All the contents on this blog are Copyright Protected.

All the contents on this blog are Copyright Protected.

MyFreeCopyright.com Registered & Protected
Protected by Copyscape Duplicate Content Software

Wednesday, 2 July 2014

रेशीमगाठी...... ? ( भाग २ )

              दोन दिवस झाले… पाऊस थांबायचं नावं घेत नव्हता.... वादळचं आलेलं ना, त्यामुळे पुढचे दोन दिवस कॉलेज बंदच होतं. संजयने कॉलेजमध्ये फोन करून conform केलं होतं… दोन दिवस घरात राहिल्याने त्याला आता कंटाळा आला होता. त्यातून, दिवसातून दोन-तीनदा call करणाऱ्या श्वेताने,त्याला साधा miss call ही केला नव्हता. त्याने तर तीन वेळा श्वेताला call केला होता. दोनदा तर call उचललाचं नाही आणि तिसऱ्यांदा " तुला थोडयावेळाने करते call" असं सांगून call केलाचं नाही. संजय त्याचं विचारात होता कधीचा," नक्की काहीतरी बिनसलं आहे श्वेताचं.. " ,संजय खिडकीपाशी उभा राहून विचार करत होता... तेव्हाच घरातला फोन वाजला,..... " hello... कोण बोलतंय... " संजयने विचारलं... " Hi.. संजय... पायल बोलतेय.... कसा आहेस ? " ," हा.. बोल पायल.. मी ठीक आहे... काही काम होतं का... ? "," नाही रे... सहज फोन केला मी.... " ," OK... " थोडावेळ काहीचं बोलणं नाही." मग पायल बोलली... " Hello ,संजय.... तू गेलेलास का कॉलेजला... " ,"नाही.... हा, पण मी call केलेला.... बंदचं आहे कॉलेज... "," तू जाणार आहेस का उद्या .. " ,"बघू.. पाऊस नसला तर जाईन… का गं... "," नाही मी पण आले असते ना मग , खूप दिवस भेटलो नाही ना आपण म्हणून.. "," OK , अजून conform नाही उद्याच.. तुला call करतो मी रात्री, उद्या जाणार असेन तर.. "," ok .. " ," अजून काही बोलायचं होतं का .. " संजयने विचारलं. " नाही , तसं काही विशेष नाही.. " ," मग.. "," जाऊ दे..... काही नाही... Bye... Good Night , Sweet Dream's... " पायल म्हणाली... " पायल... ! ... काय करतेस तू…. शुद्धीवर आहेस ना... " संजय आश्चर्याने ओरडला... " का...  काय झालं... " ," दुपारचे चार वाजले आहेत आणि  Good Night  काय करतेस.. ?"," Sorry ... Bye.. " म्हणत पायलने घाईतच फोन cut केला... " हिला काय झालंय.... अशी काय करते हि पायल.. " विचार करत करत त्याने mobile उचलला तर ६ miss call …. सगळे पायलचेच... संजय विचारात एवढा मग्न झालेला होता कि त्याचा mobile वाजत आहे हे देखील माहित नव्हतं. 

          घरात बसून कंटाळलेला तो... आणि आता पाऊसही थांबलेला, संध्याकाळचे ५ वाजले होते. रहदारी सुरु झाली होती रस्त्यावर.. त्याने श्वेताकडे जाण्याचा निर्णय घेतला... " आई... मी श्वेता कडे जाऊन येतो गं.. " संजयने mobile घेतला आणि घराच्या बाहेर पडला. पाऊस तब्बल दोन दिवसानंतर थांबलेला... काही ठिकाणी पाणी तुंबलेलं.. लोकं त्यातून वाट काढत काढत जात होती.. मध्येच एखादी गाडी पटकन निघून जाई आणि भुरकन पाणी उडवे.. मग लोकांची तारांबळ... स्वतःला वाचवण्यासाठी…. कोणी त्यात मौजमजा करायचं तर कोणी त्या गेलेल्या गाडीला शिव्या देत राहायचं.. मजेशीर अगदी.... एकाचं ठिकाणी दोन टोकांची माणसं... बाजूलाच असलेल्या मैदानात काही मुलं football खेळत होती... चिखलात... घाणेरड्या पाण्यात... त्यांना फक्त खेळायचं होतं... बस्स.... श्वेताचं घर तसं लांबच होतं जरा., पण आजूबाजूचे देखावे पाहत पाहत संजय श्वेताकडे कधी पोहोचला ते कळलंच नाही. 

            दारावरची बेल वाजवली. श्वेताच्या आईने दरवाजा उघडला. " काकू... श्वेता आहे... ? "," ये संजय… आत ये… " म्हणत श्वेताची आई त्याला घरात घेऊन आली... "बस... चहा घे जरा.. " ," नको काकू... श्वेताला बोलावता का जरा.. "," अरे... श्वेता नाही आहे... डॉक्टरकडे पाठवलं आहे तिला.. " ," काय झालं काकू…श्वेताला " ," गेले दोन दिवस ती सतत पावसात भिजत आहे, मग सर्दी नाही होणार, तापही आहे अंगात... कोण सांगणार तिला… जातंच नव्हती, तिचे पप्पा जबरदस्ती घेऊन गेलेत तिला डॉक्टरकडे.. ","श्वेता, कशी भिजू शकते पावसात... तिला तर आवडत नाही ना पाऊस.. "," अरे... काय झालंय तिला कळतंच नाही... गप्प गप्प असते, तिच्या रूम मधून बाहेरच पडत नाही.... कोणासोबत भांडण झालं का तर ते पण नाही.. हिच्याबरोबर भांडण करायची हिंमत फक्त तुझ्याकडे आहे.... तुझ्याबरोबर काही झालं का.. ","नाही... काही नाही..... मला माहित नाही काय झालं ते... ठीक आहे… काकू... मी नंतर call करतो तिला... " ," चालेल.. मी सांगते तिला कि तू आलेलास ते... " ," Bye काकू .. म्हणत संजय निघाला. श्वेता पावसात कशाला भिजते आहे... काहीच कळत नाही.. तेवढयात पावसाला सुरुवात झाली आणि संजयच्या लक्षात आलं कि तो छत्री घ्यायलाच विसरला. मग एका आडोशाला संजय उभा राहिला… थोडा वेळ गेला असेल… उदय तिथूनच गाडीतून चालला होता, संजयला बघितलं तसं त्याने गाडी थांबवली." संजय,…. ये लवकर.....बस गाडीत... " संजय धावतच गाडीत येऊन बसला.. " काय रे... एवढया पावसात इकडे काय करतो आहेस... आणि कॉलेजला गेलेलास का.. " उदयचा प्रश्न.. " अरे... कॉलेज बंदच आहे, मी केलेला फोन.. आणि श्वेताकडे आलेलो ना.. ती नाहीच आहे घरी म्हणून परत चाललो होतो तर पाऊस आला... " ,"ok ... ok... आता इकडे आला आहेस तर चल माझ्या घरी... "," नको रे, कशाला... "," चल रे.. काही काम तर नाही आहे.. नंतर सोडतो तुला मी घरी.. चल.. "," ok ... चल.. " संजय तयार झाला. 

              जवळच उदयचा Flat होता. तिकडेच गेले ते. " घरात कोणी नाही वाटते." संजयने आल्याआल्याच विचारलं." हो रे... मम्मी पप्पा, कालचं पिकनिकला गेलेत. मी आणि नेत्रा, दोघे आहोत घरी.. " नेत्राचं नाव ऐकुन संजय जरा घाबरला.हि पण आहे घरी.. बापरे... " तू कॉफी घेणार कि चहा.. ?"... " कॉफी चालेल मला."," ok , मी सांगतो कॉफी करायला.. आणि मीही जरा फ्रेश होऊन येतो, wait कर जरा.. " ," ok …. " संजय म्हणाला. " उदय.. " संजयने हाक मारली तसा उदय थांबला. " काय रे.. "," नेत्रा कुठे आहे... खूप दिवस बोलणं झालं नाही आमचं म्हणून विचारलं .. "," तिच्या बेडरूम मध्ये असेल.. जा.. तिला भेटून ये.. मी येतो कॉफी घेऊन तिथे... "  आणि उदय निघून गेला. संजयने भीत भीतच नेत्राच्या रूमचा दरवाजा ठोठावला. " कोण आहे.. ? " ," मी... संजय.. " आतून कोणताच response नाही.. " येऊ का आत मी.. ","दरवाजा उघडाच आहे.. " नेत्राचा आवाज. दरवाजा उघडून संजय आत आला. सगळ्या वस्तू कश्या व्यवस्थित आपल्या आपल्या जागी.. स्वच्छ रूम एकदम.. आणि एका कोपऱ्यात दोन bags भरलेल्या.... नेत्रा तिच्या बाल्कनीत उभी होती,पावसाला पाहत. संजयला पाहून तिला कोणताच आनंद झाला नव्हता. " कशी आहेस नेत्रा.. ?"," ठीक आहे...", पुढे काहीच प्रश्न नाही कि बोलणं नाही. नेत्रा पावसाकडे पाहत होती. " उद्या येणार आहेस का कॉलेजला." नेत्राने मान हलवून नकार दिला. पुन्हा शांतता... तेव्हा उदय कॉफी घेऊन आला. " हं… संजय कॉफी.... " ," Thanks " आणि नेत्राचा mobile वाजला तशी ती रूम बाहेर गेली. " काय झालं... नेत्रा गप्प का... उद्या कॉलेजला येणार का तर नाही बोलली... "," अरे... हो... तुला सांगायचं विसरलो मी..नेत्राने कॉलेज सोडलं.. " ,"काय ... ? " संजय दचकलाचं," अरे.... तिच्या मनात काय आलं कोणास ठाऊक .. पप्पांना बोलली , मला वेगळं काहीतरी शिकायचं आहे... म्हणून दुसरीकडे शिकायला जायचं आहे.... "," हा... मग... "," पप्पांच्या ओळखी खूप आहेत ना.. मग झालं admission लगेच... " , " पण कॉलेज बदलायचं ठरलं कधी... "," कालच.... दोन दिवस हि गप्प गप्प असायची.. म्हणून पप्पांनी विचारलं तेव्हा ती हेच म्हणाली कि कॉलेज बदलायचं आहे…. आता तिचा हट्ट पप्पा लगेच पुरवतात... " ," कुठे admission घेतलं तिने.. " ," दिल्लीला , तिकडेच रहाणार म्हणून या bag's भरून ठेवल्या आहेत, उद्या जाईल ती रात्री." संजयला तर धक्का बसला होता. नेत्रा बरोबर तर नीट बोलायला मिळालं नव्हतं… थोडावेळ संजय विचारात घडून गेला. 

              मग उदयनीचं त्याला विचारलं," श्वेता कशी आहे रे.. " संजय तसाचं विचारात…" संजय.. " उदयनी त्याला हलवलं. " श्वेता... श्वेता कशी आहे.. ?", " हं... हो.. बरी आहे... " संजय जागा झाला. " भेटलोच नाही दोन दिवस तिला.. असं वाटते किती महिने भेट झाली नाही तिची आणि माझी.. " उदय म्हणाला. " एक गोष्ट विचारू तुला.. " संजय कॉफी पीत पीत म्हणाला," विचार.. " ," तुला हे माहित आहे ना कि श्वेता तुला अजिबात पसंत करत नाही, सारखा insult करते तुझा... तरीही तू तिच्याच मागे का असतोस... I mean , कॉलेजमध्ये एवढया मुली आहेत तरी... राग मानू नकोस पण तुला विचारणारच होतो मी... " तशी उदयनी हलकीशी smile दिली. " प्रेम करतो रे तिच्यावर... " संजय उदयकडे पाहतच राहिला. " तिला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं ना मी…. ११वी ला, तेव्हाचं मला ती आवडली होती. तिचा स्वभाव जरी बिनधास्त असली, मोठयाने बोलत असली तरी तिच्या मनात काही नसत तसं... हे माझ्यापेक्षा तुला जास्त माहित आहे... कोणालाही मदत करायला जाते.... सगळ्या गोष्टी आवडतात मला तिच्या... " ," खरंच प्रेम आहे तुझं.. " संजयने विचारलं. " हो.. मनापासून... म्हणून कितीही मला बोलत असली तरी ते सगळं मला चालते…. आता तिचं माझ्यावर प्रेम असू दे नाहीतर नसू दे... त्याचा काही प्रोबेल्म नाही... असंही नाही कि तिने माझ्यावरच प्रेम करावं…. प्रेम कसं निस्वार्थ असावं." संजयनी उदयच हे रूप कधीच पाहिलं नव्हतं. " गेले काही दिवस ती शांत असते… मी विचारलं तर मला काही सांगितलं नाही, म्हणून माझही मन लागत नाही. तुला काही बोलली का ती.. "," नाही.. " मग दोघेही शांत... " चल ... मी निघतो... घरी जायला उशीर होईल."," थांब... मी सोडतो तुला गाडीतून.. " ,"नको... thanks... मी जातो चालत, पाऊस सुद्धा थांबला आहे." संजय निघाला तसा उदयने पुन्हा थांबवलं." Hey संजय....श्वेताला काही सांगू नकोस मी जे काही बोललो ते... आणि प्लीज तिला काय झालं आहे ते बघ ना... गप्प गप्प बरी नाही दिसत रे ती... " , "ठीक आहे....  नाही सांगणार.... Bye." म्हणत संजय निघाला. दारात नेत्रा उभी, निर्विकार चेहरा... " Bye नेत्रा… and best of luck for your future.... " संजय जाता जाता नेत्राला म्हणाला.. " same to you…. संजय." नेत्रा म्हणाली आणि वर घरात निघून गेली. संजयला जरा वाईटच वाटलं. 

             संजय तसाच घरी आला, विचार करत करत..जेवलाही नाही बरोबर... मनात श्वेता, नेत्रा आणि उदयचे विचार.... त्याला करमतच नव्हतं. घरात सारख्या येरझाऱ्या घालत होता. न राहवून त्याने श्वेताला call केला. दोनदा तर उचललाच नाही आणि तिसऱ्यांदा cut केला..... " अशी काय करते हि श्वेता.. " संजय मनात बोलत होता. चौथ्यादा त्याने call केला, तेव्हा खूप वेळाने तिने तो उचलला… " Hello.... श्वेता ... Hello.. " पलीकडून काहीच response नाही. " श्वेता... मला माहित आहे कि तू ऐकते आहेस ते... फोन का उचलत नाहीस माझे... ","असचं "," काय असचं ? " ," काही नाही... काय काम होतं... " ," म्हणजे... मी तुला काम असलं तरच call करायचा का... ? सहज call करू शकत नाही... " श्वेता काही बोललीच नाही. " अगं... बोल ना काहीतरी... इतके दिवस झाले , बोलतच नाहीस…. माझ्याशी तरी बोल... काय झालं ते सांगशील का... "," काही नाही झालाय.. " ,"नाही.. आज तुला सांगायलाच लागेल मला , नाहीतर.... नाहीतर तुझ्या घरी येतो आता मी... "," प्लीज संजय… मला त्रास नको देऊस.. ","त्रास.... आणि मला काय मजा वाटते.. एवढी वर्ष आपण एकत्र आहोत... तेव्हा माझा कधी त्रास झाला नव्हता तुला.. ", " तेव्हाची गोष्ट वेगळी होती... ."," आणि आता काय बदललयं... " श्वेता पुन्हा गप्प झाली. " बोल... श्वेता... बोल.. "," तेव्हा आपली friendship होती... "," मग तोडलीस friendship .. " ," नाही.... आता.. " पुन्हा शांतता.... " काय आता श्वेता... " बाहेर पावसाने सुरवात केलेली... " आता...... आता तुझ्यावर प्रेम करू लागली आहे… damn it." श्वेता मोठयाने बोलली आणि फोन cut.... संजय तसाच फोन पकडून उभा... बाहेर पावसाने जोर धरला होता... आकाशात विजांचा तांडव सुरु झालेला, पुन्हा एका नव्या वादळाची चाहूल लागलेली... संजय अजूनही तसाच उभा… confused. काय झालंय,त्याला कळत नव्हतं. तसाच विचार करत तो बाल्कनीत उभा होता. आणि त्याचा फोन वाजला," हा पायल ... बोल.. "," हेलो संजय... उद्या जाणार आहेस का कॉलेजला... तू बोलला होतास ना call करेन म्हणून केलासचं नाही.... "," हं... हो… विसरलो मी जरा... उद्या जाईन बहुतेक कॉलेजला... " ," Wow.. मग मी पण येते…. उद्या भेटू… Bye " पायलने फोन ठेवून दिला. संजय बेडवर येऊन पडला.... पण झोप येईल तर शप्पत… डोक्यात तेच विचार…. श्वेता कशी प्रेम करू शकते माझ्यावर... आम्ही तर चांगले मित्र आहोत… तिचा विचार सुद्धा नाही आला कधी मनात... मग तिच्या मनात कस आलं प्रेमाचं… म्हणून ती पावसात भिजत होती का.. ? विचार करून त्याचं डोक दुखायला लागलं… तसाच तो झोपी गेला. 

             पुढचा दिवस, संजय कॉलेजला जाण्यासाठी निघाला... वर आकाशात काळ्या ढगांची गर्दी होतीच, सोबतीला वाराही होता…. श्वेताकडे जाऊया कि नको… विचार करत होता. न जाण्याचा निर्णय तो कॉलेजमध्ये आला. कॉलेजमध्ये फार कमी संख्या होती मुलांची. त्यातून एक-दोन शिक्षक आलेले फक्त... मग काय, त्यादिवशी सुद्धा कॉलेज बंद.. आलेले student's असेच परत घरी निघाले. संजय घरी जायला निघाला, तसं त्याचं लक्ष दुसऱ्या मजल्यावर गेलं. तिथे श्वेता उभी होती. संजयकडेच पाहत होती. संजयने तिला खालूनच थांबायला सांगितलं आणि तो वर आला. 

           त्यावेळेस तिथे कोणीही नव्हते, फक्त श्वेता आणि संजय… " श्वेता.... काय झालंय तुला.. " श्वेता तशीच बघत होती संजयकडे…. " बोल ना श्वेता... " ," प्रेम झालंय.. " ," मग एवढी वर्ष आपण एकत्र होतो तेव्हा कधी तुला वाटलं नाही.. "," प्रेम कधी सांगून होतं नसतं संजय.. आणि मीही खूप विचार केला. गेले काही दिवस तेच चाललंय डोक्यात माझ्या.. आपलं चांगलं जुळतं, एकमेकांना समजून घेतो आपण.. मग पुढेही आपण एकत्र राहू शकतो ना.." ," श्वेता ..... " संजय रागातच बोलला.. " काय बोलते आहेस तू … तुला तरी कळते आहे का.. ? .. एकमेकांना समजून घेणं हे प्रेम नसतं. " ," म्हणजे मी तुला आवडत नाही असा अर्थ होतो."," आवडणं आणि प्रेम असणं यात खूप फरक आहे श्वेता.. ","ठीक आहे मग... " श्वेता जाताजाता म्हणाली. .... " Friendship कि प्रेम हे तुला ठरवायचं आहे आता... Friendship तर राहिली नाही आता, प्रेम तरी टिकते का ते बघू... "म्हणत ती झपझप निघून गेली. एकदम सडेतोड वाक्य.... तुटली Friendship …. एवढया वर्षांची… प्रेमामुळे… विचार करत करत संजय खाली आला. आणि कॉलेज बाहेर पडला. कुठे जाऊ ते त्याला कळत नव्हतं.… इतक्यात पायल आली…. संजय तसा बाजूलाच उभा होता, त्यामुळे पायलनी त्याला पाहिलं नाही. तशीच ती कॉलेजमध्ये आली तर कॉलेज बंद... watchman काका होते तिथे... " क्या काका.. आजपण कॉलेज बंदच है क्या... ","हा बेटा... तुम्हारे टीचर नही आये है ना कोई इसलिये"," तो अच्छ्या है ना काका... तुम्हाला पण सुट्टी…. आम्हाला पण सुट्टी…. " ," घर जल्दी जाना बेटा... बारीश आनेवाली आहे... " ," अरे काका... पावसाला कोण घाबरता है... पाऊस मै तो मस्त भिजने का... " आणि दोघेही हसायला लागले.... तेव्हा तिला आठवलं अचानक…," अरे काका.... कोणी आलेलं का माझ्या ग्रुपचं... "," हा... वो संजय तो अभी अभी बाहर गया.. ", संजयचं नावं ऐकलं आणि " चलो काका ... Bye. " म्हणत पायल पळालीच. बाहेर येऊन बघते तर संजय असाचं उभा होता एकटाचं... पायलला बरं वाटलं त्याला एकट्याला पाहून... त्याच्याकडे निघाली आणि पावसाने सुरुवात केली. पायलने पटकन छत्री उघडली आणि धावत धावत जाऊन संजयलाही छत्रीत घेतलं. " ये संजय... भिजतोस काय असा.. " संजय त्याच्याच तंद्रीत. " संजय.... संजय " पायलनी त्याचा हात धरून हलवलं त्याला." हं.. हो… काय झालं." संजय जागा झाला. पायल बाजूला उभी आणि तिच्या छत्रीत आहोत हे त्याला नंतर कळलं. " तू कधी आलीस.. ?" ," मी मघाशीच आली, तुझंच लक्ष नाही… आणि श्वेता आलेली का.. " , " श्वेता... ? " संजय पुन्हा विचारात हरवून गेला. मस्त पाऊस पडत होता…. गार वारा, रस्त्याला कोणीच नाही आणि पायल सोबत संजय. मस्त romantic वातावरण. दोघेही हळूहळू चालत होते.... " काय मस्त पाऊस पडत आहे ना… खूप दिवसांनी भेटलो आपण… आणि तू छत्री पण विसरलास वाटते... ये आपण मस्त गरमा गरम कॉफी घेऊया का…. कांदाभजी पण खाऊया... " पायल आपली एकटीच बडबड करत होती. संजय त्याच्या विचारात गढून गेलेला.  

