसात भिजला नव्हता,त्यामुळे त्याला खूप वेगळं वाटत होत. समोर समुद्र पण उधाणलेला होता,वर जोरात वाहत होता, समीर खूप वेगळं वाटत होता सगळं, त्याने हे कधीच अनुभवलं नव्हतं,मग त्याने समुद्राकडे बघितले व त्याच्या दिशेने चालू लागला,आईच्या गाण्याचे प्रत्येक स्वर त्याच्या कानात घुमत होते. त्याच्या महाग shoe मध्ये पाणी शिरलं म्हणून त्याने ते काढून फेकून दिले होते, त्याचा 50,000 चा mobile पाण्यात तरंगत होता, त्याचं दीड लाखाचं घडयाळ तर कधीच पाणी गेल्याने बंद पडलं होतं,त्याचा 40,000 च्या suit ला चिखल लागला होता आणि 2 कोटीच्या गाडीत आता पाणी भरू लागलं होतं,पण त्याचं त्यांकडे लक्षच नव्हतं, तो चालतच होता पावसात. वाटेत एका अणुकुचीदार दगडावर त्याचा पाय पडला , पायातून रक्त येऊ लागलं,पण त्याला त्याची पर्वा नव्हती. तो चालतच होता.  
जणू काही पूर येणार होता इतकं पाणी होतं आणि समीरच्या मनात आठवणींचा पूर आला होता. चालता चालता तो किनाऱ्यापाशी आला. पायातून रक्त वाहतच होतं आणि कानात " मेघ मल्हार " घुमत होता. तिकडेच एका दगडावर बसला तो मनातील " मेघ मल्हार " ऎकत. एकटाच. पावसात. त्याला आता कसलंच tension नव्हतं, ना meeting चे , ना त्याच्या भविष्याचे आणि ना त्याच्या घरचे. 
      तो फक्त आता त्याचाच होत. डोळ्यातले अश्रू  पावसात वाहून जात होते, जणू काही त्याची आईच त्याचे अश्रू पुसत होती. त्याने पावसाला स्वतःला समर्पित केलं होता. त्याच्या कानात घुमणारे स्वर,आता त्याच्या ओठांतून बाहेर पडू लागले होते.
      भर पावसात एका उधाणलेल्या समुद्राच्या किनारी बसून तो " मेघ मल्हार " चे स्वर आळवत होता,सगळ काही विसरून. तो पाऊस त्याचा होता,फक्त आणि फक्त " त्याचा पाऊस "………    

Saturday, 15 June 2013

थोडासा पाऊस

थोडस भरलेलं आभाळ आणि पावसाची वाट पाहणारी ती ,
                             थोडासा पाऊस आणि थोडासा मी . 

पावसाची रिमझिम सुरु होतच ती अगदी वेड्यासारखी होते. 
पण मला येताना बघताच घाबरून लपून बसते. 
अशाचं रिमझिम पावसात थोडीसी बावरलेली ती,
                             थोडासा पाऊस आणि थोडासा मी .

पाऊस सुरु होतच मग मी थोडा मुददामच आडोशाला जातो,
लपून छपून मग तिलाच बघत बसतो,
मला अगदी हळूच लपून बघणारी ती ,
                             थोडासा पाऊस आणि थोडासा मी .

पाऊस धो धो सुरु होताच मग मात्र तिला राहवत नाही,
बाहेर पडून पावसात भिजण्याची मजा ती सोडत नाही,
पावसात भिजणारी तरीही पागोळ्यात रमणारी ती,
                             थोडासा पाऊस आणि थोडासा मी .

पावसात ती भिजत असते , पण मनातून मी भिजलेला असतो. 
तिचं ते फुलाप्रमाणे भिजलेलं रूप बघून मी स्वप्नात गेलेला असतो. 
पावसात भिजताना मोगऱ्याच्या फुलासारखी फुललेली ती,
                             थोडासा पाऊस आणि थोडासा मी .