           पायल बोलत होती, संजय विचार करत होता…असचं चालू होतं कितीतरी वेळ. मधेच थांबली पायल… " अरे कुठे लक्ष आहे तुझं. मी एकटीच बोलते आहे.... जाऊया का कॉफी घेयाला.. " ," हं... हो.. नको... नको आज."," चल ना रे संजय... दोघेच तर आहोत.. " ," नको… आज मूड नाही आहे माझा.. " संजय जरा त्रासिक आवाजात म्हणाला. श्वेताच्या tension ने त्याच्या डोक्याचा भुगा केला होता. " ok , मग मी छानसं गाणं म्हणते… मग तुझा मूड चांगला होईल." म्हणत पायल " आला आला वारा... संगे पावसाच्या धारा.. " गाणं म्हणू लागली. " नको… पायल प्लीज.. "," ठीक आहे, दुसरं म्हणते... " म्हणत " सावन बरसे तरसे दिल.. " म्हणायला सुरुवात केली." ," प्लीज… शांत रहा पायल." संजय जरा रागातच म्हणाला. " हे नको… मग तिसरं म्हणते." म्हणत पायल " टीप टीप बरसा पानी.. " म्हणू लागली. आणि संजय मोठ्यानेच ओरडला... "प्लीज पायल.... What's your problem... गप्प रहा जरा.. " पायल दचकली... जोरात वाऱ्याचा झोत आला, तशी पायलची छत्री उडून गेली. दोघेही पावसात भिजू लागले. तेव्हाच वीज कडाडली आणि पायलने संजयला घट्ट मिठी मारली. एकदम फिल्मी सीन…. संजय लगेच भानावर आला आणि त्याने तीची मिठी सोडवली..... " sorry संजय.... भीती वाटली मला.. " पायल लाजत संजयला म्हणाली. संजय अगोदरच tension मध्ये, त्यात पायलची भर पडली. " काय झालंय तुम्हाला, सगळ्यांना... का असे वागत आहात , माझ्याशी… ती नेत्रा , मग श्वेता आणि आता तू.. " ," काही नाही रे .... हा पाऊस आहे ना… तो असाच असतो... त्यातून बघ कसा प्रेमाचा शिडकावा होत असतो…. वेडं करून टाकतो अगदी… असं म्हणतात खरं प्रेम मिळालं कि असा प्रेमाचा पाऊस पडतो." पायल खूषीतच सांगत होती. संजय रागातच होता, त्यात पायलचं असं बोलणं... त्याने तिचे हात पकडले आणि तिला जोरात हलवलं... " जागी हो पायल…. जागी हो… असं फक्त स्वप्नात असते. रियल लाईफ मध्ये फक्त तो पाऊसच असतो…सर्वांना भिजवणारा पाऊस… स्वप्नातून बाहेर ये… " ," पण स्वप्नात तर तूच घेऊन गेलास ना मला… मग बाहेर कशी येऊ.. ? "," काय म्हणायचं तुला.. ? " ," तू वर्णन केलेली तुझी " ती " म्हणजे मीच आहे ना... "," काय अर्थ आहे याचा.. ?"," एवढं पण कळत नाही, माझंही प्रेम आहे तुझ्यावर.. " पायल बोलली आणि जणू काही संजयच्या पायाखालची जमीनचं सरकली. त्याने हातानेच दूर लोटलं तिला. " काय झालं संजय... तुझंही माझ्यावर प्रेम आहे ना.. " एव्हाना पावसाचा जोर वाढला होता.... विजा चमकत होत्या…. आणि संजयच्या मनात घालमेल सुरु झालेली. श्वेता कि पायल... "हो ना संजय... " पायलने पुन्हा विचारलं… " नाही.... माझं तुझ्यावर प्रेम नाही.... " संजय शांतपणे म्हणाला आणि मस्त वीज चमकुन गेली, जणू काही ती पायल वरच हसली होती… " मस्करी करू नको हा... मला माहित आहे…. तुझं माझ्यावर प्रेम आहे ते.. " पायलच्या चेहऱ्याचा रंग बदलला. संजय गप्पच. " बोल ना… संजय.. " ,"एकदा सांगितलं ना.... नाही आहे…. .... नाही आहे…. .... नाही आहे…. " संजय रागातच होता.… ते ऐकून पायलला रडूच आलं.संजय भानावर आला... आपण काहीतरी रागात बोललो त्यामुळे पायल रडत आहे. हे त्याला कळून चुकलं. " sorry... sorry पायल.. मला असं.. " त्याचं बोलणं मधेच थांबवत पायल बोलली… " sorry कशाला.. मीच thank's म्हणते तुला... मला स्वप्नातून जागं केल्याबद्दल ." अशी म्हणाली आणि रडत रडतचं ती धावत निघून गेली... संजय तसाच उभा पावसात... 

           दुसऱ्या दिवशी, पाऊस थांबलेला त्यामुळे कॉलेज सुरु होतं. संजयचं tension कमी झालं नव्हतं, तरी तो आलेला कॉलेजला…. lecture पुन्हा सुरु झालेलं. student's बऱ्यापैकी होते वर्गात. संजयने नजर फिरवली वर्गात… उदय आलेला, नेत्रा तर कॉलेजचं सोडून गेलेली. श्वेता आलेली नाही आणि कालच्या घटनेमुळे पायल येण्याची शक्यता कमी होती. संजयला फार वाईट वाटत होतं, पायलबाबत. पण काय करणार…. डोक्यात एवढे विचार चालू होते कि त्याला काहीच कळत नव्हतं काय करावं ते. आलेलं वादळ निघून गेलं होतं. त्यामुळे पाऊसही जवळपास बंद झाला होता. कॉलेज, practical's, lecture नेहमी सारखे सुरु झाले होते.... Back to normal life... पण यांची Friendship जरा विखुरली होती..... उदय आणि श्वेता बोलायचे... पण संजयशी तेवढं बोलणं व्हायचं नाही. फक्त .... " Hi... Bye... कशी आहेस.. " एवढंच त्याचं संभाषण संपायचं. संजय अजूनही त्याच्या relation बाबत विचार करत होता.. आणि पायल... ती तर हिरमसून गेलेली अगदी... कोणाबरोबर बोलणं नाही, हसणं तर नाहीच. शेवटच्या बेंचवर येऊन बसायची. कॉलेज सुटलं कि तडक बाहेर पडायची, घरी जाण्यासाठी. संजयने एक-दोनदा बोलायचा प्रयन्त केला होता , परंतु ती आलीच नाही समोर त्याच्या. सगळ्यांच्याच तोंडच हसू नाहीसं झालं होतं, Friendship नाहीशी झाली होती. 

            त्यादिवशी, practical's संपल्या,नेहमीप्रमाणे पायल लगेचच निघून गेली… श्वेता आणि उदय , संजयची वाट पाहत थांबले… संजय बाहेर आला तसे तेही निघाले. " उदय... मला जरा note's काढायच्या आहेत. तुम्ही जा पुढे... " संजय उदयला म्हणाला," चल उदय... तो नाही येणार आपल्याबरोबर... " म्हणत श्वेता पुढे निघून गेली. उदयला देखील कळलं होतं कि हे दोघे बोलत नाहीत ते. त्याला तो काही न बोलता निघाला. संजयला त्यांच्याबरोबर जायचंचं नव्हतं. खोटंच बोलला तो. ते दोघे जसे गेट बाहेर गेले, तसा संजय निघाला. आणि मागून आवाज आला," संजय.. थांब जरा... " मागे सायली madam…. " Yes, ma'am... काही काम होतं का... ? " ," तुला वेळ असेल तर जरा बोलायचं होतं.. " संजय विचारात पडला,त्या काय बोलणार ते. " आहे का वेळ.. ","हो…ma'am..बोला.. ","इकडे नको... चल… माझ्या कॅबीनमध्ये." ," ठीक आहे.. चला.. " दोघेही टीचर रूम मध्ये आले."हा, बोला ma'am..आता.. "," खूप दिवसापासून विचारायचं होतं तुला... तुमच्या ग्रुपमध्ये भांडण झाली आहेत का.. " यावर संजय काही बोलला नाही. " काय झालं संजय.. मला उत्तर नाही दिलंस आणि सगळं खरं खरं सांगायचं मला... " ," काय सांगू ma'am..सगळी tension माझ्याचं डोक्यावर आहेत असं वाटते... " ," म्हणून तुझं आजकाल लक्ष नसते lecture आणि practical मध्ये… मला सांग, काही tension आहे का.... " संजयला कुठून सुरुवात करावी ते कळत नव्हतं. "हि सगळी चुकी माझी आहे ma'am..त्यादिवशी मी मनातलं सांगितलं नसतं तर हे सगळं confusion झालंच नसतं." ," काय confusion आहे .. ? " ," नेत्राने कॉलेज सोडलं.. का तर माझ्या मनात तिला जागा नाही... उदयचं श्वेतावर प्रेम आहे, श्वेताचं माझ्यावर प्रेम आहे आणि पायलला वाटते,…. माझं तिच्यावर प्रेम आहे…. श्वेता म्हणते... Friendship कि प्रेम... याची निवड तू कर.. तिकडे उदय तिच्यासाठी काहीही करायला तयार आहे.. पायलला तर स्वप्नातून बाहेरच पडायचं नसते. " ," मग.... तुझं काय मत आहे .? " ," श्वेतावर कसा प्रेम करू शकतो मी.. ती तर माझी Best Friend आहे… आणि उदयचं काय करू... त्याला सांगू तिच्या आयुष्यातून निघून जा... पायलचे तर मी स्वप्नाचं जगच मी नष्ट केलं आहे, जवळपास. पाहिलत ना तुम्ही कशी असते ती आता… वेडा होणार आहे मी." संजय डोकं पकडून बसला होता.…. खूप वेळानंतर सायली madam बोलल्या. " एक सांगू का संजय… प्रेम हे जबरदस्ती कोणावर केलं जात नाही रे.. … श्वेता आणि तू चांगले मित्र आहात. श्वेताचं असं वागणं मलाही खटकलं जरा. उदयला मी observe केलं आहे. खूप काळजी घेतो तिची तो.…. तुम्ही बोलायचं बंद झाल्यापासून तर जास्तच. प्रेम हे मनापासून केलं जातं…. माझ्याही मनात जोडीदाराची एक संकल्पना होती, परंतु माझं arranged marriage झालं आणि मनातल्या आशा-आकांशा राहून गेल्या.तुला बघितलं तेव्हा मला तू आवडला होतास. पण याचा अर्थ असा नाही कि तुही माझ्यावर प्रेम करावसं, बरोबर ना.. " संजय ऐकत होता," मी कधीकधी उगाचच तुझ्याबरोबर बोलण्याचा प्रयन्त करते , ते माझ्या मनाला चांगलं वाटते म्हणून... त्याच्यापुढे काही नाही मनात माझ्या… प्रेमाचा अर्थचं बदलून जातो अगदी. प्रेमात कोणताही स्वार्थ नसावा. खरी गोष्ट सांगू... तू जेव्हा तुझ्या मनातली " ती " चं वर्णन केलंस ना…. तेव्हा माझ्या डोळ्यासमोर एकच चेहरा होता… " पायल " चा.. " संजय ऐकतचं राहिला. " हा संजय... अगदी सगळं वर्णन तंतोतंत बरोबर नसलं तरी बहुतेक वर्णन हे पायलला शोभेल अस होतं. तिलाही तू पहिल्यापासून आवडायचास ना... श्वेता आणि नेत्रा... तुझ्या वर्णनात कुठेच बसत नाहीत. " बोलता बोलता madam उठल्या. " निर्णय तुझ्यावर आहे संजय… मला वाटते तू श्वेता बरोबर एकदा बोलायला हवंस... जीवनात काही जणांना त्यांच्या मनासारखं कधीच मिळत नाही, तुझ्यासमोर जे काही आहे … ते तू सोडू नकोस, असं माझं म्हणणं आहे… बाकी निर्णय तूच घेणार आहेस… Bye ." म्हणत सायली madam निघून गेल्या. संजयलाही थोडं हलकं वाटतं होतं. श्वेता सोबत बोलायला हवं हा निर्णय पक्का केला आणि संजय घरी परतला.

               संध्याकाळी, संजयने श्वेताला फोन केला.. " Hello, श्वेता... " ," हं… बोलतेय... " ," आहेस का घरी… जरा बोलायचे होते, तुझ्याशी.. " ," हो… आहे घरी... ये.. " म्हणत श्वेताने call cut केला. अगदी लगेच नाही परंतु एका तासाने संजय श्वेताच्या घरी गेला.. दारावरची बेल वाजवली तेव्हा तिच्या आईनेच दरवाजा  उघडला. " हा ये संजय... " ," काकू…. श्वेता घरात आहे कि गेली बाहेर.. ", " अरे आहे बघ.. तुझीच वाट बघते आहे, गच्चीवर आहे बहुदा.. " ,"Thanks काकू.. " म्हणत संजय गच्चीवर आला. संध्याकाळचे ५.३० - ६ वाजले होते. पावसाचे दिवस त्यामुळे हवेत थंडावा होता. जरा वारा सुटला होता आणि श्वेता त्यांच्या घरासमोर असलेल्या झाडाकडे टक लावून पाहत होती... " श्वेता.. "संजयने तिला हाक मारली. तिने संजयला पाहिलं, तोंडावर बोट ठेवून शांत राहायला सांगितलं आणि हाताने इशारा करून बोलावले. संजय गेला तिच्या जवळ... " काय…?" संजयने हळू आवाजात विचारले. श्वेताने झाडाकडे बोट दाखवलं. चिमणी तिच्या पिल्लांना खाऊ भरवत होती. छान देखावा होता. चिमणी जशी उडून गेली, तेव्हा श्वेताने संजयला विचारलं," काही बोलायचं होतं तुला.. " संजय अजून त्या घरट्याकडे पाहत होता… थोडयावेळाने संजय बोलला," ये... तुला आठवते आहे का गं, तुझी एक मैत्रीण होती तिसरीत... तोंड एवढंसं होतं…. चिमणी म्हणायचे सगळे तिला... " ," हो.. हो.. , आठवलं आणि एकदा तर मला तिचा राग आलेला तेव्हा तिचा डबाच तोडला होता.. "," का.. गं " ," असंच.. मी चिमणी म्हणते म्हणून मला कावळा बोलली होती… मग काय तोडला डबा.. " ,"आणि घरी येउन काकांचा मार खाल्ला होता." तसे दोघेही हसले. " अरे हो... कालच तुझी जुनी मैत्रीण उषा भेटली होती…. Art's ला आहे ती… भेटते कि नाही तुला.. " संजय म्हणाला ," नाही रे… नाही भेटत ती आता… विसरली मला... " ," तिची गंमत आठवते तुला… मी एकदा तू समजून तिच्याच पाठीत धपाटा मारला होता… " ," हो आणि मी तुझ्या पाठीत... " दोघेही हसले. " तो प्रकाश आठवतो का ? तुझ्या मागे मागे असायचा शाळेत... " ," त्याला कसं विसरीन, माझ्या हाताचा मार खाणारा पहिलाच मुलगा तो... आणि ती होती ना, संगीता…. मला सारखी सांगायची, संजयशी मैत्री करून दे… मी बोलली जा उडत.. " ," हो हो आठवलं.... तुझं एक सिक्रेट माहित आहे मला. ते सांगितलं नाही घरी तुझ्या…. पैसे चोरून एकदा तू सिगरेट ओढली होतीस, शाळेत असताना." , " हो… आणि तुला माझी शप्पत घातली होती… आठवलं." श्वेता म्हणाली. " तुमचा छान ग्रुप होता ना... शाळेत, किती जणी होतात …. सहा जणी .. " ," हो पण आता वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. " ," तुला शाळेतली आठवीतली पिकनिक आठवते आहे... तुमच्या सहा जणींचे बुट लपवले होते कोणीतरी.. "," ते कसं विसरणार.... किती रडलो होतो आम्ही.. पण लगेच आणून दिले होते कोणीतरी दुसऱ्या दिवशी. " ,"आणि सेंड ऑफ चा दिवस आहे का लक्षात.. " ," आहे मग... " ," तुझी best friend दीपा, अगदी मिठी मारून रडत होती तुला.. " ,"हो रे …. खरच छान दिवस होते ते... " थोडावेळ तसाच गेला. " ये तुला ११वीतली गोष्ट आठवते आहे का… तुझी नवीनच friendship झालेली, त्या मोहित बरोबर आणि त्याने तुला propose केल होतं... "," बघ ना... चार दिवस झालेले …. friendship करून आणि लगेच propose…. Friend होता म्हणून मारलं नाही त्याला तेव्हा... " ," मला माहित आहे... तू त्याला नंतर थोबाडीत मारली होतीस ते... " ," जाऊ दे रे…. तो नंतर कुठे आला समोर… " श्वेता म्हणाली."तुझी अजून एक मैत्रीण होती ना , १२ वीला. काय नावं होतं तिचा… " ,"हा... हो… नम्रता… तिचं काय " ," तिचं बाहेर लफडं होतं ते माहित होतं मला.. "," हो... मग मला का नाही सांगितलं कधी तू ? " ," अगं, तिने शप्पत घातली ना तुझी.. म्हणून सांगितलं नाही... त्याच्याच कॉलेजला तिने आता , १३वीला admission घेतलं आहे."," असा होय.. लबाडा... मला कळू दिलंस नाही कधी.. " म्हणत तिने संजयच्या डोक्यावर टपली मारली. खूप दिवसांनी ते गप्पा मारत होते..... मनापासून हसत होते. " काय रे.. बऱ्याच दिवसांनी शाळेतल्या आठवणी काढल्यास... " श्वेता म्हणाली. " हो... असंच वाटलं म्हणून... " संजय म्हणाला.. मग थोडावेळ गेला…. दोघेही शांत... श्वेता बऱ्याच दिवसांनी tension free वाटत होती. " एक विचारू का श्वेता…?" संजय तिच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाला." विचार ना… " , " मी मघापासून तुझ्या सगळ्या जुन्या आठवणी काढल्या…. तुझ्या शाळेतल्या Best Friends ची नावं सांगितली.…. माझ्या एका तरी मित्राचं नावं तुला आठवते का आता... ? " श्वेता विचार करू लागली. " नाही रे.. "," निदान... ११ वी, १२ वी मधले मित्र, एखादी आठवण.. " श्वेता मेंदूवर जोर देऊन आठवत होती... " नाहीच आठवत असं काही.. ". 

               " ह्या वरून काही कळलं का तुला.. ?", संजय म्हणाला. " काय ते ? " श्वेताच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं. " पहिल्यापासून तू स्वतःच्याचं जगात हरवलेली असायचीस…. माझं जीवन, माझे friends, माझ्या आठवणी… बस्स. दुसरीकडे कधी लक्षचं नाही दिलंस तू... स्वतःला नेहमी तू मोठ्ठ समजत आलीस… आपल्या वागण्याने, बोलण्याने… समोरच्यावर काय परिणाम होतो, त्याचा कधी विचार केलास का... ? " श्वेताने मानेनेच नकार दिला. " तरी प्रत्येक वेळेस मी तुझ्या सोबत राहिलो… एक सच्चा मित्र म्हणून.… सुरुवातीला मलाही तशीच treatment मिळाली तुझ्याकडून… पण नंतर मी तुझा मित्र झालो. Best Friend तर कधीच नव्हतो ना तुझा,…. शाळेतले Best Friend, कॉलेजमधले Best Friend होते तुझे… त्यात मी कधीचं नव्हतो… प्रत्येक वेळेस तुझ्या पाठीशी उभा राहिलो, सावली सारखा… तुझ्या प्रमाणे मी माझ्या आवडी-निवडी बदलल्या… " संजय श्वेताकडे पाहत म्हणाला… आभाळात जरा ढगांची पुन्हा गर्दी होऊ लागली होती… " ये श्वेता …. तुला आठवतेय का… शाळेत असताना एकदा मी पावसात भिजत होतो, तेव्हा तू मला बोलली होतीस कि तुला आवडत नाही पाऊस... आठवलं... तेव्हा पासून मीही भिजत नाही पावसात... कारण माझ्या Best Friend ला म्हणजे तुला पाऊस आवडत नाही... एवढं करूनही, तू बोलतेस Friendship नाही राहिली आता... " संजय जरासं उगाचच हसत म्हणाला.… वारा पुन्हा सुरु झाला होता. संजय दुसरीकडेच कुठेतरी पाहत होता, श्वेता मान खाली करून उभी होती.." ती... ती पायल…. बोलते, तुझ्यावर प्रेम आहे…. नाही... नाहीच बोललो तिला, मनात नसताना… मलाही ती आवडते, तरीसुद्धा नाही बोललो मी तिला... का... का तर माझी Best Friend माझ्या प्रेमात पडलीय… रडवलंचं त्यादिवशी मी पायलला... कोणाची चुकी होती यात... त्या पायलचीचं चूक होती... विचारून प्रेम करायचं ना तिने... मग रडणं, फुगणं आलचं नसतं तिच्या वाटयाला.. " पुन्हा पावसाचं वातावरण निर्माण झालं होतं.... " श्वेता... तू तुझ्याचं जगात आहेस अजून,…. एवढंच काय... तुझा वाढदिवस दरवर्षी मोठया धडाक्यात साजरा करतो मी… माझ्या वाढदिवस तर तुझ्या लक्षातच नाही ना… शाळेपासून एकदाही तुला विचारावंसं वाटलं नाही कि तुझा Birthday कधी असतो ते.. " श्वेताकडे शब्दचं नव्हते. " जाऊ दे… तू अजूनही " मी , माझं आणि मला " या त्रिकोणी जगात वावरतेस…. त्यातून बाहेर पड. आपली Friendship टिकवणं तुझ्या हातात आहे आता... मीच होतो तुझ्यासाठी प्रत्येक वेळेस.... पण तू माझ्यासाठी कधीच नव्हतीस गं... Friendship कि प्रेम , आता तुझ्या हातात आहे. ज्याची निवड करशील ते मला मान्य आहे. चल , निघतो मी… Bye… " आणि संजय निघाला, पुन्हा पाऊस... श्वेता पुन्हा भिजत होती पावसात...

                   पुढचा दिवस , …. श्वेता नेहमीप्रमाणे कॉलेजला आलेली… संजय मात्र आलेला नाही. उदय आलेला. lecture सुरु होती नेहमी सारखी…. श्वेताने हळूच शेवटच्या बेंचवर नजर टाकली, पायल होती बसलेली तिथे…. एकटीच. चेहरा कोमेजलेल्या फुलासारखा… श्वेताला जरा वाईटच वाटलं. पुढच्या दिवशी, संजय आलाच नाही कॉलेजला… श्वेताने माहिती काढली तर कळलं, त्याचं काही काम होतं म्हणून तो आला नाही २ दिवस कॉलेजला. त्यादिवशी एक lecture ऑफ होता. सगळे मग निघाले वर्गाबाहेर. श्वेता उदयसोबत बाहेर निघाली, तर तिचं लक्ष पायलकडे गेलं... " उदय... तू हो पुढे... मी येते नंतर.. " ," ok.. " म्हणत उदय निघून गेला. ती पायल जवळ आली.. " Hi पायल.. ","Hi… " पायल उसनं हसू चेहऱ्यावर आणत म्हणाली. " बोलू का तुझ्याशी जरा.. ", पायल "हो" म्हणाली आणि दोघी गप्पा मारू लागल्या, बऱ्याच दिवसांनी. 

                 संजय तीन दिवसांनी कॉलेजला आलेला. तिन्ही दिवस त्याने पायलला call करण्याचा प्रयन्त केलेला, पण तिने तो उचललाच नाही. lecture सुरु झाले आणि संपले… Practicals ला जाणार तर काही कारणात्सव रद्द केलेल्या होत्या…. सगळेच घरी निघाले. पायल नेहमीप्रमाणे आधीच निघून गेली,संजयने तिला अडवण्या अगोदर... संजय नाराज झाला जरा.... तसाच तो कॉलेजच्या बाहेर आला. आभाळ तर सकाळपासून काळवंडलेले होते, कधीचा भरून राहिलेला पाऊस.…. वर पाहत पाहत चाललेला संजय… आणि समोर बघतो तर श्वेता उभी… " Hi संजय.. " , " Hi श्वेता.. " ," थांबशील जरा... " संजय नाईलाजास्तव थांबला. " काही नाही रे... विचार केला खूप... प्रेम नाहीच जमत आपल्याला, त्यापेक्षा Friendship बरी... आणि मी काही त्याग वगैरे करत नाही हा.... तू सुद्धा उगाच मोठेपणा करू नकोस… समजलं ना.. पायल सोबत बोलणं झालं माझं... कशाला रडवलंसं रे तिला.. मनात होतं ना... तर म्हणे, माझी Best Friend माझ्या प्रेमात आहे... , साल्या filmy dialogue… हा.. " म्हणत तिने संजयच्या पोटात गुच्चा मारला. संजय बघतच राहिला तिच्याकडे. श्वेता पहिल्यासारखी वागत होती.. " त्या दिवशी एवढं lecture ऐकलं ना तुझं... कान जरा मोकळे झाले… आणि डोकंही... पायलचं prefect आहे तुला... मी तर उगाच म्हणत होते रे... माझी अक्कल जरा कमी पडली, ठीक आहे ना, लवकर शहाणंपण आलं ते... असो... Friendship च बरी बाब्बा... " संजय हसायला लागला. " जा... ती पायल आहे बघ तिकडे... तिला थांबवलं मघाशी मी... ती बघ समोर बसली आहे.. " संजयने पाहिलं तर समोरच एका बेंच वर पायल पाठमोरी बसली होती. " Thank You … श्वेता... " संजयने तिला मिठी मारली.. "जा लवकर.... आणि वेळ मिळाला तर तुझा बर्थडे कधी असतो ते सांग.... यावर्षी मोठ्ठी पार्टी करूया... " संजय हसला आणि धावतच पायलकडे पोहोचला. एव्हाना पाऊस चांगलाच धरलेला होता... कोणत्याही क्षणी सुरुवात करणार असं वातावरण होतं.

               संजय पायल समोर येऊन उभा राहिला... पायलने संजयकडे पाहिलं, तिच्या डोळ्यात अश्रू जमा झालेले. पावसाने सुरुवात केली... " या पावसाचं एक बरं असते ना… पायल.. कोणी रडत असलं तरी ते दिसतं नाही पावसात.. " दोघे तसेच होते भिजत पावसात... पायल काहीच बोलली नाही. संजयने आपला हात पुढे केला… " चल.. " पायलचा no response... " चल पायल... " ," कुठे.. ? " ," तुला पुन्हा स्वप्नात घेऊन जायला आलो आहे... "," म्हणजे.. ? " पायल उभी राहिली… " वेडीचं आहेस तू... " त्याने टपली मारली... " माझ्या मनातली " ती " म्हणजे तूच आहेस... माझंही तुझावर प्रेम आहे… येडपट.. " पायल हसायला लागली. वीज चमकली तशी पायलने संजयला घट्ट मिठी मारली.. "काय गं... आजपण भीती वाटते का वीजेची... " संजय हसत म्हणाला... " आता कशाला घाबरू... तू आहेस ना सोबत आता.. " आणि ते तसेच भिजत राहिले पावसात…. खरं प्रेम मिळालेलं दोघानाही... खऱ्या अर्थाने आज पावसाला सुरुवात झालेली. 

             श्वेता त्यांना दुरूनच पाहत होती.... तिच्याही डोळ्यात आनंदाश्रू आले,… तीसुद्धा तशीच भिजत होती पावसात. अचानक, कोणीतरी तिच्या डोक्यावर छत्री धरली… बघते तर उदय होता… " काय गं... तुला तर आवडत नाही ना पाऊस... मग पावसात कशी भिजत आहेस... ? " उदयला पाहून ती हसली… " तू भिजलास का कधी पावसात... ? " ," नाही गं... तुला आवडत नाही म्हणून मी सुद्धा... " उदय बोलता बोलता थांबला. श्वेताने हाताने छत्री बाजूला केली… " मग आज भिजून बघ, कसं वाटते ते पावसात... " उदय भिजू लागला पावसात... डोळे मिटून भिजण्याचा आनंद घेत होता तो... श्वेताने एक नजर टाकली , पायल आणि संजय कडे. ते दोघे अजूनही तसेच भिजत होते, एकत्र... जराशी हसली श्वेता... उदयकडे पाहिलं तिने… त्याचा हात पकडला आणि " चल.. " म्हणाली. उदय हसला... दोघेही एकमेकांचा हात पकडून चालत होते, भर पावसात.... प्रेमाच्या पावसात................

---------------------------------------------The End-------------------------------------------------

Monday, 23 June 2014

रेशीमगाठी...... ? ( भाग १)

              " Hello.....Hello....." पलीकडून काहीच response नाही....." Hello.....Hello.....संज्या....Hello...."," हा.... संजय बोलतोय आपण कोण .... ?" संजय डोळे चोळत उठला… अजूनही त्याची झोप उडाली नव्हती.... " साल्या संज्या..... तुझी सासू बोलतेय... ऊठ... अजून झोपला आहेस... ", त्या आवाजाने संजयची झोप उडाली... " आयला.... तू होय.... काय एवढया सकाळ- सकाळी call केलास... "," गाढवा.... सकाळ- सकाळी ? कूठल्या जगात आहेस तू... ११ वाजले आहेत सकाळचे.... कधीपासून तुला mobile वर call करते आहे मी... कुठे मेला होतास... ... " , " अगं... mobile ... silent वर होता ना …. sorry आणि thanks ... मला उठवण्यासाठी... बरं ... कशाला call केलास ?... " संजय आळस देत म्हणाला... "अबे..... आज आपलं १३ वीचं admission आहे.... विसरलास ना.... यायचं असेल तर ये…. आणि येताना त्या mobile ची पूजा घालून ये.... म्हणे silent वर होता.... मी घेते आहे admission... " असं म्हणत तिने call cut केला... त्याचबरोबर संजयची झोप उडाली... admission.... बापरे... विसरलो कसा.... पटापट त्याने तयारी केली... १२वीचा result, काही महत्त्वाची कागदपत्रे कशीबशी गोळा केली आणि धावाधाव करत संजय कॉलेजमध्ये पोहोचला... घामाघूम अगदी...बघतो तर केवढी मोठी रांग admission ला... पण त्याला त्याची पर्वा नव्हती... तो कोणाला तरी शोधत होता... अखेर , कॅम्पसच्या एका कोपऱ्यात, झाडाखाली त्याला ती बसलेली दिसली. 

                संजय तिच्या जवळ गेला. " किती शोधलं तुला..... आणि तू इकडे येऊन बसली आहेस... " ती काही बोललीच नाही... संजय तिच्याकडे बघत होता. कोणतीच reaction नाही.संजयला काय बोलावं ते आठवतच नव्हतं. रागावलेली ती त्याच्यावर.... " admission घेतलंस वाटतं.. ?" संजय काहीतरी बोलावं म्हणून बोलला.. तशी तिने त्याच्या डोक्यात टपली मारली. आणि म्हणाली," मी एकटीच घेऊ का admission.... तुला नाही घ्यायचं वाटते... " तसा संजय हसायला लागला... " साल्या.... लाईन बघितलीस केवढी आहे ती.... आज तुला भेटणारच नाही admission... मग मी कशी घेणार admission... मग वेगवेगळ्या वर्गात जावं लागेल आपल्याला... आणि मग माझा अभ्यास , प्रोजेक्ट कोण पूर्ण करून देणार मला... तुझा काका.. ?" संजय सारखा हसतच होता.. " काय झालं रे इतकं हसायला तुला.. ?" पोटात गुच्चा मारत ती म्हणाली," काही नाही गं..." संजय हसू आवरत म्हणाला,"तुला जेव्हा राग येतो ना... तेव्हा तुझ नाक... लाल बुंद होते... टोमेटो सारखं.. " आणि पुन्हा तो हसायला लागला... त्यावर ती अजूनच रागावली. 

            " श्वेता.... श्वेता.. " लांबून उदय हाका मारत आला. आता हा कशाला आला इथे.... " श्वेता रागातच बडबडत म्हणाली.... ..........." श्वेता.... श्वेता.... इकडे काय करते आहेस गं.. " उदय धावतच आला... " काही नाही... कांदा भजी तळते आहे.... खाणार का.. ? " तसा उदय नाराज झाला आणि आल्या पावली निघून गेला." काय गं... तुझ्यासाठी एवढा तो धावत धावत आला आणि त्याला झिडकारून लावलंस... कसं वाटलं असेल तुझ्या Boy-friend ला.. " ," साल्या संजय... तो त्याचं लायकीचा आहे.. आणि Boy-friend वगैरे काय रे…तसला Boy-friend असेल तर जीव नाही देणार मी ? " ," तू आणि जीव देणार... मग बघायलाच नको... " , " बस झालं आता संज्या..... आणि उद्या वेळेवर ये admission ला… नाहीतर मी घेते admission आणि तू जा उडत... " असं म्हणत श्वेता तरातरा निघून गेली. संजय तसाच तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत उभा होता.. " संजय... " मागून आवाज आला.. मागे नेत्रा उभी होती... " Hi... खूप दिवसांनी.... होतीस कुठे... ? " ," मी तर इकडेच असते रे... पण तुझं कुठे लक्ष असते आमच्याकडे.." संजय जरासा बावरला.... " घेतलंस का admission तू .... संजय ? " नेत्राचा पुढचा प्रश्न... " नाही गं.... लेट झाला ना मला आणि लाईन केवढी आहे बघ... उद्या घेतो ना admission... "," म्हणजे श्वेताने सुद्धा घेतलं नसेल admission... " त्यावर संजय काही बोलला नाही. " बरं, आता काय करतो आहेस.. खूप दिवस झाले कुठे फिरायला गेलो नाही आपण... चल ना आज जाऊया... " म्हणत नेत्राने संजयचा हात पकडला.. " ठीक आहे.. पण पहिली मी आंघोळ करून येऊ का ... घाई घाईत आंघोळ राहिली माझी.. " ," शी..... !.. घाणेरडा... Darty boy... अजून आंघोळ नाही केलीस तू.. "असं म्हणत नेत्राने संजयला दूर लोटलं... " संजयला माहित होतं कि नेत्राला स्वच्छता खूप आवडते ते ,म्हणून तो पुढे म्हणाला ," ठीक आहे मग.. आंघोळ नंतर करतो ... आपण आताच जाऊया फिरायला. चल. " अस म्हणत संजय नेत्राचा हात पकडायला गेला.. " शी... तूच जा फिरायला... घाणेरड्या... "आणि नेत्रा पळतच गेली. " चला... आता आपण सुद्धा पळूया, नाहीतर दुसरं कोणीतरी येईल.. " संजय घरी परतला. 

            संजय आणि श्वेता... दोघेही शाळेपासूनचे मित्र... एकाच वर्गातले.. पण एकाच बेंचवर नाही बसायचे. मैत्रीचं कारण.... दोघांची घरे तेव्हा आजूबाजूला होती त्यामुळे शाळेत एकत्र येणं- जाणं असायचं... त्यातूनच त्यांची मैत्री झाली होती. नंतर मात्र श्वेताच्या कुटुंबाने घर बदललं... पण श्वेताने शाळा मात्र बदलली नाही... म्हणून त्यांची मैत्री तशीच टिकून राहिली... शाळा सुटल्यावर वेगळं होण्याची वेळ आली... तरीही दोघांनी एकाच college मध्ये admission घ्यायचं ठरवलं. प्रोब्लेम होता कुठे admission घ्यायचा तो... संजयला science मध्ये इंटरेस्ट होता तर श्वेताला Arts ला जायचं होतं... तरी दोघांना १०वीला ८० % होते, त्यामुळे कोठेही admission मिळालं असतं... शेवटी श्वेताने स्वःतचं मन मारून science ला admission घेतलं, एका अटीवर…. प्रोजेक्ट, अभ्यास पूर्ण करायला मदत करायची... संजयला ते मान्य होतं... आता दोघेही १३वी ला होते. 

           चांगले मित्र असले तरीही स्वभाव दोन टोकाचे होते. संजय आपला शांत, संयमी, प्रत्येक गोष्ठीचा विचार करणारा, साधा सरळ स्वभावाचा... त्याच्या सगळ्या गोष्ठी कश्या एकदम perfect असायच्या. सगळी काम शांत डोक्याने करायचा. त्या उलट होती श्वेता... बडबडी, बिनधास्त,नेहमी घाईत असणारी. कोणालाही न घाबरणारी,पण तेवढीच प्रेमळ आणि मायाळू होती. कोणालाही त्रास होताना तिला बघवत नसायचे, त्यामुळे प्रत्येक वेळेस तिला कोणीतरी emotional blackmail करायचं आणि ती लगेच मदत करायला तयार असायची. अगदी प्रत्येक वेळेस नाही कारण संजय तिच्या बरोबर नेहमी असायचा. तो कधी कधी श्वेताला सांभाळून घ्यायचा. त्याने तिला किती वेळा सांगितलं होतं कि तुझी बोलण्याची style बदलं, जरा मुलींसारखं वागायचा प्रयन्त कर... पण नाही... तिला ते पसंतच नव्हतं.. " मला वागायचं असेल तसं वागेन मी." हाच तिचा attitude असायचा. संजयला ते कधीकधी आवडायचं नाही , पण उदयला मात्र ते सगळ आवडायचं . तिची बोलण्याची style, तिचा बिनधास्तपणा.... अगदी ११वीला असल्यापासून उदयला ती आवडायची. परंतू तिच्यासमोर बोलणार कसा... श्वेताला तो मुळीच आवडायचा नाही… एकदा तर रागात उदयच्या थोबाडीतही मारली होती श्वेताने आणि लगेच sorry ही बोलली होती... तरीही उदय काहीतरी कारण काढून तिच्याशी बोलायला यायचा... तो बोलायला आला कि श्वेता तिथून पळून जायची... उदयला माहित होतं कि संजय तिचा Best friend आहे. म्हणून त्याने संजयशी दोस्ती वाढवली होती.

           संजयनी उदय बरोबर मैत्री केली, पण स्वतःच्या मागे ब्याद लावून घेतली. ती म्हणजे उदयची बहिण नेत्रा... संजय तसा दिसायला चांगला होता, तरीदेखील कोणत्याही मुलीने त्याला प्रेमळ नजरेने पाहिलं नव्हतं कधी… त्याचं कारणही तसंच होतं.. "श्वेता"... संजयचा स्वभाव कसा सगळ्यांना मदत करणारा होता.. समोरच्या बरोबर नेहमी हसून-बोलून असायचा.त्याच्या डाव्या गालावर पडणारी खळी बघायला खूप मुलींना आवडायचं परंतु श्वेता बरोबर असली कि कोणाची हिंमत आहे,संजयला " Hi" म्हणायची....  नेत्रा मात्र वेगळंच रसायन होती..... तिने Direct श्वेता बरोबरच मैत्री केली. श्वेताला ती कधीच आवडायची नाही.. एक-दोनदा मदत केली असल्याने श्वेता तिच्या सोबत अशीच बोलायची, मनात नसलं तरी... नेत्रा जरा " मॉड " मुलगी होती, मराठी असूनही मराठी कमीच बोलायची. आणि बोलायची तेव्हा मराठीत इंग्लिश कि इंग्लिश मध्ये मराठी तेच कळायचं नाही. महागातले कपडे, पर्स, sandals…. अगदी श्रीमंतीचा देखावा करायची… टापटीपपणा, स्वच्छता, कसं वागायचं हे कोणी नेत्राकडून शिकावं… या सगळ्या गोष्टीमुळे श्वेता , नेत्रापासून थोडी लांबच राहायची. नेत्राने सुद्धा संजयच्या जवळ येण्यासाठी श्वेताशी Friendship केली होती. श्वेताचं बिनधास्त राहणं, कसंही आणि काहीही बोलणं, शिव्या देणं आणि सर्वात शेवटी... तिची राहण्याची स्टाईल खटकायची. पण संजयकडे बघून ती सगळं खपवून घ्यायची…. अर्थात नेत्राच्या मनात काय आहे ते संजयला ठावूक होतं, त्यामुळे तो नेत्राला तसा " ओळखून " होता. तर अशी होती चौकडी…. चार टोकांचे स्वभाव. तरीही एकत्र असायचे. चौघात एक पाचवा "कोन" ही होता. त्या सर्वापासून वेगळी अशी .. "पायल"…. शांत स्वभावाची, हसरी, साधी,सोपी,सरळ, जराशी चंचल, मधेच रागावणारी, पण नंतर लगेच हसणारी, मनमिळावू ..... जराशी सावळी, जराशी खोडकर होती पायल.... उंची जेमतेम होत. शरीरयष्ठी जराशी गोंडस, गोबरे गाल... जणू काही दोन गुलाबचं  ... सगळ्यांना तिच्या गालांना हात लावायचा मोह व्हायचा. सदैव हसत असली तरी हलकीशी smile देणारी.... छान वारा वाहत असेल तरच केस मोकळे सोडणारी..... आणि कोणाची नजर लागू नये म्हणून कपाळावर उगाचच छोटीशी काळी टिकली लावणारी..... " पायल ". समोरची व्यक्ती ओळखीची असो वा अनोखळी, लगेचच मैत्री व्हायची तिची... सगळ्या कॉलेजशी मैत्री होती तिच्याशी.... कॉलेजमधील संपूर्ण शिक्षकवर्ग तिला ओळखायचा. एखादं दिवशी पायल कॉलेजमध्ये आली नाही तर सगळ्यांनाच चुकचुकल्या सारखं वाटायचं. अशी होती "पायल"…. पायलची सगळ्यांबरोबर मैत्री होती. मात्र या "चौघां" सोबत जरा जास्त ओळख होती…. नेत्राप्रमाणे पायललाही संजय आवडायचा. पण तिने त्यासाठी उगाचच श्वेता बरोबर मैत्री केली नाही. उलट श्वेतानेच पुढे होऊन मैत्रीचा हात पुढे केला होता. तेव्हापासून श्वेता,संजय आणि पायल यांची घट्ट मैत्री होती. त्यात उदय आणि नेत्रा हे भाऊ-बहिण " आगंतुक पाहुण्या " सारखे होते... ज्यांना तिथे कोणी भावही देत नव्हतं आणि पसंतही करत नव्हतं. श्वेता आणि संजय तर शाळेपासून एकत्र होते. पायल त्यांच्यासोबत ११वी पासून होती. त्याच्या मैत्रीचं तिसरं वर्ष होतं. 

           पायलने तर सर्वात आधी admission घेतलं होतं. श्वेताने संजयसाठी admission उशिराने घेतलं. नेत्रा आणि उदय यांचही रीतसर admission झालं..... आणि एकदाचं कॉलेज सुरु झालं...... कॉलेजचा पहिला दिवस..... अर्थातच पावसाळ्यातला.... त्यादिवशीही छान पाऊस पडत होता. पाच जणांपैकी फक्त दोघांनाच पाऊस आवडायचा,संजय आणि पायलला.... पायल कधी कधी कविता करायची म्हणून तिला पावसाळी वातावरण romantic वाटायचं. संजय तर लहानपणापासूनच पावसाचा fan होता. पावसामुळे होणारी चिखल, घाण हे नेत्राला आवडायचं नाही. म्हणजेच चिखलाच कारण असलेला पाऊस तिला पसंत नव्हता. पावसामुळे तिचे sandal , कपडे खराब व्हायचे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेकअप खराब व्हायचा तिचा.... श्वेताला तसा काही प्रोब्लेम नव्हता पावसाचा, पण ऐनवेळी पाऊस येऊन भिजायला होणं, तिला आवडायचं नाही. उगाचचं कुठेतरी थांबून राहावं लागे तिला... कधी कधी तर कॉलेजलाही यायची नाही, मग संजय तिला जबरदस्ती कॉलेजमध्ये घेऊन यायचा भर पावसात.... श्वेताला पाऊस आवडत नाही म्हणून उदयला सुद्धा पाऊस आवडेनासा झाला होता... का तर तिला जे आवडणार नाही त्यावर तोही बहिष्कार टाकणार... बाकी काही विचार जुळले नाहीत तरी पाऊस हा फसव्या असतो , हेच दोघांचे मत होतं. 