पावसाला मात्र थांबायचे नसते, तो नुसता बरसतच असतो,
मध्येच एखादी वीज चमकवुन तिला घाबरवत असतो,
वीजेलाच जीभ बाहेर काढून वेडावून दाखवणारी ती,
                             थोडासा पाऊस आणि थोडासा मी .

मी अजूनही तीलाच बघत असतो,तीच्या त्या स्वच्छदी जगात हरवलेला असतो,
तिला कशाचेच भान नसते,कारण तीला या जगाचाच विसर पडलेला असतो,
स्वतःचा जगात या जगालाच विसरून गेलेली ती,
                             थोडासा पाऊस आणि थोडासा मी .

अशी आमची कहाणी सुरूच राहते,
                     दरवर्षी येणाऱ्या पावसाबरोबर वाढतच राहते,
तिच्यात गुंतलेला मी , आणि बरसणाऱ्या पावसात गुंतलेली अशी ती,
 आता बराच मोठ्ठा पाऊस आणि त्यात मनसोक्त भिजणारा मी . 


Wednesday, 12 June 2013

थोडसं ……… माझं मन

तुझ्या डोळ्यांच्या पापण्या वर उचलून बघ , तर तुला समजेल…………

उगवणाऱ्या सूर्याकडे जर तू  बघू शकली असतीस ,
                                   तर तुला समजलं असतं कि माझ्या मनात काय आहे ते …
वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर जर तू विहरू शकली असतीस ,
                                   तर तुला समजलं असतं कि माझ्या मनात काय आहे ते …
गाणाऱ्या पाखरांबरोबर जर तू गाऊ शकली असतीस ,
                                   तर तुला समजलं असतं कि माझ्या मनात काय आहे ते …
सागराच्या लाटा पलीकडे जर तू बघू शकली असतीस,
                                   तर तुला समजलं असतं कि माझ्या मनात काय आहे ते …
नदीच्या पाण्याबरोबर जर तू वाहू शकली असतीस,
                                   तर तुला समजलं असतं कि माझ्या मनात काय आहे ते …
झाडांच्या पानांची सळसळ जर तू समजू शकली असतीस,  
                                   तर तुला समजलं असतं कि माझ्या मनात काय आहे ते …
बरसणाऱ्या पावसाला मनात साठवलं असतंस,
                                   तर तुला समजलं असतं कि माझ्या मनात काय आहे ते …
मला तर तू कधी ओळखू शकली नाहीस,
                                    पण मी तुझा मनातच होतो. 
माझ्या मनात जरासं डोकावून बघितलं असतंस ,
                                   तर तुला समजलं असतं कि माझ्या मनात काय आहे ते …