           तर पहिला दिवस कॉलेजचा, पाऊस कोसळतोय…. थंडगार हवा... नवीन नवीन छत्र्या बाहेर पडलेल्या... एकदम फिल्मी वातावरण. पायल तर सर्वात पहिली येऊन पोहोचली होती.... " अरे... पायल, इतनी जल्दी क्यू आयी.... अभी तो कोई आया भी नही... अकेले क्या करोगी." watchman काकांनी विचारलं... " काही नाही करूंगी.. कोणी आलं नाहीतर... अकेले अकेलेच भिजणे के लिये जाऊंगी. " पायल मुद्दाम मराठी मिश्रीत हिंदी बोलायची, ते watchman काकांना सुद्धा आवडायचं. पायल असं बोलली आणि दोघेही हसायला लागले. इतक्यात, समोरून संजयची Entry झाली,.... श्वेता बरोबर.ते पाहून पायलला तर अजूनच हसायला आलं. एवढी बिनधास्त मुलगी… पावसाला घाबरून कशी छत्रीत अंग चोरून चालत होती... श्वेता जशी कॉलेजमध्ये शिरली तशी पायल गप्प झाली. "काय गं.... तुला काय वाटलं , मी बघितलं नाही हसताना तुला... माझ्याशी तुझी हुशारी चालणार नाही … समजलं ना" श्वेता छत्री बंद करत पायलला बोलली. एवढा वेळ हसू दाबून ठेवलं होतं संजयने,ते सगळं बाहेर पडलं. " साल्या संज्या.... मला हसतोस ना... उद्यापासून तुझ्या सोबत येणारच नाही कॉलेजला.... मग बस वाट बघत... " ," ठीक आहे. तू नाही मग नेत्रा तयारचं आहे... " नेत्राची गाडी येताना बघून संजय म्हणाला," हि बया कशी आली एवढया पावसात." श्वेता म्हणाली." पहिला दिवस ना कॉलेजचा... मग मिरवायला नको तिला ? " संजय हसतच म्हणाला." काय रे.... कशाला उगाचच तिला नावं ठेवता,आली आहे तर येऊ दे ना तिला. " पायल म्हणाली. नेत्रा गाडीतून उतरली तसं तोंड वाकडं झालं तिचं... चिखल होता ना... कशीबशी स्वतःचा महागातला ड्रेस सांभाळत आली ती... " Hi everybody.... कसे आहात सगळे... " नेत्रा आल्याआल्याच म्हणाली. " आम्ही सगळे ठीक आहोत , पण तुझा मूड खराब आहे वाटतं." संजय म्हणाला." Yes संजय. This पाऊस.... पाणी... चिखल and all that thing's.... मी अजिबात Like करत नाही.... मला यायचं नव्हतं... But आज study सुरु झाली तर उगाचच miss होईल ना माझी.... पप्पा तर किती सांगत होते ... Don't go in the rain... पण मी ऐकलाच नाही... " ," मग उदय कुठे आहे... तो नाही आला आज" पायलने विचारलं. " तो काय....  Behind श्वेता... " ," कुठे ...... ?"श्वेता दचकली ...... मागे वळून बघते तर उदय मागेच उभा ... "Hi...श्वेता... कशी आहेस... छान दिसते आहेस आज.. " उदय म्हणाला."चला.... चला.... Lecture सुरु होईल.. " उदय अजून काही बोलणार म्हणून श्वेता बोलली आणि सगळे वर्गात येऊन बसले... थोडयाच वेळात सगळा वर्ग भरला... पूर्ण वर्ग भरला तोही कॉलेजच्या पहिल्या दिवशी… 

            " काय गं पायल.... आज नक्की पहिलाच दिवस आहे ना.. " ,"का गं ?... "," नाही.. पहिल्याच दिवसाचा पहिला lecture आणि वर्ग Full.... " श्वेता म्हणाली." अगं, सायली madam चा lecture आहे ना आता... म्हणून १००% हजेरी आहे, कळलं का.. ? "…………. "सायली" madam… त्या chemistry शिकवायच्या.जरा बोरिंग विषय.... तरीही त्यांच lecture कोणी "miss" नाही करायचं. सुंदर होत्या दिसायला…. लहान वयात लग्न झालेलं, वय असेल २९-३० च्या आसपास... बोलायला छान होत्या. सगळी मुलं त्यांच्यावर फिदा होती. आणि त्यांनाही ते माहित होतं. Lecture तर Full असणारच....... सायली madam च जरी लग्न झालेलं असलं तरी, त्यांनाही संजय "आवडायचा"..... होताच तसा संजय... सायली madam आल्या वर्गात, नेहमीप्रमाणे आल्याआल्या वर्गात नजर फिरवली… खासकरून संजयकडे नजर टाकली. आणि smile दिली. संजयनेही गालावरची खळी दाखवली. श्वेताला मात्र राग आला... " हिच्या...आई... " श्वेता शिवी देता देता थांबली... पायलनेच तिला थांबवलं... " शिवी वगैरे देऊ नकोस हा श्वेता.. नाहीतर मी दुसरीकडे जाऊन बसते. "," sorry पायल, नाही देणार शिवी.... अरे पण... तिला कळलं पाहिजे ना…लग्न झालंय आपलं.... नवरा आहे आपला, मग दुसरीकडे कशाला तोंड मारायचं.... थांब, हिच्या नवऱ्याचा नंबर मिळवते आणि सगळं सांगून टाकते... " तशी पायल हसायला लागली... Actually, पायललाही ते आवडायचं नाही... सायली madam उगाचच कधी कधी संजय बरोबर बोलण्याचा प्रयन्त करायच्या, मुद्दाम.... त्यामुळे सगळी मुले संजयचा हेवा करायची तर मुली त्या सायली madam चा राग करायची. 
          " काय... पायल madam, आज खूप हसता आहात.... खूप खुश आहेस वाटते." पायलला हसताना बघून सायली madam म्हणाल्या… तशी पायल गप्प झाली. " नाही madam, बाहेर पाऊस पडतो आहे ना आणि कॉलेजचा पहिला दिवस... खूप छान वाटते आहे." पायल काहीतरी उगाचच बोलली.. " हो.. पायल एकदम बरोबर बोललीस.... मस्त पाऊस... थंड हवा... romantic वातावरण आहे ना अगदी.... भिजावंसं वाटते... हो ना... " सायली madam संजयकडे पाहत म्हणाल्या... तशी सगळी मुलं " आम्हालाही भिजावंसं वाटते आहे." अस म्हणाली आणि वर्गात हशा पिकला. ... ,"शांत बसा सगळ्यांनी.. "सायली madam म्हणाल्या... " एवढया romantic वातावरणात अभ्यास नकोसा वाटतो ना... नकोच आज lecture , छान गप्पा मारुया... " सगळ्यांना तो विचार पटला. " कश्याबद्दल बोलायचं.. " एक एक विचार बाहेर पडू लागले. परंतु काहीच नक्की होतं नव्हतं. " शांत राहा रे जरा.... आपण एक करूया.... एकेकाचं नावं घ्यायचं आणि त्याला एक विषय सांगायचा.. मग त्याने त्या विषयावर बोलायचं... "," चालेल चालेल.. " सगळा वर्ग बोलला..... पहिलं नावं कोणाचं... सगळे आतुरतेने वाट पाहत होते.. " संजय ",सायली madam नी नावं घेतलं... " मला माहीतच होतं , हि बाई त्याचंच नावं घेणार... " श्वेता रागातच म्हणाली. संजयचं नावं घेतलं तसा संजय पुढे येऊन उभा राहिला." हं... कोणता विषय देता आहात मला ? " संजयने विचारलं... सगळेच काहीबाही बोलत होते... पायल गप्पच होती, तो काय बोलतो ते ऐकण्यासाठी... तेवढयात सायली madam बोलल्या," तू एवढा Handsome आहेस... तुझी एखादी girl friend असेलच ना, तिच्याबद्दल सांग... " ," कुठे madam.... नाही आहे कूणी girl friend मला... एक मैत्रीण आहे, तिच्याबद्दल सांगू का ? " , संजय श्वेताकडे पाहत म्हणाला. " नको नको... तिला तर सगळेच ओळखतात... OK.... मग एक गोष्ट सांग... तू Love marriage करणार कि arranged marriage ? " असा प्रश्न विचारला आणि मागून श्वेताचा आवाज आला…. " सायली madam,…हे जरा personal नाही होतं आहे का ? " तश्या सायली madam बोलल्या. ," आपलं काय ठरलं होतं... कोणालाही इथे बोलावून एका विषयावर बोलायचं... मग आता त्याला मी प्रश्न विचारू कि नको…. " श्वेताला काय बोलावं ते कळतच नव्हतं.चडफडत ती खाली बसली... " हा, संजय.... तू उत्तर नाही दिलंस अजून... " ," मला वाटते कि प्रत्येकाने Love marriage च केलं पाहिजे… arranged marriage मध्ये अनोळखी व्यक्ती सोबत संसार करावा लागतो... त्यापेक्ष्या मी Love marriage वर जास्त विश्वास ठेवतो... " सगळ्यांनी , त्यात जास्त करून मुलींनी टाळ्या वाजवल्या. " अच्छ्या... मग तू काहीतरी , कोणीतरी ठरवली असशील ना मनात... "," मनात तशी आहे, पण ती कशी हवी ते आहे... कोणीतशी भेटली तर विचार करीन." ," मग हाच तुझा विषय आहे,... तुझ्या स्वप्नातली ,मनातली तुझी " ती " कशी आहे... हे तुला सांगायचे आहे... " ," दुसरा काही विषय द्याना मिस, हा नको.... "," नाही…. हेच तुला सांगायचे आहे, नाहीतर तुला तसच उभं राहावं लागेल." , " ठीक आहे…. ठीक आहे…. सांगतो मी… " तसे सगळे ऐकण्यासाठी सारावून बसले.

          बाहेर अजूनही पाऊस पडत होता. संजय तसाच उभा राहून बाहेर पाहत होता, " ती...... पावसाच्या मेघाप्रमाणे मुक्त विहार करणारी असावी... तीचं प्रेम पावसाच्या सरींप्रमाणे असावं…. कधी रिमझिम , कधी टपोरे थेंब तर कधी मुसळधार.....तीचं मन सागरासारखं विशाल असावं आणि मी आभाळ बनून त्या निळाईत विसावून जावं....तीचं वावरणं हे उधाणलेल्या वाऱ्यासारखं असावं.... जेव्हा जेव्हा ती येईल तेव्हा सगळ्या वाईट गोष्टी उधळून लावेल असं… तिच्या फक्त येण्यानेच कळ्यांची फुलं व्हावीत... सुरवंटाचे फुलपाखरू व्हावे... कोकिळेलाही कंठ फुटावा.... ती म्हणजे परमेश्वराने मला दिलेली देणगीच असावी, तीच माझं आयुष्य असावी. ... माझ्या सावलीत तिचाच अंश असावा.... जेव्हा जेव्हा माझं मन तहानलेलं असेल, तेव्हा तिच्याच आठवणींच्या पावसाने माझं मन तृप्त व्हावं…. ती नसताना तिच्या आठवणींनी माझ्याभोवती पिंगा घालावा.... सुखांची कितीही गर्दी झालेली असली तरी तिच्या कमतरतेमुळे मन दुखीः व्हावं... तिचा चेहरा... चंद्राप्रमाणे शीतल असावा....डोळ्यात आभाळाची विशालता असावी.... केस अमावशेच्या रात्रीप्रमाणे काळेभोर असावेत.... ती गोरी नसली तरी चालेल, पण मनाने स्वच्छ असावी.... पावसात भिजणारी तरी पागोळ्यात पाऊस शोधणारी असावी.... ती म्हणजे एक भिजरी पायवाट असावी, जिचा शेवट केवळ माझ्यापर्यंतच व्हावा... ती म्हणजे गुलाबालाही लाजवेल असं सदाफुलीचं फुल असावी.... कधीही न कोमेजणारी, सदैव फुललेली... स्वच्छंदी फुलपाखरू असावी.... " संजय बोलता बोलता खिडकीपाशी आला.... " ती क्षणात दिसणारं, क्षणात नाहीसं होणारं मृगजळ नसावी, खळखळ वाहणारा झरा असावी…. ज्याला पाहूनच मन भरून जाईल.... जेव्हा जेव्हा मी डोळे उघडीन तेव्हा तेव्हा तीच माझ्या नजरेसमोर असावी.. डोळे बंद केल्यावरही स्वप्नात तीच दिसावी.... माझ्या दिवसाची सुरुवात आणि शेवट तिच्यापासूनच व्हावा... मी घेणाऱ्या प्रत्येक श्वासात तीच सामावलेली असावी... शेवटचं सांगायचं झालं तर ती माझंच प्रतिबिंब असावी... " संजयनी आपलं बोलणं संपवलं... सगळा वर्ग स्तब्ध झालेला होता... सगळेच संजयकडे पाहत होते, कोणीच काही reaction देत नव्हतं… शेवटी संजय " Thank You" म्हणाला, तेव्हा सगळे भानावर आले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.

            संजय आपल्या जागेवर येऊन बसला तरीही सगळी मुलं टाळ्या वाजवत होती.. सायली madam आणि वर्गातील इतर मुली संजयच्या बोलण्याने " भारी " इम्प्रेस झाल्या होत्या. पण अजून काहीतरी घडलं होतं.... श्वेता स्तिमित झाली होती… संजय सोबत आपण एवढी वर्ष आहोत.... त्याच्या मनातलं आपण एकदाही ओळखलं नाही किंवा ओळखायचा प्रयन्तही केला नाही... कशी एवढी मूर्ख मी... संजय किती करतो आपल्यासाठी आणि आपण.... तिला तिचीच लाज वाटत होती... शरमेने मान खाली गेली होती श्वेताची... नेत्रानेही हे सगळ ऐकलं होतं... तिलाही कळलं कि संजयच्या मनात त्याच्या जोडीदाराची काय संकल्पना आहे ते... आणि त्यात आपण कुठेच बसत नाही. त्यामुळे तिलाही जरा वाईटच वाटत होतं… पण पायल मात्र खूप आनंदात होती. संजयने वर्णन केल्याप्रमाणे बहुतेक गोष्टी आपल्या स्वभावात आहेत, हे तिने स्वतःलाच समजावलं आणि संजय आपल्यावरच प्रेम करतो हे स्वतःच तिने मान्य केलं. 

            बाकी कोण पुढे येऊन बोलण्याचा प्रश्नच उरला नव्हता. सायली madam लाही काय बोलावं ते सुचतं नव्हतं… काहीतरी बोलणार इतक्यात lecture संपल्याची बेल झाली. ताबडतोब madam बाहेर पडल्या. पुढच्या lecture ला कोणीच आलं नाही... एव्हाना वर्गात गडबड गोंधळ सुरु झाला असता,पण सगळेच शांत होते. संजयच्या बोलण्याचा खूप वेगळा परिणाम झाला होता, सगळ्यांवर... त्यातच lecture off… पुढचाही... मग काय, एक एक जण वर्गाबाहेर पडू लागला… सगळ्यात आधी नंबर लावला तो नेत्रानी.. तिला संजय समोर थांबायचं नव्हतं. नंतर बाकीचे हळूहळू बाहेर पडत होते. " श्वेता.... चल …बसून काय करते आहेस तिथे.. आणि पायल… तुला काय वेगळं सांगायला हवं का.. " संजयने बाहेरून श्वेता आणि पायलला हाक मारली, तश्या दोघी भानावर आल्या.. " हो... येते मी... तू जा पुढे.. " श्वेता म्हणाली, पायल तर संजयनी बोलावल्याबरोबर बाहेर पडली होती…संजय श्वेता कडे तसाच पाहत होता... " पायल, ... काय झालं श्वेताचं ? बाहेर का नाही येत ती.. " संजयने पायलला विचारलं," माहित नाही, येते बोलली ना , मग थांबूया तिच्यासाठी... " म्हणत पायल आणि संजय तिथेच थांबले. त्यांना वर्गाबाहेर उभं पाहून श्वेता वर्गाबाहेर आली. " काय झालं गं श्वेता तुला, हाक मारली तेव्हा बाहेर का नाही आलीस ? " , " असंच " श्वेता म्हणाली. " तुम्ही जात असाल तर जा पुढे… मला जरा काम आहे library मध्ये... " ," कॉलेजच्या पहिल्या दिवशी… तुला काम आहे आणि तेही library मध्ये.. " संजय म्हणाला... " हो रे… खरंच काम आहे... जा तुम्ही... " , " मग मी सुद्धा येतो... "," नको संजय... please जा.... मला काम आहे. " नाईलाजास्तव संजय, पायल बरोबर पुढे आला.  

          " काय झालंय.. श्वेताला,… पहिली अशी कधी वागली नव्हती ती." संजय पायल बरोबर बोलत होता. पण पायलच कुठे लक्ष होतं त्याच्या बोलण्याकडे… ती तर स्वप्नातच होती...  " Hello... पायल, तुझ्याबरोबर बोलत आहे… आहे का लक्ष.. ? " ," हं... हो... मला वाटलं तू श्वेता बरोबर बोलत आहेस.. " पायल बोलली," काय madam... काय चाललंय... डोक आहे का ठिकाणावर.. श्वेताबद्दल बोलतो आहे... आणि ती गेली ना मघाशी library मध्ये, विसरलीस का ? " ," sorry… sorry… विसरली मी... "," आज काय झालंय ते कळतच नाही सर्वाना.. " ,"तू जे काही बोललास ना वर्गात , त्यामुळे सगळं झालं आहे.. " ," असं काही वेगळं नाही बोललो मी… मनातलंच सांगितलं ना मी." संजय पायलकडे पाहत म्हणाला. छान गार वारा सुटला होता. पायलचे केस भुरुभुरु उडत होते आणि पायल संजयकडेच पाहत होती. आजूबाजूला कोणीच नव्हतं. संजयही पायलकडेच कधीचा बघत होता... थोडा वेळ शांत झाले दोघेही.. " तुला तुझ्या मनातली कधी भेटलीच नाही का... ?" पायलने संजयला विचारलं तेव्हा त्याने मान हलवून नकार दिला... " कधीच नाही का... कधी समोरसुद्धा आली नाही का ती तुझ्या ." अजूनही दोघे तसेच उभे होते... वारा तसाच वाहत होता. पायलचे केस तिच्या चेहऱ्यावर येत होते, ते हातानेच ती मागे करत होती... संजयच्या मनात काहीतरी झालं ते पाहून... तेव्हाचं मागून उदयने संजयला हाक मारली, तसं संजयचं लक्ष दुसरीकडे गेलं.. " चल.. मी जाते घरी... नाहीतर पाऊस सुरु होईल पुन्हा.. Bye... " म्हणत पायल निघून गेली, जाताना नेहमीची smile दिली तिने.. संजय तसाचं उभा राहून तिला जाताना पाहत होता.. " काय झालं रे संजय... चल आपण पण निघूया घरी. मी सोडतो तुला गाडीतून.. " उदय म्हणाला," नको, तू जा... मी library मध्ये जाऊन येतो... " संजय जाणाऱ्या पायलकडे पाहत म्हणाला. उदय निघून गेला. पायल नजरेसमोरून निघून जाईपर्यंत तो तिलाच पाहत होता.... ती नजरेआड झाली तशी त्याला श्वेताची आठवण झाली, तो library आला. पहिलाच दिवस त्यामुळे library त कोणीच नव्हतं. ," काका.. श्वेता आलेली का इकडे.. ?" संजयने librarian ला विचारलं," श्वेता आणि इकडे ... तसा तिचा आणि library चा काही संबंध नाही तरीही आज पहिला दिवस आहे आणि library अजून student's साठी उघडली नाही. त्यामुळे ती नाहीच आहे इकडे... " ," Thanks काका.. "म्हणत संजय बाहेर पडला..  " इकडे नाही मग गेली कुठे श्वेता ?" संजय एकटाच बडबडत होता...असं कधी झालं नव्हतं कधी पहिलं... श्वेता आणि संजय नेहमी एकत्रच घरी जायचे कॉलेजमधून. आज ती एकटीच गेली होती..... नेत्राही... नेहमी त्याच्याभोवती घुटमळणारी, आज पळूनच गेली होती. संजय एकटाच निघाला घरी.

            पुढचे २ दिवस.... कॉलेज नेहमी सारखं सुरु झालं होतं. एव्हाना २ दिवसात संजयची " ती " सर्व कॉलेजमध्ये पसरली होती. सगळ्यांची संजयकडे पाहण्याची " नजर " जरा बदललेली होती. मुलींनी त्याची "ती" होण्याचा प्रयन्तही सुरु केला होता. सायली madam अजून संजयच्या प्रेमात पडल्या होत्या... पण त्या ५ जणांमध्ये वेगळचं सुरु होतं काहीतरी.. श्वेता त्या दिवसापासून वेगळीच वागायला लागली होती, शांत शांत रहायची... कोणी काही विचारलं तर फक्त छोटीशी smile द्यायची... बाकी काही नाही… शिव्या देणं, रागावणं, मोठयाने बोलणं…. सगळं बंद, दोन दिवसातच..... संजयने विचारलं तेव्हा ," तब्येत ठीक नाही आहे."एवढंच उत्तर मिळालं... शिवाय त्याच्या अगोदरच येऊन बसायची वर्गात... श्वेता गप्प तर उदयही जरा नरमलेला होता. त्याचही मन लागत नव्हतं वर्गात… श्वेता काहीच बोलली नव्हती त्याच्या बरोबरही... नेत्रा गुपचूप कॉलेजला यायची आणि lecture संपले कि निघून जायची... दोन दिवसात ती एकदाही संजय बरोबर बोलली नव्हती कि त्याच्या समोर आली होती…. तीही गप्प असायची वर्गात. सगळा तोरा उतरला होता तिचा. परंतु पायल मात्र खूप खुश होती. जणू काही तिला कोणता खजिनाच सापडला होता. चेहऱ्यावरूनच तिचा आनंद दिसायचा सगळ्यांना... त्यात पावसाचे दिवस… म्हणजे अजूनच आनंद तिला... संजय बरोबर तेच बोलणं,हसणं चालू होतं तिचं… श्वेता गप्प असल्याने, पायलचं जास्त बोलणं व्हायचं संजयशी. अजून चार दिवस गेले… सर्व तसंच चालू होतं. त्यादिवशी lecture चालू असताना , एक notice आली वर्गात.. " उद्या वादळाची शक्यता वर्तवण्यात आलेली असल्याने , सुरक्षतेच्या कारणास्तव कॉलेज बंद राहिलं."

            दिवसाचे lecture संपले.. practicals सुरु झाल्या नव्हत्या, त्यामुळे सगळे घरी जाऊ लागले. नेत्रा नेहमीप्रमाणे बाहेर पडली तर संजय समोरच उभा होता.... त्याच्या समोर यायचं नव्हत तिला. पण तोच समोर आलेला."Hi नेत्रा, कशी आहेस ? " संजयने विचारलं.. " Hi… मी ठीक आहे, चल... Bye , मला उशीर होतो आहे... " नेत्रा त्याच्याकडे न बघताचं म्हणाली. " Ok ... Bye" संजय म्हणाला, तशी ती निघून गेली, तिच्याबरोबर उदयही निघाला. लांबूनच त्याने संजयला हात हलवून " Bye " केलं... पायल बाहेर आली. पुन्हा तोच सीन, पायलचे केस भुरुभुरु उडत तिच्या चेहऱ्यावर येत होते. छान हसत होती… " भेटली का रे तुला ती... नक्की भेटेल... जरा आजूबाजूला लक्ष देत जा. " म्हणत पायल हसत हसत निघून गेली. तिच्या वागण्यातला बदल संजयला देखील कळत होता,पण आज त्याने तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळीच चमक पाहिली होती.... मनात काहीतरी झालं त्याच्या पुन्हा… तसाच उभा राहिला…. तिच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत... " पायल तीन वर्ष आपल्या सोबत आहे... रोजची मस्ती, मस्करी असते…. ती आपली चांगली friend आहे... मग आजचं असं का वाटत आहे,तिच्याबद्दल…. तिला कधीच एवढं निरखून पाहिलं नव्हतं कधी.... काय झालयं आपल्याला.... तिच्या डोळ्यात तर कधीच आपण एवढं हरवून गेलो नव्हतो... नाही.... मला स्वतःला सांभाळायला हवं.…. ", संजय मनातल्या मनात बोलला. सगळा वर्ग रिकामा होतं आला, तरी श्वेता अजून वर्गाबाहेर आली नव्हती... संजय तसाच वाट पाहत होता वर्गाबाहेर. शेवटी , श्वेता बाहेर आली... संजयकडे न बघताच ती पुढे चालू लागली... " श्वेता.... ये …. श्वेताडी.... थांब ना... " तशी श्वेता थांबली... " काय झालंय तुला... " संजयने विचारलं," काही नाही."," नाही,…काहीतरी नक्की झालंय तुझं… रोज आपण एकत्र यायचो आणि घरी एकत्र जायचो... आता तर वर्गात माझ्या आधीच आलेली असतेस… सतत बडबड करणारी… गप्प गप्प असतेस…. कोणाबरोबर बोलत नाहीस, माझ्याशी तर नाहीच…. काय झालंय तुला.. ? " श्वेता गप्पच.. बाहेर वादळाची चिन्ह दिसू लागली होती... वारा वाहू लागला होता जोरात... श्वेता आकाशाकडे पाहत होती. " श्वेता... श्वेता... तुझ्याबरोबर बोलतो आहे मी... लक्ष कुठे आहे तुझं.... " श्वेता गप्पच... " कुठे हरवलेली असतेस हल्ली... जुनी श्वेता कुठे गेली.... बदललीस तू... "," बदललचं पाहिजे ना संजय.. " खूप वेळाने श्वेता म्हणाली... " पण का बदलायचं.... " श्वेता अजूनही आभाळाकडेच पाहत होती.. आकाशात ढगांची गर्दी होऊ लागली होती, काळ्या ढगांची... वाऱ्याने जोर पकडला होता.... " बोल ना... का बदलायचं... ? ", संजयने पुन्हा विचारलं... श्वेताने संजयकडे एक कटाक्ष टाकला.," कारण....... कारण वातावरण बदलतंय संजय... " श्वेता आभाळाकडे पाहत म्हणाली... आणि जोरदार वीज कडाडली... शांतता... श्वेता थोडावेळ थांबली आणि झपाझप चालत निघून गेली… संजय काहीच बोलला नाही तिला... किंवा त्याने तिला अडवायचा प्रयत्नही नाही केला. थोडावेळ तसाच घुटमळत होता तो... निघाला मग तोही… 

           पुढचा दिवस... वादळामुळे कॉलेज बंद... सगळे आपापल्या घरीच होते... पायल मात्र कॉलेजला आली होती.. " अरे... पायल... तुम भूल गयी क्या... आज बंद है कॉलेज बेटा... " watchman काकांनी सांगितलं. तेव्हा पायलच्या लक्षात आलं कि आज सुट्टी आहे आणि आपण विसरलो आहे ते... आजकाल काहीच लक्षात राहत नाही आपल्या... काय वेड लागलंय आपल्याला.. स्वतःशीच हसत होती पायल... "चलो काका…. अशीच देखनेके लिये आली होती... कोणी आलेलंलं है क्या…. " पायल बोलली तसे watchman काका हसले. पावसाचं वातावरण निर्माण झालं होतं. पायल निघाली तशीच... खरंच तिला वेड लागलं होतं.. १० मिनिटांनी पावसाला सुरुवात झाली… नेत्रा घरीच होती.. पावसाला पाहून तिला रडूच आलं.. उदय कसल्याश्या विचारात होता... घरीच. श्वेताही घरीच होती. पाऊस सुरु झाला तशी ती खिडकीजवळ आली, हात बाहेर करून पावसाचे थेंब हातावर झेलले. पावसाला घाबरून ती नेहमी घरीच राहायची... " काय असते या पावसात.... "म्हणत ती घराच्या बाहेर पडली... खूप दिवसांनी पाऊस आलेला .. श्वेता उभी राहिली पावसात... पहिल्यांदाच ती पावसाला तशी अनुभवत होती... पावसातला आनंद तिला मिळाला होता, तरी मन दुख्खी होतं.... इकडे पायल तर वेड्यासारखी नाचत होती पावसात... सगळ जग विसरून….चिंब चिंब झालं होतं तिचं मन…. यंदाच्या पावसात तिला तिच्या मनातलं काहीतरी मिळालं होतं... जवळचं.. प्रेमाचं..... प्रेमाचाच पाऊस पडत होता , तिच्यासाठीच.... कोणी म्हणत होत , वेडी झाली कि काय ही... काही जण तिला पाहून हसत होते... पण तिचं कुठे लक्ष होतं त्यांच्याकडे …. ती तशीच बेभान नाचत होती... संजय घरीच होता... त्यालाही पाऊस आवडायचा परंतु या वेळेस त्याला पाऊस नको होता... खिडकी जवळ उभा राहून तो फक्त पाऊस ऐकत होता... त्याला त्याच्याकडे बघायचही नव्हतं…. यंदाचा पावसाळा एक वादळ घेऊन आलेला, सगळ्यांसाठी... शेवटी न राहवून संजयने बाहेर पाहिलं…पाऊस तर नेहमी सारखाच पडत होता. त्याच्यासाठी मात्र तो वेगळा होता , यावर्षी.…. " वातावरण कोणतं बदलतंय .... बाहेरचं कि... मनातलं." संजय पावसाकडे पाहत विचार करत होता......तीन जीव पावसात भिजून जात होते……वेगवेगळ्या ठिकाणी... श्वेता, पायल आणि संजय.... यंदाचा पावसाळा तिघांसाठी वेगळा होता...... खरंच वातावरण बदलत होतं का .... ?

......................................................to be continued..........................................................

Sunday, 18 May 2014

रहस्य सप्तसुरांच..... (भाग 2)

               विचार करता करता अजून २ दिवस निघून गेले. अभिषेकची सुट्टीसुद्धा संपत आली होती. महेश तिथेच थांबला होता,अभिषेकच्या गावाला." अजून काही माहिती मिळाली का तुला महेश ? " अभिषेकने महेशला विचारलं... "तशी काही महत्त्वाची माहिती नाही मिळाली,पण मला वाटते कि या guest list मधेच काहीतरी मिळू शकते. "," ते कसं काय ? " ," हे बघ... सागर यांच्या लिस्ट मध्ये इतर पाचही जणांची नावं होती. शिवाय इतर लिस्टमध्ये सुद्धा बाकीच्याची नावं होती."," मग यावरून काय कळलं तुला ? " ," मला वाटते.. या लिस्ट मधेच आपल्याला पुढची दोन नावं मिळू शकतील... कदाचित." ," अगदी बरोबर."असं म्हणत अभीने लगेचच लिस्ट पाहायला सुरुवात केली. सगळ्या लिस्ट मध्ये एकूण १५ जण common होती, त्यातील ५ जणाची हत्या झाली होती.... उरलेल्या १० व्यक्ती पैकी ३ नावं " ध " अक्षरावरून सुरु होत होती..... " अरे, तिघे जण आहेत. मग यातील नक्की कोण असेल ? " तीन व्यक्ती मधले,दोन वकील तर एक अभिनेता… " आपण त्यांना सांगूया का ? " अभिने महेशला विचारले. ... " अरे पण कस सांगणार त्यांना आपण... उगाच सगळीकडे घबराट पसरेल.. "," मग काय करायचं आपण ... त्यांना असंच मारायला द्यायचं का.. " अभी बोलला... " थांब जरा... मला विचार करू दे... उगाच घाई करू नकोस,मला विचार करू दे." मग महेशनी अजून search करून त्या तिघांच्या birth-date काढल्या.... " काय विलक्षण योगायोग आहे... " महेश बोलला," कोणता रे"," या  तिघांच्या birth-date एकच आहेत.... मग तू कोणाला वाचवणार आता... " महेश विचारात पडला. कोणाला सांगणार सावध राहा म्हणून... Date सुद्धा जवळ आलेली... " चल, आपल्याला निघायला हवं आता.. " असं म्हणत अभिषेक,त्याच्या कुटुंबासहित शहरात येऊन पोहोचला,सोबत महेशही होता. 

             त्यादिवशी त्याला करमतच नव्हतं. रात्रीही तो तळमळतच होता. किती वाजता झोप लागली माहित नाही, परंतु त्याला जाग आली ती फोनच्या रिंगमुळे... त्याला माहित होतं कि call कसला असणार.... आणि तोच call होता... " हेलो अभी... ".... पण या वेळेस महेशचा call होता... " हा महेश... बोल.. "," आपला अंदाज चुकला रे.. ","कसा काय ? " ," तुला इतिहास संशोधक " धनंजय " माहित आहेत ना... ","हो.. ","त्यांचा खून झाला आहे... " त्या बातमीने अभीची झोपच उडाली... " तू पोहोच तिथे, मी येतो लगेचच... " ,अभीने फोन कट्ट केला आणि तसाच झटपट तयारी करून घटनास्थळी पोहोचला... महेश आणि इतर पोलिस आधीच पोहोचले होते.... मिडिया होती. महेशने अगोदरच तपास केलेला होता. पुन्हा चहाचा कप... Letter. तेच ते. Dead Body , महेशच्या Lab मध्ये पाठवली गेली. " धनंजय " एकटेच राहायचे म्हणून त्याचं घर पोलिसांनी तपासणी साठी बंद करून ठेवलं. महेश आणि अभी , महेशच्या Lab मध्ये आले..... " रिपोर्ट तेच असणार , तरीही मी चेकिंग करतो. " महेश म्हणाला.... " अरे पण याचं नाव कुठे होतं लिस्टमध्ये.. " अभी , महेशला म्हणाला... तसा महेश त्याला त्याच्या केबिन मध्ये घेऊन गेला. " त्याचं नावं होतं.. "," अरे,.... आपण किती वेळा चेक केली लिस्ट, याचं नाव तुला तरी दिसलं का ? " अभी बोलला. " आपण फक्त तिथे आलेल्या लोकांची लिस्ट बघितली. पार्टीला न आलेल्या व्यक्तींची लिस्ट मी नंतर चेक केली आणि त्यामध्ये यांचं नाव होतं.","कसं शक्य आहे... " असं म्हणत अभीने पुन्हा सगळ्या लिस्ट बघायला सुरुवात केली. त्याचं नाव होतं खंर... सगळ्या लिस्ट मध्ये.... " मला एक गोष्ट खटकते आहे... " महेश अभीला बोलला," धनंजय याचं नाव सगळ्या लिस्ट मध्ये आहे, तरी ते एकाही पार्टीला गेले नाहीत... अस का.. ? " ," कदाचित.... त्यांना काहीतरी माहित असेल ? " , " असेलही... पण यावरून अस म्हणू शकत नाही ना... कारण इतर बरीच लोक होती जी पार्टीला हजर राहू शकली नव्हती. " महेश बोलला तसे दोघेही शांत झाले..... " चल, उद्या भेटू... आणि येताना रिपोर्ट घेऊन ये... " असं म्हणत अभी त्याच्या पोलिस स्टेशनकडे निघाला.    

             दुसरा दिवस, रिपोर्ट्स तेच होते, त्यात अभिषेकला interest नव्हता... अजून एक व्यक्तीची हत्या झाली होती.... राहिलं फक्त एक अक्षर .. " नी "... त्याचा काहीच पत्ता लागत नव्हता.. अभिषेकने सगळ्या लिस्ट पुन्हा पुन्हा चेक केल्या... त्यात " नी " अक्षरावरून कोणतेच नावं सुरु होतं नव्हते. गूढ अजूनच वाढत जात होतं.. ,"लिस्टमधील व्यक्तींचे खून होत आहेत, तर लिस्ट मध्ये तर कोणीच नाही ज्याचं नाव " नी " वरून सुरु होते... " अभीने महेशला प्रश्न केला.…" मलाही तोच प्रश्न पडला आहे कि शेवटची व्यक्ती कोण असेल.. ?" कोणाचंच डोक चालत नव्हतं... " मला वाटते , या सगळ्यांमध्ये काहीतरी गोष्ट असेल म्हणून तो निवडक लोकांनाच मारत आहे... ","मग याचं उत्तर कसं सापडणार? " ," आता एकच पर्याय उरला आहे.... सगळ्यांच्या घरांची तपासणी करायला हवी.. त्यातूनच काही मिळालं तर... " महेशलाही तो पर्याय पटला...... लागलीच अभिषेकने त्यांच्या घरांची तपासणी करण्याची permission घेतली ... अभीने आपली संपूर्ण team कामाला लावली... " जर तुम्हाला काही महत्वाचं वाटलं , तर लगेचच तो पुरावा म्हणून गोळा करा.... कागदपत्र... Letters... फोटो... काहीही…पण मला ते सगळ तीन दिवसात पाहिजे आहे.... " अभीने त्याच्या team ला स्पष्ठच सांगितलं.. स्वतः अभिषेक धनंजय यांच्या घरी तपास करत होता... तपासात तीन दिवस गेले.... जे काही मिळालं ते सर्व गोळा करण्यात आलं.. आणि अभिषेकच्या office मध्ये ठेवण्यात आलं...... महेश सुद्धा अभीच्या ऑफिसमध्ये येऊन पोहोचला... दोघेही थोडयाच वेळात तपासात गढून गेले.. त्याचवेळेस अभीचा फोन वाजला," हेलो सर.... " ," बोला सावंत काय आहे… ?"," सर लेखिका सुप्रिया तुम्हाला भेटायला आलेल्या आहेत... पाठवू का केबिनमध्ये ? " ," हो... पाठवून दे आत त्यांना... " ," कोण ? " ," अरे... त्या लेखिका माहित आहेत ना... सुप्रिया... त्या येत आहेत.. " ," कशाला... तू बोलावलस का.. "," नाही रे.... बघूया.... काय बोलतात ते... " थोडयाच वेळात लेखिका सुप्रिया आणि त्यांचा सेक्रेटरी दोघेही अभिषेकच्या केबिनमध्ये दाखल झाले. प्रसिध्द लेखिका होत्या त्या... शिवाय पोलिसांमध्ये तर जास्तच दरारा होता त्यांचा... कारण त्यांचे अनेक लेख पोलिसांविरुद्धच प्रसिद्ध झाले होते, परखड लेख अगदी. त्यामुळे सर्व पोलिस डिपार्टमेंट त्यांना जरा घाबरूनच असायचं. म्हणून अभिला तसं tension च आलं. "Inspector अभिषेक,……. तुम्हीच तपास करत आहात ना... या सर्व खुनांचा.. "," हो... मी आणि डॉक्टर महेश, आम्ही दोघे... "," OK, मी काही सांगण्यासाठी आलेली आहे इकडे. " , तसं अभी आणि महेश एकमेकांकडे पाहू लागले. "मी या सर्वांना चांगली ओळखायची.... चांगली मैत्री होती आमची सर्वांची, खूप वर्षापासूनची.... या सर्वांचं असं होईल अस मला वाटलं नव्हतं.... जाऊ दे... तुम्हाला काहीही माहिती हवी असेल तर मी तुम्हाला मदत करण्यास तयार आहे..... माझ्या मित्रांच्या खुन्याला शिक्षा व्हायलाच हवी."," हो हो , तुमची मदत खूप उपयोगी पडेल आम्हाला. " , " OK…. आज मी पुण्याला चालली आहे.... तर मी आज काही तुम्हाला सांगू शकत नाही." , " हो चालेल... मग तुम्ही पुण्यावरून आलात कि तुम्हाला भेटायला येतो आम्ही. ... " ,"मी आता कायमची पुण्याला चालली आहे.. त्यामुळे तुम्ही आता तिथेच या... सेक्रेटरी तुम्हाला पत्ता देईल. " असं म्हणत त्या खुर्चीतून उठल्या आणि त्यांच्या गाडीत जाऊन बसल्या. " हाय... माझं नाव नीरज... तुम्हाला जर madam ला contact करायचा असेल तर मला call करा... हे माझं कार्ड.. " ,"आणि त्यांचा पुण्याचा पत्ता …?"," हं....हो, अजून कार्ड नाही छापली आहेत, तेव्हा मी तुम्हाला पेपरवर लिहून देतो... पेन दया जरा तुमचा... " तसा महेश पेन शोधू लागला... नव्हताच पेन तिथे.. " थांबा.... " असं म्हणत त्याने bag मधून वही व पेन काढला आणि त्यावर त्याने पत्ता लिहुन दिला. " हा पेन madam चा आहे, त्यांना राग येतो त्याला कोणी हात लावला तर म्हणून मी आधी बाहेर नाही काढला." असा नीरज बोलत होता इतक्यात बाहेरून गाडीच्या होर्नचा आवाज आला, आणि नीरज पळतच गेला... " अरे... तो नीरज पेन आणि वही इकडेच विसरून गेला. " महेश म्हणाला... " आता काही खरं नाही त्याचं... madam ची वही आणि पेन इकडेच विसरला लेकाचा.. " तसे दोघे हसायला लागले.. खूप दिवसांनी हसत होते दोघे मिळून. ... " चल... आता खूप रात्र झाली आहे, घरी जाऊया." महेश बोलला," हो.. हो…चल.. " असं म्हणत त्याने टेबलावरचे सगळे कागदपत्र, फोटो .. त्याच्या bag मध्ये टाकले. " अरे, त्या madam ची वही आणि पेनाच काय करायच.. " अभीने विचारलं... " जा घेऊन घरी... तुझ्या भावाला उपयोगी पडेल ते.... कदाचित तोही लेखक होईल.. "हसतच महेश बोलला, तसं अभीने सगळं घरी आणलं.. " Wow... दादा... सुप्रिया madam चा पेन.... " अभिचा लहान भाऊ... त्यांचा खूप मोठा fan होता... "आता हे पेन मीच ठेवणार.. आणि वापरणारही... ","हो... तूच वापर.... मला नको आहे तो पेन.. तुलाच ठेव... " आणि त्याने ती वही आणि पेन स्वतःकडे ठेवून घेतलं…  

              दुसऱ्या दिवशी, नव्याने तपासाला सुरुवात झाली. बाकीच्या घरातून तसं काही महत्त्वाचं मिळालं नाही. पण धनंजय यांच्या घरी एक जुना फोटो सापडला, तसा महेश चमकला. लगेचच त्याने अभिला तो फोटो दाखवला. अभी सुद्धा आचर्यचकित झाला. तो फोटो म्हणजे आतापर्यंत खून झालेल्या व्यक्तीचा एक ग्रुप फोटो होता, जुना... " अरे... त्या madam बरोबर बोलत होत्या.. ग्रुप फोटो आहे म्हणजे सगळे मित्र असतील ना.. "," हो .. मग या फोटोमध्ये  ती शेवटची व्यक्तीही असू शकते ना.. " परंतु फोटो खूप जुना होता... काही ठिकाणी खराब झालेला होता... फोटोमध्ये एकूण ८ व्यक्ती होते.. हत्या झालेले ६ जण फोटोमध्ये स्पष्ठ दिसत होते.. एक व्यक्ती अनोळखी होती तर कोपऱ्यात उभ्या असलेल्या व्यक्तीची इमेजच खराब झालेली असल्याने ती स्त्री आहे कि पुरुष तेच समजत नव्हत. " काय कळते का तुला ? " ," नाही रे.. " मग दोघेही विचारात गढून गेले." मला वाटते ना... यांचा सगळ्यांचा एकमेकांशी अजून काहीतरी संबंध असणार म्हणून तो खुनी यांनाच मारत आहे. " महेश बोलला. " मग आता एकच करायला पाहिजे. या सगळ्यांची जुनी माहिती गोळा करायला हवी. " पुन्हा एकदा सगळी कागदपत्र नव्याने पाहायला सुरुवात केली दोघांनी.… त्यात महेशला काहीतरी सापडलं.. " हे बघ अभी.. सागर, महेंद्र , गजेंद्र , रेशमा... या  चोघांच्या घरात काही सरकारी कार्यालायातली कागदपत्र सापडली मला. याचा अर्थ हे ४ जण सरकारी नोकरीत होते कदाचित... " ," पण आता तर ते वेगळ्या profession मध्ये होते, मग सरकारी नोकरी.... ? " ," हि कागदपत्र जुनी आहेत. त्यामुळे आपल्याला यांची माहिती मिळू शकते सरकारी कार्यालयात..... तरच कळेल कि ते तिथे जॉबला होते कि नाही ते.. "असं म्हणत ते दोघेही पोहोचले सरकारी कचेरीत. 