Friday, 17 May 2013

थोडीशी………….…… गंमत


असंच एकदा वेडयासारखा,फिरत होतो रात्रीचा,
                    चालता चालता चंद्र म्हणाला ,"काय रे,वेळ आहे का दिवसाचा?"
त्याला मी म्हणालो हसत ,"तू नाही का रे असतोस रात्रीचा खेळत?"
                   तो मला म्हणाला चिडवत," पण मी सूर्यासारखा कोणाला नाही छळत. "  
असं म्हणून तो निघून गेला चमचमणाऱ्या चांदण्यांबरोबर ,
                   मग मीही नवा डाव मांडला उनाड वाऱ्याबरोबर ,
तो नुसता उडत होता ,झोपलेल्या पानांना जागवत होता  . 
                   मी त्याला म्हणालो "बस कर आता,दिवसा काय झोपला होता "
रागावून मग तोही निघून गेला , मी पडलो एकटा , 
                    वेळही अशीच होती , रस्त्यावर कोणीच नव्हते एकटा -दुकटा
अशावेळी  रस्त्यावर कोणी चिटपाखरूही नव्हते. 
                    पण मला फिरताना बघून,काही कुत्रे माझा मागे आले होते. 
त्यांना वाटले ,"कोण हा प्राणी असा रात्रीचा एकटा फिरतोय?" 
                  "आमच्याच एरियात येऊन असा आमच्यावर दादागिरी करतोय?"
त्यांचा तो पवित्रा बघून मग मीही माघार घेतली. 
                  उगाच कुठला problem नको म्हणून आडवळणाची वाट धरली . 
वाट मात्र छान होती, झाडेच झाडे होती तिथे ,
                  सोसाट्याचा वर मात्र वाहत होता इथून तिथे .   
समोर वडाचे एक मोठे झाड दिसले, वाटले जरा बसावं ,
                  अजून कसा प्रवास असेल , हे कोणी कसं सांगावं ?
बसल्या बसल्या झाड बोललं " कामधंदे नसतात . कधीही आपले येतात."
                  "स्वतःला झोप येत नाही . पण आमची झोप उडवतात ."
विचार केला निघूया , पुन्हा तो काही बोलायला नको."
                  " सकाळ पासून थकला असेल ,पुन्हा झोप मोडायला नको."
चालता चालता आंब्याचे झाड दिसले,आंबे लागलेले चार . 
                  झाडाचं म्हणाला ," पाहू नकोस हवाऱ्यासारखा, अजून ते कच्चेच आहेत फार "
समोर एक स्मशान दिसलं ,तिकडे एक माणूस बसला होता . 
                  त्याला बोललो,"काय करताय इथे ?",१२ चा ठोका पडला होता . 
तो बोलला ," काय करणार ? "कबर" मध्ये A.C. नाही .फार उकडते आत "
                  म्हणून जर बाहेर येऊन बसलो,बर वाटते गार वाऱ्यात "
ते ऐकून धावत सुटलो ,घाम सुटला अंगाला . 
                  लांब आल्यावर बोललो " पुन्हा जाणार नाही त्या वाटेला "
तेवढयात कुठून भूत आलं ,बोललं ," दिसतोस एकटा,बसतो तुझ्या मानेवर "
                  धपाटे मारत आई बोलली , " ऊठ कारट्या , किती झोपतोस . जायचे नाही का कामावर "              

Thursday, 21 March 2013

थोडसं .................आभाळ ......प्रेमाचं

मी एक " मेघ " आहे.................
                       एक पावसाळी " मेघ "..................
                                           एक प्रेमाने ओथंबलेला " मेघ "............
मी उनाड वाऱ्याबरोबर उडू शकत नाही..........कारण  तुझ्या प्रेमाने मला बांधून ठेवले आहे.
मी मनसोक्त बरसू शकत नाही .................कारण तुझा प्रेमाचा थंडावा अजून मला मिळाला नाही.
                       पण ..............पण मला माहित आहे.
                  
 तुझ्या मनात एक आभाळ दाटलंय ..............प्रेमाचं .............
                     तुझ्या ओंजळीत चंद्र विसावला आहे...........
उनाड वारा तुझे केस उगीचचं उडवतो आहे..........
                    चांदण्यांनी तुझ्या भोवती फेर धरला आहे.
आणि  तुझ्या रोमारोमांत एक प्रेमाचा सागर उधाणलेला आहे.

आता ..................... तुझ्या डोळ्यात एक " मेघ " भरून आलंय ..............
                       मला त्या प्रेमाचा ओलावा आता जाणवतो आहे.
                       तो " मेघ " आता कधीही बरसणार आहे.,..फक्त माझासाठी ....
     मला त्या पावसात मनसोक्त  भिजू दे ना ...........
                        मनसोक्त.........फक्त आणि फक्त एकदाच................... 

Sunday, 3 March 2013

थोडसं...................हास्य

लोकं मला वेडा म्हणतात ..
                 पण मी त्याकडे लक्ष देत नसतो .
                                 कारण ......मी एकटाच हसत बसलेला असतो .