             लगेचच त्यांना माहिती मिळाली ... " हे बघ... आतापासून १२ वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही.. "अभीने महेशला बोलावून सांगितले…"हे सगळे सरकारी नोकरीतच होते." ," हो रे.. पण तेव्हा काहीतरी घडलं होते त्यामुळे या सगळ्यांनी अचानक राजीनामा दिला होता. " अभिने माहिती पुरवली. अभीने अधिक माहिती गोळा केल्यावर कळलं कि १-२ महिन्यातच सगळयांनी राजीनामे दिले होते. " नक्कीच काहीतरी झालं असणार, नाहीतर सरकारी नोकरी कोणी सोडत नाही सहसा. " अभी म्हणाला.. " आणि हे बघ.... अभी, तुमचे परेश सर... त्यांचाही contact होता यांच्याशी.. म्हणजे तुझ्या Department मधून काहीतरी माहिती मिळू शकते आपल्याला. " महेश म्हणाला ," आणि जर ती सरकारी कामातली गोष्ट असेल तर नक्कीच पेपर्समध्ये सुद्धा आली असेल ना... " अभिने विचार व्यक्त केला... " हो रे... बरोबर... "," मग असं करूया.. तू जुने newspapers... ११- १२ वर्षापूर्वीचे, ते घेऊन ये आणि मी माझ्या ऑफिसच्या जुन्या रेकॉर्ड मध्ये काही मिळते का ते बघतो.. " अस म्हणत अभी आपल्या ऑफिसमध्ये पळाला तर महेश वृतपत्र कार्यालयात.... बरोबर २ तासांनी महेश , अभीच्या ऑफिसमध्ये पोहोचला... तर अभी ऑफिसमध्ये येरझाऱ्या घालत होता.. " काय रे... असा काय फेऱ्या मारतो आहेस... " महेशने आल्या आल्याच विचारलं. " अरे जुन्या रेकोर्डची रूम सिल केलेली आहे.... मी तिकडे जाऊ शकत नाही…. मला permission घ्यावी लागेल सरांची... "," अरे , मग माग ना permission ." ," सर .... परदेशी गेलेले आहेत... कामानिमित्त.. आणि त्यांना call ही करू शकत नाही मी" , " call करायला काय आहे त्यांना.. "," त्यांनी जाताना तसं सांगून ठेवलं आहे कि इंडिया मधून कोणीही call करायचा नाही त्यांना, ते का अस म्हणाले ते माहित नाही...  आणि ते ४ दिवसांनी येणार आहेत,तेव्हाच मी जाऊ शकतो तिथे.. " अभी बोलला. ... "चल जाऊ दे , ४ दिवसांनी बघू... हे बघ, मी १२ वर्षापूर्वीचे पेपर्स आणले आहेत. " महेश म्हणाला आणि अभी ते पेपर्स पाहू लागला ."१२  वर्षापूर्वी एक घटना घडली होती. ती म्हणजे पैश्याची अफरातफर. रक्कमही मोठी होती, १० कोटी " ," १० कोटी ... तेही १२ वर्षापूवी म्हणजे केवढी मोठी रक्कम... आणि यात ६ जण अडकले होते असं यात लिहील आहे." पुढे अजून माहिती होती." ह्या पेपरमध्ये अधिक माहिती आहे बघ... नंतर मात्र एक कोणीतरी वेगळाच आरोपी पुढे आला,त्यालाही पकडलं होता पोलिसांनी. पण नंतर त्याने आत्महत्या केली अस लिहील आहे. त्या आरोपीच्या कुटुंबाने नंतर केसही केलेली होती खुनाची या ७ लोकांवर , केसच काय निकाल लागला ते नाही लिहील आहे या पेपरमध्ये." महेश सांगत होता. " नाव आहेत का त्यांची, त्या सात जणांची" ," हो... सागर, रेशमा,गजेंद्र , महेंद्र ,परेश,धनंजय आणि नीलम .. " ,"म्हणजे शेवटची व्यक्ती स्त्री आहे , नीलम नावाची. ... आणि नंतर कोणावर आरोप झाला होता ... ? " ," हं... हा... त्याचं नावं होत... सागर देशमुख..... " ," सागर देशमुख.... OK अजून काही आहे का माहिती.. "," नाही, मला वाटते तुमच्याच रेकोर्ड मध्ये असेल माहिती सगळी." 

               ती रूम बंद होती. त्यामुळे अभीला त्यांची येण्याची वाट पाहावीच लागणार होती…. अजून काही माहिती मिळते का ते पाहण्यासाठी पुन्हा त्याने सगळ्या फाईल open केल्या. पहिला खून जुलै महिन्यात झाला होता. आणि शेवटचा खून मार्च महिन्यात झाला होता... " याचाच अर्थ असा होतो कि नीलम यांचाही खून येत्या चार महिन्यात होऊ शकतो." अभीने अंदाज लावला." तो कसा काय? " महेश बोलला," त्याला जर या सर्वांचे खून करायचे असते तर त्याने इतकी घाई केली नसती, म्हणजेच त्याला सगळ्यांना एका वर्षातच मारायचे आहे... पहिला खून जुलै महिन्यात झाला... म्हणजेच येत्या जूनपर्यंत त्याला " नीलम" यांना माराव लागेल... पण त्यांचा वाढदिवस कधी असतो ते कळलं तर बर होईल आपल्याला.... " ," अभी... त्या कोण आहेत हे सुद्धा माहित नाही, त्या कशा दिसतात हे माहित नाही. मग तू कसा वाचवणार त्यांना ? " , " मला वाटते , आपण वृत्तपत्र संपादकांना याबद्दल विचारायला हवं, त्यांना १२ वर्षापूर्वीची माहिती असेलच ना.. " तसे ते दोघेही एका वृत्तपत्र कार्यालयात पोहोचले आणि त्याच्या संपादकाला भेटले." हो... तशी एक केस झाली होती, १२ वर्षापूर्वी… "," नक्की काय झालं होत सांगाल आम्हाला.. " ,"साधारण १२ वर्षापूर्वी , सुमारे १० कोटींची चोरी झाली होती, सरकारी तिजोरीतून... आणि सगळ्यांचा संशय होता तो,त्या ६ जणांवर .... Inspector परेश हि केस बघत होते तेव्हा... " ," तेच सहा जण का... त्यांच्यावरच का संशय होता... " अभिने पुढचा प्रश्न केला. " हे ६ हि जण तेव्हाच खूप फ़ेमस होते... खूप चांगली चांगली कामे त्यांनी केली होती, लोकांसाठी.. जनतेसाठी... एवढी चांगली टीम होती त्यांची.. आणि त्या टीम चे बॉस होते सागर देशमुख... शिवाय Inspector परेश सुद्धा त्या टीमला खूप मदत करायचे, सपोर्ट करायचे... एकदा तर या सात जणांनी खूप मोठा सरकारी घोटाळा उघड केलेला… त्यामुळे ते जास्तच फ़ेमस झाले. या सात जणांची नावे जर ओळीनी लावली तर संगीतातले सात सूर तयार होतात म्हणून त्यांच्या  बॉसने त्यांना " सप्तसूर " असं नाव दिलं होतं.... पण त्या दिवशी काय झालं कोणास ठाऊक … त्यांचे बॉस , सागर देशमुख त्यांनी त्या सहा जणांवर आरोप करून त्यांची तक्रार नोंदवली पोलिस स्टेशनमध्ये…… तशी तक्रार लिहिलीही होती… परंतू पुराव्या अभावी त्यांना सगळ्यांना सोडण्यात आलं.... पण मग तिसऱ्याच दिवशी सागर देशमुख यांना दोषी ठरवलं गेलं, १० कोटींच्या चोरीसाठी.".," खरंच त्यांनी चोरी केलेली का ? ", "नाही ते शक्यच नव्हत.... त्यांच्या एवढा इमानदार माणूस नव्हता दुसरा... त्यांना त्यांच्याच ऑफिसमध्ये पकडलं होतं... लगेच पुरावेही सादर केले inspector परेशनी, त्यानंतर २ दिवसांनी त्यांनी विष पिऊन आत्महत्या केली असं म्हणतात.... त्यांच्या कुटुंबाने तर हा खून आहे म्हणून केसही केलेली होती सगळ्यांवर.. परंतू पुराव्या अभावी त्यांना सगळ्यांना सोडण्यात आलं...." महेश सगळी माहिती लिहून घेत होता पटापट... " त्यांचा फोटो वगैरे आहे का ? " अभिने विचारलं... " आहे... पण आता नाही आहे... मी तुमच्या ऑफिसमध्ये पाठवून देतो नंतर.. "," ठीक आहे."असं म्हणत अभी आणि महेश ऑफिसमध्ये परत आले. 

            ४ दिवसांनी अभिचे सर आले... तेव्हा त्यांनी लगेचच त्याला permission दिली त्या रूममध्ये जाण्याची… अभी आणि महेश लगेचच कामाला लागले... सगळ्यात पहिलं काय मिळालं ते म्हणजे सागर देशमुख यांचा post mortem रिपोर्ट.. " हे बघ, डॉक्टरने लिहिलं आहे कि त्यांच्या पोटात plaster of paris चे कण मिळाले... अगदी सेम आहे हे... मग त्यांनी आत्महत्या केलीच नसणार... त्यांचा खून झाला होता.. "," चल अजून काही माहिती मिळते का ते पाहू... " परंतू डॉक्टरच्या रिपोर्टशिवाय त्या रूममध्ये कोणतीच फाईल वा कागदपत्र नव्हती. " कस शक्य आहे हे... एवढा मोठा घोटाळा झाला होता.... एका व्यक्तीची हत्या झाली होती... केसही झाली होती आणि एकही कागदपत्र नाही... असं कसं.. " अभी विचार करत होता.. " मला वाटते अभी , तू तुझ्या सरांना विचारलं पाहिजे, त्यांना माहित असणारच.. " तसे अभी आणि महेश दोघेही त्याच्या सरांकडे गेले.. " सर , तुमच्याकडून काही माहिती हवी होती आम्हाला." ," कश्या संदर्भात " ," सर... परेश सरांच्या संदर्भात.. " ," काय माहिती हवी आहे तुम्हाला.. " ," सर १२ वर्षापूवी काय झालं होतं.... परेश सरांनी त्या केसची काय माहिती गोळा केलेली होती, ते विचारायचे होते… " तसे अभिचे सर जरा चलबिचल झाले. महेशच्या नजरेतुन ते सुटलं नाही. तरी तो बोलला... " प्लीज सर... अजून एका व्यक्तीची हत्या होणार आहे, त्याला वाचवायचे असेल तर तुम्हाला बोलावंच लागेल.. "," ठीक आहे... मी सहसा त्या गोष्टी कोणाबरोबर share करत नाही... कारण तेव्हा कायदा यावरचा माझा विश्वास उडाला होता... पण तुम्ही वचन दया कि या गोष्टी बाहेर जाणार नाहीत म्हणून."," हो सर, हि गोष्ट आपल्या तिघांमध्येच राहील" , अभी बोलला. " OK , १२ वर्षापूर्वी जी घटना घडली होती,त्याची माहिती तर तुम्ही मिळवलीच असेल ना... त्यात ६ जणांवर आरोप केला गेला होता, परेश सर ती केस handle करत होते. सर्व तयार होते... साक्षीदार, पुरावे,वकील... सगळी तयारी होती... पण कुणास ठाऊक , अचानक सगळे पुरावे गायब झाले... साक्षीदारांनी साक्ष फिरवली.... आणि त्यात अडकले ते सागर देशमुख…. सर्वाना माहित होतं कि एवढे सच्चे , इमानदार माणूस असं काही करणार नाही... पण नंतर मिळालेले पुरावे त्यांच्या विरुद्ध होते... तरी देखील... सागर सरांकडे एक पुरावा होता कि जो कोर्टात हजर केला तरी ते सहा जण त्यात अडकणार होते... त्या अगोदरच बातमी आली कि त्यांनी विष पिऊन आत्महत्या केली... तसं त्यांनी एक Letter सुद्धा लिहून ठेवलं होतं कि मीच चोरी केली आहे म्हणून मी आत्महत्या करत आहे... अक्षरही त्यांचाच होतं त्यामुळे ती आत्महत्याच आहे हे साफ होते. पण त्यांच्या कुटुंबाने खुनाची केस केली होती.... ३ महिने त्यांची बायको यायची केससाठी.... मात्र नंतर कोणीच हजर राहिलं नाही केसला, त्यामुळे कोर्टाला ती केस बंद करावी लागली. " अभिच्या सरांनी माहिती पुरवली. " मग सर , त्या दोन्ही केसेसची कागदपत्र,पुरावे ... फाईल कुठेच कसे नाहीत?" अभी म्हणाला,"तेच तर... आम्हीही त्यावेळेस खूप ठिकाणी शोधलं, कितीतरी दिवस आम्ही फक्त तेच शोधत होतो, पण नाहीच भेटलं... कोणी म्हणायचं परेश सरांनीच त्या फाईल गायब केल्या. पैसे देऊन साक्षीदारांना फिरवल. कारण त्यांचाही नावं होतं ना केस मध्ये."," मग आता सर त्या फाईल कुठे गायब झाल्या त्या कस कळणार... "," आम्ही तेव्हा सर्व ठिकाणी शोधलं होतं, फक्त परेश सरांच्या घरी आम्हाला permission नव्हती. कदाचित तिथे त्या फाईल असल्या तर मिळतील, माझी permission आहे तुम्हाला." आणि अभी व महेश लगेचच परेश सरांच्या घरी जाण्यास निघाले.

             रात्र झाली होती. महेशनी सगळी माहिती लिहून घेतली होती आणि अभी आता गाडी चालवत होता...... इतक्यात महेशच्या पेनाची शाई संपली. " पेन दे रे जरा… अभी." ," तो घे ना, तिकडे ठेवला आहे तो.. " महेशने बाजूलाच असलेला पेन उचलला आणि लिहू लागला. परंतु जेव्हा जेव्हा लिहायचा प्रयन्त करायचा तेव्हा त्याची रिफील आतंच जायची.. " कोणाचा पेन आणलास रे... खराब आहे वाटते, सारखी आत जाते रिफील.. " अभिने पेन पाहिला.. " अरे हो, त्या लेखिका ... सुप्रिया madam चा पेन आहे तो... त्यांचा सेक्रेटरी विसरला होता ना आपल्याकडे... माझा भाऊ सुद्धा हेच म्हणत होता, कश्या लिहितात देव जाणे एवढे लेख.. " महेशने वैतागून तो पेनच उघडला, काय गडबड आहे ते पाहण्यासाठी आणि तशीच अभिला त्याने गाडी थांबवायला सांगितली. " काय रे काय झालं एवढं... ? " लगेचच महेशने त्याला पेनाची रिफील दाखवली." तू म्हणत होतास ना, सवय कोणतीही असो .... एकदा लागली कि लागली.... आणि हि रिफील सुद्धा तशीच कट केली आहे."," याचा अर्थ ? खून त्या लेखिका करत आहेत ? त्यांचाच पेन आहे ना " ,"काही कळत नाही… पण त्या तर बोलल्या काही मदत लागली तर contact करा ..... मग त्या कश्या खून करू शकतील ? " ," आता काय करायचं ... पुण्याला जायचं का ? " ," ते नंतर..... कारण शेवटची व्यक्ती " नीलम" कोण आहेत ते तरी कळलं पाहिजे .... निदान त्या पेपर्समध्ये त्यांचा फोटो तरी असेल... " तशी अभिने लगेचच गाडी स्टार्ट केली आणि परेश सरांच्या घरी आले दोघेही . 

             दोन रूममध्ये परेश सर आपल्या महत्वाच्या गोष्टी ठेवायचे. तिथे जाण्यास कोणालाच permission नव्हती,म्हणून अगोदर जेव्हा अभिने तपास केला होता तेव्हा तो त्या रूम मध्ये जाऊ शकला नव्हता. आणि आता त्याने permission आणली होती. " महेश.... तू त्या रूममध्ये शोध … मी इकडे शोधतो.. "," ठीक आहे.. चल लवकर.. " आणि दोघांनीही शोधाशोध सुरु केली. अर्धा तास झाला असेल. " महेश , चल लवकर..... " अस अभी ओरडतच बाहेर आला. महेशला कळेना काय झालं ते," काय झालं ? " , " चल , वेळ नाही आहे आपल्याकडे... बसं गाडीत पटकन… सगळं सांगतो... " दोघेही गाडीत बसले. " पुण्याला जायचं आहे आपल्याला आता... तू तयार आहेस ना आणि त्या madam चा पत्ता आहे ना.. " अभीने महेशला विचारलं," हो रे ... पण काय झालं ते तर सांग... "," सांगतो..... आता किती वाजले आहेत?"," आता , रात्रीचे १२ वाजले आहेत." ," म्हणजे पुण्याला पोहोचायला ४ तासाप्रमाणे आपण ३ च्या सुमारास पोहोचू... " अभी म्हणाला "अरे ... पण उद्या निघू ना सकाळी... एवढ्या रात्रीचा कशाला ? " महेश म्हणाला " तू पहिला दोघांच्या घरी फोन करून सांग कि आपण पुण्याला चाललो आहोत ते… मग मी सांगतो... " अभी गाडी चालवत म्हणाला. महेशनीही call करून घरी कळवलं. " आता सांग, कसली एवढी घाई आहे..... " , " लेखिका सुप्रिया यांचा खून होणार आहे... ", " हे कसं शक्य आहे ? .... त्यांना आपण पकडायला चाललो आहोत कि वाचवायला... " , " वाचवायला .. " ," शिवाय.... त्यांचा खून कसा होऊ शकतो... खून तर नीलम चा होणार आहे ना... " ," हो.... सुप्रिया याचं लग्नाअगोदरच नावं " नीलम" आहे... ती फाईल उघडून बघ, त्यांचा फोटोसुद्धा आहे... " लगेच महेशने ती फाईल उघडून पाहिली. सहा जणांची संपूर्ण माहिती होती... त्यात सर्वात शेवटी माहिती होती ती सुप्रिया यांची फोटोसहित… " हो रे... नीलम म्हणजेच सुप्रिया... आणि या माहितीनुसार यांचा वाढदिवस... परवा आहे, म्हणजे काहीही करून आपल्याला आजच पोहोचावं लागेल तिथे... " ," म्हणून मी आजचं पुण्याला जायचं ठरवलं... म्हणजे आपण खुन्याला खून करण्या अगोदर पकडू शकतो... " अभी म्हणाला... " means तुला खुनी कोण आहे ते माहित आहे.. " महेशने अभिला विचारलं. " हो म्हणून तर घाई करतो आहे मी.. " म्हणत त्याने गाडीचा speed वाढवला.. पुढे हायवेवर एक अपघात झालेला असल्याने प्रचंड ट्राफिक लागलेलं... " शट यार... जेव्हा कधी लवकर पोहोचायचं असते तेव्हाच ट्राफिक लागते नेहमी... "," शांत हो अभी... कशाला तापतोस एवढा.. " ," अरे त्याला पकडायला हात शिवशिवत आहेत रे.. "," तू मला अजून तो कोण आहे ते सांगितलं नाही आहेस." ," सुप्रिया madam चा खुनी नीरज .... तो खुनी आहे.. " हे ऎकून महेशला shock बसला.. " तुला कसं कळल.. "," सागर देशमुख यांच्या कुटुंबात फक्त तीनच व्यक्ती होत्या... स्वतः ते , त्यांची बायको आणि त्यांचा १५ वर्षाचा मुलगा.. आणि लहान मुलांना permission नसते कोर्टात येण्याची... त्यामुळे त्यांची बायकोच यायची केससाठी... शिवाय त्या माहितीप्रमाणे त्यांचा मुलगा नाशिकला शिकायला होता त्यावेळेस, म्हणून त्याला कोणी पाहिलच नाही.... नीरजच पूर्ण नावं आहे " नीरज सागर देशमुख" त्यांचा एक family फोटो देखील आहे बघ... आणि हे फक्त परेश सरांनाच माहित होतं वाटते... शिवाय धनंजय यांच्या घरी जो ग्रुप फोटो सापडला त्यातले दोन अनोळखी व्यक्ती म्हणजे एक सागर सर आणि दुसऱ्या नीलम उर्फ सुप्रिया... " महेशने तो फोटो पाहिला... तो नीरजच होता... " पण कशावरून तोच खून करत असेल…? " ," तुला अजूनही कळल नाही... तो पेन सुप्रिया madam चा नाहीच आहे... तो नीरजचा आहे.. त्या पेनाने लिहिताना तुला किती प्रोब्लेम येत होता... परत माझा भाऊसुद्धा तेच सांगत होता... पण जेव्हा निरजने त्यांचा पुण्याचा पत्ता याच पेनांने लिहिला, तेव्हा कसा त्याने पटापट लिहिला होता... कारण त्याला त्या पेनाची सवय आहे... तुला बोललो होतो मी ... कि तो पेनच मला खुन्यापर्यंत पोहोचवेल... नीरजच खुनी आहे.... " .

          ट्राफिकमुळे त्यांचा खूप वेळ वाया गेला. पहाटे ५ ला ते त्यांच्या पुण्याच्या घरी पोहोचले. घरी पोहोचता क्षणी , दारावरची बेल वाजवली महेशनी. आतून कोणताच प्रतिसाद आला नाही… मग पुन्हा बेल वाजवली… त्यावेळेस मात्र नीरजनीच दरवाजा उघडला.. तसा अभिने त्याच्या समोर पिस्तुल धरली आणि " Hands Up " सांगितले... त्यावर नीरज फक्त हसला आणि त्याने आपले हात वर केले... " महेश .... तू आत जाऊन madam ला बाहेर घेऊन ये.. त्यांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाऊया... " महेश धावतच गेला आत.. अचानक महेशचा आवाज आला," अभी लवकर आत ये.. " अभिने नीरजची कॉलर पकडली आणि त्याला आत घेऊन आला.. समोर बघतो तर सुप्रिया यांचा खून झाला होता.. अभिने नीरजला एका खुर्चीवर बसायला सांगितले... नीरज निमूटपणे जाऊन बसला... महेश आणि अभी , दोघेही हताशपणे मृत शरीराकडे पाहत होते... " Well Done , inspector अभिषेक आणि तुला सुद्धा शाबासकी Doctor महेश... तुम्हा दोघांबद्दल खूप ऐकलं होतं.. आज त्याचा अनुभवसुद्धा घेतला... " नीरज म्हणाला... " Shut up ... " अभी रागातच म्हणाला... " शांत हो अभी ... " महेशने अभिला शांत केलं... " का केलंस तू हे सगळं.. "माझा प्रतिशोध पूर्ण केला मी." , " त्यांनी काय केलं होतं तुझं... " ,"माझ्या वडिलांनी तरी काय केलं होतं... त्यांना मारलं तेव्हा कुठे होते पोलिस... काय चूक होती त्यांची... इमानदार होते म्हणून... सगळे पुरावे गायब केले, साक्षीदारांना फिरवलं... काय आमची चूक होती.. " ," अरे पण केस का मधेच बंद केलीत तुम्ही.. " ," केस चालवायला पैसे नकोत... माझ्या आईने सर्व काही दिलं... पैसे, दागिने, ... आमची बाजू खरी होती तरी कोणीही मदत नाही केली आम्हाला... आईचं कश्यावरच लक्ष नाही राहिलं.. माझ्याकडे नाही … स्वतःच्या तब्बेतीकडे नाही.. आजारी पडली ती.. मी तर तेव्हा १५ वर्षाचा होतो... शिक्षण सोडून आलेलो... काय कमावणार... मदत मागितली तर मला " आम्ही चोरांना मदत करत नाही" असे म्हणायचे…medicine ला पैसे नाहीत… तशीच ती गेली मला सोडून... एकटा पडलो मी... माझं सगळं कुटुंब संपवलं त्यांनी... तेव्हाच मी ठरवलं कि या सगळ्यांना संपवायचे... काहीही झालं तरी.. " नीरज सांगत होता... "मग तू एवढी वर्ष कुठे होतास ? " , महेशने विचारलं... " या सगळ्यांची माहिती गोळा करत होतो... कारण सगळेच वेगळे झाले होते, त्यानंतर मी एकेकाचा विश्वास जिंकत गेलो... गेल्या १० वर्षात सातही जणांकडे मी जॉबला होतो... " ," त्यामुळेच तू त्यांच्या रूममध्ये कधीही जाऊ शकत होतास.. CCTV कॅमेरे बंद करत होतास... " , " आणि माझ्या वडिलांना त्यांनी विष देऊन मारलं होतं , तेही त्यांच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी…. मग मीहि त्यांना तसंच मारलं."," सुप्रिया यांचा वाढदिवस तर परवा होता... मग त्यांना आज का मारलस.. "," त्यांच्या वाढदिवसाची तारीख चुकीची आहे त्या पेपर्समध्ये... त्यांचा वाढदिवस आजच होता…. म्हणून त्यांना आज मारलं मी.. " नीरजने आपलं बोलणं संपवलं. 

          आता तिघे शांत बसले होते... थोड्यावेळाने अभी उठला... " तुझी अवस्था मी समजू शकतो तरीसुद्धा तू पोलिसांची मदत घ्यायला पाहिजे होती... कायद्याची मदत घ्यायला पाहिजे होती.... तुला आता मला arrest करावंच लागेल." अभी बोलला. " कायद्याची मदत... ? " नीरज हसतच म्हणाला." त्यांनीच तर फसवलं आम्हाला... तुमच्या परेश सरांनी तर पुरावेच गायब केले. मग कसा विश्वास ठेवायचा कानून व्यवस्थेवर... सांग ना.. " अभी तसाच उभा होता. " माझ्या वडिलांनी ज्यांच्यावर एवढा विश्वास ठेवला.... त्यांनीच त्यांचा घात केला... माझ्या पप्पांना त्या सर्वांचा खूप अभिमान होता.. त्यांच्याबद्दल खूप सांगायचे ते... त्यांना कुटुंबातले मानायचे, माझे पप्पा त्यांना "सप्तसूर" म्हणायचे.... आणि स्वतःला ते त्या सुरांमधला वरचा " सा " मानायचे. ते नेहमी म्हणायचे.. ' हे सप्तसूर एकत्रच राहावे सदैव...  ' पप्पांच्या death नंतर सगळेच विखुरले गेलेले.. त्यांना मी फक्त एकत्र आणण्याचे काम केलं… बस्स." महेश आणि अभिषेक नुसतेच ऐकत होते.... " मला सगळ्यांना एकत्र आणायचे होते…. माझ काम संपलं... आता मीही जातो माझ्या कुटुंबाकडे... " तसा तो पटकन उठला आणि टेबलावर ठेवलेल्या पिस्तूलमधून त्याने स्वतःलाच गोळी मारून घेतली..... काही कळायच्या आतच हे सगळ घडलं. अभिषेक काहीच करू शकला नाही.… महेशही तसाच बघत राहिला. थोडयावेळाने अभी भानावर आला... लगेचच त्याने पुण्यातील पोलिसांना फोन केला आणि तिथे बोलावून घेतले. 

         त्या पोलिसांनी , महेश आणि अभिषेकची जबानी घेतली आणि त्यांना जाऊ दिलं.महेश घराबाहेर पडला. आणि अभी मात्र तसाच उभा होता, नीरज शेजारी.शेवटची नजर टाकली त्याने आणि तोही घराबाहेर आला. महेश त्याची वाट पाहत होता ,"काय करायचं केसचं अभी... ?" महेशने त्याला विचारलं... "नीरजने काही चुकीचं काम केलं असेल असं नाही वाटत मला... जे त्यांनी त्याच्या कुटुंबासोबत केलं होतं , तेच नीरजने त्यांना परत केलं.... खरं तर हे ... परेश सरांचे काम होते, त्याला न्याय मिळवून दयायचं... पण त्यांनीही... ... नीरजने तर समाजातली घाण साफ केली रे फक्त.... जी आपल्याला करायची होती.... आणि केसचं बोलतोस तर.... केस त्याने स्वतःच close केली आहे... चल गाडीत बस.... " दोघेही गाडीत बसले.. कुणास ठाऊक ,…अभिषेक पुन्हा गाडीतून उतरला. त्याने महेशला Driving seat वर बसायला सांगितले. तसा महेश बसलाही. " नाही रे... आज तू driving कर.... खूप दिवस झोपलो नाही आहे.... आणि आज एका चांगल्या माणसालाही भेटलो.... निदान त्याच्यामुळे तरी आज झोप येते का ते बघतो. " आणि महेशने गाडी स्टार्ट केली. गप्पा मारत महेश गाडी चालवत होता. बोलता बोलता त्याने अभिषेककडे नजर टाकली. तो तर कधीचाच झोपला होता, एकदम शांत झोप.......       



------------------------------------------------------------The End----------------------------------------------------------


Wednesday, 23 April 2014

रहस्य सप्तसुरांच..... (भाग १)

                रात्री १२ ची वेळ .....अभिषेक त्याच्या बाईकवरून एकटाच येत होता. रस्त्यावरून कोणीही नाही.... फक्त आणि फक्त त्याचीच बाईक धावत होती रस्त्यावरून......... त्यात मुसळधार पाऊस कोसळत होता.... रस्त्यावरचे खड्डे चुकवत अभिषेक बाईक चालवत होता. रेनकोट घातलेला असला तरी पूर्णपणे भिजून गेलेला होता.... रस्त्यावरचे दिवे तर आतमध्ये पाणी गेल्याने काही ठिकाणी बंदच होते. अर्ध्या रस्त्यावर प्रकाश तर अर्ध्या रस्ता काळोखात बुडालेला.... वीजही मधेच कडाडत होती... त्यामुळे एक वेगळचं भीतीदायक वातावरण निर्माण झालं होतं.... तरीही अभिषेक घरी यायला निघाला होता.... उशीरच झाला होता त्याला.... 

             कसाबसा अभिषेक त्याच्या एरियात पोहोचला. तिथेही काही वेगळ वातावरण नव्हतं... हवा सुटलेली... त्यात मुसळधार पाऊस ... वीज तर आकाशात धिंगाणा घालत होती.. आणि त्याची बाईक बंद पडली... " शट्ट यार.... हिला काय आताच बंद पडायचं होतं ? ".....  खूप प्रयन्त केला त्याने , पण ती बंदच होती.... घडयाळात बघितलं त्याने ..... १२.१५ झाले होते . मग करणार काय ? बाईक ओढत ओढत तो घेऊन जाऊ लागला.... mobile बाहेर काढला तर पावसात भिजून बंद होणार म्हणून तो bag मध्येच राहू दिला... तसं घर आता जवळच होतं परंतु बंद पडलेली बाईक , सुसाट वाहणारा वारा, त्यात पाऊस या combination मुळे अभिषेक वैतागला होता...... कसाबसा पोहोचला घरी… बघतो तर काय... घरात काळोख... त्याने बाजूला डोकावून पाहिलं... " अरेच्या... आजूबाजूला तर लाईट आहे.... आमच्याच घरातली गेली वाटते... " अभिषेकचं घर तसं मोठ्ठ होतं.... बंगलाच जणू काही. त्याच्याबरोबर त्याची बायको, एक नोकर, आई-बाबा आणि लहान भाऊ राहायचे. पण आज कोणीच बाहेर आलेले नव्हते...... अभिषेकनी बाईक बाहेरच उभी केली. भिजलेला रेनकोट काढला आणि दाराबाहेरच्या कुंठीवर अडकवला.... दारावरची बेल वाजवली.... बेल सुद्धा बंद... " काय झालंय इकडे.. " दारावर त्याने थाप मारली.... एकदा ... दोनदा.... आतून कोणाचा प्रतिसाद नाही... दरवाजा त्याने हातानेच ढकलून पाहिला तर दरवाजा उघडाच होता... " दरवाजा उघडा कसा ? " अभिषेकला आता संशय येऊ लागला होता… तसाच तो आतमध्ये आला.... मिट्ट काळोख घरात.. पुढचं काहीच दिसत नव्हतं... बाहेर आकाशात वीज चमकली तरच काहीतरी दिसत होता... चाचपत तो घरात आला..  आणि त्याच्या बायकोला ... आई-बाबांना, भावाला हाक मारू लागला.... कोणताच प्रतिसाद नाही... तेवढ्यात .... " आलात साहेब.... मी तुमचीच वाट बघत होतो."असा आवाज आला, त्याच्या मागून... मागे वळून बघतो तर त्याचा नोकर मेणबत्ती पकडून उभा... 

              केवढा दचकला अभिषेक..... heart attack यायचा बाकी होता त्याला.. " गाढवा... असं कोण येत का समोर " अभिषेक बोलला ," आणि बाकीचे कुठे आहेत…. लाईट का घालवली आहेस .. " ,"लाईट गेली आहे साहेब , म्हणून मेणबत्ती पेटवली आहे."," आणि बाकीचे कुठे गेले सगळे ? " त्यावर नोकर काही बोलला नाही....... " अरे गधड्या.......... तुला विचारतो आहे मी ", मख्ख चेहऱ्याने नोकर म्हणाला ," चला.... तुम्हाला पण पोहोचवतो तिथे.... " .... आणि तो पुढे चालू लागला... अभिषेकला नक्कीच काहीतरी गडबड आहे याची खात्री पटली होती. तो नोकर त्याला आवडायचाच नाही. काहीतरी वेगळ्याच स्वभावाचा होता तो. संशयी नजर... कामात चोख असला तरी... वेगळाच वाटायचा तो अभिषेकला... अभिषेकला तो main hall मध्ये घेऊन आला. " काय झालं .. थांबलास का ? " अभिषेकने त्याला विचारलं. " असंच.... तुम्हाला काही द्यायचं आहे... हि मेणबत्ती पकडा जरा... " अभिषेकने एका हाताने मेणबत्ती पकडली आणि दुसऱ्या हाताने तो आपली पिस्तुल शोधू लागला. पण पिस्तुल तर बाईक वरच राहिली होती. नोकर वळला. तसा अभिषेकने त्याच्या हातात सुरी बघितली... " काय करतो आहेस हे? " अभिषेक घाबरतच म्हणाला ," नाही.... तुम्ही बोलला होतात ना... बाकीचे कुठे आहेत ते... त्यांच्याकडे घेऊन जातो तुम्हाला... " त्याच्या नोकराने सुरी त्याच्यासमोर रोखून धरली.... जणू काही तो कोणत्याही क्षणाला त्याच्या छातीत भोसकणार.. तेवढयात....तेवढयात....आकाशात पुन्हा वीज जोरात कडाडून गेली.... आणि अभिषेकच्या हातातली मेणबत्ती विझली. पुन्हा भयाण शांतता ... आणि अचानक... घरातले सगळे दिवे लागले... " surprise " घरातली सगळी मंडळी एकत्र बोलली आणि गाऊ लागली .... Happy Birthday To You, Happy Birthday To You, Happy Birthday To Dear अभिषेक ,Happy Birthday To You.........  सगळे होते.. अभिषेकच कुटुंब.... त्याचे मित्र-मैत्रीण... शेजारी.. " अरे... हो... आज माझा वाढदिवस आहे... विसरलोच मी... " अभिषेक मनातल्या मनात हसत बोलला... समोर केक होता.... आणि नोकर अजूनही हातात सुरी घेऊन उभा होता...अभिषेकने पुढे येऊन त्याच्या डोक्यावर टपली मारली आणि सुरी घेऊन केक कापला. खूप छान पार्टी जमली होती त्या रात्री.... " काय Inspector अभिषेक ...... घाबरवलं ना तुम्हाला... " त्याची बायको पुढे येऊन बोलली.त्यावर अभिषेक हसला. " घाबरलो... अगं heart attack आला असता मला... खरंच खूप छान surprise होत .. मी कधीच विसरणार नाही हे... "," happy birthday अभी... " अभिषेकचा बेस्ट friend " महेश पुढे येऊन म्हणाला, " काय डॉक्टर साहेब, तुम्हाला पण आठवण होती वाटते माझ्या वाढदिवसाची... " अभिषेक म्हणाला," Inspector, कामात असताना थोडं घरीही देत जावा जरा... " आणि अभी ने पुढे होऊन महेशला मिठी मारली. 

               अभिषेक Inspector होता आणि महेश डॉक्टर होता .... दोघेही एकत्रच काम करायचे. पोलीस Department साठी... लहानपणापासून मित्र होते ते ... एकत्र वाढलेले... एकत्र शिकलेले... दोघानांही पोलिसात जायचे होते. अभिषेकची निवड लगेच झाली. पण महेशची उंची थोडी कमी असल्याने त्याची निवड झाली नाही. मग त्याने डॉक्टर बनून पोलिसांची medical team join केली. वेगळ्या Department मध्ये असूनही मैत्री तरीही तशीच होती दोघांची. खूप केसेस त्या दोघांनी मिळून सोडवल्या होत्या. म्हणून त्या दोघांची जोडी फ़ेमस होती.... 

               दुसरा दिवस उजाडला.... छान झोप झाली होती. रात्री पार्टीही उशिरापर्यंत चालली होती आणि आज सुट्टीचा दिवस... रोज सकाळी लवकर उठणारा अभी... आज सकाळी १० वाजता उठला... छान फ्रेश वाटतं होतं त्याला, सुट्टी असल्याने आणि वाढदिवस... मूड चांगला होता, कुठेतरी बाहेर जाऊया फिरायला असा त्याने मनात plan केला. अंघोळ करून तो तयार झाला. सगळ्या कुटुंबाला आपला plan सांगणार इतक्यात त्याचा mobile वाजला,पोलिस स्टेशन मधून call होता," हेलो... बोला काय झालं ? " , अभिषेकने विचारलं," हेलो सर.... प्रसिद्ध संगीतकार " सागर " यांचा खून झाला आहे.. तुम्हाला लवकर यावं लागेल... त्यांच्या घरी.. "," ठीक आहे.. निघतोच मी." सगळा plan रद्द . अस अनेकवेळा झालं होतं, त्यामुळे कुटुंबाला त्याची सवय झाली होती. अभी काही बोलण्याच्या आधीच त्याची बायको बोलली," मला काही problem नाही , Duty first " .

             थोड्याच वेळात अभिषेक पोहोचला तिथे... मिडियावाले तर कधीच पोहोचले होते.. त्यांच्या रूम मधे पोहोचला अभी.... तसे बाकीचे पोलीसही होते तिकडे.. " सर, यांच्या नोकराने फोन करून सांगितलं आम्हाला.. " , "OK , काही मिळालं का घरात ? पुरावा वगैरे ."," नाही सर, फक्त एक letter मिळालं आहे .... त्यातलं वाचून काहीच कळलं नाही आम्हाला.. " ," बघू इकडे... आणि बॉडी post-mortem साठी पाठवा." अभीने Letter उघडून पाहिलं... त्यात काहीतरी वेगळाच मजकूर होता," संगीतातले सात सूर कधीच वेगळे राहू शकत नाहीत... सप्तसुरांना मी एकत्र करणार... पुन्हा " डोक्याच्या वरून गेलं अभिषेकच्या... खोलीत त्याने अजून काही पुरावा मिळतो का ते पाहू लागला. रूम मधील सामान होते तसेच होते. कसलीच तोडफोड नाही, उलटा-पालट नाही, मारामारी ... झटापट अस काहीच झालं नव्हत रूममध्ये.... चोरी झाली नव्हती, पैसे... दागिने... कसलीशी महत्वाची कागदपत्र.... सगळ जागच्याजागी होतं…. टेबलावर कपबशी होती तेवढी.. " याचा अर्थ , खुनी.. ओळखीचा व्यक्ती होता.. टेबलावर २ कप आहेत.... घरातल्या वस्तू तशाच आहेत... काहीच चोरी झालेली नाही,मग खून कशाला केला असेल त्याने... " , गोळी मारली होती त्यांना… आणि पिस्तुल बाजूलाच ठेवली होती.. पुरावा म्हणून त्याने ते दोन्ही कप आणि पिस्तुल बरोबर घेतली. 

            काहीच तपास लागत नव्हता. दुसऱ्याच दिवशी "सागर" यांचा वाढदिवस होता आणि त्या अगोदरच , आदल्यादिवशी त्यांचा खून झाला होता,खूप पाहुणे आले होते.. त्या सगळ्यांचे बोटांचे ठसे घेण्यात आले. एक गोष्ट होती मात्र कि बाहेरचा कोणीही अनोळखी व्यक्ती नव्हता तिथे... आणि कोणाचेही ठसे त्या पिस्तुलवर किंवा दुसऱ्या कपावर नव्हते. शिवाय सगळी पाहुणे मंडळी.. या " बडया " व्यक्ती होत्या. मोठी नावाजलेली माणस होती. त्यामुळे कोणावरही संशय घेऊ शकत नव्हता अभिषेक... सगळ्यांना त्यांच्या घरी सोडण्यात आले. post mortem चा रिपोर्ट आणण्यासाठी तो स्वतः पोहोचला डॉक्टर महेशकडे. " काही तपास लागला का अभी.. ", " नाही रे .... काहीच कळत नाही, कोणताच पुरावा नाही मिळत, कोणाचे बोटांचे ठसे नाही.. तुझा रिपोर्ट काय म्हणतो ? " ," रिपोर्ट जरा विचित्र आहे." ," काय विचित्र ? " , " त्यांची हत्या गोळी मारून नाही झाली आहे." ," काय बोलतो आहेस तू ? " ,"त्यांना विष देण्यात आलं होतं.","मला जरा सविस्तर सांग .","त्यांना जेव्हा त्याने गोळी मारली तेव्हा ते अगोदरच मेलेले होते."," मग गोळी का मारली असेल ? " ," कदाचित confirm करण्यासाठी.... "," आणि पिस्तुल वर कोणाचे ठसे मिळाले का ? " ," नाही , एक गोष्ट आहे... पिस्तुल त्यांचाच आहे.... त्यांनी safety साठी ठेवलेलं असेल कदाचित.... "," कोणत विष वापरलं होतं ? "  ," हं ... हेच तर सांगायचे आहे तुला.... खुन्याला science ची चांगली माहिती आहे.... कारण त्याने अगदी साधं विष वापरलं होतं... ","म्हणजे रे " ," मला त्यांच्या शरीरात Plaster of Paris चे कण मिळाले... शिवाय त्या कपात तर तेच सापडलं... " ," मग त्याने काय होणार आहे?"," हेच तर..... जास्त कोणालाच माहित नाही आहे.... Plaster of Paris ची थोडी पावडर जर दुधात किंवा दुधापासून बनणाऱ्या पदार्थात mix केली तर ते एक slow poison बनते. यांनी तर चहा घेतला असणार.... त्यात आरोपीने ती पावडर mix केली असेल... सुरुवातीला काहीच जाणवत नाही… मात्र नंतर त्याचा प्रभाव जाणवू लागतो,किमान २ तासांनी माणूस जीव सोडतो." डॉक्टर महेशने सांगितलं," चांगली माहिती दिलीस मित्रा.. आणि ते पत्र... त्यावरून काही कळल का ?"," हा..... ते जे काही लिहिलं आहे ते कळण्यापलीकडे आहे पण ते अक्षर " सागर " यांचाच आहे. म्हणजे त्या खुन्याने त्यांच्याकडून लिहून घेतलं असेल... मरण्याअगोदर... " सगळीच गुंतागुंत होती.... 

           आठवडा झाला तरी काहीच सुगावा लागत नव्हता.... पुरावे काहीच नव्हते.होतं ते फक्त ते Letter. चौकशीसाठी त्यांच्या नोकराला पोलिस स्टेशनमध्ये बोलावले," शेवटची तुझी भेट कधी झाली होती ?"," रात्री १० वाजता... ","आणि त्यांनतर कोण भेटायला आलं होतं का त्यांना?","त्यांचा सावत्र मुलगा आलेला भेटायला... ११ वाजता,पण तो लगेचच बाहेर पडला... १०-१५ मिनिटात…" डॉक्टरच्या रिपोर्ट नुसार " सागर " यांचा मृत्यू रात्री ३ ते ४ दरम्यान झाला होता... " म्हणजे त्यांना.... विष साधारणपणे १,२ च्या सुमारास दिलं असणार... याचाच अर्थ त्यांच्या सावत्र मुलाचा यात काही हात नसणार... मग नक्की आहे तरी कोण ? " बरं... CCTV मधून काही मिळालं असतं तर तेही आरोपीने येण्याअगोदर बंद करून ठेवले होते. विचार करत करत २ आठवडे निघून गेले.. तपासाला काहीच गती येत नव्हती, सारखा तोच विचार अभिषेकच्या मनात... 

           " आज काहीतरी नक्की भेटलं पाहिजे ." असा विचार करून अभिषेक पोलिस स्टेशनमध्ये आला..खुर्चीवर बसणार तोच त्याचा फोन वाजला, " hello, Inspector अभिषेक " ,"yes सर.... बोला.. " अभिच्या सरांचा फोन होता... " अभिषेक... एक केस आहे... तुम्हाला तातडीने पोहोचावं लागेल.. " ," OK,सर .. कुठे जायचे आहे ? "," क्रिमिनल लॉयर " रेशमा टिपणीस" यांचा काल त्यांच्या घरी खून झाला आहे. लवकरात लवकर पोहोचा तिथे." अभिषेक तसाच पोहोचला तिथे.... मिडिया तर त्याच्याही अगोदर पोहोचली होती तिकडे," या मिडीयाला अगोदर कशी माहिती मिळते."," माहित नाही सर... आमच्याही अगोदर हे आलेले होते. " ," त्यांना बाहेर करा आधी.... तपासात गडबड होईल नाहीतर.... " तसं हवालदारने त्यांना सगळ्यांना बाहेर काढलं.... अभिषेकने तपास सुरु केला.... पुन्हा तसंच सगळं... गोळी मारून हत्या... पुरावे काहीच नाहीत.. चहाचे कप... तसंच Letter , तोच मजकूर.... रूम मधल्या सगळ्या वस्तू जागच्या जागी.... post mortem चा रिपोर्ट तोच... " हा खून... त्यानेच केला आहे.... ज्याने सागर यांचा खून केला होता.... पद्धतही तीच आहे. चहाच्या कपात पुन्हा मला Plaster of Paris ची पावडर मिळाली. त्यांच्या पोटातही तेच मिळालं... गोळीही त्यांच्या safety gun मधून मारली गेली आहे, तीसुद्धा त्या मेल्यानंतर.. ", " आणि अजून काही मिळालं का तुला तिकडे अभी.. "," बाकी काहीच नाही... ना बोटांचे ठसे.... ना काही पुरावे... मिळालं ते letter आणि तोच मजकूर.... "संगीतातले सात सूर कधीच वेगळे राहू शकत नाहीत... सप्तसुरांना मी एकत्र करणार... पुन्हा " कश्यासाठी खून होत आहेत ते कळतच नाही आहे. " 

           सागरप्रमाणे रेशमा यांचाही खून त्यांच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी झाला होता.... दोन्ही खुनात खूप साम्य होतं.... खून रात्रीचाच झाला होता, साधारण ३-४ च्या दरम्यान... CCTV बंद करून..... वाढदिवसासाठी आलेले पाहुणे, त्यातही कोणीच नव्हतं.. संशय घेण्यासारखं... एका महिन्यात २ प्रसिद्ध व्यक्तीची हत्या आणि अभिषेक व डॉक्टर महेश या दोघानाही आरोपीला पकडण्यात यश आलं नव्हतं. खूप तपास चालू होता, दोन्ही हत्येचा… कसलेच धागेदोरे हाती लागत नव्हते.... पुरावेच नव्हते त्यांच्याकडे.... मग कोणाला अटक करणार... २ महिने होत आलेले , तरी काहीच प्रगती नव्हती. अभीवर सुद्धा त्याच्या मोठ्या अधिकारीचं प्रेशर होतं. हल्ली रोज उशिरा येऊ लागला होता अभिषेक घरी. दोन्ही केसेस मध्ये बुडून गेलेला अगदी तो.. अशातच एका सकाळी , तो नुकताच आंघोळ करून चहा घेत होता, तयारीसुद्धा झाली नव्हती आणि त्याला call आला ... " Hello सर, TV लावा लवकर , Breaking News आहे... " ," काय आहे ? " अभिषेकने वैतागूनच फोन कट केला आणि TV चालू केला, " प्रसिद्ध नृत्यदीरदर्शक गजेद्र यांचा त्यांच्या राहत्या घरी खून झाला आहे... पोलिस तपास करत आहेत.. " पुढंच काहीच त्याने ऐकल नाही. अभी ने तशीच पोलिसची वर्दी चढवली आणि निघाला तो घटनास्तळी. मिडिया नेहमी प्रमाणे त्याच्या अगोदर पोहोचली होती. त्यांचा अभिषेकला खूप त्रास व्हायचा. त्यांच्याकडे एक नजर टाकून अभी त्यांच्या खोलीत पोहोचला, बाकीचे पोलिस इतर ठिकाणी तपास करत होते... अभिषेकने एक नजर फिरवली रूममध्ये... पुन्हा तसच सगळं.... कुठेही तोडफोड नाही, मारामारीची चिन्ह नाहीत... तशीच " Well Plan Murder "... तेच Letter, तोच मजकूर.... एकच गोष्ट वेगळी होती ती म्हणजे चहाचे कप नव्हते.त्याऐवजी एक रिकामा ग्लास होता तिथे... अभीनी तोही मग डॉक्टर महेश कडे पाठवून दिला.