कामाला जाताना बसमध्ये फार गर्दी असते .
                 लोकं नुसती धक्का - बुक्की करत असतात.
पण मला त्याचा काही फरक पडत नसतो.
                                 कारण ......मी एकटाच हसत बसलेला असतो .

office मध्ये जायला नेहमी सारखंच उशीर होतो.
                 बॉस सगळ्यांसमोर मला ओरडत असतो.
परंतु  मला त्याचा राग येत नसतो.
                                 कारण ......मी एकटाच हसत बसलेला असतो .

office मधली माणसं माझ्याबद्दल बोलत असतात.
                   आणि मला नेहमी सारखं एकटच सोडतं असतात.
मी त्यांना "येडपट","मंद" वाटत असतो.
                                 कारण ......मी एकटाच हसत बसलेला असतो .

घरी माझ्या लग्नाची तयारी सुरु असते.
                   रोज मला एखादी मुलगी "बघायला" आलेली असते.  
मात्र ...मी तिच्याकडे " बघत "ही नसतो .
                                 कारण ......मी एकटाच हसत बसलेला असतो .

लग्नाचे वय आता उलटून गेलेलं असते.
                    माझ्या घरचे मला त्रासलेले असतात.
त्यांना आता मी " ओझं " वाटत असतो. 
                                 कारण ......मी एकटाच हसत बसलेला असतो .

office मधून मला आता " निरोप " दिलेला असतो. 
                     सगळ office मात्र खूप खुश झालेले असते.
"माझा सेंड-ऑफ झाला" हे सुद्धा मला माहित नसते.
                                 कारण ......मी एकटाच हसत बसलेला असतो .

जोडीदार नसल्याने आता आयुष्यात एकटाच असतो.
                     मी लोकांमध्ये मिसळत नसतो. 
म्हणून मला साधा कुणी " कुत्रं " सुद्धा विचारात नसतो.
                                 कारण ......मी एकटाच हसत बसलेला असतो .

वय उलटून गेले तरी मी अजूनही जिवंत असतो. 
                      कारण मी मृत्युलाच फसवत असतो.
रोज यमराज येउन सुद्धा मला घेऊन जात नसतो.
                           कारण ......प्रत्येक वेळेस ,नेहमी सारखाच तो सुद्धा माझ्या बरोबर हसत बसलेला असतो . 

Sunday, 3 February 2013

थोडीशी ..................."ती ...."

तुला माहित आहे,
               तुला माहित आहे, की मला सगळ माहित असते.
               तरी देखील तू उगाचंच अजाणपणा करतेस.
तुला माहित आहे,
               तुला माहित आहे, की मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो.
               तरी देखील तू मला चंद्र आणण्यास सांगतेस.
तुला माहित आहे,
               तुला माहित आहे, की माझं तुझावर प्रेम आहे.
               तरी देखील तू माझ्या प्रेमाची परीक्षा बघतेस.
तुला माहित आहे,
               तुला माहित आहे, की तुझामुळे माझी झोप उडाली आहे.
               तरी देखील तू नेहमी माझ्या स्वप्नांत येतेस.  
तुला माहित आहे,
               तुला माहित आहे, की मला पाऊस खूप आवडतो.
               तरी देखील तू तुझा हातांची ओंझाळ करून पावसात उभी असतेस.  
तुला माहित आहे,
               तुला माहित आहे, की तुला पाहिल्यावर चांदण्या लपतात.
               तरी देखील तू नेहमी चंद्राशी गप्पा मारतेस.
तुला माहित आहे,
               तुला माहित आहे, की तुला बोलण्यात कोणी हरवू शकत नाही.
               तरी देखील तू माझाशी पैज लावतेस .
आणि मग जाता - जाता मी हरले असे बोलतेस.
पण तुला माहित असते,कि तू मला प्रेमात हरवून गेलेली असतेस.   

Followers