         रिपोर्ट हि तेच होते, मागच्या दोन खुनांसारखे... फक्त त्या ग्लासमध्ये दुध होतं. " यावेळी त्याने चहाच्या ऐवजी दुधात पावडर मिसळली आहे. " महेशने अभी ला माहिती पुरवली. " तुला काय वाटते महेश.... कशासाठी खून करत असेल तो ? " अभिषेकने महेशला विचारलं," मलाही काही कळत नाही, तरीही काहीतरी कारण नक्की असेल त्याचं आणि त्या Letter वरून काहीच कळत नाही ना... " ," गेल्या ४ महिन्यात ३ नावाजलेल्या व्यक्तिच्या हत्या झाल्या आणि मला काहीच मिळत नाही. " ," कदाचित तुझ्याकडून काही सुटत असेल बघ " ," नाही रे . काहीच नाही... एकही पुरावा नाही मिळत... कुठेच त्याचे फिंगर प्रिंट्स नाही आहेत, Letter हि तो मरणाऱ्या व्यक्तीकडून लिहून नंतर त्यांना मारतो... CCTV बंद करतो... कसलाही आवाज न करता स्वतःचा काम पूर्ण करतो.. विचित्र आहे अगदी.. " ," अरे अभी... पण तूच म्हणतोस ना.... आरोपी कितीही हुशार असला तरी काहीना काही पुरावा मागे सोडतोच, मग आता काय झालं ? " , " नाहीच भेटत आहे रे पुरावा." मग दोघेही शांत झाले, थोड्यावेळाने दोघेही आपापल्या घरी गेले. 

          अभिषेकला तर झोपच लागायची नाही आता.. मिडिया खूप त्रास देत होती पोलिसांना... तिसऱ्याच दिवशी, अभिषेक पुन्हा काहीतरी शोधण्यासाठी " गजेंद्र " यांच्या घरी गेला, अगदी सकाळीच, त्याने शोधायला सुरुवात केली.... आणि त्याचा फोन वाजला.... हल्ली फोन वाजला कि त्याला तेच वाटायचं सारखं," Hello Inspector अभिषेक speaking... कोण बोलतंय... ? " , " Hello .... मी महेंद्र यांचा मुलगा बोलतो आहे.... लवकर या तुम्ही इकडे ... " , " Hello....Hello....काय झालंय नक्की .. "," माझ्या पपांना गोळी मारलीय कोणीतरी" तो रडतच सांगत होता. अभिने फोन कट केला... "सावंत... चला गाडी काढा लवकर... " , " काय झालं सर... आताच तर आलो होतो ना पुरावा शोधायला.. " ," हो... पण आपल्याला जावं लागेल ." ," कुठे सर ? " ," बिजनेसमन महेंद्र माहित आहेत ना... त्यांची हत्या झाली आहे."        

          अभिषेक त्याच्या टीमसहित पोहोचला त्यांच्या घरी, मिडीयाने त्यांना आल्या आल्याचं घेरलं..... ," काय करताय तुम्ही .... गेल्या ४ महिन्यात ४ था खून... तुम्ही पकडत का नाही खुन्याला... "अभिषेक काहीही न बोलता Dead Body जवळ आला... तीच पद्धत खून करण्याची... Letter लिहिलेलं... सगळं तेच पुन्हा... यावेळी मिठाईचा बॉक्स होता तिथे... खूप तपास करूनही काहीही नाही मिळालं. Dead Body आणि मिठाईचा बॉक्स त्याने चाचणीसाठी डॉक्टर महेश कडे पाठवून दिलं. विचार करतच तो बाल्कनीत आला,घराबाहेर मिडिया तशीच होती. त्यांचा तर अभिषेकला खूप राग यायचा. पण यावेळेस कुणास ठावूक.... त्याला त्यांच्याकडे बघून काहीतरी आठवलं. ," सावंत... त्यांच्यापैकी एकाला वर घेऊन या इथे माझ्याजवळ" ," OK सर... " तसं एका पत्रकाराला वर घेऊन आले... पत्रकार जरा घाबरलेलाच होता," काय झालं सर ? मी काही चूक केली आहे का ? मलाच बोलावलं म्हणून विचारलं मी... "," नाही... मला काही प्रश्न विचारायचे होते... विचारू का ? " तसा पत्रकार थोडा relax झाला. ," विचारा ना सर.. " ," आतापर्यंत ४ हत्या झाल्या... तुम्ही होतात ना प्रत्येक वेळेस तिथे... " ," हो सर , In fact आम्हीच पोहोचलो होतो... तुमच्याही अगोदर... " , " हेच..... हेच विचारायचे आहे मला... आमच्या अगोदर कशी खबर मिळाली प्रत्येकवेळेस .... " तसा पत्रकार जरा बावरला... " मला .... प्रत्येक वेळेस call आले होते... " ," कसले फोन ? " ,"हेच कि... यांचा यांचा खून झाला आहे…. तर त्यांच्या घरी पोहोचा लवकरात लवकर.. "," साधारण किती वाजता call यायचे ? " , " चारही वेळेस call पहाटे ४.३० लाच आलेले होते." ," आणि हे फक्त तुलाच आले होते कि खाली जमलेल्या मिडिया ला सुद्धा आले होते. " ," हो... बहुतेक सगळ्यांना call गेले होते, अगदी same timing ला.. " अभिषेकने अजून काही पत्रकारांना बोलावलं, त्यांचाही तेच उत्तर होतं... अभिषेकने त्या सगळ्यांची call History चेक केली.सगळ्यांनाच ४.३० ला call आले होते. नंबर मात्र वेगळाच होता. अभिषेक पोलिस स्टेशन मध्ये आला,  त्याने त्याच्या  computer expert ला विचारलं," हो सर, असा एक program आहे ज्यावरून सगळ्यांना एकत्रच call करता येतो."," कस काय ? " ,"एक program आहे... त्यात फक्त तुम्हाला तुमचा record केलेला message टाकायचा असतो आणि नंतर कोणाकोणाला तो call करायचा आहे त्यांचे नंबर टाकायचे... बसं.. सगळ्यांना एकदम call जातात. " चांगली माहिती मिळाली होती अभिषेकला. आता post mortem चा रिपोर्ट बाकी होता. 

           रिपोर्ट काही वेगळा नव्हता... तीच वेळ खून करण्याची... पण यावेळेस तिथे मिठाईचा बॉक्स सापडला होता," काय सापडलं मिठाई मध्ये.. ? " ," मिठाईत नाही, त्याच्यावर सापडलं.. " ," काय " ," मलाही तेच वाटत होतं कि पावडर मिठाईत mix करून दिली असणार... पण त्याने मिठाईवर पावडर टाकून त्यांना खायला दिली असेल.... "," असं होय....  " ," बाकी काही मिळाला का पुरावा वगैरे.. ", " नाही रे... खूनी भलताच हुशार आहे... काहीच मागे ठेवत नाही.. ","अरे हो... एक सांगायचं राहून गेलं तुला." तसा महेश उठला आणि एक पेन घेऊन आला.. " हे काय ? " , "हा पेन त्यांच्या मुठीत सापडला..... बहुदा याच पेनाने त्यांनी ते letter लिहिलं असेल, त्या खुन्याने त्यांच्याकडून लिहून घेतलं असेल... " अभिषेकने ते पेन पाहिलं... " यावर काही बोटांचे ठसे मिळाले का ? " ," हो.... फक्त " महेंद्र" यांचे ठसे होते पेनवर.","म्हणजे नक्की हा त्या आरोपीचा पेन असणार... अजून काही माहिती मिळाली का या वरून.. ",अभीने महेशला विचारलं," एक गोष्ट आहे…. हा पेन इतर पेनांपेक्षा थोडा लहान आहे... त्यामुळे नॉर्मल रिफिल्स यात जातंच नाहीत,म्हणून रिफीलचा मागचा भाग थोडा कट करावा लागतो... बघ पेन उघडून.. " अभिषेकने पेन उघडून रिफील बघितली... महेशच म्हणणं बरोबर होतं, त्याने रिफील थोडी कापली होती आणि तीही थोडी तिरकी," अशी का कट्ट केली रिफील त्याने ? " ," तो पेन बघ जरा... जिकडे पेनाचं बटन प्रेस करतो,तिथे थोड तिरकं बटन आहे म्हणून तिरका कट्ट दिल्याने रिफील बरोबर राहते एकदम."," आता हा पेनच मला कदाचित आरोपीकडे पोहोचवणार बहुतेक" अभिषेक बोलला. " ते कसं काय ? " डॉक्टर महेशने विचारलं. " तू एवढं सगळं पाहिलंस... पण महत्त्वाची गोष्ट विसरलास . "," ती कोणती ? " ," पेन जर निरखून पाहिलास तर कळेल... हा खुप जुना पेन आहे. मला तरी आठवते... साधारण ९-१० वर्षापूर्वी असे लहान पेन मिळायचे... आणि त्याचं वेळेस त्याच्या रिफील सुद्धा मिळायच्या... आता असले पेन मिळतही नाही आणि रिफ़िलही नाही."," मग या वरून तुला काय कळलं ? " डॉक्टर महेशने विचारलं," माणसाला जर एखादी सवय लागली.. मग ती चांगली असो किंवा वाईट ,ती सहजासहजी सुटत नाही. त्याचा पेन जरी आता आपल्याकडे असला तरी जेव्हा तो कोणताही नवीन पेन वापरायला घेईल तेव्हाही रिफील भरताना,तशीच कट्ट करेल. " अभीने आपला विचार मांडला." अरे अभी , मग आता काय तू सगळ्यांचेच पेन चेक करणार आहेस तू का ? ","जमलं तर तसही करू."

         ८ महिने होतं आले होते... त्या ४ हत्येचा शोध अजूनही लागला नव्हता.. तपासाला गती येत नव्हती.. अभिषेक आणि डॉक्टर महेश, यावरचे tension अजूनही तसंच होतं... आरोपी अजूनही मोकाट फिरत होता. अभिषेकची झोप कधीच उडाली होती. पहिलीच अशी केस त्याला मिळाली होती कि त्याने त्याला संपूर्ण हलवून सोडलं होतं..... घरी उशिरा येणं... रात्र-रात्रभर केस विषयी काम करत बसणं.. उशिरा झोपणं.. लवकर उठून पोलिस स्टेशनला जाणं. या सगळ्यांमुळे त्याची तब्येतही खालावली होती... असंच चालू होतं सगळं, आणि अशाच एका दिवशी, सकाळी.... पुन्हा... अभिषेक चा फोन वाजला," Hello सर , लवकर पोहोचा पोलिस स्टेशनमध्ये ."," काय झालं ? " ," सर,आपल्या Department चे परेश सर आठवतात ना.. "," हो... २ वर्षापूर्वी रिटायर झाले ते ना.. "," हो.... हो सर... त्यांचा खून झाला आहे."," काय ? " अभिषेक उडालाच. तसाच पोहोचला धावत धावत त्यांच्या घरी. तिकडे पोहोचल्यावर, तसंच सगळं पुन्हा.....मारण्याची पद्धत,Letter, चहाचा कप, तसचं सगळं... अभिषेकला काय करावं तेच कळत नव्हतं आता. पत्रकारांनाही त्याचं वेळेस call आले होते. २ पत्रकारांचे फोन रेकॉर्ड केले होते. आवाज रेकॉर्ड केलेला होता. त्यावरून काहीच कळलं नाही.विचार करून डोक्याचा भुगा झाला होता अभीच्या. त्याचा मित्र, डॉक्टर महेश सुद्धा त्याला काहीही मदत करू शकत नव्हता. " अभी, मला वाटते... तुला आरामाची गरज आहे .. " , " अरे .... कसा काय आराम करू... बघतो आहेस ना, ५ हत्या झाल्या…त्याची नावाजलेल्या लोकांच्या आणि मी काय करतोय.... काहीच नाही... त्यावर तू म्हणतोस आराम कर... कसा करू आराम.. " अभिषेक रागातच बोलला,  तसा महेश गप्प बसला....अभीला स्वतःच्याच बोलण्याचा राग आला, " Sorry यार, माझं डोकंच चालत नाही रे."," म्हणून तुला सांगतो मी... ,थोडा आराम कर... मग Fresh mind नी पुन्हा तपास सुरु करू... कसं " ," ठीक आहे... मी विचारून बघतो सरांना." दुसऱ्याच दिवशी त्याने त्यांच्या Senior अधिकाऱ्यांना सुट्टी बद्दल विचारलं... त्यांनाही माहित होतं कि गेले ८ महिने तो या केसेसमधे एवढा गुंतून गेलेला होता कि एकही सुट्टी घेतली नव्हती. त्याची तब्येतही खालावली होती… त्यांनी त्याला सुट्टी देण्याचे ठरवले." ठीक आहे, Inspector अभिषेक... तुम्ही ७ दिवस सुट्टी घ्या.. पण ८ व्या दिवशी कामाला वेळेवर हजर राहा. "  

          सुट्टी तर मिळाली होती पण शहरात राहिलो तर अभिषेकला तेच ते सतावत राहणार म्हणून त्याच्या बायकोने गावाला जाण्याचा निर्णय घेतला. तिकडे त्याचं मोठ्ठ घर होतं. तिकडेच गेले ते. तिथे खूप शांतता होती.आराम मिळाल्याने अभीला जरा बरं वाटलं होतं, त्याने त्या शांत जागी त्या केसेसचा पुन्हा नव्याने तपास सुरु केला.... दोन पूर्ण दिवस अभिषेकने त्या पाचही केसेसचा पूर्ण अभ्यास केला... " आज , काहीतरी भेटलं वाटते तुम्हाला.. "अभीच्या बायकोने त्याला विचारलं," काहीतरी नाही... खूप काही मिळालं... आता फक्त महेशला बोलावयाचे आहे इकडे... " लगेचच त्याने महेशला फोन करून गावाला बोलावून घेतलं आणि महेश पोहोचलाही लगेच." बोल अभी, काय एवढया तातडीने बोलावून घेतलंस." ," अरे.... केस संबंधी चर्चा करायची होती." , " हा... बोल, काय झालं ? " ,"OK.... पहिली तू सांग माहिती.. कि तुला आतापर्यंत काय काय माहिती मिळाली आहे.. " ," पहिली गोष्ट... खून हा रात्रीचाच होतो, ३ ते ४ दरम्यान... आरोपीला science ची चांगली माहिती आहे. Plaster of Paris हे दुधात किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थात mix केलं कि त्याचं slow poison तयार होते, हे त्याला माहित आहे. तेच देऊन तो लोकांना मारतो, त्यानंतर त्यांच्याच पिस्तुल मधून गोळीही मारतो.... दुसरी गोष्ट, आरोपी ओळखीचाच असणार.. कारण येवढ्या रात्रीचा एखाद्याच्या खोलीत जाणार... तेही दरवाजाचा lock न तोडता... मग तो ओळखीचाच असणार... शिवाय कोणतेही फिंगर प्रिंट्स मिळत नाहीत. याचा अर्थ तो कुठेही स्पर्श करत नसणार किंवा हातात glove घालत असणार.... कोणतेच पुरावे मागे ठेवत नाही,CCTV कॅमेरे बंद करतो. म्हणजेच त्याला पोलिसांची आणि ते कसा तपास करतात याची चांगली जाण आहे... बस्स एवढंच मला माहित आहे... तुला सांगतो ना अभी... एवढा चलाख , तल्लख बुद्धीचा माणूस मी अजून नाही बघितला कुठे..... बरं.... तुला काय सापडलं ते सांग. " 

           " या सुट्टीत, खूप काही गोष्टी पुढे आल्या. खूप अभ्यास केला मी या गोष्टींचा. तो आपल्यावर दबाव टाकण्यासाठी,  त्या मिडीयाला आधी call करतो... तेही computer वरून,वेगळीच पद्धत एकदम. या ५ खुनांमध्ये खूप गोष्टी common आहेत. तू बोलला होतास ना… काहीतरी नजरेसमोर आहे,पण ते दिसत नाही… " अभी बोलला," हो... बोललो होतो मी ... त्याचं काय ? " डॉक्टर महेश म्हणाला," त्याचं Letter वाचलस ना तू... तोच तर Clue आहे."," कसं काय ? " महेशने विचारलं. " सुरुवातीपासून सांगतो.... " सागर " यांचा खून झाला,त्याच्या दुसऱ्यादिवशी त्यांचा वाढदिवस होता, बरोबर. " ," बरोबर" ," आणि इतर ४ खूनही तेव्हाच झाले... प्रत्येकाच्या वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर... " महेशने प्रत्येकाच्या Date चेक केल्या. " हो...  रे , माझ्या लक्षातच नाही आलं.... " ," आणि पाचही व्यक्ती नावाजलेल्या होत्या त्यामुळे वाढदिवसासाठी पाहुणे अगोदरच आलेले होते, त्यांच्या घरी... त्यांच्या राहण्याची सोयही केलेली होती त्यांनी. याचाच फायदा आरोपीने घेतला..... त्या Guest पैकीच कोणीतरी खुनी आहे... " , " अरे पण अभी, सगळे पाहुणे V.I.P. आहेत ना .... आपण त्यांच्यावर पुराव्याशिवाय आरोप करू शकत नाही. " मी सगळ्या लिस्ट चेक केल्या, ज्या या सर्वांच्या बर्थडे पार्टीच्या होत्या... त्यात मला काही नावं common दिसली... असे एकूण १५ जण आहेत, कि ज्यांची नावं सगळ्या लिस्ट मध्ये आहेत.... अजून एक गोष्ट आहे. " ," ती कोणती? " ," सागर यांच्या बर्थडे लिस्ट मध्ये या इतर चार जणांचीही नावं होती." , " काय ? " डॉक्टर महेश उडालाच. " हो... शिवाय, यांचाही लिस्टमध्ये एकमेकांची नावं होती... याचा अर्थ कळला का तुला ? " , अभिने महेशला विचारलं... " हो.... याचा अर्थ असा कि हे सगळे एकमेकांना चांगले ओळखत होते…"," बरोबर बोललास अगदी. "

           " आणि त्या Letter वरून काय कळलं तुला ? " डॉक्टर महेशने अभिषेकला विचारलं." त्या Letter मध्ये काय लिहिलं आहे. " संगीतातले सात सूर कधीच वेगळे राहू शकत नाहीत... सप्तसुरांना मी एकत्र करणार... पुन्हा " .... तुला माहिती आहेत ना संगीतातले सात सूर कोणते ते ? " , " हो..... सा, रे, ग, म, प,ध,नी , सा.... " महेशने लगेच बोलून दाखवले," अरे , पण ' सप्तसूर' असं म्हटलं आहे ना त्या Letter मध्ये, मग सूर तर आठ आहेत ना... " महेशने अभिषेकला विचारलं," शेवटचा किंवा वरचा " सा " धरत नाहीत. त्यामुळे "सप्तसूर" असेच म्हणतात सगळीकडे. " ," हो... पण त्याचा इथे काय संबंध ? " ," संबंध आहे... या सगळ्यांच्या नावाचे पहिलं अक्षर बघ जरा आणि हे सूर बघ."," हो.... अगदी बरोबर.... "सा" वरून सागर , "रे" वरून रेशमा, "ग" वरून गजेंद्र,"म" वरून महेंद्र आणि "प" वरून परेश.... म्हणजे तो त्यांचाच खून करत आहे,ज्यांची नावं या सुरांवरून सुरु होतात." महेश बोलला," बरोबर, पण एक गोष्ट मला कळत नाही... या अक्षरांवरून कितीतरी जण आहेत... मग तो यांनाच का मारत आहे आणि का ? ... " ," कदाचित.... यांचा काहीतरी संबंध असेल एकमेकांशी किंवा त्या खुन्याशी... ","असेलही कदाचित... ते जर कळल तर पुढचे खून आपण थांबवू शकतो आणि त्यालाही पकडू शकतो." अभी बोलला. " एक मिनिट... " महेश मधेच बोलला,"आता तो " प " या सुरावर पोहोचला आहे... याचा अर्थ अजून दोन खून होणार आहेत ... ? " ," हो अजून दोन खून.... तरच " सप्तसूर " पुन्हा एकत्र येतील... अस त्याचं म्हणणं आहे... पण कोण आहेत ते दोघे जण.... खरंच…कोण असतील ते आणि त्यांना कोण मारणार असेल ? "

-----------------------------------------------------to be continued---------------------------------------------------

Followers